Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भगिनी महोत्सवात स्त्री शक्तीला सलाम

$
0
0

भगिनी महोत्सवात स्त्री शक्तीचा गौरव

नसीमा हुरजूक, अश्विनी दानिगोंड यांना भगिनी पुरस्कार प्रदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा सहभाग, गीत नृत्याचा धमाकेदार आविष्कार आणि प्रेक्षकांचा शिट्ट्या, टाळ्यांचा वर्षाव अशा जल्लोषी वातावरणात रंगलेल्या भगिनी महोत्सवात स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रांत कर्तबगारी सिद्ध केलेल्या पाच महिलांचा भगिनी पुरस्कारांनी सन्मान करताच हजारो नागरिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना जणू सलाम ठोकला. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर रविवारी सायंकाळी हा दिमाखदार सोहळा झाला.

ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेत्री सरोज सुखठणकर, हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप संस्थेच्या नसीमा हुरजूक, उद्योजिका अश्विनी दानिगोंड आणि आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हर खुशी परमार यांचा भगिनी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर स्वाती यवलुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी मिसेस भगिनी स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या स्नेहल वैभव चौगुले, राजनंदिनी रामेश्वर पत्की, प्रिया कमलेझ नाझरे तर मिस भगिनीतील विजेत्या पूजा संकपाळ, साक्षी कमते, पूर्वा कोडोली यांना बक्षिसे देण्यात आली.

भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी महोत्सवाची संकल्पना स्पष्ट केली. ऋतुराज क्षीरसागर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, सुरेखा शहा, अजिंक्य चव्हाण, सुनंदा मोहिते, तेजस्विनी इंगवले, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, दिगंबर फराकटे, दिग्दर्शक यशवंत भालकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांढरे गावातील दोन गटातील ११ जणांवर गुन्हे दाखल

$
0
0

मारामारीप्रकरणी

११ जणांवर गुन्हे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मांढरे (ता. करवीर) येथे प्रेम विवाहाच्या कारणावरुन दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी करवीर पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे नोंदविले. बाजीराव भागोजी पाटील (वय ४५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग पाटील, विठ्ठल पाटील, पार्वती विठ्ठल पाटील, संगीता दिंडे, कृष्णात पाटील, अनिल दिंडे यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर पांडुरंग पाटील यांनी विरोधी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार बाजीराव पाटील, आकाश पाटील, रोहित पाटील, युवराज पाटील, भागोजी पाटील, वासंती पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमी रिक्षा चालकाचा मृत्यू

$
0
0

अपघातातील जखमी

रिक्षाचालकाचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे अपघातात गंभीर जखमी झालेले धोंडीराम राजाराम रेडेकर (वय ६५, रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ) यांचा उपचार सुरु असताना खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवारी मृत्यू झाला. ते विद्यार्थी वाहतूक रिक्षा व्यावसायिक होते.

धोडींराम रेडेकर हे कुटुंबिय व नातेवाईकांसह २८ एप्रिल रोजी पंढरपूर, तुळजापूर, शेगाव, अक्कलकोट येथे देशदर्शनास गेले होते. ३० एप्रिल रोजी मंगळवेढा येथे झालेल्या अपघातात त्यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मंगळवेढा येथे उपचार सुरु होते. अधिक उपचारासासाठी त्यांच्या नातेवाईकांना त्यांना कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावई असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीत महाडिक, क्षीरसागरांचा पक्ष कुठला?

$
0
0

पान ३ मेन

......................

तीन सिंगल फोटो

........

महाडिक, क्षीरसागर कुठे असणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी वाढविला संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अवधी असताना आतापासूनच प्रत्येकाकडून उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याविषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत. राजकीय संदिग्धता कायम असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आयोजित भगिनी महोत्सवाच्या व्यासपीठावरून बोलताना 'निवडणुकीच्या कालावधीत खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर कुठल्या पक्षात असतील माहीत नाही,' अशी गुगली टाकली.

प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित भगिनी महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसच्या महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी भगिनी महोत्सवानिमित्त एकत्र आले होते. महोत्सवाच्या माध्यमातून आमदार क्षीरसागर यांनी वातावरणनिर्मिती केली. भगव्या रंगाची शाल देऊन त्यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

'आमदार क्षीरसागर यांच्या भगिनी महोत्सवाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. मात्र, निवडणूक एक दिवसाची असते आणि निवडणूक संपली की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे ही माझी धारणा आहे. निवडणुका येतील त्यावेळी पुन्हा लढू, कोण कुठे असतील, हे सध्या सांगता येणार नाही,' असे म्हणत पालकमंत्र्यांनी राजकीय संभ्रम कायम ठेवला.

दरम्यान, भाजप, सेनेचे बिनसलेले संबंध आणि स्थानिक राजकारणावरून पालकमंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यात मध्यंतरी झालेले आरोप, प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने उत्सुकता वाढली होती. त्यासंदर्भात खुलासा करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'निवडणुका संपल्या की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे याची शिकवण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मला दिली. राजकारणात चांगल्या कामाची स्पर्धा करूया. विधायक कामासाठी चढाओढ असली की शहरातील प्रश्न संपुष्टात येतील. शहराशी संबंधित प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. निवडणुका येतील तेव्हा पुन्हा लढू' असे म्हणत त्यांनी खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर यांच्याकडे नजर टाकली. त्यांना उद्देशून 'निवडणुकीच्या कालावधीत महाडिक, खासदार कुठल्या पक्षात असतील माहीत नाही. आमदार क्षीरसागर व वैशाली क्षीरसागर यांनी भगिनी महोत्सवात सातत्य ठेवताना त्यातील विविधता वाढवली, महिलांचे सक्षमीकरण केले. महिलांना रोजगाराच्या संधी, त्यांचे कर्तृत्व उंचावणे हे महत्वाचे काम आहे. '

प्रास्ताविकात आमदारांनी महोत्सवाच्या आठ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. महिला सक्षमीकरण व बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे नमूद केले.

................

माजी मंत्र्यांनी आत्मविकास साधला

खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. खासदार महाडिक म्हणाले, 'पालकमंत्र्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी ४०८ कोटींचा निधी दिला. खड्डेमुक्त रस्ते, पाच रुपयांत चपाती-भाजी, नवदुर्गा महोत्सव, फ्लॉवर फेस्टिव्हल, आडवाटेवरचं कोल्हापूर यांसारख्या उपक्रमांतून कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण केली. कोल्हापुरात यापूर्वी काही मंत्री होऊन गेले, पण त्यांनी कोल्हापूरचा विकास सोडून आत्मविकास साधला असा टोलाही आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला.

.........

खासदार व महापौरांनी नावाचा उल्लेख टाळला

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व महापौर स्वाती यवलुजे यांनी भाषणात एकमेकांच्या नावाचा उल्लेख टाळला. दोघांनीही व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या नावांचा उल्लेख केला. मात्र, एकमेकांच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे कार्यक्रमस्थळी चर्चा रंगली.पालकमंत्री पाटील यांनी माजी नगरसेवक सुनील मोदी यांचा उल्लेख 'आमचे मित्र व शिवसेनेचे नेते' असा करताच कार्यक्रमस्थळी हंशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८ पासून बेमुदत उपोषण

$
0
0

बेमुदत उपोषण

कोल्हापूर

बांधकाम कामगार असल्याचा दाखला पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेतच देण्यात यावा, या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे आठ मे पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष गुणवंत नागटिळे, उपाध्यक्ष संजय सुतार यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे. कामगार असल्याचा दाखल मिळत नसल्याचे नोंदणीचे काम थांबले आहे. त्यामुळे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

--------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साप्ताहिक बाजारभाव - भाजीपाल्याचे दर वाढू लागले

$
0
0

साप्ताहिक बाजारभाव... लोगो

...............

भाजीपाल्याचे दर वाढू लागले

कलिंगडाचा हंगाम समाप्तीकडे, हापूस आंब्याची मोठी आवक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर होऊ लागला आहे. आवक कमी होऊ लागल्याने भाजीपाला व पालेभाजीच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. प्रत्येक फळभाजीच्या दरात सरासरी दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. मेथी वगळता इतर पालेभाज्यांची आवक पूर्णपणे थांबली आहे. कलिंगडाचा हंगाम समाप्तीकडे जात असताना हापूस आंब्याची आवक मात्र चांगलीच वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याच्या डझनाचा दर सरासरी २०० ते ८०० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. पुढील दिवसांत हापूसची आणखी आवक वाढत जाणार आहे.

गळीत हंगाम संपल्यानंतर भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली होती. गेल्या चार महिन्यांपासून भाजीपाल्याची ‌आवक वाढल्याने दरात प्रचंड घसरण होऊन त्याचा फटका उत्पादकांना बसला होता. फ्लॉवर, कोबीला कवडीमोल दर मिळत होता. सध्या मात्र वाढत्या उन्हाचा भाजीपाला उत्पादनावर चांगलाच परिणाम दिसून येत आहे. तसेच उसामध्ये भाजीपाल्याचे घेतलेल्या आंतरपिकांची काढणी पूर्ण झाल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. आवक मंदावल्याने दरामध्ये हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

वांगी, टोमॅटो, भेंडी, ढबू मिरची, जवारी गवार, दोडका, कारली या सर्वच फळभाज्यांच्या दरात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. पालेभाजीमध्ये मेथी वगळता चाकवत, पोकळाची आवक पूर्णपणे थांबली असून पालक व शेपूची आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. पुढील एक ते दीड महिन्यामध्ये भाजीपाल्याची आवक आणखी कमी होणार आहे.

चौकट

कलिंगडाचा हंगाम समाप्तीकडे

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कलिंगडांची आवक सुरू झाली होती. मार्च महिन्यापासून मात्र आवक प्रचंड वाढली होती. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेसह शहराच्या अनेक चौकांमध्ये कलिंगडांची विक्री जोरात सुरू होती. सरासरी ३० ते १०० रुपये दराने एका नगाची विक्री सुरू होती. उन्हाच्या तीव्र झळा असताना कलिंगड खरेदीसाठी ग्राहक विशेष पसंती देत होते. गेल्या चार दिवसांपासून कलिंगडांची आवक कमी होऊ लागल्याने हंगाम संपत चालला आहे.

.....................

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)

वांगी - ४०

टोमॅटो - १०

भेंडी - ४०

ढबू मिरची - ३०

जवारी गवार - ७०

दोडका - ५०

कारली - ३०

ओली मिरची - ४०

काकडी - ४०

..............

कांदा - १२ ते १५

बटाटा - ३०

लसूण - ३० ते ४०

आले - ४०

................

पालेभाजी दर (पेंडी, रुपयांत)

मेथी - १५

पालक - १०

शेपू - १०

कोथिंबीर - २५

.................

फळांचे दर (प्रतिकिलो)

संत्री - १००

मोसंबी - ४०

डाळींब - २० ते ४०

सफरचंद - १२० ते १८०

चिकू - ४०

केळी - २५ ते ३० रु. डझन

जवारी केळी - ४० ते ५० रु. डझन

कलिंगड - ३० ते ७० रु. नग

हापूस आंबा - २०० ते ८०० रु. डझन

पेटी (४ ते ५ डझन) - दोन ते चार हजार रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूरचे तिघे अपघातात ठार

$
0
0

फोटो

...............

जयसिंगपूरचे अपघातात तिघे ठार

मिरज-जत मार्गावर दुर्घटना, विवाहसोहळा आटोपून परतताना काळाचा घाला

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

मिरज-जत मार्गावर कोकळेजवळ आयशर टेम्पो आणि बीट कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात जयसिंगपूरचे तिघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विवाह सोहळ्यानंतर जयसिंगपूकडे येताना हा अपघात झाला.

विशाल सदाशिव माळी (वय २३), सुभाष मारूती चव्हाण (वय ३१, दोघेही रा.राजीव गांधीनगर जयसिंगपूर), लखन भीमराव मोहिते (वय ३०, रा.शिरोळ) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात सचिन प्रकाश मोहिते (वय २२, रा.राजीव गांधीनगर जयसिंगपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मिरज येथील सिव्हील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जयसिंगपूर येथील विजय साळुंखे याचा विवाह सोहळा रविवारी जत येथे होता. या सोहळ्यासाठी विशाल माळीसह अन्य तिघेजण बीट कार (क्रं.एम.एच.०९ सीएम ९९७६) मधून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेले होते. विवाह सोहळ्यात जेवण करून ते जयसिंगपूरकडे येत होते. जत- मिरज मार्गावरील कोकळेजवळ समोरून येणाऱ्या आयशर टेंम्पो (क्रं.एपी ०४ टीडब्ल्यू २०६३) शी बीट कारची धडक झाली. दोन्ही वाहनांचा समोरासमोर झालेला हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील विशाल माळी, सुभाष चव्हाण व लखन मोहिते हे जागीच ठार झाले तर सचिन मोहिते हा गंभीर जखमी झाला.

अपघातस्थळाचे दृश्य अत्यंत हृदय हेलावणारे होते. कारमध्ये मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रक्तामासांचा सडा सर्वत्र पडला होता. तर कारचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर वाहनधारकांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमींना तातडीने मिरज येथील सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर मृतदेह कवठेमहांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, अपघाताचे वृत्त जयसिंगपूर येथे समजताच राजीव गांधी नगरमध्ये शोककळा पसरली. मृत व जखमींचे मित्र तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृत विशाल माळी हा शिवसेनेच्या ग्राहक कक्षाचा जयसिंगपूर शहर प्रमुख होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. लखन मोहिते हा वीटभट्टीवर काम करीत होता. मूळचा जत तालुक्यातील लखन शिरोळ येथे राहात होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सुभाष चव्हाण हा इंटेरिअर डिझायनर होता. सायंकाळी चायनीज पदार्थांची विक्री करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. अभिनयाची त्याला आवड होती. जयसिंगपूर येथील नाट्यशुभांगी या संस्थेत विविध नाटकात तो काम करीत होता. 'भरत बाहुबली' या नाटकाबरोबरच 'सलवा जुडूम' या एकांकिकेत त्याने अभिनय केला होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, आई, वडील, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षीचा कृतिशील एकात्मतेचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'समता प्रस्थापित करायची असल्यास जातीयता नष्ट केली पाहिजे, असा सिद्धांत मांडताना राजर्षी शाहू महाराजांनी कृतिशीलतेतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आंतरराजीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीअंताचा लढा सुरू केला. जातीनिहाय स्थापन झालेल्या विद्यार्थी वसतिगृहातून राष्ट्रीय एकात्मतेचे शिक्षण देणारे विद्यार्थी घडले. वसतिगृहातील हेच विद्यार्थी सामाजिक चळवळीत अग्रेसर राहिले,' असे प्रतिपादन प्राचार्य टी. एस. पाटील यांनी केले.

शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता' त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

प्राचार्य पाटील म्हणाले, 'भारतीय स्वातंत्र्य लढा, राज्यघटना आणि सामाजिक चळवळीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. तत्पूर्वी इ.स पूर्व शतकात परकीय आक्रमणे झाली. त्यानंतर मोगलांची आक्रमणे झाली. जुलमी सत्तेविरोधात सर्वांना सोबत घेऊन राजसत्ता स्थापन करण्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना यश आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रभाव शाहूंवर होता. राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी शाहू महाराजांनी मोठे प्रयत्न केले. वेदोक्त प्रकरणानंतर तर त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. संस्थानातील नागरिकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जातीनिहाय वसतिगृहांची स्थापना केली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयीत्वाची जाणीव करुन दिली. त्यामुळेच या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुढील सामाजिक चळवळीत अग्रेसर राहिले.'

प्राचार्य पाटील म्हणाले, 'जाती मोडल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य शक्य नसल्याने त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन जातीअंताचा लढा सुरू केला. यासाठी स्वत: कृतिशील राहिले. वेदोक्त प्रकरणानंतर त्यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भाषणातून जातीभेद नष्ट करण्याचे आवाहन करुन राष्ट्रीय एकात्मतेला अधिक चालना देणारी होती.'

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. पवार म्हणाले, 'ज्या देशातील लोक बंधूभावाने वावरतात, ज्या समाजात एकमेकांबद्दल आपलेपणा वाटतो ते राष्ट्र होय. ज्यांनी समतेच्या तत्त्वाचा उद्घोष केला, समतेचे आचरण केले ते राष्ट्रपुरुष होय. राष्ट्र म्हणजे केवळ राजकीय अधिकार असणारे लोक नव्हे, तर समता, बंधूता ज्या समाजात आहे, ते राष्ट्र होय. अशा समाजातील लोकांना छत्रपती शाहू महाराजांनी माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार दिला. असा अधिकार देताना स्वकृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.'

ट्रस्टचे विश्वस्त विवेक आगवणे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार डॉ. सुरेश शिखरे यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीत महाडिक, क्षीरसागरांचा पक्ष कुठला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अवधी असताना आतापासूनच प्रत्येकाकडून उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याविषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत. राजकीय असंदिग्धता कायम असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आयोजित भगिनी महोत्सवाच्या व्यासपीठावरून बोलताना 'निवडणुकीच्या कालावधीत खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर कुठल्या पक्षात असतील माहीत नाही,' अशी गुगली टाकली.

प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित भगिनी महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसच्या महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी भगिनी महोत्सवानिमित्त एकवटले. महोत्सवाच्या माध्यमातून आमदार क्षीरसागर यांनी वातावरणनिर्मिती केली. भगव्या रंगाचा शाल देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.

'आमदार क्षीरसागर यांच्या भगिनी महोत्सवाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. मात्र, निवडणूक एक दिवसाची असते आणि निवडणूक संपली की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे ही माझी धारणा आहे. निवडणुका येतील त्यावेळी पुन्हा लढू, कोण कुठे असतील? हे सध्या सांगता येणार नाही,' असे म्हणत पालकमंत्र्यांनी राजकीय संभ्रम कायम ठेवला.

दरम्यान भाजप, सेनेतील बिनसलेले संबंध आणि स्थानिक राजकारणावरून पालकमंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यात मध्यंतरी झालेले आरोप, प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने उत्सुकता वाढली होती. त्यासंदर्भात खुलासा करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'निवडणुका संपल्या की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे याची शिकवण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मला दिली. राजकारणात चांगल्या कामाची स्पर्धा करूया. विधायक कामासाठी चढाओढ असली की शहरातील प्रश्न संपुष्टात येतील. शहराशी संबंधित प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. निवडणुका येतील तेव्हा पुन्हा लढू' असे म्हणत पालकमंत्री पाटील यांनी खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर यांच्याकडे नजर टाकली. त्यांना उद्देशून 'निवडणुकीच्या कालावधीत महाडिक, खासदार कुठल्या पक्षातील माहीत नाही. आमदार क्षीरसागर व वैशाली क्षीरसागर यांनी भगिनी महोत्सवात सातत्य ठेवताना त्यांनी विविधता वाढवली. महिलांचे सक्षमीकरण केले. महिलांना रोजगाराच्या संधी, त्यांचे कर्तृत्व उंचावणे हे महत्वाचे काम आहे.ध्येय नक्की असेल तर माणूस थकत नाही.'

प्रास्ताविकात आमदारांनी महोत्सवाच्या आठ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. महिला सक्षमीकरण व बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे नमूद केले.

................

माजी मंत्र्यांनी आमत्मविकास साधला

खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. खासदार महाडिक म्हणाले, 'पालकमंत्र्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी ४०८ कोटींचा निधी दिला. खड्डेमुक्त रस्ते, पाच रुपयांत चपाती-भाजी, नवदुर्गा महोत्सव, फ्लॉवर फेस्टिव्हल, आडवाटेवरचं कोल्हापूर यांसारख्या उपक्रमांतून कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण केली. कोल्हापुरात यापूर्वी काही मंत्री होऊन गेले, पण त्यांनी कोल्हापूरचा विकास सोडून आत्मविकास साधला असा टोलाही खासदार महाडिक यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांना लगावला.

.........

खासदार व महापौरांनी नावाचा उल्लेख टाळला

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व महापौर स्वाती यवलुजे यांनी भाषणात एकमेकांच्या नावाचा उल्लेख टाळला. दोघांनीही व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, एकमेकांच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे कार्यक्रमस्थळी चर्चा रंगली. पालकमंत्री पाटील यांनी माजी नगरसेवक सुनील मोदी यांचा उल्लेख 'आमचे मित्र व शिवसेनेचे नेते' असे करताच कार्यक्रमस्थळी हंशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावली गायब

$
0
0

'झिरो शॅडो'चा अद्भुत चमत्कार

कोल्हापुरात खगोलप्रेमींनी घेतला अनुभव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माणसाची सावली त्याला आयुष्यभर सोबत करते. तसेच अनेकदा 'मी सावलीसारखा तुझ्या पाठीशी राहीन' अशी वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. पण हीच सावली काही सेकंद तुमची साथ सोडते, असा दुर्मिळ योग रविवारी कोल्हापुरातील खगोलप्रेमींना अनुभवायला मिळाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजता झिरो शॅडोचा अद्भुत चमत्कार पाहता आला. निमित्त होते 'झिरो शॅडो डे' अर्थात शून्य सावली दिवसाचे.

कर्कवृत्त व मकर वृत्तामध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोनवेळेला शून्य सावलीचा अनुभव येतो. कर्कवृत्ताच्या वरील व मकरवृत्ताच्या खालच्या भागातील लोकांना या शून्य सावलीचा आनंद घेता येत नाही. पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते, त्याला २३.५ डिग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आमनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. या दिवशी सूर्याची किरणे विषुवृत्तावर वरून पडतात. त्यामुळे विषुवृत्तावरती आपण कोठेही उभा असलो, तरी काही काळासाठी आपली सावली गायब होते. यानंतर तीन महिन्यांनंतर मकर वृत्तावरती त्याच्या तीन महिन्यांनी पुन्हा विषुवृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यांनी कर्कवृत्तावर शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

०००

कर्कवृत्त व विषुवृत्त या दोन स्थानांच्या मध्ये सूर्याची किरणे १६.७४ डिग्री उत्तर या रेखावृत्तावर पडल्याने त्यामध्ये येणाऱ्या सर्व जागांवर काही सेकंदांपर्यंत शून्य सावलीचा आनंद घेता आला. कोल्हापुरात हा अनुभव रविवारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे चार सेकंदांपर्यंत म्हणजेच ५२ सेकंदांपर्यंत पाहता आला.

डॉ. मिलिंद कारंजकर,

विभागप्रमुख, पदार्थ विज्ञान विभाग, विवेकानंद कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनएसयुआयच्या जिल्हाध्यक्षपदी पार्थ मुंडे

$
0
0

एनएसयूआयच्या

जिल्हाध्यक्षपदी मुंडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी पार्थ श्रीहरी मुंडे यांची निवड झाली. काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणून ओळख असलेल्या एनएसयूआयमध्ये अंतर्गत निवडणूक होते. यामधून जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस व सचिवपदांचा समावेश असतो. कोल्हापुरातून १७ हजार सभासदांची नोंदणी केली होती. त्यापैकी १७०० सभासदांची मतदार म्हणून निवड केली होती. एक मे रोजी झालेल्या मतदानात मुंडे यांनी २४३ मते मिळवून जिल्हाध्यक्षपदी विजय मिळवला, तर सरचिटणीसपदी शुभम तोरस्कर यांनी निवड झाली. निखिल कांबळे, शरद यादव, निखिल कोळी, उज्ज्वला तेली यांची सचिवपदी निवड झाली. निवडीसाठी आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, गुलाबराव घोरपडे, आदींचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता बेपत्ता

$
0
0

विवाहिता बेपत्ता

कोल्हापूर : आंबवडे (ता. पन्हाळा) येथील विवाहिता विनया भरत पाटील (वय २५) घरगुती भांडण झाल्याने घरी न सांगता २३ एप्रिलला निघून गेल्या आहेत. पन्हाळा पोलिस ठाण्यात नवनाथ बापू पाटील यांनी फिर्याद दिली आहे. विनया अंगाने सडपातळ असून, उंची पाच फूट तीन इंच, चेहरा उभा, रंगाने गोरी असून केस लांब आहेत. अंगात गुलाबी रंगाची साडी, हिरव्या रंगाचे ब्लाऊज, स्कार्प घातला आहे. अशी महिला आढळल्यास ८२०८२४८७४३, ८७६६४१२३०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील कुटुंबीयांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नलिनी डवरला सकल मराठा समाजाची आर्थिक मदत

$
0
0

नलिनी डवरला

आर्थिक मदत

कोल्हापूर : शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर हिला सकल मराठा समाजाच्या वतीने ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. ही मदत अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सुपूर्द केली. ऑलिम्पिकचे ध्येय बाळगलेल्या पनोरी (ता. राधानगरी) येथील नलिनीने दिव्यांग गटात गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी या क्रीडा प्रकारात तब्बल ६५ बक्षिसे मिळवली आहेत. या कामगिरीची दखल घेऊन तिला नुकताच शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला. आर्थिक स्थिती बेताची असल्याने नलिनीला शिवणकाम करावे लागत आहे. नलिनीने खेळात सक्रिय राहावे, यासाठी सकल मराठा समाजाने ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. मदतीसाठी दिलीप देसाई, जयेश कदम, सतीश कडुळकर, सचिन तोडकर, विजय जाधव, राजू लिंग्रज, बुरहान नायकवाडी यांनी प्रमुख भूमिका घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’साठी सात हजार विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभरातील शासकीय, शासन अनुदानित, खासगी तसेच अभिमत विद्यापीठातील एमबीबीएस आणि बीडीएस शाखांच्या प्रवेशासाठी रविवारी (ता.६) शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सामाईक परीक्षा (नीट) सुरळीत पार पडली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या या परीक्षेला ७,०८६ पैकी ६,९३६ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. निर्धारीत वेळेपूर्वी परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी पोहोचू न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

देशभरातील एमबीबीएसच्या ६४ हजार तसेच बीडीएसच्या २७ हजार जागांसाठी नीट परीक्षेतून गुणानुक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच बीएएमएस व बीएचएमएससह उर्वरित शाखांचे प्रवेश या परीक्षेतून होणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी या प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. कोल्हापुरातील १३ केंद्रावर होणाऱ्या परीक्षेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातून परीक्षार्थी आले होते. विवेकानंद कॉलेज, छत्रपती शाहू विद्यालय, कमला कॉलेज, राजर्षी शाहू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूल, न्यू मॉडेल, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल, विबग्योर स्कूल, शांतिनिकेतन, एसएम लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, संजय घोडावत कॉलेज आणि गोखले कॉलेज अशा १३ केंद्रांवर परीक्षा झाली. ७२० गुणांच्या परीक्षेला सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वीच नऊ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजेरी लावली होती. परीक्षेला ड्रेस कोडची सक्ती करण्यात आल्याने सर्व परीक्षार्थींची तपासणी करुनच परीक्षा हॉलमध्ये सोडले जात होते. हेअर पीन, कॉलर शर्ट, टी-शर्ट, घड्याळ, पेन आदी वस्तूंना प्रतिबंध घातला होता. विद्यार्थ्यांनी फक्त हॉल तिकिट, आधार कार्ड व दोन आयकार्ड साइज फोटोसह उपस्थिती लावण्याच्या सूचना असल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतरच पेपर सोडवण्यासाठी पेन देण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत दिलेल्या सूचनाची माहिती इंटरनेटवरून घेऊनच परीक्षेला हजेरी लावली होती.

फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या तीन विषयाची ७२० गुणांची एकत्रित प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री प्रत्येकी ४५ व बायोलॉजी ९० अशा १८० प्रश्नांची परीक्षा झाली. 'फिजिक्स विषयाचा प्रश्न काहीसे अवघड असले तरी बायोलॉजी व केमिस्ट्रीचे प्रश्न सोपे असल्याने सुमारे ३५० पर्यंत कट ऑफ पॉइंट येणार असल्याचे सांगलीतील परीक्षार्थी सोनाली ठोंबरे यांनी सांगितले.' 'सर्व विषयाचे पेपर सोपे असल्याने यावर्षी कट ऑफ पॉइंट वाढणार असल्याची शक्यता इचलकरंजी येथील निलाधर झपाटे याने व्यक्त केली. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्रवेश परीक्षेनंतर प्रसिद्ध होणाऱ्या गुणवत्ता यादीनुसार थेट सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार असल्याने प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेचा तणाव परीक्षार्थींसह पालकांच्या चेहऱ्यांवर स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे संपूर्ण परीक्षा संपेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर पालक जागा मिळेल, तेथे बसून होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक पालकांनी तीन तास झाडांच्या सावलीत ठाण मांडले होते.

.......

नीट परीक्षेसाठी परीक्षार्थींना करण्यात आलेल्या ड्रेसकोडची माहिती इंटरनेटवरुन घेतली होती. याचे काटेकोर पालन केल्याने काही अडचण आली नाही. मात्र विद्यार्थिनींच्या ड्रेसकोडबाबत नव्याने बदल करण्याची आवश्यकता आहे.

सुभाष निरुके, पालक, कुडित्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक ओपनिंग

$
0
0

चित्रकला कार्यशाळा,

कीर्तन, व्याख्याने

कोल्हापूर टाइम्स टीम

या आठवड्यात चित्रकलेची प्रात्यक्षिके, संत चरित्र या विषयावर कीर्तन आणि शिक्षणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांची व्याख्याने ऐकण्याची संधी मिळणार आहे. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट येथे येथे ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांचे व्यक्तिचित्रणविषयक कार्यशाळा आयोजित केली आहे.

प्रोबस ज्येष्ठ नागरिक संघ आणि डॉ. अरगडे ट्रस्टतर्फे अरविंद दीक्षित यांचे 'चला, जीवनात बदल घडवू या' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. मंगळवारी (ता.८) सायंकाळी ५.३० वाजता अरगडे हॉस्पिटल बेसमेंट सभागृह, राजारामपुरी आठवी गल्ली येथे व्याख्यान होणार आहे.

श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे अपर्णा सहस्रबुद्धे यांचे मंगळवार (ता. ८) ते शुक्रवार (ता.११) या कालावधीत 'संतचरित्र' विषयावर कीर्तन आयोजित केले आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर गारेच्या गणपतीसमोर रोज रात्री ७.३० वाजता कीर्तन होईल. येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये १४ ते २४ मे या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांच्या व्यक्तिचित्रण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत रेखांकन, चारकोल, जलरंग, तैलरंग माध्यमात प्रत्यक्ष मॉडेलचे व्यक्तिचित्रण पाहता येईल.

..............

आज 'शिक्षण'विषयक चर्चासत्र

शहीद भगतसिंग यूथ स्टुडंट्स फेस्टस्हलअंतर्गत सोमवारी (ता.७) दिवसभर शिक्षणविषयक चर्चासत्र होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत विविध सत्रे होणार आहेत. सकाळी दहा वाजता 'विद्यार्थी चळवळीची दिशा' विषयावर वक्ते जयंत जिग्यासू यांचे व्याख्यान होईल. अमरिता पाठक यांचे सकाळी ११ वाजता 'शिक्षण रोजगार व नवउदारमतवाद','भौतिकवाद ऐतिहासिक व व्दंद्वात्मक' आणि 'प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया व नवउदारमतवाद' या विषयावर व्याख्यान होईल. इंटरप्रिटेशन सभागृह, हॉटेल टुरिस्ट शेजारी पन्हाळा येथे फेस्टिवल सुरू आहे.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६२ जोडपी विवाहबंधनात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर, पोलिस बँडची धून, पाहुण्यांच्या भूमिकेत सरकारी अधिकाऱ्यांची लगबग, पुष्प पाकळ्यारूपी अक्षतांचा सुगंधी वर्षाव अशा मंगलमय, उत्साही वातावरणात रविवारी सामुदायिक विवाह सोहळा झाला. फटाक्यांची आतषबाजी, डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत विधायक संदेश दिला. येथील धर्मादाय आयुक्त कार्यालय, सामुदायिक विवाह समितीतर्फे पेटाळा मैदानात आयोजित सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विवाह सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. त्यासाठी पेटाळा मैदानात भव्य मंडप उभारला होता. त्यामध्ये समोर व्यासपीठ, वधू-वरांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म तयार केला होता. सकाळी नऊपासून मंडपात गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांच्या मुहूर्तावर मंगलाष्टका म्हणून तांदळाऐवजी पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. ६२ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यामध्ये हिंदू ४८, बौद्ध ११, मुस्लिम, ख्रिश्चन, सत्यशोधक पद्धतीच्या प्रत्येकी एक जोडप्याचा सामावेश होता. संबंधित जोडप्यांच्या धर्मातील रितीरिवाज, धर्मविधीही करण्यात आला. सोहळ्यात करमणुकीसाठी 'जागो हिंदुस्थानी' हा बहारदार गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

प्रत्येक जोडप्यास एक पिंप, ताट, वाट्या, चमचे, फुलपात्रे प्रत्येकी सहा, दोन तांबे, बाळकृष्ण मूर्ती, गादी, मणी मंगळसूत्र, नथणी, जोडवी आहेर म्हणून समितीतर्फे देण्यात आले. याशिवाय दोन महिन्यांसाठी आटा, तांदूळ, साखर, तूरडाळ देण्यात आली. सरकारी अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी वधू-वर, नातेवाइकांचे स्वागत केले. पालकमंत्री पाटील यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. आर्थिक बोजा न पडता लग्न झाल्याने सर्व जोडप्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. सोहळ्यास आमदार अमल महाडिक, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, स्थायी समिती सभापती आशीष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे, अजितसिंह काटकर, अभयकुमार साळुंखे, नंदकुमार मराठे, ॲड. समृद्धी माने, सुप्रिया ताडे, विजयसिंह डोंगळे, उत्तम कांबळे, राजू मेवेकरी, अनंत खासबागदार, शिरीष खांडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

-----------------------

पर्यावण संरक्षणाचा संदेश

लग्नानंतर वधू-वरांसह नातेवाइकांनी श्रीखंड-पुरीचे गोड जेवण केले. वधू-वरांना घरासमोर उभा करण्यासाठी मुहूर्तमेढीसाठी आंब्याचे रोप देत पर्यावण संरक्षणाचा संदेश दिला. विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मंडपामध्ये सहा मोठे स्क्रीन लावण्यात आले होते.

--------------------

नवदाम्पत्यास विमा कवच

सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या ६२ जोडप्यांच्या नावे साडेचार हजारांची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे. त्याच्या व्याजातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा हप्ता भरण्यात येईल. यामुळे जोडप्यांना विमा कवच मिळेल. याशिवाय लग्नानंतर देवदर्शन, पर्यटनासाठी पाच हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिक्कोडीत छापा टाकून दोघांना अटक

$
0
0

फरारी टोळीच्या

दोन म्होरक्यांना अटक

कोल्हापूर

महाराष्ट्र व कनार्टक सीमाभागात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार काडय्या इरय्या टोळीचा म्होरक्या काडय्या लिंबलिंगय्या पुजारी (वय ४०, रा. बस्तवाड, ता. हुक्केरी) व कल्लाप्पा बाळाप्पा मेलवट्टी (वय ३२, रा. इंगळी, ता. हुक्केरी) या दोघांना नेसरी पोलिसांनी चिकोडी येथे छापा टाकून अटक केली. त्यांच्यावर मोक्का कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.

दोघांच्यावर चोरी, जबरी चारी, लूटमार, प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काडय्या इरय्या टोळीत सात गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर येथे शोध घेऊन या दोघांना चिक्कोडी येथे अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीत शेजाऱ्यांच्यात मारामारी, दोन जखमी

$
0
0

शेजाऱ्यांच्या मारामारीत

दोघेजण जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी चौथी गल्ली येथे पाणी मारण्याच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत दोघे शेजारी जखमी झाले. माणिक प्रभाकर भोसले (वय ४५) व विजय मार्तंड लोंढे (वय ४५) अशी जखमींची नावे आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदवण्याचे काम सुरु होते.

राजारामपुरी चौथी गल्ली येथे मोरया हॉस्पिटलजवळ भोसले व लोंढे हे शेजारी राहतात. दोन्ही कुटुंबात बरेच दिवस वाद सुरू असून दोघांनीही राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लोंढे यांच्या पत्नी घराच्या खिडक्या पाण्याने धुऊन काढत असताना पाणी भोसले यांच्या घरावर उडाले. त्यातून भोसले व लोंढे कुटुंबात वाद झाला. लोंढे यांची पत्नी अलका यांनी उडालेले पाणी पुसून घेण्याची तयारी दाखवली. पण वाद वाढत गेल्याने दोन्ही कुटुंबे एकमेकांविरोधात भिडली. माणिक भोसले यांनी शिविगाळ करत सळीने मारहाण केली असा जबाब लोंढे यांनी दिला आहे. त्यांच्या पत्नीच्या हातालाही दुखापत झल्याचे सांगितले. त लोंढे यांनी तलवार व दगडांनी हल्ला केला असे माणिक भोसले यांनी सीपीआरमध्ये पोलिसांना सांगतिले. भोसले यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्याचे काम सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची सभा १४ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सध्याच्या सभागृहातील ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित महापौरपदाचा अडीचा वर्षांचा कार्यकाल १५ मे रोजी संपणार आहे. त्यानुसार सध्याच्या महापौर स्वाती यवलुजे यांच्या महापौरपदाची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वधारण सभा १४ मे रोजी होत आहे.

महापौर यवलुजे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही शेवटची सर्वसाधारण सभा असेल. त्यानंतर महापालिकेकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नवीन महापौर निवडीविषयी मार्गदर्शन घेऊन निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल.

दरम्यान, महापौरपदावरून सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडीत वर्चस्वाची लढाई सुरू आहे. सर्वांनाच आता नवीन महापौर निवडीचे वेध लागले आहेत. आगामी अडीच वर्षासाठी महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांकडून इच्छुक महिला सदस्यांची संख्या वाढत आहे. भाजप-ताराराणी आघाडीने महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक जिंकल्यामुळे आता 'भाजपचा महापौर' करण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी महापालिकेवरील वर्चस्वासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नाराज व असंतुष्ट नगरसेवकांना पद, जादा विकास निधी देण्यावर फोकस ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापट कॅम्प डीपी रोडवर अतिक्रमण

$
0
0

फोटो आहेत.

बापट कॅम्प डीपी रस्त्यांवर अतिक्रमण

महापालिकेचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बापट कॅम्प परिसरातील शिरोली नाका ते शुगर मिल या वीस मीटर रुंद व लिशां हॉटेल ते बापट कॅम्प या बारा मीटर डीपी रस्त्यावर बेकायदशीर बांधलेल्या बंगल्यांकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करुन धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकांसाठी डीपी रस्ता वळवून देण्याचा घाट महापालिकेने घातला आहे.

नगरपालिकेतून महानगरपालिकेत रुपांतर झाल्यावर पहिली कोल्हापूर विकास योजना १९७७ मध्ये जाहीर झाली. त्यानंतर दर १५ वर्षांनी विकास योजना राबवण्याचा नियम असताना २००० मध्ये दुसरी विकास योजना जाहीर करण्यात आली. विकास योजनेत शहराची लोकसंख्या, रस्ते, बागा, मैदाने, शाळा यासाठी मोकळ्या जागेवर आरक्षण टाकली जातात. पण आरक्षित जमिनीवर अतिक्रमणे केली जात असताना महानगरपालिकेकडून कानाडोळा केला जात आहे.

बापट कॅम्प येथील रि.स.नंबर २२६ व २२७ मध्ये पहिल्या विकास आराखड्यात १२ मीटर व ३० मीटर अशा दोन डीपी रस्त्यांचे नियोजन करुन आरक्षण टाकण्यात आले आहे. ३० मीटर रोडसाठी स्थानिक नागरिकांनी जास्त जागा जात असल्याची तक्रार केल्यानंतर २० मीटर डीपी रस्त्यांला मंजुरी देण्यात आली.

लिशां हॉटेल, बापट कॅम्प ते जाधवाडी असा १२ मीटर रुंद डीपी रस्ता आहे. तर शिरोली नाका ते कोल्हापूर शुगर मिल असा २० मीटर रुंद डीपी रोड मंजूर करण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दोन्ही रस्ते शहराच्या विकासासाठी महत्वाचे असतानाही महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने बंगले बांधले जात आहेत.

१९७७ मध्ये हा भाग शेतीक्षेत्रात मोडत होता. पण आता या परिसरात बांधकाम व्यवसाय चांगलाच फोफावत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी जमिनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. डीपी रोड सोडून बांधकाम व्यावसायिकांनी गृह प्रकल्प उभारले आहेत. याच जागेत कुंभार लोकांच्या वसाहतीसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. कुंभार समाजातील नागरिकांनी तिथे घरे बांधली आहेत. पण काही नागरिकांनी थेट २० मीटर व १२ मीटर डीपी रोडवर टुमदार बंगले बांधले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. काही जणांनी १९८६ मध्ये बंगले बांधले आहेत. बंगले बांधणाऱ्यांमध्ये महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी असल्याची माहिती पुढे येत आहे.

डीपी रोडवर बंगले बांधल्याने रस्ते बंद झाल्याने काही बांधकाम व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. अतिक्रमण करणारी मंडळी थेट आंदोलनाची भाषा वापरत असल्याने महानगरपालिका अधिकारी बोटचेपी भूमिका घेत आहेत. अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करुन अन्य जमीन मालकाच्या मोकळ्या जागेतून डीपी रस्ते वळवण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी स्थानिक जमीन मालकांच्यावर महानगरपालिकेकडून दबाव आणला जात आहे. डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण काढून टाका मगच आमच्या मोकळ्या जागेबाबत निर्णय घ्या, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. डीपी रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्यास आणखीन बांधकामे होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

००००००

अवैध व्यावसायिकांकडून अधिकाऱ्यांना मॅनेज

या परिसरात अवैध धंद्यातील एका 'सम्राटा'ने जागा विकसित करण्यासाठी घेतली आहे. अतिक्रमणाला हात न लावता डीपी रस्ता वळवण्यासाठी त्याने अधिकाऱ्यांना मॅनेज केले आहे. अधिकारी 'सम्राटा'ची तळी उचलत 'नारायण, नारायण' चा गजर करत 'फुलां' च्या पायघड्या घालत आहेत. अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी परिसरातील नागरिक एकवटू लागले आहेत.

०००००

कोट

'विकासयोजनेत रस्ते व समाजपयोगी कामांसाठी आरक्षित केलेल्या जागेत कोणताही बदल व अतिक्रमण करता येत नाही. विकास नियंत्रण नियमावलीनुसार आयुक्तांना मंदिर, शाळा अशा वास्तूंबाबत अल्पसा बदल करता येतो. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवून डीपी रस्त्यांवरील बांधकाम कायद्याने हटवणे महापालिकेला बंधनकारक आहे.

राजेंद्र सावंत, संचालक, अर्किटेक्ट अॅन्ड इंजिनिअर असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images