Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लोकअदालत

$
0
0

लोकअदालत २२ रोजी

कोल्हापूर: राष्ट्रीय लोकअदालतीचे २२ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व तडजोड योग्य फौजदारी खटले, मोटार अपघात खटले तसेच दाखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी कळवले आहे. सर्व बँका, पतसंस्था, विमा कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांनी लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशनचे दावे ठेवायचे असतील, त्यांनी कागदपत्रासह १३ एप्रिलपर्यंत सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर येणारे कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत असेही मोरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोष्टरमधील त्रुटींच्याचौकशीचे आश्वासन

$
0
0

शिक्षक भरतीची

चौकशी होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान रोष्टर डावलल्याच्या निषेधार्थ येथील खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघातर्फे जि. प. समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भरतीदरम्यान राबविलेल्या रोष्टर प्रक्रियेची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बिंदूनामावली तयार करताना निवड यादी केली नाही, निवड प्रवर्ग केला नाही, पुरावे गहाळ करण्यात आले, अशा त्रुटी आंदोलकांनी प्रशासनासमोर मांडल्या. आरक्षित प्रवर्गामध्ये निवड झालेल्या शिक्षकांची नावे खुल्या प्रवर्गात घुसडण्यात आली आहेत. वस्तीशाळा शिक्षकांचे बिंदू निश्चित करताना सरकारी निर्णयाकडे सोयीस्कपणे दूर्लक्ष केले. यामुळे खुल्या प्रवर्गातील शिक्षकांवर अन्याय झाला आहे. भरती प्रक्रियेवेळी खुल्या गटातील उमेदवारांना संधी मिळणार नाही. यामुळे रोष्टरमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महासंघातर्फे ठिय्या आंदोलन केले. त्रुटीच्या चौकशी १५ दिवसांत करण्याचे पत्र प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात जयकुमार पाटील, राजेंद्र कागले, धनाजी भोपळे, राहुल पाटील, संतोष वाईंकडे, सूर्यकांत डवर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

०००००००

मूळ कॉपी

०००००००००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघातर्फे प्राथमिक शिक्षण प्रशासनातील बिंदूनामावलीतील (रोष्टर) त्रुटी दूर करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. रोष्टर प्रक्रियेची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बिंदू नामावली तयार करताना निवड यादी केली नाही, निवड प्रवर्ग केला नाही, पुरावे गहाळ केल्या अशा त्रुटी प्रशासनाने ठेवल्या आहेत. आरक्षित प्रवर्गामध्ये निवड झालेल्या शिक्षकांची नावे खुल्या प्रवर्गात घुसडण्यात आली आहेत. वस्तीशाळा शिक्षकांचे बिंदू निश्चित करताना सरकारी निर्णयाकडे सोयीस्कपणे दूर्लक्ष केले. यामुळे खुल्या प्रवर्गातील शिक्षकांवर अन्याय झाला आहे. भरती प्रक्रियेवेळी खुल्या गटातील उमेदवारांना संधी मिळणार नाही. यामुळे रोष्टरमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महासंघातर्फे ठिय्या आंदोलन केले. त्रुटीच्या चौकशी १५ दिवसात करण्याचे पत्र प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात जयकुमार पाटील, राजेंद्र कागले, धनाजी भोपळे, राहूल पाटील, संतोष वाईंकडे, सूर्यकांत डवर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती हाराला गुलाल

$
0
0

शुभेच्छांच्या हाराला गुलाल कसा?

आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण. शुभेच्छा देण्यासाठी फलक, विविध उपक्रम राबविण्यासाठी चढाओढ लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात आधी जाऊन बुके देऊन किंवा हार घालून शुभेच्छा देण्यात कार्यकर्ते पुढे असतात. वाढदिवसाला हार घालून,बुके देऊन शुभेच्छा देण्याची पद्धत राजकीय नेत्याकडून गल्लीबोळात रुजली आहे. पण मित्राच्या वाढदिवसाला हार घालण्यासाठी काही टोळकी भन्नाट कल्पना वापरतात. नदीजवळ वास्तव्यास असलेल्या मित्राला मोबाइलवर फोन करुन हार घेऊन येण्यास सांगतात. मित्राने आणलेला हार गुलालात रंगलेला असतो. मित्राला हार घातल्यावर कोणीतरी हाराला गुलाल कसा असा प्रश्न केला की 'अरे हार जोतिबाचा हाय रे' असे सांगून वेळ मारुन नेली जाते. पण प्रत्यक्षात हार नदीवरुन आणला जात असल्याची कुणकुण काही जणांना लागली आणि 'हार नको, बुके दे' अशी प्रेमळ सादही घातली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर जनकल्यासाठी व्हावा

$
0
0

विज्ञानाचा वापर जनकल्याणासाठी व्हावा

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. डी. वाय. पाटील यांना सा. रे. पाटील समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार प्रदान

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

'सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांची वजाबाकी अशी शिक्षणपद्धती अवलंबणे गरजेचे आहे. नवे तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी ते उपद्रव बनत आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर, प्रचार व प्रसार जनकल्याणासाठी झाला पाहिजे,' असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले. शिरोळ येथे श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते यावर्षीचा समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

रोख एक लाख एक हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार सतेज पाटील, राजू कागे, माजी खासदार निवेदिता माने, कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार काका पाटील, कल्लाप्पाण्णा मग्गेण्णावर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, शिरोळच्या सरपंच सुवर्णा कोळी, अशोकराव कोळेकर प्रमुख उपस्थित होते.

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, 'स्व. सा. रे. पाटील यांनी शेतक-यांच्या हितासाठीच नेहमीच कार्य राहिले. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दत्त उद्योग समूहाचा परिसर फुलविला. साखर कारखाना हा त्यांच्या कर्तृत्वाचा साक्ष देतो. साहित्य, कला व ध्येयवाद असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा वसा व वारसा त्यांचे पुत्र गणपतराव पाटील चालवत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य अतुलनीय आहे. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून ते जनमानसात चिरंतन राहणार आहे. जग झपाट्याने बदलत आहे. नवे तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी ते उपद्रव बनत आहे. देशासमोर संभाव्य धोके व उपाययोजना याबाबत सहकार व शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर चर्चासत्रे घडविली पाहिजेत.'

दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, 'स्व. सा. रे. पाटील यांचे आचार-विचार जोपासत शिरोळ तालुका कॅन्सरमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. गो-परिक्रमा, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, क्षारपडमुक्त जमीन असे उपक्रम दत्त उद्योग समूहाने हाती घेतले आहेत. तालुक्यातील १८ हजार एकर जमीन क्षारपड आहे. त्यातील वर्षभरात नऊ हजार एकर जमीन क्षारपडमुक्त होऊन वर्षाला अंदाजे ७० ते ८० कोटी रुपयांचे उत्पन्न या जमिनीतून घेतले जाईल.'

सत्काराला उत्तर देताना डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून संस्था सुरू केल्याचा मला सार्थ अभिमान आहे. राजकारणात फार वेळ न राहता राज्यपाल होण्याचे माझे स्वप्न होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व सोनिया गांधी यांच्यामुळे ते पूर्ण झाले. राज्यपाल असताना महिन्याच्या साडेतीन लाख रुपये पगारातील फक्त एक रुपया पगार घेतला. आमदार असतानाही एक रुपयाच पगार घेतला. आज मिळालेल्या पुरस्काराची रक्कम तालुक्यातील मूकबधिर सेवाभावी संस्थांना देत आहे.'

माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, 'स्व. सा. रे. पाटील यांचे शिरोळ परिसरात समाजविकासाचे केलेले काम अत्यंत लक्षणीय आहे. समाजाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. यावर्षीचा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला आहे.'

ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनीही मनोगत व्यक्त केले. विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. बाळ महाराज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजश्री पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी मासिक इंद्रधनुष्यच्या कॅन्सर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सीमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य बंडा माने यांनी आभार मानले.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सीदगोंडा पाटील, संचालक अनिल यादव, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव बी. बी. शिंदे, नगरसेवक सर्जेराव पवार, शीतल गतारे, नितीन बागे, संगीता पाटील-चिंचवाडकर, प्रेमला मुरगुंडे, युनूस डांगे, संजय पाटील-कोथळीकर, मिलिंद शिंदे, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, मिनाज जमादार, माजी पं. स. सभापती सुवर्णा अपराज, सर्जेराव शिंदे, फारुखभाई पठाण यांच्यासह दत्त उद्योग समूहातील पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्काराची रक्कम

सामाजिक संस्थांना

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी एक लाख एक हजार १११ रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन डॉ. पाटील यांना सन्मानित केले. यावेळी डॉ. पाटील यांनी पुरस्काराची रक्कम शिरोळ तालुक्यात अंध, मूकबधिरांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांना देण्यात यावी अशी घोषणा केली.

०००००

फोटो ओळ...

शिरोळ येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित गणपतराव पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, सुरेश द्वादशीवार, आमदार उल्हास पाटील, सतेज पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, आदी. (छाया : शशांक घोरपडे, जयसिंगपूर)

०००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा हल्लाबोल आजपासून

$
0
0

राष्ट्रवादीच्या नेत्यांची विविध ठिकाणी सभा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप शिवसेनेच्या साडेतीन वर्षांच्या अकार्यक्षम कामकाजाविरोधात सोमवारपासून दोन दिवस जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे हल्लाबोल आंदोलन केले जाईल. दसरा चौकात सायंकाळी सहा वाजता सभा होणार असून सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत भाजपने राज्यात, केंद्रात सत्ता मिळवली. साडेतीन वर्षे झाल्यानंतरही प्रत्यक्षात अच्छे दिन आलेले नाहीत. प्रचंड महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. चुकीच्या धोरणामुळे उद्योगधंदे अडचणीत आहेत. वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यामुळे सरकारविरोधात जनतेत प्रचंड असंतोष आहे. सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षातर्फे विविध टप्यात आंदोलन केले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्यातील हल्लाबोल आंदोलन सोमवारपासून सुरू होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रवादीचे नेते अंबाबाईचे दर्शन घेतील. सकाळी १० वाजता मूरगूड येथे सभा होईल. दुपारी एक वाजता माजी आमदार के. पी. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी तीन वाजता गारगोटी येथे सभा होईल. सायंकाळी सहा वाजता दसरा चौकातील सभेला प्रारंभ होईल. या सभेला शहर, हातकणंगले, गगनबावडा, पन्हाळा, करवीर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित राहतील.

मंगळवारी सकाळी १० वाजता नेसरीत सभा होईल. दुपारी साडेबारा वाजता आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कानडेवाडी निवास्थानी नेते भेट देतील. सायंकाळी साडे चार वाजता येथील शासकीय विश्रामगृहात मुंडे, पवार यांची पत्रकार परिषद होईल. सायंकाळी ५ वाजता जयसिंगपुरात सभा होईल. हल्लाबोल आंदोलनात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत पक्षाची महत्त्वाची बैठक असल्याने खासदार धनंजय महाडिक आंदोलन सहभागी होणार नाहीत. पत्रकार परिषदेस आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदील फरास, संगीता खाडे आदी उपस्थित होते.

सरकारविरोधात रान उठवणार

राज्यातील विविध ठिकाणी राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रातही हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी पक्षाने व्यापक नियोजन केले आहे. तिसऱ्या टप्यातील हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरपासून होत आहे. या आंदोलनातून सरकारच्या विरोधात रान उठवले जाईल. आंदोलनात अंतर्गंत गटतट बाजूला ठेवत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील, असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसाला मारहाण

$
0
0

वाहतूक नियम तोडणारे दोघे ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलिस नाईक संजय पवार यांना दोघांनी रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास मारहाण केली. याप्रकरणी सुलतान अकबरअली सय्यद आणि झाकीर ताहीर हुसेन सय्यद (दोघे रा. जवाहनगर) या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिनस टॉकीस येथे पोलिस नाईक संजय पवार ड्युटीवर होते. सात वाजण्याच्या सुमारास दसरा चौकातून आलेला टेम्पो उजवीकडे लक्ष्मीपुरीकडे वळू लागल्यावर पवार यांनी चालकास इशारा करून अडविले. त्यांनी टेम्पोचा चालक दिलावर रजाक मकानदार (रा. हुपरी, ता. हातकणंगले) याला उजवीकडे वाहन वळवता येत नाही, असे स्पष्ट करुन नियम तोडल्याप्रकरणी दंड भरावा लागेल असे सांगितले. तसेच त्यांनी चालक मकानदारकडे लायसन्सची मागणी केली. चालक मकानदार याने लायसन्स नसल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी टेम्पो ताब्यात घेऊन रस्त्याच्या कडेला लावला. दरम्यान चालक मकानदार याने टेम्पो मालकांना मोबाइलवर कॉल करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर चालक मकानदार व्हिनस चौकातून पसार झाला.

रात्री साडेसातच्या सुमारास टेम्पोचा मालक सुलतान सय्यद आणि झाकीर सय्यद व्हिनस चौकात आले. त्यांनी टेम्पो ताब्यात घेऊन नेण्याचा प्रयत्न करताच पोलिस नाईक पवार यांनी दोघांना रोखले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. सुलतान आणि झाकीरने पवार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पवार यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले व शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पवार यांनी दोघांविरोधात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुलतान सय्यद आणि झाकीर सय्यदला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या ...

$
0
0

विहिरीत उडी घेऊन

महिलेची मुलासह आत्महत्या

जत तालुक्यातील अमृतवाडी येथील दुर्घटना

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली : जत तालुक्यातील अमृतवाडी येथे कौटुंबीक वादातून शनिवारी रात्री चार वर्षांच्या मुलासह महिलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) आणि आशिष (वय चार वर्षे)अशी त्यांची नावे आहेत. रविवारी विहिरीतील पाण्याचा उपसा करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

कर्नाटकातील देसारहट्टी (ता. अथणी) माहेर असलेल्या प्रियांकाचा दहा वर्षांपूर्वी अमृतवाडीतील रामचंद्र बाबर याच्याशी विवाह झाला होता. मुलगी ऐश्वर्या (७ वर्षे), मुलगा आशिष या दोन अपत्यांसह ते राहत होते. पती रामचंद्र हे शेती करतात. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. प्रियांका रागाच्या भरात आशिषला घेऊन घराबाहेर पडली. तिने मुलासह गावातील कृष्णा बाबर यांच्या विहिरीत उडी टाकली. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. परंतु गावात भारनियमन सुरू असल्याने पाणी उपसा करणे शक्य न झाल्याने मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही. तरीही ग्रामस्थांनी विविध प्रयत्न सुरू ठेवले होते. सुमारे ऐंशी फूट खोल असलेल्या विहिरीत २७ फुटापर्यंत पाणी होते, शिवाय त्या विहिरीला पायऱ्या नसल्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही. अखेर रविवारी सकाळी पाणीउपसा करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यमंत्री कांबळे

$
0
0

'विहिरीसाठी जागेची अट

शिथिल करण्याचा विचार'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरीसाठी असलेली किमान एक एकर जागेची अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा सरकारचा विचार आहे,' असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाउस येथे आयोजित केलेल्या बैठकीत राज्यमंत्री कांबळे बोलत होते. बैठकीस समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार सुनील शेरखाने तसेच समाजकल्याण विभागाचे निरीक्षक संजय पवार उपस्थित होते.

राज्यमंत्री कांबळे म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरीसाठी सध्या लाभार्थ्यासाठी किमान एक एकर जागेची अट आहे. त्यामुळे एक एकरापेक्षा कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन या योजनेसाठी किमान एक एकर क्षेत्राची असलेली अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा विचार आहे. मात्र, ज्यांचे क्षेत्र एक एकरापेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेत प्राधान्य राहील.'

सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी दुधाळ जनावरे व शेळी गट पालनाची योजना आहे. या योजनेंतर्गत सध्या दहा शेळ्यांच्या गटासाठी अनुदान दिले जाते. ही मर्यादा वाढवून २० शेळ्यांच्या गटासाठी अनुदान देण्याचा प्रयत्न आहे, अशी ग्वाहीही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी लहान-मोठे उद्योग उभारणीसाठी सहकारी संस्थांशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात सरकार पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.

'शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये. शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज आठ दिवसांत तपासणी पूर्ण करून समाजकल्याण विभागास देण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना करावी, महाविद्यालयस्तरावर एकही अर्ज प्रलंबित राहू नये, यासाठी पाठपुरावा करावा. वर्षभरात जिल्ह्यात ४२ कोटींची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे,' असे मंत्री कांबळे यांनी सांगितले. सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसचालकाला दुचाकीस्वाराची मारहाण

$
0
0

बसचालकाला मारहाण

शाहूवाडी : बसच्या आडवी असणारी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका दुचाकीस्वाराने एसटी बसचालक प्रकाश लहू सुतार (रा. मलकापूर, ता. शाहूवाडी) यांना बसमधून खाली ओढून लथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी येळवणजुगाई-मलकापूर (ता. शाहूवाडी) रस्त्यावरील येळवणजुगाई जवळच्या वळणावर घडली. संदीप धनवडे (रा. गेळवडे, ता. शाहूवाडी) याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक धनाजी सराटे हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची वसुली ३०० कोटींवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

३१ मार्चअखेर झालेला कराचा भरणा तसेच सरकारकडून आलेल्या निधीच्या जोरावर महापालिकेने ३०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला. मुद्रांक शुल्क तसेच सरकार निधी असा १४ कोटी रुपयांच्या जमा होणाऱ्या महसुलामुळे हा टप्पा गाठला जाण्यास मदत होणार आहे. यानंतरही महसुलाच्या अंदाजापेक्षा तब्बल ९२ कोटी रुपयांची तूट येणार आहे.

गेल्या अर्थसंकल्पामध्ये महासभेने ३९७ कोटी रुपयांचा महसूल जमा होईल, असा अंदाज बांधला होता. तर प्रशासनाने ३३५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे स्थायी समितीसमोर मांडले होते. मार्च अखेरीस २९१ कोटी रुपये जमा झाले. मुद्रांक शुल्क दहा कोटी व चार कोटीचा सरकार निधी सोमवारी जमा होणार असल्याने ३०५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे दिसणार आहे.

वर्षभर महापालिकेकडून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. प्रत्यक्षात फेब्रुवारीपासूनच वसुलीची मोहीम राबवण्यात आली. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनीही उत्पन्न वाढीसाठी सक्त सूचना दिल्यानंतर घरफाळा, पाणीपट्टीची थकबाकी वसुली मोहीम वेगाने सुरू झाली. घरफाळा विभागाला ५४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी त्यांनी ५२ कोटी रुपयांची वसुली केली. पाणीपुरवठा विभागाने ५१ कोटीच्या उद्दिष्टापैकी ४१ कोटी ६१ लाख रुपयांची वसुली केली.

या दोन विभागांबरोबर नगररचना व इस्टेट विभागाकडून मोठे उत्पन्न अपेक्षित होते. त्यातील नगररचना विभागाने निम्मे उद्दिष्ट गाठले होते. त्यांनी ५४ कोटी उद्दिष्टापैकी ३९ कोटीवर महसूल जमा केला. पण इस्टेट विभाग बारा टक्क्यावरच थबकला. ३३ कोटी ५८ लाख उद्दिष्ट असलेल्या या विभागाकडून अवघा साडेचार कोटीपर्यंतच महसूल मिळाला. याशिवाय अन्य छोटे उत्पन्न असलेल्या विभागाकडूनही पुर्ण वसुली होऊ शकली नाही. परिणामी प्रशासनाने सादर केलेल्या ३३५ कोटी रुपयांच्या अंदाजापर्यंतही उत्पन्न जमा होऊ शकले नाही. महासभेने मंजुरी दिलेल्या उत्पन्नात तब्बल ९२ कोटी रुपयांची तूट आली आहे. नवीन आर्थिक वर्षात साहजिकच विभागांना गेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्तीचे उद्दिष्ट आहे. ते गाठण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा पाठपुरावा

$
0
0

अपेक्षांना बजेटमध्ये स्थान

'मटा'ने मांडलेल्या विषयांचा अर्थसंकल्पात समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतुकीच्या कोंडीमध्ये सापडलेल्या शहरासाठी नवीन रस्ते, पार्किंगची अद्ययावत सुविधा, शहरवासियांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेला सेफ सिटी प्रकल्प, पर्यटक व भाविकांसाठी बिंदू चौकातील मॉडेल पादचारी मार्ग, भक्त निवास, पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाचे संवर्धन, कचरा निर्गतीकरण, ड्रेनेज लाइन, खुल्या जागांचा विकास या साऱ्यांची आवश्यकता 'महाराष्ट्र टाइम्स' ने सातत्याने मांडली. शहरवासियांनीही 'महाराष्ट्र टाइम्स' च्या 'आपलं बजेट, आपलं कोल्हापूर' या उपक्रमांतर्गत याबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. शहराची निकड लक्षात घेऊन महापालिकेला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकल्पांचा समावेश करावा लागला.

वाहतूक कोंडी ही शहरातील मोठी समस्या आहे. पार्किंगअभावी चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. त्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक खोळंबते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी विकास आराखड्यात नियोजित केलेले रस्ते तयार करणे व पार्किंगची अद्ययावत व्यवस्था करण्याची नितांत आवश्यकता होती. या समस्येमुळे होणारे नागरिकांचे हाल 'महाराष्ट्र टाइम्स' ने मांडले होते. अनेक रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी, वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण याचे गांभीर्यही मांडले होते. शहरवासियांनी 'आपलं बजेट, आपलं कोल्हापूर' या उपक्रमामध्येही रस्त्यांची रुंदी वाढवणे व पार्किंगची व्यवस्था करण्याबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार अर्थसंकल्पामध्ये पार्किंग व डीपी रोड विकसीत करण्याचे मुद्दे समाविष्ट केले. सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेफ सिटीचा प्रकल्प महत्त्वाचा आहे. अनेक उपनगरांमध्येही त्याबाबतची व्यवस्था करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सेफ सिटी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे.

अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक शहरात येतात. या संख्येमुळे दिशादर्शक फलक, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था असे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची नीट व्यवस्था नसल्याने भाविक, पर्यटकांचे शहराबाबत नकारात्मक मत तयार होत होते. त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार विविध खुल्या जागांवर भक्त निवास, पार्किंगसारखे प्रकल्प राबवण्याची गरज मांडण्यात आली होती. शहरातील पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. रंकाळ्यामध्ये मिसळणारे सांडपाणी, वाढणारी जलपर्णी, खिळखिळी झालेली संरक्षक भिंत या साऱ्यातून रंकाळ्याची दुरवस्था झाली होती. रंकाळा वाचला तर शहरातील पर्यटनाचे केंद्र वाचेल हे मांडत महापालिकेला रंकाळा संवर्धनासाठी भाग पाडले. त्यानुसार सरकारकडून काही निधी मंजूर करून आणला आहे. संवर्धनाचे काम केल्यानंतर सुशोभीकरणाचा पुढील टप्पा हाती घेण्यास काहीच अडचण येणार नाही.

\B

अंमलबजावणीची हमी\B

गेल्या काही वर्षांपासून कचरा, गटार हे शहरवासियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बनले आहेत. महापालिकेकडून अनेक भागात गटारी केल्या नसल्याने तिथे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. कोंडाळ्यांमध्ये साठलेले कचऱ्याचे ढीग तर साऱ्या शहराचा प्रश्न बनला आहे. नागरिकांनी याबाबत सक्षम व्यवस्था कार्यरत करण्याची मागणी केली होती. 'महाराष्ट्र टाइम्स' ने याबाबत सातत्याने आवाज उठवत प्रश्नांची गंभीरता नगरसेवक व प्रशासनासमोर मांडली होती. सामान्य नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार यंदाच्या अर्थसंकल्पात काही नवीन प्रकल्प राबवण्याची घोषणा केली. तर जुन्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची हमी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ऑपरेशन ‘सलोखा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोरेगाव भीमा दंगलीनंतर शहरात उद्भवलेली दंगलसदृश्य परिस्थिती, संभाजी भिडे यांच्या समर्थनात निघालेला मोर्चा या पार्श्वभूमीवर पारंपरिक शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी होण्यासाठी शहर पोलिसांकडून ऑपरेशन सामाजिक सलोखा अभियान राबवण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, पोलिस प्रशासनाच्यावतीने दिली.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असून १७ एप्रिल रोजी पारंपरिक शिवजयंती आहे. कोल्हापूर शहरात आंबेडकर जयंती व पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त शहरात आठवडाभवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच जयंतीदिनी मिरवणुकांचे आयोजन केले जाते. यापूर्वी दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्साहात व शांततेत साजरा झाल्या आहेत.

२०१८ मध्ये कोरगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात उमटले. गुजरी, शाहूपुरी, सीपीआर चौक परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना अश्रूधुरांचे नळकांडे फोडावे लागले होते. दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने करण्यात आले. या मागणीच्या विरोधात आणि संभाजी भिडे यांच्या समर्थनात गेल्या आठवड्यात कोल्हापुरात हिंदुत्त्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. कोरगाव भीमा घटनेचे पडसाद पुन्हा उमटू नयेत, यासाठी पोलिस दलाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

पारंपरिक शिवजयंती आणि डॉ. आंबेडकर जयंती एकाच आठवड्यात साजरी होणार आहे. पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली आहे. तसेच कोरेगाव भीमा घटनेनंतर घडलेल्या हिंसाचारात अटक केलेल्या संशयितांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवण्यात येणार आहेत. तसेच शहरातील काही गुन्हेगारी टोळ्यांना शहरातून हद्दपारही केले जाणार आहे.

कोल्हापूर ही शाहू नगरी असून यापूर्वी दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जयंती शांततेत साजरा झाल्या आहेत. तरीही विविध जाती धर्मात काही घटनामुळे निर्माण झालेली तेढ कमी करण्यासाठी पोलिसांकडून सामाजिक सलोख्यासाठी बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.

डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उप अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी कामगारांच्याकडे चौकशी

$
0
0

बलात्कारप्रकरणी

कामगारांकडे चौकशी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी रविवारी परराज्यातील चार ते पाच कामगारांकडे चौकशी केली. तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

पीडित मुलगी तीन महिन्यांपूर्वी राजारामपुरीत भाड्याच्या घरात रहात होती. शाळेत जाताना एक तरुण तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्या तरुणाने मुलीला फूस लावून बलात्कार केला. दरम्यान पिडीत मुलीच्या कुटुंबानी राजारामपुरीतील घर बदलून उपनगरात रहायला गेल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परराज्यातील चार ते पाच तरुणांकडे चौकशी केली. तसेच पीडित मुलीकडून फसवणाऱ्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात रेडिरेकनरचे दर जैसे थे

$
0
0

'रेडीरेकनर'चा व्यावसायिकांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने खुली जागा, निवासी जागेचा रेडिरेकनच्या दरात या वर्षी कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी तेच दर आकारले जाणार आहेत. जमीन व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी रेडिरेकरच्या दरात आठ ते दहा टक्के वाढ करून एक एप्रिल रोजी दर जाहीर केले जातात. या वर्षी बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीचा विचार करून 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. रेडिरेकरचे दर वाढल्यास स्टॅम्प ड्युटी, महापालिका चार्जेस, इन्कमटॅक्समध्ये वाढ होते. त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसतो. दर कायम ठेवल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील प्रमुख भागातील रेडिरेकनचे दर असे :

००

रेडिरेकनरचे चौरस मीटरचे दर

ठिकाण, खुली जागा निवासी दर (रुपये)

भाऊसिंगजी रोड ते भवानी मंडप ५४०९०, ५६४७०

व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर चौक ४१६९०, ४७४८०

शाहूपुरी व्यापारी पेठ परिसर ३५७२०, ४७०२०

दाभोळकर चौक ते महादेव मंदिर, ताराराणी चौक परिसर ४८३८०, ५२३५०

महाद्वार रोड मुख्य रोड ५१७००, ४९९५०

गुजरी ते जोतिबा रोड ५०६००, ५५२७०

भेंडे गल्ली परिसर ४८६८०, ५१०७०

ताराबाई रोड ते वरुणतीर्थ वेस परिसर २४३१०, ३८८००

महाद्वार रोड ते खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर ३८०८०, ४२०००

बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी ४२३८०, ४२२५०

०००

राजारामपुरी मेन रोड ४४१९०, ४७९४०

प्रतिभानगर, शास्त्रीनगर परिसर १०३४०, ३९६५०

खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज परिसर २०५००, ४४६००

साकोली कॉर्नर ते रंकाळा १६०१०, ३८२००

फिरंगाई परिसर (शिवाजी पेठ) १३२००, ३६११०

रुईकर कॉलनी परिसर १९२५०, ४२५००

हिंमतबहाद्दूर परिसर, सरलष्कर पार्क १८८५०, ४३९८०

००

बेलबाग परिसर ८७२०, ३१३५०

सुभाषनगर परिसर ५७५०, ३१३००

बाबा जरगनगर मेन रोड ५०१०, ३००३०

असेब्ली रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय २५७४०, ४६४६०

माळी कॉलनी, टाकाळा परिसर १४०५०, ३९०००

शिवाजी पार्क परिसर २२९९०, ४२६२०

मार्केट यार्ड जाधववाडी परिसर ७८३०, ३७६४०

शाहू व शिवाजी स्टेडियम परिसर १०४७०, ३१३८०

गोखले महाविद्यालय परिसर १३९६०, ३३६९०

बिंदू चौक, मिरजकर तिकटी परिसर ३४२३०, ३६२९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांत चोरीचा छडा

$
0
0

चार दिवसांत चोरीचा छडा

साडेचार किलो चांदीसह सव्वादोन लाखाचा मुद्दमाल चोरट्यांकडून हस्तगत

दोन फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी पोलिसांनी चार दिवसांत चोरीचा छडा लावत संशयित नागेश बसवराज गोविंदे (वय २४, रा. वळसंग, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) या चोरट्याला अटक केली. चोरट्याकडून पोलिसांनी एक लाख ९० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू , ३५ हजार रुपये किंमतीचे घड्याळ असा अंदाजे सव्वादोन लाखाचा माल हस्तगत केला.

शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी याबाबतची माहिती दिली. ताराबाई पार्क येथील विजय आप्पासाहेब भोसले (६८, रा. सुलोचना गार्डन होम्स, दुसरा मजला, सरदार कॉलनी, आकाशवाणीसमोर) हे कामानिमित्त २८ मार्च रोजी फ्लॅट बंद करून बाहेर गेले असता चोरट्याने दाराचे लॅच उघडून घरात प्रवेश केला. चोरट्याने लोखंडी तिजोरी आणि लाकडी कपाटातील चांदीचे दागिने, तसेच भिंतीवरील घड्याळ चोरून नेले. भोसले यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिल्यानंतर तपासाला सुरुवात केली.

दरम्यान पोलिसांना एक व्यक्ती घड्याळी विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बीटी कॉलेज परिसरात संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घड्याळ घेऊन आलेल्या नागेश गोविंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चांदीची मोठी समई, मोठा तांब्या, चार ताटे, सहा वाट्या, अत्तरदाणी, सात देवतांच्या मूर्ती, छत्री असा चार किलो ६०० किलो ग्रॅमच्या वस्तू जप्त केल्या. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, दिवाकर होवाळे, बजरंग हेब्बाळकर, निलेश साळुंखे, राजेश बरगाले, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, विशाल चौगुले, दिगंबर पाटील, विजय इंगळे हे कर्मचारी तपासात सहभागी झाले होते.

तीन महिने करत होता चोरी

सुलोचना गार्डन येथे सहा फ्लॅटपैकी तीन बंगल्यात नोकर आहेत. फिर्यादी भोसले यांच्या घरी त्यांची मुलगी व नातू राहतात. चोरीचा तपास करताना पोलिसांनी फ्लॅटमध्ये काम करणाऱ्या नोकरांकडे तपास सुरू केला. सुलोचना गार्डन येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांचा फ्लॅट असून नागेश गोविंदे चार महिन्यांपूर्वी काम करत होता, अशी माहिती मिळाली. अधूनमधून तो अन्य सहकाऱ्यांना भेटण्यास येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नागेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान एक व्यक्ती घड्याळाची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. भोसले यांच्या घरातून घड्याळ चोरीस गेले असल्याने तीच व्यक्ती चोरटा असावा अशी पोलिसांना शंका आली. पोलिसांनी सापळा रचून नागेशला ताब्यात घेतल्यानंतर चोरीची कबुली दिली. नागेशने तीन महिन्यांच्या कालावधीत अनेकवेळा भोसले यांच्या दाराचे लॅच कंगवा अथवा अन्य वस्तूने काढून त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन वस्तू लांबवत होता. चोरी केलेल्या वस्तू घेऊन तो गावी जाणार होता. पण तत्पुर्वीच पोलिसांना त्याला अटक केली. नागेश अविवाहित असून त्याला दारु व गांजाचे व्यसन आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने तो चोरी करत होता, असे तपासात पुढे आले आहे. तो नेसरी येथे कुपेकराच्या घरात नोकर म्हणून काम करत होता. चार महिन्यांपूर्वी कुपेकर यांनी त्याला कामावरुन काढून टाकले होते, असे पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष निवडी बिनविरोध

$
0
0

विद्यापीठ लोगो वापरावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या विद्याशाखांमधील अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये १८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सहा जागा रिक्त राहिल्या आहेत.

यामध्ये प्रा. डॉ. एस. एच. ठकार (गणित), डी. एन. काशीद (संख्याशास्त्र), पी. एस. पाटील (पदार्थविज्ञान), जी. एस. गोकावी (केमिस्ट्री अँड केमिकल इंजिनीअरिंग), अख्तर मोहंमद शेख (इलेक्ट्रॉनिक्स), डी. के. गायकवाड (वनस्पतीशास्त्र), संभाजी शिंदे (भूगोल व भूगर्भशास्त्र),अशोक पिसे (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), एस. व्ही. काळेबाग (शिक्षणशास्त्र), हरिनाथ मोरे (फार्मसी), ए. एम. गुरव (कॉमर्स), सारंग भोला (मॅनेजमेंट),एस. एस. महाजन (अकाउंटन्सी), डी. के. मोरे (बिझनेस इकॉनॉमिक्स), संभाजी भांबर(इंग्लिश व लिंग्विस्टीक), भारती पाटील (राज्यशास्त्र), अवनीश पाटील(इतिहास) यांची निवड बिनविरोध झाली.

प्राणीशास्त्र, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र , सिव्हील इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या मंडळावरील जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.

मराठी या अभ्यामंडळासाठी डॉ. दत्तात्रय पाटील आणि डॉ. उदय जाधव यांना समान मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे अंतिम निर्णय घेण्यात आला. यामध्ये डॉ. पाटील विजयी झाले. अर्थशास्त्र विषयासाठी डॉ. अनिलकुमार वावरे आणि डॉ. निवास जाधव यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये डॉ. वावरे यांना १० तर जाधव यांना शून्य मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा रास्ता रोको

$
0
0

पे अँड पार्कविरोधात

शिवसेनेचा रास्ता रोको

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

हुतात्मा पार्कसमोरील जागेत महापालिकेने सुरु केलेली पे अँड पार्क वसुली तातडीने बंद करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सोमवारी सकाळी रास्ता रोको केला. येथील टेम्पो व्यावसायिकांच्या पार्किंगबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

लक्ष्मीपुरीतील कोल्हापूर जिल्हा आदर्श टेम्पो असोसिएशनची वाहने जुने कांदा बटाटा मार्केट येथे उभी केली जात होती. तेथे मॉल उभा राहिल्यानंतर या असोसिएशनला हुतात्मा पार्कसमोरील जागेवर पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. दोन आठवड्यापूर्वी या जागेवर केएमटीच्यावतीने पे अँड पार्क सुरु करण्यात आले. असोसिएशनला काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. येथील वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. पण महापालिकेने कार्यवाही न केल्याने सोमवारी सकाळी आमदार क्षीरसागर, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार, शहर प्रमुख नियाज खान, धनाजी यादव, रविकिरण इंगवले, तानाजी पाटील, योगेश रेळेकर, वीरेंद्र भोपळे, तुकाराम लांबोरे, शंकर पाटील, सुरेश सुर्यवंशी, सुरेश खोत यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा पार्कसमोर रास्ता रोको केला. त्यानंतर केएमटीचे प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी या प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगितले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिभा पाटील यांचा दौरा

$
0
0

फोटो

...........

'डॉ. डी. वाय.पाटील

यांचे भरीव योगदान'

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सोमवारी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची कसबा बावडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या अनौपचारिक भेटीमध्ये त्यांनी डॉ. पाटील यांच्याबरोबरच कुटुंबियांशी विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी सयाजी हॉटेलसह शहरातील काही निवडक ठिकाणीही भेटी दिल्या.

रविवारी शिरोळ येथील कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती पाटील या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. शिरोळ येथील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात मुक्काम केला. सोमवारी सकाळी त्यांनी डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कसबा बावडा येथील 'ज्ञानशांती' या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील व कुटुंबियांशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी प्रतिभा पाटील यांनी डॉ. डी. वाय.पाटील यांनी शिक्षणाबरोबरच इतर सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन त्यांचे चिरंजीव डॉ. संजय पाटील व आमदार सतेज पाटील यांनी कार्य पुढे सुरु ठेवले असल्याचे कौतुक केले. आमदार सतेज पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना उत्कृष्ट काम केल्याचेही त्यांनी नमूद केले. वैजयंती पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी शांतादेवी डी. पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

त्यानंतर प्रतिभा पाटील यांनी हॉटेल सयाजीलाही भेट दिली. ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्याचे काम डॉ. संजय पाटील यांनी हॉटेल सयाजीच्या माध्यमातून केल्याचे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढले. यावेळी आमदार सतेज पाटील, सयाजी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉफ धनानी, सुचित्रा धनानी उपस्थित होते. जनरल मॅनेजर पुनीत महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाई वैद्य प्रतिक्रिया

$
0
0

समाजवादी लढवय्या हरपला

भाई वैद्यांच्या निधनानंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'समाजवादी चळवळीच्या माध्यमातून शेवटपर्यंत सामान्य नागरिकांसाठी संघर्ष करणाऱ्या भाई वैद्य यांच्या निधनाने देशातील समाजवादी विचाराचा बुरुज ढासळला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणे शक्य नाही,' अशा भावना कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातून सोमवारी व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या राष्ट्र सेवा दल व शैक्षणिक चळवळीची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'अजूनपर्यंत धडधाकट शरीरयष्टी व सर्वत्र जाण्यासाठी धडपडणारे भाई वैद्य यांचे असे अचानक निघून जातील, असे वाटत नव्हते. सध्या समाजवादी चळवळीत त्यांच्यासारखे कार्यकर्ते फार कमी आहेत. त्यांच्याकडे समाजवादी शक्तींना एकत्र करण्याची ताकद होती. सध्या समाजवादी व डाव्या विचारांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी भाईंनी प्रभावी भूमिका निभावली असती. आज त्यांची गरज असताना ते निघून गेल्याने महाराष्ट्रातील राजकारणात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.'

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर म्हणाले, 'पुण्याचे महापौरपद भुषवत असताना त्यांनी आणीबाणीत निषेध मोर्चा काढला. त्यावेळी त्यांना अटक झाली. आणीबाणीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अटकेत असणारे ते बहुधा एकमेव असावेत. राष्ट्र सेवा दलातून मोठे झालेले भाई हे एस. एम. जोशी यांचे पट्टशिष्य होते. त्यांनी समाजवादी चळवळ कधीही सोडली नाही. शेवटपर्यंत त्याचे विविध ठिकाणी दौरे सुरू होते. कोल्हापूरशीही त्यांचे नाते कायम राहिले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील मोठा कार्यकर्ता हरपला.'

राष्ट्र सेवा दलाचे भरत लाटकर म्हणाले, 'सामान्यांना न्याय देण्यासाठी तळमळीने काम करणारे ते कार्यकर्ते होते. समाजवादी चळवळीनंतर त्यांनी सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजवादी अध्यापक सभेची स्थापना केली होती. त्या माध्यमातून त्यांनी दर्जेदार, मोफत शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. सेवा दलाच्या हिरक महोत्सवाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.' जनता दल सेक्युलरचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर म्हणाले, 'लोकशाही, समाजवाद जिवंत ठेवण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. सध्याच्या परिस्थितीत त्यांची गरज असताना निधन झाल्याने पोरके झाल्यासारखे वाटते. गृह राज्यमंत्रिपद भूषवत असताना त्यांनी पोलिसांना फूल पँट देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विविध पातळीवर संघर्ष केला. साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भाई वैद्य होते. त्यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा होता. त्यांची समाजवादी विचारावर अखेरपर्यंत निष्ठा होती.'

ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ' भाई वैद्य शेवटपर्यंत सचोटीने जगले. त्यांनी जे तत्वज्ञान सांगितले, त्याप्रमाणे ते वागले. आचारविचारात काही फरक न ठेवणारे नेते होते. समाजवाद हाच देशाला तारु शकतो, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांचा आशावाद फार मोठा होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील समाजवादी विचाराचा बुरुज ढासळला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईसाहेब महाराज पुतळा सरंक्षक भिंतीला बसची धडक

$
0
0

आईसाहेब महाराज पुतळा

कठड्यास बसची धडक

कोल्हापूर: लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या आईसाहेब महाराज पुतळ्याच्या संरक्षण भिंतीस सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खासगी आराम बसने धडक दिली. बसच्या धडकेत संरक्षण कठड्याचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची खासगी आराम बस आली होती. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिंदू चौक पार्किगमधून प्रवाशांना घेऊन बस बाहेर पडली. बिंदू चौकातून बस लक्ष्मीपुरीकडे जात असताना आईसाहेब महाराज पुतळ्यास वळसा घालून जात असताना चालकाचा अंदाज चुकल्याने बसने संरक्षण कठड्याला धडक दिली. धडकेत कडठ्याच्या पाइप वाकल्या असून फरशीचे नुकसान झाले आहे. अपघाताची घटना लक्ष्मीपुरी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे शहरातील सर्वच गस्ती पथकांना अपघाताची माहिती दिली. ठोकर दिलेली बस शहरात सापडली नाही, पण किणी टोल नाका परिसरात पहाटे बस ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images