Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरटीओची सोमवारपासून कारवाई

$
0
0

खासगी ट्रॅव्हल्सवर

आजपासून कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारेमाप तिकीट दर आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग सोमवार (ता. ७) पासून कारवाई करणार आहे. विविध ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑनलाइनचे तिकीट दर दीडपटापेक्षा अधिक असल्यास त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. गर्दीच्या काळात एसटीच्या तिकीट दरापेक्षा दीडपट भाडे आकारावे. जादा तिकीट भाडे आकारल्यास तत्काळ कारवाईच्या सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाहीचा कोल्हापूर मुंबई मार्गावर प्रति प्रवासी तिकीटाचा दर ६२० रूपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून वातानुकूलितसाठी १२०० ते २००० पर्यंत भाडे आकारले जाते. मुंबई ते कोल्हापूरसाठी मल्टी एक्सेल एसी प्रकारात २८०० ते ३००० रुपये प्रतिप्रवासी भाडेदर घेतला जात आहे. एसटीच्या तिकीट दरापेक्षा दीडपट जादा भाडे आकारण्याची मुभा दिली आहे. मात्र त्या पेक्षाही अधिक भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लूटमार होत आहे. सोमवारी मोटार वाहन निरीक्षक संबधित ट्रॅव्हल्स कंपनीला सूचना आणि कारवाई करणार असल्याचे आरटीओ डॉ. डी. टी. पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक

$
0
0

फोटो आहे...

आदिनाथ तीर्थंकरांवर महामस्तकाभिषेक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर रविवारी धार्मिक सोहळ्यात महामस्तकाभिषेक करण्यात आला. ५७ व्या वार्षिक महामस्तकाभिषेकासाठी कोल्हापूरसह मुंबई, पुणे, बेळगांव, कोकण आदी परिसरातील जैन श्रावक-श्राविकांनी गर्दी केली होती.

भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तींवर पंचामृत अभिषेक, कुंकुमाभिषेक, कशायद्रव्य, हळदाभिषेक,दुग्धाभिषेक, इक्षूराभिषेक, क्लकचूर्ण, सर्वऔषधी, चतुषकोन,अष्टगंध, पुष्पावृष्टी, शांतीकलश आदी महामस्ताभिषेक विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या अधिपत्याखाली आणि मुडबिद्री (कर्नाटक) येथील जगद्गुरू स्वस्तिश्री डॉ. चारूकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत सायंकाळी महामस्तकाभिषेक झाला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी साडेचारनंतर भगवान श्री आदिनाथ तीर्थंकर महास्तकाभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली. रविवारी सकाळी सहापासून मठात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. मंगलवाद्य, ध्वजवंदन, भगवान चंद्रप्रभ तीर्थंकरांचा पंचामृताभिषेक व महाशांती मंत्र पठण, मौजी बंधन सोहळा झाला. दुपारी तीन वाजता देवी श्री ज्वालामालिनी महिला मंडळाचे भजन झाले. जैन सेवा संघाने महाआरती केली. राजू उपाध्ये, शशिकांत उपाध्ये यांनी महामस्तकाभिषेकाची माहिती दिली. रूपाली पाटील, राजेंद्र मकोटे, अभयकुमार इंगळे यांचा सत्कार झाला. भरत वणकुद्रे, अभय भिवटे, अजित सांगावे, संजय कोठावळे, विद्याधर चौगुले, सतीश पत्रावळे आदी जैन श्रावक, श्राविका उपस्थित होत्या.

०००

महामस्तकाभिषेकाचे मानकरी

दुग्धाभिषेक : अजित शेट्टी (सांगली), श्री. भागचंद (इचलकरंजी)

इक्षुराभिषेक : रवींद्र दोशी (फलटण)

क्लकचूर्ण : संतोष मेहता (कोल्हापूर)

कुंकूमाभिषेक : वृषभनाथ उपाध्ये (रत्नागिरी)

कशायद्रव्य : नीलकांत जैन (कोल्हापूर)

हळदाभिषेक : महावीर टोणे (पुणे)

सर्वौषधी : शीतल अथणे (गोकाक)

अष्टगंध : मधुकर मगदूम (मुंबई)

शांतीकलश : अण्णासाहेब शेंडुरे (हुपरी)

००००

'आदर्श दाम्पत्य' पुरस्कार प्रदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'क्रोध, लोभ, माया, मत्सर कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी कोणत्याही धारदार शस्त्राची गरज नाही. त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे. जैन समाजाच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे समाजाने आचरण केल्यास स्वास्थ्य, मनशांती सहजपणे लाभते,' असे प्रतिपादन मुडबिद्री (कर्नाटक) येथील जगद्गुरू स्वस्तिश्री डॉ. चारूकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी रविवारी येथे केले. शुक्रवार पेठेतील महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठातर्फे आयोजित 'आदर्श दाम्पत्य' पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी प्रमुख उपस्थित होते.

अ‍ॅड. कुंतिनाथ आणि प्रा. कांचन कापसे यांना स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते 'आदर्श दाम्पत्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, दुपट्टा, श्रीफळ, हार, शास्त्र, मानपत्र आणि ११ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, 'अ‍ॅड. कापसे यांचे समाजासाठी मोठे योगदान असून, प्रेरणादायी आहे.' कोलकाता येथील पारसकुमार आणि गुणमाला पांड्या यांचा विशेष सन्मान प्रा. डी. ए. पाटील आणि विमलाताई पाटील यांच्या हस्ते झाला. हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांचा सत्कार प्रा. कांचनताई कापसे यांच्या हस्ते झाला. दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे यांनी स्वागत केले. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गोमटेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय मगदूम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन वाढ....

$
0
0

रविवार 'हाउसफुल'

पर्यटक, भाविकांमुळे शहर गजबजले; प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर टाइम्स टीम

उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराई आणि महोत्सवांची रेलचेल यामुळे मे महिन्याचा पहिला रविवार हाउसफुल ठरला. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरी जोतिबा तीर्थक्षेत्र भाविकांनी फुलला. लग्नसराईमुळे शहरातील मंगल कार्यालये गजबजली आहेत. सुट्टीच्या निमित्ताने शहरात गर्दी वाढल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. सायंकाळी तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, शिवाजी रोड, भवानी मंडप भाविक व पर्यटकांनी फुलला. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांची रांग पूर्व दरवाजाबाहेर होती. अंबाबाई मंदिराच्या दर्शनानंतर भाविक व पर्यटकांची पावले रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठाकडे वळली. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे जथ्थाच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, राजारामपुरी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोडवरील कापड दुकानांमध्ये स्वतंत्र दालने सुरू केली आहेत. जिल्ह्यासह आसपासच्या गावांतील नागरिकही खरेदीसाठी कोल्हापूरला पसंती देतात. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीची रेलचेल पाहावयास मिळत होती.

पर्यटक, भाविक कोल्हापुरात आल्यामुळे त्यांचा ओढा कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ खरेदीसाठी जास्त असल्याचे दिसून येत होते. कोल्हापुरी चपप्पल खरेदीसाठी पापाची तिकटी चप्पल लाइनला पर्यटकांची गर्दी झाली होती. सुट्टीमुळे हॉटेल व्यवसाय तेजीत आहे. वाढत्या गर्दीमुळे बिंदू चौक, सीपीआर चौक, फोर्ड कॉर्नर, मिरजकर तिकटी, माळकर तिकटी चौक, शिवाजी चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

..................

महोत्सवाला पर्यटकांचीही हजेरी

कोल्हापुरात सध्या महोत्सवांची रेलचेल सुरू आहे. गेल्या आठवड्यात गृहिणी महोत्सवाची धामधूम आणि या आठवड्यात भगिनी महोत्सव नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. खरेदी आणि मनोरंजनाची मेजवाणी ही पर्वणी ठरली. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार, टीव्ही कलाकारांच्या करमणुकीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गीत, नृत्याविष्कार आणि विनोदी कलाकारांचे खास शो गर्दी खेचणारे ठरले. महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ लाभली. या महोत्सवाला स्थानिक नागरिकांसह बाहेरगावांहून आलेल्या भाविक व पर्यटकांनी हजेरी लावली. खरेदीसोबत मनोरंजनाच्या मेजवाणीचा आस्वाद लुटला.

.....................

सध्या सुट्टीचा कालावधी सुरू आहे. उत्सव आणि सुट्टीच्या कालावधीत भाविक, पर्यटक हमखास कोल्हापूरला भेट देतात. धार्मिक व पर्यटनस्थळी गर्दी होते. भाविक, पर्यटकांची वाढती संख्या विचारात घेऊन आवश्यक सुविधा पुरविल्या पाहिजेत. शहरात पार्किंग व्यवस्था पुरेशी नाही. भाविक, पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक नाहीत. बाहेरगावाहून आलेले पर्यटक, भाविक जास्तीत जास्त दिवस कोल्हापुरात मुक्काम करतील या पद्धतीने नियोजन झाल्यास खऱ्या अर्थाने पर्यटनवाढीला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

अरुण चोपदार, हॉटेल व्यावसायिक

..........................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभेनंतर नगरसेवकांना हलविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरांची मुदत संपण्यापूर्वीची अखेरची सर्वसाधारण सभा सोमवारी (१४ मे) होत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी नगरसेवकांना सभेनंतर तातडीने सुरक्षितस्थळी नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून विविध माध्यमांतून नेत्यांपर्यंत इच्छा पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी नेत्यांनी दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली जात आहे.

आठवड्यानंतर महापौरपदाची मुदत संपणार आहे. त्यानंतरच हालचाली वेगावतील असे दोन्ही आघाडीच्या कारभाऱ्यांकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी गोपनीयरीत्या बैठक सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत पद तसेच विकास निधी न मिळाल्याने अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांशी भाजप आघाडीकडून संधान साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या वजनाच्या ऑफर दिल्या जात असल्या तरी अजूनपर्यंत भाजपच्या गळाला कुणी लागले नसल्याची चर्चा आहे. यातूनच महापौरपदाच्या निवडणुकीला रंग येण्यास सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी आघाडीकडून ज्याप्रकारे रणनीती आखली जात आहे. तसेच इच्छुक व नगरसेवकांकडूनही निवडणुकीसाठीचे धोरण तयार केले जात आहे. दोन्ही आघाडींमध्ये नाराज नगरसेवकांची संख्या आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून विरोधकांमधील नगरसेवकांची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे नेत्यांकडूनही सावधानता बाळगली जात आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर 'अर्थ' शोधला जाणार असल्याने आघाडीतील अशा निवडक नगरसेवकांची 'इच्छा' जाणून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या कारणासाठी नगरसेवक फुटणार आहेत, तीच इच्छा पूर्ण केल्यास फुटण्याचा धोका कमी होईल, अशी नेते, कारभाऱ्यांची धारणा आहे.

भाजपला बहुमतासाठी आठ नगरसेवकांची गरज आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेतील नगरसेवकांवर गळ टाकले जात आहेत. त्यांच्याबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतोषी नगरसेवकांचा एक गट फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील अडीच वर्षांत पुन्हा धोका होऊ नये यासाठी कारभाऱ्यांकडून, नेत्यांकडून सूचना केल्या जात आहेत. भाजपकडून फोडाफोडी केली जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून कारभाऱ्यांना हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपमधील अस्वस्थ नगरसेवकांना हेरण्यात येत आहे.

नगरसेवकांच्या पातळीवर चाचपणी सुरू असताना इच्छुक उमेदवारांनीही तयारी चालवली आहे. काँग्रेस आघाडीत असलेल्या इच्छुकांनी नेत्यांपर्यंत आपली इच्छा पोहोचविण्याचा प्रयत्न चालवला आहे. नेत्यांनी यापूर्वी दिलेल्या शब्दांचीही आठवण करून दिली जात आहे. काँग्रेसच्या वतीने इंदुमती माने, शोभा बोंद्रे, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, निलोफर आजरेकर इच्छुक आहेत.

००००

आजरेकरांना दिलेला शब्द...

काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन करताना निलोफर आजरेकर यांनी अटीविना सहकार्य केले होते. त्या बदल्यात महापौरपद देण्याचा शब्द नेत्यांनी दिला असल्याचे आजरेकर यांच्या वतीने सांगितले जात आहे. शब्द दिल्याप्रमाणे किमान सहा महिने तरी सुनेला महापौरपद द्यावे, अशी मागणी गणी आजरेकर यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. भाजप आघाडीकडून जयश्री जाधव यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात असले तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व महादेवराव महाडिक यांच्या पातळीवर अंतिम निर्णय होणार आहे. या निवडणुकीत 'अर्थ'कारण रंगणार असल्याने त्यादृष्टीने विचार करुन दोन्ही आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला ११ मेपर्यंत सुरुवात केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू. तसेच शिवाजी पूल आणि राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूकही बंद पाडू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या प्रश्नावर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पर्यायी पुलासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशाराही समितीने दिला.

पर्यायी पुलाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्यात यावे, यासाठी कृती समिती आक्रमक बनली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली होती. महापौर स्वाती यवलुजे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुभेदार यांच्याशी पुलाच्या बांधकामासंदर्भात चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु करावे, यासाठी समिती आग्रही आहे. पावसाळा तोंडावर आला आहे, पुराच्या कालावधीत शिवाजी पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलाचे आयुर्मान संपल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहतुकीसाठी पूल धोकादायक आहे. अपघात घडल्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा बैठकीत दिला.

पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे सांगून समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, 'राज्यकर्ते व प्रशासनाने लोकभावनेची दखल घेऊन तत्काळ कामाला सुरुवात करावी. पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी आता आम्ही कुणाच्याही दारात जाणार नाही. कृती समिती प्रशासनाला चार दिवसाचा अल्टिमेटम देत आहे. ११ तारखेपर्यंत बांधकामाला सुरुवात न झाल्यास त्यादिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू. तसेच शिवाजी पूल व राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली जाईल. कोल्हापूरला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. सरकारने आमच्यावर केसेस दाखल कराव्यात.'

आर. के. पोवार, निमंत्रक कृती समिती

.............

पुरातत्त्व विभागाचे कायदे कडक आहेत. कायदा मोडल्यास पाच वर्षांची कैद होऊ शकते. आपत्ती व्यवस्थापन कायद्यासंदर्भात जिल्हा सरकारी वकील व राज्य सरकारच्या विधी विभागाचा अभिप्राय मिळाला आहे. त्या कायद्याअंतर्गत तात्पुरत्या पुलाचे बांधकाम होऊ शकते. पर्यायी पूल कायमस्वरुपी असणार आहे. यामुळे पर्यायी पुलाला तात्पुरता पूल म्हणून मंजुरी देणे योग्य ठरणारे नाही, असे कळविले आहे. विधी व न्याय विभागाचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पर्यायी पुलाचे बांधकाम करणे कायद्याचे उल्लंघन करणारे ठरेल. जिल्हा प्रशासन पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी वेगवेगळ्या पातळीवर पाठपुरावा करत आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडीटवर साखर निर्यातीचा पर्याय - पाशा पटेल

$
0
0

क्रेडिटवर साखर निर्यातीचा पर्याय

राज्य कृषीमूल्या आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विदर्भ, मराठावाडा विभागात झालेल्या चांगल्या पावसांमुळे उसाचे पर्यायाने साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले. साखर उत्पादनाबाबत निर्माण झालेली समस्या तात्पूर्ती स्वरुपाची असून स्थानिक बाजारपेठेत दर वाढण्यासाठी क्रेडिटवर श्रीलंका, ब्राझील व नेपाळ या देशांना साखर निर्यात करण्याचा पर्याय केंद्र सरकारला सुचवला असल्याची माहिती राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार बैठकीत दिली. कारखान्यांनी उत्पादित होणाऱ्या साखरेवर बँकाकडून अर्थसाह्य घेतलेले असल्याने नेमके क्रेडिट कोणाला देणार असा प्रश्न या पर्यायामुळे उपस्थित झाला आहे.

उत्पादन खर्चाचा चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्याने शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देताना पटेल म्हणाले, 'संपूर्ण शेतीमालाच्या खर्चाची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला निश्चितच चांगला भाव मिळेल. राज्य कृषीमूल्य आयोगाची आठ महिन्यांपूर्वी स्थापना झाली. आयोगाने सुचवल्यानुसार २२ अधिसूचना प्रसिद्ध केल्या. उत्पादन खर्चाची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलित करण्यासाठी राज्यातील २७९ गावांत शेती उत्पादनाची नोंदी ठेवणारी केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रातून होणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना निश्चितच चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकार अनेक निर्णय घेत आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो. प्रत्येक राज्यातील उत्पादन खर्चाचा ताळेबंद केंद्राच्या कृषीमूल्य आयोगाकडे मांडण्यासाठी राज्याच्या आयोगाच्या अध्यक्षांना सदस्यत्व देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.'

'शेतकरी नेत्यांनी एकमेंकावर आरोपांच्या फैरी झाडण्यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी नेत्यांनी संघर्षावेळी संघर्ष केला, पण आता सरकारच्या धोरणावर बोलण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुद्देसूद मांडणी करण्याची गरज आहे. ४० वर्षे संघर्षात गेल्यानंतर कृषीमूल्य आयोगच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनाही अशी संधी मिळाली होती, पण ही संधी त्यांनी गमावली असल्याचा टोला पटेल यांनी लगावला.

'यावर्षी साखरेप्रमाणे तुरीच्या अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन कोटी ३५ लाख क्विंटल तुरीपैकी सरकारने ७७ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. तूर ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी बंद झाली. सोयाबिनला प्रतिक्विंटल चार हजार ५०० रुपये दर कोणत्या पद्धतीने देता येईल यासाठी कृषीमूल्य आयोगाचे नियोजन सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमध्ये होणार बदल

$
0
0

पान ३ अॅंकर

...............................

काँग्रेस होणार आक्रमक

कर्नाटक निवडणुकीनंतर होणार पक्षात संघटनात्मक बदल

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

युती सरकारविरोधात हल्लाबोल करत राष्ट्रवादीने राज्यात हवा तापवल्यानंतर आता काँग्रेसला जाग आली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल ठेवत आक्रमक होण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यासाठी कर्नाटक निवडणुकीनंतर तातडीने पक्षात संघटनात्मक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा व लोकसभेच्या पार्श्वभूमीवर युवा आणि आक्रमक चेहऱ्यांच्या गळ्यात पदाची माळ घालण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादीने सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून या पक्षाने सरकारविरोधी वातावरण तापवले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात संघटनात्मक बदल करण्यात आले. माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या आक्रमक व अभ्यासू नेत्याकडे राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपद सोपवले. एकूणच हा पक्ष जोमात दिसत असताना काँग्रेस मात्र 'कोमात' असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यामुळे कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाल्याने अखेर पक्षाच्या नेत्यांना जाग आली आहे. दिल्लीतून आदेशाची वाट पाहत बसल्यानेच राज्यात पक्ष कोमात गेल्याची भावना कार्यकर्त्याच्या मनात तयार झाली आहे. यामुळे ही निराशा कमी होण्यासाठी संघटनात्मक बदल करण्याचे वारे वाहू लागले आहेत.

पक्षातील तालुकाध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत बहुतांशी पदाधिकारी बदलण्यात येणार आहेत. त्याची यादी तयार आहे, फक्त घोषणा शिल्लक आहे. अशोक चव्हाण यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य काही नावे सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. जयंत पाटील यांच्या तुलनेत काँग्रसची जबाबदारी आक्रमक नेत्याकडे सोपवावी अशी मागणी नेत्यांमधून होत आहे. त्यामुळे सध्या अशा आक्रमक चेहऱ्याच्या शोधात सध्या काँग्रेस आहे. राजस्थान व मध्यप्रदेशात संघटनात्मक बदल केल्यानंतर महाराष्ट्रात बदल करण्याचे नियोजन आहे.

कर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. राज्यातील अनेक नेत्यांना या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. काहीही करून हे राज्य टिकवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी होणार हे जवळजवळ नक्की आहे. आघाडी करताना काँग्रेसचे वर्चस्व कायम राहील याकडे पक्ष लक्ष राहण्याची ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची अजूनही ताकद आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद याच भागात दिले जाण्याची चिन्हे आहेत. तशा हालचाली सुरू आहेत.

चौकट

मुदत संपलेले जिल्हाध्यक्ष बदलणार

कोल्हापूर, सांगली, सातारा यासह राज्यातील नऊ ते दहा जिल्हाध्यक्ष बदलण्याची दाट शक्यता आहे. कारण हे जिल्हाध्यक्ष पंधरा ते अठरा वर्षे या पदावर आहेत. मुदत संपल्याने तेथे बदल निश्चित आहे. जिथे एकमत आहे, तेथून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे जिल्हा व शहराध्यक्षपदासाठी एकच नाव पाठवण्यात आले आहे, मात्र जेथे वाद आहे, तेथे नावंच पाठवण्यात आले नाही. त्यामुळे ऐनवेळी या पदांच्या निवडी जाहीर होणार आहेत.

चौकट

आवाडे काँग्रेसमध्ये सक्रीय

पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील पक्षाचे नेते प्रकाश आवाडे पक्षापासून दुरावले होते. पण कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सक्रीय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर कर्नाटकातील एका जिल्ह्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तेव्हापासून ते तेथे प्रचारात सहभागी झाले आहेत. आवाडे यांच्याप्रमाणे अन्य कुणी पक्षात नाराज असतील तर त्यांच्याशी देखील या निवडणुकीनंतर चर्चा करण्यात येणार आहे. सर्वांची नाराजी दूर करत पक्ष बळकट करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झीपकॉइनचा मुख्य सूत्रधार गणगेला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुंतवणुकीच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणाऱ्या 'झीपकॉइन'चा मुख्य सूत्रधार बाळासाहेब उर्फ बालाजी भरत गणगे (वय ३८, रा. पुणे) याला कोल्हापुरात अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

फसवणुकीनंतर गणगेने पोलिसांना गुंगारा दिला होता. गेले आठवडाभर पुणे, बीड, मुंबई, कोकण आणि कर्नाटकच्या काही भागात पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या तीन संशयितांची पोलिस कोठडी कोर्टाने १२ मेपर्यंत वाढवली आहे.

झीपकॉइनच्या माध्यमातून २५० हून अधिक गुंतवणूकदारांना २५ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. उद्योजक, व्यापारी आणि राजकारणातील बड्या प्रस्थांनी झीपकॉइनमध्ये गुंतवणूक केली आहे. झीपकॉइनमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र भीमराव नेर्लेकर, अनिल भीमराव नेर्लेकर (रा. हुपरी, ता. हातकणंगले), संजय तमन्ना कुंभार (रा. शिरढोण, ता. शिरोळ), पद्मा राजेंद्र नेर्लेकर, बालाजी गणगे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार, अनिल नेर्लेकर या तिघांना अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.

फसवणुकीतील मुख्य संशयित बालाजी गणगेच्या तपासासाठी पोलिसांनी पुण्यातील त्याच्या घर व फार्महाउसवर छापे टाकले होते. बीडमध्येही त्याचा शोध घेण्यात आला. रविवारी (६) पोलिसांनी हुपरी, शिरढोण येथे नेर्लेकर व कुंभार या संशयितांच्या घरी छापे टाकून संशयितांचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडेही चौकशी केली.

दरम्यान, सोमवारी गणगे याचा शोध घेत असताना त्याचा मोबाईल कोल्हापूरमध्ये अॅक्टिव्हेट झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन शोधले असता तो मध्यवर्ती स्थानक परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गणगेला अटक केल्यामुळे झीपकॉइनमध्ये कितीजणांनी गुंतवणूक केली आहे, याची माहिती मिळणार आहे. पोलिसांनी झीपकॉइनच्या लक्ष्मीपुरी कार्यालयातून संगणक जप्त केला आहे. गणगेला अटक केल्यानंतर संगणकाच्या नोंदी तपासण्यास मदत होणार आहे. दरम्यान संशयित राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा नेर्लेकर व त्यांच्या अल्पवयीन मुलाचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीटंचाई

$
0
0

शहरात आजही कमी

दाबाने पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज वितरण कंपनीकडून सोमवारी दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणारी शिंगणापूर, आपटेनगर, कसबा बावडा पंपिंग स्टेशन सात तास बंद राहिली. त्यामुळे सोमवार सायंकाळी ए, बी तसेच ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मंगळवारीही शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाणी उपसा सुरु करण्यात आला.

वीज कंपनीने दुरुस्तीसाठी सकाळी दहाच्या सुमारास वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे तीन उपसा केंद्रावरील पाणी उपसा बंद झाला. रविवारी रात्री करण्यात आलेल्या उपशामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा व्यवस्थित झाला. पण त्यानंतर पाणी उपसा बंद राहिल्याने ए, बी आणि ई वॉर्डमधील सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. ई वॉर्डमधील काही भागात तर पाण्याचा ठणठणाट जाणवला. मंगळवारीही दिवसभर अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली होती. त्यानुसार सोमवारी दिवसभरात कळंबा फिल्टर हाऊसवरुन तीन टँकरद्वारे दहा ठिकाणी तर बावडा फिल्टर हाऊसवरुन चार टँकरद्वारे २७ ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला.

सोमवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर पाणी उपसा सुरु करण्यात आला. रात्रभर पाण्याचे शुद्धीकरण करुन पहाटेपासून त्याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच्या पाणीपुरवठ्यावर काही भागात परिणाम होणार आहे. काही भागात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्या

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद कमी झाला आहे. यामुळे जीवन जगण्यातील अर्थ संपत चालल्याची भावना पाल्यात निर्माण झाली आहे. परिणामी कुटुंब व्यवस्था कोलमडत आहे. पाल्य अपयशाने खचत आहे. शिक्षक, पालकांनी अपयशी पाल्यास आत्मविश्वास, धाडस, प्रेम देण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन जिल्हा परिषेदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे सोमवारी आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पेटाळा येथील गडकरी हॉलमध्ये कार्यक्रम झाला.

देशमुख म्हणाले, 'गतिमान जीवन पद्धती, तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. आपुलकीचा अभाव जाणवत आहे. पाल्यास पुरेसे प्रेम मिळत नसल्याचे चित्र आहे. दुःख व्यक्त करण्याची वाट मिळत नसल्याने त्याचे खच्चीकरण होत आहे. खोट्या स्वप्नांमुळे नैराश्य येत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे.'

यावेळी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, महात्मा फुले आदर्श शिक्षक आणि शिक्षक समिती जीवन गौरव पुरस्काराने बंडोपंत किरोळकर, शिवाजीराव नांदवडेकर, बाबूराव चव्हाण, वर्षा जाधव, सलमा मकानदार, स्नेहल पाटील, दीपक पाटील, समृद्ध नाईक, गोविंद चांदेकर यांच्यासह २८ शिक्षकांना गौरविण्यात आले. यावेळी समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, समितीचे राज्यनेते शिवाजी साखरे, महिला आघाडीच्या दीपाली भोईटे, सरचिटणीस सुरेखा घाटगे, विष्णू जाधव, अर्जुन पाटील, प्रमोद तौंदकर, कृष्णात कारंडे, अनिता तोडकर, रवळू पाटील, प्रभाकर आरडे, जोतिराम पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ चोरटी कनेक्शन बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात पाणी चोरीचे प्रमाण मोठे असल्याने पाणी चोरांना चाप लावण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सोमवारपासून धडक मोहीम हाती घेतली. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी व मीटर रीडरना असलेल्या माहितीच्या आधारे पाच पथकांनी एकाच दिवसात ३३ चोरटी कनेक्शन बंद केली. अक्षरश: घराच्या दारापासून खोदाई करून चोरटी कनेक्शन शोधली जात आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील पाणीचोरीच्या प्रकाराची माहिती देण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या पाणी उपशापैकी ५० एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे नगरसेवकांनी दाखवून दिले होते. त्यामुळे ई वॉर्ड तसेच अन्य वॉर्डमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने पाणी चोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन सभेमध्ये दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने विविध वॉर्डसाठी पाच पथके स्थापन केली आहेत. त्यामध्ये मीटर रीडरचाही समावेश आहे. महापालिकेकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारी या पथकांकडे सोपविण्यात आल्या आहेत. तसेच मीटर रीडरनाही पाणी चोरी करणाऱ्यांची असलेल्या माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली आहे. यानुसार बागल चौक, यादवनगर या परिसरातील पथकाने १४ चोरटी कनेक्शन तोडली आहेत. गंजी माळ, सुधाकर जोशीनगर या परिसरातील ६, महाराणा प्रताप चौक परिसरातील पाच, न्यू शाहूपुरी व स्टेशन रोडवरील तीन व अन्य ठिकाणची पाच अशी ३३ चोरटी कनेक्शन या पथकांनी बंद केली आहेत.

या सर्व ठिकाणी खोदाई करून पाइपलाइन शोधून काढल्या आहेत. ही कनेक्शन मुख्य पाइपलाइनपासून बंद करण्यात आली असून, यामुळे त्या परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. या पथकांकडून यापुढे सातत्याने विविध भागांत शोधमोहीम सुरूच ठेवण्यात येणार असून, ज्यांना पाणीचोरीचे प्रकार माहीत आहेत, त्यांनी महापालिकेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने होमिओपॅथीलाप्रोत्साहन द्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

होमिओपॅथी उपचारामुळे गंभीर आजारी रुग्णांचे आयुष्य वाढते. ही उपचारपद्धती अॅलोपॅथीपेक्षा स्वस्त आहे. घरी बसून उपचार घेता येतात, त्यामुळे सरकारने होमिओपॅथीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती डॉ. विजयकुमार माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. माझ्या मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च आणि ट्रिटमेंट सेंटरच्या नूतन वास्तूचे स्थलांतर मंत्री नाईक यांच्याहस्ते येत्या शुक्रवारी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. माने म्हणाले, कॅन्सर, किडनी, मेंदूविकार, कंपवात, दमा, हृदयविकार, वंध्यत्व, गर्भाशयाच्या गाठी, हृदयविकार, संधिवात, मणक्याचे आजार, थायरॉईड, हृदयाच्या झडपांचे आजार, मासिक पाळीच्या तक्रारीवर होमिओपॅथी उपचार प्रभावी ठरत आहेत. या उपचारामुळे एचआयव्ही, कॅन्सरग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढते, हे आमच्या रिसर्च सेंटरमध्ये स्पष्ट झाले आहे. यामुळे सरकारने होमिओपॅथिक उपचाराला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मेडिकल विम्यामध्येही त्याचा सामावेश होणे आवश्यक आहे. सरकारी दवाखान्यातही या उपचार पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. होमिओपॅथी उपचाराचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी अद्ययावत सेंटरची इमारत बांधली आहे. त्या इमारतीत 'मॉडर्न' स्थलांतरचा कार्यक्रम सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा परिषद - अन्यथा रस्त्यावरील लढाईसाठी समाज सक्षम

$
0
0

दोन फोटो आहेत.

...........

रस्त्यावरील लढाईसाठी समाज सक्षम

मराठा समाज प्रतिनिधी परिषदेत राज्य सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढण्यात आले. मोर्चानंतर सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला, पण अद्याप आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली नाही. मोर्चानंतर दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारने आढावा घेवून तत्पर अंमलबजावणी करावी, अन्यथा मराठा समाज रस्त्यावरील लढाईसाठी सक्षम असल्याचा इशारा मराठा समाज प्रतिनिधींच्या परिषदेत देण्यात आला. २१ मे रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाची समिती कोल्हापुरात येणार असून समितीला लाखो स्वाक्षऱ्यांची निवेदने आणि आरक्षणासाठी लागणारे आवश्यक पुरावे सादर करण्याचा निर्णयही परिषदेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे होते.

अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवन येथे मराठा प्रतिनिधी परिषद व मराठा-कुणबी दाखला मार्गदर्शन शिबिर पार पडले. अध्यक्षीय भाषणात बोलताना कोंढरे म्हणाले, 'दरवर्षी १२ लाख विद्यार्थीं उत्तीर्ण होतात. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळत नसल्याने सर्व समाजात आर्थिक आणि रोगजारा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे जातीच्या चौकटीतून पाहत असल्याने जातीय तेढ निर्माण होत आहे. याला सोशल मीडिया कारणीभूत असून यातून प्रसारीत होणारे संदेश अवैचारीक व मतभेद निर्माण करणारे आहेत. लोकशाहीमध्ये आरक्षणाची योग्यरितीने अंमलबजावणी होत नसल्याने ७२ टक्क्यांपर्यंत आरक्षण पोहोचले असून यामध्ये दोष असल्याने द्वेष निर्माण होत आहेत. यासाठी मराठा समाजाची प्रशासकीय बाबींमधील असाक्षरता कारणीभूत आहे. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मागण्या मांडल्या पाहिजेत. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेतील आयुधांचा वापर केला पाहिजे. भविष्यात मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि शेतकरी सक्षम करण्यासाठी लढा सुरुच ठेवला जाईल.'

महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून स्वयंरोजगारासाठी दहा ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळत असल्याचे सांगितले जात आहे, पण प्रत्यक्षात अद्याप कोणालाही कर्ज मिळालेले नाही. '

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले, 'शेतीचे तुकडीकरण, नोकरी नाही, उद्योगाचा वारसा नसल्याने समाजाची स्थिती ढासळत आहे. अशी परिस्थिती भविष्यात उद्भवून नये, यासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. समाजाच्या काही मागण्या मान्य झालेल्या असल्या, तरी अद्याप आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे.'

परिषदेमध्ये मोडी अभ्यासक वसंत सिंघन, अमित आडसुळे, राजेंद्र मोरे तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील, सुनील पाटील, रणजीत जाधव, अवधूत पाटील, स्वप्नील जाधव यांच्यासह सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. स्वागत एकनाथ जगदाळे यांनी केले. शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन शरद साळुंखे यांनी केले. ठराव वाचन शिरीष जाधव यांनी केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.

...........

चौकट

कार्यक्रमस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

परिषदेपूर्वी पोलिस उपधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कार्यक्रमस्थळी मोठी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत परिषद संपेपर्यंत उपस्थित होते. याचा संदर्भ देत कोंढेरे म्हणाले, 'एवढ्या पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता नव्हती. चांगले काम करताना त्रास होतोच.अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला होता, त्याप्रमाणे आम्हालाही धमक्या येत आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. '

....................

चौकट

परिषदेमध्ये झालेले ठराव

मराठा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती फंड निर्माण करावा.

कोल्हापुरात सारथीचे उपमुख्य कार्यालय हवे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत सुलभता आणावी.

समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्याचा पुरस्कार करावा.

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा.

समाजाने कालानुरुप बदल स्विकारावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल आतील पानासाठी बातमी...

$
0
0

पर्यायी पुलासाठी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाचा पर्याय

अन्यथा 'टोल आंदोलन पॅटर्न'चा अवलंब, जिल्हाधिकारी कार्यालयात उमटला सरकार व लोकप्रतिनिधींच्या विरोधातील रोष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पूल हा कोल्हापूर व कोकणाला जोडणारा मार्ग आहे. वाहतुकीसोबतच कोल्हापूरच्या व्यापार व व्यवसायाचा हा विकास मार्ग आहे. जयगड बंदरापर्यंत ही वाहतूक होते. शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपले असून तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या साऱ्या बाबींचा विचार करुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वटहुकूम काढून अत्यावश्यक बाब म्हणून पर्यायी पुलाच्या बांधकामाल मंजुरी द्यावी. त्या मंजुरीसाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर संयुक्तपणे पाठपुरावा गरजेचा आहे, असा सूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उमटला. दरम्यान, पुरातत्व विभागाच्या मान्यतेअभावी गेल्या तीन वर्षांपासून पर्यायी पुलाचे काम रखडल्याप्रकरणी सरकार व लोकप्रतिनिधींच्या विरोधात तीव्र भावना उमटल्या.

कोल्हापुरातील टोल हटविण्यासाठी ज्या पध्दतीने आंदोलन झाले तोच पॅटर्न पर्यायी पुलासाठी वापरला जाईल, रस्त्यावरील लढाई तीव्र केला जाईल. पालकमंत्री व खासदार पाठपुरावा करण्यात कमाी पडले असा आरोपही बैठकीत झाला. कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीन नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन तत्काळ पुलाचे काम सुरु करण्याची मागणी केली. यावेळी सुभेदार यांनी बांधकामाला लोकसभेची मान्यता, कॅबिनेटची मंजुरी आणि राज्यसभेचे न चाललेले कामकाजाचा घटनाक्रम मांडला. ते म्हणाले,' पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा सुरु आहे. पालकमंत्री, दोन्ही खासदारांशी चर्चा केली. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. कागदपत्रे सादर केली असून येत्या दोन दिवसात मार्गदर्शन उपलब्ध होईल.'

कॉ. चंद्रकांत यादव, दिलीप पोवार यांनी राष्ट्रपतींनी खास बाब म्हणून वटहुकूम काढावा यासाठी प्रशासनाने काय पाठपुरावा केला अशी विचारणा केली. मुंबईत सैन्याने आपत्कालीन स्थितीत पुलाची उभारणी केली. पर्यायी पुलाचीही त्याच धर्तीवर बांधकाम करावे असा मुद्दा मांडला. बाबा पार्टे यांनी पुरातत्व विभागाच्या नियमाचा दाखला देत बांधकामाला मनाई केली जाते. दुसरीकडे पुल परिसरात गेल्या काही दिवसात दोन बोअर मारल्या. पुलावरुन केबल टाकल्या जात आहेत हे निदर्शनास आणले. अॅड. पंडितराव सडोलीकर, नगरसेवक अशोक जाधव, संपत चव्हाण, किशोर घाटगे, दुर्वास कदम,जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदींनी चर्चेत भाग घेतला.

.........

कोल्हापूरच्या व्यापार, व्यवसायाला फटका

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी पर्यायी पुलाची उभारणी रखडल्यामुळे पूर्ण क्षमतेने वाहतूक होऊ शकत नाही. त्याचा फटका कोल्हापूरच्या व्यापार व्यवसायाला फटका बसला आहे. कोकण बंदराशी जोडणारा हा मार्ग आहे. तत्काळ या पुलाचे बांधकाम सुरु करावे. जुना पूल हा मौत का कुआ अशी स्थिती बनली आहे. शिवाजी पुलावरुन वाहतुकीदरम्यान अपघात घडल्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला. रमेश मोरे यांनी टोल आंदोलनाच्या धर्तीवर पुलासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रसाद जाधव यांनी लोकहिताचा निर्णय म्हणून प्रशासनाने पर्यायी पुलाच्या बांधकामाला मान्यता द्यावी. अन्यथा रस्त्यावरील आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

.............

तर मी आजपासून रजेवर

कृती समितीचे पदाधिकारी अशोक पोवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावयाच्या निवेदनाचे वाचन केले. त्या दरम्यान प्रशासन प्रमुख म्हणून आपणाकडून पुलाच्या बांधकामासंदर्भात कोणतीच कार्यवाही होत नाही असा उल्लेख केला. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. सुभेदार म्हणाले, 'अतिशय निष्ठेने मी काम करत आहे. विविध विभागांशी पत्रव्यवहार सुरु आहे. माझ्यावर व्यक्तीगत आरोप होत असतील आणि तुमची इच्छा असेल तर मी आजपासून रजेवर जातो,' असे नमूद केल्यावर बैठकीचा नूर पालटला. समितीच्यावतीने व्यक्तिगत टिकाटिप्पणी कुणी करु नये आवाहन करण्यात आले. दरम्यान, अशोक पोवार यांनी पर्यायी पुलाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

.....

'पुरातत्व' ला काही मंडळींनी जागे केले

पर्यायी पुलाच्या बांधकामाला प्रारंभी पुरातत्व विभागाची प्रारंभी काहीच हरकत नव्हती. मात्र महापालिकेतील बैठकीत झाडे तोडण्याच्या मुद्यावरुन काही मंडळींनी हरकत घेतली. महापालिकेने पुरातत्व विभागाकडे झाडे तोडायची परवानगी मागितली. पुरातत्व वास्तूच्या शंभर मीटरच्या आत बांधकाम करता येणार नाही हे काही मंडळीनी दाखवून देत पुरातत्व विभागाला जागे केले. कालांतराने पुरातत्व विभागाने बांधकामाला परवानगी नाकारल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरालगतच्या गावांतीलपाणी टंचाई दूर करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरालगतच्या पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, उचगावसह उपनगरांमधील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सध्याची नळपाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे, आवश्यक त्या ठिकाणी जलकुंभ बांधणे, पाइपलाइन वाढविण्याच्या कामांसाठी ११ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केला आहे. त्याची प्रशासकीय मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहराजवळील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार प्रमुख उपस्थित होते.

आमदार महाडिक म्हणाले, 'तीन महिन्यांपासून शहरालगतीच गावे आणि उपनगरांमध्ये पाणीटंचाई तीव्र भासत आहे. त्या गावच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाइपना गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली. टंचाईची नेमकी कारणे शोधली. त्यातून उपाययोजनांचा ११ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. निधींसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या पाणी योजनांच्या पाइपना अनेक ठिकाणी गळती आहे. उपनगरांत लोकवस्ती वाढली आहे. त्यांच्यासाठी नवीन टाकी बांधण्यात येणार आहे. पाचगाव नळ योजनेसाठी नवीन पाणी पंपाची आवश्यकता आहे़ त्या पंपाचा सामावेशही प्रस्तावात आहे.'

बैठकीला जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, प्रकाश टोणपे, विलास पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एन. बी़ भोई, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस़. एस़ शिंदे यांच्यासह महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

पुढील वर्षीच

गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाचगावसह चार गावांत तीव्र पाणीटंचाई होत आहे. ही गावे शहरालगत असल्याने वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याची पाणीपुरवठा योजना कमी पडत आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांतील लोकसंख्येला पाणीपुरवठा होईल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठीच ११ कोटींचा प्रस्ताव जीवन प्राधिकरण विभागाने तयार केला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधी मिळणे, निविदा प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेला हा उन्हाळा संपणार आहे. प्रत्यक्ष कामाला पुढील उन्हाळ्यातच सुरुवात होईल, असे प्रशानाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

०००

ग्रामसेवकांना आदेश द्या

शहराजवळील गावांत विनापरवाना घरांचे बांधकाम करण्याचे प्रमाण वाढले आहे, असा मुद्दा प्रकाश टोणपे यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यावर आमदार महाडिक यांनी त्यासंबंधी ग्रामसेवकांना स्वतंत्र आदेश द्यावा, अशी सूचना डॉ. खेमनार यांना दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरपद आठ दिवस रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार महापौरपद अडीच वर्षांसाठी असल्याने कोल्हापूरच्या महापौरपदाची मुदत १५ मे रोजी संपणार आहे. प्रशासन मुदत संपण्याची प्रतीक्षा करत असल्याने मुदतीनंतर किमान आठ दिवस महापौरपद रिक्त राहण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे निवड प्रक्रिया जाणीवपूर्वक पुढे ढकलली आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. स्थायी समिती सभापतिपद तसेच प्रभाग समिती सभापती निवडीही उशिरा करण्यात आल्या आहेत.

महापालिका अधिनियमानुसार महापौर व उपमहापौरपद अडीच वर्षांसाठी ठेवण्यात आले आहे. त्यानुसार आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. या नियमानुसार कोल्हापूरच्या महापौरपदाचा कालावधी १५ मे रोजी संपणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिलांसाठी महापौरपद राखीव आहे. १५ मेनंतर तातडीने नवीन महापौर निवड करता आली असती. विभागीय आयुक्तांकडे तशी मागणी केली असती तर १५ मे रोजीची अथवा त्यानंतर दोन दिवसांतील निवडीची तारीख मिळाली असती. प्रशासनाने मात्र महापौरपदाची मुदत संपण्याची प्रतीक्षा करण्याचे ठरवले आहे.

अधिनियमामध्ये महापौर व उपमहापौरपद नैमित्तिक कारणाने रिक्त झाल्यास त्यानंतर प्रक्रिया राबविण्याची तरतूद आहे. यावेळी महापौर व उपमहापौरपदाचा कालावधी नियमानुसार संपणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा करण्याऐवजी प्रशासनाला त्यादृष्टीने प्रक्रिया राबविता आली असती. सध्याच्या प्रतीक्षेमुळे मात्र १५ मे रोजीची मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा कालावधी गृहित धरून प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांकडे तारखेची मागणी केली जाणार आहे. त्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकाराने २२ मे रोजी निवडीची सभा होईल, असे दिसते.

यापूर्वी कालावधी संपल्यानंतर उशिराने निवडी घेतल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी महापालिकेकडे खुलासा मागितल्याचे उदाहरण आहे. यंदा महापौरपदाबरोबरच स्थायी सभापती, प्रभाग समिती सभापती यांच्या निवडीही उशिराने झाल्या आहेत. स्थायी सभापतिपदाची मुदत एक वर्षाची आहे. मुदत संपल्यानंतरच्या दुसऱ्याच महिन्यात पहिल्या आठवड्यात निवड होत होती. प्रभाग समिती सभापतींची मुदत आर्थिक वर्षानुसार संपते. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या प्रभाग समितीच्या सभेत निवड होणे अपेक्षित असते. पण यंदा मे महिना उजाडला. याबाबत सभागृहातील पदाधिकारी व नगरसेवकही शांत आहेत. यामुळे निवडी जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आल्या का? याची शंका व्यक्त होत आहे. याबाबत नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासास प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सुमारे पाच हजार दूध संस्थांच्या माध्यमातून पाच लाख दूध उत्पादकांचे दूध संकलन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) केले जाते. प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून गोकुळ आर्थिक उन्नतीचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.

पारदेवाडी (ता. भुदरगड) येथील अमोलदा महिला दूध संस्थेला नोंदणीपत्राचे महाडिक यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूग्ध विभागाचे सहायक निबंधक अरुण चौगले यांच्या उपस्थितीत संस्थेच्या चेअरमन आशा मोरसे यांना नोंदणीपत्र देण्यात आले.

महाडिक म्हणाले, 'भुदरगड तालुक्यातून पाचशे दूध संस्थांच्या माध्यमातून गोकुळकडे दररोज ६२ हजार लिटर दूध संकलित होत आहे. महिलांच्या दूध संस्थेमुळे यामध्ये आणखी भर पडणार आहे.' चेअरमन मोरसे यांनी अमोलदा दूध संस्था प्रतिदिन १३० लिटर दूध संकलन करत असून लवकरच ५०० लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करेल, अशी ग्वाही दिली. गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांचे याकामी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

यावेळी दूध संकलन अधिकारी संजय मणगुतकर, संस्थेच्या संचालिका शोभा रेडेकर, नम्रता गवस, मंगल गवस, रुपाली चव्हाण, शीतल निफाडे, सुनीता दुरुगुडे, वैशाली मोरसे, संगिता बसूगडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुलक्षणा चव्हाण यांना पीएचडी

$
0
0

सुलक्षणा चव्हाण यांना पीएचडी

कोल्हापूर

येथील सुलक्षणा वसंतराव चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी 'अ स्टडी ऑफ कंझ्युमर बिहेविअर इन डिजिटल प्रिटींग सर्व्हीसेस इन कोल्हापूर' या विषयावरील प्रबंध सादर केला होता. चव्हाण या गेली पंधरा वर्षे सांगली येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना कॉमर्स विभागप्रमुख डॉ. ए. एम. गुरव, डॉ. आर.बी.तेली, डॉ.डी.के.मोरे, डॉ.एस.एस. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्री निवासातील वेश्या व्यवसाय बंद करा

$
0
0

कोल्हापूर

व्हिनस कॉर्नर परिसरातील शाहू रोडवरील प्रणाम यात्री निवासातील वेश्या व्यवसाय, मटका, जुगार त्वरित बंद करावे, या यात्री निवासाचा परवाना रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन येथील महाराज प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, प्रणाम यात्री निवास रहिवाशी वसाहतीमध्ये आहे. येथील वेश्या व्यवसायाचा रहिवाशांना त्रास होत आहे. परिसरातील चांगल्या कुटुंबातील महिला, युवतींना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. यात्री निवासात बेकायदेशीरपणे खुलेआम कुणाच्या पाठबळावर वेश्या व्यवसाय, बेकायदेशीरपणे मटका, जुगार असे उद्योग सुरू आहेत, त्याचीही चौकशी करावी. निवेदन देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष निरंजन शिंदे, अमर देसाई, संगीता मोळे, तुकाराम लाखे, दशरथ राणे, जावेद मुल्ला, रश्मी देसाई आदी उपस्थित होते.

-------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफसी कोल्हापूर सिटी घोषणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन व्यावसायिक स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी एफसी कोल्हापूर सिटीची स्थापना केली आहे. या माध्यमातून १३, १५ व १८ वर्षांखालील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारपासून (ता. ११) टॅलेंट हंटला सुरुवात होणार आहे,' अशी माहिती कार्यकारिणीचे अध्यक्ष व उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी दिली. व्यावसायिक क्लब स्थापन करण्यासाठी केएसएचे चीफ पेट्रन इन चीफ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे जाधव यांनी सांगितले.

जाधव म्हणाले, 'कोल्हापुरात कुस्ती आणि फुटबॉलला संस्थानकाळापासून राजाश्रय मिळाला. श्रीमंत शाहू महाराजांनी कोल्हापुरात चांगला फुटबॉल रुजवला. त्यामुळे गेल्या दोन दशकांत कोल्हापुरातील फुटबॉलला चांगली उभारी मिळाली. यामुळेच कोल्हापूरला फुटबॉल जननी मानली जाते. तालमींच्या माध्यमातून फुटबॉल खेळाला चांगले वलय प्राप्त झाले आहे. नियमित होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत आहेत. पण त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही. प्रशिक्षणाअभावी काही मोजकेच खेळाडू राष्ट्रीय व राज्यस्तरावर चमकत आहेत. त्यापैकी एक अनिकेत जाधवचे नाव घ्यावे लागले. कोल्हापुरात असे अनेक अनिकेत तयार होण्यासाठी एफसी सिटीची स्थापना केली आहे. या माध्यमातून आयलीगसाठी १३, १५ व १८ वर्षांखालील संघातील खेळाडू तयार करण्यात येणार आहे.'

संघ बांधणीसाठी विभागीय क्रीडा संकुलात सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत निवड चाचणी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ११ ते १३ मे, तर जिल्ह्याबाहेरील खेळाडूंसाठी १४ ते १५ मे दरम्यान निवड चाचणी होणार आहे. निवड चाचणीतून ५० खेळाडंची निवड करून त्यांना व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना १८ वर्षांखालील विजेत्या स्पेन संघाचे व अॅटलॉटिटो क्लबचे खेळाडू फिलिक्स सरोगाथी विशेष मार्गदर्शन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

'विफा'चे उपाध्यक्ष मालोजीराजे म्हणाले, 'फुटबॉल खेळाला दिशा देण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. कोल्हापुरात नव्याने स्थापन झालेल्या एफसी कोल्हापूर सिटीला केएसए व विफाच्यावतीने संपूर्ण मदत करू.'

पत्रकार बैठकीस नगरसेवक संभाजी जाधव, सेक्रेटरी योगेश कुलकर्णी, दीपक चोरगे, शरद पवार, नरेंद्र पायमल, अमित पवार, युवराज पाटील, माणिक मंडलिक, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images