Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मराठा महासंघाचे शिबिर

$
0
0

मराठा महासंघाच्यावतीने

शुक्रवारी मार्गदर्शन शिबिर

कोल्हापूर: कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजनेची माहिती देण्यासाठी मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिबिराचे आयोजन केले आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी ११ वाजता शिबिर होणार आहे.

सरकारने १८ ते ४५ वयोगटातील युवकांना स्वयंरोजगारासाठी दहा लाखपर्यंत बिनव्याजी कर्ज योजना राबवली आहे. या योजनेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी महामंडळाचे संचालक, राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक, सहकारी बँकांचे अधिकारी तसेच चार्टर्ड अकाउंटंट यांना निमंत्रित केले आहे. या शिबिराचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीएचओंना रजेवर जाण्याचा आदेश

$
0
0

डॉ. पाटील यांना

रजेवर जाण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औषध खरेदी घोटाळ्याचा ठपका असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील शुक्रवारी अचानक हजर झाले. मात्र, कामगिरी वादग्रस्त असल्याने त्यांना पुन्हा रजेवर जाण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला.

औषध घोटाळा उघडकीस आल्यानंतर डॉ. पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. नियमबाह्य, अनावश्यक औषधांची खरेदी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासह औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगले यांच्या विरोधात कारवाईचा अहवाल सरकारकडे पाठवला आहे. डॉ. पाटील १२ एप्रिल रोजी त्यांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी संपला. त्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी कार्यालयात आले. येण्यापूर्वी त्यांनी डॉ. खेमनार यांची परवानगी घेतली. कार्यालयाच्या गाडीतूनच ते आले. अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांची भेट घेतली. त्यांनी एक दिवसाचे कामकाज केले. त्यानंतर डॉ. खेमनार यांनी त्यांना पुन्हा रजेवर जाण्याचा सल्ला दिला. शुक्रवारनंतर शनिवार, रविवार सुटी होती. सोमवारी ते कार्यालयात आले नाहीत, तसेच पुढील रजाही टाकलेली नाही. त्यामुळे ते रूजू होणार किंवा नाही, याबद्दल संभ्रम आहे. ते हजर झाल्यास प्रशासनास टिकेला सामोर जावे लागण्याची शक्यता आहे.

वाघमारेंचा कित्ता गिरवला

तत्कालीन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे वादग्रस्त झाले होते. त्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तेही एक दिवस अचानक हजर झाले होते. त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यांना रजेवर जाण्याचा सल्लाही दिला होता. त्यानुसार ते पुन्हा रजेवर गेले व त्यानंतर त्यांची बदली झाली.

डॉ. पाटील शुक्रवारी हजर झाले. हजर होण्यापूर्वी त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधला होता. हजर झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांची भेट घेतली. दरम्यान, तक्रारी असल्याने त्यांना पुन्हा रजेवर जाण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद परिसर नो पार्किंगच

$
0
0

जि.प. लोगो

...........

वाहन लावल्यास कायदेशीर कारवाई होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद परिसरात दोन दिवसांपूर्वी माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लावलेल्या वाहनाची हवा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सोडायला सांगितले. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. म्हणून परिसरातील नो पार्किगवर फेरविचार करण्यासंबंधी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अध्यक्षा महाडिक यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांनी सर्वांना नियम सारखाच, परिसर नो पार्किंग झोनच असेल अशी, ठाम भूमिका मांडली. त्यामुळे प्रशासनाने नो पार्किंग झोनमध्ये यापुढील काळात वाहने लावल्यास पोलिसांकरवी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक खोत यांच्या वाहनाची हवा अध्यक्षा महाडिक यांनी समोर उभा राहून सोडण्यास भाग पाडले. त्यावेळी खोत आणि महाडिक, त्यांचे समर्थक सदस्यांत खडाजंगी झाली. दक्षिण विधानसभा मतदासंघातील आमदार पाटील विरूध्द महाडिक यांच्या राजकीय संघर्षाचा रंग हवा सोडण्याच्या प्रकाराला आला. त्यातून मार्ग काढण्यासाठी डॉ. खेमनार यांनी सोमवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. बैठक झाली नाही, मात्र डॉ. खेमनार यांनी अध्यक्ष महाडिक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नो पार्किंगचा निर्णय कायम ठेवण्यावर प्रशासन, अध्यक्षांचे एकमत झाले.

---------------------

कोट

'जि. प. परिसरातील नो पार्किंगच्या विषयावर अध्यक्षांशी चर्चा झाली. त्यांनी परिसर नो पार्किंगच राहील, असे सांगितले. त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. तसे खोत यांनाही लेखी कळवण्यात येईल. खोत यांनी जि. प. परिसरातून वाहन दुसरीकडे लावण्यासाठी चालक देण्याची मागणी केली होती. मात्र नियमानुसार खासगी वाहन चालवण्यास चालक देता येत नाही.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

-------------

'नो पार्किंग फेरविचारावर सोमवारी बैठक घेणार असल्याचे सीईओंनी सांगितले होते. दुपारी सीईओंना मोबाइलवरून विचारणा केली. त्यांनी तुम्हाला कळवतो असे सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी बैठक घेतली नाही. त्यामुळे जि.प. आवारात माझे वाहन लावणारच. कायदा हातात घेत कुणी हवा काढायला आल्यास जशास तसे उत्तर देणार आहे.

शशिकांत खोत, माजी उपाध्यक्ष

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसव व्याख्यानमाला बातमी फोटोसह

$
0
0

फोटो आहे

'बसवेश्वरांच्या तत्वज्ञानात

पुरोगामित्वाची कास'

डॉ. रहमत तरिकेरे यांचे प्रतिपादन

बसव व्याख्यानमाला ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सुफी पंथातील संतांनी जे विचार मांडले त्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या बसवेश्वर यांच्या शरण तत्वज्ञानातही पुरोगामी विचार आहेत. सुफी संप्रदाय व बसव शरण तत्वज्ञान यांच्यातील साधर्म्य समाजाला दिशादर्शक आहे,' असे प्रतिपादन हंपी येथील प्रख्यात कन्नड साहित्य संशोधक डॉ. रहमत तरिकेरे यांनी केले.

कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बसव व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना डॉ. तरिकेरे बोलत होते. 'शरण और सुफी संप्रदाय' या विषयावर डॉ. तरिकेरे यांनी तौलनिक विवेचन केले. शाहू स्मारक भवन येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. एम. हिर्डेकर होते.

डॉ. तरिकेरे म्हणाले, 'सुफी पंथातील संतांनी समाजाला सात्विक विचार दिले आहे. महात्मा बसवेश्वर यांनी शरण तत्वज्ञानाची मांडणी करतानाही काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे जेव्हा सुफी संप्रदायाची बैठक व बसवेश्वर यांचे शरण तत्वज्ञान यांचा अभ्यास करताना त्यातील वैचारीक साधर्म्य समानधाग्याने जोडले जाते. स्त्रीचा आदर करा, अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका असे विचार बसवेश्वरांनी ज्या काळात मांडले ते त्या समाजव्यवस्थेची परिस्थिती पाहता महत्त्वाचे होते. मात्र आजही या विचारांना समाजात पूर्णपणे रूजण्याची गरज आहे, अशा घटना घडत आहेत. बसव व सुफी तत्वज्ञानाला पौरोहित्याचा पगडा मान्य नाही. राज्यसत्तेतून येणारी मक्तेदारीही या दोन्ही तत्वांनी नाकारल्याचे दिसून येते. '

बी. एम. हिर्डेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी उद्योजक अशोक चिमटे, विजय शेटे उपस्थित होते. राजशेखर तंबाके यांनी प्रास्ताविक केले. बी. एम. पाटील यांनी डॉ. तरिकेरे यांचा परिचय करून दिला. बाबूराव तारळी यांनी आभार मानले. यश आंबोळे यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी सुरक्षानिधी सुधारीत बातमी

$
0
0

पान ४ मेन

.............

विद्यापीठ लोगो, मदतीचा फाइल फोटो

........................................

'विद्यार्थी सुरक्षानिधी'ला हवी प्रसाराची जोड

योजनेबाबत अद्याप विद्यार्थी व पालक अनभिज्ञ

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

विशीबावीशीतला तरूण मुलगा किंवा मुलगी जेव्हा नियती हिरावून घेते तेव्हा पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम होत असतानाच अनेकदा अशा तरूण मुलांचा मृत्यू पाहण्याचे दु:ख पालकांच्या वाट्याला येते. तर विद्यार्थीदशेत जेव्हा आईवडीलांचा आधार हवा असतो तेव्हा पोरकेपण येते आणि शिक्षणासोबत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तरूणांवर येते. काळाचा हाच घाव आर्थिक आधाराने भरून काढण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थी सुरक्षानिधी योजना सुरू केली आहे. मात्र अद्यापही या योजनेची माहिती विद्यार्थी व पालकांना पूर्णपणे नसल्याने अनेक विद्यार्थी व पालकांपर्यंत आपत्तीपश्चात सुरक्षानिधी पोहोचत नाही असे चित्र आहे. गेल्या वर्षभरात सुरक्षानिधीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २१ तर पालकांची संख्या ही २१ आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे सुरक्षा निधी योजना राबवली जाते. २००३ पासून ही योजना सुरू आहे. मात्र त्यापूर्वी विमा कंपनीशी ही योजना संलग्न होती. गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाच्यावतीने स्वतंत्रपणे ही योजना राबवण्यात येते. महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या पालकांना एक लाख रूपये मदत देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे. तर विद्यार्थ्यांच्या आई किंवा वडीलांचा मृत्यू झाल्यास विद्यार्थ्याला २५ हजार रूपये दिले जातात. यासाठी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरावरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक शुल्कामध्ये दरवर्षासाठी एकरकमी २५ रूपये आकारले जातात. हे पैसे भरणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे. प्रवेश घेत असताना शुल्कातील रकमेच्या वर्गीकरणामध्ये याबाबत नमूद करण्यात येत असले तरी विद्यार्थीहिताच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या या योजनेचा लाभ घेण्याबाबत महाविद्यालयीनस्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा अभाव आहे. ज्या विद्यार्थ्यांना किमान या योजनेची माहिती आहे ते पालकांच्या मृत्यूनंतर सुरक्षानिधीच्या लाभासाठी प्रस्ताव देतात. परंतु, या योजनेबाबत पालक अनभिज्ञ असण्याचे प्रमाण अधिक असल्याने मुलांच्या निधनानंतर या योजनेचा लाभ घेण्यापासून पालक वंचित राहतात.

विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्यादृष्टीने आर्थिक आधार देणाऱ्या योजनेचा प्रसार महाविद्यालयीन पातळीवर अधिक गतिमान व्हावा यासाठी यंदा कॉलेजला परिपत्रकातून ऑनलाइन बॅनर पाठवण्यात येणार आहेत. प्रवेशप्रक्रिया कालावधीत हे बॅनर कॉलेजच्या आवारात लावण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच माहितीपत्रकातही या योजनेची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

............................

काय आहे योजना

विद्यार्थ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास (आत्महत्या वगळता) पालकांना १ लाख रूपयांची मदत

आई किंवा वडीलांचा किंवा दोघांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विद्यार्थ्याला प्रत्येकी २५ हजार रूपयांची मदत

एकाच वेळी शिक्षण घेत असलेल्या भावंडांना या योजनेचा लाभ घेता येतो.

विद्यापीठाचे कर्मचारी व शिक्षकांनाही ही योजना लागू आहे.

वर्षाकाठी सरासरी ६० लाख रूपये जमा होतात. तर ३५ लाखापर्यंतची रक्कम निधीपोटी देण्यात येते. उर्वरित रक्कम विद्यापीठाकडे स्वतंत्र फंड म्हणून ठेवण्यात येते. विद्यापीठ व कॉलेजमध्ये अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो.

...............

४५ दिवसात प्रस्ताव, आठ दिवसात धनादेश

मृत्यूनंतर ४५ दिवसांच्या मृत्यू प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर आठ दिवसात मदतीच्या रकमेचा धनादेश देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. अनेकदा विद्यार्थी सहल, अभ्यासदौरा करण्यासाठी जातात तेव्हा अपघात होतो. आजारी पडून विद्यार्थ्यांना मृत्यू होतो. पालकांच्या बाबतीतही अशाप्रकारचे मृत्यू होतात. अशाप्रसंगी मानसिकदृष्ट्या सावरण्यास काही काळ जाणे आवश्यक असते. त्यामुळे प्रस्तावासाठी ४५ दिवसांची पुरेशी मुदत देण्यात आली आहे. दरम्यान काही कारणाने प्रस्तावास काहीसा विलंब झाल्यास विद्यापीठ समिती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांना नाकारत नाही. गेल्या महिन्यात शिवज्योत आणताना अपघाती मृत्यू झालेल्या वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पालकांना या निधीतून आर्थिक मदत देण्यात आली.

............................

चौकट

पालकांची अनभिज्ञता

सुमारे अडीच लाख विद्यार्थी विद्यापीठासह संलग्न कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना वर्षभरात पालकांचे निधन होण्याचे प्रमाण अधिक असूनही केवळ २१ विद्यार्थ्यांनीच पालकांच्या निधनानंतर सुरक्षानिधीचा लाभ घेतला आहे. वयाच्या साठ वर्षापर्यंत ज्या पालकांचे निधन होते त्यांची अपत्ये महाविद्यालयीन किंवा विद्यापीठस्तरावर शिक्षण घेत असतात. मात्र पालकांच्या निधनानंतर सुरक्षानिधीचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षभरात २१ इतकी नगण्य आहे. अनेकदा आपल्या पाल्याने सुरक्षानिधीसाठी फीमधून शुल्क भरले आहे याची कल्पना पालकांना नसते.

.....................

कोट

'मदतीचा धनादेश देण्याऐवजी रक्कम थेट बँकखात्यात जमा करून प्रक्रिया सुलभ करण्याचाही मानस आहे. तसेच पालकांच्या मृत्यूनंतर देण्यात येणाऱ्या २५ हजार रूपयांच्या रकमेत वाढ करण्याचाही प्रस्ताव यंदा विचाराधीन आहे. ही योजना ऐच्छिक असल्याने व विद्यार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी प्रसार मोहिमेला गती देण्यात येणार आहे.

आर. व्ही. गुरव, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळेच काढणार फलक

$
0
0

(फोटो आहे)

मंडळेच काढणार फलक

शिवजयंती मिरवणुकांसाठी कडेकोट बंदोबस्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शहरात लागलेले डिजिटल फलक उत्सव संपताच काढून घेण्याचे आश्वासन मंडळांनी पोलिसांना दिले आहे. याशिवाय प्रबोधनावर भर देऊन वेळेत मिरवणुका संपवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे. मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी (ता. १६) मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली.

राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त सध्या शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आणि मिरवणुकांचे आयोजन केले आहे. मंगळवारी आणि बुधवारी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका निघणार आहेत. याचे नियोजन करण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शहरातील शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहरातील सर्व उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि शहरातील पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंडळांनी मिरवणुकांचे स्वरुप आणि नियोजनाची माहिती दिली. बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर शिवचरित्रातील देखाव्यांसह सामाजिक प्रबोधनपर देखावेही सादर केले जाणार असल्याची माहिती बैठकीत दिली. गर्दी टाळण्यासाठी जुना बुधवार पेठ मंडळाने बुधवारी मिरवणुकीचे नियोजन केल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मिरवणुकांसाठी रात्री वेळ वाढवून मिळण्याचा आग्रहदेखील काही मंडळांनी धरला.

याबाबत पोलिस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, 'मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आणि मंडळांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. मिरवणुकीत पुढे जाण्यावरून मंडळांचे वाद होणे, वाहतूक कोंडी होणे, ट्रक किंवा ट्रॉलीतील कमानींचा विजेच्या तारांना स्पर्श होणे, मोठ्या फलकांमुळे अडथळे निर्माण होणे असे प्रकार टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. दुचाकीच्या पुंगळ्या काढून गोंधळ घालणाऱ्या तरुणांना संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीच सूचना देऊन कारवाईचे प्रसंग टाळावेत. शिवज्योत घेऊन येताना अपघात होऊ नयेत, यासाठी मंडळांनी खबरदारी घ्यावी. मिरवणुकीत फटाके फोडताना दुर्घटना घडण्याचा धोका असतो, त्यामुळे सुरक्षित ठिकाणीच फटाक्यांची आतषबाजी करावी. उत्सव संपताच सार्वजनिक ठिकाणी लावलेले सर्व डिजिटल फलक आणि ध्वज काढण्याची जबाबदारी संबंधित मंडळांची आहे. मिर‌णुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मंडळांनी दक्षता घ्यावी.'

यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, शशिराज पाटोळे, अनिल गुजर, सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, आदी उपस्थित होते. मंडळांच्या वतीने बाबा पार्टे, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक दिगंबर फराकटे, हर्षल सुर्वे, नागेश भोसले, प्रवीण सोनवणे, संजय जाधव, धनंजय सावंत, आदी उपस्थित होते.

फलकांबाबत अधिक दक्षता

अनेकदा डिजिटल फलक वादाचे कारण ठरतात. त्यावरील मजकूर, फलक लावण्याचे ठिकाण, फलकांची मोडतोड यावरून दोन मंडळे आणि गटांमध्ये संघर्ष निर्माण होतो. असे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांकडून फलकांबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे. आक्षेपार्ह मजकुराचे फलक उभे राहू नयेत, यासाठी छपाई करणाऱ्या व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. मुरवणुकीतील फलकांची उंची आणि रुंदीबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना मंडळांना दिल्या आहेत. याशिवाय उत्सव संपताच मंडळांनी स्वत:हून फलक काढून घेण्याचे कबूल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकात गोंधळ घालणाऱ्या दोघांवर गुन्हा

$
0
0

बसस्थानकात गोंधळ

घालणाऱ्या दोघांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ घालून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बारक्या उर्फ संतोष आनंदा पाटील (रा. उचगाव), अशोक रामसिंग मंडल (रा. सदर बाजार, कोल्हापूर) हे दोघे रविवारी (ता. १५) दुपारी मध्यवर्ती बसस्थानकातील फलाट क्रमांक एकवर गोंधळ घालत होते. यावेळी डेपोतील कर्मचारी रमजान शमशुद्दीन अत्तार (रा. अंबप, ता. हातकणंगले) यांनी गोंधळ घालणाऱ्या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर पाटील आणि मंडल या दोघांनी कर्मचारी अत्तार यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की सुरू केली. गोंधळ सुरू असताना आलेल्या पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनीही टेबलवर डोके आपटून घेऊन आणि खिडकीच्या काचेवर बुक्की मारून स्वत:ला जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला. अटक केल्यास पोलिसांनीच आम्हाला मारहाण केल्याचे सांगणार असा कांगावा त्यांनी केला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार कायदे पाळत नाही

$
0
0

'अतिक्रमणांबाबत सरकारची मनमानी'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिक्रमणांबाबत आतापर्यंत केलेले कायदे व वेळोवेळी काढलेली परिपत्रके यानुसार तावडे हॉटेल परिसरातील जागेबाबत कार्यवाही न करता सरकारने मनमानी चालवली आहे. सध्याच्या कायद्यानुसार महापालिकेला कारवाई करण्याची मुभा द्यावी, अन्यथा महापालिका बरखास्त करून सरकारनेच कामकाज पहावे, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या काळातील बेकायदेशीर सनदांची चौकशी करून त्या रद्द करण्यात याव्यात, अशीही मागणी केली.

दरम्यान, तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करावेत. अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई तातडीने केली जावी. अन्यथा कायदा पूर्ण रद्द करून ज्याला हवे तसे बांधकाम करण्याची परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

देसाई म्हणाले, '१९८४ मध्ये अनधिकृत बांधकाम करणे हा दखलपात्र गुन्हा ठरवला. त्यानुसार कारवाई केली जात नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे कलम २०१२ मध्ये समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम १५६ अन्वये हा कायदा लागू असलेल्या क्षेत्रात याच कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा. इतर कायद्याने केलेली कारवाई ग्राह्य असणार नाही, असे नमूद केले आहे. या कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नसल्याने संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे सोडून सरकारने २०१७ मध्ये सुधारणा केली. अनधिकृत बांधकामांना नव्या सुधारणेनुसार अभय देण्यात आले. बफर झोन, बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर जागेवरील बांधकामांसाठी हा कायदा आहे. आरक्षित जागांवरील बांधकामांसाठी हा कायदा नाही. त्यामुळे सरकार कायद्यानुसार कार्यवाही करत नाही.'

तावडे हॉटेल परिसरातील जागांचा वापर व्यावसायिक व औद्योगिक कारणासाठी करण्याची सनद अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या काळात देण्यात आली आहे. मात्र ती बेकायदा असल्याचे दिसून आल्यावर या सनोनुसार दस्त नोंद केले जाऊ नयेत, असे जिल्हा प्रशासनानेच आदेश दिले आहेत. त्यामुळे अशा बेकायदा सनदांची चौकशी करावी व त्या रद्दही कराव्यात, अशी मागणी केल्याचे सांगत देसाई म्हणाले, 'ज्यांनी पूर्वी कोल्हापुरात जिल्हाधिकारी पदावर काम केले व सध्या मंत्रालयात सनदी अधिकारी आहेत. त्यांचा व त्यांच्या नातेवाइकांचे हितसंबंध या परिसरातील मिळकतीत आहेत का? याचीही सरकारने चौकशी करावी. यावेळी बुरहान नाईकवडी, सुशील कोरडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिध्देश्वर मंदिर चोरीचा छडा

$
0
0

फोटो

..............

जयसिंगपूरच्या सिध्देश्‍वर

मंदिरातील चोरीचा छडा

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर मंदिरातील चोरीचा छडा लागला असून पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सांगली येथील गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आकाश श्रीकांत खांडेकर (वय १९, रा. जोतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी) व अक्षय धनंजय पोतदार (वय १९, रा. अहिल्यानगर, सांगली) अशी चोरट्यांची नावे आहेत. दुसऱ्या एका गुन्ह्यात पोलिसांनी राजू माणिक डांगे (वय २३, रा.हरिपूर) याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर मंदिरात २ डिसेंबर २०१७ रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी दोन दानपेट्या लंपास केल्या होत्या. त्यावेळी सुमारे दीड ते पावणेदोन लाख रूपयांची रक्कम चोरीस गेल्याचे मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी सांगितले होते. मंदिरात दोन दानपेट्या होत्या. मंदिराचा नुकताच जीर्णोध्दार करण्यात आला होता. यामुळे मोठी रक्कम दानपेटीत जमा झाली होती. चोरट्यांनी मंदिराच्या दक्षिणेस असणाऱ्या दरवाजावरील झडपेची काच फोडून आतील कडी काढली. यानंतर मंदिरात प्रवेश करून सुमारे साडेतीन फूट उंचीच्या दोन दानपेट्या लंपास केल्या होत्या. यानंतर पोलिसांसमोर मंदिरातील चोरीच्या तपासाचे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान, सोमवारी सांगली शहर परिसरात गस्त घालताना पोलिसांना विश्रामबाग गणपती मंदिर ते शंभर फुटी रोडच्या कॉर्नरजवळ काळ्या पिवळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली होंडा डिओ मोटारसायकल आढळली होती. या ठिकाणी तीनजण थांबले होते. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने चौकशी करण्यासाठी जात असताना संशयितांनी मोटारसायकलवर बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता डिसेंबर महिन्यात जयसिंगपूर येथील सिध्देश्‍वर मंदिरातील दानपेट्या लंपास केल्याचे आकाश खांडेकर व अक्षय पोतदार यांनी सांगितले. या दानपेट्या सांगलीतील लिंगायत स्मशानभूमीत फोडून त्यातील रोकड काढून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

या तिघा चोरट्यांनी १४ एप्रिल रोजी रात्री सांगलीतील बालाजीनगरमध्ये बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून सोन्या-चांदीचे दागिने, कॅमेरा व रोकड असा एक लाख ३९ हजार ३९९ रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, सहायक फौजदार लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, सचिन कुंभार, योगेश खराडे, सागर लवटे, संकेत कानडे, संतोष गळवे, आर.एन. देशिंगकर, कॉन्स्टेबल साळुंखे, मोतीराम खोत यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजा परांजपे महोत्सव...रंगला अभंगरंग

$
0
0

स्वरांमध्ये रंगला

अभंगरंग

राजा परांजपे महोत्सव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विठोबामध्ये माऊलीचे रूप शोधणाऱ्या संतांना विठूरायाने मोहवून टाकले आहे. त्यातूनच संत समुदायांचे त्या भगवंताशी भक्तीचे बंध गुंफले गेले. भक्तिभावात रमलेल्या संतांनी त्या विठूच्या रुपावर केलेल्या रचना अनुभवण्याची पर्वणी सोमवारी रसिकांना अभंगरंग या कार्यक्रमात मिळाली. मंचावर सादर झालेल्या अभंगांमधील स्वरांची तान, आलापताना, स्वरातील आरोह अवरोह यांनी रसिकमन भारावून गेले.

 निमित्त होते राजा परांजपे चित्रपट महोत्सवात सादर करण्यात आलेल्या संत रचनांवर आधारित अभंगरंग कार्यक्रमाचे. अवघा रंग एकचि झाल्याप्रमाणे रंगमंचावरील कलाकारांसह सारा श्रोतृवृंद तल्लीन झाला. सोमवारी सायंकाळी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

 आयुष्याचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार आदी संतांच्या रचनांवर आधारीत अभंग सादर करण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, राजस सुकुमार मदनाचा पुतळा ही तुकोबांची रचना,  निर्गुणाचा संग धरिला जो आवडी हा संत गोरा कुंभारांचा अभंग, श्री अनंता मधुसुदना पद्मनाभा नारायणा ही तुकोबांची रचना, सावळे सुंदर रुप मनोहर हे अभंग सादर करण्यात आले .

 संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे, संपदा थिटे यांच्या गायकीला प्रशांत पांडव, नंदकुमार भांडवलकर, प्रसाद भांडवलकर यांनी ढोलकी, तबला आणि टाळाची साथ दिली. दीप्ती कुलकणी यांनी संवादिनी साथ दिली. श्रेयस बडवे यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी १७ एप्रिल

$
0
0

पुस्तक प्रदर्शन : संवाद प्रकाशन व वाचनकट्टातर्फे पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक कलादालन, वेळ : सकाळी १० ते रात्री ८

शिबिर : शिवजयंती व बसवेश्वर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर, स्थळ : चित्रदुर्ग मठ, दसरा चौक, वेळ : सकाळी १०.००

रांगोळी प्रदर्शन : निलिशा सावंत ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त तीन हजार चौरस फुटी रांगोळीचे प्रदर्शन, स्थळ : क्रशर चौक हॉल, वेळ : सकाळी १० ते रात्री ९

कवीसंमेलन : सतेज पाटील वाढदिवस लोकोत्सवअंतर्गत कवीसंमेलन, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी ५.००

नाट्यप्रयोग : राजा परांजपे चित्रपट महोत्सवाअंतर्गत ब्रँड बाजा बारात नाट्यप्रयोग, स्थळ : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ : सायंकाळी ५.००

व्याख्यान : बसव केंद्र व लिंगायत समाजतर्फे बसव व्याख्यानमालेअंतर्गत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान, स्थळ : शाहू स्मारक भवन, मिनी हॉल, वेळ : सायंकाळी ५.३०

कीर्तन : सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे रोहिणी माने यांचे किर्तन, स्थळ : अंबाबाई मंदिर कारंजा चौक, वेळ : सायंकाळी ७.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकास अटक

$
0
0

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कोल्हापूर: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किरण भालकर असे संशयिताचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने रविवारी (ता. १५) कळंबा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याबाबत पीडित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करताच पोलिसांनी भालकर याला अटक केली. करवीर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात युवक ठार

$
0
0

फोटो

...........

अपघातात युवक ठार

गारगोटी

गारगोटी - कडगाव मार्गावर करडवाडी नजीकच्या ओढ्यावरील पुलावरून सुमो कोसळून सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात युवक ठार झाला. शुभम मधुकर नांदेकर (वय २३ रा. तिरवडे) असे युवकाचे नाव आहे. शुभम हा तिरवडे येथून पहाटे सहाच्या सुमारास गारगोटीकडे टाटा सुमो घेऊन येत होता. करडवाडी नजीकच्या दोरडाच्या ओढ्यावरील पुलावर गाडीचा ताबा सुटल्याने गाडी सुमारे वीस फुटावरून थेट ओढ्यात कोसळली. यावेळी शुभमला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला गारगोटी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील व बहिण असा परिवार आहे. त्याचे आय.टी.आय. शिक्षण पूर्ण झाले होते. तो अथणी शुगर भुदरगड युनिटमध्ये कामाला होता. माजी सभापती बाबा नांदेकर यांचा तो पुतण्या व माजी जिल्हा परिषद सदस्य के.जी.नांदेकर यांचे नातू होय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूर रत्नागिरी हायवेला सांगली फाटा ते टोप रस्ता जोडावा

$
0
0

महामार्गाला बायपास कशाला?

रत्नागिरी-नागपूर महामार्गाबाबत खासदार शेट्टी यांची सवाल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीचे संपादन करून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक ते टोप हा बायपास कशाला हवा? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित केला. चोकाक ते टोप फाट्याऐवजी सद्या अस्तित्वात असलेला सांगली फाटा ते टोप या मार्गाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीही वाचतील आणि खर्चही वाचेल, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाटी भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी-नागपूर हा चौपदरी महामार्ग शाहूवाडी, पन्हाळा, करवीर हातकणंगले तालुक्यातून जाणार असून महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनीचे भूसंपादन होत असल्याने विरोध होत आहे. रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग शहराजवळून न जाता कोल्हापूर सांगली रस्त्यांवरुन चोकाक शिये असा बायपास काढण्यात येणार आहे. या बायपाससाठी चोकाक, टोप परिरसरातील नागरिकांच्या बागायती जमिनी, विहिरीचे अधिग्रहन करण्यात येणार आहे. हा बायपास काढण्याऐवजी रत्नागिरी-नागपूर महामार्गात चोकाक, सांगली फाटा ते टोप या मार्गाचा समावेश केला तर शेतकऱ्यांच्या जमिनी वाचू शकतात याकडे खासदार शेट्टी यांनी बैठकीत लक्ष वेधले. कोल्हापूर ते सांगली हा ५४ किलोमीटर हा चौपदरी रस्ता पूर्ण झाला आहे. तसेच सांगली फाटा ते टोप हा मुंबई-बेंगळूरू या महामार्गावरुन जात असल्याने चोकाक ते टोप हा बायपास करु नये, अशी मागणी केली.

शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील नावली, बोरपाडळे, आवळी, आंबवडे या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होणार आहे. दोन्ही तालुक्यात फक्त १० ते १२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे, असे आधिकारी सांगत आहेत. भूसंपादन होणाऱ्या जमिनीचे गट नंबर जाहीर करावे. गटनंबर जाहीर न केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे, याकडे खासदार शेट्टी यांनी लक्ष वेधले. शेतकरी भूसंपादनाला सहकार्य करत आहेत. पण त्यांना जमिनीचा मोबदला रेडिरेकनरच्या अडीच टक्के भरपाई मिळणार की साडेचार टक्के मिळणार याचाही खुलासा करावा, अशी मागणी केली. जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत भूसंपादन करू दिले जाणार नाही, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला.

असा आहे महामार्ग

रत्नागिरी, टिंक, पाली, कोल्हापूर, सांगली, सांगोला, सोलापूर,तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, बुटीबोरी, नागपूर एमआयडीसी

महामार्गाची लांबी : १०८७ किलोमीटर

मंजूर निधी : ८००० कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म. टा. सोशल कनेक्ट....

$
0
0

लोगो : म. टा. सोशल कनेक्ट

समृद्ध वारसा जपायला हवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याची पर्यटन उद्योगाच्या विकासात वृद्धी व्हावी, यासाठी सरकारीपातळीवर प्रयत्न सुरू असताना अनेक सामाजिक संस्थाही यासाठी प्रयत्न करत आहेत. अर्किटेक्ट अॅन्ड इंजिनिअरिंग असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरिअर डिझायनर्स या संघटना हेरिटेज वास्तूंसह समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागतिक वारसा दिनानिमित्त दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या एकूण सांस्कृतिक वारसा आणि परंपरेवविषयी मटा सोशल कनेक्टअंतर्गत संवाद साधला.

१९७६ मध्ये अर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनची स्थापना राजाराम बेरी यांनी केली. त्यानंतर बलराम महाजन, मोहन वाचयळ यांच्यासह अन्य अध्यक्षांनी या संस्थेचा विकास व विस्तार केला. घर अथवा बंगला बांधण्यासाठी डिझाइन करावे लागते ही संकल्पना त्याकाळी फारच कमी लोकांना माहीत होती. असोसिएशनने बांधकाम व्यवसायात अर्किटेक्टचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. घर बांधताना कागदावर डिझाइन लागते, बांधकाम करण्यासाठी करारपत्र तयार करावे लागतात. खरेदी विक्रीची प्रक्रिया असते याची माहिती संस्थेच्यावतीने अर्किटेक्ट आणि इंजिनिअरर्सना करून दिली. त्याचा फायदा ग्राहकांनाही झाला. अर्किटेक्टचर व्यवसायाचा शास्त्रशुद्ध पाया असोसिएशनने घातला. मजबूत आणि सौदर्यपूरक बांधकाम उभारणीत असोसिएशनने सभासदांना मार्गदर्शन केले. असोसिएशनचे सभासद ज्ञान व तंत्राच्यादृष्टीने कायम सक्षम राहण्यासाठी मान्यवरांची व्याख्याने, सहली, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरात आज तीन हजारहून अधिक अर्किटेक्ट कार्यरत आहेत. असोसिएशनच्यावतीने सामाजिक उपक्रमात मदत केली जाते. शहर विकासात अर्किटेक्टसचे योगदान मोठे आहे. रस्ते विकास प्रकल्पाचे ऑडिट करण्यासाठी असोसिएशने टोलविरोधी आंदोलनात मोठी मदत केली होती. पुरातन वास्तूंचे जतन, पंचगंगा प्रदूषण या प्रश्नांसंदर्भात असोसिएशन सामाजिक बांधिलकीतून प्रशासनाला मदत करत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरिअर डिझायर्नस् संस्थेची स्थापना १९७२ मध्ये दांडेली येथे सुरू झाली. कोल्हापूर शाखेची सुरुवात १९९७ मध्ये झाली. या संस्थेचे ४५० सदस्य आहेत. देशात ३७ ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. हेरिटेज, सुरक्षितता या प्रश्नांवर संस्थेने लक्ष केंद्रीत केले आहे. इमारतीची सुरक्षितता या प्रश्नांवर प्रबोधन केले जात आहे. पुरातन वास्तू संवर्धन करणाऱ्या मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जात आहेत. तसेच कोल्हापूर शहर व जिल्ह्यात हेरटेज वॉकचे आयोजन केले जात आहे. कोल्हापूरच्या पर्यटन विकासात दोन्ही संस्थांकडून योगदान दिले जात आहे.

दुसरे महायुद्ध आणि तालिबानी हल्ल्यात पुरातन वास्तूंची झालेली नासधूस लक्षात घेता जागतिक वारसा जतन करणाऱ्या ७९५ ठिकाणे निश्चित केली आहेत. भारतात अशा ३५ वास्तू असून कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचा समावेश आहे. चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर, गगनबावडा तालुक्यातील पळसंबे येथील मंदिरे अंबाबाई मंदिराइतकी प्राचीन आहेत. हेरिटेज वास्तूंचा इतिहास सांगताना महाराज, सरदारांची नावे घेतली जातात. त्याचबरोबर ज्यांनी वास्तू बांधल्या त्या अर्किटेक्चर, बांधकाम व्यावसायिकाचे योगदान कळावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

मोहन वाचयळ, माजी अध्यक्ष अर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशन

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पुरातन वास्तूंचे महत्त्व पटवून देण्यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, डॉ. अमर आडके आणि मान्यवर तज्ज्ञांच्या सहकार्यांतून हेरिटेज वॉकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरात हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर व त्यांची समितीने अतिशय चांगले काम करत असून हेरिटेज वास्तूंच्या त्या सूची बनवत आहेत. त्याचा फायदा भावी पिढी व पर्यटन व्यवसायाला होणार आहे.

संदीप घोरपडे, अर्किटेक्ट

हेरटेज वास्तूंची जपणूक करण्यासाठी दगड, चुना, माती, वीट, सुतारकाम करणाऱ्या कलाकारांची गरज आहे. या कलाकारांची यादी तयार केली पाहिजे. त्यासाठी सरकारी कार्यालयात अशा कामांसाठी नवीन डीएसआरची नोंद झाली पाहिजे. हेरिटेज वास्तूची डागडुजी करताना नियमांचा अवलंब करताना आहे त्या स्थितीतील वस्तू मिळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

अजय कोराणे, सदस्य अर्किटेक्ट अॅन्ड इंजिनीअरिंग असोसिएशन

हेरिटेज वास्तू सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, शिक्षण मंडळासह संस्थांकडे आहेत. या संस्थांनी या वास्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी संस्थांनी आपल्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली पाहिजे. हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धन करण्यासाठी नागरिकांच्यात जागरुकता केली पाहिजे. पर्यटनवृद्धीसाठी हेरिटेज वास्तू हे मोठे माध्यम आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

डी. एस. भोसले, निवृत्त शहर अभियंता

पुरातन वास्तू व संवर्धनाबाबत सरकारी कार्यालयाची प्रचंड उदासीनता आहे. वास्तूंचे संवर्धन करताना काळजी घेतली जाते. हेरिटेजमध्ये फक्त इमारतींचा समावेश होत नसून कला, वस्तू, कारागिरी यांचाही समावेश होतो. कोल्हापुरात तयार होणारे घोंगडे, गूळ, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल या वस्तू व खाद्य पदार्थांचाही समावेश होतो. कोल्हापुरातील परंपरागत वास्तू, संस्कृतीची परंपरा जपण्याची गरज आहे.

चंदन मिरजकर, अर्किटेक्ट

राष्ट्रीय व परदेशापेक्षा कोल्हापूर शहर व जिल्ह्यात अतिशय दुर्मिळ वास्तू आहेत. या वास्तूंचे संवर्धन करन त्याची योग्य माहिती नागरिक व पर्यटकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. प्रशासन, सामाजिक संस्थांबरोबर नागरिकांचाही हेरिटेज वास्तूच्या संवर्धनासाठी मदत होण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारकडून हेरिटेज वास्तूसाठी निधी मिळू लागला आहे. धार्मिक पर्यटनाला हेरटेज पर्यटनांची जोड देणे ही भविष्यकाळाची गरज आहे.

पार्षद वायचळ, अध्यक्ष आयआयआयडी कोल्हापूर शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवजयंतीनिमित्त आज मिरवणूक, पोवाडा आणि व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात सुरू झालेला शिवजयंतीचा माहोल आता अधिकच रंगला आहे. आज, मंगळवारी शिवजयंतीचा मुख्य सोहळा आहे. त्यानिमित्त शहरातील विविध तालीम संस्था आणि मंडळांनी एकत्र येत संयुक्त शिवजयंती साजरी करण्याची तयारी केली आहे. सायंकाळी निघणाऱ्या मिरवणुकीसह सकाळपासून शिवज्योत आगमन, शिवजन्मकाळ सोहळा, पोवाडा, व्याख्याने असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान शिवजयंतीनिमित्त शहर शिवमय झाले असून, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौक, राजारामपुरी येथे भगवे झेंडे, पताका, शिवप्रतिमा आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शिवजयंतीनिमित्त नीलिशा सामंत व सहकलाकार तीन हजार फूट व्यासाची रांगोळी रेखाटणार आहेत. सामंत यांच्यासोबत १५ युवती ही रांगोळी काढणार आहेत. क्रशर चौक येथे ही भव्य रांगोळी मंगळवारी दिवसभर पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. यामध्ये दहा फूट शिवप्रतिमा रांगोळीतून रेखाटण्यात येणार आहे. मंगळवार पेठ परिसरातील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे परिसरातील १३ तालीम मंडळांनी एकत्रित शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. शिवजयंतीदिवशी सकाळी शिवजन्मकाळ सोहळा तसेच सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ८ फुटी शिवप्रतिमा, घोडे, उंट, झांजपथक हे मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. मिरजकर तिकटी, लाड चौक, महाद्वार रोड या मार्गावरून ही मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीसह उत्सवकाळात या भागात लावण्यात येणाऱ्या फलकांमधून प्रबोधन करण्यात येणार आहे. फलक बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संयुक्त राजारामपुरी परिसरातील ७६ मंडळांनी एकत्रितरित्या शिवजयंती साजरी करण्याची तयारी केली आहे. १७ रोजी शिवज्योत, शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रूग्णांना फळेवाटप, वृक्षारोपण, स्मशानभूमीला साहित्यदान असे उपक्रम राबवून समाजोपयोगी विचार रूजवण्यात येणार आहे. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गंगावेश दत्त गल्लीतर्फे शिवजयंतीनिमित्त उभारण्यात आलेला देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या लगबगीने सजावट व मिरवणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

संयुक्त उद्यमनगरतर्फे करूणालयाला मदत

उद्यमनगर परिसरातील १० मंडळे एकत्र आली आहेत. मिरवणुकीला फाटा देत या उत्सवसमितीने शिये येथील करूणालय संस्थेला अग्निशमन सिलिंडर यंत्रणा देणगीदाखल देणार आहेत. शिवजन्मकाळ सोहळ्यानिमित्त सजावटीची तयारी करण्यात आली असून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता उद्यमनगर फ्रेंडस सर्कल चौक येथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.

केरळी नृत्याचा थाट

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सवसमितीतर्फे बिंदू चौक येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंगळवारी, मुख्य दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोहळा, मूर्तिपूजन, पाळणा व संगीत होणार आहे. तर सायंकाळी काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीत १५ फुटी अश्वारूढ पुतळा, केरळचे पारंपरिक नृत्य, चाळीस लहान मुलांचे लेझीम पथक, ऐतिहासिक वेशभूषा अशी प्रमुख आकर्षणे असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाज पार्लरमधील कुंटणखान्यावर छापा

$
0
0

(फोटो आहेत)

मसाज पार्लरमधील

कुंटणखान्यावर छापा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी येथील शाहू मिल चौकात एका घरात सुरू असलेल्या मसाज पार्लरमधील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, दोन तरुणांना अटक केली. आशिष राजेंद्र चिंगळे (२७, रा. आळते. ता. हातकणंगले) आणि सूरज संजय पवार (२७, रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. सोमवारी (ता. १६) संध्याकाळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या आदेशानुसार राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.

शाहू मिल चौकातील शीतल तिडके या महिलेच्या घरात सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाला मिळाली होती. डॉ. अमृतकर यांनी या माहितीची शहानिशा करून राजारामपुरी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. दामिनी पथकाने सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला असता, मसाज पार्लरमध्ये दोन पीडित तरुणी आढळल्या. पथकाने पीडित महिलांची सुटका करून कुंटणखाना चालवणारा आशिष चिंगळे आणि ग्राहक सूरज पवार या दोघांना अटक केली. दोन्ही संशयितांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत समाज - लिंगायत समाजाचा २९ एप्रिलला नाशिकमध्ये मोर्चा

$
0
0

लिंगायत समाजाचा

२९ ला नाशिकमध्ये मोर्चा

क्रांतीदिनी पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी बेमुदत उपोषण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्यासाठी समाजाने शंभर दिवसांचा अल्टीमेट दिला होता. समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मागण्यांकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी २९ एप्रिल रोजी नाशिक येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर तीन जून रोजी सोलपूर येथील मोर्चानंतर ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानासमोर लिंगायत संघर्ष समितीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल,' अशी माहिती संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरलाताई पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाल्या, 'लिंगायत धर्माला मान्यता देवून स्वतंत्र अल्प संख्यांकांचा दर्जा मिळावा व धर्मातील पोटजातींना इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण मिळण्यासाठी लिंगायत संघर्ष समितीच्यावतीने २०१४ पासून आंदोलन सुरू आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीने लिंगायत धर्माला मान्यता देण्याची व अल्पसंख्याक दर्जा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. केंद्र सरकारने ठरावाची अंमलबजावणीसाठी पाठवण्याचे काम सत्ताधारी पक्षांनी करण्यासाठी लातूर, सांगली, कोल्हापूर व औरंगाबाद येथे मोर्चे काढण्यात आले. तरीही ठरावाबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने पुन्हा नाशिक, उस्मानाबाद व पुणे येथे भव्य मोर्चे काढण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या बैठकीत घेतला आहे.'

विजय शेटे म्हणाले, ' अनेक लिंगायत मठांवर महिला धर्मगुरू आहेत. लिंगायत धर्मामध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ ही संकल्पनाच नाही.' संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र मुंढे म्हणाले, 'भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपण हिंदू वैष्णव असल्याचे जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतु त्यांच्या कागदपत्रांवर शहा आपला धर्म जैन असल्याचे नमूद करतात.'

काका कोयटे म्हणाले, 'पालकमंत्री पाटील मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री आहेत. त्यामुळे ९ ऑगस्टपासून त्यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रध्वजासोबत लिंगायत ध्वज फडकावून स्वतंत्र लिंगायत धर्म स्थापन झाल्याची घोषणा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येणार आहे.' पत्रकार परिषदेस राजशेखर तंबाखे, अशोक माळी, शिवानंद हायबुतपुरे, सुधीर पांगे, महारुद्र पाटील, चंद्रशेखर बटकडली आदी लिंगायत समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूविकास बँक कर्मचाऱ्यांचा घंटानाद आंदोलन

$
0
0

फोटो आहे

...................

भूविकास बँक कर्मचाऱ्यांचा घंटानाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेची (भूविकास) मालमत्ता 'ब' सत्ता प्रकारांमध्ये असल्याने विक्रीची निविदा खोळंबली आहे. सहकार विभागाचे आदेश असताना महसूल विभागाला सरकारने काढलेल्या अध्यादेशाची माहितीच नसल्याचा आरोप करत बँक कर्मचारी संघटनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. 'झिरो पेंडन्सी हाय हाय', 'ज्येष्ठ नागरिक धोरण हाय हाय', 'सहकारमंत्री, महसूलमंत्र्यांचा धिक्कार असो' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

'भूविकास बँक कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी सहकार विभागाने बँक इमारतीची विक्री करण्याचे आदेश दिले. मात्र बँकेची जागा 'ब' सत्ता प्रकारात येत असल्याने विक्री निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. निविदाधारकांनी 'ब' सत्ता प्रकार कमी करण्याची मागणी केली. त्यानंतर करवीरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अट शिथिल करण्यासाठी प्रस्ताव पाठवला असता, त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. वास्तविक बँक परिसरातील अनेक जागा शेरी इनाम प्रकारातील असून अशा मिळकतीवरील 'ब' सत्ता प्रकार कमी झाला आहे. मात्र बँकेच्या जागेबाबत वेगळी भूमिका घेतली जात आहे. बँकेची जागा विक्री करण्यासाठी मंत्री गट व सहकार विभागाने परवानगी दिलेली असताना सरकारचा दुसरा विभाग आडवणूक का करतो, याची विचारणा करण्यासाठी आणि मागण्यांचे निवेदन देण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असल्याने आंदोलकांना अधिकाऱ्यांची भेट मिळाली नाही. त्यामुळे आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाहतूक ठप्प झाल्यानंतर सुमारे ६० ते ७० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची रवानगी शाहूपुरी पोलिस ठाण्यात केली. यावेळी सर्व आंदोलकांची नावे घेवून त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, ' बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी दिला. आंदोलनात रावसो चौगुले, भरत पाटील, नंदकुमार पाटील, टी. बी. पाटील, डी. जी. हिर्डेकर, एन. एल. चौगले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

..................

चौकट

अध्यादेशाबाबत अनभिज्ञता

बँकेची संबंधित जागा शेरी इनाम प्रकारच्या असून त्या संस्थानिकांच्या खासगी मालकीच्या आहेत. या जमिनी संस्थानिकांनी पूर्व हक्कदारास रहिवास म्हणून मोफत दिल्या असून यावर सरकारचा कोणताही हक्क दिसत नाही. त्यामुळे या जमिनीवरील 'ब' सत्ताप्रकार कमी करण्यास हरकत नसल्याचा आध्यादेश २०१० मध्ये काढला आहे. यानुसार २१ जमिनीवरील 'ब' सत्ता प्रकार कमी केला आहे. पण हा अध्यादेशच करवीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना माहित नसल्याने ही जमीन 'ब' सत्ताप्रकार कमी करता येत नसल्याचे पत्र दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडफोडप्रकरणी तिघे अटकेत

$
0
0

(फोटो आहेत)

तोडफोडप्रकरणी तिघे अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाडळकर कॉलनी येथे दुचाकीस्वाराचा पाय लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर २० ते २५ तरुणांनी वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवली होती. यातील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) अटक केली. युसूफ सादत पठाण (वय २५), अमित खुदबुद्दीन मुजावर (२९) आणि जुनैद अकबर मुजावर (२०, तिघेही रा. जवाहरनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. हॉकी स्टेडियम परिसरातील पाडळकर कॉलनीत सोमवारी (ता. ९) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हल्लेखोरांनी चार वाहनांचे नुकसान केले होते. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून जवाहरनगर येथील तिघांना अटक केली आहे. अटकेतील संशयितांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images