Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

िशंदे

$
0
0

'शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते असलेले भाई आमचे मोठे बंधू होते. राज्याचे गृह राज्यमंत्रीपद असो की पुण्याचे महापौरपद असो, भाईंनी कसल्याच गोष्टीचा कधी गर्व केला नाही.

अखेरच्या श्वासापर्यंत भाईंनी समाजवादाची कास सोडली नाही. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही.

श्रीपतराव शिंदे, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कायद्याचे ज्ञान व धाक प्रबळ होणे आवश्यक

$
0
0

कायद्याचे ज्ञान व धाक नसल्यानेच महिलांच्या अत्याचारात वाढ

न्या. उमेशचंद्र मोरे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण बदलून आता अन्याय होत असेल तर शहाण्याने कोर्टाची पायरी चढावी अशी रूढ करावी लागेल. समाजात महिलांविषयी कायदे कठोर असूनही केवळ महिलांना कायद्याचे ज्ञान व समाजाला कायद्याचा धाक नसल्यानेच महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे,' असे प्रतिपादन विधी व न्याय प्राधिकरणाचे न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी केले.

हुंडाबळीच्या त्रासातून गेल्यावर्षी आत्महत्या केलेल्या कोल्हापूरच्या कै. आरती पाटील हिच्या पहिल्या स्मृतीनिमित्त पाटील कुटुंबीयांनी आरती पाटील फाउंडेशनची स्थापना केली आहे. या मंचतर्फे आयोजित व्याख्यानात न्यायाधीश मोरे बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'भारतीय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थान... प्रश्न व सोडवणूक' या विषयावर बोलताना न्या. मोरे म्हणाले, 'वैदिक काळात स्त्रीला सन्मान दिला जात होता. कौटिल्ययुगानंतर स्त्रीवर अधिकार गाजवून तिचे शोषण करणारी पुरूषी मानसिकता वाढीस लागली. सध्याच्या युगात स्त्रीची सुरक्षितताच धोक्यात आल्यामुळे कायद्याचा योग्य वापर केल्यास ही समाजव्यवस्थेतील कीड नष्ट होऊ शकते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१६ च्या अहवालानुसार एकूण गुन्ह्यापैकी २.९ टक्के गुन्हे महिलांसंदर्भात होतात. यामध्ये छेडछाड, कौटुंबिक कलह, मुलांचा ताबा व हुंडाबळी यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय हा राज्यघटनेचा आत्मा आहे. घटनेत २९ कायदे महिलांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. महिलांना अबला बनवण्यात अनेकदा महिलाद्वेष कारणीभूत ठरतो याचाही विचार केला पाहिजे. महिलांनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होत असताना कायदेशीर ज्ञानही मिळवले पाहिजे.' प्रास्ताविकात डॉ. बी.एम. पाटील यांनी फाउंडेशनचा उद्देश सांगितला. ज्योती भालकर यांनी निवेदन केले. यावेळी फाउंडेशनचे सचिव एम. आर. पाटील, अॅड. प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.

..........

चौकट

समुपदेशनाच्या माध्यमातून १०० संसार मार्गी

कौटुंबिक कलहातून उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेले १०० संसार समुपदेशनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी गेल्या वर्षभरात जिल्हा न्याय व विधी प्राधिकरणाला यश आल्याची माहिती मोरे यांनी दिली. यामुळे वेळ, पैसा व शक्तीची बचत झाली असून गैरसमजातून होणारे वादही टाळले आहे. तसेच येत्या मे महिन्यापासून न्याय व विधी प्राधिकरणातर्फे सहा शाळांमध्ये कायदा साक्षरता चळवळ राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पौंगडावस्थेतील मुलांमध्ये येणारी आक्रमकता व त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कायदा साक्षरता कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी उदयासाठी

$
0
0

पालखी सोहळा : फिरंगाई देवी पालखी सोहळा , स्थळ : फिरंगाई मंदिर, शिवाजी पेठ, वेळ : सकाळी ८.०० वाजता

वितरण : अवनि संस्थेतर्फे प्लास्टिकमुक्त शाळा प्रमाणपत्र वितरण, स्थळ : भाऊराव पाटील विद्यामंदिर, कदमवाडी, वेळ : सकाळी ९.१५

नेत्रतपासणी : सर्वमंगल सेवासंस्थेतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर, स्थळ : नेत्रोपचार केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली, वेळ : दुपारी ३.०० वाजता

व्याख्यान : सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे सुरेश शहा यांचे 'हॅपीनेस थेरपी' या विषयावर व्याख्यान, स्थळ : महसूल भवन, मिरजकर तिकटी, वेळ : दुपारी ४.३०

चित्रप्रदर्शन : युगेन चित्रप्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक कलादालन, वेळ : सकाळी दहा ते रात्री आठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आाजरा ... सभा

$
0
0

फोटो

.................

मुजेरांच्या हाती

सत्ता देऊ नका

आजऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीच्या प्रचार मेळाव्यात हसन मुश्रीफ

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'आजरा तालुक्यामध्ये हेकेखोर आणि मुजोर वृत्ती वाढते आहे. शहराच्या विकासाला ती मारक आहे. त्याऐवजी विकासाचे राजकारण करणारी मंडळी हवी आहेत. हेकेखोर वृत्तीपेक्षा विकासाचे व्हिजन असणाऱ्या मंडळींना आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीत आम्ही स्थान दिलेले आहे. नगरपंचायत राजकारणातून अशी हेकेखोर वृत्ती हाकलून द्या', असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या वाडा गल्ली येथे आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी भाजप आघाडीचे नेते अशोक चराटी यांचे नाव न घेता घणाघाती टीका करण्यात आली.

मुश्रीफ म्हणाले, 'आजरा परिसराला निसर्ग वरदान लाभले आहे. याचा फायदा करून घेत गोवा व कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी येथील पर्यटन स्थळे विकसित केली पाहिजेत. ते व्हिजन घेऊनच आजरा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आणि कोल्हापूर व कागलप्रमाणे विकास करण्यासाठी आमची आघाडी बांधील आहे.'

के.पी. पाटील म्हणाले, 'अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात सत्ताधारी सत्तेत आले. पण अच्छे दिन शोधावे लागले आहेत. अशा भाजप पक्षाच्या आघाडीसह तेथून फुटून बाहेर पडलेल्या असंतुष्टांच्या तिसऱ्या आघाडीलाही भुईसपाट करावे.' यावेळी आघाडीचे नेते जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, नामदेव नार्वेकर, विष्णू केसरकर, विद्याधर गुरबे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी ...

$
0
0

'हुतात्मा स्मारक हुपरी

नगरपरिषदेने ताब्यात घ्यावे'

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हुपरी (ता.हातकणंगले) येथील पंचायत समितीच्या नावावरील हुतात्मा स्मारक व क्रीडांगण नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेऊन व्यवसायासाठी गाळे उभारावे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी सरपंच आप्पासाहेब देसाई व दिनकरराव ससे यांच्यासह राजगुरुनगर परिसरातील शहरवासीयांनी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

दरम्यान, येत्या आठवड्यात महसूल विभागाकडे पाठपुरावा करुन हुतात्मा स्मारक व क्रीडांगण नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याचे आश्वासन नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट व उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे यांनी शिष्टमंडळाला दिले.

या निवेदनात म्हटले आहे, सन १९८३ साली राज्य सरकारने मध्यवर्ती ठिकाणी भव्य हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. या हुतात्मा स्मारक व क्रिडांगणाची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी हा संपूर्ण परिसर हातकणंगले तहसीलदार कार्यालयाने पंचायत समिती यांच्या ताब्यात दिला आहे. ही वस्तुस्थिती असताना गेल्या अनेक वर्षांपासून स्मारक परिसराचा बेकायदेशीर कब्जा एका व्यक्तीने घेतला असून या व्यक्तिच्या मनमानी कारभाराचा मानसिक त्रास शहरवासियांना सोसावा लागत आहे. तसेच कोणत्याही सरकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता या स्मारक परिसराला बेकायदेशीररित्या संरक्षक भिंत घालण्याचा उद्योग चालविण्यात येत आहे.या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग व नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरवासियांच्या मागणीनुसार सरकारच्या मालकीचे हुतात्मा स्मारक व क्रिडांगण परिसर नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेऊन येथे व्यावसायिक गाळे उभारुन नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करावी. शिष्टमंडळात मानसिंगराव देसाई, प्रतापसिंह देसाई, नानासाहेब भोसले, प्रदीप ठोंबरे,अभिनंदन गाट, राणोजी ठोंबरे, तानाजी पाटील,अभिनव गोंधळी,जयकुमार देसाई,भरत देसाई आदीचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यफूल .१

$
0
0

राधानगरी परिसरात शेतकरी सूर्यफुलशेतीकडे वळू लागल्याचे चित्र दिसत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा सूर्यफूल लागवडीत वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकात आंतरपीक म्हणून सूर्यफूल घेतले आहे. सध्या सुर्यफुलाचा दर २८०० रुपयांपासून ३२०० रुपयांपर्यंत आहे.

...............

आनंद चरापले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लीड ...

$
0
0

ग्रामीण पार्श्वभूमीचा कोणताही न्यूनगंड न बाळगता किंबहुना ग्रामीण पार्श्वभूमी हेच आपले बलस्थान आहे, या जिद्दीने यशाला गवसणी घालणाऱ्या राहुल पाटील यांचा ग्राामीण भागातील एक सामान्य मुलगा ते भारतीय वनसेवा अधिकारीपर्यंतचा प्रवास रोमांचक आणि प्रेरणादायी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी मेळावा पान तीन...

$
0
0

राज्यकर्त्यांमध्ये धमक नाही

दसरा चौकातील सभेत अजित पवार यांचा टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सत्तेवर येताच धनगर आरक्षण, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती. चार वर्षांच्या कालावधीत धनगर आरक्षणापासून लिंगायत आरक्षणापर्यत कशाचाही पत्ता नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी उध्दवस्त होत आहे. शेतीमालाला भाव नाही. ऊस उत्पादक, कांदा उत्पादक, बटाटे उत्पादकांचे वाटोळे झाले. सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये मार्ग काढायची धमक नाही,' असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित दसरा चौक येथील हल्लाबोल सभेत लगावला.

पवार म्हणाले,' राष्ट्रवादी सत्तास्थानी असती, शरद पवार मंत्रीपदावर असते तर या प्रश्नी निश्चित मार्ग काढला असता तेवढी त्यांच्यात ताकद होती. वयाची नव्वदी ओलांडलेल्या एन.डी. पाटील यांना शेती वीज पंपासाठी या वयात आंदोलन करावे लागते यावरुन हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती असंवेदनशील आहे याची प्रचिती येते. कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कर्नाटकाविषयी इतके प्रेम असेल तर त्यांनी तिकडेच जाऊन राहावे. भाजपला पैशाची मस्ती आहे. सत्ता आणि पैशाच्या ताकदीवर इतर पक्ष फोडण्याचा उद्योग सुरु केला आहे. कोल्हापूर महापालिकेत स्थायीच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडले. भाजपचा सभापती केला. घोडेबाजार झाल्याशिवाय हे नगरसेवक फुटणार नाहीत. पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्रतेची कारवाई होणार हे माहित असताना ते फुटले याचा अर्थ यासाठी तोडपाणी झाली आहे. कन्नडचे सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाच कोटीची ऑफर होती हे त्यांनीच जाहीर केले होते. दीडशे कोटी रुपयांचे आमिष दाखवून तीस आमदार फोडण्याचा भाजपचा डाव होता.'

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षापूर्वी देशातील १२५ कोटी जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत फसवले. राज्याची सत्ता ताब्यात आल्यानंतर सरसकट कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र या सरकारची सरसकट कर्जमाफीची दानत नाही. प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा मोदी यांनी केली होती. चार वर्षाच्या कालावधीत पंधरा पैसेही जमा झाले नाहीत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरेद्र अशी स्थिती बनली आहे. सहा कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे भाजप नेते आता तरुणांना पकोडे तळायला सांगतात.' प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप हे खोटारडे आणि फसवे सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असे सांगितले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने राज्य आणि केंद्रातील थापाडे सरकार हटविण्याचा संकल्प करु या असे आवाहन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर आर. के. पोवार यांनी आभार मानले.

..............

बिद्रे प्रकरणाचा तपास दाबून ठेवला

पवार म्हणाले, ' राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलीय. कुणाचा पायपोस कुणाला नाही. पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर याने ज्युनिअर महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून केला. कटरने शरीराचे तुकडे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले. वास्तविक कुणावर अन्याय होऊ नये यापध्दतीने कामकाज करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. मात्र पोलिस खात्याचे गेल्या काही महिन्यात धिंडवडे निघाले आहेत. बिद्रे प्रकरणाचा तपास दाबून ठेवला. कित्येक महिने कुरुंदकर बिनधास्तपणे फिरत होता. मात्र याचे उत्तर सरकार देत नाही. '

...........

कार्यकर्त्यांना कानपिचक्या

'एकच वादा कसल्या घोषणा करताय, पहिल्यांदा आमदार निवडून आणा. तिकिटे दिलेल्या उमेदवाराला आमदारकीच्या निवडणुकी पाडता, विधानसभेत मी एकटा जाऊन काय करु. दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आणि मी सहा सहा वेळेला निवडून येतो. कोल्हापूर आणि सांगली भागात समान विकासकामे झाली आहेत. पण विधानसभा निवडणुकीत के. पी. पाटील यांचा ५० हजार मतांनी पराभव कसा होतो. वादा कसला करताय, अगोदर राष्ट्रवादीच्या आमदारांना निवडून आणा', अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. दरम्यान, सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री' असा करताच कार्यकर्त्यांनी शिट्टया,टाळ्यांचा वर्षाव केला.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,जयंत पाटील, माजी खासदार निवेदिता माने, रणजितसिंह मोहिते पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार के. पी. पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ, आदिल फरास, उपमहापौर सुनील पाटील, व्ही.बी. पाटील, प्रताप माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, मदन कारंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखेआदींची प्रमुख उपस्थिती होती. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप राजवटीत राज्य कंगाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकारच्या राजवटीत समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्याला कंगाल आणि कर्जबाजारी करण्याचे पाप या सरकारने केले आहे. या नाकर्त्या सरकारला सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय जनता सुखी होणार नाही,' असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारपासून कोल्हापुरात हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दसरा चौक येथील जाहीर सभेत बोलताना पवार यांनी राज्यातील शेतकरी, बेरोजगार, व्यापारी आणि नोकरदार या सर्व घटकांची फसवणूक झाल्याचा आरोप केला. भाजप सरकार राज्य कारभार हाकण्यात अपयशी ठरले आहे. चार वर्षांच्या काळात राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर झाल्याचे सांगून पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरण, कोरेगाव भीमा प्रकरण, सांगलीतील अनिकेत कोथळे व पंढपुरात गुढीपाडव्यादिवशी घडलेल्या खुनाच्या घटनांचा संदर्भ घेत राज्यातील बिघडलेल्या कायदा, सुव्यवस्थेबाबत सरकारवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नाही. त्या मागील मास्टरमाइंड हाती लागत नाही. सरकार करतेय तरी काय? आघाडी सरकारच्या कालावधीत राज्यावर पावणे तीन लाख कोटींचे कर्ज होते. आता पायाभूत सुविधांसह हा कर्जाचा आकडा आठ लाख कोटींपर्यंत पोहचला आहे. भाजप सरकारच्या कालावधीत राज्य कर्जबाजारी झाले आहे.'

भाजपला पैशाची मस्ती चढली असून भ्रष्ट राज्यकर्त्यांनी धनदांडग्यांना अभय आणि सामान्यांचे आर्थिक शोषण सुरु केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे देशाची वाटचाल सुरु आहे. मात्र भाजप सरकार संविधान बदलण्याची भाषा करत आहे. भाजपला संविधान बदलण्याची कसली मस्ती आलीय आणि कसल्या धुंदीत भाजपचे मंत्री असे बोलत आहेत‌? असा सवालही पवार यांनी केला.

...

स्मारकाची उंची कमी केल्यास माफी नाही

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधीत अरबी सम्रुदात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा साकारण्याचा आराखडा तयार केला. आता भाजप सरकार पुतळ्याची उंची कमी करण्याचा खटाटोप करत आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या स्मारकाची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता माफ करणार नाही, हे जनतेने दाखवून द्यावे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अरबी समुद्रात शिवस्मारक, इंदू मिल परिसरात आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम भाजपवाले करत आहेत. मात्र कुदळ मारण्यापलीकडे काहीही झालेले नाही. स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजात अंतर निर्माण करण्याचे कारस्थान सुरु आहे. या भ्रष्ट सरकारला सत्तेवरुन खाली खेचून जनेतला सुखी करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत, रहा, असे आवाहन पवार यांनी केले.

...............

३७.८

२१.५

.............

आर्थिक वर्षाची 'भेट'

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भई वैद्य प्रतिक्रिया

$
0
0

'ज्येष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी सेवादलात दिशा देण्याचे काम केले. त्यांचे निधन झाले ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. त्यांच्या निधनामुळे समाजवादी आणि पुरोगामी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

-गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त साखर कारखाना

............................

'आजरा तालुक्यातील उत्तूरसारख्या छोट्या गावातील आंतरभारतीसारख्या शैक्षणिक संस्थेशी भाई वैद्य यांचा जिव्हाळा म्हणजे गावागावातील समाजवादी विचारांच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्नच होता. अखेरपर्यंत त्यांनी दुर्बल आणि उपेक्षितांसाठी आयुष्य वेचले. अशा व्यक्तित्वाचे जाणे म्हणजे सध्याच्या अराजकसदृश्य स्थितीत मोठी पोकळी निर्माण होण्यासारखे आहे.

अनंतराव आजगावकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, आंतरभारती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांच्या तक्रारी दाखल करण्यास टाळाटाळ

$
0
0

महिलांच्या तक्रारी बेदखल

पोलिस ठाण्यांतील असहकार्यामुळे महिला सुरक्षा धोक्यात

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर 'धमकी दिली म्हणून लगेच तुमच्यावर हल्ला होईलच असे नाही...'आणि 'त्याने काही हल्ला केला तर तेव्हा या तक्रार द्यायला.' तक्रार देण्यासाठी आलेल्या छेडछाडग्रस्त महिलेला पोलिसांकडून मिळालेले हे उत्तर. साहेब, मला दुकानमालक त्रास देतोय तर 'मी इथेच तक्रार करू का?' या प्रश्नावर, इथे नाही, 'दिल्लीला जा तक्रार करायला' अशा शब्दात पोलिसांकडून उडवलेली खिल्ली. गेल्या आठवड्यात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घडलेले हे दोन प्रसंग. फेसबुकवरून आलेल्या अश्लील मेसेजविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीची तक्रार घेण्याऐवजी, 'तू दिसायला इतकी सुंदर आहेस की कुणीही तुला असे मेसेज पाठवेल. त्यामध्ये त्याची काय चूक' असा संतापजनक प्रश्न करणारा करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस. चंदगड, गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलींवरच प्रश्नांचा भडिमार करत परस्पर मिटवण्याचा सल्ला देणारे पोलिस. या घटना आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील. एकीकडे निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी देशभर मोहीम राबवली जात असताना तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडून होत असलेली टाळाटाळ पोलिस खात्यातील असंवेदनशीलता दाखवणारी आहे.

२२ मार्च रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात छेडछाड झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना पोलिसांकडून असहकार्याचा व चेष्टा केल्याचा अनुभव आला. यापैकी एका महिलेला शिवाजी पेठ परिसरातील एका तरुणाकडून धमकीचा संदेश मिळाला. संशयित तरुणाचे नावदेखील त्या महिलेला समजले. त्यानुसार ती महिला २२ मार्चच्या सायंकाळी सात वाजता जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता ठाणे अंमलदार अशोक खोत ड्युटीवर होते. धमकीचा संदेश आला असून त्या तरुणाकडून जीवाला धोका असल्याची तक्रार नोंदवण्याची मागणी महिलेने खोत यांच्याकडे केली असता, 'अशी तक्रार देता येत नाही' असे त्यांनी सांगितले. तसेच 'त्याने जर काही हल्ला केला तरच तक्रार दाखल करा,' असा अजब सल्लाही दिला. 'किमान तक्रार तरी नोंद करा' असे सांगणाऱ्या तक्रारदार महिलेला त्यांनी महिला कक्षात पाठवले. याठिकाणी महिला पोलिस एस. एस. चव्हाण त्यांच्या अन्य महिला व पुरुष पोलिस सहकाऱ्यांसोबत उपस्थित होत्या. संबंधित महिलेने आपली तक्रार व धमकी देणाऱ्या तरुणाकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यावरही चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अद्याप 'त्या तरुणाने काही हल्ला केलाच नाही तोपर्यंत उगीच कशाला दंगा करता' असे म्हणत तक्रार नोंदवण्यास असमर्थता दर्शवली. तसेच 'एस.पी. ऑफिसला जाऊन झेड सुरक्षा मागवा, असा चेष्टावजा सल्ला दिला.

पापाची तिकटी येथे एका कापड दुकानात काम करणाऱ्या महिलेलाही दुकानमालकाकडून होणाऱ्या छेडछाडीविरोधात तक्रार द्यायची होती. अशिक्षित असल्यामुळे तिला नेमक्या कोणत्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यायची याची माहिती नव्हती. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन तिने 'घडल्या प्रकाराची तक्रार मला कुठे देता येईल' असा प्रश्न विचारला असता ठाणे अंमलदार अशोक खोत यांनी तिच्या प्रश्नाची खिल्ली उडवत 'दिल्लीला जा आणि तक्रार करा असे सांगितले. खोत यांच्या उत्तराने ती भांबावून गेली. तिला त्रास देणाऱ्या दुकानमालकाचे दुकान कोणत्या भागात येते, त्यानुसार पोलिस ठाण्याचे नाव सांगून तिला मदत करण्याऐवजी तिच्या अशिक्षितपणावर खोत यांनी मनोरंजन करून घेतले.

फेसबुकवरून अश्लील संदेश आल्याची तक्रारही पोलिसांनी नोंदवून न घेतल्याची तक्रार एका तरुणीने विधी व न्याय विभागाच्या कोल्हापूर प्रतिनिधीकडे केली आहे. तसेच मध्यरात्री पतीने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलेला तक्रार नोंदवण्याऐवजी 'नवरा विनाकारण मारत नाही' असे सांगत वाटेला लावण्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या मदतीची अपेक्षा नसल्याने सध्या ही महिला नवऱ्याच्या भीतीने सुधारगृहाच्या आसऱ्याला गेली आहे. गेल्या वर्षभरात निर्भया पथकाद्वारे जिल्ह्यातील ३५ हॉटस्पॉटवर लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती निर्भया पथकातर्फे सांगण्यात आली. महिला सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या कायद्यान्वये छेडछाडबाबत तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी नियुक्त करावा, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ही कार्यवाही होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यापैकी केवळ नेसरी पोलिस ठाण्यात महिला पोलिस निरीक्षक आहे. उर्वरित ठिकाणी पुरुष पोलिस निरीक्षक आहेत. त्यामुळे तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलींना ठाणे अंमलदारापर्यंतच सहकार्य मिळत नसल्याने त्या वरिष्ठ पातळीवर संपर्क साधण्याचे धाडस दाखवत नसल्याचे चित्र आहे.

पोलिसच जेव्हा अश्लील बोलतात...

काही दिवसांपूर्वी करवीर पोलिस ठाण्यातही एका तरुणीला पोलिसातील सडकसख्याहरीचा अनुभव आला. संबंधित तरुणी फेसबुकवरच्या फोटोवर अनोळखी तरुणाकडून तिला अश्लील मेसेज व फोन आले. खबरदारी म्हणून तिने फेसबुकवरून फोटो डिलीट केला. मात्र भविष्यात पुन्हा अश्लील फोन येऊ नयेत, यासाठी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावेळी तिने तक्रारीचे स्वरूप सांगितले असता, 'तू दिसायला इतकी सुंदर आहेस त्यामुळे कुणीही तुझ्याशी 'तशा' भाषेत बोलले तर त्यांची काय चूक? मलाही तुझ्याशी तसे बोलावे वाटेल.' अशाप्रकारे पोलिसाने त्या तरुणीशी संवाद साधला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तडक महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी भेट घेतली. ज्यांच्याकडे तक्रार दाखल करायची ते पोलिसच जर अश्लील भाषेत बोलत असतील तर याबाबत पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

निर्भया पथकाचे दुर्लक्ष

गेल्या आठवड्यात बाबुजमाल परिसरातील एका साडीच्या दुकानात काम करणाऱ्या युवतीला रोज त्रास देणाऱ्या युवकाला तिने रस्त्यातच मारहाण केली. तर दररोज छेडछाडीचे प्रकार घडत असतात, पोलिस तसेच निर्भया पथक या प्रकारांकडे कानाडोळा करत असल्याने तरुणांचे फावत असल्याचा आरोप केला जात आहे.

तक्रार दाखल करण्यासाठी जाणाऱ्या महिलांची तक्रार नोंदवून न घेण्याचा प्रकार पोलिसांकडून केला जात आहे. सुरुवातीला छेडछाड केली जाते व त्याचे पर्यावसान खून, बलात्कार अशा गंभीर प्रसंगांमध्ये होत असते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महिलांची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यास महिला तक्रार देण्यासाठी पुढे येणार नाहीत. परिणामी छेडछाड करणारे, धमकी देणारे तरुण पोलिसांच्या असहकार्यामुळे मोकाट राहण्याची भीती आहे.

ज्योती भालकर, सामाजिक कार्यकर्त्या

तक्रार देण्यासाठी येणाऱ्या महिलांची समस्या जाणून त्यांची तक्रार प्राधान्याने दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर तरुणींना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून न घेतल्याचा अनुभव आला असेल त्यांनी मुख्य पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधावा. अशाप्रकारे जर घटना घडत असतील तर ते चुकीचे आहे.

अनिल गुजर, पोलिस निरीक्षक जुना राजवाडा पोलिसठाणे

मूळ कॉपी

०००००००००००००००००

महिलांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ

बहुतांश पोलीसठाण्यातील प्रकार...महिला सुरक्षा मोहिम धाब्यावर

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

धमकी दिली म्हणून लगेच तुमच्यावर हल्ला होईलच असे नाही...आणि त्याने काही हल्ला केला तर तेव्हा या तक्रार द्यायला. तक्रार देण्यासाठी आलेल्या छेडछाडग्रस्त महिलेला पोलीसांकडून मिळालेले हे उत्तर. साहेब, मला दुकानमालक त्रास देतोय तर मी इथेच तक्रार करू का? या प्रश्नावर, इथे नाही, दिल्लीला जा तक्रार करायला अशा शब्दात पोलीसांकडून उडवलेली खिल्ली. गेल्या आठवड्यात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घडलेले हे दोन प्रसंग. फेसबुकवरून आलेल्या अश्लील मेसेजविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणीची तक्रार घेण्याऐवजी, तू दिसायला इतकी सुंदर आहेस की कुणीही तुला असे मेसेज पाठवेल. त्यामध्ये त्याची काय चूक असा प्रतिप्रश्न करणारे करवीर पोलीसठाण्यातील पोलिस. चंदगड, गडहिंग्लज पोलिसठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलींवरच प्रश्नांचा भडिमार करत परस्पर मिटवण्याचा सल्ला देणारे पोलिस. या घटना आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील. एकीकडे निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी देशभर मोहीम राबवली जात असताना तक्रार दाखल करण्यास पोलीसांकडून होत असलेली टाळाटाळ पोलीसखात्यातील असंवेदनशीलता दाखवणारी आहे.

२२ मार्च रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात छेडछाड झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना पोलीसांकडून असहकार्याचा व चेष्टा केल्याचा अनुभव आला. यापैकी एका महिलेला शिवाजी पेठ परिसरातील एका तरूणाकडून धमकीचा संदेश मिळाला. संशयित तरूणाचे नावदेखील त्या महिलेला समजले. त्यानुसार ती महिला २२ मार्चच्या सायंकाळी सात वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता ठाणेअंमलदार अशोक खोत ड्युटीवर होते. धमकीचा संदेश आला असून त्या तरूणाकडून जीवाला धोका असल्याची तक्रार नोंदवण्याची मागणी महिलेने खोत यांच्याकडे केली असता, अशी तक्रार देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याने जर काही हल्ला केला तरच तक्रार दाखल करा अशीही पुष्टी जोडली. किमान तक्रार तरी नोंद करा असे सांगणाऱ्या तक्रारदार महिलेला त्यांनी महिला कक्षात पाठवले. याठिकाणी महिला पोलीस एस. एस. चव्हाण त्यांच्या अन्य महिला व पुरूष पोलीस सहकाऱ्यांसोबत उपस्थित होत्या. संबंधित महिलेने आपली तक्रार व धमकी देणाऱ्या तरूणाकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यावरही चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अद्याप त्या तरूणाने काही हल्ला केलाच नाही तोपर्यंत उगीच कशाला दंगा करता असे म्हणत तक्रार नोंदवण्यास असमर्थता दर्शवली. तसेच एस.पी. ऑफीसला जाऊन झेड सुरक्षा मागवून असा चेष्टावजा सल्ला दिला.

पापाची तिकटी येथे एका कापड दुकानात काम करणाऱ्या महिलेलाही दुकानमालकाकडून होणाऱ्या छेडछाडीविरोधात तक्रार द्यायची होती. अशिक्षित असल्यामुळे तिला नेमक्या कोणत्या पोलीसठाण्यात तक्रार द्यायची याची माहिती नव्हती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात येऊन तिने घडल्या प्रकाराची तक्रार मला कुठे देता येईल असा प्रश्न विचारला असता ठाणेअंमलदार अशोक खोत यांनी तिच्या प्रश्नाची खिल्ली उडवत दिल्लीला जा आणि तक्रार करा असे सांगितले. खोत यांच्या उत्तराने ती भांबावून गेली. तिला त्रास देणाऱ्या दुकानमालकाचे दुकान कोणत्या भागात येते, त्यानुसार पोलीसठाण्याचे नाव सांगून तिला मदत करण्याऐवजी तिच्या अशिक्षितपणावर खोत यांनी मनोरंजन करून घेतले.

फेसबुकवरून अश्लील फोन आल्याची तक्रारही पोलिसांनी नोंदवून न घेतल्याची तक्रार एका तरूणीने विधी व न्याय विभागाच्या कोल्हापूर प्रतिनिधीकडे केली आहे. तसेच मध्यरात्री पतीने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलेला तक्रार नोंदवण्याऐवजी नवरा विनाकारण मारत नाही असे सांगत वाटेला लावण्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या मदतीची अपेक्षा नसल्याने सध्या ही महिला नवऱ्याच्या भीतीने सुधारगृहाच्या आसऱ्याला गेली आहे. गेल्या वर्षभरात निर्भया पथकाद्वारे जिल्ह्यातील ३५ हॉटस्पॉटवर लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती निर्भयापथकातर्फे सांगण्यात आली. महिला सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या कायद्यान्वये छेडछाडबाबत तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी नियुक्त करावा असे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ही कार्यवाही होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील २८ पोलिसठाण्यापैकी केवळ नेसरी पोलिसठाण्यात महिला पोलिस निरीक्षक आहे. उर्वरित ठिकाणी पुरूष पोलिस निरीक्षक आहेत. त्यामुळे तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलींना ठाणेअंमलदारापर्यंतच सहकार्य मिळत नसल्याने त्या वरिष्ठ पातळीवर संपर्क साधण्याचे धाडस दाखवत नसल्याचे चित्र आहे.

चौकट

पोलिसच जेव्हा अश्लील बोलतात...

काही दिवसांपूर्वी करवीर पोलिसठाण्यातही एका तरूणीला पोलिसातील सडकसख्याहरीचा अनुभव आला. संबंधित तरूणी फेसबुकवरच्या फोटोवर अनोळखी तरूणाकडून तिला अश्लील मेसेज व फोन आले. खबरदारी म्हणून तिने फेसबुकवरून फोटो डिलीट केला. मात्र भविष्यात पुन्हा अश्लील फोन येऊ नयेत यासाठी करवीर पोलिसठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावेळी तिने तक्रारीचे स्वरूप सांगितले असता, तू दिसायला इतकी सुंदर आहेस त्यामुळे कुणीही तुझ्याशी 'तशा' भाषेत बोलले तर त्यांची काय चूक...मलाही तुझ्याशी तसे बोलावे वाटेल. अशाप्रकारे पोलिसाने त्या तरूणीशी संवाद साधला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरूणीने तडक महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी भेट घेतली. ज्यांच्याकडे तक्रार दाखल करायची ते पोलिसच जर अश्लील भाषेत बोलत असतील तर याबाबत पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

गेल्या महिन्यात गाडीला कट मारून अश्लील टोमणा मारणाऱ्या दोन युवकांना दीपाली खाडे या महिलने पाठलाग करून भररस्त्यात चोपले. तर गेल्या आठवड्यात बाबुजमाल परिसरातील एका साडीच्या दुकानात काम करणाऱ्या युवतीला रोज त्रास देणाऱ्या युवकाला तिने रस्त्यातच मारहाण केली. पोलिस तसेच निर्भया

कोट

तक्रार दाखल करण्यासाठी जाणाऱ्या महिलांची तक्रार नोंदवून न घेण्याचा प्रकार पोलीसांकडून केला जात आहे. सुरूवातीला छेडछाड केली जाते व त्याचे पर्यवसन खून, बलात्कार अशा गंभीर प्रसंगांमध्ये होत असते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महिलांची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यास महिला तक्रार देण्यासाठी पुढे येणार नाहीत. परिणामी छेडछाड करणारे, धमकी देणारे तरूण पोलिसांच्या असहकार्यामुळे मोकाट राहण्याची भीती आहे.

ज्योती भालकर, सामाजिक कार्यकर्त्या

कोट

तक्रार देण्यासाठी येणाऱ्या महिलांची समस्या जाणून त्यांची तक्रार प्राधान्याने दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर तरूणींना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून न घेतल्याचा अनुभव आला असेल त्यांनी मुख्य पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधावा. अशाप्रकारे जर घटना घडत असतील तर ते चुकीचे आहे.

अनिल गुजर, पोलिस निरीक्षक जुना राजवाडा पोलिसठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्सेस स्टोरी ...

$
0
0

सक्सेस स्टोरी ... लोगो

......................

सिंगल फोटो

..................

सकारात्मक विचारातून यशाला गवसणी

आयएफएस राहुल पाटील यांची यशोगाथा

कोल्हापूर

स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे तर पहिलीपासून अभ्यासात अव्वल पाहिजे, अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कोणत्याच बाबींत लक्ष घालता कामा नये हा गैरसमज भारतीय वनसेवेत कार्यरत असणाऱ्या राहुल पाटील यांच्या प्रवासाकडे पाहिले तर दूर होतो. आपले आवडीचे छंद जोपासूनही इच्छित ध्येय गाठता येते एवढेच नव्हे तर दुदेवाने शिक्षणात अडथळा आला तरी साऱ्या नकारात्मक बाबी बाजूला सारून यशावर स्वार होता येते, हे राहुल यांनी दाखवून दिले आहे. मूळचे शिराळा तालुक्यातील कणदूर येथील असणारे राहुल पाटील हे सध्या चंद्रपूर येथील बांबू केंद्राचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.

आपल्या प्रवासााबाबत सांगताना राहुल म्हणाले,'वडील मेडिकल ऑफिसर असल्याने माझे दहावीपर्यंतचे शिक्षण बिळाशी येथे झाले. माझे एक चुलते शिक्षक तर एक चुलते पैलवान होते. त्यामुळे पैलवानकीकडेही मी आकषिर्ला गेलो होतो. त्यामुळे एक पाय पैलवानकीत आणि एक पाय शिक्षणात अशी परिस्थिती होती. दोन्ही गोष्टी आवडीच्या असल्याने अभ्यासात सातवीला स्कॉलरशीप मिळाली, तर त्याकाळात सांगलीतील ८० टक्के कुस्ती मैदानात हजेरी लावली. चक्क कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत आणि सांगलीच्या वसंतदादा कुस्ती केंद्रातही काही काळ राहीलो. अकरावीला कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र अकरावीला गणितमध्ये चक्क नापास झालो. प्राध्यापकांनी आईवडीलांना बोलावून घेतले. मात्र आपल्यामुळे आईवडीलांना बोलून घ्याावे लागले, ही गोष्ट जिव्हारी लागली. गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क काढायची जिद्द बाळगली आणि ती तडीस नेली. बारावीला ग्रुपला ९३ टक्के मार्क पडल्यानंतर पुण्याच्या शिवाजी मेमोरिअल कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इथे परत पहिल्या सेमिस्टरला एकच विषय सुटला. दुसऱ्या सेमिस्टरला एकूण नऊपैकी चार विषय सुटले, पाच राहिले. त्यामुळे इअर डाऊन झाले. या अपयशामुळे डोळ्यात झणझणीत अंजन गेले. मधल्या वर्षभराच्या काळात जाणीवपूर्वक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे लक्ष दिले. सेकंड इअरपासून मात्र चांगली ग्रीप घेतली. अभ्यासाबरोबरच कॉलेजच्या सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला. परिणामी शेवटच्या वषी डिस्टींग्शन मिळाले. त्यानंतर खासगी नोकरीचाही प्रयत्न केला, मात्र पैशापेक्षा सामाजिक बांधिलकीचे भान होते. शिवाय सन्मानाने जगायचे तर अस्तित्व निर्माण केले पाहीजे, लोकांनी ओळखले पाहिजे, हे मनावर ठसले होते. त्यामुळे युपीएससी करण्याचा निर्णय घेतला. माझे जवळचे नातेवाईक पी.आर. पाटील जे सध्या नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक आहेत, ते तहसीलदार आणि डीवायएसपी पदासाठी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर होताच. साहिजकच मग झोकून देवून अभ्यासाला सुरूवात केली.'

राहुल यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास दिल्ली येथे केला. पूर्व परीक्षेसाठी भरपूर वाचन केले. खासगी क्लासेसचा आधार न घेता मित्रांशी चर्चा आणि यशस्वीतांचे मार्गदर्शन घेतले. शिवाय स्वत: नोट्स काढण्यावर भर दिला. मुख्य परीक्षेसाठी राहुल यांनी भूशास्त्र आणि वनीकरण हे विषय घेतले. इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असल्यामुळे आणि आवड असल्यामुळे भूशास्त्र विषयाचा अभ्यास करणे सोपे गेले. मात्र 'वनीकरण' च्या आकलनासाठी खूप वेळ लागत असे. मात्र सहअध्ययींशी चर्चा व पूर्वसूरींचे मार्गदर्शन घेवून विषय समजून घेतला. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना राहुल यांनी स्वत:च्या नोट्स काढल्याच शिवाय लिखाणाचा सराव केला. यामध्ये प्रेझेंटेशन चांगले करण्यावर भर दिला. त्यांचे दोन्ही विषय शास्त्रीय असल्याने संबंधित भाषा उत्तरात येणे अपेक्षित असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. पूर्वचा निकाल लागल्यानंतर दररोज दोन तास लिखाणाचा सराव आणि पेपर सोडविण्यावर भर दिला. ते तज्ज्ञांकडून तपासूनही घेतले. गट चर्चा व्हायचीच, मात्र इंटरनेटचा वापरही त्यांनी मोठ्या प्रमाणात केला.

मुलाखतीचा अनुभव सांगताना राहुल म्हणाले,' मुलाखतीत मला वेस्टर्न घाट आणि गाडगीळ समितीबाबत सखोलपणे विचारण्यात आले. कुस्ती आणि कबड्डी हे माझे छंद असल्यामुळे त्यावर विचारलेल्या प्रश्नांना खाशाबा जाधव आणि ऑलिंपिकच्या संदर्भाने सविस्तर उत्तर दिल्याने मुलाखत प्रभावी झाली.'

...............

चौकट

चाकोरीबाहेर जावून काम

राहुल पाटील यांनी चंद्रपूरमधील बांबू केंद्राचे संचालक म्हणून काम करताना चाकोरीबाहेर जावून काम केले आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या माध्यमातून आजवर त्यांनी २५० महिला आणि ५० पुरूषांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कार्यरत असताना नरभक्षक वाघाच्या एक महिना मागावर राहून त्याला प्रााणी संग्रहालयात हलविले. यासाठी जे ट्रॅकींग केले गेले, त्याचे सर्वच स्तरात कौतुक केले गेले.

.....................

कोट

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवक युवतींना राहुल पाटील सांगतात, 'केवळ क्रेझ म्हणून या नोकरीत येऊ नका. समाजातील ज्वलंत प्रश्नांसंबंधी आपण काय योगदान देवू शकतो, याचा विचार करून या सेवेत या. स्पर्धा परीक्षा ही एक प्रोसेस आहे, त्यामुळे अभ्यास एंजॉयही करता आला पाहिजे.'

राहुल पाटील, आयएफएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांच्या जयघोषात रथोत्सव

$
0
0

शिवरायांचा अखंड जयघोष

उत्साही वातावरणात शिवाजी महाराज आणि ताराराणींचा रथोत्सव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'छत्रपती शिवाजी महाराज की जय','जय भवानी, जय शिवाजी', हर...हर... महादेवचा अखंड जयघोष, ढोल, ताशांचा कडकडाट, भालदार, चोपदार, घोडेस्वार, तोफगाडी अशा उत्साही वातावरणात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी रथोत्सव झाला. भवानी मंडपात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रथोत्सवाचे उद्घाटन झाले. तुतारीने सलामी दिल्यानंतर उत्सवमूर्ती असलेला रथ मान्यवरांनी ओढल्यानंतर वाद्यांच्या गजरात जुना राजवाड्याच्या प्रवेशद्वारातून रथोत्सवाला सुरुवात झाली.

अंबाबाई रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाईंचा रथोत्सव होतो. राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून ही प्रथा सुरू आहे. सोमवारी सायंकाळपासून जुना राजवाड्याचा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. भवानी मंडपात फुलांनी सजवलेला रथ, त्यामध्ये ठेवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाईंची उत्सवमूर्ती पाहण्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी झाली होती. रात्री साडेआठ वाजता उद्घाटन झाल्यानंतर रथ मार्गस्थ झाला. रथाच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या, भव्य सप्तरंगी रांगोळ्या घातल्या होत्या. तसेच आकर्षक रोषणाई केली होती. रथोत्सवाच्या मिरवणुकीत भालदार, चोपदार ऐतिहासिक वेशभूषेत सहभागी झाले. घोडेस्वार, बैलगाड्या, तोफगाड्याही रथामागे होत्या.

रणांगण, करवीर नाद ढोल ताशा पथकातील कलाकारांनी परिसर दणाणून सोडला. सनई, चौघड्याची गाडी रथाच्या अग्रभागी होती. रथावर सेवेकऱ्यांचे पथक होते. बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे रथ पुन्हा जुना राजवाडा परिसरात आल्यानंतर रात्री उशिरा उत्सवाची सांगता झाली. रथोत्सव पाहण्यासाठी रस्त्याच्या दूतर्फा अबाल-वृद्धांसह, महिलांची मोठी गर्दी झाली होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. रथावर फुलांचा वर्षाव केला जात होता. रथ ओढण्यासाठीही रस्सीखेच सुरू होती.

लक्षवेधी रांगोळी आणि सेल्फी

भवानी मंडपात शिवप्रतिष्ठानतर्फे भव्य रांगोळी रेखाटली होती. मंडपाच्या प्रवेशद्वारात लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक जणांचे मोबाइल सरसावले. हौशी फोटोग्राफर रांगोळीची स्वतंत्र छबी टिपताना दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात विविध स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

निबंध स्पर्धेसाठी, राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर? धोरणकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे विषय आहेत.

निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा ३००० असून ए-४ कागदाच्या एकाच बाजूस स्वहस्ताक्षरात निबंध लिहावा. स्पर्धकाने १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात निबंध जमा करणे आवश्यक आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये एक हजार व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये सातशे पन्नास व प्रमाणपत्र, व तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये पाचशे व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रनायक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिकतेचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक लोकशाही असे विषय आहेत.

या स्पर्धेसाठी पोस्टर एक मीटर लांब व एक मीटर रुंद असावे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी १२ एप्रिलपर्यंत संशोधन केंद्रात नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्पर्धकाने १३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता केंद्रात पोस्टरसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२३१- २६०९३९६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००००००००

मूळकॉपी

आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

डॉ. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, निबंध स्पर्धेसाठी, राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि वैज्ञानिक दृष्टीकोन , अर्थशास्त्रज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आज असते तर, धोरणकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे विषय आहेत.

निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा ३००० असून ए-४ कागदाच्या एकाच बाजूस स्वहस्ताक्षरात लिहावा. स्पर्धकाने १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात निबंध जमा करणे आवश्यक आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये एक हजार व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये सातशे पन्नास व प्रमाणपत्र, व तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये पाचशे व प्रमाणपत्र अशी पारितोषिके दिली जातील.

पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी , राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रनायक राजर्षी छ.शाहू महाराज, छ.शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, आधुनिकतेचे प्रतीक डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक लोकशाही असे विषय आहेत.

या स्पर्धेसाठी पोस्टर एक मीटर लांब व एक मीटर रुंद असावे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी दि.१२ एप्रिलपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्पर्धकाने दि.१३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र येथे पोस्टरसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२३१- २६०९३९६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. महाजन यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या आवारातून संशयितांचे पलायन

$
0
0

कोर्टाच्या आवारातून

संशयितांचे पलायन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा कोर्टाच्या आवारातून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मंदिरात चोऱ्या करणाऱ्या संशयिताने पलायन केले. कसबा बावडा रोडवर संशयितांचा पोलिसांनी पाठलाग केला, पण पोलिसांना गुंगारा देऊन तो निसटून गेला.

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मंदिरात चोऱ्या करणाऱ्या एका संशयिताला सोमवारी कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने त्याची जामिनावर मुक्तता केली. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर संशयिताला पुन्हा अटक करण्यासाठी एका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यंत्रणा लावली होती. कोर्टाच्या बाहेर येत असताना संशयिताला पुन्हा अटक होणार याची कुणकुण लागताच तो पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग सुरु केला. कसबा बावडा रोडवरुन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, कोर्टाच्या आवारातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला अशी चर्चा सुरु झाल्यावर ताब्यात घेणाऱ्या संशयिताची जामिनावर मुक्तता झाली असल्याचे सांगून पोलिसांनी चोरटा पळून गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक बंदीबाबत लवकरच समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी काळात प्लास्टिकबंदीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, तज्ज्ञ, सरकारी अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल. त्या समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जातील', असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.

विविध संघटनांच्यावतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सोमवारी मंत्रालयात पर्यावरण मंत्री कदम यांच्यासोबत विशेष बैठक झाली. त्यावेळी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्लास्टिक बंदीमुळे राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्रातील विविध घटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबाबत मंडलेचा यांनी भूमिका मांडताना प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच संयुक्त समितीची मागणी केली. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, 'परिपत्रकामध्ये प्लास्टिकचा साठा संपवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तरीही पुणे, कोल्हापूर महापालिका कारवाई करत आहे.' यानंतर मंत्री कदम यांनी आयुक्तांना फोनवरुन अशा प्रकारची कारवाई केली जाऊ नये असे सांगितले. अन्य प्रतिनिधींनीही मंत्री कदम यांच्यासमोर मुद्दे मांडले. त्यानंतर मंत्री कदम यांनी संयुक्त समिती स्थापन केली जाईल. त्या समितीला आवश्यक ते अधिकार दिले जातील. त्यांच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

या चर्चेमध्ये इंडियन बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. इराणी, निमित पुनामिया, विनोद वाधवा, राजेश मसन, रश्मी मसन, संजय शाह, शंकर ठक्कर, तरुण जैन, राहुल कर्नावट, अतुल देशमुख, मनीष गुप्ता, राजीव ठाकरे, गोपाल शहा, अरुण दांडेकर आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्या लातूर गँगला मोक्का

$
0
0

आज्या लातूर टोळीवर मोक्का

तीन सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी उच्चभ्रू वस्तीत व्यापारी व सर्वसामान्यांवर दहशत गाजवून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या आज्या लातूरच्या टोळीला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी रात्री मोक्का लावला. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, विनयभंग, सरकारी नोकरावर हल्ले अशा १८ गंभीर गुन्हे या टोळीवर आहेत. अजय उर्फ अविनाश माने उर्फ आज्या लातूर, शुभम अजित हळदकर उर्फ पीर सुभ्या, विशाल अविनाश माने उर्फ गोट्या लातूर अशी टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

राजारामपुरी, दौलतनगर येथे आज्या लातूर टोळीची दहशत वाढू लागल्यावर विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी या टोळीवर मोक्काअंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार राजारामपुरी पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव तयार केला. प्रस्तावाची छाननी झाल्यावर पोलिस अधीक्षक मोहिते यांनी मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला. त्यांनी ताबडतोब मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. आज्या लातूरवर खुनी हल्ल्याचे दोन प्रमुख गुन्हे असून शुभम हळदकरवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. गोट्या लातूर खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या अटकेत आहे. या टोळीकडून दौलतनगर परिसरातील दहशत माजवली जात होती. गेल्या आठवड्यात आज्या लातूर टोळीवर कारवाई करावी, अशी मागणी करत नागरिकांनी मोर्चाही आणला होता. या टोळीला मोक्का लावल्याने राजारामपुरी, दौलतनगर परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यातील खंडणी, भूखंड माफिया, फाळकूट दादांवर आगामी काळात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा लोकांच्याविरुद्ध तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट स्थानिक पोलिस ठाण्यात अथवा पोलिस अधीक्षक कार्यालयास संपर्क साधावा.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

आरसी गँगवर नजर

शहरातील काही टोळ्या सक्रीय झाल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलिस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला. जवाहरनगरातील आरसी गँग, वारे वसाहत, संभाजीनगर, राजेंद्रनगर, दौलतनगर येथे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. गुन्हेगारीवृत्तीच्या टोळ्यांवर थेट मोक्काअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्रमावर बहिष्कार घालणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संवेदना सोशल फाउंडेशनचे नाव पुढे करत ४ एप्रिलला होत असलेला भीमवंदना कार्यक्रम भाजपपुरस्कृत आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी मत बँक तयार करणारा हा कार्यक्रम प्रचाराचा फंडा आहे. या कार्यक्रमावर आंबेडकरी संघटना व आंबेडकरप्रेमी जनता बहिष्कार टाकेल,' असा इशारा डॉ. आंबेडकर स्वाभिमानी जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक, उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषेदत बोलताना दिला.

यावेळी माने म्हणाले, 'भीमवंदना कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फोटोसह त्यांनी केलेल्या राजकीय कामाचे मार्केटिंग केले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीच्या व्यासपीठाचा गैरफायदा घेत निवडणूक प्रचाराचा फंडा राबवला जात आहे. डॉ. आंबेडकर जयंती ही शिक्षणदिन म्हणून साजरा करण्याचा फतवा काढणाऱ्या भाजप सरकारला डॉ. आंबेडकर हे नाव पुसून टाकायचे आहे. मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती रद्द करून त्या निधीचा वापर अन्य कामांसाठी करण्याचा घाट घातला जात आहे. भिडे, गोळवलकर यांना पाठीशी घालण्यासाठी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचे नाटक भाजप, पर्यायाने संघपरिवार सोशल फाउंडेशनला पुढे करून करत आहेत.'

शिवाजीराव परूळेकर या कार्यक्रमात आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या जनतेने सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अर्थपुरवठ्याची चौकशी करावी अशी मागणी उत्सव समितीच्यावतीने यावेळी करण्यात आली.

०००००००००००००००००००००००००

उत्सव समितीची बुधवारी बैठक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी स्वाभिमानी जयंती उत्सव समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती अध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी यावेळी दिली. समितीच्या उपाध्यक्षपदी दिगंबर सकट, कार्याध्यक्षपदी सुशील कोल्हटकर, सचिवपदी प्रिया कांबळे यांची निवड केली आहे. जयंतीच्या नियोजनाबाबत ५ एप्रिलला दुपारी साडेचार वाजता टेंबे रोड येथील शेकाप कार्यलायत बैठक होणार आहे.

०००००००००००

मूळ कॉपी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संवेदना सोशल फाउंडेशनचे नाव पुढे करत ४ एप्रिलला होत असलेला भीमवंदना कार्यक्रम भाजपपुरस्कृत आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी मत बँक तयार करणारा हा कार्यक्रम प्रचाराचा फंडा आहे. या कार्यक्रमावर आंबेडकरी संघटना व आंबेडकरप्रेमी जनता बहिष्कार टाकेल,' असा इशारा डॉ. आंबेडकर स्वाभिमानी जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक, उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषेदत बोलताना दिला.

यावेळी माने म्हणाले, डॉ. आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. मात्र ४ एप्रिलला जयंती उत्सव साजरा करणाऱ्या फाउंडेशनने भाजपने पुरवलेल्या आर्थिक निधीतून कार्यक्रमाचे नियोजन केले आहे असा स्पष्ट आरोप आहे. यानिमित्ताने शिवाजी स्टेडियम येथे भीमवंदना हा संगीतमय कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फोटोसह त्यांनी केलेल्या राजकीय कामाचे मार्केटिंग करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीच्या व्यासपीठाचा गैरफायदा घेत केवळ निवडणुकीसाठी प्रचाराचा फंडा राबवला जात आहे. डॉ. आंबेडकर जयंती ही शिक्षणदिन म्हणून साजरा करण्याचा फतवा काढणाऱ्या भाजप सरकारला डॉ. आंबेडकर हे नाव पुसून टाकायचे आहे. मागासवर्गीयांना शिक्षणात मिळणाऱ्या शिष्यवृत्ती रद्द करून त्या निधीचा वापर अन्य कामासाठी करण्याचा घाट घातला जात आहे. भिडे, गोळवलकर यांना पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांच्यामुळे समाजात जी तेढ निर्माण झाली आहे त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचे नाटक भाजप पर्यायाने संघपरिवार सोशल फाउंडेशनला पुढे करून करत आहेत.

शिवाजीराव परूळेकर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजप सरकारला डॉ. आंबेडकर यांच्याविषयी फारसा आदर नाही. सत्तेत असलेल्या रामदास आठवले यांचाही आवाज या सरकारने बंद केला आहे. त्यामुळे कोल्हापुरात होणाऱ्या भीमवंदना या कार्यक्रमासाठी आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या जनतेने सहभागी होऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्थपुरवठ्याची चौकशी करा

भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच या कार्यक्रमाला आर्थिक निधी पुरवला आहे. या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने जनसमुदाय जिल्ह्यातून खास वाहनाने आणण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अर्थपुरवठ्याची चौकशी करावी अशी मागणी उत्सव समितीच्यावतीने यावेळी करण्यात आली.

०००००००००००००००००००००००००

उत्सवसमितीची बुधवारी बैठक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी स्वाभिमानी जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी यावेळी दिली. जातीयवादी विचारांच्या व त्यांच्या सोबतीने डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याऱ्यांचा निषेध करत स्वाभिमानी जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्षपदी दिगंबर सकट, कार्याध्यक्षपदी सुशील कोल्हटकर, सचिवपदी प्रिया कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंतीच्या नियोजनाबाबत ५ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता टेंबे रोड येथील शेकाप कार्यलायत या समितीची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी भक्त संघटनेतर्फे जोतिबा यात्रेकरूंना झुणकाभाकर वाटप

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर

चैत्रपौर्णिमेनिमित्त जोतिबा यात्रेनंतर परतणाऱ्या भाविकांना श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळेच्यावतीने झुणकाभाकर वाटप करण्यात आले. अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथे हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भक्त मंडळ व अन्नछत्र ट्रस्टचे शिरीष कणेकर, गजानन नार्वेकर, वसंतराव पोवार, रणजित मेवेकरी, अनिल जाधव, राजन झुरळे, वैभव मेवेकरी, कृष्णकुमार मुंगळे, संजय बावडेकर, किरण धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.चे १५ कोटी परतीच्या मार्गावर

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषदकडील विविध विकास कामांसाठी आलेला १५ कोटी, ६० लाखांचा निधी ३१ मार्चअखेर खर्च न झाल्याने सरकारला परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निधी वेळेत खर्च करण्याकडे दुर्लक्ष, निष्क्रिय कामकाज, पाठपुराव्याच्या अभावामुळे संबंधित विभागावर निधी परतीची नामुष्की ओढवली. निधी टंचाईमुळे सदस्य हैराण असताना उपलब्ध निधी परत जात असल्याने प्रशासनावरही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सरकारकडून उशिरा आलेला आणि मार्च महिन्यात सुरू झालेल्या कामांचा निधी आता खर्ची पडत आहे. यामुळे १५ एप्रिलपर्यंत निधी खर्चाची लगीनघाई कायम असेल.

केंद्र, राज्य सरकारसह जिल्हा वार्षिक योजनेतून जि. प. ला प्रत्येक वर्षी कोट्यांवधीचा निधी मिळतो. तो मार्चअखेर खर्च करावा लागतो. न केल्यास का खर्च झाला नाही, या कारणांसह निधी परत करावा लागतो. गेले महिनाभर जि. प. प्रशासन अधिकाधिक विकासकामे मार्गी लावून निधी खर्च करण्यासाठी धडपडत आहेत. तरीही अनेक विभागाचा निधी अखर्चित राहिला. स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी लाभार्थीस अनुदान दिले जाते. ते अनुदान आणि सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी केंद्र सरकारकडून १६ कोटी, २६ लाख रुपये मिळाले होते. मात्र पाणी पुरवठा, स्वच्छता विभागाचे गतिमान प्रशासन नसल्याने निधी शिल्लक राहिला. परिणामी तब्बल सहा कोटी, ३५ लाख, ५० हजारांचा निधी परत जाणार आहे. ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरवण्यासाठी पाच कोटी, ५५ लाख रुपये मिळाले होते. त्या निधीतून स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे, नवीन स्मशानशेड बांधणे आदी विकास कामे करणे अपेक्षित होते. परंतु, ग्रामपंचायत विभागाच्या गलथान कारभारामुळे सर्व निधी खर्च झाला नाही. मंजूर कामांचा पाठपुरावा न केल्याने तीन कोटी, पाच लाखांचा निधी परत करावा लागणार आहे.

नदीकाठच्या गावांना बांधकाम विभागातर्फे संपर्कासाठी होडी दिली जाते. चंदगड, गडहिंग्लज, आजरा, शाहुवाडी तालुक्यात होडीची मागणी आहे. ती देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने २० लाखांचा निधी परत जाणार आहे. अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पाच कोटी निधींपैकी दोन कोटी, ९८ हजार ९९ हजार रुपयांचा निधी परत जाणार आहे. अंगणवाड्यांना इमारतीसह सेवा, सुविधा देण्याची जबाबदारी महिला व बालकल्याण प्रशासनाची आहे. या विभागाला वर्षभर पूर्णवेळ अधिकारी नव्हते. त्याचाही परिणाम कामकाजावर झाला आहे. मागासवर्गीय, नवबौद्ध शेतकऱ्यांना दारिद्र्यरेषेवर आणण्यासाठी नऊ कोटी, ९६ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ९८ लाख ७३ हजार निधी अखर्चित राहिला. थेट लाभार्थी खात्यावर पैसे जमा करण्याच्या व्यवस्थेमुळे हा निधी वेळेत खर्च झाला नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमासाठी दोन कोटी ४० लाखांपैकी ३२ लाख ८४ हजार, उच्च क्षमतेच्या विंधन विहिरीवर विद्युतपंप बसवण्यासाठी ७४ लाखांपैकी २० लाख ८५ हजार रुपये परत जाणार आहेत. ज्या विभागाचे खातेप्रमुख अकार्यक्षम, पाठपुरावा करण्याकडे दुर्लक्ष केले आहेत, त्यांचा निधी परत जाण्याचे प्रमाण जास्त आहे.

निधी परत जाणाऱ्या महत्वाचे विभाग

शौचालय बांधकाम :सहा कोटी ३५ लाख

ग्रामपंचायत जनसुविधा पुरवणे : ३ कोटी ५ लाख

होडी खरेदी : २० लाख

अंगणवाडी इमारत बांधकाम : २ कोटी ९८ लाख

विशेष सहाय योजना : ९८ लाख

ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम : ३२ लाख

विद्युत पंप बसवणे : २० लाख.

जिल्हा वार्षिक योजना व सरकारच्या विविध विभागाकडून २०१६-१७ वर्षासाठी मिळालेल्या निधी खर्चाचा ताळेबंद घेतला जात आहे. परत कराव्या लागणाऱ्या निधींची माहिती विभागनिहाय घेतली जात आहे. सरकारकडून उशिरा मिळालेल्या निधींचा खर्च एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होईल.

संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images