Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तावडे हॉटेल प्रकरण....

$
0
0

कारवाई करावी, अन्यथा कोर्टात जाणार

माजी नगरसेवक संघटनेचा इशारा, बी वॉर्ड समितीचीही कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयुक्त अभिजित चौधरी यांनी तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची त्वरित कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक संघटनेने दिला आहे. पालकमंत्र्यांनी तावडे हॉटेल परिसरातील कारवाईसंदर्भात आपला काही संबंध नाही, तसेच स्थगितीची सूचना दिली नसल्याचे म्हटले आहे. जर कोणत्याही प्रकारच्या स्थगितीची सूचना नसेल तर आयुक्त, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास का घाबरत आहेत, अशी विचारणा संघटनेने केली आहे. पत्रकावर माजी नगरसेवक अनिल कदम, सुजय पोतदार, किरण दरवान, चंद्रकांत सांगावकर, रमेश पोवार आदींच्या स्वाक्षरी आहेत.

दरम्यान, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी असे पत्रक काढले आहे. बेकायदेशीर कामांना पाठीशी घालून शहर विकासाला खो घालणाऱ्या लोकप्रतिनिधींचा समितीने निषेध केला आहे. तसेच कोल्हापूरच्या नागरिकांना दूधखुळे समजू नका, असा इशाराही दिला आहे. कृती समितीचे संस्थापक किसन कल्याणकर व अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ वर्षांत पंधरा जागांचा बाजार

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

राज्य सरकारने सार्वजनिक हितासाठी काही जागा महापालिकेला दिल्या. शाळा, क्रीडांगण आणि बगीचा यांसाठी महापालिकेने काही ठिकाणी आरक्षणे टाकली. मात्र मुदतीत भूसंपादन आणि जागा महापालिकेच्या मालकीच्या नावांनी करण्याची प्रक्रिया न पाडल्याने त्या जागा परत कराव्या लागल्या. यामुळे स्टुडिओपासून शाळा, क्रीडांगणासाठी आरक्षित जागेवरील मालकी महापालिकेला गमवावी लागली. राखीव जागांपासून डीपी रस्त्यापर्यंत मूळ आरक्षण उठविण्यात महापालिकेत काही कारभारी माहीर आहेत. गेल्या आठ वर्षांत कधी नगरसेवकांना अंधारात ठेवून तर कधी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन शहर आणि परिसरातील सुमारे पंधरा आरक्षित जागांचा बाजार झाला आहे. या जागा खासगी संस्था आणि व्यक्तींच्या घशात घातल्या आहेत. यामुळे महापालिकेला कोट्यवधींच्या जागेवर पाणी सोडावे लागले.

तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित जागेवरुन सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीवरुन आता हे प्रकरण कुणी किती जागा लाटल्या, याचा हिशेब मांडण्यापर्यंत पोहचले आहे. महापालिकेशी करार करुन अल्पदरात तीस वर्षे मुदतीसाठी जागा घ्यायच्या आणि त्या परस्पर व्यापार, व्यवसायासाठी अन्य संस्थांना भाडेतत्त्वावर द्यायच्या, अशी उदाहरणे सर्वश्रृत आहेत. जयप्रभा स्टुडिओ आणि शालिनी सिनेटोनचे आरक्षण उठविण्याचा प्रकार ताजा आहे. स्टुडिओच्या जागेचा वापर पूर्णत: सिनेमा व्यवसायासाठी करण्यासंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध असताना ते आरक्षण उठवून जागा विक्री झाली. गेल्या आठ वर्षांत जवळपास पंधरा जागांवरील आरक्षणे उठवली आहेत. रमणमळा, पाटोळेवाडी, हॉकी स्टेडियम परिसर, गजानन महाराजनगर, पाचगाव रोड, आपटेनगरसह उपनगरातील आरक्षित जागा मुदतीत ताब्यात घेतल्या नाहीत. यामुळे त्या जागाही परत गेल्या आणि महापालिकेला संबंधित घटकाला नुकसानभरपाईही द्यावी लागली. संभाजीनगर परिसरातील मैल खड्डा येथील जागेवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे.

..........

प्रशासनाकडे नेमकी आकडेवारी नाही

शहर आणि परिसरात महापालिकेच्या मालकीच्या किती जमिनी आहेत, कुठल्या जागेवर कोणते आरक्षण आहे, आरक्षण टाकल्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या नावे करायची, सातबारा नोंद करण्याची प्रक्रिया झाली नाही. एकदा नव्हे तीनदा महापालिकेच्या मालकीच्या जागांच्या ऑडिटचा निर्णय झाला. पण प्रत्यक्षात महापालिकेच्या जागांचे सर्वेक्षण झाले नाही. गेल्या सभागृहात माजी नगरसेवक सुभाष रामुगडे आणि सध्याच्या सभागृहातील नगरसेवक राजसिंह शेळके यांनी प्रशासनाकडे आरक्षित जागांची माहिती विचारली होती. सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र प्रशासनाकडून आरक्षित जागांसंदर्भात अधिकृत आकडेवारी दिली नाही. विभागीय कार्यालयांतर्गत समाविष्ट प्रभागात आरक्षित जागांची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

................

टीपीतील अधिकाऱ्यांची कारभाऱ्यांना साथ

आरक्षित जागांचा बाजार मांडण्यात महापालिकेच्या नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठिय्या मांडल्याने त्यांची 'टीपी'मध्ये ती वजन ठेवून आहेत. हे अधिकारी महापालिकेच्या हिताच्या कारभारापेक्षा कारभाऱ्यांच्या फायद्याचे काम करतात. त्यांनी शहरातील आरक्षित जागा, खुल्या जागांच्या माहितीच्या देवाणघेवाणीचा व्यवहार सुरु केला आहे. पर्चेस नोटिसीच्या नावाखाली आरक्षित जागांचा पद्धतशीर व्यवहार सुरु आहे. या प्रकारात महापालिकेतील काही कारभारी आणि बांधकाम व्यावसायिकांची साखळी आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागा मुदतीत ताब्यात घेतल्या नाहीत. कर्तव्यात कसूर करत महापालिकेचे नुकसान केल्याच्या कारणावरुन नगरसेवक भूपाल शेटे यांनी अधिकाऱ्यांविरोधात नगरविकास विभागाकडे तक्रार केली आहे.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीचा साखरपुडा मोडणारा प्रियकर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करून आईने तिच्या साखरपुड्याचा घाट घातला. पण प्रियकराने पोलिसांना कळवून हा डाव उधळला. यावर मुलीच्या आईने प्रियकराविरोधात पोलिसात विनयभंगाची तक्रार दिल्याने प्रियकराला पोलिसांनी अटक केली. ऐनवेळी मुलीने प्रियकराचीच बाजू घेतल्याने आईवडिलांसह पोलिसही बुचकळ्यात पडले. अखेर पोलिसांनी शनिवारी (ता. १४) प्रियकराला अटक केली, तर प्रेयसीची रवानगी बालसुधारगृहात केली. चार दिवसांपूर्वी करवीर तालुक्यात हा प्रकार घडला.

आमशी (ता. करवीर) येथील बाजीराव युवराज काळे याचे जवळच्याच गावातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. सहा महिन्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होताच त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, हे दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी लग्नाला विरोध केला. मुलीच्या आईवडिलांनी तिच्या साखरपुड्याचा घाट घातला. चार दिवसांपूर्वी पैपाहुणे आले. साखरपुड्याची गडबड सुरू असतानाच दारात पोलिसांची गाडी आली. यामुळ‌े सगळेच गोंधळले. अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची तक्रार आल्याने याची शहानिशा करण्यासाठी आल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले. मुलीचे वय १७ वर्षे ७ महिने आहे. आज केवळ साखरपुडा सुरू आहे. सहा महिन्यांनंतरच लग्न करणार असल्याचा खुलासा मुलीच्या आईवडिलांनी केला. यानंतर पोलिसांनी तक्रारदाराची चौकशी सुरू केली. मुलीच्या प्रियकरानेच निनावी तक्रार दिल्याचे लक्षात येताच मुलीच्या आईने बाजीराव काळेविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. काळे मुलीचा पाठलाग करतो. रस्त्यात अडवून त्याने मुलीचा हात धरला, अशी तक्रार मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली आहे.

प्रियकरावर गुन्हा दाखल होताच या प्रकरणाला नवे वळण मिळाले. मुलीने थेट आईवडिलांविरोधात भूमिका घेत जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याचे पोलिसांना सांगितले. बाजीरावसोबतच लग्न करण्याचा हट्ट तिने पोलिसांकडे धरल्याने पोलिसही गोंधळात पडले. विनयभंगाची तक्रार असल्याने पोलिसांनी बाजीरावला अटक केली, तर प्रियसीला ताब्यात घेऊन तिची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुपाली पवार यांना पीएचडी

$
0
0

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने रुपाली वीरेंद्रसिंह पवार यांना नुकतीच अभियांत्रिकी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेशन या विषयातील पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांना व्हीआयटीचे डॉ. राजेश जालनेकर यांचे मार्गदर्शन तर पती कॅप्टन वीरेंद्रसिंह पवार, वडील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे निवृत्त संचालक फत्तेसिंह जाधव-बहिरेवाडीकर, आई संजीवनी पवार यांचे प्रोत्साहन लाभले. रुपाली यांनी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजीनिअरिंग महाविद्यालय आणि डी.वाय. पाटील इंजीनिअरिंगमधून पदवी मिळवली. तसेच पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकी तेल तीन रुपयांनी स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात किलोमागे सरासरी दोन ते चार रुपयांची वाढ झाली होती. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली होती. या आठवड्यात मात्र केवळ सरकी तेलाचा दर किलोमागे तीन रुपयांनी कमी झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात ९० रुपये किलो असणारा दर यावेळी ८७ रुपये झाला.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व खाद्यतेलाच्या दरांत चांगलीच वाढ झाली होती. शेंगतेल, सरकी तेल, वनस्पती तूप आणि खोबरेल तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली होती. खोबरेल तेलाच्या दरात तर तब्बल ६० रुपयांची वाढ झाली होती. तर शेंगतेल पाच, सरकी सहा, वनस्पती तूप तीन रुपयांनी वाढले होते. सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने गृहिणांच्या महिन्याचा बजेटवर चांगलाच परिणाम झाला होता. या आठवड्यात मात्र काहिसा दिलासा मिळाला असून, सरकी तेलाचे दर प्रतिकिलो तीन रुपयांनी कमी झाला आह. इतर किराणामालाचे दर स्थिर राहिले आहेत.

.......................

किराणा दर (किलो)

पोहे : ४० रु.

साखर : ३६ रु.

शेंगदाणा : ८० रु.

मैदा : २६ रु.

रवा : २८ रु.

आटा : २६ रु.

गूळ : ४२ रु.

शाबू : ६० रु.

तीळ : १४० रु.

..................

डाळीचे दर (किलो)

तूर डाळ : ७० रु.

मूग डाळ : ७५ रु.

उडीद डाळ : १०० रु.

हरभरा डाळ : ७० रु.

मसूरडाळ : ६२ रु.

मूग : ८० रु.

मसूर : ८० रु.

चवळी : ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा : ४० ते ६० रु.

काळा वाटाणा : ७२ ते ८० रु.

मटकी : ६० रु.

छोले : १४० रु.

पावटा : १२० रु.

.................

तेलाचे दर (किलो)

शेंगतेल : १२४ रु.

सरकी तेल : ८७ रु.

खोबरेल तेल : ३०० रु.

वनस्पती तूप : ९० रु.

.....................

बार्शी शाळू : ३६ ते ४० रु.

ज्वारी नं. १ : ३२ ते ३४ रु.

ज्वारी नं. २ : २८ ते ३० रु.

बाजरी : १७ ते २४ रु.

००००००००००००

००००००००००००

मूळ कॉपी

साप्ताहिक बाजारभाव

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन आठवड्यात खाद्यतेलाचा दरात किलोमागे सरासरी दोन ते चार रुपयांची वाढ झाली होती. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे देशातंर्गत बाजारपेठे खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली होती. या आठड्यात मात्र केवळ सरकी तेलाचा दर किलोमागे तीन रुपयांनी पुन्हा कमी झाला. त्यामुळे गेल्या आठड्यात ९० रुपये किलो असणारा दर या आठड्यात ८७ रुपये झाला. बाजारातील तेजी मंदीचा फटका व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व खाद्यतेलाच्या दरांत चांगलीच वाढ झाली होती. शेंगतेल, सरकी तेल, वनस्पती तूप व खोबरेल तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली होती. खोबरेल तेलाच्या दरात तर तब्बल ६० रुपयांची वाढ झाली होती. तर शेंगतेल पाच, सरकी सहा, वनस्पती तूप तीन रुपये प्रतिकिलोच्या दरात वाढ झाली होती. सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने गृहिणांच्या महिन्याचा बजेटवर चांगलाच परीणाम झाला होता. या आठवड्यात मात्र काहिसा दिलासा मिळाला असून सरकी तेलाचे दर प्रतिकिलो तीन रुपयांनी कमी झाला. त्यामुळे ९० रुपयांवरुन पुन्हा सरकीचा दर ८७ रुपये झाला.

गेल्या आठड्यात शाबूदाणा व खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली होती. या आठवड्यात मात्र सरकी तेलाचा दर तीन रुपयांनी कमी झाला असून इतर किराणामालाचे दर स्थिर राहिले आहेत.

.......................

किराणा दर (किलोमध्ये)

पोहे : ४० रु.

साखर : ३६ रु.

शेंगदाणा : ८० रु.

मैदा : २६ रु.

रवा : २८ रु.

आटा : २६ रु.

गूळ : ४२ रु.

शाबू : ६० रु.

तीळ : १४० रु.

..................

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ : ७० रु.

मूगडाळ : ७५ रु.

उडीदडाळ : १०० रु.

हरभराडाळ : ७० रु.

मसूरडाळ : ६२ रु.

मूग : ८० रु.

मसूर : ८० रु.

चवळी : ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा : ४० ते ६० रु.

काळा वाटाणा : ७२ ते ८० रु.

मटकी : ६० रु.

छोले : १४० रु.

पावटा : १२० रु.

.................

तेलाचे दर (किलोमध्ये)

शेंगतेल : १२४ रु.

सरकीतेल : ८७ रु.

खोबरेलतेल : ३०० रु.

वनस्पती तूप : ९० रु.

.....................

बार्शी शाळू: ३६ ते ४० रु.

ज्वारी नं. १ : ३२ ते ३४ रु.

ज्वारी नं. २ : २८ ते ३० रु.

बाजरी : १७ ते २४ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात आंबेडकर जयंती उत्साहात

$
0
0

महामानवाला अभिवादन

व्याख्याने, मिरवणुका, रॅलीसह विविध उपक्रमांनी आंबेडकर जयंती उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध संस्था, संघटनांनी सभा, व्याख्याने, मिरवणुका, रॅलीचे आयोजन केले होते.

बिंदू चौकात पालकमंत्र्यांच्या हस्ते अभिवादन

बिंदू चौकातील आंबेडकर यांच्या पुतळ्यास शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून अनुयायांनी दिवसभर गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अॅड पंडिततराव सडोलीकर, विकास चोपडे, शाहीर आझाद नाईकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समता सैनिकांनी शानदार संचलन करुन मानवंदना देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार गणेश शिंदे, सविता लष्करे, नायब तहसीलदार अपर्णा मोरे, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, 'भारतरत्न डॉ. आंबेडकरांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात यावी. आजचा दिवस अभिमानाचा दिवस असून, समाजात एकता, अखंडता आणि बंधुभाव अबाधित राहण्यासाठी आंबेडकरांचे कार्य आणि विचार आचरणात आणणे आवश्यक आहे.' नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी संविधान प्रस्तावनेचे वाचन केले.

बीएसएनएलमध्ये अभिवादन

बीएसएनएल प्रशासन, टेलिफोन रिक्रिएशन क्लब व दूरसंचालक एस.सी. एस.टी. कर्मचारी वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने टेलिफोन भवन येथील टीआरसी हॉल येथे आंबेडकर जयंती साजरी झाली. यावेळी डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उप महाप्रबंधक व्ही.जी. पाटील, बी.एस. पाटील, के.बी. पाटील, एस.पी. कांबळे, वाय.एस. कुलकर्णी उपस्थित होते. सूर्यकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.

बालसंकुलात माहितीपटाचे प्रदर्शन

जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटना बालसंकुलात डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर दाखविण्यात आला. यावेळी सल्लागार सदस्य एस. एन. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समतादूत प्रतिभा सावंत व आशा रावणे यांनी आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी अधीक्षक अश्विनी गुजर, सोनाली नूलकर, पद्मजा गारे, नजिरा नदाफ, डी.ए. पाटील, टी.एम. कदम, संगीता तळेकर, आदी उपस्थित होते.

रमणमळ्यात भीमवंदना

रमणमळा येथील आंबेडकर चौकात नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी नालबंद यांनी भीमवंदना गायिली. यावेळी विनोद शिराळे, अरुण माळगे, अमोल खाबडे, मसू कांबळे, सदानंद जांभळे, चंद्रकांत माने, प्रशांत जाधव आदि उपस्थित होते.

'विवेकांनद'मध्ये व्याख्यान

'डॉ. आंबेडकरांनी भारताला जातिव्यवस्थेच्या जोखडातून बाहेर काढून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने नेण्यासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुभावाची त्यांनी हाक दिली. त्यांचा हा सामाजिक परिवर्तनाचा मूलमंत्र एक थोर विचारवंत म्हणून समाजातील लोकांनी अंगी बाणवण्याची गरज आहे,' असे मत राज्य विभागाच्या प्रा. समीक्षा फराकटे यांनी व्यक्त केले. विवेकानंद महाविद्यालयात आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.वाय. होनगेकर होते. डॉ. एस.आर. कट्टीमनी यांनी प्रास्ताविक केले. यू. आर. हिरकुडे यांनी आभार मानले.

समता हायस्कूल

भोसलेवाडी येथील. म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूलमध्ये नामदेव यादव यांनी प्रतिमापूजन केले. यादव यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती दिली. भीमराव पवार यांनी बाबासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. मुख्याध्याक शशिकांत सावंत यांनी प्रास्ताविक केले. सरदार आंबर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता कलागते यांनी आभार मानले. यावेळी सचिव सुंदरराव देसाई उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँक

जिल्हा बँकेत संचालक माजी महापौर आर. के. पोवार व उदयानीदेवी साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक आर. जे. पाटील, पंडित चव्हाण, एस. एस. उपाध्ये, रणवीर चव्हाण, डी. एस. कालेकर, उपव्यवस्थापक डी. सी. जाधव, अशोकराव साळोखे, विकास जगताप, स्नेहल करंडे उपस्थित होते.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज (डिक्की) कोल्हापूर शाखेत समन्वयक संजय वाघ यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व जातीधर्मातील गरीब वर्गाकरिता उद्यम विषय योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नि:स्वार्थीपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी डिक्कीचे सदस्य डॉ. उदय लोखंडे, किशोर कांबळे, रत्नाकर कांबळे, राजेंद्र चौगले, लक्ष्मण कांबळे, विलास पाटोळे, प्रशांत मोरे, अदित्य वाघ, प्रकाश साठे आदि उपस्थित होते.

एसटी कार्यशाळा

ताराबाई पार्क येथील एसटी महामंडळ विभागीय कार्यशाळेत यंत्र अभियंता शिवदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी प्रतापराव तराळ, एस. एस. कुलकर्णी, एस. बी. भातमारे, दत्तात्रय सिंघन, नागेश भोसले, एस. एस. जोशी उपस्थित होते.

सोनावणे हायस्कूल

सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक धनाजी बेलेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रावणी नवाळे, शिया इंगोले, पूजा इंगोले, अंजली धैसे यांनी मनोगत व्यक्त केले. सलोनी आयरेकरने सूत्रसंचालन केले. अदित्य आंधळे यांनी आभार मानले.

कमला कॉलेज

ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील आणि प्राचार्य. जे.बी. पाटील यांच्या उपस्थितीत कमला कॉलेजमध्ये आंबेडकर जयंती साजरी झाली. प्राचार्य पाटील यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सचिव प्राजक्त पाटील, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी विद्यानिकेत

महाद्वार रोड येथील इंदिरा गांधी विद्यानिकेतनमध्ये मुख्याध्यापिका एम. आर. मोहिते-पाटील यांच्या आंबेडकरांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुजय देसाई, डी. वाय. देसाई, बी. एम. खाडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीचे पत्रक....

$
0
0

भूखंड आरक्षणाची चौकशी कराच

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचे पालकमंत्र्यांना आव्हान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील गेल्या वीस वर्षांतील आरक्षण उठविण्याच्या कारभाराची चौकशी करावी, म्हणजे सध्या त्यांच्या अवती-भवती असणाऱ्या माणसांचे कर्तृत्व त्यांच्या आणि कोल्हापूरच्या नागरिकांसमोर उघड होईल,' असे प्रतिआव्हान काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. कोल्हापुरात आजपर्यंत विरोधाचे राजकारण झाले, पण कुठल्याही पालकमंत्र्यांनी अशी भाषा वापरली नव्हती. पालकमंत्र्यांना आम्ही आजपर्यंत सुसंस्कृत समजत होतो, पण त्यांच्या वक्तव्यामुळे आता 'ते दादा हेच काय' असा प्रश्न पडल्याचा टोलाही काँग्रेस, राष्ट्रवादीने लगावला.

पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेतेमंडळींवर तोंडसुख घेतले होते. पालकमंत्र्यांच्या टीकेला काँग्रेस आघाडीने रविवारी पत्रक काढून जोरदार प्रत्युत्तर दिले. महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, सभागृह नेता दिलीप पोवार, शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी संयुक्तपणे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

'उचगावच्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे पालकमंत्री वारंवार सांगत आहेत, तसे असेल तर त्यांनी महापालिका आयुक्तांना हायकोर्टाच्या आदेशाप्रमााणे कारवाईचे आदेश द्यावेत,' असे खुले आव्हान काँग्रेस आघाडीने पालकमंत्र्यांना दिले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे थेट नाव न घेता पत्रकात म्हटले आहे की, 'दादा, शिरोलीचे वारे आपणास लागले आहे. हे कालच्या वक्तव्यावरून दिसून येत असून, काही मंडळी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत: स्वच्छ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालकमंत्री या नात्याने तुम्ही केलेले वक्तव्य म्हणजे तुम्ही वजनदार मंत्री आहे, बलाढ्य नेता आहे हे जनतेने मान्य केले नसल्यामुळे तुम्हाला स्वत:ला सांगावे लागते.'

................

काँग्रेसकडून पालकमंत्र्यांना सात प्रश्न

पालकमंत्री पाटील राज्यातील क्रमांक दोनचे वजनदार मंत्री असूनही कोल्हापूर शहरासाठी गेल्या साडेतीन वर्षांत किती निधी दिला? त्यांच्या पदाचा कोल्हापूर शहराला कितपत फायदा झाला? यासंबंधी त्यांनी आत्मचिंतन करून नागरिकांना उत्तर द्यावे. पालकमंत्र्यांनी दहा वर्षांचा आमदार फंड नेमका कुठे खर्च केला? कुणाला दिला व त्यातून कोणती विकासकामे झाली? विद्या प्रबोधिनी चार वर्षांत कशी मोठी झाली? कोल्हापूरचे विभागीय क्रीडा संकुल कोणाच्या घशात घालण्याचा घाट रचला आहे? विविध संस्थांना खिरापतीसारखे पैसे कोणता दिवाणजी पोहोच करतो? त्याची 'ईडी'मार्फत चौकशी करावी. गतवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना प्रचंड पैसे वाटले, ते कोठून आले? नवदुर्गा ऊर्जा महोत्सव, कोल्हापूर कला महोत्सव हे कोणत्या पैशातून झाले? केएसबीपी ही कंपनी सीएसआर फंडाच्या नावाखाली कोल्हापुरातील कोणकोणत्या व्यक्ती व संस्थेकडून किती पैसे गोळा करते व शहर सौंदर्यावर त्यातील किती पैसे खर्च करते? याचा हिशेब नागरिकांना द्यावा.

.................

पालकमंत्र्यांकडून महापौरांचा अवमान

महापौरांसहित महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी 'चिल्ली, पिल्ली' म्हणत अवमान केला आहे. महापौरांचा अवमान हा कोल्हापूरच्या नागरिकांचा अवमान आहे. यामुळे आम्ही पालकमंत्र्यांचा निषेध करत आहे. महापालिकेत २०१० पासून पक्षीय राजकारणातून शहराचा विकास सुरू आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही आरक्षण उठवले नाही.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रीपूर्ण लढतीत शाहू रॉयल्स विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत लक्षवेधी ठरलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत शाहू रॉयल्स संघाने राजाराम वॉरियर्सवर ३-२ अशी मात केली. नेताजी तरुण मंडळ, कोल्हापूर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट इनिशिटीव्ह यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या सामन्यात अनेक राजकीय व्यक्ती, उद्योजक, नगरसेवक, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

शाहू रॉयल्स व राजाराम वॉरियर्स यांच्यातील लढत सुरुवातीपासूनच अटीतटीची झाली. राजाराम वॉरियर्सच्या धैर्यशील मानेंची गोल करण्याची संधी हुकली. सामन्यातील शाहू रॉयल्सच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिकेत जाधवच्या पासवर पहिला गोल उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी साधला. राजाराम वॉरियर्सकडून आक्रमक खेळ करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न झाला. धैर्यशील मानेंनी गोल करत बरोबरी साधली. यानंतर अनिकेत जाधवने मैदानी गोलची नोंद करीत ही आघाडी २-१ अशी केली. राजाराम वॉरिर्यसकडून नगरसेवक विजयसिंह खाडे यांनी मारलेल्या फ्री किकवर राजू साळोखे यांनी गोल नोंदवत सामना २-२ असा रंगतदार स्थितीत आणला. शाहू वॉरियर्सकडून अनिकेतने मारलेला फटका वॉरियर्सच्या गोलीने झेप घेत रोखला. मात्र त्यांना चेंडूवर नियंत्रण मिळवता आले नाही. पुन्हा एक जोराचा फटका मारत अनिकेतने गोलची नोंद केली आणि सामन्यात ३-१ असा विजय मिळवला. आमदार चंद्रदीप नरके पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला.

अंतिम सामन्याबत उत्कंठा

या मोसमातील सर्वाधिक बक्षिसे असलेली अटल चषक स्पर्धेतील अंतिम सामना पाटाकडील तालीम संघ 'अ' आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लब 'अ' यांच्यात दुपारी ४ वाजता हा होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने लढत रोमहर्षक होणार आहे. अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

रणरागिणी उपस्थित राहणार

'सैराट' फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू अंतिम सामन्यावेळी उपस्थित राहणार आहे. यावेळी नेमबाज सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत व देशातील कमी वयातील 'ए' लायसन्सप्राप्त फुटबॉल प्रशिक्षक अंजना तुरंबेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे फाटक पादचारी पुलाला ग्रीन सिग्नल

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणाऱ्या परिख पुलाजवळील रेल्वेफाटक एक या ठिकाणी पादचारी पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुलाच्या डिझाइनला मान्यता मिळाल्यानंतर दोन महिन्यांत पादचारी पुलाच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पादचारी पुलासाठी गेली वीस वर्षे पाठपुरावा सुरू होता. दचारी पूल व्हावा, या मागणीसाठी रेल्वे आणि महानगरपालिकेकडे सातत्याने मागणी होत होती.

मध्यवर्ती बसस्थानक आणि राजारामपुरीकडून जाताना पादचाऱ्यांना रेल्वे फाटक एक येथून गेली अनेक वर्षे धोकादायकरित्या ये-जा करावी लागते. पादचाऱ्यांच्या धोकादायक प्रवासामुळे या ठिकाणी पादचारी पूल उभारावा, अशी मागणी गेल्या वीस वर्षांपासून होत आहे. मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पादचारी पुलाचा प्रश्न लटकला होता. महानगरपालिकेने पाठपुरावा केल्यानंतर २०१७ मध्ये रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधण्यासाठी परवानगी दिली. मात्र पादचारी पूल उभारणीसाठी सव्वा कोटी खर्च येणार असल्याने महानगरपालिकेकडून निधीअभावी काम झाले नाही.

गेल्यावर्षी २०१८ मध्ये रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे फाटक दोन्ही बाजूंनी आरसीसी भिंती बांधून बंद केले. त्यामुळे पादचाऱ्यांचा मार्ग बंद झाला. परिख पुलाखालूनही सांडपाणी वाहत असल्याने पादचाऱ्यांनी भिंती ओलांडून जाण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारला. सरंक्षक भिंतीजवळ, दगड आणि छोटे बॉक्स टाकून धोकादायक पद्धतीने पादचारी ये-जा करू लागले. रेल्वेने सरंक्षक भिंत बांधून पादचाऱ्यांचा मार्ग बंद केल्यावर याप्रश्नी धनंजय महाडिक युवा शक्तीने आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण सुरक्षेच्या कारणावरुन मार्ग बंद करण्याच्या निर्णयावर रेल्वे प्रशासन ठाम राहिले.

रेल्वे फाटकावर पादचारी पुलाची मागणी पुन्हा ऐरणीवर आल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याची घोषणा केली. त्यानुसार महापालिकेने जिल्हा नियोजनाकडे प्रस्ताव पाठवला. रेल्वेची परवानगी नसल्याचे कारण सांगून महापालिकेला निधी द्यायला सुरुवातीला जिल्हा नियोजन मंडळानेही तांत्रिक कारण पुढे केले. पण दीड वर्षापूर्वीच रेल्वेने पादचारी पूल उभारणीला मान्यता दिली असल्याचे पत्र व रेल्वे विभागाकडे भरलेले शुल्क अशी कागदपत्रे महानगरपालिकेने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निधी देण्याची तयारी दर्शवली. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाने पादचारी पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. एक कोटी ३० लाखाचा निधीही महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे नितिन देसाई यांनी दिली. महानगरपालिका पुलाचे डिझाइन पुण्यातील व्हीजेआयटीकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीसाठी खासदार धनंजय महाडिक पाठपुरावा करणार आहेत. तांत्रिक मंजुरी व रेल्वेची संमती मिळाल्यानंतर निविदा प्रसिद्धी केली जाणार आहे. दोन महिन्यात पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

०००००००

रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाला मंजुरी दिली आहे. पुलाच्या डिझाइनला तांत्रिक मंजुरी आणि रेल्वे खात्याची परवानगी मिळाल्यानंतर पादचारी पूल उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येईल.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकीली क्षेत्रात नवे पर्याय

$
0
0

'बँकिंग, आयटीमध्ये

वकिलीचे नवे पर्याय'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काही वर्षांपासून पर्यावरण, बँकिंग, माहिती व तंत्रज्ञान यांसारख्या नव्या क्षेत्रात वकिली करण्याचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्या क्षेत्रात काम करण्यापूर्वी स्वत:चा कल समजून घ्या,' असे मत हायकोर्टातील ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी व्यक्त केले.

अॅडव्होकेट्स अॅकॅडमीच्या वतीने 'वकिली व्यवसायातील संधी' या विषयावर अॅड. नेवगी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. रविवारी शहाजी लॉ कॉलेजच्या सभागृहात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी अॅकॅडमीच्या वतीने ज्येष्ठ वकिलांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते.

अॅड. नेवगी म्हणाले, 'संधी येत नाही, ती तयार करावी लागते. तसेच मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. वकिली क्षेत्रात स्पेशलाइज्ड तज्ज्ञांची गरज भासत आहे. बँकिंग, पर्यावरण, माहिती व तंत्रज्ञानसारखी क्षेत्रे स्पेशलायझेनसाठी तयार आहेत. त्यातील आवडणाऱ्या क्षेत्रात काम केले तर नक्कीच करिअर यशस्वी होऊ शकते. तसेच नेहमी वाचन, अद्ययावत ज्ञान मिळवणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर हेही आवश्यक आहे.'

अॅकॅडमीचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ पाटकर यांनी अॅकॅडमी स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, 'बदलत्या काळाची गरज ओळखून ज्युनिअर वकिलांसाठी कायदेविषयक प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध विषयांवर ज्येष्ठ वकिलांच्या माध्यमातून चर्चा केली जाते. कायद्यातील स्थित्यंतरे व हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाकडून दिल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.'

अॅड. संतोष शहा यांनी अॅड. नेवगी यांचा परिचय करून दिला. अॅड. जावेद फुलवाले यांनी आभार मानले. याप्रसंगी अॅड. सर्वश्री राजाराम ठाकूर, सुमित कामत, अमीर शेख, भगवान मोरे, योगेश मांडरे आदी उपस्थित होते.

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांचा बुडून मृत्यू

$
0
0

मयत आकाश चंदनशिवेचा फोटो आहे

.............

वेगवेगळ्या घटनांत

दोघांचा बुडून मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन वेगवेगळ्या घटनांत पंचगंगा नदी आणि कंदलगाव तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. आकाश उर्फ निलेश पांडुरंग चंदनशिवे (वय २२, रा. राजेंद्रनगर) आणि इंद्रजित ऊर्फ विनायक राधाकृष्ण बागल ( ५०, रा. रिंगरोड सांगली) अशी या दोघांची नावे आहेत. आकाश चंदनशिवे हा राहुल शिंदे आणि ऋषिकेश शिंदे या मित्रांसमवेत रविवारी दुपारी कंदलगाव तलावात पोहायला गेला. तिघेही पाण्यात उतरले. राहुल व ऋषिकेश पोहून बाहेर आले पण त्यांना आकाश दिसला नसल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दोघांनी पाण्यात शोध घेतला पण तो मिळून आला नाही. सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या सहकार्याने जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी आकाशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आकाशच्या पश्चात आई व बहिण असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या भावाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, शिंगणापूर येथे पंचगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या इंद्रजित ऊर्फ विनायक राधाकृष्ण बागल (वय ५०, रा. रिंगरोड सांगली) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. पोहत असताना बागल यांना चक्कर आल्याने ते बुडू लागले. यावेळी काठावरील नागरिकांनी पाण्यात उड्या घेतल्या व बुडालेल्या बागल यांना बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले, पण उपचारापूर्वीत त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माले फाटा एसटी अपघात

$
0
0

एसटीची टँकरला

धडक, चौघे जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांगलीहून कोल्हापूरकडे येणाऱ्या एसटीने टँकरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. अपघात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास माले फाटा येथे घडला. जखमींना उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये आणण्यात आले.

हीना नजीर शिकलगार (वय २०), तबस्सूम नजीर शिकलगार (वय ३४, रा. हुपरी), खलील नूरमहमद मणेर (वय ६३), बेबी खलील मणेर (वय ५०, रा. रिकिबदार गल्ली) हे चौघे एसटीने सांगलीहून कोल्हापूरला येत होते. त्यावेळी माले फाटा येथे रस्त्यावरील धावत्या टँकरला एसटीने पाठीमागून धडक दिली. एसटीचे डाव्या बाजूचे नुकसान झाले. त्यावेळी हे चौघे व अन्य प्रवाशी जखमी झाले. त्यांना खासगी वाहनांमधून सीपीआरमध्ये आणण्यात आले. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीनंतर बघू

$
0
0

महापौर निवडीनंतर बघू

जि. प. पदाधिकारी खांदेपालटावर नेत्यांची भूमिका, इच्छुकांच्या अस्वस्थतेत वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट सव्वा वर्षानंतर करावे, यासाठी इच्छुकांनी गेल्या आठवड्यापासून जोरदार मोर्चेबांधणी केली. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, खासदार राजू शेट्टी यांच्यात मोबाइलवरून चर्चा झाली. खासदार शेट्टी वगळता पालकमंत्री पाटील, आमदार नरके यांनी महापौर बदलानंतर जि. प. पदाधिकारी खांदेपालचा निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली. त्यामुळे जि.प. अध्यक्ष बदलाची शक्यता धूसरच झाली आहे.

जि. प. मध्ये भाजपसह मित्रपक्षांची सत्ता आहे. अध्यक्षपद भाजपकडे आहे. शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे सुरुवातीला ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षानंतर अध्यक्षपद दुसऱ्याला देताना महाडिक कुटुंबीयांचा आणि पालकमंत्री पाटील यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. मंत्री पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी महाडिक यांनी अध्यक्षपद बदलाला विरोध केला. त्यामुळे आमदार डॉ. मिणचेकर यांना अध्यक्षपद सोडून इतर पदाधिकारी बदलासंबंधी चर्चा करा, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

रविवारी मिणचेकर आणि नरके यांच्यात चर्चा झाली. यावेळीही उपाध्यक्ष बदलासंबंधी एकमत झाले नाही. बांधकाम, समाजकल्याण सभापतिपद बदलासंबंधी माजी मंत्री विनय कोरे सकारात्मक नाहीत. सध्या फक्त खासदार शेट्टीच आपल्याकडील पद आवाडे गटास देण्यास तयार आहेत. मात्र, केवळ एक पद बदलणे किचकट आहे. निवडीवेळी निवडणुकीची वेळ आल्यास बहुमत सिध्द करावे लागले तर नवी डोकेदुखी ठरणार नाही ना, याचीही चाचपणी स्वाभिमानी, आवाडे गट करीत आहे. परिणामी तूर्त जि. प. मधील खांदेपालटाची शक्यता मावळली आहे.

--------------

चौकट

उपरोधिक टोल्यानुसार परिस्थिती

सव्वा वर्षात खांदेपालट करावयाचे झाल्यास २० मेपर्यंत विद्यमानाचे राजीनामे होणे गरजेच आहे. त्या दिशेने हालचाली नाहीत. याउलट खुर्ची सोडण्याची विद्यमानांची मानसिकता नाही. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांत प्रचंड निराशा निर्माण झाली आहे. यावेळी संधी न मिळाल्यास पुढे अवघड आहे, असे त्यांना वाटत आहे. अध्यक्षपद न बदलण्याचा निर्णय अडीच वर्षे कायम राहिल्यास सर्वाधिक धक्का ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांना बसेल. लबाडाघरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही, असा अध्यक्षपदाचा विषय निघाल्यानंतर इंगवले नेहमीच उपरोधिक टोला लगावतात. तशीच आताची परिस्थिती आहे.

------------------

चौकट

यांची होणार निराशा

अध्यक्षपदासाठीचे अरुण इंगवले, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रवीणसिंह यादव (मिणचेकर गट) , बांधकाम सभापतिपदी जनसुराज्यचे शंकर पाटील, समाजकल्याणपदी जनसुराज्यच्या पुष्पा आळतेकर, महिला व बालकल्याणपदी वंदना मगदूम (आवाडे गट), शिक्षणपदी शिवसेनेचे हंबीरराव पाटील (आमदार सत्यजित पाटील गट) या इच्छुकांची निराशा होणार आहे. सव्वा वर्षानंतर खांदेलपाट न झाल्यास यांना पदांची खुर्चीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या तपासासाठी जबाबदार अधिकारी नेमण्याची गरज

$
0
0

'पानसरे हत्या तपासासाठी

जबाबदार अधिकारी नेमा'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येस दोन वर्षे उलटूनही तपासात म्हणावी तशी प्रगती दिसत नाहीत. हत्येचा तपास करण्यासाठी जबाबदार अधिकारी नेमण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी मांडले. शहाजी लॉ कॉलेज येथील एका कार्यक्रमानिमित्त ते रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई हायकोर्टात पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेचे वकीलपत्र अभय नेवगी यांच्याकडे आहे. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पानसरे हत्या तपासावर नाराजी व्यक्त केली. तपास अधिकाऱ्यांच्या वांरवार बदल्या होत आहेत. तपासाला जबाबदार धरावा असा अधिकारी नाही. त्यामुळे अपेक्षित गतीने तपास होत नाही. याचा फटका न्यायालयीन लढाईत बसत असल्याचे ॲॅड. नेवगी यांनी सांगितले. पानसरे हत्येत मारेकरी कोण आहेत हे माहिती असूनही ते सापडत नाहीत, हे पोलिसांचे अपयश आहे. हायकोर्टात तपासाचा अहवाल सादर जातो. प्रत्येक सुनावणीवेळी तपास अहवालावर कोर्टाने वारंवार ताशेरे ओढूनही काहीच उपयोग होत नसल्याची आगतिकता यांनी बोलून दाखवली.

हायकोर्टात पानसरे हत्या तपासप्रकरणी २५ ते २६ सुनावणी झाल्या आहेत. हत्येचा तपास असाच सुरू राहिल्यास साक्षीदारांवर त्याचा परिणाम होऊन खटला कमकुवत होण्याची भीतीही नेवगी यांनी व्यक्त केली आहे. पानसरेंशी माझे ऋणानुबंध असल्याने तपास यंत्रणा कमी पडत असले तरी न्यायालयात आपण ही लढाई कधीच अर्धावर सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसंकुल स्नेहमेळावा - जुन्या आठवणींने ऋणानुबंध झाले घट्ट

$
0
0

फोटो आहे

जुन्या आठवणींने ऋणानुबंध घट्ट

बालसंकुलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यशानंतरची शाबासकी, अनाथ मुलांना मिळालेली मायेची ऊब आणि योग्य संस्कारांमुळे यशाला गवसणी घातलेल्या सर्व अनाथ माजी विद्यार्थ्यांनी संस्थेप्रती बनलेला ऋणानुबंद व्यक्त करण्यासाठी सुमारे १७ ते २० वर्षांनी एकत्र आली. संस्थेने दिलेली आपुलकी आणि संस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यामध्ये अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. रविवारी मंगळवार पेठेतील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना (बालकल्याण) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साही वातावरणात पार पडला.

१९८५ ते २०१४ मध्ये बालकल्याणमधून बाहेर पडलेले असे अनेक विद्यार्थी रविवारी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. अनाथपणाचे असह्य जीवन जगूनही अनेकांनी आपले यशस्वी करिअर घडवले आहे. अशाच डॉक्टर, अभियंता, एमआर, वकील, हॉटेल मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंट याचबरोबर आधुनिक शेतीचा ध्यास घेणारे सर्वजण एकत्र आले होते. संस्थेत असताना पालकाविना मित्रांच्या सोबतीने आपली सुख-दु:खे सांगितली. या प्रतिकूल काळांमधून करिअर केलेल्या अनेकांनी मित्रांना आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळी अकरा वाजता हे सर्व माजी विद्यार्थी बालकल्याण संकुलात आल्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवर्जून भेट घेऊन आशीर्वाद घेत होते. विद्यार्थी आपले यशस्वी करिअर सांगत असताना पदाधिकाऱ्यांना अधिक आनंद होत होता. सुमारे दोन ते तीन तासांच्या भेटीनंतर सध्या संकुलामध्ये असलेल्या सुमारे २२५ विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा माजी विद्यार्थ्यांनी आनंदही घेतला. जुन्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भेटीमुळे अनेकांना जगण्याीच ऊर्मी मिळाली, तर अनेकांनी यापुढेही संस्थेशी एकरूप राहण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास बालन्याय मंडळाचे अध्यक्षा एम. एस. निकम, उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, व्यंकप्पा भोसले, मानद कार्यवाह पद्मा तिवले, प्रा. सुरेश शिरोडकर, प्रदीपभाई कपाडिया, प्रचार्य. डॉ. जे. के. पवार, व्ही. बी. शेट्ये, संजय देशपांडे, अतुल देसाई, संस्था अधीक्षक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अर्जुन सुतार, गजानन शिंदे, शारदा डोईफोडे, अक्षय पोतदार, अनिल व्हटकर, सोमनाथ माने, आदी माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे घंटनाद आंदोलन

$
0
0

भूविकासच्या कर्मचाऱ्यांचे

आज घंटानाद आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेचा (भूविकास) बी-ट्युनिअर प्रस्ताव प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या देणी भागविण्यासाठी बँकेला बी-ट्युनिअरचा प्रस्ताव कोल्हापूर उपविभागीय कार्यालयाकडे जानेवारी २०१८ मध्ये पाठवला आहे. मात्र, तीन महिन्यांनंतरही प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे बँकेच्या इमारतीची विक्री प्रक्रिया ठप्प होऊन कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबित राहिली आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रक श्रीकांत कदम यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सतेज पाटील

$
0
0

शहरासाठी ५०० कोटी आणून दाखवा

आमदार सतेज पाटील यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर आव्हान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विकासात्मक दृष्टिकोन नाही. शहराच्या विकासापेक्षा माझा झेंडा फडकला पाहिजे या मानसिकतेतून ते फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शहराच्या पाणी प्रश्नापासून रस्ते, ड्रेनेजलाइन अशा विविध विकासकामांसाठी १३०० कोटी रुपयांचा निधी आणला. पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, त्यांची शहरात हत्तीवरून मिरवणूक काढतो,' असे जाहीर आव्हान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांना दिले.

नगरसेविका जयश्री चव्हाण व माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्या पुढाकारातून टिंबर मार्केट परिसरात मॉडेल रस्ता विकासकामाचा प्रारंभ रविवारी झाला. महापौर स्वाती यवलुजे, सभागृह नेते दिलीप पोवार, शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

याप्रसंगी आमदार पाटील यांनी पालकमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबल्यावरून आयुक्तांचाही चिमटा काढला. आयुक्तांवर दबाव टाकला की ते ऐकतात, हे नागरिकांनी आठ दिवस पाहिले असल्याचा टोला लगावला. शाहू स्मारक, अंबाबाई मंदिर परिसर विकास अशी महत्त्वाची कामे रखडली आहेत. मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन होईपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लागू होईल. यामुळे यावर्षी तरी प्रत्यक्ष काम बघायला मिळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या कारभाराची खिल्ली उडविली.

घोडेबाजारावरून महाडिकांनाही टोला

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवरून पालकमंत्र्यांसह माजी आमदार महादेवराव महाडिक यांना टोला लगावताना आमदार पाटील म्हणाले, 'शहर विकासाला दिशा देण्यासाठी पक्षीय राजकारणाला सुरुवात केली. सत्ता स्थिर असेल तरच प्रशासन गतिमान आणि शहर विकासाला चालना ही आमची भूमिका आहे. दुर्दैवाने ज्यांचा इतिहास घोडेबाजाराचा आहे, त्यांनी सभापतिपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार केला. त्यांनी शहरासाठी निधी दिला नाही, पण नगरसेवक पळवले. त्याचा काय फायदा झाला कुणास ठाऊक? नोटबंदी, जीएसटीमुळे व्यापार, व्यवसाय कोलमडला. आता परिवर्तन ही काळाची गरज बनली आहे. यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकदिलाने पुढे जाण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. अच्छे दिनच्या स्वप्नामुळे सामान्यांसह व्यापाऱ्यांची फसगत झाली. यामुळे अच्छे दिन दाखवा नाही तर काँग्रेसला मतदान करा असे म्हणण्याची वेळ आली आहे.'

.................

जितका दबाव टाकाल तितकी उसळी मारू

आमदार पाटील म्हणाले, 'पालकमंत्र्यांनी दबाव आणि धमकावणी तंत्राचा अवलंब करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. जितके दबाव टाकाल तितकी अधिक उसळी मारू. शहर विकासाचे आम्हाला आकर्षण आहे. त्यासाठी कुठल्याही संघर्ष आणि संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, श्रीमंतीचे आम्हाला आकर्षण नाही. प्रतिष्ठा, श्रीमंती घरची आहे. चाळीस वर्षे घरात पदे आहेत. त्या गोष्टीचे आकर्षण नाही. माझे शहर चांगले झाले पाहिजे आणि सामान्य लोकांना न्याय ही आमच्या कामाची पद्धत आहे. यामुळे सत्य बोलायला घाबरणार नाही. सत्ताकाळात मी कुणाला धमकावल्याचे एक उदाहरण दाखवून द्या, आमदारकीचा राजीनामा देतो. पण पालकमंत्र्यांनी दबाव आणि धमकी देण्याचे सत्र सुरू केले आहे. प्रसारमाध्यमावरही दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. दादा, जनतेला गृहित धरू नका. नागरिक खूप हुशार, सूज्ञ आहेत. सत्ता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी असते याचे भान ठेवा. चांगल्या कामाला खो घालण्याऐवजी मदत करण्याची वृत्ती ठेवा. काही चुकत असेल तर कान धरा, पण बरोबर काम करत असू तर ते मान्य करण्याइतके मन मोठे करा.'

याप्रसंगी टिंबर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरिभाई पटेल, वसंतराव देशमुख यांची भाषणे झाली.

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर कोल्हापुरी मोहर

$
0
0

फोटो आहे..

राष्ट्रीय पुरस्कारावर

कोल्हापूरची बाजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नुकत्याच जाहीर झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोल्हापूरच्या मेधप्रणव बाबासाहेब पवार याने बाजी मारली. उत्कृष्ट कौटुंबिक मूल्ये या अंतर्गत त्याने बनविलेल्या 'हॅपी बर्थ डे' या सिनेमाला उत्कृष्ट चित्रपट विभागातील प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात मेधप्रणवला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मेधप्रणवने फिल्म इन्स्टिट्यूटमधून दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल पदवी घेतली आहे. सिनेमाच्या आवडीतून त्याने अॅनिमेशनचे शिक्षण घेतले. गोवा येथील चित्रपट महोत्सवात त्याचा हॅपी बर्थ डे सिनेमा दाखवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लीम समाज निदर्शने

$
0
0

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी व मुस्लिम समाजाच्यावतीने रविवारी सायंकाळी दसरा चौकात निदर्शने केली. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली जात असताना आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील नेत्यांनी केली. यावेळी कादर मलबारी, जाफर मौलाना, राजू नदाफ, वसीम चाबुकस्वार, डॉ. जुबेर बागवान, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, रुपाराणी निकम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटल चषक पाटाकडीलकडे

$
0
0

'अटल' चषक पाटाकडील तालीमकडे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तुडुंब भरलेले मैदान, क्रीडारसिकांचा सळसळता उत्साह, 'भारत माता की जय' अशा घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात झालेल्या अटल चषक फुटबॉल अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर २ - १ अशी मात केली. छत्रपती शाहू मैदानावर हा सामना पार पडला. कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिटीव्ह आणि नेताजी तरुण मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.दोन तुल्यबळ स्पर्धक एकमेकांत भिडणार असल्याने क्रीडारसिकांना या सामन्याबाबत कमालीची उत्सुकता होती. सामन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही संघांनी जोरदारपणे आक्रमकता दाखवत चढाया केल्या.

..................

सुवर्णकन्या तेजस्विनीचे जल्लोषी स्वागत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरची कन्या तेजस्विनी सावंत हिने सुवर्ण कामगिरी करून राज्याची मान उंचावली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले. या दैदिप्यमान कामगिरीनंतर पहिल्यांदाच ती कोल्हापुरात येत होती. कोल्हापूर विमानतळावर हेलिकॉप्टरने दुपारी चार वाजता तिचे पुण्याहून आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांतर तिच्या राहत्या घरापर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>