Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रविवार पेठतर्फे शिवजयंतीनिमित्त रंगणार केरळी नृत्य

$
0
0

\Bसंयुक्त रविवार पेठतर्फे शिवजयंतीनिमित्त रंगणार केरळी नृत्य

\Bमिरवणुकीत १५ फूटी अश्वारूढ पुतळा आकर्षणसह भरगच्च कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या आठ वर्षापासून ऐतिहासिक बिंदू चौक येथे भागातील सर्व मंडळ, तालीम संस्था विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितरित्या पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे. यंदाचे नववे वर्ष असून यावर्षीही मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त १६ एप्रिलपासून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीतील केरळी नृत्याविष्कार, १५ फूट अश्वारूढ शिवपुतळा हे यंदाच्या उत्सवाचे खास आकर्षण आहे', अशी माहिती संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोनवणे म्हणाले,' मुंबईतील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याप्रमाणेच कोल्हापुरात १५ फूट उंच शिवरायांचा पुतळा शिवजयंतीनिमित्त साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक बिंदू चौक येथील देखाव्याचे उद्घाटन सोमवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, जयेश कदम, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, आदिल फरास, दुर्वास कदम आदी उपस्थित राहणार आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी आतिषबाजी करण्यात येणार आहे.'

मंगळवारी १७ एप्रिल रोजी मुख्य दिवशी महापौर स्वाती येवलुजे, मधुरिमाराजे,वैशाली क्षीरसागर, प्रतिमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोहळा, मूर्तीपूजन, पाळणा व संगीत होणार आहे. तर सायंकाळी भव्य मिरवणुकीचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. १५ फुटी अश्वारूढ पुतळा, केरळचे पारंपारिक नृत्य, चाळीस लहान मुलांचे लेझीम पथक, ऐतिहासिक वेशभूषा ही प्रमुख आकर्षणे असणार आहेत. मिरवणुकीस बिंदू चौक येथून प्रारंभ होणार आहे.

यावेळी उपाध्यक्ष सुमित पोवार, सोनम कुमार घोटणे, अमोल मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॉक टेस्ट उद्या

$
0
0

कोल्हापूर: युवासेनेतर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ एप्रिल रोजी 'मॉक टेस्ट' आयोजित केली आहे. राजारामपुरी येथील चाटे कोचिंग क्लासेस येथे सकाळी दहा ते दोन या वेळेत ही टेस्ट घेतली जाणार आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन होण्यासाठी हा उपक्रम होत आहे. त्यासाठी यापूर्वी १२ एप्रिल पर्यंत नावनोंदणीची मुदत होती. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून १५ एप्रिल पर्यंत ऑफलाइन नोंदणी केली जात आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, अविनाश कामते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेश पाटीलचा जामीन कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे अपहरण आणि खूनप्रकरणी अटकेतील आरोपी राजेश पाटील याचा जामीन अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी फेटाळला. शुक्रवारी न्यायाधीश शेवलीकर यांनी हा निर्णय दिला. दरम्यान, पोलिसांनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी मीरा भाईंदरच्या खाडीतील जागा निश्चित केली आहे. लवकरच ग्रॅडिओमीटरच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली जाणार आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी सरकारने खासगी कंपन्यांकडून मदत मागवली आहे. संशयित आरोपी अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांनी अश्विनींचा खून करून मीरा भाईंदरच्या खाडीत मृतदेहाचे तुकडे टाकल्याची कबुली महेश फळणीकर या संशयिताने दिली होती. मृतदेहाचे काही तुकडे पत्र्याच्या पेटीत घालून टाकल्याचे संशयितांनी सांगितले आहे. यानुसार समुद्राच्या तळाशी गाळात अडकलेल्या पत्र्याच्या पेट्यांचा शोध घेतला जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकानंद कॉलेजची नुपूर कदम बेस्ट कॅडेट

$
0
0

नुपूर कदम बेस्ट कॅडेट

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी नुपूर कदम हिला एनसीसी कोल्हापूर जिल्हा बेस्ट कॅडेट अॅवॉर्ड जाहीर झाला तर अपूर्वा शेलार हीची सेकंड बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली. या दोघींना अनुक्रमे रोख ४५ हजार व ३५ हजार रुपयां पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. कदम व शेलार यांना कर्नल जे. पी. साईकिया, एनसीसी अधिकारी कॅप्टन सुनीता भोसले, लेफ्टनंट एस. जी. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिकेकर यांना पीएचडी

$
0
0

कोल्हापूर: गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या प्रा. संपदा सच्चिदानंद टिकेकर यांनी भूगोलशास्त्र विषयात पीएचडी जाहीर झाली. त्यांनी 'स्पॉरिओ टेम्पोरेल अॅनालिसिस ऑफ सोशल डेव्हलपमेंट इन रूरल पार्ट ऑफ कोल्हापूर डिस्ट्रीक्ट' विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना शिवाजी विद्यापीठातील डॉ. एस. के. पवार, न्यू कॉलेजचे प्राचार्य नागेश नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

$
0
0

जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी सहापासून सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ठिकठिकाणी नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी दुपारी शहरात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अधीक्षक मोहिते यांनी पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. शहरातील प्रमुख मार्गांवर रात्रीची गस्त वाढवून नाकाबंदी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरात वाहनांची कसून तपासणी करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदीसह सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बैठकीसाठी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अनिल गुजर, संजय मोरे, शशिराज पाटोळे, शहाजी निकम आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जब्बार पटेल यांना रा. कृ. कणबरकर पुरस्कार बातमी फोटोसह

$
0
0

फोटो अमित गद्रे

अभ्यासक्रमात कलात्मक विषय यावेत

प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकर पुरस्काराने डॉ. पटेल यांचा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोणतीही कला ही सृजनाची जननी असते आणि कलाकाराला त्याची कला नवनिर्मितीचा आनंद देत असते. मात्र आपल्या समाजात अभ्यासक्रमांमध्ये कलात्मक विषयांना दुय्यम स्थान दिले जाते. आयुष्यात कलासंस्कृतीचे महत्त्व आहे. त्यादृष्टीने शिक्षणामध्ये कलात्मक विषयांच्या ज्ञानाबाबत जागृती होण्याची गरज आहे. माणसाच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या कलेतून कलाकार या क्षेत्रात प्रयोगशील बंडखोरी करू शकतो. वेगळं काही करण्याच्या बंडखोरीसाठी शिक्षणाच्या प्रक्रियेतच कलात्मक विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाले पाहिजेत,' अशी अपेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठ आणि कणबरकर कुटुंबीयांच्या पुढाकाराने देण्यात येणारा प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार डॉ. पटेल यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख एक लाख, ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी डॉ. पटेल बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

ते म्हणाले, 'नाटकाने मला घडवले. वयाच्या नवव्या वर्षी चेहऱ्याला रंग लावून रंगमंचावर संवाद म्हटला आणि त्यावेळी वाजलेल्या टाळ्यांनी मला या क्षेत्राकडे खेचून घेतले. रंगमंचावरील प्रायोगिकतेमुळेच भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे महान नाट्यकर्मी घडले. 'घाशीराम कोतवाल'मधला राजकीय संदर्भ इतका सशक्त होता की, त्यामधून राज्यव्यवस्थेला अशा घाशीरामांची गरज अधोरेखित होते. 'सामना' हा माझ्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताचा पहिला प्रसंग कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत चित्रित करण्यात आला. मुहूर्ताला भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांडरे आणि लता मंगेशकर उपस्थित होते. तर कॅमेऱ्यासमोर डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले असा एक योग जुळून आला होता.'

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटाशी निगडित आठवणी सांगताना डॉ. पटेल म्हणाले, या चित्रपटाच्या निमित्ताने देशातल्या दलित, शोषित वर्गाचं दुःख मला अभ्यासता आलं, मांडता आलं. बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी जगभर फिरून योग्य अभिनेत्याचा शोध घेतला, तो अखेर दाक्षिणात्य अभिनेता मामुटीवर येऊन संपला.' एस. एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज यांच्यावरील माहितीपट करताना आलेले अविस्मरणीय अनुभवही डॉ. पटेल यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या महान चित्रपटकर्मीला पुरस्कार देताना शिवाजी विद्यापीठला अतिशय आनंद होतो आहे.'

यावेळी प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्याविषयी चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. जे. एफ. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी डॉ. मणी पटेल यांना अनिता शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांच्यासह कणबरकर कुटुंबीय, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी उपाध्यक्षाच्या वाहनातील हवा गुल

$
0
0

फोटो आहे.

अध्यक्षा महाडिक- खोत यांच्यात खडाजंगी

जि.प.च्या आवारात वाहनातील हवा सोडल्याने वाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या आवारात लावलेली माजी उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शशिकांत खोत यांच्या वाहनाच्या चाकांतील हवा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शुक्रवारी सोडायला लावली. त्यानंतर महाडिक, त्यांचे समर्थक सदस्य राजवर्धन निंबाळकर, प्रकाश टोणपे यांच्यात आणि खोत यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

जि. प. आवारात एक वर्षापासून नो पार्किंग झोन आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांना आवारात सोडून वाहने कागलकर हाऊसच्या परिसरात पार्क केली जातात. दरम्यान, चालक नसल्याने वाहन आवारात लावणार असल्याचे पत्र जि. प. सदस्या सरिता खोत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना दिले आहे. त्यावर काहीही निर्णय झाला नसल्याने वाहन लावल्याचे म्हणणे खोत यांचे आहे. शुक्रवारी अडीच वाजता खोत यांच्या वाहनाने शशिकांत खोत आले आणि त्यांनी परिसरातच वाहन लावले. हे निदर्शनास आल्यानंतर अध्यक्षा महाडिक यांनी सुरक्षा रक्षकास त्या वाहनाच्या चाकांची हवा सोडण्याचा आदेश दिला.

या प्रकरणावरून खोत खवळले. त्यांनी 'मी सीईओंना येथे वाहन लावण्यासंबंधी पत्र दिले आहे,' असे सांगितले. त्यावर महाडिक यांनी सर्वाना नियम सारखेच आहेत. येथे कोणाचीही वाहने पार्किग करता येणार नाही,' असे सांगितले. वाद वाढल्यानंतर टोणपे यांनी हस्तक्षेप केला. टोणपे, खोत यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 'सीईओंना दिलेल्या पत्रावर काय निर्णय झाला,' अशी विचारणा केली. खोत यांनी 'तुम्ही सीईओंनाच विचारा', असे सांगितले. अचानकपणे घडलेला प्रकार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी झाली. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार कक्षातून प्रवेशद्वारात आले. त्यांनी पत्रावर कोणताही निर्णय घेतला नाही, असे स्पष्ट केले. त्यावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर वाद मिटला.

प्रॉटोकॉल डावलल्याचाही राग

चार दिवसापूर्वी जि. प. च्या मेन राजाराम हायस्कूलच्या आवारात आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सॅनिटरी नॅपकिन वेल्डिग मशीनचे उद्घाटन झाले. त्या कार्यक्रमास प्रोटाकॉलनुसार का बोलवले नाही, अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्षा महाडिक यांनी केली. याप्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. आमदार पाटील यांच्या फंडातून मशीन मंजूर झाल्यामुळे अधिकाऱ्यांनाही राजकीय विरोधक असलेल्या महाडिक यांना निमंत्रित करणे अडचणीचे झाले. ते धर्मसंकटात सापडले. त्यानंतर शुक्रवारी आमदार पाटील यांचे समर्थक खोत आणि महाडिक, त्यांच्या समर्थकात खंडाजंगी झाली. त्यामुळे यापुढील काळात संघर्ष तीव्र होणार असल्याची झलक मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीमाभागातील सराईत टोळीला मोक्का

$
0
0

(फोटो आहेत)

सीमाभागातील टोळीला मोक्का

पाच अटकेत; दोघे फरार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दरोडे, अपहरण, मारामारी, चेनस्नॅचिंग असे गंभीर गुन्हे करून सीमाभागात दहशत माजवलेल्या काडय्या-इरय्याच्या टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. नेसरी पोलिस ठाण्याने पाठवलेल्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. या टोळीतील पाच गुंड अटकेत असून, मुख्य सूत्रधार काडय्या याच्यासह दोघे फरार आहेत. नेसरी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी ही माहिती दिली.

काडय्या शिवलिंगय्या पुजारी (वय ३२, रा. बस्तवाड, ता. हुक्केरी. जि. बेळगाव), इरय्या चंदय्या मटपती (३२, रा. हेब्बाळ), गुलाबसाहब आप्पासाहब मुलतानी (५५, रा. हंजानहट्टी, ता. हुक्केरी), कल्लाप्पा बाळाप्पा मेलमपट्टी (रा. इंगळी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), मेहबुब मुलतानी (रा. हंजानहट्टी, ता. हुक्केरी), बसाप्पा उर्फ बसू गुरसिद्धाप्पा किल्लेदार (रा. हिडकल डॅम), परशराम उर्फ परसू केंचाप्पा (रा. बगुडीकट्टी, ता. गडहिंग्लज) या सात जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई होणार आहे. यातील काडय्या आणि कल्लाप्पा हे दोघे फरार आहेत.

काडय्या-इरय्या या टोळीवर पन्नासहून अधिक दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातील हे गुन्हेगार आहेत. चेनस्नॅचिंग, चोऱ्या करणे, लुटणे, डोळ्यात चटणी टाकून लूटमार करणे, अपहरण करणे असे गंभीर गुन्हे दोन्ही राज्यातील पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. हेब्बाळ-जलद्याळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून काढलेली तीन लाख ७० हजारांची रक्कम या टोळीने लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना ही टोळी नेसरी पोलिसांच्या हाती लागली. यातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव नेसरी पोलिसांनी दिला होता. आयजी नांगरे-पाटील यांनी या कारवाईला मंजुरी दिली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्यासह गडहिंग्लज विभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चोरट्यांचा मुक्काम देवळात

काडय्या-इरय्या टोळीतील चोरटे गुन्हा केल्यानंतर घरी जाण्याऐवजी परिसरातील मंदिर आणि मठात राहत होते. हॉटेल किंवा लॉजवरही ते फिरकत नसल्याने पोलिसांना सापडत नव्हते. महाराष्ट्र आणि कर्नाटकात तब्बल पन्नासहून अधिक दरोडे या टोळीने घातल्याचे तपासात समोर आले आहे. महाराष्ट्रात दरोडा घातल्यानंतर कर्नाटकात पळून जायचे आणि कर्नाटकात गुन्हा केल्यानंतर महाराष्ट्रात लपण्याचा फंडा या टोळीतील गुन्हेगारांनी वापरला. या टोळीने चेन स्नॅचिंगचे गुन्हे मोठ्या प्रमाणात केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटाकडील, प्रॅक्टिस अंतिम सामना

$
0
0

फोटो आहे

अटल चषक फुटबॉल स्पर्धा... लोगो

......................

पाटाकडील, प्रॅक्टिसमध्ये उद्या अंतिम लढत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती शाहू स्टेडियम सुरु असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघाने दिलबहार तालीम मंडळ अ संघाचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ अ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात रविवारी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. नेताजी तरुण मंडळ, कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट एनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा खेळवली जात आहे.

स्पर्धेच्या अव्वल साखळी स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने पाच गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केल्याने शुक्रवारच्या दिलबहार आणि प्रॅक्टिस यांच्यातील सामन्याकडे फुटबॉल शौकिनांचे लक्ष होते. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या सामन्यात दिलबहारला गोलफरकासह विजय आवश्यक होता तर प्रॅक्टिसला बरोबरीची गरज होती.

सामन्याच्या पूर्वाधात दिलबहारने खोलवर चढाया केल्या. किरण चौकाशी, निखिल जाधव, इम्यॅन्युअल यांच्या खोलवर चढायामुळे प्रॅक्टिसने बचावत्मक धोरण स्वीकारले. सनी सनगरच्या पासवर करण चव्हाणने गोल नोंदवण्याची सोपी संधी गमावली. ४३ व्या मिनिटाला प्रक्टिसने यशस्वी चढाई केली. उजव्या बगलेतून कैलास पाटीलने गोलरक्षकाला सफाईदारपण चकवत उत्कृष्ट फटक्याव्दारे गोल नोंदवला. हीच आघाडी मध्यंतरापर्यंत टिकली.

उत्तरार्धात दिलबहार संघ बरोबरीसाठी मैदानात उतरला पण प्रॅक्टिसने चढायांचा धडाका कायम ठेवत दिलबहारला डोके वर काढू दिले नाही. ५३ व्या मिनिटाला कैलास पाटीलच्या पासवर राहुल पाटीलने मैदानी गोलची नोंद करत संघाला २-० ची आघाडी मिळवून दिली. दोन गोलच्या पिछाडीमुळे दिलबहारचा खेळ विस्कळीत झाला. त्याचा फायदा घेत ६५ व्या मिनिटला राहुलने दिलबहारची बचावफळी भेदत वैयक्तिक दुसरा व संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. तीन गोलची भक्कम आघाडी टिकवत प्रॅक्टिसने सामना जिंकला.

०००० चौकट

आजचा अनोखा सामना

शाहू रॉयल्स आणि राजाराम वॉरियर्स यांच्यात शनिवारी प्रदर्शनीस सामना खेळवण्यात येणार आहे. खासदार, आमदारांसह पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी सामन्यात खेळणार आहेत. शाहू रॉयल्समध्ये पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाटगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, जयसिंगपूर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, उपवन अधीक्षक प्रभुनाश शुक्ला, अभिनेता हार्दिक जोशी, स्वप्निल राजशेखर, विकास पाटील, आनंद काळे यांचा समावेश आहे. तर राजाराम वॉरिअर्सकडून खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, मालोजीराजे छत्रपती, संदीप देसाई, ऋतुराज पाटील, विश्वेश कोरे, ऋतुराज क्षीरसागर, धैर्यशील माने, नगरसेवक संभाजी जाधव, विजय खाडे, संतोष गायकवाड, राजू साळोखे मैदानात उतरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाचे ११ विभाग तोट्यात,तरीही १० शाखांचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेतकरी सहकारी संघाचे ११ विभाग विविध कारणांनी तोट्यात आहेत. हे विभाग नफ्यात आणून पुन्हा नव्या १० शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे', अशी माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, 'संघ फायद्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचे सकारात्मक बदल जाणवत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे संघाचे मशिनरी, सायकल, रिटेल, मुख्य ऑफीस, भांडी दुकान, शेतकरी पेट्रोल पंप, शेती सेवा केंद्र या विभागासह धामोड, वळीवडे शाखा तोट्यात आहेत. तोट्याचे प्रमाण कमी केले जात आहे. न्यायप्रविष्ट झाल्याने पेट्रोल पंप तोट्यात आहे. इचलकरंजीतील संघाकडे असलेले दुकानगाळे खुले आहेत. तेथे नविन उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेले ते दुकानगाळे दुसऱ्यांना देऊ नयेत यासाठी दोन वर्षापासून दरमहा सहा हजार रूपयांचे भाडे इचलकरंजी नगरपालिकेस भरले जात आहे. त्याचा आर्थिक फटका बसत आहे. याउलट संघातर्फे चालवला जाणारा रूकडी खत कारखाना, मिरचीपुड विभाग, डिझेल विभागामुळे संघास १ कोटी ४० लाखांचा फायदा झाला आहे.'पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

--------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कर्मचाऱ्याला भामट्यांचा गंडा

$
0
0

सरकारी कर्मचाऱ्याचे

३६ हजार लांबवले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये एटीएम पीन चोरून सरकारी कर्मचाऱ्याचे दोन अनोळखी तरुणांनी ३६ हजार रुपये लांबवले. शुक्रवारी (ता. १३) दुपारी बारा ते सव्वाबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत मांगीलाल काळू बागूल (वय ४८, रा. कावळा नाका, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बागूल एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर पाठीमागून आलेल्या दोन तरुणांनी त्यांचा एटीएम कार्डचा पिनकोड चोरला. यानंतर बागूल यांच्या बँक खात्यातील ३६ हजार रुपये त्यांनी काढून पोबारा केला. दोन्ही तरुण निघून गेल्यानंतर काही वेळाने बागूल यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या साहायाने संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाई पठार पर्यटनस्थळ घोषित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मसाई पठार येथील पांडवदरा गुहा आणि कुशिरे पोहाळे येथील बौद्ध लेण्यांचे केंद्रीय पुरातत्व विभागाने संवर्धन करुन त्याचे पर्यटनस्थळात रुपांतर करावे, अशी मागणी जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीच्यावतीने करण्यात आली. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. समितीच्यावतीने २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत मसाई पठार आणि कुशिरे पोहाळे येथे गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाणार आहे. जयंतीच्या कार्यक्रमास बौद्ध बांधवांसाठी पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणीही निवेदनात केली आहे. जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध अवशेषांचा विद्ध्वंस थांबवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मसाई पठार येथील पांडवदरा लेणी आणि कुशिरे पोहाळे येथील लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात अध्यक्ष टी.एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे, अमोल वाडकर, अजित कांबळे, सर्जेराव थोरात, सागर लकडे, रघुनाथ कांबळे, प्रविण कांबळे, सुरेश कुरणे, बाबासाहेब कांबळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाच्या अध्यक्षांना पुन्हा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांची भूविकास बँकेच्या थकबाकीबाबत २७ एप्रिलला म्हणणे मांडण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिले. याबाबतची नोटीस त्यांनी दिली आहे. यामुळे पाटील यांच्या अध्यक्षपदावर पुन्हा एकदा टांगती तलवार निर्माण झाली आहे.

शेतकरी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान पाटील भूविकास बँकेकडील थकीत कर्जाला सहजामिनदार असल्याने त्यांचे पद रद्द करण्याची मागणी सुरेश देसाई यांनी प्रथम जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी जून २०१७ रोजी पाटील यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाला पाटील यांनी हायकोर्टात आव्हान दिले. हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर पाटील यांनी थकीत रक्कम भूविकास बँकेकडे जमा केली. रक्कम जमा केल्यानंतर कोर्टाने जिल्हा उपनिबंधकांचा अपात्रतेचा निर्णय रद्द केला होता. मात्र रक्कम भरल्यानंतर पुन्हा देसाई यांनी हायकोर्टाकडे निवडणुकीदरम्यान पाटील थकबाकीदार असल्याने ते निवडणूक लढवण्यास अपात्र ठरत असल्याचा दावा केला. त्यामुळे पुन्हा फेरसुनावणीला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे कोर्टाने ऐकून घेतले. त्यानंतर कोर्टाने पुन्हा हे प्रकरण जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी अध्यक्ष पाटील यांना २७ एप्रिलला म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: १०वीच्या उत्तरपत्रिका झाल्या गहाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तपासणीसाठी आलेल्या दहावीच्या नऊ उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. मोपेडवरून जाताना भवानी मंडप ते साळोखेनगर दरम्यान उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत. ४ एप्रिलला हा प्रकार घडला असून, ११ एप्रिलला मुख्याध्यापिका भूपाली भूपतसिंह शिंदे यांनी उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची नोंद दाखल केली.

शिंदे यांच्याकडे दहावीच्या आयसीटी विषयाच्या प्रश्नपत्रिका तपासणीसाठी आल्या होत्या. ४ एप्रिलला त्या सकाळी साडेनऊच्या सुमारास भवानी मंडपातील लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधून उत्तरपत्रिका घेऊन मोपेडवरून बाहेर पडल्या. साळोखेनगर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना एकूण उत्तरपत्रिकांपैकी नऊ उत्तरपत्रिका कमी आढळल्या. त्यांनी उत्तरपत्रिकांचा शोध घेतला. मात्र, त्या न सापडल्याने बुधवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात फक्त ५ रुपयांत चपाती-भाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने शाहूपुरीतील विद्या प्रबोधिनी येथे पाच रुपयांत चपाती-भाजी देण्याच्या उपक्रमाची सुरुवात शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. हा उपक्रम गरजूंचे पोट भरणारा ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय झोपडपट्टीतील मुली आणि महिलांसाठी दर सहा महिन्यांनी विनामूल्य दातांचे उपचार करण्याचा उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

पालकमंत्री पाटील म्हाणाले, 'सामाजिक भावनेतून संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने पाच रुपयांत चपाती-भाजी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, निराधार वृद्ध यांची सोय झाली आहे. निराधार वृद्धांसाठी महाविद्यालयीन तरुणांच्या माध्यमातून घरपोच चपाती-भाजी दिली जाईल. यातून विद्यार्थ्यांनाही अर्थार्जनाची संधी मिळेल. हा उपक्रम अधिक दर्जेदार करण्याचा आमचा मानस आहे.' याशिवाय झोपडपट्टीतील महिला आणि मुलींचे दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी दर सहा महिन्यांनी विनामूल्य दंतोपचार करण्याचीही घोषणा मंत्री पाटील यांनी केली. ते म्हणाले, 'गेल्या सहा महिन्यांपूर्वी सामाजिक भावनेतून शहरातील झोपडपट्टीतील मुलींच्या वाकड्या दातांची शस्त्रक्रिया करून दातांना क्लिप लावण्याचा उपक्रम राबविला आहे. यात २२ मुलींच्या दातांना क्लिप बसविण्यात येत आहे. आतापर्यंत १८ मुलींना दातांच्या क्लिप बसविल्या आहेत. यापुढील काळातही हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाईल. दर सहा महिन्याला झोपडपट्टीतील महिला आणि मुलींसाठी विानमूल्य दातांचे उपचार केले जातील.'

पाच रुपयांत चपाती-भाजी उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी दहा रुपये देऊन चपाती-भाजीची दोन पाकिटे खरेदी केली. कार्यक्रमस्थळीच त्यांनी पत्नीसोबत चपाती-भाजी खाऊन त्याच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले. संवेदना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी अंजली चंद्रकांत पाटील, विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, स्थायी समितीचे सभापती आशीष ढवळे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कोल्हापूरचे प्रमुख विजय जाधव, अनंत खासबारदार यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजा परांजपे महोत्सवात आज

$
0
0

महोत्सवातील आजचे सिनेमे

सकाळी १० वाजता : लाखाची गोष्ट

दुपारी एक वाजता : ऊन पाऊस

...........

सायंकाळी पाच वाजता

दोन अंकी नाटक : एक प्रवास मराठी असण्यापासून मराठी होण्यापर्यंतचा

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार

$
0
0

साहित्य संस्कृती लोगो...

लोगो : राजा परांजपे चित्रपट महोत्सव

०००००

फोटो आहेत...

सिनेसृष्टीचा कोल्हापूर हा 'बापमाणूस' ठरावा

राजा परांजपे चित्रपट महोत्सवात कलाकारांच्या भावना; ऑस्करपेक्षा हा पुरस्कार मोठा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी सिनेमा, नाट्य आणि संगीत क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांनी कोल्हापूरविषयी जागविलेल्या आठवणी, त्यांच्या शाब्दिक कोट्यांनी सभागृहात फुललेली हास्याची खसखस, अभिनय क्षेत्रात गायकी घराण्यासारखे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या मा. विनायकांपासून राजा ठाकूर, राजा परांजपे ते सचिन यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सलाम करत कोल्हापुरात राजा परांजपे चित्रपट महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात पुरस्कारप्राप्त कलाकारांनी 'कोल्हापूर हा सिनेसृष्टीचा 'बापमाणूस' ठरावा आणि आम्ही सारे कलाकार या कलानगरीची लेकरी आहोत,' अशा भावना व्यक्त केल्या.

कलाकारांच्या त्या भावस्पर्शी उद्गाराला प्रेक्षागृहाने टाळ्यांचा वर्षाव करत कोल्हापूर आणि सिनेमाचे अतूट नाते आणखी दृढ होईल हेच जणू दाखवून दिले. राजा परांजपे प्रतिष्ठान आणि गुणिदास फाउंडेशन यांच्यातर्फे नववा राजा परांजपे चित्रपट महोत्सव यंदा कोल्हापुरात आयोजित केला आहे. प्रतिष्ठानतर्फे यंदा, अभिनेता संजय नार्वेकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, संगीतकार गायक अवधूत गुप्ते आणि दिग्दर्शक राजेश मापूसकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि महापौर स्वाती यवलुजे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा झाला. गुणिदास फाउंडेशनचे शिरीष सप्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन,नाटक अशा सर्वच क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या राजा परांजपे यांच्या नावाचा पुरस्कार हा आमच्यासाठी ऑस्कर पुरस्कारापेक्षा मोठा असल्याची भावना गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली. अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या, 'माझ्या संपूर्ण कारकिर्दीसाठी राजा परांजपे पुरस्कार मिळाला आहे. राजर्षी शाहूंच्या कलानगरीत महान कलावंतांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण हा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा ठेवा आहे.' अभिनेता संजय नार्वेकर म्हणाले, 'कोल्हापूरशी जुळलेल्या नातेसंबंधांमुळे मी कोल्हापूरचाच झालो आहे. या कलानगरीसाठी काम करण्याची इच्छा आहे. मराठी सिनेसृष्टीचा कोल्हापूर हा बापमाणूस ठरावा आणि सगळे कलाकार या नगरीची लेकरे आहेत.'

कलाकार स्वकर्तबगारीने मोठा झालेला असतो. तो शब्द आणि अभिनयाच्या बळावर नानाविध व्यक्तिरेखा जिवंत करणारा असतो. कलाकारांनी कुणापुढेही झुकू नये, असे आवाहन करत खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'कोल्हापूरला सिनेमाचा मोठा वारसा लाभला आहे. मात्र, दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत सिनेमा आणि नाट्यक्षेत्रात कोल्हापूरची पीछेहाट झाली. ही पीछेहाट भरून काढत कोल्हापूरला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. कलाकारांनी मुंबई आणि कोल्हापूर असा फरक न करता कोल्हापूर हेच सिनेमाचे माहेरघर आहे, या भावनेने काम करावे. संसदेच्या स्थायी समितीच्या 'कल्चरल टुरिझम' कमिटीवर काम करत असताना कोल्हापूरची, महाराष्ट्राची कलापरंपरा केवळ राज्यापुरतीच नव्हे तर राष्ट्रीयपातळीवर पोहोचावी यासाठी दिल्लीदरबारी पाठपुरावा करेन, त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.'

प्रतिष्ठानचे अजय राणे, अर्चना राणे यांनी स्वागत केले. अजय बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिद्रेंच्या मृतदेहाचा ९ ठिकाणी घेणार शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे पत्र्याच्या पेटीतून मीरा भाईंदरच्या खाडीत फेकल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली आहे. त्यानुसार मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी खाडीतील नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत. ओशियन सायन्स अँड सर्व्हायविंग प्रा. लि. या कंपनीने लोखंडसदृश वस्तू आढळून आलेली नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यानुसार शोध घेण्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

बिद्रे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे पत्र्याच्या पेटीत भरून खाडीत टाकल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. पुरावे गोळा करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष मिळवणे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी खासगी कंपन्यांच्या मदतीने अत्याधुनिक साधनांचा वापर करून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शोधण्यासाठी खाडीतील नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत. निश्चित केलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. प्रत्येक ठिकाणी पाच मीटर परिघात व एक मीटर खोल जमिनीत शोध घेतला जाणार आहे. डायव्हर मॅनोमीटर उपकरणाच्या माध्यमातून पाच मीटर परिघात व एक मीटर खोल गाळात लोखंडसदृश वस्तू नेमकी कुठे आहे, याचा शोध घेणे सुलभ होणार असल्याने नवी मुंबई पोलिसांनी या उपकरणासह शोध घेऊ शकणाऱ्या कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहे. डायव्हर मॅनोमीटर उपकरण इराकमध्ये आहे. त्याच्या माध्यमातून पुढील आठवड्यात मीरा भाईंदरच्या खाडीत या उपकरणाच्या मदतीने शोधमोहीम सुरू होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत सुरक्षाभिंत कोसळली

$
0
0

कारच्या धडकेत

संरक्षक भिंत कोसळली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कावळा नाका ते धैर्यप्रसाद हॉल या मार्गावर भरधाव कारच्या आडवे कुत्रे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार घराच्या संरक्षक भिंतीला धडकली. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरक्षा भिंत कोसळून कारचे आणि भिंतीचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेत कारमधील अभिषेक अजय सिंग (वय १८, रा. बसंती निवास, ताराबाई पार्क) जखमी झाला. याबाबत कारचालक अजय राम सिंगविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राम सिंग (५०, रा. बसंती पार्क, ताराबाईपार्क) यांच्या मालकीची कार (एम.एच. ०९ बी.डब्ल्यू. ९७७९) घेऊन भाऊ अजय सिंग हा शनिवारी पहाटे मुलगा अभिषेकसह पुण्याला निघाला होता. धैर्यप्रसाद हॉल ते कावळा नाका मार्गावर अचानक कुत्रे आडवे आल्याने चालक अजय सिंगचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार फुटपाथवरून पुढे जाऊन रवी संघवी यांच्या घराच्या संरक्षक भिंतीला धडकली. धडकेत संरक्षक भिंत कोसळली, तर कारचालक अजय यांचा मुलगा अभिषेक किरकोळ जखमी झाला. कार आणि भिंतीचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत कारमालक संजय सिंग यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात वर्दी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images