Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

३५ अनाधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेच्या अनाधिकृत नळ कनेक्शन शोध पथकाने शुक्रवारी शहरातील राजेंद्रनगर झोपडपट्टी, कदमवाडी परिसर, लक्षतीर्थ वसाहत, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, साई मंदिर, पुलगल्ली उमा टॉकिज, रजपूत गल्ली, शिंदे गल्ली, गोंधळी गल्ली, कागदी गल्ली या ठिकाणी कारवाई करून ३५ अनाधिकृत नळ कनेक्श्न तोडली. यामध्ये सर्वाधिक लक्षतीर्थ वसाहतीमध्ये १२, राजेद्रनगर झोपडपट्टीत ९ तर कदमवाडी परिसरात सहा अनाधिकृत पाणी कनेक्शन बंद करण्यात आली. आजअखेर एकूण २४१ अनाधिकृत पाणी कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन शोधणेची मोहिम राबविण्यात येत आहे. या करीता एकूण पाच पथके नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत शहरातील विविध ठिकाणी अचानक भेटी देवून अनाधिकृत नळ कनेक्शन तोडणेची कारवाई करण्यात येत आहे. जलअभियंता सुरेश कुलकर्णी, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या नियत्रंणाखाली पथकप्रमुख मोहन जाधव, के. टी. पाटील, संजय पाटील, भिकू कांबळे, रणजित संकपाळ, अमर बागल, पी. एस. माने, उदय पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॉडर्न होमिओपॅथी - होमिओपॅथीला विमा कवच देणार

$
0
0

फोटो आहे

होमिओपॅथीला विमाकवच देणार

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती, मॉर्डन होमिओपॅथी रिसर्च आणि ट्रिटमेंट सेंटर उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' भारतात डॉक्टर, संशोधक, केमिस्ट आणि अन्य घटकांमुळे होमिओपॅथी उपचार पद्धती उत्तमप्रकारे रुजली. देशातील खेडोपाड्यांमध्ये या उपचार पद्धतीचा स्वीकार केला असल्याने, या उपचार पद्धतीला विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नशील आहे', अशी ग्वाही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. कावळा नाका येथे स्थलांतर झालेल्या मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च आणि ट्रिटमेंट सेंटरच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन व कोनशिला अनावरणप्रसंगी ते बोलत होते. महापौर स्वाती यवजुले यावेळी प्रमुख उपस्थिती होत्या.

मंत्री नाईक म्हणाले, 'होमिओपॅथी उपचार पद्धतीने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑलिओपॅथी उपचार पद्धतीला ज्या सरकारी सुविधा व विमा संरक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे होमिओपॅथीला विमा संरक्षण देण्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नशील आहे. योगा, नॅचरोपॅथी, आयुर्वेदाप्रमाणे होमिओपॅथीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्रीय मंत्रालयाने १२ देशातील १५ विद्यापीठांसोबत होमिओपॅथी व योगाबाबतचे करार केले असून सरकारच्या वेगवेगळ्या पायलट प्रोजक्टमध्ये होमिओपॅथीचा समावेश केला आहे. राज्यात वैद्यकीय व्यवसायात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनामध्ये होमिओपॅथीचा समावेश करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी चर्चा करणार आहे. '

'सर्वसामान्य व्यक्तीला होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये कमीत कमी खर्च येत असल्याने ही सर्वात चांगली उपचार पद्धती आहे. रुग्णांनी या उपचार पद्धतीचा स्वीकार करताना आपली जीवनशैली, योग्य औषधोपचार करुन घेतल्यास आरोग्यदायी भारताचे स्वप्न साकार होईल. होमिओपॅथीमध्ये डॉ. विजयकुमार माने चांगले प्रयत्न करत आहेत. छोट्या स्वरुपात त्यांनी केलेल्या सेवेचे आज वटवृक्षामध्ये रुपातंर झाले आहे. होमिओपॅथी उपचार पद्धती गावोगावी पोहोचवण्यात डॉ. माने यांना उत्तमप्रकारे यश आले आहे.'

आमदार डॉ. सुजीत मिणचेकर म्हणाले, 'सद्य:स्थितीमध्ये फॅमिली डॉक्टर संकल्पना मागे पडत आहे. प्रत्येक रुग्णाला त्वरीत निरोगी व्हायचे असते. ऑलिओपॅथीमध्ये रुग्णांना तत्काळ आराम मिळतो, पण होमिओपॅथी उपचार पद्धतीमुळे रोगाचे समूळ उच्चाटन होते. केंद्र सरकारने होमिओपॅथीला ५० टक्के अनुदान द्यावे.'

डॉ. विजयकुमार माने म्हणाले, '१९९६ मध्ये अल्प जागेत होमिओपॅथी उपचार पद्धतीला सुरुवात केली. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 'मॉडर्न' नवीन वास्तू निर्माण होत आहे. ब्लड कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर आदी आजारांवर यशस्वी संशोधनाद्वारे उपचार करुन चांगले परिणाम मिळाले. वाजवी दरात समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत उपाचर करणे धेय्य असून देशात व राज्यात विविध ठिकाणी होमिओपॅथी सेंटर उभारण्याचा मानस आहे.'

यावेळी महापौर स्वाती यवलुजे, डॉ. संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंत्री नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. श्रीधर पाटील, डॉ. शिरीष पाटील, डॉ. अजय ताडे, डॉ. विकास मोहिते यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले. व्यस्थापकीय संचालक प्रेमकुमार माने यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर हालचाली

$
0
0

कोट्यवधी द्यायचे कुणी

महापौर निवडणुकीतील आर्थिक घडामोडींवरून नेत्यांचे एकमेकांकडे बोट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप व ताराराणी आघाडीचे नेते सक्रीय झाले आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक नाराज नगरसेवकावर नजर ठेवण्यात येत आहे. पण नाराज नगरसेवकांचा दर कोटीत जाण्याची चिन्हे असल्याने ही रक्कम द्यायची कुणी याबाबत दोन्ही आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे.

महापौर स्वाती यवलुजे यांची मुदत येत्या १५ मे रोजी संपत आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत नव्या महापौर निवडीसाठी सभा होईल. महापौर स्वाती यवलुजे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शेवटची सभा होणार आहे. यामुळे सोमवारची सभा संपताच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात येणार आहे. या दोन्ही पक्षातील काही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराज नगरसेवकांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचे समजते.

महापौरपदासाठी काँग्रेसकडून दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे, इंदुमती माने यांच्यासह अनेक नगरसेविका इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास काहीजण बंडाच्या तयारीत आहेत. यामुळे भाजपची नजर या नाराज नगरसेविकांवर आहे. राष्ट्रवादी पक्षातदेखील नाराजी आहे. विशिष्ट नगरसेवकांनाच सतत पदे दिली जात असल्याने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ या दोनच पक्षातच नाराज आहे असे नाही तर भाजप आणि ताराराणी आघाडीत देखील खदखद आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.

\Bमोठ्या ऑफरची चर्चा

\Bनगरसेवकांना फोडण्यासाठी कोटीत ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीत तीन कोटींचा व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत होते. दोन सदस्यासाठी तीन कोटी खर्च झाले असतील तर आता किमान आठ सदस्यांना फोडायचे असल्याने हा आकडा दहा कोटींच्यावर वर जाणार आहे. एवढी मोठी रक्कम द्यायची कुणी याबाबत सध्या दोन्ही आघाडीतील नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. महापौर निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत देखील पदाधिकरी बदलण्यात येणार आहेत. महापौर निवडीत अर्थव्यवहार झाल्यास त्याचे पडसाद जिल्हा परिषदेत देखील उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेत्यांना बराच हात सैल सोडावा लागणार आहे.

\Bशिवसेनेवरच भिस्त

\Bया निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य भाजप आघाडीला पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत सेनेने भाजपवर राग काढण्यासाठी थेट काँग्रेसला मदत करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेत ते भाजपला मदत करण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भगिनी महोत्सवाला उपस्थिती लावत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्षातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेचे चार नगरसेवक भाजपबरोबर आल्यास भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कारण राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक यापूर्वीच गळाला लागले आहेत. त्यांचे नगरसेवकपद टिकवायचे की घालवायचे हे सध्या तरी सरकारच्या हातात आहे. यामुळे नगरसेवकपद टिकवण्यासाठी ते भाजपच्या उमेदवारालाच मदत करतील अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम सुरू न झाल्यास २८ ला रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे काम १५ दिवसांत सुरू न झाल्यास २८ मे रोजी शिवाजी पूल येथे शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. पर्यायी पुलाच्या कामाबाबत आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. या कामामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्याशी चर्चा केली.

यावेळी क्षीरसागर म्हणाले,पर्यायी पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पुरातत्व विभागाच्या जाचक कायद्यामुळे थांबले आहे. या पुलाचे काम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करावे अशी ३० जानेवारी रोजी मागणी करूनही प्रशासन गप्प आहे. मोठी दुर्घटना घडून निष्पाप प्रवाशांचे बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का? असा सवालही आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. आता तातडीने हे काम सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा २८ मे रोजी शिवसेना स्टाइलने शिवाजी पुलावर रास्ता रोको करू असा इशारा यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाच्या ठिकाणीच पोलिसांना घरे

$
0
0

कामाच्या ठिकाणीच पोलिसांना घरे

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पोलिसांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे आणि कामाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणीच घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस मुख्यालयातही वसतिगृहाच्या धर्तीवर इमारती बांधल्या जाणार आहेत,' अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचे राजकारण स्वार्थी असल्याची टीका त्यांनी केली. अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राय यांच्यावर कोणताही दबाव नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'पोलिसांवरी ताण कमी व्हावा आणि त्यांच्याकडून दर्जेदार काम व्हावे, यासाठी कामाच्या ठिकाणीच निवासस्थाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. खासगी सदनिकांमध्ये पोलिसांना घरे मिळावीत यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पोलिसांना सोयीची घरे मिळणार आहेत. पोलिस मुख्यालयातही वसतिगृहांच्या धर्तीवर इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. बंदोबस्ताठी येणाऱ्या पोलिसांना थांबण्यासाठी अशी वसतिगृहे उपयुक्त ठरतील. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. यासाठी आर्थिक तरतूद केली जात आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री केसरकर यांनी दिली.

राणे स्वार्थी राजकारणी

नारायण राणे यांच्याबद्दल विचारणा केली असता केसरकर यांनी राणेच्या राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, 'राणे हे कोणत्या पक्षाचे घटक आहेत हे मला माहीत नाही. ते नेहमीच स्वार्थी भूमिका घेतात. ज्या व्यक्तींनी पदे दिली त्यांच्यावरच ते घसरतात. रायगडमध्ये राणेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरीही शिवसेनेवर याचा काहीच परिणाम होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांवरील आर्थिक फसवणुकीचे खटले जलदगती न्यायालयात चालवले जाणार आहेत, त्यामुळे लवकरच राजकारणातही स्वच्छता पाहायला मिळेल,' असा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज व्याख्यान

$
0
0

कोल्हापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर शाखेतर्फे रविवारी (ता. १३) अर्थविश्लेषक मिलिंद इनामदार यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. टेंबे रोडवरील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल. 'बँकिंग आर्थिक घोटाळा' असा त्याच्या व्याख्यानाचा विषय आहे. भाजप सरकारच्या काळात अनेक आर्थिक घोटाळे झाले आहेत. त्या संदर्भात इनामदार व्याख्यानातून आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश टाकणार आहेत. तरी व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन पक्षाचे शहर सेक्रेटरी एस. जी. काटाळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३२ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी

$
0
0

जि.प. लोगो

.......................

फोटो आहे.

जि. प. सभेत मान्यता, सर्वाधिक निधी बांधकाम विभागास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा वार्षिक नियोजन समितीमधून ग्रामिण भागातील विविध विकासकामे, मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळालेल्या १३२ कोटी ४९ लाख ४१ हजार रूपयांच्या आराखड्यास शुक्रवारी जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. आराखड्यात सर्वाधिक निधी बांधकाम विभागावर खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च एंडिंगची वाट न पाहता आराखड्यातील सर्वच कामे त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागाकडून नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीतून विकासकामे करण्यात येणार आहे. त्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यासाठी सभा आयोजित केली होती. आराखड्यातील अनेक कामांवर वादळी चर्चा झाली.

सदस्य शिवाजी मोरे म्हणाले, 'पुढील वर्षी मार्च महिन्याच्याआत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यानंतर विकासकामे करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे आराखड्यातील कामे तातडीने सुरू करावीत.' विजय भोजे म्हणाले, पंचगंगा काठावरील गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करावी. त्यातून संबंधित ग्रामपंचायतींना प्रकल्प बांधण्याची सक्ती करण्यासंबंधीचा ठराव करावा. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात सुमारे १८ हजार कॅन्सरग्रस्त रूग्ण सापडले आहेत. त्यांच्या उपचार विम्यासाठी ३० ते ४० लाख रूपये द्यावेत. त्यासंबंधीचे ठराव करावेत.'

जिल्हा नियोजन, क वर्ग पर्यटन, जन सुविधांमधून निधी वाटपात पक्षापतीपणा केल्याचा आरोप मनोज फराकटे, सतिश पाटील, पांडूरंग भांदिगरे यांनी केला. सत्ताधारी सदस्य आणि विरोधकांत २५ लाख निधींचा फरक असल्याचे फराकटे यांनी निदर्शनास आणले. ते म्हणाले, 'आम्ही विरोधात असलो तरी लोकप्रतिनिधी आहे. सभागृहात कोणीही स्वीकृत सदस्य नाहीत. त्यामुळे निधी वाटपात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनाही गृहीत धरावे. गृहीत धरणार नसाल तर आम्ही विरोधक मागे बसतो केवळ सत्ताधाऱ्यांनी सभागृह चालवावे.' त्यावर अध्यक्षा महाडिक यांनी विरोधी सदस्यांनाही निधी दिला आहे. तुमच्या बोरीवडे गावात १२ लाख दिल्याचे सांगितले. निधीतील पक्षपातीपणावर भांदिगरे यांनीही प्रश्न उपस्थित केला. त्यावर कोणत्याही सदस्यास २५ लाख रूपये दिले आहे, त्यांचे नाव सांगा अशी प्रतिप्रश्न भांदिगरे यांना महाडिक यांनी केली. त्यावर भांदिगरे यांनी सभागृहात नाव सांगण्यास नकार दिला. विरोधकांनाही निधी देताना झुकते माप द्यावे, अशी मागणी सतीश पाटील यांनी केले. अरूण इंगवले यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्राथमिक शाळांभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद विकास आराखड्यात करावी, अशी मागणी केली.

यावेळी अशोक माने, राहुल आवाडे, डॉ. पद्माराणी पाटील, सचिन बल्लाळ, प्रसाद खोबरे यांची चर्चेत भाग घेतला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरीश घाटगे, सर्जेराव पाटील - पेरीडकर, शुभांगी शिंदे, विशांत महापुरे यांच्यासह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

--------------------

चौकट

कोणत्या विभागास किती निधी ?

येत्या वर्षभरात विभागनिहाय खर्च होणारा निधी असा : अपारंपरिक ऊर्जा साधणे बसवणे : १ कोटी, पशुसंवर्धन : ३ कोटी ७२ लाख ४३ हजार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा : ८० लाख १८ हजार, पाणी व स्वच्छता : २५ कोटी ३७ लाख ९० हजार, ग्रामपंचायत : १६ कोटी ३५ लाख ७४ हजार, लघु पाटबंधारे : १० कोटी ७४ लाख २६ हजार, बांधकाम : ३० कोटी ८५ लाख ९० हजार, प्राथमिक शिक्षण : ८ कोटी १८ लाख ११ हजार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना : २ कोटी, आरोग्य : ६ कोटी ६७ लाख, ग्रामीण पाणी पुरवठा : २६ कोटी ५२ लाख, ८८ हजार, समाजकल्याण : २५ लाख.

---------------

चौकट

मराठा आरक्षणाचा ठराव

मराठा समाजास तत्काळ आरक्षण मिळावे, असा ठराव शिवाजी मोरे यांनी मांडला. तर लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे, स्वतंत्र धर्माला मान्यता मिळावी, असा ठराव प्रसाद खोबरे यांनी मांडला. दोन्ही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

--------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध दरवाढीचा सरकारी आदेश फाडला

$
0
0

फोटो आहे

...................

दूध दरवाढीचा सरकारी आदेश फाडला

दरवाढीची अंमलबजावणी नसल्याने काँग्रेसचे आंदोलक आक्रमक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दूध खरेदीचा सरकारचा आदेश डावलणाऱ्या दूध संघांवर फौजदारी दाखल करा, संघावरील प्रशासक नियुक्तींच्या नोटिशींचे काय झाले, वाढीव दर न देणाऱ्या दूध संघाबरोबर किती वेळा पत्रव्यवहार केला आदी मागण्या करत उत्पादकांना वाढीव दूध मिळत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलकांनी सरकारच्या आदेश फाडून टेबलवर फेकून दिला. विभागीय सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकांनी दुग्ध विकास अधिकारी सी. के. कांबळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व संजय पाटील यांनी केले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'दूध व्यवसायाकडे सरकार अनास्थेने पाहत आहे. खासगी संस्थांच्या दरावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे. शेतकरी संपाच्या धसक्याने सरकारने गाय व म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ केली. पण अतिरिक्त दुधाचे कारण पुढे करत सहकारी संघांनी प्रतिलिटर दोन रुपयांनी दर कमी केला. सरकारचा आदेश डावलला असल्याने अशा संघावर फौजदारी का दाखल करत नाही, दरवाढ करुनही मिळत नसल्याने उत्पादकांचे आतापर्यंत सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे उत्पादकांचे नुकसान होत असताना ग्राहकांना मात्र जुन्याच दराने दुधाची विक्री सुरू आहे. त्यामुळे उत्पादकांबरोबर ग्राहकांची दूध संघाकडून लूट सुरू आहे.

मुंबई येथील बैठकीमुळे विभागीय सहायक निबंधक अरुण चौगले कार्यालयात उपस्थित नसल्याने शिष्टमंडळाने सरकारच्या आदेश फाडून टाकत दुग्ध विकास अधिकारी कांबळे यांच्या टेबलावर फेकून दिला. दरवाढीबाबत त्वरीत निर्णय घ्या अन्यथा कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आला.

शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, बजरंग रणदिवे, योगेश हतलगे, तानाजी मोटे, संपत भोसले आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

(दोघांचे फोटो आहेत)

पोलिस ठाण्यात

आत्मदहनाचा प्रयत्न

बोंद्रेनगरातील तरुणावर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मारहाण झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या तरुणाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ज्ञानसागर नामदेव कोंडरे (वय ३०, रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. पोलिस नाईक सुधीर हेगडे-पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंडरे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर कोंडरे याला मारहाण करणारा ओंकार अरुण तडुळे (वय २८, रा. बोंद्रेनगर) याच्यावरही गुन्हा दखल करून दोघांनाही अटक केली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंद्रेनगर येथील ज्ञानसागर कोंडरे याच्याकडे त्याच परिसरातील ओंकार तडुळे याने स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी साडेचार हजार रुपये उसने मागितले होते. कोंडरे याने पैसे देण्यास नकार दिल्याने ओंकारने गुरुवारी रात्री त्याला मारहाण केली. यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ओंकारच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोंडरे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेला. तातडीने तक्रार दाखल करून घेण्याचा आग्रह त्याने धरला. 'माझी तक्रार घ्या, नाहीतर मी स्वत:ला पेटवून घेतो,' असे म्हणत त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेतले. पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याच्याकडील डिझेलची बाटली आणि काडीपेटी काढून घेतली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

दरम्यान, कोंडरे याला मारहाण करणारा ओंकार तडुळे याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तडुळे याला अटक केली. मारहाणीच्या घटनेत गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची चेन लंपास झाल्याचा उल्लेख कोंडरे याने फिर्यादीत केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा परिसराततरुणीची चेन लांबवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव परिसरात फेरफटका मारून घरी परत जाणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली. रविवारी (ता. ६) रात्री पावणेदहाच्या सुमारास अंबाई टँजवळ हा प्रकार घडला. याबाबत अंकिता जगदिश कालगावकर (वय २२, नरसोबा गल्ली, तासगाव, जि. सांगली) या तरुणीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता कालगावकर ही तरुणी तासगाव येथील असून, रंकाळा परिसरातील नातेवाइकांकडे सुटीसाठी आली आहे. रविवारी रात्री ती गायत्री कुलकर्णी या मैत्रिणीसह रंकाळा परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी परत जाताना अंबाई टँकजवळ आल्या असता, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी मागे बसलेल्या तरुणाने अंकिताच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून लांबवली. या घटनेनंतर दोघींनीही आरडाओडा केला, मात्र चोरटे भरधाव वेगाने निघून गेले. दोन्ही चोरट्यांनी तोंडावर काळे कापड बांधले होते. अंकिताने शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींच्या मागणीत वाढ

$
0
0

डाळींला मागणी वाढली

लोगो : बाजारभाव

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नसराई आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढल्याने दरात काहीशी वाढ झाली आहे. तसेच घरगुती वापरासाठी सर्वच प्रकारच्या डाळींच्या मागणीत वाढ झाली असून दरात किरकोळ वाढ झाली आहे. हरभरा, तूरडाळ, उडीदडाळीच्या दरात किलोमागे एक रुपयांची तर मटकी व मूग दरात किलोमागे पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. तर मसूरचा दर किलोमागे दहा रुपयांनी कमी झाला. भाजीपाल्याला अधिक मागणी असल्याने गृहिणी डाळ खरेदीला अधिक प्राधान्य देत महिन्याचा बजेटमध्ये समतोल साधत आहेत.

मुहूर्त नसल्याने अखेरच्या दोन दिवसांत विवाह समारंभाचा धुमधडाका सुरू असून त्यामुळे भाजीपाल्याच्या मागणी चांगलीच वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याने गृहिणी डाळी खरेदीला अधिक प्राधान्य देत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून डाळीच्या दरात फारसी चढउतार झालेली नाही. मात्र या आठवड्यात डाळींच्या दरात किरकोळ प्रमाणात वाढ झाली आहे. हरभरा, तूरडाळ व उडीदडाळीच्या दरात किलोगामे एक रुपयांची वाढ झाली असून मुगाचा दर एक रुपयाने कमी झाला. तर मटकी व मूग दरात पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. मसूरचा दरात चांगलीच घसरण झाली. ७० रुपये किलोप्रमाणे विक्री होणारा मसूरचा सध्या दर ६० रुपये झाला आहे.

इतर किराणामालाच्या घाऊक बाजारात फारसी चढउतार झालेली नाही. प्रतिक्विंटल साखरेच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात साखरेचा दर चार रुपयांनी कमी झाला होता. या आठडवड्यात ३२ रुपयांवर दर स्थिर राहिला आहे. घरगुती वापरासाठी चटणी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू असल्याने मसाले खरेदीमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली असली, तरी मिरची हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने मसाले खरेदी कमी होऊ लागली आहे.

............................

किराणा दर (किलोमध्ये)

पोहे : ४२ रु.

साखर : ३२ रु.

शेंगदाणा : ७५ रु.

मैदा : २८ रु.

रवा : २८ रु.

आटा : ३० रु.

गूळ : ४५ रू.

शाबू : ५५ रु.

तीळ : १४० रु.

..................

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ : ७० रु.

मूगडाळ : ७५ रु.

उडीदडाळ : ६५ रु.

हरभराडाळ : ५४ रु.

मसूरडाळ : ६० रु.

मूग : ७० रु.

मसूर : ६० रु.

चवळी : ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा : ४० ते ६० रु.

काळा वाटाणा : ७२ ते ८० रु.

मटकी : ८० रु.

छोले : १४० रु.

पावटा : १२० रु.

.................

तेलाचे दर (किलोमध्ये)

शेंगतेल : १२४ रु.

सरकीतेल : ९० रु.

खोबरेलतेल : ३०० रु.

वनस्पती तूप : ९० रु.

.....................

बार्शी शाळू: ३६ ते ४० रु.

ज्वारी नं. १ : ३२ ते ३४ रु.

ज्वारी नं. २ : २८ ते ३० रु.

बाजरी : १७ ते २४ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव रिक्षाच्या धडकेत चिमुरडा ठार

$
0
0

(फोटो आहे)

रिक्षाच्या धडकेत चिमुरडा ठार

भोसलेवाडीत धडकेनंतर रिक्षाचालकाचे पलायन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराबाहेर मित्रांसोबत खेळणाऱ्या साडेचार वर्षांच्या चिमुरड्याला भरधाव रिक्षाने शनिवारी चिरडल्याने आयुष संदीप भाकरे (रा. भोसलेवाडी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोसलेवाडीत दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. उपचारादरम्यान तीनच्या सुमारास आयुषला मृत घोषित केले. या घटनेने भाकरे कुटुंबीयाला धक्का बसला. अपघातानंतर रिक्षाचालक पळून गेला असून, पोलिसांनी रिक्षा ताब्यात घेतली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भाकरे हे टेम्पोचालक आहेत. भोसलेवाडीत माझी शाळेजवळ ते पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांची मोठी मुलगी श्रद्धा ही सहा वर्षांची असून, लहान मुलगा आयुष साडेचार वर्षांचा. पत्नी गृहिणी आहे. शनिवारी सकाळीच ते टेम्पो घेऊन कामासाठी बाहेर पडले. शाळेला सुटी असल्याने गल्ल्तील सर्वच मुले माझी शाळेच्या परिसरात खेळत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास आयुष हादेखील मुलांसोबत खेळण्यासाठी गेला. शाळेजवळ रस्त्याकडेला मुलांचा खेळ सुरू होता. खेळता-खेळता दुपारी एकच्या सुमारास आयुष रस्त्यावर आला. याचवेळी आलेल्या भरधाव रिक्षाने (एम. एच. ८ ई. ३३९५) आयुषला जोराची धडक देऊन १० ते १५ फूट फरफटत नेले. या अपघातात आयुषच्या डोक्यासह चेहरा, हात, पाय आणि छातीला गंभीर इजा झाली. अपघाताचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतील. धडक दिलेल्या रिक्षातूनच तरुणांनी आयुषला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.

गंभीर जखमा आणि रक्तस्रावामुळे आयुष बेशुद्धावस्थेत होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आयुषचे आई, वडील आणि भोसलेवाडी परिसरातील नागरिकांनीही रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. आयुषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट करताच त्याच्या आई, वडिलांनी आक्रोश केला. हसता-खेळता मुलगा अपघाताचा बळी ठरल्याने भाकरे दाम्पत्याला मानसिक धक्का बसला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

अपघातानंतर जखमी आयुषला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रिक्षाचालकाने पळ काढला. शाहूपुरी पोलिसांनी रिक्षा ताब्यात घेतली असून, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पोलिसांकडून रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.

\Bदोन तासांत होत्याचे नव्हते झाले

\Bभाकरे कुटुंबाचा उदरनिर्वाह टेम्पो व्यावसायावर सुरू आहे. भोसलेवाडीत हे चौकोनी कुटुंब आनंदाने राहत होते, मात्र शनिवारी भाकरे कुटुंबीयाच्या आनंदाला दृष्ट लागली. संदीप भाकरे टेम्पो घेऊन कामासाठी बाहेर गेले होते, तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त होती. याचवेळी आयुष खेळण्यासाठी बाहेर गेला. मित्रांसोबत तो खेळताना रस्त्यावर धावत गेल्याने त्याला रिक्षाने उडवले. यानंतर दोन तासात त्याने जगाचा निरोप घेतला. भाकरे कुटुंबासाठी अवघ्या दोन तासात होत्याचे नव्हते झाले. गोंडस आणि खेळकर मुलाच्या अपघाती मृत्यूने या कुटुंबाला धक्का बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमासाहेब क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा आज

$
0
0

क्रांती उद्यानाचे आज लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नव्याने विकसित केलेल्या सीपीआर परिसरातील चिमासाहेब महाराज चौकातील क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा आणि १८५७ च्या स्वातंत्रसंग्रामातील करवीर छत्रपती घराण्यातील क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (१३) सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब महाराज सांस्कृतिक मंडळाचे वैभवराज भोसले, प्रसाद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१८५७ च्या शतकपूर्ती महोत्सव साजरा करताना जिल्हा न्यायालयाशेजारी जागेत १९५७ मध्ये क्रांतीवीर चिमासाहेब महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याशेजारी स्मृती उद्यान विकसित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेतील स्मृती उद्यानाकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली आहे. उद्यानातील कोल्हापुरातील सर्वात मोठा कारंजा अनेक वर्षे बंद होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे क्रांतीवीर चिमसाहेब महाराज सांस्कृतिक मंडळाने लक्ष वेधल्यानंतर केएसबीपीच्या माध्यमातून उद्यानाचे सौंदयीकरण करण्यात आले आहे.

१८५७ च्या बंडात चिमसाहेब महाराजांचे योगदान मोठे असून त्यांच्या बलिदानाचा इतिहास दुर्लक्षित झालेला आहे. हे उद्यान प्रेरणास्त्रोत व्हावे या उद्देशाने उद्यान विकसित केले आहे. मूर्तीकार बाळ चव्हाण यांनी बनवलेला चिमासाहेबांचा ब्राँझचा पुतळा स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच १४० रनिंग स्क्वेअर फूट लांबीचा वर्तुळकार कारंजा सुशोभित केला आहे. उद्यानात शोभेची झाडे, हेरिटेज लाईट, डिजिटल लाईटव्दारे बागेचे सौंदयीकरण करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते लोकर्पण सोहळा होणार आहे. पत्रकार परिषदेला सूर्यराज भोसले, राहूल फल्ले, महादेव पाटील, केएसबीपीचे सुजय पित्रे, शकील भुसारी उपस्थित होते.

००००००

चिमासाहेबांना अभिवादन

दक्षिण भारतात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात कोल्हापुरातील इंग्रजाविरोधातील बंडाचे नेतृत्व छत्रपती चिमासाहेबांनी केले. १८४४ मध्ये कोल्हापुरातील गडकऱ्यांच्या उद्रेकाचे प्रेरणास्त्रोत चिमासाहेब होते. १८५७ च्या बंडात चिमासाहेबांनी उत्तरेतील नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी यांनी संपर्क ठेवला होता. इंग्रजाच्या ब्रिटीश पलटणीतील सैनिकांनी बंड केले. या बंडातील ३१ जणांना फाशी व तोफेच्या तोंडी दिले. या बंडाचे प्रमुख सुत्रधार म्हणून चिमासाहेबांना अटक करुन ब्रिटीशांनी त्यांना देवगडमार्गे कराचीला नेले. कराचीत ते ११ वर्षे कैदेत होते. १५ मे १८६९ मध्ये त्यांचे निधन झाले. कराचीमध्ये चिमासाहेबांची समाधीही बांधण्यात आली. चिमासाहेबांचे १८५७ च्या स्वातंत्र्यलढातील योगदान लक्षात घेऊन १९५७ मध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई टाळण्यासाठीच फिनेल प्राशन

$
0
0

कारवाई टाळण्यासाठीच

फिनेल फ्राशन

गुंड भालकरच्या चौकशी अहवाल सादर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांच्या कारवाईला घाबरून त्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठीच सराईत गुन्हेगार गौरव अशोक भालकर (वय २८, रा. सम्राटनगर) याने फिनेल प्राशन केल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनीच फिनेल पाजून मारहाण केल्याचा जबाब भालकरने करवीर पोलिसात दिला होता. निरीक्षक जाधव यांनी शनिवारी (ता. १२) हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला.

तडीपारीचा आदेश लागू केल्यानंतरही शहरात राहणारा गुन्हेगार गौरव भालकर याला पकडण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी (ता. ९) मध्यरात्री आर. के. नगर येथील घरात छापा टाकला होता. यावेळी पळून गेलेल्या भालकरने पोलिसांनीच फिनेल पाजून मारहाण केल्याचा जबाब करवीर पोलिसात दिला होता. त्याने फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत गौरव भालकरसह छापा टाकणारे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि शहाजी निकम आणि गजेंद्र लोहार यांच्या चौकशीचे आदेश अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले होते. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी भालकरसह राजारामपुरी पोलिसांची चौकशी करून शनिवारी (ता. १२) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. सराईत गुन्हेगार भालकर याने स्वत:च कारवाईला घाबरून पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन भालकर हा ओंकार इंदुलकर या साथीदारासह पळाला होता.

खासगी रुग्णालयात उपचार घेताना भालकरने दिलेल्या जबाबात राजारामपुरी ठाण्याचे सपोनि शहाजी निकम आणि गजेंद्र लोहार या दोघांनी फिनेल पाजल्याचा गंभीर आरोप केला होता. यामुळे पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. चौकशी अहवालानंतर पोलिसांवरील संशयाचे मळभ दूर झाले. दरम्यान, पोलिसांनी भालकरवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक केली जाणार आहे. तडीपारीच्या आदेशाचाही भंग केल्याने त्याच्यावर कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन - कृष्णाबाई प्रभू

$
0
0

कृष्णाबाई प्रभू

कोल्हापूर : पाटाकडील तालीम परिसरातील कृष्णाबाई दत्ताराम प्रभू (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता आहे.

००

वसंतराव माळवदे

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरातील तुळजाभवानी कॉलनीतील वसंतराव बहिरनाथ माळवदे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दैव नामदेव शिंपी समाजाचे सेक्रेटरी, शनिवार पेठेतील श्री ज्ञानेश्वर मंडप भजनी मंडळाचे खजिनदार होते. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी प्रबोधनाची मोहीम शनिवारपासून सुरू झाली. कावळा नाका येथे वाहतूक नियमांचे फलक घेऊन वाहनधारकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेतला. 'शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू' असे आवाहन वाहनधारकांना केले. शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी महिनाभर ही मोहीम राबवली जाणार आहे.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकंमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते, त्याचबरोबर अपघांताचीही धोका वाढतो. वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांकडून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. शनिवारी कावळा नाका येथे महापौर स्वाती यवलुजे, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, नगरसेवक संजय मोहिते, युनिक ऑटोमोबाइलचे सुधर्म वाझे यांच्या उपस्थितीत प्रबोधन मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहनधारकांना वाहतूक नियमांची माहिती दिली जात आहे. युनिक ऑटोमोबाइल, नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे, कोडोली येथील गनिमी कावा ग्रुपचे तरुण आणि पोलिसांनी यात सहभाग घेतला.

प्रबोधन मोहिमेच्या प्रारंभी बोलताना पोलिस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, 'वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांकडून नियमित प्रयत्न सुरू असतात. मात्र, वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने नियमांचे पालन होत नाही. आपल्याला वाहतुकीची शिस्त हवी असेल, तर नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्यामुळे कोणाची अडवणूक होऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घेतली तर, वाहतूक कोंडीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. पोलिसांसह काही स्वयंसेवी संस्थादेखील यासाठी रस्त्यावर उतरत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. यापुढे प्रबोधनाची गरज पडू नये याची खबरदारी वाहनधारकांनी घेतली पाहिजे.' महापौर स्वाती यवलुजे यांनी प्रबोधन मोहिमेचे स्वागत करून शहरातील मार्गदर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, ट्रॅफिक सिग्नल सुसज्ज ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.

यावेळी पोलिसांसह गनिमी कावा या ग्रुपच्या सदस्यांनी कावळा नाका चौकात वाहनधारकांना माहितीपत्रकांचे वाटप केले. झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नये, सिटबेल्टचा वापर करावा, रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवावी, रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास जागा द्यावी, ट्रीपलसिट प्रवास करू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे असे सांगत, 'शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू' असे आवाहन केले. पोलिस व्हॅनमधून वाहतूक नियमांची चित्रफीतही दाखवण्यात आली. यावेळी वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, प्रा. किरण पाटील, बिपीन मिरजकर, अभय देशपांडे, राहुल देसाई, गनिमी कावा ग्रुपचे संतोष हुजरे, अशोक पाटील, अमोल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

पथनाट्यातून होणार प्रबोधन

नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे हे केवायफोरएस या संस्थेच्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती वाहनधारकांपर्यंत पोहोचवणार आहेत. यासाठी पथनाट्यांचा आधार घेतला जाणार आहे. शहरातील विविध चौकात पथनाट्ये सादर करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. विशेष म्हणजे यात अंध विद्यार्थीही सहभाग घेणार आहेत. गुरुवारपासून (ता. १७) याची सुरुवात होणार असल्याची माहिती बगाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार

$
0
0

आंदोलन सुरुच

कोल्हापूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना ४८ तासात कामांवर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाने घेतला आहे. विविध मागण्यासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपासून राज्यस्तरीय आंदोलन सुरू केले आहे. सरकारने दहा दिवसांत मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने २१ एप्रिलला आंदोलन स्थगित केले. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर दहा दिवसांत कोणताच निर्णय न घेतल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य आरोग्य अभियान संचालकांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन बंद करून ४८ तासांत कामावर हजर रहावे, असा आदेश काढला आहे. कर्मचारी हजर न राहिल्यास नवीन भरती त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ४८ तासात हजर रहावे अन्यथा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पण सरकारने आश्वासन न पाळल्याने आंदोलन सुरुच राहील, असे कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊगर्दीने नेत्यांची डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत सत्तेची समीकरण जुळविताना नेत्यांनी अनेकांना शब्द दिला. कुणाला पदाची ऑफर दिली. मात्र अनेकांनी 'व्हायचं तर महापौर'म्हणत स्थायीसह अन्य पदे नाकारली. आता हे सारे इच्छुक महापौरपदासाठी पुढे सरसावले आहेत. विशेषत काँग्रेस आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. महापौरपदापदावर दावा सांगत इच्छुक समर्थकांसोबत स्वतंत्रपणे नेत्यांची भेट घेऊन फिल्डिंग लावत आहेत. दुसरीकडे विरोधी भाजप आघाडीच्या नेत्यांनी भाजपचा महापौर करण्यासाठी कंबर कसली आहे.

महापालिका निवडणुकीच्या कालावधीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेची गणिते जुळविताना अनेकांना पदाचा शब्द दिला. कुणाला महापौर तर कुणाला स्थायी समिती सभापतीपदाची ऑफर दिली. शिवसेनेच्या चार नगरसेवकांना सोबत घेऊन महापालिकेतील आघाडी भक्कम केली. गेल्या अडीच वर्षांत तीन महापौर झाले. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित आहे. यामुळे इच्छुकांनी अपेक्षा उंचावल्या आहेत. काँग्रेस आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. नगरसेविका शोभा बोंद्रे, नगरसेविका इंदुमती माने, नगरसेविका उमा बनछोडे, नगरसेविका निलोफर आजरेकर, नगरसेविका जयश्री चव्हाण यांची नावे महापौरपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्यापैकी बोंद्रे, माने व बनछोडे यांना गेल्या अडीच वर्षात कुठेच संधी मिळाली नाही.

गेल्या सभागृहात श्रीकांत बनछोडे, इंद्रजित बोंद्रे सभागृहात प्रतिनिधीत्व करत होते. बनछोडे यांची ज्येष्ठ नगरसेवकांत गणना व्हायची, पण पद वाटपाप्रसंगी त्यांचे नाव बाहेर पडायचे. सध्याच्या सभागृहात त्यांची सून उमा प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा होती. ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडून दुसऱ्यांना संधी दिल्यामुळे बनछोडे यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उमा बनछोडे यांची अडीच वर्षांत कुठल्याच पदावर निवड न झाल्यामुळे आता त्यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या सभागृहात इंद्रजित बोंद्रे यांनाही पद मिळाले नाही. या सभागृहात त्यांच्या आई प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्या अडीच वर्षांत तेही पदापासून लांब आहेत.

राहुल माने व त्यांच्या आई इंदुमती यांनी महापालिका सत्ता समीकरणात काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राहुल माने यांचे नाव यापुर्वी स्थायी सभापतिपदासाठी चर्चेत होते. आता महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने इंदुमती माने यांच्या नावाची चर्चा आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या निलोफर आजरेकर यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना नेत्यांनी महापौरपदी संधी देण्याची ग्वाही दिल्याचा त्यांचा दावा आहे. जयश्री चव्हाण, आजरेकर यांना स्थायी समितीवर सदस्य म्हणून संधी मिळाली आहे. आतापर्यंत ज्यांना महत्त्वाच्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्यांनी आता नेत्यांच्याकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची कसोटी लागणार आहे.

.........................

भाजप आघाडीतही इच्छुकांची रांग

भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीकडून नगरसेविका जयश्री जाधव या प्रमुख दावेदार समजल्या जात आहेत. भाजप आघाडीत इच्छुकांची संख्या मोठी असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा शब्द हा अंतिम असणार आहे. पालकमंत्र्यांनी वेळोवेळी महापालिकेत भाजपचा महापौर करण्यासाठी चमत्कार करू, असे सांगितले होते. पण त्यांना ते आजअखेर जमले नाही. भाजप आघाडीने स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पाडत फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. महापौरपदाची निवडणूक भाजप आघाडी ताकतीने लढविणार असल्याने सत्ताधारी आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. भाजपकडून सविता भालकर, स्मिता माने, रुपाराणी निकम, भाग्यश्री शेटके तेजस्विनी इंगवले यांच्या नावांचीही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखांच्या कॅमेरा लेन्सची चोरी

$
0
0

दहा लाखांच्या कॅमेरा लेन्सची चोरी

जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भवानी मंडप येथे शुटिंगसाठी आणलेल्या कॅमेऱ्याची दहा लाख रुपयांची लेन्स अज्ञाताने लंपास केली. सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसांच्या कालावधीत चोरीचा प्रकार घडला. याबाबत सुभाष सकरू काळे (वय ४२, मूळ रा. अंधेरी पश्चिम, मुंबई, सध्या रा. सिट्रस हॉटेल, शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी शनिवारी (ता. १२) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष काळे यांचा मुंबईत स्टुडिओ असून, चित्रीकरणाच्या कामासाठी ते कोल्हापुरात आले आहेत. शाहूपुरीतील एका हॉटेलमध्ये ते सहकाऱ्यांसह राहतात. चित्रीकरणासाठी ते सोमवारी आणि मंगळवारी कॅमेरे व लेन्स घेऊन भवानी मंडप येथे गेले होते. भवानी मंडप ते झोरबा हॉटेल या दरम्यान अज्ञाताने त्यांच्या कॅमेऱ्याची दहा लाख रुपयांची लेन्स लंपास केली. लेन्सची चोरी झाल्याचे लक्षात येताच काळे यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरट्यास पाठलाग करून पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तरुणीचा मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्यास वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस हवालदार सर्जेराव पाटील यांनी पाठलाग करून शिताफीने पकडले. सीपीआर चौकातील सिग्नलजवळ शनिवारी (ता. १२) दुपारी हा प्रकार घडला. अमित विलास कांबळे (वय २४, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) असे चोरट्याचे नाव आहे. वाहतूक पोलिस पाटील यांच्या दक्षतेमुळे सराईत चोरटा हाती लागला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी तरुणी शनिवारी सकाळी कॉलेजमध्ये गेली होती. दुपारी गावाकडे जाण्यासाठी ती टाऊन हॉल येथील बस स्टॉपवर पोहोचली. यावेळी अमित कांबळे या चोरट्याने तरुणीच्या हातातील मोबाइल हिसडा मारून घेऊन तो पळून जाण्यचा प्रयत्न केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून चौकात वाहतूक नियंत्रण करणारे शहर वाहतूक शाखेचे हवालदार सर्जेराव पाटील यांनी चोरट्याचा पाठलाग केला. सीपीआर चौकात त्याला पकडून मोबाइल काढून घेतला. त्यानंतर चोरट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. अमित कांबळे हा सराईत चोरटा असून, त्याच्यावर मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मीपुरी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images