Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आम्ही मराठी नाटकातून उलगडला मातृभाषेचा पट

$
0
0

फोटो टाकळकर

लोगो : राजा परांजपे महोत्सव

'आम्ही मराठी'ने उलगडला मातृभाषेचा पट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संतरचनांपासून ते आजच्या मराठी कवी व साहित्यिकांच्या लेखनातून मराठी भाषेचे विस्तारलेले आकाश त्यातील शब्द व अर्थसौंदर्यातून अनुभवण्याची पर्वणी रविवारच्या सायंकाळी कोल्हापूरकरांना मिळाली. 'एक प्रवास.. मराठी असण्यापासून मराठी होण्यापर्यंतच्या' या संकल्पनेवर बेतलेल्या 'आम्ही मराठी' या नाटकाने उलगडलेला मातृभाषेचा पट रसिकांना सुखावून गेला.

राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात राजा परांजपे महोत्सव सुरू आहे. महोत्सवांतर्गत रविवारी आम्ही मराठी या नाट्यकृतीचे आयोजन केले होते. यावेळी मराठीच्या उत्पत्तीपासून भाषिक लहेजातील बदलांचा प्रवास सादर करण्यात आला. श्रीकृष्ण व सुदामा यांच्यातील भारूडरूपी संवादातून मराठी भाषेचा आजवरचा प्रवास मांडण्यात आला. दरम्यान सकाळच्या सत्रात 'लाखाची गोष्ट' व 'ऊन पाऊस' हे दोन सिनेमे दाखविण्यात आले.

नटरंग या सिनेमातील शीर्षक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी भाषेतील लोकगीते, भावगीते सादर करत त्यातील सखोल अर्थाच्या गोडव्याचे वर्णन ऐकणे हा रसिकांसाठी अनोखा अनुभव ठरला. कोकण, मराठवाडा, कोल्हापूर, खानदेश अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाषिक सौंदर्य दाखवणारे शब्द, त्यातून तयार झालेली गाणी सादर करत मराठीच्या वैविध्याची ओळखही करून दिली.

'मराठीतील हरवलेली शुद्धता' यावर या नाट्यकृतीतून केलेले चिंतन अंतर्मुख करून गेले. इंग्रजाळलेली किंवा हिंदीमिश्रित मराठी बोलणाऱ्या पिढीने मराठी भाषेतील शब्दांचे वैभव गमावू नये असा संदेश देणारे संवाद ही या नाट्यकृतीची खासियत ठरली, तर शिक्षणाच्या माध्यमामध्येही मराठी मागे पडून इंग्रजी माध्यमाला येत असलेले प्राधान्य विचार करायला लावणारे आहे असेही या नाट्यकृतीने अधोरेखित केले. मातृभाषेतून ज्ञान घेणे ही संस्कृती लोप पावत आहे आणि ती मराठी भाषेच्या अस्मितेतूनच जपली जाईल असा विश्वास देत या नाट्यकृतीने टाळ्यांची पावती घेतली.

अक्षय जोशी यांचे लेखन असलेल्या या नाट्यकृतीचे दिग्दर्शन अर्चना राणे यांनी केले. अमेय बर्वे, अक्षय जोशी, पार्थ राणे, अमिता घुगरी, संजीव मेंहेंदळे, धवल चांदवडकर, स्वराली कुंभोजकर, विक्रम भट, दीप्ती कुलकर्णी व कौस्तुभ देशपांडे या कलाकारांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीअंतासाठी बसवेश्वरांचे विचार आदर्शवत

$
0
0

\Bजातीअंतासाठी बसवेश्वरांचे विचार आदर्शवत\B

प्रा. परदेशी यांचे प्रतिपादन, बसव व्याख्यानमालेला प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात जातीअंताच्या चळवळीचे नेतृत्व केले. समता, बंधुता, मानवतेचे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. महात्मा बसवेश्वर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात मानवता, एकता, जातीअंत हे मुद्दे समान आहेत. याच महामानवांच्या विचारांची गरज आहे', असे प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी रविवारी केले. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाज संस्था, बसव केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 'महात्मा बसवेश्वर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीअंताचा संगर' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात व्याख्यानमाला सुरू आहे.

प्रा. परदेशी म्हणाल्या, 'जातीव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि स्त्रियांना दुय्यम मानण्याची मानसिकता बदलण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांचे विचार महत्वाचे आहेत. ज्या काळात बहुजन समाजाला आत्मसन्मान नाकारला गेला, त्याकाळात बसवेश्वर आणि डॉ. आंबेडकर यांनी क्रांतिकारी कामगिरी केली. मात्र, आज जयंतीच्या निमित्याने महापुरुषांची वाटणी जातीजातींनी करून घेतल्याचे दिसते. क्रांतिकारी बदल घडवणारे महापुरुष कोणत्याही एका जातीचे नसतात. ते अखंड मानवतेचे असतात. चूल, मूल, रांधा, वाढ यातच स्त्रियांचे जग बंदिस्त असतानाच्या काळात अक्कमहादेवी यांनी परिवर्तनासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रबोधनातून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच विचाराची चळवळ सावित्रीबाई फुले यांनी चालवली. शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली.'

कुलगुरू साळुंखे म्हणाले, 'जगभर वर्णभेद आहेत. समानतेसाठी संघर्ष अटळ आहे. सध्या असहिष्णुता, हुकूमशाहीचे वातावरण वाढले आहे. ही धोक्याची घंटा आहे. राजकारण, शिक्षणामुळे जातीच्या भिंती घट्ट होताना दिसत आहेत. क्रांतिकारी महापुरुषांना विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करणे म्हणजे पुरोगामी विचारांचा पराभव आहे.'

सुभाष झगडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मेघा पानसरे, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पोवार, राजशेखर तंबाके, चंद्रकांत वडगावकर आदी उपस्थित होते. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव विभुते यांनी आभार मानले.

तेही संघातच... असे म्हणतील

'भारत देशही आरएसएसचीची एक शाखा होती, असे म्हणण्यापर्यंत सध्याच्या राज्यकर्त्यांची मजल गेली आहे. महात्म बसवेश्वरही आरएसएसचे होते असेही म्हणण्यास ते मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकांनी सतर्क राहण्याची वेळ आली आहे', असे प्रा. प्रतिममा परदेशी यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. स्वयंघोषित संकृती आणि गोरक्षकांचा उन्माद घातक असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षणाने अधिक जातीवादी

'वस्तूत: शिक्षणाने जात, वर्णव्यवस्था कमी झाली पाहिजे. मात्र, आताचे चित्र उलट दिसत आहे. किती जेवढे उच्चशिक्षीत तितके जातीयवादी अधिक असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी महात्मा बसवेश्वर, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर जिथे संधी, मिळेत तिथे करावा', असे आवाहनही प्रा. परदेशी यांनी केले.

000

(मूळ कॉपी)

प्रा. परदेशी यांचे प्रतिपादन, बसव व्याख्यानमालेला प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जातीअंताच्या चळवळीचे नेतृत्व केले. समता, बंधुता, मानवतेचे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. महात्मा बसवेश्वर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात मानवता, एकता, जातीअंत हे मुद्दे समान आहेत. याच महामानवांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी रविवारी केले.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाज संस्था, बसव केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 'महात्मा बसवेश्वर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती अंताचा संगर' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते. शाहू स्मारक भवनात व्याख्यानमाला सुरू आहे.

प्रा. परदेशी म्हणाल्या, जातव्यवस्था उदध्वस्त करण्यासाठी आणि स्त्रियांना दुय्यम मानण्याची मानसिकता बदलण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांचे विचार महत्वाचे आहेत. ज्या काळात बहुजन समाजाला आत्मसन्मान नाकारला त्या काळात बसवेश्वर आणि डॉ. आंबेडकर यांनी क्रांतीकारी कामगिरी केली. मात्र आज जयंतीच्या निमित्याने महापुरूषांची वाटणी जातीजातींनी करून घेतल्याचे दिसते. क्रांतीकारी बदल घडवणारे महापुरूष कोणत्याही एका जातीचे नसतात. ते अखंड मानवतेचे असतात. चूल, मूल, रांधा, वाढ या असे स्त्रियांचे बंदीस्त जग असतानाच्या काळात अक्कमहादेवी यांनी परिवर्तनासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रबोधनातून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच विचाराची चळवळ सावित्रीबाई फुले यांनी चालवली. शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली.

कुलगुरू साळुंखे म्हणाले, जगभर वर्णभेद आहेत. समानतेसाठी संघर्ष अटळ आहे. सध्या असुहिष्णता, हुकूमशाही वातावरण वाढले आहे. ही धोक्याची घंटा आहे. राजकारण, शिक्षणामुळे जातीच्या भिंती घट्ट होताना दिसत आहेत. क्रांतीकारी महापुरूषांना विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करणे पुरोगामी विचाराचा पराभव आहे.

सुभाष झगडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मेघा पानसरे, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पोवार, राजशेखर तंबाके, चंद्रकांत वडगावकर आदी उपस्थित होते. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव विभुते यांनी आभार मानले.

---------------

चौकट

तेही संघातच असे म्हणतील

भारत देशही आरएसएसचीची एका शाखा होती, असे म्हणण्यापर्यंतची मजल आताच्या राज्यकर्त्यांची गेली आहे. महात्म बसवेश्वरही आरएसएसचे होते, असेही म्हणण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकांनी सतर्क राहण्याची वेळ आली आहे, असे प्रा. परदेशी यांनी सांगताच हशा पिकला. स्वयंघोषित संकृती आणि गोरक्षकांचा उन्माद घातक असल्याचेही त्यांनी सांगितले.

-------------------

अधिक जातीवादी

शिक्षणाने जात, वर्णव्यवस्था कमी झाली पाहिजे. मात्र आताचे चित्र उलटे दिसत आहे. किती उच्च शिक्षीते तितके जातीवादी अधिक असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी महात्मा बसवेश्वर, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर जिथे संधी, मिळेत तिथे करावा, असे आवाहनही प्रा. परदेशी यांनी केले.

-----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवणार

$
0
0

'गाळमुक्त धरण, शिवार

प्रभावीपणे राबविणार'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' ही योजना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यास येणार असून या योजनेंतर्गत जिल्ह्यात गाव तलाव, पाझर तलाव आणि कृषि बंधाऱ्यांच्या ११७ कामांचे नियोजन केले असून ही कामे तात्काळ सुरु करावीत', असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' या योजनेंतर्गत कामांच्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

जिल्हाधिकारी म्हणाले, 'जलसाठ्यांची पुर्नस्थापना करून उपलब्ध जलस्त्रोतांची शाश्वत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने संपूर्ण राज्यभर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्राधान्यक्रमाची योजना म्हणून हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील ११७ कामांची नोंदणी झाली असून यामध्ये गाव तलावाची ४४, पाझर तलावाची ५३ आणि बंधाऱ्यांच्या ३० कामांचा समावेश आहे. यामध्ये गगनबावडा तालुक्यात सात, शाहूवाडीत १६, कागलमध्ये पाच, भुदरगडमध्ये १०, गडहिंग्लजमध्ये नऊ, हातकणंगलेत १७, शिरोळ, राधानगरीत प्रत्येकी तीन, आजरा तालुक्यात आठ, करवीर तालुक्यात १२, चंदगडमध्ये दहा आणि पन्हाळा तालुक्यातील १७ कामांचा समावेश आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात गाळ काढण्याचे १३६ कामांचे उद्दिष्ट होते पण १५० कामे पूर्ण केली आहेत.'

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, उप जिल्हाधिकारी विवेक आगवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी यशवंत थोरात, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

पाझर तलावातील गाळ

काढण्यासाठी विशेष मोहीम

'जिल्हा परिषदेकडील पाझर तलावामधील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून तलावातील गाळ काढण्याबरोबरच शेतकऱ्यांना हा गाळ उपलब्ध झाल्याने जमिनीही सुपिक करण्यावर अधिक भर दिला जाईल', असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी सांगितले.

अशी आहे योजना

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसाठी शेतकरी तसेच संस्थांकडून गाळ काढण्यासाठी ऑनलाईन व ऑफ लाईन अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांनी संबंधित सदस्य सचिवाकडे छाननीसाठी व तांत्रिक मान्यतेसाठी तात्काळ पाठवावा. उप अभियंत्यांनी दोन दिवसांत अर्जाची छाननी करून, तांत्रिक मान्यता देणे आवश्यक आहे. त्यानंतर तहसिलदारांच्या शिफारशीसह तो अर्ज तालुकास्तरीय समितीकडे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यक्रम

$
0
0

लोगो - यंग सीनिअर्स

निराधार ज्येष्ठांसाठी वसतिगृह बांधणार

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष जॉ. जगताप यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेत सुवर्णा अरविंद काळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धा घेण्यात आल्या. वर्धापनदिन विविध उपक्रमांनी टाऊन हॉल येथील बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र येथे साजरा झाला. तात्यासाहेब मोरे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमात पारितोषिक वितरणप्रसंगी संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप म्हणाले, 'सेवा संघातर्फे सभासदांना शस्त्रक्रियेसाठी एक हजार रूपये दिले जातात. निराधार, गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी घरपोच जेवणाचे डबे दिले जातात. संघातर्फे सभासदांच्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात. सेवा संघ हे ज्येष्ठांचे सहायता केंद्र आहे. भविष्यात निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वसतिगृह बांधण्याचा संकल्प आहे.'

वर्धापनदिनानिमित्त निबंध स्पर्धा, वार्षिक अहवाल स्पर्धा घेण्यात आल्या. वार्षिक अहवाल स्पर्धेच बक्षीस वितरण प्रा. अनुराधा गुरव यांच्या हस्ते झाले. निबंध स्पर्धेसाठी प्रा. अ. रा. जयतीर्थ, रेखा जयतीर्थ, अरविंद दीक्षित, आर. डी. नार्वेकर, एस. डी. साळुंखे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्राचार्य एच. व्ही. देशपांडे यांचे सहकार्य लाभले. या वेळी शिवाजीराव हिलगे, प्राचार्य एच. व्ही. देशपांडे, मनोरमा कुलकर्णी, प्रा. श्रीपाल जर्दे, पी. टी. पाटील, श्रीकृष्ण वाघ, डॉ. सुशीला ओडेयार आदी उपस्थित होते. अरविंद ओतारी यांनी स्वागत केले. श्रीकांत आडीवरेकर यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल

निबंध स्पर्धा : सुवर्णा काळे, आप्पासो कोकितकर, मंगल जाधव, किरण फडणीस, मोहन आळतेकर, खंडेराव परीट, मालती डुंबरे, रा. अ. गुरव, संजय मोहिते.

वार्षिक अहवाल स्पर्धा : जखुबाईदेवी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (चोकाक), तपोवन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (कोल्हापूर), ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (हुपरी), गणेश ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (सांगली).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षी वाचवा मदत

$
0
0

पक्ष्यांसाठी सरसावले हात

'डीआयडी'तर्फे घरटी, जिजाऊ महिला मंडळातर्फे धान्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लहानग्या पक्ष्यांना मदत देण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे येत आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'पक्षी वाचवा' मोहिमेसाठी डीआयडी फिटनेस अकॅडमीतील लहान मुलांसह तरुणांनी पक्ष्यांना आकर्षित करणारी विविध प्रकारची घरटी सुपूर्द केली, तर साइक्स एक्स्टेंशनमधील जिजाऊ महिला मंडळाने धान्य दिले आहे. पक्ष्यांसाठी समाजातील संवेदनशील घटकांकडून जमा होत असलेल्या साहित्यामुळे 'पक्षी वाचवूया' मोहिमेला व्यापक स्वरूप येत आहे.

उन्हाच्या वाढत्या तडाख्यापासून पक्ष्यांना संरक्षण देण्यासाठी 'मटा'ने राबविलेल्या मोहिमेला सर्व वयोगटांतील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. धान्य, पाण्यासाठी मातीची भांडी तसेच पक्ष्यांसाठी निवारा म्हणून विविध प्रकारची घरटीही दिली जात आहेत. यामुळे ही मोहीम अगदी तळागाळातील नागरिकांना भावली असून, प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करण्यासाठी पुढे येत आहे. याशिवायही अनेकजण पक्ष्यांच्या संरक्षणासाठी समाजात प्रबोधन करण्यासाठी सरसावले आहेत. विविध ठिकाणच्या सोसायटी व नागरी वस्त्यांमध्ये प्रबोधनाच्या बैठक आयोजित केल्या जात आहेत.

डीआयडी फिटनेस अकॅडमी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पक्षी वाचवा' मोहिमेत सहभागी झाली आहे. अध्यक्ष मिस्टर मॅडी व डॉ. अनिता मांडरे यांच्यासह अकॅडमीतील संजना, झिमा, झुनेरा, इशांत, अविशता, विद्या, धैर्य, अनुष्का, आदर्श, अक्षय, प्रणव, आदित्य, प्रीती, प्रसन्न, रेणुका, सान्वी, वैदेही, झुमाना या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी विविध प्रकारची घरटी भेट दिली. यावेळी पालक झेबा नागरजी, छाया गडमारे, प्रसाद कमतनुरे, आदी उपस्थित होते.

साइक्स एक्स्टेंशन हा झाडांनी व्यापलेला परिसर आहे. या परिसरात पक्ष्यांचा वावर जास्त असतो. त्यामुळे सजग असलेल्या जिजाऊ महिला मंडळाने या मोहिमेसाठी धान्य सुपूर्द केले. स्मिता खामकर, जया शिंदे, अश्विनी हर्षे, जयश्री पाटील, बिना देशमुख या महिलांनी लहानग्या पक्ष्यांसाठी मदत करण्याच्या उद्देशाने पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरेमठ यांना शोधनिबंध पुरस्कार

$
0
0

डॉ. हिरेमठ यांच्या

शोधनिबंधास पुर्सकार

कोल्हापूर : के. एल. ई संस्थेतील प्राध्यापक डॉ. रवींद्र हिरेमठ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सर्वोत्तम शोधनिबंध' पुरस्कार मिळाला. नवी दिल्ली येथे झालेल्या एपीटीआयच्या २२ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, डॉ. एस. ईश्वरा रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. हिरेमठ यांनी 'इंडियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँण्ड रिसर्च' या नियतकालिकात 'क्रोमॅटोग्राफिक फिंगरप्रिंट अॅनालीसीस ऑफ मेडिसिनली इम्पॉर्टन्ट प्लान्ट एलिफंटॉप्स स्केबर युसिंग एचपीटीएलसी टेक्निक' हा शोधनिबंध सादर केला होता.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्ताबाळ हायस्कूलमध्ये व्याख्यान

$
0
0

दत्ताबाळ हायस्कूलमध्ये व्याख्यान

कोल्हापूर : दत्ताबाळ मिशन डिव्हाइन संचलित दत्ताबाळ हायस्कूलमध्ये व्यक्तीमत्व विकास यावर पाटकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवावा, मुलांचे व्यासपीठावरील गुण अवगत करावे, तसेच खेळाच्या माध्यमातून शारिरीक व बौद्धिक विकास कसा करावा यावर पाटकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विविध खेळांचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, सेक्रेटरी नीलेश देसाई, मुख्याध्यापक डी. व्ही. पाटील, सचिन डवंग, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका किर्ती मिठारी आदी उपस्थित होते.

०००

बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : अनुसुचित जातीविरोधातील अत्याचारात २२ टक्क्यांनी वाढ झाली असताना सुप्रिम कोर्टाने अॅट्रासिटी कायद्यातील कडक तरतुदी वगळल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुर्नयाचिका दाखल करावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली. आंदोलनात मनोहर चौगुले, गौरव पणोरकर, अमित कोल्हापुरे, सागर नरशिंगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

०००

गुरुवारी सामाजिक हक्क दिन

कोल्हापूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व पशुसंवर्धन दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांचा १९ एप्रिल रोजी होणारा ५० वा वाढदिवस 'सामाजिक हक्क दिन' येथे मुंबई येथील बिर्ला हाऊस येथे साजरा करण्यात येणार आहे. समारंभास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वाढदिवस समारंभासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते १८ एप्रिल रोजी रवाना होणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. बाळासाहेब कामाण्णा व जिल्हाध्यक्ष संदेश कचरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक ओपनिंग

$
0
0

मनोरंजनाचा मंच बहरणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळांना सुटी सुरू झाली आहे. पर्यटनाचा माहोल रंगला आहे. अशा वातावरणात कोल्हापुरात येणाऱ्या आठवड्यात मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण मंच बहरणार आहे. सिनेमा महोत्सव, प्रदर्शने, पुरस्कार सोहळे, व्याख्यानमाला असा भरगच्च कार्यक्रम रसिकांना खुला होणार आहे.

राजा परांजपे यांना मानाचा मुजरा

मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळाला अभिनय व दिग्दर्शनातून झळाळी देणाऱ्या राजा परांजपे यांचे सिनेमे पाहणे ही दर्दी रसिकांसाठी पर्वणीच. मग जर या राजा माणसाच्या सिनेमाचा महोत्सव म्हणजे बहारच. कोल्हापुरात हा महोत्सव सुरू झालाय. राजा परांजपे यांनी अजरामर केलेल्या कथांचा हा महोत्सव २० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत महोत्सवाचा पडदा खुला आहे. आज सोमवारी जगाच्या पाठीवर, गंगेत घोडं न्हालं, तर मंगळवारी सुवासिनी आणि पाठलाग हे सिनेमे दाखवण्यात येणार आहे. बुधवारी पुढचं पाऊल व वऱ्हाडी वाजंत्रीसोबत सायंकाळी पाच वाजता अंकुर हे नाटकही पाहता येणार आहे. गुरूवारी पडछाया व पेडगावचे शहाणे सिनेमांचा आनंद घेता येणार आहे. दिग्दर्शक राजदत्त यांना राजा परांजपे जीवन गौरव पुरस्काराने या महोत्सवाची सांगता होणार आहे. कथा, मांडणी यांनी समृद्ध असलेल्या या महोत्सवाला कोल्हापूरकरांचा प्रतिसाद मिळत आहे.

विचारांची शिदोरी

एखाद्या विषयाची अभ्यासात्मक मांडणी करून त्यातून विचारांची शिदोरी देणारी व्याख्यानमाला अशी ओळख असलेल्या बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले गेले आहे. मंगळवारपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. सोमवारी १६ रोजी डॉ. रहमत तरिकरे हे शरण और सुफी संप्रदाय या विषयावर विवेचन करणार आहेत. तर मंगळवारी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार हे लिंगायत क्रांतिकारी प्रागतिक धर्म या विषयावर मनोगत मांडणार आहेत. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता ही व्याख्यानमाला रंगणार आहे.

रंगणार कवी संमेलन

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी वह्या संकलन संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने आयोजित सतेज लोकोत्सव या उपक्रमांतर्गत गुणवंत कामगार सेवासंघातर्फे मंगळवार दि. १७ रोजी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. पाटलोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कोल्हापुरातील नामांकित कवींसह नवोदित कवींनाही काव्यवाचनाचा मंच मिळणार आहे.

भेट पारध्याच्या गायीची

सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात माणसाला साद घालणाऱ्या पारध्याला व त्याच्या गायीला भेटण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. शाहू स्मारकभवन येथे सोमवार दि. १६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अनेक साहित्यिक व विचारवंत उपस्थित राहणार आहेत. या अनोख्या कार्यक्रमातून अंतर्मुख करणारा विचारप्रवाह मांडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणपतराव देशमुख यांना यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कार...फोटो सह

$
0
0

फोटो आहे...टाकळकर यांचा फोटो आहे

..........

आरक्षणासाठी आयुष्याचीही किंमत मोजू

धनगर आरक्षणप्रश्नी आमदार गणपतराव देशमुख यांचा निर्धार, होळकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'धनगर समाजासाठी अनुसूचित जाती आरक्षणाची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला करावीच लागेल. धनगर समाज आरक्षणाच्या कक्षेत यावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रसंगी आयुष्याचीही किंमत मोजू,' असा निर्धार आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केला.

यशवंत प्रतिष्ठान संचलित यशवंत महोत्सवात यशवंत युवा सेनेच्यावतीने धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते व आमदार गणपतराव देशमुख यांना यशवंतराव होळकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र व घोंगडे प्रदान करून देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश शेंडगे होते. शाहू स्मारक भवन येथे रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला.

आमदार देशमुख म्हणाले, 'धनगर समाजाला राज्य घटनेने आरक्षणाचा हक्क दिला आहे. मात्र राज्य सरकारकडे सात्यत्याने मागणी करून ही या आरक्षणाबाबत अंमलबजावणी न केल्याने धनगर समाज विकासापासून वंचित राहिला आहे. शिक्षण, नोकरीतील संधी, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रात समाजाची पिछेहाट झाली आहे. भविष्यात धनगर समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जाती जमाती आरक्षणाची अंमलबजावणी होणे गरजेचे असून यासाठी आयुष्य वेचण्याची माझी तयारी आहे. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देईन असा इशाराही देशमुख यांनी दिला.

माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, 'धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत भाजप सरकारने फसवणूक केली आहे. आयोगामार्फत सर्व्हेक्षण करण्याचा दिखाऊपणा सरकारने केला आहे. धनगर समाजाचा अभ्यास पूर्ण झाला तरी अद्याप आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकार वेळकाढू धोरणाचा अवलंब करत आहे. सत्ता दिल्यास धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजाणीचा निर्णय निकालात काढल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन फडणवीस, खडसे यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी दिले होते. या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सत्तेवरून खाली खेचण्याआधी मुख्यमंत्री फडवणीस यांना त्यांच्या या आश्वासनाची आठवण करून दिली जाणार आहे.'

यावेळी अमरजितराजे बेरघळ, भूषणसिंहराजे होळकर, प्रा. शिवाजीराव दळणार, माजी आमदार संपतराव पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास रेणुका शेंडगे, गणपतराव बारगळ, अशोक कोळेकर, बबन रानगे, सुलोचना नायकवडी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अमोल रणदिवे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारीत पोवाडा सादर केला. उचगाव येथील मंगोबा ओवीकार मंडळाने ओवीतून लेकवाचवा संदेश दिला. यशवंत युवासेनेचे अध्यक्ष विवेक कोकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्माराजे उद्यानातील रिंग काढा

$
0
0

पद्माराजे उद्यानातील

रिंग हटविण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानातील स्केटिंग रिंग, जिमनॅस्टिक मैदान तसेच दोन मजली इमारत हटवावी, अशी मागणी उद्यानात फिरण्यास येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे.

महापालिकेने पद्माराजे उद्यानात स्केटिंग रिंग, दोन मजली इमारत तसेच जिमनॅस्टिक मैदान केले होते. उद्यानामध्ये केलेल्या या बांधकामामुळे नागरिकांना फिरण्यास अडचण येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्याबाबत वारंवार तक्रार करुनही फरक न पडल्याने काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी रिंगचे बांधकाम उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे आहे. या बांधकामाचा काहीच वापर होत नसल्याने या रिंगबरोबर दोन मजली इमारत महापालिकेने हटवावी, अशी मागणी उद्यानात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस मोर्चा - महिला अत्याचारांविरोधात काँग्रेसचा कँडेल मोर्चा

$
0
0

महिला अत्याचारांविरोधात

काँग्रेसचा कँडल मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्नाव (उत्तरप्रदेश) व कठुआ (जम्मू काश्मीर) येथे झालेल्या बलात्कार घटनांच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने कँडल मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. शाहूपुरी येथील काँग्रेस कार्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली.

भाजप सरकारच्या काळात महिला असुरक्षित बनल्या असून कायदा व सुव्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे. फलक, हातामध्ये मेणबत्ती व काँग्रेस पक्षाचे झेंडे घेवून कार्यकर्ते सहभागी झाले होते. निषेध फलकांच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले.

उन्नाव व कठुआ येथे बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. उन्नाव येथे तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. यामध्ये भाजप आमदाराचा समावेश असल्याने त्याला अटकही करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांचा अशा घटनांमध्ये सहभाग असल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने कँडेल मोर्चाद्वारे निषेध व्यक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने कँडल मोर्चा काढण्यात आला.

सायंकाळी सात वाजता कँडल मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा काँग्रेस कमिटी येथून शाहूपुरी पोलिस ठाणे, दाभोळकर कॉर्नर मार्गे एसटी स्टँड येथील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत आला. हातात मेणबत्ती व निषेधाचे फलक घेवून कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा राजीव गांधी पुतळ्याजवळ आल्यानंतर सर्व मेणबत्त्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर ठेवून पीडित महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कँडल मोर्चाची सांगता करण्यात आली.

मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष पाटील यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा अंजनाताई रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. सुरेश कुऱ्हाडे, भोगावती कारखान्याचे व्हाइस चेअरमन उदयसिंह पाटील-कौलवकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, प्रकाश सातपुते यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैंद्यांना मोबाईल पुरवणारा सुरक्षा रक्षक निलंबित

$
0
0

कैद्यांना मोबाईल पुरवणारा

सुरक्षा रक्षक निलंबित

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना मोबाइल व बॅटरी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालाजी मुंढे (वय ४५) या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले. मागील आठवड्यात रविवारी (ता. ८) जेल प्रशासनाने मुंढे यांची मोबाइल पुरवण्याची घटना उघडकीस आणली. कारागृह प्रशासनाने मुंढे याच्याकडील मोबाइल व दोन बॅटरी जप्त केल्या आहेत.

कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी या घटनेची माहिती दिली. सुरक्षारक्षक मुंढे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर गेले महिनाभर पाळत ठेवण्यात आली होती. रविवारी आठ एप्रिल रोजी मुंढे यांची दुपारी दोन वाजता ड्यूटी असताना तो रात्री साडेसात वाजता कारागृहात आला. त्याने मद्यपान केले होते. कारागृह प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याची तपासून करुन कारागृहात सोडले जाते. त्याची तपासणी केली जात असताना त्याने नकार दिला. त्यामुळे मुंढे याच्यावरील संशय बळावला. कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी बळाचा वापर करुन त्याची अंगझडती घेतली असता बुटात लहान आकाराचा मोबाइल, दोन बॅटरी मिळून आल्या. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकांनी कारागृह अधीक्षक शेळके यांना दिली. त्यांनी मोबाइल व बॅटरी जप्त केल्या व निलंबनाच्या कारवाईबाबत अहवाल पाठवण्यात आला. रविवारी त्याला निलंबित करण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक शेळके यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर कारागृहाच्या सर्व बरॅकची झाडाझडती घेण्यात आली. सुरक्षा रक्षक मुंढे याने कोणत्या कैद्याला पुरवण्यासाठी मोबाइल आणला होता याचा तपास करण्यात येत आहे. मुंढे याच्यावर यापूर्वी पुणे येथे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री राक्षसीप्रवृत्तीचे

$
0
0

पालकमंत्री राक्षसी प्रवृत्तीचे

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकाधिकारशाहीमुळे सर्वच घटकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना धमक्या येत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपण राक्षस असल्याचे सांगत विरोधकांच्या फायली बाहेर काढू, कामांची चौकशी करू, अशा धमक्या देत आहेत. ते राक्षसी प्रवृत्तीचेच आहेत, म्हणून ते तसा इशारा देत आहेत,' असा आरोप मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी रविवारी केला. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या बांधणीसाठी आयोजित मेळाव्याला ते येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.

गायकवाड म्हणाले, 'गोध्रा हत्याकांडामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी आणि शहांची प्रतिमा गुन्हेगारी राजकारणी अशी झाली आहे. यामुळेच भारतात विदेशातील गुंतवणूक घटली आहे. नवीन रोजगार निर्माण झालेले नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. विरोधात बोलणाऱ्यांना संपविण्याच्या प्रवृत्तीमुळेच अॅड. गोविंद पानसरे, डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश हत्या यांची हत्या झाली. राज्यातील ७० विचारवंतांना पोलिस संरक्षणात फिरावे लागते आहे. इतकी भयावह परिस्थिती राज्यात आहे. राज्यकर्ते दहशत निर्माण करीत आहेत, हे पालकमंत्री पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून समोर येते. माझ्यातील राक्षस जागा झाला आहे, विरोधकांच्या कामांची चौकशी करू, असे ते म्हणाले. हुकूमशाही वक्तव्य करणारे ते राक्षसीप्रवृत्तीचेच आहेत. त्यांची भाषा अशीच राहिल्यास जशाच तसे उत्तर देऊ.'

संभाजी ब्रिगेड सक्रिय नसल्याने राज्यात जातीयवादी शक्तींनी तोंड वर काढले आहे. हिंदत्ववादी, आरएसएसमुळे एकोपा धोक्यात आला आहे. राज्यात शाहू, फुले, आंबेडकरी विचाराने पुन्हा एकोपा निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रबोधन करणार आहे. घटनेतील सर्व तरतुदींची अंमलबजावणी करणे, तरुणांना आर्थिक सक्षम करण्याचे कार्यक्रम हाती घेणार आहे. त्यासाठी राज्यभरात संघटनेची बांधणी केली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

००००

भीमा कोरेगाव दंगल सरकारपुरस्कृत

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणीवपूर्वक आपल्याकडे गृहखाते ठेवून राजकीय फायद्यासाठी दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भीमा कोरेगावची दंगल सरकारपुरस्कृत आहे. मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांचे गुरू आहेत. दंगलप्रकणी गुन्हा दाखल असतानाही त्या दोघांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. मात्र, डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारपुरस्कृत दंगलीचे पितळ उघडे पाडले, असा आरोपही गायकवाड यांनी केला.

००००

राणेंचा अहवाल टिकणार नाही

गायकवाड म्हणाले, 'मराठा समाजास आरक्षण देण्यासंबंधी नारायण राणे यांचा अहवाल कोर्टात टिकणार नाही. तमिळनाडूच्या धर्तीवर कायद्याच्या चौकटीत मराठा समाजास आरक्षण द्यावे लागणार आहे. ओबीसी समाज आरक्षण कोट्याला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका आहे. आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघाले. त्यास विरोधासाठी अप्रत्यक्षपणे सरकारने इतर समाजास मोर्चा काढण्यास प्रवृत्त केले.'

------------------------------------

देशभक्त पुरस्कार देणार

दोष नसताना कन्हैय्या कुमार, हार्दिक पटेल यांच्यावर सरकारने देशद्रोही गुन्हे दाखल केले. दोघांनीही चांगले काम केले असताना आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दोघांनाही संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राष्ट्रीय अधिवेशनात देशभक्त पुरस्कार देणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात अधिवेशन होईल. संभाजी महाराज जयंतीनिमित्त १४ मे रोजी पुरंदर किल्ल्यावर भव्य मेळावा आयोजित केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीप्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात हेलपाटे सुरूच

$
0
0

विद्यापीठ लोगो

..................

नव्या प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे

प्रमाणपत्रांचा निकृष्ट दर्जा तसेच त्रुटींची जबाबदारी अद्याप अधांतरीच

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कुलसचिवांची स्वाक्षरी नसलेली पदवी प्रमाणपत्रे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने छपाई करून दिलेल्या प्रमाणपत्राचा निकृष्ट दर्जा व त्रुटींची जबाबदारी अद्यापही शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने निश्चित केलेली नाही. छपाईतील दोष काढून नव्या प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून विद्यार्थी विद्यापीठाकडे हेलपाटे मारत आहेत. पदवीप्रमाणपत्रांबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून विद्यार्थी कुलगुरूंची भेट मागण्यासाठी धडपडत आहेत, मात्र त्यांना कार्यव्यस्ततेचे कारण देत कुलगुरूंची भेट नाकारली जात आहे.

२०० रूपये शुल्क घेऊन २० रूपयांच्या छपाई दर्जाची पदवीप्रमाणपत्रे देणाऱ्या विद्यापीठाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांनी का सोसायचा असा प्रश्न करत विद्यार्थ्यांनी पदवीप्रमाणपत्रांमधील घोळाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मार्च महिन्यात तीनवेळा याबाबत चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोन वेळा कुलगुरू मुंबईला गेल्याने भेट होऊ शकली नाही, तर एकावेळी झालेल्या भेटीत १३ एप्रिल रोजी चर्चेसाठी येण्यास सांगितले होते. मात्र या दिवशीही कुलगुरूंनी वेळ दिली नाही.

१९ मार्च रोजी शिवाजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ झाला. प्रमाणपत्रावर कुलसचिवांची स्वाक्षरी असणे बंधनकारक असताना यंदा प्रमाणपत्रावर ही स्वाक्षरीच नव्हती. हा प्रकार प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर तातडीने नव्याने प्रमाणपत्रांची छपाई करण्यात आली व पदवीदान कार्यक्रमादिवशी ती विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. मात्र घाईगडबडीत छापण्यात आलेली ही प्रमाणपत्रे कृष्णधवल व लॅमिनेशन न केलेली आहेत. तसेच यावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मजकुरात काही विद्यार्थ्यांच्या पदवीच्या नावासह श्रेणीच्या उल्लेखातही चुका झाल्या आहेत. अशा चुका असलेल्या पदवीप्रमाणपत्रांमुळे नोकरीसाठी अर्ज करताना समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे पदवीदान सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी नव्या व योग्य प्रमाणपत्रांसाठी मागणीचा जोर धरला आहे. पदवीदान कार्यक्रम पार पडून महिना होत आला तरी विद्यापीठ प्रशासनाने प्रमाणपत्राच्या छपाईमध्ये झालेल्या चुकांबाबत जबाबदारीच निश्चित न केल्याने या प्रकरणाचे भिजत घोंगडे पडले आहे.

...................

विद्यार्थी म्हणतात ...

पदवीप्रमाणपत्र हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रमाणपत्र असते. त्यासाठी आम्ही २०० रूपये शुल्क देतो. यामध्ये फोटोसह लॅमिनेट करण्यात आलेले रंगीत प्रमाणपत्र मिळणे हा आमचा हक्क आहे. नियमानुसार प्रमाणपत्रावर कुलसचिवांची स्वाक्षरी असली पाहिजे हे विद्यापीठ प्रशासनाला माहिती असणे आवश्यक आहे. तरीही कुलसचिवांच्या स्वाक्षरीशिवाय प्रमाणपत्र छापणाऱ्या विद्यापीठाच्या सदोष यंत्रणेचा फटका विद्यार्थ्यांनी का सहन करायचा हा आमचा प्रश्न आहे. पदवीदान कार्यक्रमाची वेळ भागवण्यासाठी छापण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. कागद चांगला नाही. शिवाय त्यावर लॅमिनेशन नसल्याने फेरफार होण्याचा धोका आहे. प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यातील लेटेस्ट फोटो मागवण्यात आला होता. मात्र जी प्रमाणपत्रे आम्हाला देण्यात आली आहेत त्यावर प्रवेशप्रक्रियेवेळी जे फोटो आम्ही दिले होते तेच फोटो छापण्यात आले आहेत. २०० रूपये शुल्काप्रमाणे ५० हजार विद्यार्थ्यांकडून जमा होणारी रक्कम जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. मात्र हातात मिळालेले प्रमाणपत्र २० रूपयांच्या छपाईदर्जाचे आहे. त्यामुळे आमच्याकडून घेतलेल्या शुल्कानुसार चांगल्या दर्जाची लॅमिनेट केलेली प्रमाणपत्रे विद्यापीठ प्रशासनाने येत्या १५ दिवसात घरपोच दिली पाहिजेत.

.................

चौकट

विकास आघाडी गप्पच

विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसह, व्यवस्थापन परिषद व सिनेटमध्ये सत्तेसाठी एकत्र आलेल्या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी प्रमाणपत्रांचा घोळ व विद्यार्थ्यांना देण्यात आलेली सदोष प्रमाणपत्रे याबाबत आवाज उठवलेला नाही. सिनेट सभेतही या विषयावर फारशी चर्चा झाली नाही. विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनाही विद्यार्थ्यांवरील अन्यायबाबत सोयरसूतक आहे की नाही अशी शंका येत आहे. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, मराठा महासंघ युवक संघटना, व एनएसयूआय या संघटनांनी मात्र या प्रश्नाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जनता नागरी निवारा संघटनेने याबाबत कुलपती यांच्याकडे तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्रॅब गोडाऊनला आग

$
0
0

स्क्रॅप गोडाऊनला आग

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग लागून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (ता. १६) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. इरफान खान यांच्या गोडाऊनमधून धुराचे लोट येताच परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास घटनेची माहिती दिली. महानगरपालिकेच्या तीन बंबांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने कागल येथील शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. गोडाऊनमधील प्लास्टिक, रबर आणि वाहनांच्या स्पेअरपार्ट्समुळे आग वाढली होती. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात जवानांना यश आले. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. दस्तगीर मुल्ला, रघुनाथ पाटील, सिद्राम चौगुले, विठ्ठल मगदूम, आदींनी आग विझवण्याचे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फौंड्री उद्योजकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे

$
0
0

नवतंत्रज्ञान आत्मसात करा

फाउंड्री परिषदेत तज्ज्ञांचा सल्ला; परिषदेची सांगता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फाउंड्री उद्योजकांनी पर्यावरणपूरक उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत. त्यासाठी अधिकाधिक यंत्रसामुग्रीचा वापर करावा लागणार आहे. उद्योगातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक घटकांवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याचे नियोजन करावे, असे सर्वच तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया फाउंड्रीमनच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित वेस्कॉन २०१८ परिषदेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. हॉटेल सयाजी येथे दोन दिवसीय परिषदेची सोमवारी सांगता झाली.

कोईमतूरचे फाउंड्री उद्योजक विश्वनाथन म्हणाले, 'फाउंड्री उद्योगातून बाहेर पडणाऱ्या वाळूपासून विटा तयार करता येतात. आम्ही तशा विटा तयार करून इमारतीही बांधल्या आहेत. बाजारपेठेत त्यांना चांगली मागणी आहे. उद्योगांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून झाडांना वापरता येते. सांडपाण्याचा एक थेंबही उघड्यावर सोडू नये, तसे नियोजन करावे.'

अहमदाबादमधील फाउंड्री उद्योगातील एचआर प्रमुख सुमित वर्गिस म्हणाले, 'उद्योग वाढवताना भविष्यात नेटके नियोजन करावे. दुसऱ्या पिढीकडे व्यवसाय सोपवताना आपण कधी निवृत्त व्हायचे हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निवृत्त झाल्यानंतर व्यवस्थापनात ढवळाढवळ करू नये. पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावे.'

टाटा मोटर्सचे उदयन पाठक म्हणाले, 'दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढते आहे. यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिकल व्हेईकलचा वापर वाढवावा लागणार आहे. अशा वाहनांचे उत्पादन केले जात आहे. पहिल्या टप्यात हलकी वाहने तयार होतील. त्या वाहनांचा वापर वाढल्यानंतर छोटे पार्ट, बॅटरीला मागणी वाढणार आहे.'

बेंगळूरुचे उद्योजक आनंद जोशी म्हणाले, उद्योगामध्ये मनुष्यबळावर वापर अधिक राहिल्यास त्रुटी राहतात. उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अपरिहार्य आहे. सर्वच विभागात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्यास त्रुटी कमी होतील. उत्पादन गुणवत्तापूर्ण होईल.'

यावेळी परिषद नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश चौगुले, मल्हार भांदुर्गे, जयकुमार परीख, नरेंद्र झवर यांच्यासह कोल्हापूर आणि विभागातील फाउंड्री उद्योजक उपस्थित होते.

०००००००००

मूळ कॉपी

००००००००

परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उत्साहात सांगता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फौंड्री उद्योजकांनी पर्यावरणस्नेही उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत. त्यासाठी अधिकाधिक यंत्रसामुग्रीचा वापर करावा लागणार आहे. उद्योगातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक घटकांवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याचे नियोजन करावे, असे सर्वच तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया फौंड्रीमनच्या येथील शाखेतर्फे आयोजित परिषदेत ते बोलत होते. पश्चिम विभागातील फौंड्री उद्योजकांसाठी वेस्कॉन २०१८ नावाने आयोजित दोन दिवसाच्या परिषदेची सांगता सोमवारी झाली. येथील सयाजी हॉटेलमध्ये परिषद झाली.

कोईमतूरचे फौंड्री उद्योजक विश्वनाथन म्हणाले, फौंड्री उद्योगातून बाहेर पडणाऱ्या वाळूपासून विटा तयार करता येतात. आम्ही तशा विटा तयार करून इमारतीही बांधल्या आहेत. बाजारपेठेत त्यांना चांगली मागणी आहे. वाळू उघड्यावर टाकल्यास प्रदूषण होते. त्याचा पुन्हा वापर करता येतो. उद्योगांतील सांडपाण्याचे शुघ्दीकरण करून झाडांना वापरता येते. सांडपाण्याचा एक थेंबही उघड्यावर सोडू नये, तसे नियोजन करावे.

अहमदाबादमधील फौंड्री उद्योगातील एचआर प्रमुख सुमित व्हर्गीस म्हणाले, उद्योग वाढवताना भविष्यात नेटके नियोजन करावे. दुसऱ्या पिढीकडे व्यवसाय सोपवताना आपण कधी निवृत्त व्हायचे हे ठरवणे अत्यंत महत्वाचे आहे. निवृत्त झाल्यानंतर व्यवस्थापनात ढवळाढवळ करू नये. पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावे.

टाटा मोटर्सचे उदयन पाठक म्हणाले, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढते आहे. यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रीकल व्हेईकलचा वापर वाढवावा लागणार आहे. अशा वाहनांचे उत्पादन केले जात आहे. पहिल्या टप्यात हलकी वाहने तयार होतील. त्या वाहनांचा वापर वाढल्यानंतर छोटे पार्ट, बॅटरीला मागणी वाढणार आहे.

बेंगलोरचे उद्योजक आनंद जोशी म्हणाले, उद्योगामध्ये मनुष्यबळावर वापर अधिक राहिल्यास त्रुटी राहतात. उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अपरिहार्य आहे. सर्वच विभागात यांत्रिकिरणाचा वापर वाढल्यास त्रुटी कमी होतील. उत्पादन गुणवत्तापूर्ण होईल.

यावेळी परिषद नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश चौगुले, मल्हार भांदुर्गे, जयकुमार परीख, नरेंद्र झवर यांच्यासह कोल्हापूर आणि विभागातील फौंड्री उद्योजक उपस्थित होते.

--------------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांकडून चौकशी सुरु

$
0
0

पालकमंत्र्यांनी मागविली

आरक्षित जागांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील २० वर्षांतील वगळलेली आरक्षणे, हॉटेल सयाजी जवळील डीपी रोड आणि रमणमळ्यातील वॉटर पार्कबाबत महापालिकेने केलेल्या कारभाराची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशी सुरू केली. त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना दिले.

तावडे हॉटेल परिसरातील जागेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या आरोपामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या २० वर्षांतील जागांचा कारभार उघड करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी तातडीने महानगरपालिकेतील कारभाराची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. पालकमंत्र्यांनी सोमवारी आयुक्तांना पत्राद्वारे आदेश देऊन १९९५ ते २०१५ या वर्षातील आरक्षणाची माहिती मागितली आहे. तसेच हॉटेल सयाजी येथील डीपी रस्त्यांची तसेच रमणमळ्यातील वॉटर पार्कचीही माहिती मागितली आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या पत्रामध्ये हॉटेल सयाजीनजीक रुक्मिणीनगर परिसरातील डीपी रोड व अन्य कारणासाठी महापालिकेने आरक्षित केलेली जागा संपादित केली आहे का? संपादन केली असल्यास डीपी रोड मोकळा केला आहे का? तो वापरात घेतला का? याची माहिती देण्यास सांगितले आहे. मालकांनी खरेदी सूचना (पर्चेस नोटीस) देऊन १९९५ ते २०१५ या २० वर्षाच्या कालावधीत जी आरक्षणे वगळली, त्याची प्रकरणनिहाय माहिती मागवली आहे. रमणमळा येथील तलाव व त्या नावाशी सुसंगत असलेली जागा कोणाच्या मालकीची? डेव्हलपमेंट प्लॅननुसार या जागेचा जमीन वापर काय आहे? महानगरपालिकेने ही जागा संस्थेस वा व्यक्तीस हस्तांतरित केली असल्यास ती कोणत्या प्रकारच्या कराराने, किती वर्षासाठी व कोणत्या अटी शर्तीसह हस्तांतरीत केली आहे? हस्तांतरणाबाबात महानगरपालिका महासभेने केलेल्या ठरावास सरकारची मंजुरी मिळाली आहे का? ही माहिती देण्यास सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणी आज

$
0
0

कोल्हापूर: स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात दोन नगरसेवकांनी मतदान केल्याबद्दल विभागीय आयुक्तांकडून मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोन नगरसेवकांना लेखी वा तोंडी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण या दोघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोघांना सुनावणीच्या नोटीस बजावल्या आहेत. मंगळवारी (ता.१७) त्याची पहिली सुनावणी होणार आहे. यावेळी दोघांना लेखी वा तोंडी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी सिनेटोन....

$
0
0

परत केलेल्या पैशावर डल्ला

शालिनी सिनेटोनची रक्कम कारभाऱ्यांच्या ताब्यात

लोगो : महानगरपालिका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी सिनेटोन परिसरातील सुमारे आठ एकर जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी घेतलेली दोन कोटी रुपयांची रक्कम काँग्रेस, राष्ट्रवादीतील कारभाऱ्यांच्या ताब्यात आहे. आरक्षणाचा प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी पैसे घेऊन आरक्षण उठविण्याच्या प्रकारावरुन चहूबाजूनी टीका सुरू झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी प्रत्येकी ३८ हजार रुपयांची रक्कम परत केली होती. ही रक्कम महापालिकेतील कारभाऱ्यांच्या ताब्यात असून त्यावरून सध्या आघाडीत धुसफूस सुरू आहे.

दरम्यान जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या यंत्रणेची अवस्था 'ठरावही लटकला आणि पैशाचाही पत्ता नाही'अशी बनली आहे. कारभाऱ्यांना दिलेली रक्कम परत मिळावी यासाठी संबंधितांने महापालिकेत नेतृत्व करणाऱ्या घटकाकडे धाव घेतल्याचे वृत्त आहे. शालिनी सिनेटोनमधील जागांचे ले आऊट मंजुरीवेळी सुमारे आठ एकर जागा स्टुडिओसाठी राखीव ठेवण्याची आणि त्यासंदर्भात विकसकांनी महापालिकेला हमीपत्र दिले होते. आठ एकर जागेवरील आरक्षण उठविण्याची खेळी डिसेंबर २०१७ मध्ये झाली. बारा डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत आठ एकर जागेवरील आरक्षण नामंजूर करण्यात आले. नगरसेवकांना अंधारात ठेवून आणि सभागृहात कोणतीही चर्चा न करता अवघ्या अर्ध्या मिनिटाच आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

आरक्षण उठविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा सौदा झाला होता. या प्रक्रियेत महापालिकेतील सत्ताधारी आघाडीतील काही कारभाऱ्यांनी पुढाकार घेतला. गेल्या सभागृहातील एक माजी पदाधिकारीही या कामात सक्रिय होता. मात्र स्टुडिओसाठी आरक्षित जागा बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याच्या प्रकारावरुन शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. चित्रपट व्यावसायिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. सदस्यांना अंधारात ठेवून ठराविक कारभाऱ्यांनी स्टुडिओ विक्रीचा घाट घातल्यामुळे नगरसेवकही संतापले. विरोधी आघाडीसह सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांनी शालिनी सिनेटोन वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. चहूबाजूनी टीका सुरू झाल्यानंतर कारभाऱ्यांनी सत्तारुढ आघाडीच्या नगरसेवकांना प्रत्येकी ३८ हजार रुपयांचे वाटप सुरू केले. काही नगरसेवकांनी रक्कम नाकारली. तर काही नगरसेवकांनी मानहानी टाळण्यासाठी घेतलेली रक्कम परत केली. परत केलेल्या रकमेतही डल्ला मारण्याचा प्रकार घडल्याने नगरसेवक अस्वस्थ आहेत.

नेत्यांसमोर झाली चर्चा

गेले तीन महिने ही रक्कम महापालिकेतील ठराविक कारभाऱ्यांकडे आहे. नगरसेवकांनी स्टुडिओ वाचविण्यासाठी आणि मानहानी टाळण्यासाठी रक्कम परत केली. पण काही कारभाऱ्यांनी हे दोन कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले आहेत. एका स्नेहभोजनाच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर नगरसेवकांनी शालिनी सिनेटोनचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवकांकडून वसूल केलेली रक्कमही कारभाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे निदर्शनास आणले. आघाडीत सध्या वाद नको, म्हणून सदस्यांनी सबुरीने घ्यावे, अशी सूचना नेत्यांनी केल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार गुन्हेगार अटकेत

$
0
0

(फोटो आहे)

हद्दपार गुन्हेगार

राजारामपुरीत अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हद्दपार केल्यानंतरही शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी (ता. १६) दौलतनगरातून अटक केली. ओंकार विनायक आरगे (वय २३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, कोल्हापूर) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. ओंकार हा गौरव भालकर याच्या टोळीतील गुन्हेगार आहे. त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात मारामारी, दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राजारामपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठवले होते. यात गुंड गौरव भालकर याच्या टोळीतील ओंकार आरगे याचाही समावेश आहे. अधीक्षक मोहिते यांनी पाच एप्रिलला त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपारीच्या कारवाईनंतरही आरगे शहरात वावरत होता. सोमवारी सकाळी तो दौलतनगर परिसरात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांना मिळाली होती. पोलिस नाईक तानाजी सुंबे, युवराज पाटील, एकनाथ कळंत्रे यांनी आरगे याला ताब्यात घेतले. हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निकम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images