Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिका....

0
0

सत्ताधारी-विरोधकांत मानापमान नाट्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पण स्थायी समितीच्या चाव्या हातात असलेली भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीतील कुरघोडीचे राजकारण अर्थसंकल्पादरम्यानही दिसून आले. अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या केबिनमध्ये झालेल्या बैठकीविषयी कळविले नाही म्हणून दोन्ही काँग्रेस आणि सेनेच्या सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. शिवाय सभेपूर्वी झालेल्या सभापतींच्या दालनातील बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली. तर सभापतिपदाच्या निवडणुकीत सभापती ढवळे यांना मतदान करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे, अजिंक्य चव्हाण हे दोघेही सभापतींच्या दालनातील बैठकीला उपस्थित होते.

महापालिकेतील विविध समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता तर स्थायी समिती सभापतिपद भारतीय जनता पक्ष -ताराराणी आघाडीने आपल्याकडे खेचून आणले आहे. शनिवारी अर्थसंकल्पीय सभेच्या निमित्ताने दोन्ही आघाडीतील कुरघोडीचे राजकारण आणि मानापमान नाट्य रंगले. सभापती ढवळे यांच्या दालनात स्थायी सदस्य व नगरसेवक सत्यजित कदम, गीता गुरव, कविता माने, सुनंदा मोहिते, भाग्यश्री शेटके, सविता घोरपडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक पिरजादे व चव्हाण यांची बैठक झाली. मात्र या बैठकीला दोन्ही काँग्रेसचे सदस्य संदीप नेजदार, राहुल माने, दीपा मगदूम, संजय मोहिते, प्रतिक्षा पाटील, शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यापैकी कुणीही हजर नव्हते. सभेआधीच्या बैठकीचे निमंत्रण सेनेच्या सदस्या निल्ले यांना दिले नसल्यामुळे त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा महापालिकेत रंगली.

अर्थसंकल्प सादर करतानाच विचारणा

अर्थसंकल्पीय सभेवेळी सभापती हे स्थायी समिती सदस्यासोबत सभागृहात दाखल झाले. त्यांच्यसोबत भाजप, ताराराणी आघाडीचे सदस्य, राष्ट्रवादीचे फुटीर नगरसवेक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजाते होते. तत्पुर्वी दोन्ही काँग्रेस व सेनेचे सदस्य अगोदर सभागृहात दाखल झाले होते. सभापती ढवळे हे महापौरांना अर्थसंकल्प सादर करत असतानाच काँग्रेसच्या व सेनेच्या महिला सदस्यांनी, बैठकीचे निमंत्रण का दिले नाही? अशी विचारणा सभापती ढवळे यांना करत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी सभापतींनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाला कळविले होते, असे उत्तर दिले. या नाराजी नाट्यातूनच ढवळे हे महापौरांकडे अर्थसंकल्प सादर करताना कॉँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेचे सदस्य त्यांच्यासोबत महापौर आसनापर्यंतही गेले नाहीत. दरम्यान सभापतिपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितरित्या पराभव पत्कराव्या लागलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवका मेघा पाटील या सभेला गैरहजर होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्थसंकल्प बातमीत चौकट...

0
0

'शिवसेनेचे नगरसेवक सुखात'

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी तिरकस शब्दांत भाजप नेत्यांवर टीका केली. त्याचवेळी महापालिकेतील राजकारणावरुन बोलताना त्यांनी 'शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत आणि हे चौघेही इतर नगरसेवकापेक्षा सुखात आहेत. शिवाय प्रत्येक नगरसेवक वर्षाला एकदा परिवहन सभापती होत आहे.' अशी टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला. त्यावर शिवसेनेचे गटनेते नियाज खान म्हणाले, 'शिवसेनेच्या नगरसेवकांनी दोन्ही काँग्रेसला सातत्याने मदत केली. मात्र मुरलीधर जाधव यांच्या कालावधीतील बजेटमध्ये परिवहनला काही मिळाले नाही. आणि आताच्या बजेटमध्ये परिवहनसाठी काय तरतूद केली हे अद्याप समजले नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगभलं च्या गजराने जोतिबा दुमदुमला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पिपाणी, डफ, हलगीच्या तालावर आकाशाला गवसणी घालणाऱ्या सासनकाठ्या आणि 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात मिरवणुकीवर गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत जोतिबा डोंगर भाविकांच्या भक्तिभावाने न्हाऊन निघाला. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी जोतिबा चैत्र यात्रा उत्साहात पार पडली. उन्हाच्या तडाख्यातही भाविकांचा उत्साह, प्रशासनाने केलेली सुरक्षेची जय्यत तयारी आणि विविध संघटनांनी भाविकांसाठी केलेल्या सोयीसुविधांमुळे यात्रेला सेवा, शिस्तीचे वलय लाभले होते.

चैत्र यात्रेसाठी गेले तीन दिवस भाविक जोतिबा डोंगरावर येत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री भाविकांचे जथ्थे एसटी, खासगी वाहनांतून येत होते. शनिवारी पहाटे चार वाजता तहसीलदार राम चौबे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविक प्रदक्षिणामार्गावर शिखरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण करत होते. अनेक गावच्या आलेल्या सासनकाठ्यांची हलगी, ताशा, पिपाणीच्या तालावर मिरवणुका काढण्यात आल्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा सज्ज होती.

सकाळी दर्शनानंतर भाविकांना दुपारी सासनकाठी मिरवणुकीचे वेध लागले होते. मानाच्या सासनकाठ्या शुक्रवारीच डोंगरावर दाखल झाल्या होत्या. दुपारी सव्वाच्या सुमारास चांगभलंच्या गजरात निनाम पाडळीची मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आली. गावचे सर्व नागरिक सासनकाठीबरोबर पांढऱ्या पोशाखात होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निनाम पाडळी आणि पाटण तालुक्यातील विहे गावच्या सासनकाठींचे पूजन केले. यावेळी आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खजानिस वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, सरपंच रिया सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जोतिबा मंदिर ते चोपडाई मंदिर मार्गावरील सासनकाठी मिरवणुकीवर अखंड गुलाल व खोबऱ्यांची उधळण होत होती.

एकीकडे सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू असताना दुसरीकडे भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेचारनंतर मंदिर परिसरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक वाद्यांबरोबर अश्व व उंट होता. गुलालाच्या उधळणीत पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर दक्षिण दरवाजातून पालखी यमाई मंदिराकडे मार्गस्थ झाली.

अन्नछत्राचा लाखो भाविकांना लाभ

सहजसेवा ट्रस्टने गायमुखाजवळ, जोतिबा डोंगरावर आर. के. मेहता च'रिटेबल ट्रस्टने तर पंचगंगा नदीवर शिवाजी चौक तरुण मंडळाने भाविकांसाठी अन्नछत्राची सेवा उपलब्ध करून दिली आहे. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा मार्गावर भाविकांसाठी चहा, नाष्टा, सरबत, ताक वाटप करण्यात आले. कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळाच्या वतीने गायमुखाजवळ सरबत वाटप केले.

मानाच्या सासनकाठीने वेळ पाळली

मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी दीड वाजता सुरू होते. पण देवस्थानने सासनकाठ्यांच्या मिरवणुकीची वेळ दुपारी एक वाजता ठरवली होती. एकच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार व देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. पण मानाची निनाम पाडळीची सासनकाठी मिरवणुकीत सहभागी झाली नव्हती. सासनकाठीस विलंब होत असल्याने दुसऱ्या क्रमांकाची विहेच्या सासनकाठीचे पूजन करण्याची सूचना पुढे आली. पण आमदार शंभूराज देसाई यांनी मिरवणुकीतील मानाच्या सासनकाठी पूजनाचा पायंडा मोडू नये, अशी सूचना केली. तब्बल २५ मिनिटांनंतर निनाम पाडळीची सासनकाठी आली. दुपारी दीड वाजता मानाच्या सासनकाठीची पूजा केली.

एसटी, केएमटी, झंवर ग्रुपकडून बससेवा

एसटी, केएमटी आणि झंवर ग्रुपकडून भाविकांसाठी बससेवा देण्यात आली. पंचगंगा घाटावरून पाच मिनिटाला एक एसटी बस सोडण्यात आली होती. केएमटीच्या ४० बसेस मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच झंवर ग्रुपकडून सलग सातव्या वर्षी मोफत चार बससेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. उपक्रमाचे उद्घाटन कंपनीचे संचालक नीरज झंवर, रोहन झंवर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिया झंवर, अंकिता झंवर, नीता झंवर, छाया सोमानी उपस्थित होत्या. कोल्हापूर महापालिका, गोकुळच्या वतीने पाण्याचे टँकर पुरविले. कोल्हापूर महापालिका आणि वारणा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाचे दोन फायर फायटर सेवेसाठी उपलब्ध होते. १०८ रुग्णवाहिकाही चोवीस तास सज्ज ठेवल्या होत्या.

तीनशे भाविकांचे रक्तदान

गायमुखाजवळ सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राजवळ राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. दोन दिवसांत तीनशे भाविकांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने एसी व्हॅन उपलब्ध करून दिली होती. जोतिबा मंदिरात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने मोफत प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा, तर व्हाइट आर्मीच्या वतीने भाविकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

0
0

१२ लाखांची फसवणूक

कर्जाच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; चौघांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्यवसायासाठी १३ कोटी, ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शैलेंद्र रामचंद्र कुऱ्हाडे (वय ४६, रा. चिले महाराज हाउसिंग सोसायटी, राजेंद्रनगर) यांनी शुक्रवारी (ता. ३०) चौघांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संतोष चंद्रकांत कळेकर (रा. मालती पार्क, सातारा), राहुल जगदाळे (रा. शिवडे, ता. कराड, जि. सातारा), राजेंद्र कणकवे (रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली) आणि संतोष दळवी या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गोकुळ शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र कुऱ्हाडे हे व्यावसायिक आहेत. व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. याचदरम्यान भेटलेला संतोष कळेकर याने कुऱ्हाडे यांना खासगी फायनान्स कंपनीकडून मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. माफक व्याजदरात १३ कोटी ५० लाखांचे कर्ज मिळेल, मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून १६ लाख, ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे कळेकर आणि त्याच्या साथीदारांनी कुऱ्हाडे यांना सांगितले. कुऱ्हाडे यांनी विश्वास ठेवून संतोष कळेकर, राहुल जगदाळे, राजेंद्र कणकवे आणि संतोष दळवी या दोघांना सुरुवातीला नऊ लाख, ९० हजार रुपये दिले. यानंतर १० हजार रुपये दिले. तिसऱ्या भेटीत दोन लाख, पाच हजार रुपये, असे १२ लाख पाच हजार रुपये दिले. सहा जानेवारी २०१७ ते तीन जुलै २०१७ या कालावधीत कुऱ्हाडे यांच्याकडून पैसे घेतले होते.

यानंतर कर्ज मिळावे यासाठी कुऱ्हाडे यांनी पाठपुरावा केला, मात्र कळेकरसह चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कर्ज मिळत नसल्याचे लक्षात येताच कुऱ्हाडे यांनी दिलेली रक्कम परत करण्याचा दगादा लावला. यालाही चौघांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी जिल्हा कोर्टात धाव घेऊन चौघांविरोधात तक्रार दिली होती. कोर्टाने संशयितांवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गोकुळ शिरगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारभाव- खाद्यतेल कडाडले

0
0

फोटो आहे...

स्वयंपाकगृहातील फोडणी महागणार

खाद्यतेलांसह साखर, शेंगदाणा महागला, खोबरेलच्या दरात विक्रमी ६० रुपयांची वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यात स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारपेठेत शेंगतेल प्रतिकिलो १५, सरकी ६, खोबरेल ६० रुपयांनी महागले आहे. दरवाढीने स्वयंपाकघरातील फोडणी आता महाग झाली असून, सर्वसामान्यांचे महिन्याचे गणित बिघडणार आहे. साखर आणि शेंगदाणा दरातही वाढ झाली असून, उडीद डाळ व हरभरा डाळीच्या किमती कमी झाल्या आहेत.

स्वयंपाकघरात प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी फोडणी गृहिणींसाठी महाग झाली आहेत. गेल्या आठवड्यात शेंगतेल प्रतिकिलो ११० रुपये होते. या आठवड्यात १२५ रुपयांवर गेले आहे. सरकी तेल ८२ रुपयांवरून ८८ रुपये झाले आहे. खोबरेल तेल गेल्या आठवड्यात २४० रुपये किलो होते. आता त्यात ६० रुपयांनी वाढ झाल्याने ३०० रुपये दर झाला आहे. वनस्पती तुपाचा दर मात्र ९० रुपये प्रतिकिलो असा स्थिर आहे. हिरवा वाटाण्याच्या प्रतिकिलो दरात १० रुपयांची वाढ झाली आहे. साखर ३६ वरून ३८ रुपये किलो झाली आहे. शेंगदाणा प्रतिकिलो ८० रुपयांवरून ९० रुपये झाला आहे. तूरडाळ तीन रुपयांनी महागली आहे. मूगडाळ, मसूराडाळ, मूग, मसूर, काळा वाटाणा, मटकी, छोलेचे दर स्थिर आहेत. बाजारात मागणी नसल्याने खाद्यतेल वगळता फारसा चढउतार झालेला नाही.

उन्हाळ्यामुळे नाचणीच्या मागणीत या आठवड्यातही वाढ झाली आहे. भाकरी आणि आंबिल करण्यासाठी ग्राहकांची नाचणीला मागणी आहे. नाचणीची सर्व आवक जिल्ह्यातून झाल्याने उत्पादकांना चांगला दर मिळत आहे. सरासरी ४० रुपये किलो दराने किराणा माल दुकानातून विक्री होत आहे. गेल्या आठवड्यात साखरेचा दर कमी झाला होता. या आठवड्यात साखर प्रतिकिलो २ रुपयांनी वाढून ३८ रुपये किलो झाली आहे. भाजीपाल्याची आवक प्रचंड असूनही कडधान्यांच्या मागणीत किरकोळ वाढ झाल्याचे किराणा मालाचे व्यापारी संदीप वीर यांनी सांगितले.

०००००

डाळींचे दर ( प्रतिकिलो रु.)

तूरडाळ ७२ रुपये

मूगडाळ ७२ ते ८०

उडीद डाळ ६० ते ७२

हरभरा डाळ ५२ ते ६४

मसूरडाळ ६० ते ६४

मूग ७० ते ८०

मसूर ७० ते १२०

चवळी ८० ते १००

हिरवा वाटाणा ५० ते ६०

काळा वाटाणा ७० ते ८०

मटकी ६० ते ९०

छोले १२०

००

तेलाचे दर (प्रतिकिलो रु.)

शेंगतेल १२५

सरकी ८८

खोबरेल ३००

वनस्पती तूप ८०

००

बार्शी शाळू : ३८ ते ४० रुपये

ज्वारी नं. १ : ३८ ते ४०

ज्वारी नं २ : ३७ ते ३२

ज्वारी नं ३ : ३० ते ३२

बाजरी : १८ ते २४

००

किराणा दर (प्रतिकिलो रु.)

पोहे ४० रुपये

साखर ३८

शेंगदाणा ९०

रवा २८

आटा २६

गूळ ४०

शाबू ७५

तीळ १४०

०००००००००००००

फोटो..

मलकापूर बाजारात भाजीपाला घसरला

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

तालुक्यातील मलकापूर, बांबवडे आठवडी बाजारात सर्वच भाजीपाल्यांचे दर घसरल्याचे निदर्शनास आले. तुलनेत पावटा, भेंडी व कारल्याचे दर मात्र स्थिर व टिकून राहिल्याचे दिसले. हंगाम समाप्तीकडे सरकल्याने द्राक्षांची आवक घटली असली तरी सुमार दर्जाच्या द्राक्षांचा बाजारातील दर तेजीत राहिला होता. स्थानिक देशी काकडीचा दरही तेजीतच राहिला. सर्वप्रकारच्या डाळींसह कांदा, लसूण, शेंगदाणा, खोबरे, आदी किराणामालाच्या दरात १०-२० रुपयांची घसरण झाली. नवीन हरभरा बाजारात आल्याने हरभरा डाळ, छोले यांच्या दरातही अधिक घसरण झाल्याचे किराणा व्यापाऱ्यांनी सांगितले. गूळ, साखरेसह साबूदाणाही स्वस्त झाला. धान्य बाजारातील दर काहीअंशी स्थिर आहेत. खाद्यतेलांचे दर किलोला १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे.

बाजारभाव खालीलप्रमाणे (दर प्रतिकिलो रु.)

गूळ ४० रु., रवा २६, साखर ३४, आटा २८, बाजरी २०, तूरडाळ ७०, मसुरा डाळ ५५, हरभरा डाळ ५४, मूग ७०, मूगडाळ ७५, उडीद डाळ ७०, हिरवा वाटणा ६०, शेंगदाणा ७०, खोबरे (राजापूर) १८०, गट्टू खोबरे १७०, लसूण २० ते ४०, कांदा १५, बटाटा २० ते २५, साबुदाणा ५९ ते ५५, भगर ७०, मटकी ७० (उंची दर ८० रु.), छोले १००, शेंगतेल १२० ते १३०, सरकी तेल ८५, सोयाबीन तेल ९०, सूर्यफूल तेल ९० (स्टँडर्ड- १०० रु.)

मिरची दर (प्रतिकिलो रु.)

गुंटूर ११० ते १३०, लवंगी १२० ते १४०, ब्याडगी १४० ते २२०, (बाजार मिरची दर ११० ते १५० रुपये प्रतिकिलो)

भाजीपाला दर

मेथी ५ रुपये पेंडी, कांदापात १० रुपये पेंडी, कोबी गड्डा ५ रु., फुलकोबी १० रु. किलो, भेंडी ४० रु. किलो, वांगी १० किलो, पावटा ६० रु., शेवगा शेंग १० रु. पेंडी, टोमॅटो ५ ते १० रु. किलो, काकडी ५० ते ७० रु. किलो, बीट १० रु.

धान्य बाजारभाव (प्रतिकिलो रु.)

शाळू - हिरामोती ३० ते ३३ रुपये, शाळू २ नं. - २० ते २४ रुपये, हायब्रीड ज्वारी १५ ते १८ रुपये, गहू २२ ते २६ रुपये.

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका अंदाजपत्रक...

0
0

प्रस्तावित कामांच्या आश्वासनांचे फुगे

जुन्या योजना पूर्ण करण्याची ग्वाही; मोफत वायफायचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरेची ओळख आणखी घट्ट करताना शहरात आणखी एक अद्ययावत नाट्यगृह आणि बहुउद्देशीय क्रीडा सभागृहाची उभारणी होणार आहे. 'परिवर्तनाच्या समृद्धीतून...श्रीमंतीकडे वाटचाल करणारे महानगर'अशा शब्दांत अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी शहरवासियांना महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे स्वप्न दाखवताना त्यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद केली. केशवराव भोसले नाट्यगृह विकासाचा दुसरा टप्पा, सेफ सिटी प्रकल्प, रंकाळा संवर्धन अशा विकास कामांतून शहराला विकासात्मक चेहरा देण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा शहरवासियांना मोफत वायफायची घोषणा केली. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एप्रिल २०१८ अखेर तीस टन क्षमतेचा बायामेथिनेशन प्लँट सुरू करण्यात येईल असे सभागृहात सांगितले. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडल्याने शहर विकासाच्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सरकारवर भिस्त राहणार आहे.

६५ कोटीचा प्रशासकीय इमारतीचा आराखडा

महापालिकेची सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत आहे. आगामी ५० वर्षांचा विचार करून महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत मैल खड्डा येथे प्रस्तावित केली आहे. प्रस्तावित केलेल्या प्रशासकीय इमारतीसाठी ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारकडून हा निधी उपलब्ध करुन त्या माध्यमातून नवी इमारत साकारण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान नव्या प्रशासकीय इमारतीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सभापती ढवळे यांनी अर्थसंकल्प सादर करताना नव्या प्रशासकीय इमारतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणपूरक बनविण्यासाठी अपारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर केला जाईल. त्याचबरोबर सर्व विभाग कम्प्युटराइजड असतील. या इमारतीत सर्व आवश्यक सुविधांसह भविष्याचा विचार करून पुरेशा पार्किंग व्यवस्थेचा समावेश राहील. या इमारतीमधून भारतीय लोकशाही मूल्ये, भारतीय संविधान प्रतिबिंबित होईल, अशा पद्धतीने आराखडा बनविला आहे.

.............................

सर्किट हाऊसनजीक नवीन नाट्यगृह

कोल्हापुरातील वाढत्या उपनगरांचा विचार करून नवीन नाट्यगृह अत्यावश्यक आहे. रंगकर्मी, नाट्यप्रेमी, नाट्यप्रेक्षकांच्या सूचना विचारात घेऊन सर्किट हाऊसनजीक प्रशस्त जागेमध्ये नवीन नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये २५०० बैठक क्षमतेचे सभागृह, ३५० व २०० क्षमतेची ब्लॅक बॉक्स, कलादालन असेल. तसेच रेकॉर्डिंग, स्टुडिओ, गायन, संगीत, नाट्य प्रशिक्षणची सोय असणार आहे. २५० चारचाकी व ५०० दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सोय केली जाईल.

....................

मंगेशकरनगरात बहुउद्देशीय क्रीडा सभागृह

खेळाच्या प्रत्येक प्रकारात कोल्हापूरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली. कोल्हापुरातील खेळाडूंच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय विभागाच्या 'खेला इंडिया' या क्रीडा विकास योजनेंतर्गत मंगेशकरनगरात बहुउद्देशीय क्रीडा सभागृहाची संकल्पना अंदाजपत्रकांत मांडली आहे. यामध्ये दोन कोर्टचे बॅडमिंटन हॉल, बॉक्सिंग रिंग, प्रेक्षकगृह असणार आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉस्केटबॉल इत्यादी खेळासाठी अॅस्ट्रो टर्फ युक्त इनडोअर स्टेडियम, चेजिंगरुम, लॉकर्स, स्वच्छतागृह असेल. याशिवाय विकास आराखड्यातील आरक्षित सर्व प्रभागामधील क्रीडागणांचा विकास करण्याचा मानस आहे.

.............

रंकाळा तलाव संवर्धनासाठी प्राधान्यक्रम

रंकाळा तलाव हा कोल्हापूरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. भाविक व पर्यटक हमखास रंकाळा तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी भेट देतात. भविष्यकाळात अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभिकरणासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून चार कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यामधून प्राप्त ५० लाख रुपयांमधून प्रथम टप्प्यात रंकाळा तलाव संवर्धनाची कामे हाती घेतली जातील.

.............

कचऱ्यावर प्रक्रियेसाठी बायोमिथेनेशन प्लँट

कोल्हापूर शहराचा विस्तार, भविष्यातील वाढ विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे. राज्य सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन विषयक आराखडा मंजूर करुन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांतर्गत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीस टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्लँट एप्रिल २०१८ अखेर सुरू करण्याचे नियोजन आहे. स्वच्छ भारत अभियान अतंर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना १५,००० अनुदान वितरीत केले. तसेच शेल्टर असोसिएटस या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत शौचालय बांधकाम पुरविले आहे. बांधण्यात येणारे शौचालय ड्रेनेज लाइनला मोफत जोडून देण्यात येणार आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह विकासाचा दुसरा टप्पा

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राचा मानबिंदू समजला जातो. दहा कोटी रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात नाट्यगृह व खासबाग मैदानाचे नूतनीकरण झाले. प्रशासनाने नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा आखला आहे. नऊ कोटी, ९३ लाख रुपयांचा सुधारित आराखड्याला राज्य सरकारकडून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात हेरिटेज कंपाऊंड वॉल, दगडी कमान, ब्लॅक बॉक्सची नवीन इमारत, खाऊ गल्ली, लँडस्केप या कामांचा समावेश आहे.

भवानी मंडप ते बिंदू चौक मॉडेल पादचारी मार्ग

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांचा ओघ असतो. भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात दिशादर्शक फलक, रस्ते दुभाजक, बिंदू चौक तटबंदीवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिर परिसर ते भवानी मंडपपासून बिंदू चौकपर्यंतचा मार्ग एक मॉडेल पादचारी मार्ग म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये भक्तांना बसण्यासाठी सीटाऊटस, पिण्याच्या पाण्याची सोय, महिलांसाठी स्वच्छतागृहे असतील. कोल्हापुरातील उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉलची अभारणी, पूजेच्या साहित्याच्या स्टॉलचा समावेश असेल.

सेफसिटी, वायफाय अन् ई गव्हर्नन्स

शहर सुरक्षितता, वाहतुकीवर नियंत्रण असा उद्देश ठेवून महापालिकेने सेफ सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी केली. सेफ सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात व्हिडीओ सर्व्हिलन्स सिस्टीम, इमर्जन्सी व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम अशा प्रकारच्या विविध सुविधांचा समावेश आहे. या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा बारा कोटींचा आहे. यासाठी सरकारकडून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आगामी वर्षात कोल्हापूर शहराला फ्री वायफाय करू, असे आश्वासनही ढवळे यांनी दिले. महापालिकेमार्फत ई ऑफिस सक्षमीकरण यंत्रणा, जीआयएसवर आधारित मिळकतींचे सर्व्हे पूर्णत्वास आणणे, मोबाइल अॅपद्वारे महापालिका योजनांची माहिती, नागरिकांच्या सूचना तसेच ऑनलाइन पेमेंट करण्याची सोय करण्यात येईल. सध्या कार्यरत ई गव्हर्नन्स प्रकल्पाची मुदत यावर्षी संपत असून नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे ई गव्हर्नन्स प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे.

तीन एकर जागेवर भक्त निवास

अंबाबाई मंदिर विकास आराखडा अतंर्गत व्हीनस कॉर्नर परिसरातील गाडी अड्ड्याच्या जागेवर भक्त निवास प्रस्तावित आहे. सुमारे तीन एकर परिसरातील राज्य सरकारच्या निधीतून पाच मजली इमारत साकारणार आहे. यामध्ये २०० लोकांना राहता येईल, असे दोन मजली भक्त निवास उभारण्यात येणार आहे. तसेच ३५० चारचाकी वाहनासाठी तीन मजली वाहनतळ प्रस्तावित आहे.

टर्न टेबल लॅडरसाठी प्रयत्नशील

राज्य सरकारने ड वर्ग महापालिकेसाठी नवीन विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ५० मीटर उंचीच्या इमारतीस परवानगी देणे क्रमप्राप्त आहे. अग्निशमन दलाकडे सध्या उपलब्ध साधनसामग्रीत २१ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीसाठी आपत्कालीन स्थितीमध्ये सेवा पुरविण्याची क्षमता आहे. नव्याने लागू झालेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ५० मीटरपर्यंतच्या इमारतीसाठी बांधकाम परवानगी मान्य केली आहे. इतक्या उंचीपर्यंतच्या इमारतींसाठी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन, लोकांची सोडवणूक, बचाव कार्यासाठी अद्ययावत साधन सामग्री आवश्यक आहे. शहरातील उंच इमारती, वाढते नागरिकीकरणाचा विचार करून महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यामध्ये ५५ मीटर टर्न टेबल लॅडर वाहन लवकरात लवकर उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी....

सुधारित शहर विकास योजनेअंतर्गत डीपी रोडचा विकास

बारा ते ३० मीटरचे रस्ते टीडीआर देऊन विकसित करणे

कोंबडी बाजारात दोन ठिकाणी खासगी तत्वावर बहुमजली व्यापारी संकुल

या प्रकल्पातंर्गत १२५३४ चौरस फूट जागेवर २५०७० चौरस फुटाचे बांधकाम

यापैकी ६५३० चौरस फूट इतके क्षेत्र महापालिकेस मिळणार

उर्वरित २३६८२ चौरस फूट इतके क्षेत्र विकसकाला मिळणार

अमृत अभियान अंतर्गत २०१५ पासूनची रखडलेली कामे पूर्ण करणार

उद्यान विकास प्रकल्पाची अंमलबजावणीवर भर

निव्वळ महसुली उत्पन्नाच्या पाच टक्के निधी महिला व बालकल्याण कार्यक्रमासाठी

तीन टक्के निधी अपंग कल्याण कार्यक्रमासाठी, पाच टक्के मागास निधी आरक्षित

थेट पाइपलाइन, एसटीपी यंदा कार्यान्वित

थेट पाइपलाइन योजना शहरवासियांच्या जिव्हाळ्याची योजना आहे. गेली चार वर्षे योजनेचे काम सुरू आहे. यावर्षी थेट पाइपलाइन योजना, भुयारी गटर प्रकल्प योजना पूर्ण करण्याला प्राधान्यक्रम राहील. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत दुधाळी येथील १७ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे नियोजन आहे. २६ कोटी, ६० लाख रुपयांची ही योजना असून ५० टक्के सरकारी अनुदान आहे. अमृत अभियान अंतर्गत शहरातील अनेक ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये उंच टाक्या भरण्यासाठी फिडर मेन्स, गुरुत्वनालिका, दाबनलिका पूर्ण केली जातील. शहरातील अनेक भागातील मुख्य व अंतर्गत वितरणनलिका खराब झाल्या आहेत. पाणी पुरवठा व्यवस्थेने जीआयएस मॅपिंग व हायड्रोलि मॉडेलिंगची कामे पूर्ण करुन घेतली आहेत. त्यानुसार ११४ कोटी, ८१ लाख इतक्या रकमेच्या प्रकल्पास सरकारची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये पुढील तीस वर्षाचा विचार करून २०५ एमएलडी इतके पाणी उपलब्ध करण्याची योजना आखली आहे.

सीबीएस परिसरात सात मजली वाहनतळ

कोल्हापुरात पार्किंगची मोठी समस्या उभी ठाकली आहे. पार्किंगचे योग्य नियोजन नसल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत बनत आहे. पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेला प्राधान्यक्रम देत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉपच्या जागेवर सात मजली वाहन तळ उभारणी प्रस्तावित आहे. पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळ व व्यापारी संकुल नियोजित आहे. यामध्ये ५०० दुचाकी, १०० चारचाकी वाहने तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, सार्वजनिक शौचालय असणार आहे. १०० अॅटो रिक्षा, त्याचबरोबर दहा टॅक्सी उभ्या राहतील असे टॅक्सी स्टँडसह रुग्णवाहिकेची सोय, अग्निशमन विभागाची वाहने तैनात असतील. या परिसरातील शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास व स्वामी समर्थ मंदिरास कोणतीही बाधा पोहचणार नाही.

............

झोपडपट्टीवासियांना किफायतशीर घरे

महापालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी तांत्रिक सेल नेमला आहे.महापालिकेतर्फे चार प्रकल्प सरकारला सादर केला आहे. राज्य व केंद्र सरकारकडून २५२ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या यादीला मान्यता मिळाली आहे. त्या लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार प्रमाणे सहा कोटी ३० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. तसेच शहरातील सर्व झोपडपट्टीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. कदमवाडी, बोंद्रेनगर, सुभाषनगर, कामगार चाळ, तसेच शिवाजी पार्क या ठिकाणी आगामी काळात झोपडपट्टीवासियांना आहे त्या ठिकाणी किफायतशीर घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : बाबूराव पाटील

0
0

निधन

बाबूराव पाटील

शाहूवाडी : भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील बाबूराव तुकाराम पाटील (वय ६३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२) सकाळी दहा वाजता भेडसगाव येथे आहे.

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतक-याचे शाळेतच बोंब मारो आंदोलन

0
0

महेमध्ये शाळेतच

बोंब मारो आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

महे (ता. करवीर) येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला सन २००२ मध्ये दिलेल्या शेतजमिनीच्या खरेदीची पावती व त्यासंबंधीची संस्थेकडे असणारी कागदपत्रे वारंवार मागणी करूनही संस्थेने दिली नाहीत. या कारणास्तव शाळेसाठी शेतजमीन दिलेल्या मेजर लहू महादेव पाटील यांनी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास भैरवनाथ हायस्कूलच्या कार्यालयातच सहपत्नीक बोंब मारो आंदोलन करून शेतजमिनी खरेदीच्या कागदपत्रांच्या मागणीचे निवेदन संस्था प्रशासनास दिले.

याबाबत मेजर लहू पाटील म्हणाले, '२९ ऑक्टोबर २००२ रोजी भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेने माझी गट नं. ६०० पैकी १२.१३ आर जमीन नाममात्र दराने खरेदी केली. यावेळी संस्थेने तुमचे भाऊच संस्थेचे अध्यक्ष आहेत. भविष्यात तुम्हीही संस्थेत असणार असे सांगून शेतजमिनीची खरेदी करण्याचे मी मान्य केले. मात्र, त्यानंतर अद्याप मला व माझ्या कुटुंबातील कोणालाही शाळेसाठी दिलेल्या शेतजमिनी खरेदीची कागदपत्रे दिलेली नाहीत. कागदपत्रांसाठी वारंवार संस्थेकडे मागणी केली. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी अध्यक्ष सर्जेराव महादेव पाटील यांना घरी जाऊन विनंती अर्ज दिला होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता आमच्याकडे अशी कोणतीही कागदपत्रे नसून आणि असली तरी देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मला माझ्या शेतजमिनीच्या खरेदीची शिक्षण संस्थेकडे असलेली कागदपत्रे रितसर मिळावीत या मागणीसाठी पत्नीसह आंदोलन करावे लागत आहे.'

याबाबत संस्थेशी संपर्क साधला असता, संस्थेकडून लहू पाटील यांना जमीन खरेदीची कागदपत्रे दिल्याचे सांगितले. अगोदरच भैरवनाथ शिक्षण संस्था ताब्यात घेण्यावरून दोन गटांत दावे-प्रतिदावे सुरू असतानाच आता शाळेसाठी खरेदी केलेल्या शेतजमिनीचा वाद सुरू झाल्यामुळे शिक्षण संस्थेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माढा: पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू

0
0

पंढरपूर: माढामधील शिवाजीनगर येथे पाण्याच्या टबमध्ये पडून एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दुर्वा सायबू शिंदे असं या बालिकेचं नाव असून या घटनेमुळे शिवाजी नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सायबू मारुती शिंदे हे आपल्या कुटुंबासह शिवाजी नगर परिसरात राहतात. त्यांची सर्वात लहान मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती. खेळता खेळता दुर्वा पाण्याने पूर्ण भरलेल्या टबमध्ये पडली. शेजाऱ्यांचं लक्ष गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दुर्वाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज सकाळी ११ वाजता ही घटना घडली. सायबू शिंदे यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. ते आसपासच्या गावांमध्ये यात्रेत हातातील कडे, कानातील कुंडल इत्यादी विकून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आहेत. दुर्वाच्या मृत्यूमुळे शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारामारीतील चौघांची कंळबा येथे रवानगी

0
0

मारामारीतील चौघांची

कंळबा येथे रवानगी

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी-धाऊरवाडा येथील मारामारीतील आरोपींना अटक केली असून, मारहाणीत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. आरोपीना न्यायालयीन कोठडी दिल्याने दोन्ही बाजूकडील चार आरोपींना कळंबा कारागृहात पाठवले आहे. राधानगरी शेजारील ऐनी पैकी धाऊरवाडा येथे गुलाब पन्हाळकर आणि सुधाकर साळोखे यांच्या गटात राडा झाला होता. त्यात गुलाब पन्हाळकर, चाँदसाब पन्हाळकर, युवराज जाधव आणि सुधाकर साळोखे, सुजित साळोखे, आशुतोष पाटील यांच्या गटात गाडी घासून मारली, या कारणावरून हाणामारी झाली. या घटनेतील चौघांना राधानगरी पोलिसांनी अटक करून पोलिस कोठडी दिली. न्यायालयाने पुन्हा कोठडी दिल्याने आशुतोष पाटील, सुजित साळोखे, युवराज जाधव, चाँदसाब पन्हाळकर यांची कळंबा कारागृहात रवानगी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीडीसीए परीक्षा अर्ज

0
0

जीडीसीए परीक्षा मेमध्ये

कोल्हापूर: सहकार खात्याच्यावतीने मे २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा २६ मे पासून घेण्यात येणार आहे. यासाठी आठ एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत आहे. ही परीक्षा २६ ते २८ मे या कालावधीत कोल्हापूरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतच्या सविस्तर सूचना खात्याच्या वेबसाइट www.mahasahakar.maharashtra.gov.in व www.sahakarayukta.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ केल्याची तक्रार

0
0

महिलेच्या तक्रारीवरून

भाजप-राष्ट्रवादी भिडले

म. टा. वृत्तसेवा, कागल

लाभार्थ्यांना मिळालेल्या राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेच्या धनादेशाच्या पार्श्वभूमीवर रविवारी तक्रारीच्या निमित्ताने कागलमध्ये भाजप व राष्ट्रवादी असे दोन राजकीय पक्ष पोलिस ठाण्याच्या आवारात आमने-सामने उभे ठाकले. भैय्या माने यांनी आपणास शिवीगाळ केली, अशी एका लाभार्थी महिलेने तक्रार केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परस्परविरोधी अर्ज स्वीकारून कौशल्याने ही परिस्थिती हाताळली.

धनादेश मिळालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या निवासस्थानी केला. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी आपणास शिवीगाळ केली, अशी एका लाभार्थी महिलेने तक्रार केली. याबाबतची तक्रार देण्यासाठी ती महिला पोलिस ठाण्यात गेली. तिचा तक्रार अर्ज घ्यावा व भैय्या माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत भाजप कार्यकर्ते जमावाने पोलिस ठाण्यात गेले. हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळताच तेही जमावाने पोलिस ठाण्यात गेले व माने यांच्याविरुद्धची तक्रार खोटी आहे, ती राजकीय द्वेषातून केल्याचे जमावाकडून सांगण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंधित महिलेचा तक्रार अर्ज स्वीकारला. तसेच ही तक्रार खोटी असल्याचा माने यांचा अर्जही पोलिसांनी स्वीकारला. त्यानंतर पोलिसांनी दोन्हीकडील जमावाला पांगविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर पंचायत समिती आवारात पाणपोई

0
0

शिवाजी पतसंस्थेतर्फे

करवीर पं.स. पाणपोई

म. टा. वृत्तसेवा , कुडित्रे

उन्हाळ्याच्या दिवसांत सार्वजनिक ठिकाणी असणारी पाणपोई तहानलेल्यांना मोठा दिलासा देणारी ठरते. छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून साकारल्या जात असलेल्या पाणपोई उपक्रमामुळे थंडगार पाणी पिऊन सुखावलेला प्रत्येकजण संस्थेला दुवा देऊन संस्थेचे आभारच मानेल. संस्थेचे कार्य व वाटचाल उल्लेखनीय अशा पद्धतीची असून, संस्था सामाजिक उपक्रमातही विशेष पुढाकार घेत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखाधिकारी संजय राजमाने यांनी काढले.

करवीर पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी पतसंस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी सुभाष चौगले, उपसभापती विजय भोसले, सदस्या अश्विनी धोत्रे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीच्या समर्थनार्थ संस्थेच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले. तसेच पाणपोई उपक्रमास विशेष सहकार्य करणारे कर्मचारी वसंत मोरे, युवराज पाटील, संभाजी सुतार, ऊर्मिला गुरव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव, संस्थापक चेअरमन एस. व्ही. पाटील, अधीक्षक कोरडे, विष्णू काटकर, बाळासाहेब माने, बाजीराव खेडकर, मनोज माळवदकर, डी. एस. पाटील, संजय बुड्डे, मारुती माने, बाबूराव खोत, डी. बी. पाटील, बाबूराव पाटील, अर्जुन कराड, सचिन कांबळे, नीतेश वळवी, संतोष शेलार, राजाराम भालेराव, रामचंद्र माने, संभाजी कांबळे, सतीश वेल्हाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ सामुदायिक विवाह सोहळा

0
0

सामुदायिक विवाह सोहळा

राधानगरी : घोटवडे (ता. राधानगरी) येथील कै. गणपतराव आबाजी डोंगळे ट्रस्टमार्फत प्रतिवर्षीप्रमाणे गरीब व गरजू तरुणांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा १८ एप्रिलला आयोजित केला आहे. विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोकुळचे संचालक व ट्रस्टचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शेतकरी व शेतमजूर दाम्पत्यांना दहा हजार रुपये अनुदानाची सोय आहे. दरवर्षी ५० पेक्षा अधिक मुलींचे कन्यादान डोंगळे ट्रस्टमार्फत केले जाते. ज्यांना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी आपली नावे कृष्णात डोंगळे यांच्याकडे नोंदवावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयघोषात अंबाबाईचा रथोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आकर्षक रांगोळ्या,मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृटी, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, 'अंबा माता की जय'चा अखंड गजर, हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सवमूर्ती... अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीच्या रथामधून नगरप्रदक्षिणा पार पडली. सोहळ्यात यावर्षी मोठा लवाजम्याला फाटा देत केवळ तीस जणांचे बॅण्ड पथक, लेझर लायटिंग आणि रथावर केवळ पाच पुजाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत भाविकांची गर्दी झाली.

दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो. रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर 'अंबा माता की जय'च्या जयघोषात रथोत्सवाची सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, समितीच्या खजिनदार वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, प्रमोद पाटील, सचिव विजय पवार उपस्थित होते.

वाहनाच्या नगरप्रदक्षिणेत देवीच्या रथापुढे मानाचा घोडा होता. रथावर देवीचा चोपदार, हवालदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक होते. परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. फुलांनी तसेच विद्युतदिव्यांनी सजवलेल्या रथामध्ये श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती होती. बँड पथके, लेझीम पथके, चौऱ्या आणि मोर्चेल धरणारे सेवक, अशा लवाजम्यासह हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे रथ गुजरी कॉर्नर येथे आला. भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. एम.एल.जी. गर्ल्स हायस्कूल येथे महालक्ष्मी स्पोर्टसने आकर्षक रांगोळी रेखाटली. श्री महालक्ष्मी आरती व आध्यात्मिक सेवा मंचातर्फे प्रसाद वाटप करण्यात आला. पारंपारिक मार्गावरुन रथ मंदिरात आल्यानंतर सांगता झाली. रविवार, जोतिबाची पहिली पाकाळणी आणि रथोत्सव असा तिहेरी संगम आल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली. महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे झुणका-भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आले. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे संपूर्ण गुजरी आणि महाद्वार मार्गावर व्हाइट मेटल लाइटस्‌ उजळल्या. मुंबई आणि सांगलीच्या रंगावलीकारांनी रांगोळ्यां रेखाटल्या होत्या. भाविकांना सुमारे पंधराशे किलो प्रसाद मंडळातर्फे वाटप झाले. गुजरी कॉर्नरला अंबाबाईची भव्य प्रतिकृती उभी करण्यात आली. बाबासाहेब मुल्ला आदर्श विचारमंचतर्फे गेली १८ वर्षे रथावर पुष्पवृष्टी केली जाते. बालगोपाल तालीम समोरील 'भोसले प्लाझा' या इमारतीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोमवारी (ता. २) होत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अंबाबाईला साकडे

माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नेते रथोत्सवात सहभागी होत अंबाबाईला साकडे घातले. या नेत्यांनी घाटी दरवाजा जवळ रथ ओढला. यावेळी आमदार पवार म्हणाले, 'राज्याची सद्यस्थिती जनतेला माहिती आहे. भाजप सरकार चुकीचे धोरण, कारभार करीत आहे. बेजाबदार कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहिल्यास, त्यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते विरोध करीत आहेत. राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी बोलत नाही. सरकार विरोधात लोक स्पष्टपणे बोलू लागले आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा वारसा भाजप सरकारकडून जपला जात नाही. राज्य'भाजप' मुक्त कर, एवढीच प्रार्थना अंबाबाई चरणी आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामसेवकास मारहाण.. माजी सारपंचाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद

0
0

ग्रामसेवकास मारहाणप्रकरणी

माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील विकासकामाचा ताबा घेण्यास नकार दिल्याबद्दल ग्रामसेवकास मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला धमकावून कामात अडथळा आणल्याबद्दल शाहूवाडी पोलिसांत माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी : शित्तूर वारुण ढवळेवाडी दरम्यान नवीन साकव पूल बांधण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने या विकासकामाचा ताबा घ्यावा म्हणून ग्रामसेवक बुधाजी दादू कडवेकर (वय ४२, रा. सोनवडे, ता. शिराळा) यांना माजी सरपंच तानाजी बापू भोसले यांनी शनिवारी सकाळी ताबापट्टीवर स्वाक्षरी करण्यास दरडावले असता ग्रामसेवक कडवेकर यांनी सदस्यांच्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा करून तसा रितसर ठराव मंजूर झाल्यानंतर सकवाच्या ताबापट्टीवर सही करतो, असे माजी सरपंच भोसले यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या भोसले यांनी ग्रामसेवकांना शिवीगाळ करून मारहाण करून जावे मारण्याची धमकी दिली. सरकारी कर्मचाऱ्यास धमकावून कामात अडथळा आणल्याचा गुन्हा रात्री उशिरा शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

00000000000000

विवाहिता बेपत्ता

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

येलूर पैकी पायरवाडी (ता. शाहूवाडी) येथील मालूबाई आत्माराम शिंदे (वय ४५) ही विवाहिता कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ प्रकाश केशव मोरे यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली आहे. रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, उंची पाच फूट दोन इंच, कानात रिंगा पायात जोडी, चप्पल, अंगावर अबोली रंगाची साडी असे तिचे वर्णन असून फिर्यादी भावाच्या घरातून ती बेपत्ता झाली आहे.

00000

डंपरची एसटी बसला धडक

बसचालक जखमी, बसचे ७५ हजारांचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील गोगवे (ता. शाहूवाडी) गावानजीकच्या अपघाती वळणावर भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचालक जखमी झाला. अघातात बसचे सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एम. एस. शेळके (रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे जखमी बसचालकाचे नाव आहे. डंपरचालकावर शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : मलकापूर-कोल्हापूर एसटी बस (एमएच ४० एन ९२३१) कोल्हापूरच्या दिशेने चालली असता रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मलकापूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या डंपरने (एम एच ०६ ८५९२) गोगवेच्या पुढील अपघाती वळणावर बसला जोरदार धडक दिली. बसला समोरून चालकाच्या बाजूला डंपरची धडक बसल्याने बसचालक शेळके गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी वाहनाने तत्काळ बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तसेच काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले. डंपरच्या धडकेत बसचे सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले आहे. एसटी वाहक जयश्री पवार (रा. सागाव, ता. शिराळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरचालक संदीप दि. पाटील (केर्ले-आंबा, ता.शाहूवाडी) याच्याविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बसमधील पाच प्रवासी जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरु महामार्गावर किणी टोल नाक्यावर शिवशाही एसटी बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने सीटच्या पाइपवर आदळून पाच प्रवाशी जखमी झाले. रविवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. आनंद शरद कुलकर्णी, गार्गी मिलिंद कुलकर्णी, प्रशांत प्रकाश पाटील, मारुती सुभाषराव गायकवाड, मिलिंद शरद कुलकर्णी (रा. सर्व पुणे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने सीपींआरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.

कोल्हापूर-पुणे मार्गावरुन धावणारी शिवशाही एस.टी. बस रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडली. बसमध्ये ३५ ते ४० प्रवाशी होते. किणी टोल नाक्याजवळ बस आल्यानंतर चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे बसमधील प्रवाशी सीटच्या पाइपवर आदळले, पाच प्रवाशांच्या तोंडाला, डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते. अपघाताची माहिती समजल्यावर जखमींच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. या अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

shivsena

0
0

शिवसेना कर्नाटकात

६० जागा लढविणार

मुंबई

गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटकच्या रणांगणात उतरण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५० ते ६० जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बाबतची माहिती दिली. 'शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. ५० ते ६० जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करू,' असं सांगतानाच 'सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवत असल्याने समितीच्या उमेदवारांसमोर आम्ही उमेदवार देणार नाही,' असे राऊत यांनी स्पष्ट केले.

'राज्यपालांच्या प्रत्येक अभिभाषणात सीमाभागाचा उल्लेख असतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमध्ये एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी यायला हवे. त्यांनी नवा पायंडा पाडावा, तरच त्यांनी स्वत:ला अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घ्यावे,' असा टोलाही राऊत यांनी लगावला.

'अमित शहा यांनी आपल्याच विधानांनी कर्नाटकात जो गोंधळ उडवला आहे, त्यामुळे भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कर्नाटकचे निकाल काय लागतील हे आत्ताच कुणी सांगू शकत नाही, सध्या तरी काँग्रेस दोन पाऊल पुढे आहे. मात्र आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अन्य नेते प्रचारात उतरल्यावरच नेमकं चित्रं स्पष्ट होईल,' असं ते म्हणाले. सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुका लढणार नाही. सीमाभागात इतर पक्षांनीही निवडणुका लढवू नयेत. जोपर्यंत सीमाभागाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकांना पदे

0
0

फोटो आहेत

घाटगे, गोंजारे

भाजपचे पदाधिकारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांची भाजपच्या महानगर उपाध्यक्षपती तर मोहन गोंजारे यांची चिटणीसपदी नियुक्ती केली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एक वर्षातच पक्षाचे पदाधिकारी बनवले. पक्षाच्या कार्यक्रमांमधील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

घाटगे हे महापालिकेतील काँग्रेसचे माजी सभागृह नेते होते. त्यांची जिल्हा महानगरच्या उपाध्यक्षपदी तर माजी उपमहापौर असलेले मोहन गोंजारे यांची चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्येच या दोघांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे देण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत वेतनाचा तिढा सुटला

0
0

थकीत वेतनाचा

तिढा सुटला

कोल्हापूर: अतिरिक्त समायोजन, ऑनलाइनचा घोळ, बदली मान्यता यासह विविध कारणांमुळे एक हजारहून अधिक शिक्षकांचे वेतन थकले होते. थकीत वेतन उपलब्ध व्हावे यासाठी कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघ आणि टीडीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने थकीत वेतनासाठी लढा सुरू होता.

एका वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असणाऱ्या थकीत वेतनाचा तिढा सुटला असल्याची माहिती महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक यांनी दिली. शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी शिक्षक संघातर्फे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करत याप्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या लढ्याला यश आल्यामुळे ४२ शाळांची वर्षभराची वेतन प्रतीक्षा संपली. हे वेतन पाच एप्रिलपर्यंत दिले जाणार आहे. थकीत वेतनाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अध्यक्ष वरक, संजय सौंदलगे, ईश्वरा गायकवाड, दत्तात्रय चौगुले, रघुनाथ मांडरे, प्रशांत जाधव, सजय सांगले, राजाराम कांबळे आदींनी पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images