Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दिवसाढवळ्या लुटीने सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आठवड्यात शहरात जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. शुक्रवारी (ता. २ फेब्रुवारी) दिवसाढवळ्या कावळा नाका परिसरात, राजेश मोटर्ससमोर दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून एका इस्टेट एजंटाकडील १७ लाखांची रोकड लुटली. तर बुधवारी (ता. ७ फेब्रुवारी) भल्या पहाटे, सहा वाजता पाच लुटारुंनी गुजरी परिसरात मुंबईच्या सराफाकडून ३४ लाखांचे दागिने लुटून पोबारा केला. अशा स्वरुपाच्या लुटालुटीच्या प्रकारांसह पोलिसांदेखत टोळक्यांची हुल्लडबाजी, सावकारांचा जाच आणि पोलिसांनाच दमदाटी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन महिन्यांपूर्वी लक्ष्मीपुरीत रिलायन्स मॉलच्यासमोर चोरट्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्याकडील सुमारे सात लाखांची रक्कम लुटून पोबारा केला. या घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तर महिन्यापूर्वी राजारामपुरीत महिलेच्या मोपेडच्या डिकीतील १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केले. पंधरा दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागेच एका व्यापाऱ्याची दुचाकीच्या हँडलला लावलेली पावणेदोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने काही क्षणात लांबवली.

गेल्या आठवडाभरात, २ फेब्रुवारीला चौघांनी एका इस्टेट एजंटावर चटणीपूड फेकून १७ लाखांची रक्कम लुटली. या घटनेत संबंधित इस्टेट एजंट जखमी झाले. ही घटना ताजी असताना अवघ्या सहाव्या दिवशी गुजरी परिसरात जबरी चोरीचा प्रकार घडला. बुधवारी पहाटे पाच लुटारुंनी मुंबईचे सराफ कांतीलाल मेहता यांना मारहाण करून लुटले. लुटारुंनी तब्बल एक किलोचे, ३४ लाख रुपयांचे दागिने घेऊन कारमधून पळ काढला. या घटनांनी शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्नाण केले आहे.

पोलिसही असुरक्षित

अशा घटनांतून सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असताना पोलिसही सुरक्षित नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी रात्री उशिरा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राजेंद्रनगरातील एका टोळक्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच घेरले होते. त्यावेळी पोलिसही टोळक्याच्या दहशतीखाली होते. रविवारी (ता. ४) झालेल्या फुटबॉल सामन्यानंतर पोलिसांसमोरच दोन्ही संघांचे समर्थक भिडले. तरुणांच्या हुल्लडबाजीने फुटबॉल स्पर्धांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने पोलिसांनी वेळीच ठोस भूमिका घेऊन हुल्लडबाजांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा टवाळखोर, फाळकूटदादा, खासगी सावकार सर्वसामान्य नागरिकांना शांततेत जगू देणार नाहीत.

तारिख घटना ठिकाण

४ डिसेंबर २०१७ ७ लाखांची रक्कम लंपास रिलायन्स मॉलसमोर लक्ष्मीपुरी

२५ जानेवारी २०१७ मोपेडमधून १५ तोळ्यांचे दागिने लंपास राजारामपुरी

१५ जानेवारी दुचाकीच्या हँडलची पावणेदोन लाखांची बॅग लांबवली लक्ष्मीपुरी

२ फेब्रुवारी एजंटला मारहाण करून १७ लाख लुटले राजेश मोटर्ससमोर, कावळा नाका

३ फेब्रुवारी बांधकाम व्यावसायिकाला धमकावले देवकर पाणंद

७ फेब्रुवारी सराफाचे ३४ लाखांचे दागिने लुटले गुजरी कॉर्नर ते रंकाळा रोड

लुटीनंतर फसली नाकाबंदी

बुधवारी गुजरी परिसरात झालेल्या लुटीनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, चोरटे त्याआधीच शहराबाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे नाकाबंदी संपल्यानंतर संशयित चोरट्यांची कार पुन्हा शहरातूनच कावळा नाकामार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गाकडे गेली. संशयित कार शहराबाहेर गेल्याचे लक्षात येताच त्या मार्गावरील नाकाबंदी का वाढवली नाही? शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी दिवसभर का सुरू ठेवली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

असुरक्षित सोनेवाहतूक

कोल्हापुरात सोन्या-चांदीची उलाढाल मोठी आहे. हुपरीत रोजच चांदीचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. सोने, चांदी घेऊन जाणाऱ्या सराफांवर अनेकदा हल्ले होतात. मोठा ऐवज लुटला जातो, तरीही सोने आणि चांदीच्या सुरक्षित वाहतुकीबद्दल सराफ असोसिएशन दक्षता का घेत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

'बँक आणि एटीएम सेंटर्ससाठी पैसे पाठवणाऱ्या कंपन्या ज्याप्रमाणे शस्त्रसज्ज सुरक्षारक्षकासह पैशांची ने-आण करतात, त्याप्रमाणे पुरेशा संरक्षणात मौल्यवान दागिन्यांची वाहतूक करणे गरजेचे आहे. याबाबत सराफ असोसिएशनशी चर्चा करण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे.

- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

सावकारांची दहशत कायम

शहरात खासगी सावकारांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. पाच दिवसांपूर्वीच लक्षतीर्थ वसाहत परिसरातील एका खासगी सावकाराने बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दोन फ्लॅटची मागणी केली होती. याच खासगी सावकाराने दमदाटी करून काही फ्लॅट बळकावले आहेत. राजकीय लागेबांधे आणि काही पोलिसांशी हातमिळवणी केल्याने त्याची दुकानदारी वाढली आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून अटक होत नसल्याने त्याची दहशत वाढली आहे. अशी अनेक प्रकरणे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत हे वास्तव आहे.

गस्तीचे पोलिस गायब

प्रत्येक पोलिस ठाण्यात गस्ती पथक आहे. शिवाय शहर पोलिस उपअधीक्षकांचेही स्वतंत्र पथक शहरात गस्त घातले, असे सांगितले जाते. सात महिन्यांपूर्वी शहरात पोलिसांनी सायकल गस्तीचा प्रयोग केला. मात्र काही दिवसांतच ही सायकल गस्त थांबली. बंदोबस्ताशिवाय पोलिस रस्त्यावर फिरताना दिसत नाहीत. टोळक्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. यातच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मदत मिळत असल्याने हुल्लडबाज, फाळकूटदादांचे फावले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांना ठोस भूमिका घ्यावी लागेल.

वाढलेल्या लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या रकमांचा व्यवहार ऑनलाइन करणे बंधनकारक आहे. तरीही काही लोक कोणत्याही सुरक्षेविना मोठ्या रकमा सोबत बाळगतात. मौल्यवान वस्तूंबाबतही अशी दक्षता घेणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडापमधून महिलेचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वडापमधून प्रवास करताना महिलेच्या पर्समधील आठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले. शिवाजीपेठ ते पिरवाडी मार्गावर मंगळवारी (ता. ८) दुपारी हा प्रकार घडला. अलका चंद्रकात पाटील (वय ५५, सध्या रा. श्रावण अपार्टमेंट, सृष्टी कॉम्प्लेक्स, मिरा रोड मुंबई, मूळ रा. वेताळ तालीम शेजारी, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पेठेत राहणाऱ्या अलका पाटील या मंगळवारी दुपारी पीरवाडी येथील सावली केअर सेंटर ते जुना वाशी नाका, शिवाजी पेठ यादरम्यान वडाप जीपमधून प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवासी महिलेने त्यांच्या पर्समधील लहान पर्स लंपास केली. यात दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, दोन तोळ्याचा मध्यभागी फुल असलेला हार, अर्धा तोळ्याच्या रिंगा, कर्णफुले, वेल, अंगठी, दोन तोळ्याची चेन असे सुमारे एक लाख रुपये किंमतीचे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर दागिन्यांची पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन चोरीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी पेठ ते पीरवाडी मार्गावरील वडापचालकांकडे चौकशी सुरू केली आहे. तसेच संशयित चोरट्या महिलेचे रेखाचित्र तयार करून तिचा शोध घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

पात्र शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. मात्र, सरकारने त्यांनाही तीन दिवसांत कर्जमाफी देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेंतर्गत मंजूर कर्जखात्यावर बँकांनी ३१ जुलै २०१७ नंतर व्याज आकारणी करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना गुरुवारी दिले. त्यानुसार येत्या तीन दिवसांत जिल्ह्यातील बँकांत ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आढावा गुरुवारी घेतला. सर्वच राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांनी जुलै २०१७ नंतर कर्ज खात्यावर व्याज आकारणी करू नये, असे आदेश यापूर्वी दिले होते. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. तरीही जुलै २०१७ नंतर कर्ज खात्यावर काही बँका व्याज आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्याने बँकांनी या प्रकारची व्याज आकारणी करू नये. व्याज आकारणी केल्यास बँकांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना आजअखेर थकबाकी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी एक कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला आहे. अर्ज दाखल केलेल्या दोन लाख ५३ हजार सभासदांपैकी ८० हजार अर्जांत त्रुटी असल्याने ही यादी पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठविली आहे. आजअखेर कर्जमाफी योजनेत एकूण ३१.३२ लाख कर्ज खात्यावर १२ हजार ३०० कोटी रुपयांची रक्कम संबंधित कर्जखात्यात वर्ग केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अर्जात दिलेली माहिती आणि बँकेकडील माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती संबंधित बँकांकडे पाठविली आहे. यामध्ये जिल्हा बँकेकडे ५७ हजार सभासदांची यादी पाठविली आहे.

दरम्यान, २१.६५ लाख खात्यांपैकी १३.३५ लाख खात्यांची माहिती बँकांनी अपलोड केली आहे. उर्वरित कर्जखात्यांची माहिती दोन दिवसांत सर्व जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका, व्यावसायिक बँकांना पोर्टलवर टाकावी लागणार आहे. उर्वरित टप्प्यातील रक्कम पात्र खातेदारांच्या कर्जखात्यावर जमा होण्यासाठी बँक आणि तालुकास्तरीय समितीने जलदगतीने आणि अचूक काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात कर्जखात्यावर रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

>> बँकांनी ३१ जुलै २०१७ नंतर व्याज आकारणी न नसल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, हा आर्थिक तोटा राज्यातील सर्वच बँकांना सहन करावा लागणार आहे. त्या संदर्भात येत्या आठवड्यात जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत आणि व्यावसायिक बँकांची बैठक घेतली जाणार आहे.
- हसन मुश्रीफ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तलाख विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारे तीन तलाक विधेयक रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका निलोफर आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना शुक्रवारी दिले. विधेयक रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, तीन तलाक विधेयक मुस्लिम महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहे. मुस्लिम महिला इस्लामच्या शरियत कायद्याच्या तरतुदीतच समाधानी आहेत. शरियत कायद्यात महिलांच्या अधिकारांचे पुरेपूर संरक्षण केले आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांना तीन तलाख विधेयकाची आवश्यकता नाही. तरी हे विधेयक लवकर रद्द करण्यात यावे.

निवेदन दिल्यानंतर नगरसेवक निलोफर आजरेकर म्हणाल्या, 'प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज अॅक्ट २०१७ हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. निर्णय घेताना सरकारने मुस्लिम समाजातील कोणत्याही धर्मगुरू किंवा मुस्लिम बुद्धिजीवी वर्गाशी चर्चा केलेली नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर या विधेयकाची काहीच आवश्यकता नव्हती. हे विधयेक भारतीय संविधानाच्या व मुस्लिमांच्या विरुद्ध आहे. या विधेयकामुळे मुस्लिम महिला आणि मुलींच्या अधिकारांवर गदा येणार आहे.'

राष्ट्रपतींनी संसदेला संबोधन करताना भाषणात तीन तलाक पद्धतीमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होतो, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्याने मुस्लिम महिलांच्या स्वाभिमानाला बाधा पोहोचली आहे. राष्ट्रपतींच्या भाषणातून त्यांचे वक्तव्य वगळावे, अशी मागणी महिलांनी केली.

शिष्टमंडळात डॉ. बिलकिश सय्यद,वहिदा बागवान, नजिया शेख,यास्मिन शेख, मिसबाह शेख, कासिफ शेख, सनोबर बागवान, डॉ. सीमा मोडक, नौशीन खानापूर, यास्मिन पट्टणकुडी, आदींचा समावेश होता. तसेच मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी,अधीक्षक साजिद खान, सर्व संचालक, समाजातील मान्यवरही उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्भया पथकाकडून हुल्लडबाजांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील स्वामी विवेकानंद कॉलेज आणि महावीर कॉलेजसमोर हुल्लडबाजी करणाऱ्या आठ तरुणांवर निर्भया पथकाने शुक्रवारी कारवाई केली. यातील दोघांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली असून, उर्वरित हुल्लडबाजांना मुंबई पोलिस कायदा कलम ११२ आणि ११७ प्रमाणे समज देऊन सोडण्यात आले. शुक्रवारी (ता. ९) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

व्हॅलेन्टाइन डेच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या आसपास हुल्लडबाजांची गर्दी वाढली आहे. कॉलेजच्या गेटवर थांबून विद्यार्थिनींवर शेरेबाजी करणे, भरधाव दुचाकी चालवणे, कर्कश्श हॉर्न वाजवणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे असे प्रकार होतात. शुक्रवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान स्वामी विवेकानंद कॉलेज आणि महावीर कॉलेज परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ सुरू होता. याची माहिती मिळताच निर्भया पथकाने कॉलेजच्या समोरून आठ तरुणांना ताब्यात घेतले. विवेकानंद कॉलेजच्या समोरून दीपक गंगाराम कुचकोरवी (वय १९, रा. कावळा नाका परिसर), संजय धोंडिराम शेळके (१८, कदमवाडी), विनय विलास कांबळे (१९, कदमवाडी), हर्ष सुनील बिरंजे (१८, रा. ताराबाई पार्क), रोहित तानाजी भोरी (२०, रा. ताराबाई पार्क) यांना ताब्यात घेतले. महावीर कॉलेजच्या समोर दंगामस्ती करणारे रॉनी जॉर्ज फर्नांडिस (१८, रा. वृषाली हॉटेल शेजारी, ताराबाई पार्क), स्वप्निल धोंडिराम कोल्हापुरे (१८, रा. महालक्ष्मीनगर, कदमवाडी) आणि प्रकाश विजय चव्हाण (१८, रा. पाटील गल्ली, कसबा बावडा) या आठ तरुणांना निर्भया पथकाने ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील दोघांकडे दुचाकी होती, मात्र त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून प्रत्येकी २०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली. चांगल्या वर्तनाची हमी दिल्याने आठ हुल्लडबाजांना सोडण्यात आले. यांच्याकडून पुन्हा असाच गुन्हा घडल्यास त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती निर्भया पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

>> कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या व्हॅलेन्टाइन डेचा माहोल सुरू आहे. या काळात तरुणांच्या काही गटामध्ये वादाचे प्रसंग उद्भवल्यास अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निर्भया पथकाने महाविद्यालयांच्या परिसरातील गस्त वाढवली आहे. आठवडाभर सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या आसपास ही कारवाई सुरू राहणार आहे.
- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी विद्यापीठासाठी प्रयत्न करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी तसेच मराठी विद्यापीठ व्हावे यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने राज्यसरकारकडे मराठी विद्यापीठाची मागणी करणार आहे' असे उद्गार बडोदा येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसतर्फे डॉ. देशमुख यांचा ज्येष्ठ समीक्षक व संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याहसे सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एस. आर. चरापले होते. शाल, श्रीफळ, शाहू महाराज यांची चांदीची मूर्ती व गुळाची ढेप असे या सत्काराचे स्वरूप आहे.

डॉ. देशमुख म्हणाले, 'मराठी भाषेला आपण मायबोली म्हणतो मात्र या मायसमान भाषेवरील प्रेम कमी होत आहे. मराठीची अस्मिता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी शालेय स्तरावर वाचनसंस्कृती वाढवणे आवश्यक आहे'.

डॉ. सबनीस म्हणाले, 'मराठी भाषा टिकवण्यासाठी स्वतंत्र कायदा झाला पाहिजे. मराठीचे मरण हे मराठी माणसाचे मरण आहे. डॉ. देशमुख यांनी मराठीत केलेले लेखन हे मराठी वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी पोषक आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव काम करतील याची खात्री आहे.'

आर. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक विनय पाटील यांनी संस्थेविषयी माहिती दिली. सी. एम. गायकवाड यांनी देशमुख व सबनीस यांचा परिचय दिला. ज्येष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे व संस्थेचे चेअरमन डी. बी. पाटील यांनी डॉ. देशमुख यांच्या साहित्यिक व प्रशासकीय कार्याचा गौरव केला. मनीषा नायकवडी यांनी पसायदान सादर केले. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, रजनी हिरळीकर, व्ही. जी. पोवार, ए. जी. वणिरे, आर. डी. आतकिरे, एस. डी. लाड यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारताला राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य बाबासाहेबांकडून: डॉ. भारत पाटणकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारताला राज्यघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्याचप्रमाणे हे राष्ट्र सातत्याने विकसित होईल याची तरतूदही त्यांनी घटनेत करून ठेवली, हे बाबासाहेबांचे भारताचे राष्ट्रनिर्माता म्हणून सर्वाधिक मोलाचे योगदान आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित 'आधुनिक भारताच्या उभारणीत राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान' या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

डॉ. पाटणकर म्हणाले, 'डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रनिर्माता आणि आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान अशा दुहेरी अंगांनी विचार करावा लागतो. बाबासाहेबांनी भारताची घटना अशा पद्धतीने लिहिली की, ज्यामध्ये राष्ट्रनिर्मिती व उभारणीची प्रक्रिया निरंतर होत राहील, अशी व्यवस्था आहे. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या घटनेत अशी तरतूद नाही. भारतीय समाजातील जात, धर्म, पंथ, लिंग आदींच्या आधारावर प्रस्थापित झालेल्या शोषण व्यवस्थेचा अंत करण्याच्या दृष्टीने राज्यघटनेत जागा निर्माण करून देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य व बंधुता अर्थात मत्ता या तत्त्वाच्या आधारावरच राज्यघटनेची पर्यायाने या राष्ट्राची उभारणी केली. प्रेम व करुणा या बुद्धाने सांगितलेल्या मूलभूत तत्त्वांखेरीज एकात्म राष्ट्राची उभारणी अशक्य आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणून त्यांनी त्यांचा समावेश घटनेत केला.'

डॉ. गेल ऑम्वेट म्हणाल्या, 'जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या बरोबरीने देशात निर्माण केलेल्या अनेक समस्या व दुःखांचे निराकरण करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. जीवनाचा अधिकार व जगण्याचा अधिकार यांचा राज्यघटनेत समावेश हे त्यांचे भारतीय समाजावर फार मोठे उपकार आहेत.'

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी बाबासाहेबांच्या राष्ट्रउभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गिरीश मोरे यांनी आभार मानले. यावेळी धारवाड येथील डॉ. टी. ब्रह्मानंदन यांच्यासह अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव, प्रा. हरीश भालेराव, प्रा. विनय कांबळे, डॉ. भगवान माने, डॉ. राजन गवस, डॉ. पी. एस. कांबळे, डॉ. गौतम कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-गारगोटी एस.टी.ला शॉर्टसर्किटने आग

$
0
0

कोल्हापूर:

कोल्हापूर गारगोटी एस.टी. बसला आज सकाळी अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हणबरवाडी नजीक ही घटना घडली. यात जीवितहानी झाली नाही. मात्र धावपळ उडाल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने न्यूट्रल केल्याने एसटी रस्त्याकडेला असणाऱ्या नाल्यात गेली. दरम्यान प्रवासी तात्काळ बाहेर आल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र धावपळ उडाल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बस कोल्हापूर आगारातून गारगोटीकडे निघाली होती. चालकाच्या बाजूला असलेल्या बोनेटला आग लागली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बायोमॅट्रीक धान्य वाटपात कोल्हापूर जिल्हा प्रथम

$
0
0

पाच दिवसांत ३६ टक्के धान्य वाटप

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आधार पडताळणी करुन बायोमॅट्रिक रेशनिंगच्या एई पीडीएस या नव्या प्रणालीद्वारे अवघ्या पाच दिवसांत कोल्हापूर जिल्ह्याने ३६ टक्के धान्य वाटप करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एई पीडीएस प्रकल्पामध्ये कोल्हापूरने मार्गदर्शक जिल्हा म्हणून आपली ओळख केली आहे.

जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड आधार कार्डने जोडली आहेत. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातून ६ एप्रिल, २०१७ पासून बायोमॅट्रिकद्वारे धान्य वाटप सुरू केले आहे. बायोमॅट्रिक रेशन धान्य वाटपाला सर्व राजकीय पक्ष, संघटना, रेशन दुकानदार आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने ही योजना यशस्वीपणे कार्यान्वित केली आहे. ग्राहकाने बायोमॅट्रिक प्रणालीत अंगठा दर्शविल्यावर ही यंत्रणा कार्यान्वित होते. त्यानंतर धान्य वाटप केले जाते. पण काही रेशन दुकानात तांत्रिक अडचणी येत असल्याने आधार क्रमांकाची नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला धान्य वाटप करण्यात येत होते.

राज्य सरकारने बायोमॅट्रिकमधील सर्व त्रुटी दूर करून फेब्रुवारी महिन्यात एई पीडीएस (आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टिम) प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. पाच फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याने ३६ टक्के धान्य वाटप करून राज्यात आघाडी घेतली आहे. धान्य वाटप करताना रेशन कार्डधारकाची शंभर टक्के आधार पडताळणी करुन धान्य वाटप झाले आहे. आजरा तालुक्यात ५२.५५ टक्के, इचलकरंजीत ५१.३३ टक्के, शाहूवाडी तालुक्यात ४३.७५ टक्के धान्याचे वाटप झाले आहे. हातकणंगले या मोठ्या तालुक्याबरोबर राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या डोंगराळ, दुर्गम तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त धान्य वाटप झाले आहे.

एई पीडीएस ही प्रणाली सर्वप्रथम नागपूर शहरात राबवण्यात आली. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात ही प्रणाली राबवण्यात येत आहे. पण नागपूर जिल्हाला मागे टाकून कोल्हापूर जिल्ह्याने पाच दिवसांत ३६ टक्के धान्य वाटप करुन योग्य अंमलबजावणी केली आहे. काही तांत्रिक कारणामुळे रेशनकार्डधारकाला धान्य मिळत नाही. त्यासाठी ई केवायसी रुट ऑफिसरची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाने ग्रामीण भागातील पोलिस पाटील व कोतवाल यांना रुट ऑफिसर म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे. रुट ऑफिसरांचे अंगठे घेऊन बायोमॅट्रीक मशिनमध्ये नोंद केली जाणार आहे. ज्यांना काही तांत्रिक कारणामुळे धान्य मिळण्यास अडचण येणार आहे, त्यांची ओळख पटवून पोलिस पाटील आणि कोतवाल स्वतचे अंगठे प्रेस करून धान्य देण्यास मदत करणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

बायोमॅट्रिकद्वारे एई पीडीएस ही प्रणाली राबवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. तसेच सर्व राजकीय पक्ष, संघटना,धान्य दुकानदार आणि रेशनकार्डधारकांच्या सहकार्यामुळे ही योजना यशस्वी होत आहे.
- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचा दौरा; दिलजमाई गुलदस्त्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा दौरा संदिग्धता दूर करण्याऐवजी त्यात भर घालणाराच ठरला. शनिवारी प्रा. संजय मंडलिकांच्या कार्यक्रमात उमदेवारी वा निवडणुकीविषयी कोणतेही भाष्य न करता त्यांनी पत्ते खोलले नाहीत. तर पक्षाच्या खासदारांबाबत स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष असताना दुसऱ्या दिवशी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट देऊन पवारांनी नेहमीप्रमाणे सारेच गुलदस्त्यात ठेवले. भविष्यात पवारांचा नेमका कुणाला आशिर्वाद मिळणार याबाबतची अस्वस्थता तयार झाली. तर आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील पवारांसमोर दिसलेली दिलजमाई कुठवर टिकणार हे देखील गुलदस्त्यातच राहिले. लोकसभेच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली तर त्यानुसार विधानसभेची गणिते आखण्याचे जिल्ह्यातील अनेकांचे मनसुबे सध्या तरी पवारांच्या दौऱ्यानंतर उधळले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना राष्ट्रवादीमध्ये मात्र खासदार महाडिक विरुद्ध आमदार मुश्रीफ असे चित्र तयार झाले आहे. पक्षाच्या वाटचालीत योग्य साथ दिली नसल्याचा राग मुश्रीफांच्या मनात आहे. कट्टर विरोधक आमदार सतेज पाटील यांच्यासोबत मुश्रीफांची दोस्ती खासदार महाडिकांना नेहमी खटकते. त्यातूनच मुश्रीफांनी केलेल्या तडजोडी चालतात तर आम्ही का नाही असा मतप्रवाह तयार होऊन पक्षात मुश्रीफविरोधी गट प्रबळ झाला. गेल्या महिन्यापासून तर खासदार महाडिक यांच्याऐवजी मंडलिकच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे दाखवण्याचा प्रयत्न मुश्रीफांनी विविध वक्तव्यातून केला. प्रसंगी मीही निवडणूक लढवीन असे सांगत महाडिकांना उमेदवारी नको असेच मांडले. हे सारे सुरू असताना आतापर्यंत शरद पवार यांनी खासदार महाडिकांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. सध्या आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्याची वेळ आली असताना पवार यांचा दौरा काही दुरुस्ती करणारा ठरेल असे वाटत होते.

प्रा. मंडलिक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावून पवारांनी खासदार महाडिक गटाला गर्भित इशारा दिला आहे. महाडिक यांच्या आतापर्यंतच्या भाजपच्या हातात हात घालून चाललेल्या वाटचालीबाबत पवार यांनी थेट इशारा दिला नसला तरी भविष्यात मंडलिकांना सोबत घेतले जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. मंडलिकांच्या बाजूने मुश्रीफ,आमदार सतेज पाटील उभे राहून त्यासाठी अनेक जोडण्या करण्याबाबतचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यातूनच महाडिक यांचा पत्ता कट करण्याबाबतची पेरणी केली. पवार यांनी मात्र यावेळी मंडलिक हे सध्या शिवसेनेत असल्याचे भान राखत त्याबाबत थेट भाष्य करण्याचे टाळले. तसेच आगामी स्थानिक राजकारणाबाबतही काहीच संकेत दिले नाहीत. रात्री व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीयांसोबत झालेले जेवण आगामी राजकारणासाठी पोषक ठरल्याची चर्चा होती.

रविवारी पवारांनी खासदार महाडिक यांच्या घरीही भेट दिली. इतक्या सर्व घटना झाल्यानंतर पवार हे खासदारांच्या घरी जाण्याचे टाळतील असे वाटत होते. सकाळी आठ वाजता भेट देण्याचे ठरलेले असताना ते न घडवता पवार गोलिवडेला गेले. या दोन तासांच्या कालावधीत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. पवारांचे संकेत ओळखणाऱ्यांसाठी या गोष्टी खूप होत्या. कारण पवार यांनी शनिवारीच मंडलिकांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना माझ्या राजकारणाची दिशा समजते असे सूचक वक्तव्य केले होते. महाडिक यांच्या भाजपसोबतच्या वाटचालीबाबत पवार काही संकेत जिल्ह्यातील राजकारण्यांना मिळतील अशी अपेक्षा होती. पण पवारांनी सारेच गुलदस्त्यात ठेवले. यामुळे विधानसभा डोळयासमोर ठेवून नव्या जोडण्या करण्याच्या अपेक्षा ठेवलेल्यांच्या हातात काही पडले नाही. आमदार सतेज पाटील, चंदगडमधील आमदार संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, डॉ. सुजीत मिणचेकर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, दिनकरराव जाधव, श्रीपतराव शिंदे आदी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील मंडळी या दौऱ्याकडे वेगळ्या अपेक्षेने पहात होती. राष्ट्रवादीचा खासदारकीचा उमेदवार जिल्ह्यातील आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असल्याने पवार यांच्याकडून त्यादृष्टीने काही संकेत मात्र मिळाले नाहीत. पण पवारांनी ज्यांना कानगोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या आहेत. त्याबाबतच्या घडामोडी आगामी कालावधीत पहायला मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीत घुमणार शिवगर्जना

$
0
0

दिल्लीत राजपथावरून जयंतीची मिरवणूक, १९ व २० फेब्रुवारीला वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा वारसा केवळ देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा या उद्देशाने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यंदा १९ व २० फेब्रुवारी नवी दिल्लीत शिवजयंती साजरी होणार आहे. राजपथवर शिवजयंतीची जंगी मिरवणूक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, पोवडा व शिवगर्जना महानाट्य अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या शौर्याचा गजर होणार असल्याची माहिती समितीचे मार्गदर्शक व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाब आणि दिल्लीतील हजारो शिवभक्त शिवजयंती सोहळ्यात सामील होणार आहेत. हरियाणातील तीन हजार रोड मराठे दिल्लीतील उत्सवात सामील होणार आहेत. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवजयंती सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी कोल्हापूर, मिरज आणि पुणे येथून रेल्वेला जादा डबे जोडावेत यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी राजपथावरुन मिरवणूक निघेल. मिरवणुकीत हत्ती आणि घोड्यांचा समावेश असणार आहे. शिवजयंती हा राष्ट्रीय उत्सव बनावा ही मुख्य संकल्पना आहे. त्यासाठीच दिल्लीमध्ये शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा होणार आहे. शिवजयंतीनिमित्त स्वप्निल यादव दिग्दर्शित 'शिवगर्जना' नाटकाचे दोन प्रयोगाचे आयोजन केले आहे. शिवाय शाहीर आझाद नायकवडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदीत पोवाडा सादर करणार आहेत.'

पत्रकार परिषदेला महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, विनायक फाळके, उदय घोरपडे, राम यादव, मकरंद ऐतवडे, प्रतिक पोवार, उदय बोंद्रे, शहाजी माळी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची रुपरेषा

१९ फेब्रुवारीला संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी नऊ वाजता पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी १०.१० मिनिटाला महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम होईल. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र सदन ते कस्तुरबा गांधी मार्ग, राजपथ व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत मिरवणूक निघणार आहे. दुपारी एक वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे युध्दकलेची प्रात्यक्षिके, गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, माहितीपटाचे सादरीकरण, रक्तदान शिबिर व पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सात वाजता शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारित 'शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग होईल. वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा शिवगर्जना नाटकाचे सादरीकरण आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मामाच्या गावची मुलगी करायचं राहिलंच !

$
0
0

कोल्हापूर :

'लग्नासाठी मामाच्या गावची मुलगी करण्याची पद्धत आहे. पण माझ्या नशिबात हा योग नाही. आता या गोष्टीला ५० वर्ष झालीत. त्यामुळे काही उपयोगही नाही. मामाच्या गावाला यायला खूप उशीर झाला आणि आता ते शक्यही नाही,' अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यामुळे एकच हशा पिकला.

शरद पवार कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावात बोलत होते. गोलिवडे हे पवार यांचं आजोळ आहे. जेमतेम अडीच ते तीन हजार लोकवस्तीचं हे गाव. मात्र या गावाचा संबंध शरद पवार यांच्याशी असल्यामुळे या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला त्याचा अभिमान आहे. शरद पवार यांचं गोलिवडे गावात आगमन होताच झांज पथकाच्या तालात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि ते व्यासपीठावर आले.

यावेळी गावकऱ्यांनी शरद पवार यांचा नागरी सत्कार केला. तेव्हा आपल्या भावना व्यक्त करताना पवार भारावून गेले होते. गोलिवडे गावाचा आपल्या आईचा ऋणानुबंध सांगत गावाशी असलेले नातेसंबंध उलगडले. तसेच आपल्या आईच्या अनेक आठवणींना पवारांनी उजाळा देतानाच ही मिश्किल टिप्पणी केली.

दिलजमाई गुलदस्त्यातच

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पवारांचा दौरा संदिग्धता दूर करण्याऐवजी त्यात भर घालणाराच ठरला. शनिवारी प्रा. संजय मंडलिकांच्या कार्यक्रमात उमदेवारी वा निवडणुकीविषयी कोणतेही भाष्य न करता त्यांनी पत्ते खोलले नाहीत. तर पक्षाच्या खासदारांबाबत स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष असताना दुसऱ्या दिवशी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट देऊन पवारांनी नेहमीप्रमाणे सारेच गुलदस्त्यात ठेवले. भविष्यात पवारांचा नेमका कुणाला आशीर्वाद मिळणार याबाबतची अस्वस्थता तयार झाली. तर आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील पवारांसमोर दिसलेली दिलजमाई कुठवर टिकणार हे देखील गुलदस्त्यातच राहिले. लोकसभेच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली तर त्यानुसार विधानसभेची गणिते आखण्याचे जिल्ह्यातील अनेकांचे मनसुबे सध्या तरी पवारांच्या दौऱ्यानंतर उधळले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना राष्ट्रवादीमध्ये मात्र खासदार महाडिक विरुद्ध आमदार मुश्रीफ असे चित्र तयार झाले आहे. पक्षाच्या वाटचालीत योग्य साथ दिली नसल्याचा राग मुश्रीफांच्या मनात आहे. कट्टर विरोधक आमदार सतेज पाटील यांच्यासोबत मुश्रीफांची दोस्ती खासदार महाडिकांना नेहमी खटकते. त्यातूनच मुश्रीफांनी केलेल्या तडजोडी चालतात तर आम्ही का नाही असा मतप्रवाह तयार होऊन पक्षात मुश्रीफविरोधी गट प्रबळ झाला. गेल्या महिन्यापासून तर खासदार महाडिक यांच्याऐवजी मंडलिकच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे दाखवण्याचा प्रयत्न मुश्रीफांनी विविध वक्तव्यातून केला. प्रसंगी मीही निवडणूक लढवीन असे सांगत महाडिकांना उमेदवारी नको असेच मांडले. हे सारे सुरू असताना आतापर्यंत शरद पवार यांनी खासदार महाडिकांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. सध्या आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्याची वेळ आली असताना पवार यांचा दौरा काही दुरुस्ती करणारा ठरेल असे वाटत होते.

प्रा. मंडलिक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावून पवारांनी खासदार महाडिक गटाला गर्भित इशारा दिला आहे. महाडिक यांच्या आतापर्यंतच्या भाजपच्या हातात हात घालून चाललेल्या वाटचालीबाबत पवार यांनी थेट इशारा दिला नसला तरी भविष्यात मंडलिकांना सोबत घेतले जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. मंडलिकांच्या बाजूने मुश्रीफ,आमदार सतेज पाटील उभे राहून त्यासाठी अनेक जोडण्या करण्याबाबतचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यातूनच महाडिक यांचा पत्ता कट करण्याबाबतची पेरणी केली. पवार यांनी मात्र यावेळी मंडलिक हे सध्या शिवसेनेत असल्याचे भान राखत त्याबाबत थेट भाष्य करण्याचे टाळले. तसेच आगामी स्थानिक राजकारणाबाबतही काहीच संकेत दिले नाहीत. रात्री व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीयांसोबत झालेले जेवण आगामी राजकारणासाठी पोषक ठरल्याची चर्चा होती.

रविवारी पवारांनी खासदार महाडिक यांच्या घरीही भेट दिली. इतक्या सर्व घटना झाल्यानंतर पवार हे खासदारांच्या घरी जाण्याचे टाळतील असे वाटत होते. सकाळी आठ वाजता भेट देण्याचे ठरलेले असताना ते न घडवता पवार गोलिवडेला गेले. या दोन तासांच्या कालावधीत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. पवारांचे संकेत ओळखणाऱ्यांसाठी या गोष्टी खूप होत्या. कारण पवार यांनी शनिवारीच मंडलिकांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना माझ्या राजकारणाची दिशा समजते असे सूचक वक्तव्य केले होते. महाडिक यांच्या भाजपसोबतच्या वाटचालीबाबत पवार काही संकेत जिल्ह्यातील राजकारण्यांना मिळतील अशी अपेक्षा होती. पण पवारांनी सारेच गुलदस्त्यात ठेवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अरुंद रस्ते, पार्किंगचा अभाव, फेरीवाले व विक्रेत्यांचे अतिक्रमण व नियम तोडणारे वाहनचालक आणि पोलिसांची खाबूगिरी यामुळे शहरातील वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा झाला आहे. उद्योग, व्यापार आणि पर्यटनामुळे दुचाकी आणि हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची संख्याही वाढली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी ३१मार्च २०१७ पर्यत वाहतुकीचे नियोजन करून शहराचा कायापलट होईल, अशी घोषणा केली होती. मात्र या घोषणेला एक वर्ष उलटूनही परिस्थितीत फारसा बदल न होता स्थिती गंभीर होत चालली आहे. शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कडक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असताना वरिष्ठ अधिकारी प्रबोधनाचे डोस पाजण्यात मग्न आहेत. त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी ठरलेलीच आहे. महानगरपालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागात समन्वय ठेवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती नसल्याने काहीच घडत नसल्याचे वास्तव आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वय राखून प्रयत्न केल्यास वाहतुकीचे नियोजन होऊ शकते.

वाहतूक नियोजनातील अडथळे

पार्किंगचा अभाव

शहरात सिमेंटचे जंगल वाढत आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून पार्किंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. सर्वसामांन्य नागरिक बांधकाम करताना पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. रस्ता अथवा गटरपासून तीन फूट अंतराचा निकषही धुडकावला जात आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्ते वाहनांच्या पार्किंगने खचाखच भरलेले असतात. या नियमाची अंमलबजावणी करण्यात महानगरपालिका अपयशी ठरत आहे. तर शहरासाठी आवश्यक मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प गेले दहा वर्षे रखडला आहेत. पार्किंगसाठी नव्या जागा शोधून त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रशासनातील काही विभाग जबाबदारी परस्परांवर ढकलत आहेत. नियोजनाअभावी वाहतूकीचे नियोजन कोलमडले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

केएमटीच्या ताफ्यात ११२ ते ११५ बस आहेत. पण यापैकी फक्त ९५ बस रस्त्यांवर धावतात. त्यामुळे नागरिकांना दुचाकी व चारचाकींचा वापर करावा लागत आहे. केएमटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

दिसेल तिथे रिक्षा स्टॉप

शहरात पाच हजारांहून अधिक ऑटोरिक्षा आहेत. शहरातील व्यापारी पेठा व प्रमुख मार्गांवर दिसेल त्या ठिकाणी रिक्षा स्टॉप आहेत. अधिकृत रिक्षास्टॉपची संख्या वाढवण्यासाठी गरज आहे. मात्र, अनेक रिक्षाचालकांची दांडगाई वाहतूक अडविण्यासह परिसरातील व्यावसायिकांना डोकेदुखी ठरत आहे. महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, गंगावेश, रंकाळावेश, शाहूपुरी, स्टेशन रोड यांसह शहरातील बहुतांश सिग्नल्सवर रिक्षास्टॉपनी आपली पथारी पसरली आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी रिक्षा उभ्या असतात. त्यामुळेच अनेकदा वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. मध्यवर्ती बसस्थानक परिरसरात तर रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लावण्यात ट्रॅफिक पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. अधिकृत स्टॉपवर मोजक्या रिक्षा आणि बुडाव डाव आणि स्टॉपबाहेर थांबून प्रवासी पळवून नेणाऱ्या अधिक असेच चित्र येथे दिसते.

धोकादायक वडापकडे दुर्लक्ष

आरटीओ व पोलिस हप्ता घेऊन धोकादायक वडापकडे दुर्लक्ष करत आहेत. एका वाहनात जास्तीत जास्त प्रवाशांना कोंबून वाहतूक केली जात आहे. हप्ता देण्यास विलंब झाल्यावर आरटीओ व पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई केली जाते. शहरात सहा सिटर रिक्षाला प्रवाशी वाहतूक करण्यास बंदी असताना राजकीय पक्षाच्या वाहतूक संघटना, आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्याने धोकादायक वाहतूक सुरू आहे.

अवजड वाहतुकीचे काय?

शहरात अवजड वाहतुकीला दुपारी १ ते ४ या विशिष्ट वेळेतच परवानगी असताना ट्रॅफिक पोलिस आणि आरटीओंकडून त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त माल भरून, भरदिवसा रस्ते अडवून वाहनांतून मालाची ने-आण सुरू आहे. अवजड वाहनांसह शहरात जागोजागी टेंपो, मालवाहतूक करणाऱ्या रिक्षांचे थांबे रस्त्यांवरच असतात. त्यामुळे लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, महानगरपालिका परिरसरात नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. ऊस, बॉक्साइड, वाळूची वाहतूक रिंगरोडवरून होण्याची गरज असताना शहराच्या मध्यवर्ती मार्गातून होत असताना प्रशासनच त्याकडे काणाडोळा होत आहे.

फेरीवाल्यांचा आडमुठेपणा

गर्दीच्या आणि रहदारीच्या रस्त्यांवर फेरीवाले, छोट्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे मोकाट सुटलेल्या फेरीवाल्यांनी पार्किंगच्या जागाही बळकावल्या आहेत. महानगरपालिका फेरीवाले, विक्रेत्यांच्या कारवाई करण्याच धाडस दाखवत नसल्याने त्यांचा आडमुठेपणा वाढला आहे. महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या भागात फेरीवाल्यांबरोबर दुकानदार व व्यापारीही रस्त्यावर माल मांडून विक्री करीत आहेत. महानगरपालिकेने मध्यंतरी सुरू केलेली अतिक्रमण मोहिमही थंडावली आहे. हॉकर्स झोनची तर अंमलबजावणीच झालेली नाही.

बेशिस्त वाहनचालक

वाहतूक सुरळीत राखण्यासाठी शहरात सिग्नल यंत्रणा कार्यरत आहे. मात्र तरीही वाहनचालकांकडून नियम तोडले जात आहेत. ट्रीपल सीट, विना लायसन वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणे, सिग्नलवड डाव्या बाजूला मार्गिका रिकामी न ठेवता तेथे वाहन घेऊन थांबणे या गोष्टी नियमित होत आहेत. सिग्नलवर नियम तोडले जात असताना तेथील पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नाही. अनेकदा पोलिस बाहेरगावच्या वाहनांना तेवढेच लक्ष्य करतात.

पोलिस यंत्रणा कुचकामी

वाहतूक शाखेकडे पोलिस कमी आहेत, अशी ओरड कायम असते. पण ड्यूटीवर असलेल्या पोलिसांकडून कामाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सर्रास पहायला मिळते. सावज हेरुन दंडाच्या पावत्या करण्यात पोलिसांची यंत्रणा गुंतल्याचे दिसून येते. नो पार्किंगमधील दुचाकीवर मोठ्या संख्येने दंडात्मक कारवाई कारवाई होते. चारचाकी, रिक्षा, अवजड वाहनांवर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र पहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढली, भाजीपाला स्थिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्पादन व आवक वाढल्याने बाजारात वांगी, दोडका, भेंडी, शेवगा, बटाटे,गाजर यांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणेच स्थिर आहेत. बेळगाव, विदर्भ, सांगली जिल्ह्यातून मालाची आवक वाढल्याने फळभाज्या, पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले. दर स्थिर आणि स्वस्त झाल्याने भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. शहरासह उपनगरात टेम्पोने भाजीपाला, फळांची विक्री होत आहे.

बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. वांगी, टोमॅटो, भेंडी, कारली, ढबू, मिरची, दोडका या फळभाज्यांचा दर सरासरी ३० ते ६० रुपये किलो झाला आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबिरीच्या पेंडीचा दर १० रुपये होता. या आठवड्यात एक पेंडी पाच रुपये झाली आहे. कांद्याच्या दरातही घसरण कायम राहिली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ३५ ते ४० रुपये होता. दोन दिवसांत बाजार समितीसह किरकोळ बाजारात कांद्याची आवक होऊ लागल्याने दरावर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात २५ ते ३० रुपये किलोने विक्री होत आहे. गवारीचा दर मात्र तुलनेत कमी झालेला नाही. भेंडी, वांगी, दोडका या भाज्या सरसरी ४० रुपये किलो आहे. बाजारात सांगली जिल्ह्यातून वांगी आणि दोडका, बार्शी, विदर्भातून भेंडी, गवारी, शेवगा यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोलापुरी काकडी ४० रुपये किलो झाली आहे. सोलापूर, बार्शी, कुर्डूवाडी, मोहोळ येथे बारमाही काकडीचे उत्पादन होत असल्याने बाजारपेठेत काकडीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. लसूणही प्रतिकिलो ३० रुपये झाला आहे. गाजर, ओली मिरचीचा दर स्थिर आहे. गेल्या आठवड्यातही कांद्याचा दरही स्थिर होता. या आठवड्यातही कांदा दरात प्रतिकिलो २ ते ५ रुपयांनी घट झाली आहे. पालेभाज्याही ८ ते १० रुपये पेंडी मिळत आहेत. दोन पेंड्या घेतल्यास १५ रुपयांना पालेभाजी मिळत आहे. उत्पादन आणि आवक वाढल्याने भाजीपाल्याचा दर स्थिर राहिला आहे. द्राक्षे आणि कलिंगडाची आवक बाजारपेठेत वाढली आहे. कलिंगडाचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. द्राक्षे सरासरी ५० ते १०० रुपये, काळी द्राक्षे ६० ते १५० रुपये किलो आहेत. कलिंगड एक नग ४० ते ५० रुपयांना मिळत आहे. फळभाज्या, पालेभाजीसह फळमार्केटमधील दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत हेच दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसांत सर्वच फळांची आवक वाढली आहे. शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष उत्पादन चांगले झाले असून, कलिंगडची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ४० ते ५० प्रतिनग कलिंगडची विक्री होत आहे. थंडीही कमी होत असल्याने कलिंगड खरेदीकडे कल वाढत आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ३०

टोमॅटो : १०

भेंडी : ५०

कारली : ३५

ढबू मिरची ३५

जवार गवारी : ७०

दोडका : ४०

हिरवा वाटाणा ३५

ओली मिरची : ३०

गाजर : ४०

कांदा २५ ते ३०

बटाटा : १० ते १५

लसूण : ३०

आले : ३५

पालेभाजी दर (पेंडी रु.)

मेथी : १०

पोकळा : १०

पालक : १०

शेपू : १०

कोंथिबीर : ५

फळांचे दर (प्रतिकिलो रु.)

संत्री : ४०

मोसंबी: ६५

डाळिंब : २० ते ४०

सफरचंद : ६० ते ७०

सीताफळ : ७० ते ८०

चिकू : ५०

द्राक्षे : ५० ते १५०

केळी : ३० ते ४६ रुपये डझन

उपवासाचे पदार्थही स्थिर

महाशिवरात्रीनिमित्त उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. उपवासासाठी लागणारी शाबू, शेंगदाणे, बटाटे, रताळे यांचे दर स्थिर आहेत. शाबू प्रतिकिलोचे दर ६० ते ७२ रुपये किलो आहे. वरीचा दर प्रतिकिलो ५० ते ८० रुपये आहे. शेंगदाणे प्रतिकिलो ७० ते ९० रुपये आहे. बटाटे आणि रताळेही प्रतिकिलो १० ते २० रुपये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस तोडणी कामगाराचा मुलगा ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भुये (ता. करवीर) येथे उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरुन जमिनीवर खाली पडल्याने ओमकार अजिनाथ फुंदे (वय १३, मुळ गाव बोरगाव चकला, ता. शिरुर कालार, जि. बीड) या मुलाचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

शाहूपुरी पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली. फुंदे कुटुंबिय गेले तीन महिने ऊस तोडण्यासाठी कोल्हापुरात आले आहेत. ओमकार हा गतिमंद होता. आज रविवारी भुये येथे राजाराम सहकारी साखर कारखान्याची उसाची तोड सुरू होती. सकाळपासून ऊस तोडून ट्रॉलीत भरण्याचे काम सुरू होते. ओमकारही ऊस भरायला मदत करत होता. तीनच्या सुमारास सर्व ऊस तोडणी कामगार जेवायला बसले होते.त्यावेळी ओमकार ऊस भरलेल्या ट्रॉलीवर चढला. अचानक त्याचा पाय घसरल्याने तो दहा ते बारा फूट उंचीवरुन खाली पडला. ओमकारला मार बसल्याने तो ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकूण सर्वजण धावले. तो वेदनेने विव्हळत होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी वाहनाने कसबा बावडा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारास आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच राजाराम साखर कारखान्याचे अधिकारीही हॉस्पिटलमध्ये धावले. ओमकार याच्या पश्चात वडील, आई, लहान बहिण असा परिवार आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्युमान संपलेल्या एसटीतून धोकादायक प्रवास

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर :

कोल्हापूर विभागात दोनशेहून अधिक आयुर्मान संपलेल्या एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटीच्या कार्यशाळेतून मात्र प्रत्येक एसटी 'ओके' असल्याचा कागदोपत्री अहवाल दिला जात आहे. नऊ लाख किलोमीटरची मर्यादा संपूनही एसटीचे रंग बदलून प्रवाशांच्या सेवेत धोकादायक पद्धतीने धावत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गांभीर्याने एसटीची तपासणी न करता फिटनेस सर्टिफिकेट दिले जात आहे. एसटीच्या ताफ्यात १९८० सालापासूनची वाहने असून प्रवाशांचा जीव धोक्यात घालूनच कोल्हापूर विभागाचा प्रवास सुरू आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी असणारे एसटीचे दक्षता पथक, पोलिस आणि आरटीओ निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर ते गारगोटी रस्त्यावर शनिवारी शॉर्टसर्किट झाल्याने एसटीने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र एसटी स्क्रॅपमध्ये घालण्याशिवाय दुसरा पर्याय एसटी प्रशासनासमोर राहिलेला नाही. राज्य मार्ग परिवहन महामंडळात नऊ लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी स्क्रॅप केली जाते. कोल्हापूर विभागाच्या ताफ्यात ७५० एसटी आहेत. बारा आगारात या एसटींचा प्रवास सुरू असून दररोज प्रत्येक लांब पल्ल्याची एसटी एक हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या ७५० एसटींपैकी २०० एसटी आयुर्मान संपलेल्या आहेत. कोल्हापूर विभागीय कार्यशाळेतून प्रवाशांच्या सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या एसटी तपासणी केल्याचा 'ओके' असा अहवाल दिला जातो. प्रत्यक्षात रस्त्यावर प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. एसटीच्या ताफ्यातील दोनशेहून अधिक एसटींची नऊ लाख किलोमीटरची मर्यादा संपली आहे. तरीही या एसटी मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा, संभाजीनगर बसस्थानकासह जिल्ह्यातील बारा आगारांत कार्यरत आहेत. एसटीतील वायरिंग वीस वर्षे जुने आहे. या वायरिंगसह एसटीची दररोज तपासणी केली जात नाही. कार्यशाळेत एसटीचे खराब झालेले स्पेअर पार्ट बदलण्यासाठी नवीन पार्ट उपलब्ध नाहीत. गुळगुळीत झालेल्या टायर्सवरच हजारो किलोमीटरचा प्रवास सुरु आहे. तीनशेहून अधिक एसटीत प्रथमोपचार पेटी, जॅक, हॉर्न, इंडिकेटर, फायर फायटर नाहीत. पुणे विभागीय कार्यालयाकडून कोल्हापूर विभागाला गेल्या पाच वर्षात एकही नवीन एसटी दिलेली नाही. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या एसटीला वेगवेगळे रंग देऊन साधी, निमआराम, एशियाड एसटी प्लॅटफॉर्मवर लावली जात आहे. खासगी आराम बसची स्पर्धा करण्यासाठी काही चालकांनी एसटीचे स्पीड लॉकही तोडले आहे. त्यामुळे नादुरुस्त असलेल्या एसटी रोडवरून सुसाट धावत असल्याचे चित्र आहे. ताफ्यातील साधी, निमआराम, मिनी बसेसची हीच अवस्था आहे. ताफ्यात नवीन एसटी नसल्याने जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या एसटीतून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी आधीच खिळखिळी झाली आहे. त्यात महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. पुणे विभागाकडून नवीन टायर मिळालेले नाहीतचपा रिमोल्ड टायर्सही वेळेवर मिळत नाही. अनेक एसटीच्या खिडक्यांना काचा नाहीत. काहींना इंडिकेटर नाहीत. अनेक एसटी चावीविनाच सुरु होतात.

चालकांची तपासणी नाही

कोल्हापूर विभागात चालकांची संख्या १७७६ आहे. लांब पल्ल्याच्या मार्गासाठी अनेकदा एकच चालक दिला जातो. एसटी ताब्यात देण्यापूर्वी चालकांची ब्रेथ अल्कोहोलिक अनॉलायझर मशीनव्दारे तपासणी केली जात नाही. जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग आगारातील एका चालकाने मद्यपान करून मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ घातला होता. एसटीच्या १२ आगारात चालकांची कसलीही तपासणी होत नाही.

'आरटीओकडून वर्षातून एकदाच हे फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. त्यावेळी एसटी सुस्थितीत असली तरी नंतर होणाऱ्या बिघाडावर आरटीओचे नियंत्रण राहत नाही. एसटी प्रशासनाने प्रत्येक बसची काळजी घेणे अपेक्षित आहे.

डॉ. डी. टी. पवार, आरटीओ

'कोल्हापूर ते गारगोटी मार्गावरील एसटीने पेट घेतला. खेडोपाडी धावणारी सुरक्षित एसटी म्हणून प्रवाशांचा विश्वास आहे. मात्र एसटीचे आयुर्मान वाढविण्यासाठी काहीही केले जात नसल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एसटी महत्वाची आहे. भविष्यात एसटीने प्रवास करायचा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे

संदीप पाटील, प्रवासी, वडकशिवाले

कोल्हापूर विभाग

१२ बसस्थानके

एसटी संख्या ७५०

चालक १७७६

वाहक १८०९

कार्यशाळा कर्मचारी ९१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए प्रवेश परीक्षा मे महिन्यात घ्यावी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

एमबीए या अभ्यासक्रमासाठी सन २०१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ फेब्रुवारीपर्यंत आहे. यंदा एकच प्रवेश परीक्षा असल्याने या परीक्षेस मुकणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीएसाठी पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान एमबीए प्रवेश परीक्षा १० व ११ मार्च रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. मात्र, सध्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या परीक्षेत व्यस्त असल्यामुळे एमबीए प्रवेशपरीक्षा मे महिन्यात घ्याव्यात, अशी मागणी सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट असोसिएशन संघटनचे उपाध्यक्ष डॉ. बी. एस. सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सावंत म्हणाले, 'कोल्हापूरसह सांगली व सातारा येथे शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत एमबीएसाठी एक हजार जागा आहेत. तर राज्यात ही क्षमता ६० हजार इतकी आहे. एमबीए पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत मोठी संधी आहे. यासाठी घेण्यात येणारी प्रवेशपरीक्षा मार्चमध्ये घेतली जाते. त्यासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज फेब्रुवारीमध्येच भरण्याची प्रक्रिया सुरू होते. ही माहिती ग्रामीण भागासह शहरात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत न पोहोचल्याने अनेक मुले ही परीक्षा देऊ शकत नाहीत. तसेच सरकारतर्फे ही परीक्षा राबवण्यात येणार असून त्यासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी व अनुदान योजनांसाठीही ही परीक्षा देणारे विद्यार्थीच पात्र ठरवले जाणार आहेत. परंतु या परीक्षेची वेळ विद्यार्थ्यांसाठी असुविधेची असून त्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आली आहे.'

विराज खोलकुंबे म्हणाले, 'सध्या कॉलेजमध्ये वािर्षक परीक्षेच्या अभ्यासात विद्यार्थी व्यस्त आहेत. अशावेळी एमबीएसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास विलंब झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. इतर अभ्यासक्रम व कोर्समध्ये सरकारने तुलनेने एमबीए प्रवेश परीक्षेसाठी २५ दिवसांचा कालावधी दिला आहे. जिल्ह्यातील मॅनेजमेंट शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा मोफत देण्यात आली आहे.'

यावेळी केआयटी आयएमइआरचे संचालक डॉ. एस. एम. खाडीलकर, सायबरच्या एमबीए विभाग संचालक विशाखा आपटे, प्रा. दिलीप देसाई, प्रा. विनायक कागले आदी उपस्थीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार धनंजय महाडिक निवासस्थानी पवार भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्ववाद आणि खासदारकीच्या उमेदवारीवरुन जिल्ह्याचे नेते व आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांची तोंडे दोन दिशेला आहेत. दोघातील वादंग वाढल्यासारखी स्थिती असताना रविवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खासदार महाडिकांच्या निवासस्थानी भेट दिली. पवारांच्या उपस्थितीत झालेल्या चहापानाला आमदार हसन मुश्रीफही सहभागी झाले. दरम्यान पवार यांच्या भेटीदरम्यान खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नगरसेवक स्वागताला असे चित्र पाहावयास मिळाले. राष्ट्रवादीच्या खासदारासोबत भाजप आघाडीच्या नगरसेवकांना पाहून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही भुवया उंचावल्या.

दरम्यान पक्षाध्यक्ष पवार, आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी गोलिवडे ते कोल्हापूरचा प्रवास एकाच मोटारीतून केला. या प्रवासात पवार यांनी महाडिक व मुश्रीफ यांना कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहे. शिवाय राष्ट्रवादीची डिप्लोमसी ठरल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत सुरु आहे. सकाळी १०.५० मिनिटाच्या सुमारास पवार हे महाडिकांच्या निवासस्थानी पोहचले. पवार हे मोटारीच्या पुढच्या सीटवर तर मागील सीटवर मुश्रीफ, के. पी. आणि महाडिक होते. पवार यांच्या अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे महाडिकांच्या निवासस्थानी पोहचले. आमदार संध्यादेवी कुपेकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे आदी सोबत होते.

राजकारणावर नाही नोटबंदीवर चर्चा

पवार हे महाडिकांच्या निवासस्थानी सुमारे २० मिनिटे थांबले. या कालावधीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र मुश्रीफ व महाडिक यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव जाणवत होता. चहापानाच्या निमित्ताने महाडिक, मुश्रीफ एकत्र आले तरी संवाद फारसा घडला नाही. आमदार मुश्रीफ यांनी नोटाबंदीनंतर मध्यवर्ती बँकेत अजूनही काही नोटा शिल्लक राहिल्या आहेत. त्या बदलून मिळण्यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी गेल्याच आठवड्यात जेटली व माझी भेट झाल्याचे सांगितले. तेव्हा मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना भेट घ्यावी लागेल असे नमूद केले. महाडिक यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा सत्कार झाला. त्यावेळी पवार यांनी हसत हसत प्रत्येकवेळी सत्काराची औपचारिकता कशाला? अशी विचारणा केली.चहापानाचा कार्यक्रम झाल्यावर पवार, तटकरे, मुश्रीफ आणि महाडिक हे चौघे एका मोटारीतून गव्हर्मेंट बँकेच्या कार्यक्रमासाठी बाहेर पडले. तर दुपारी माजी महापौर आर. के. पोवार यांनी कराडपर्यंत पवारांसोबत प्रवास केला.

नगरसेविकांनी घेतली पवारांची भेट

महाडिकांच्या निवास्थसानी राष्ट्रवादीचे अन्य नेते व नगरसेवक हजर नव्हते. त्याचवेळी गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, भाजप आघाडीचे नगरसेवक आशिष ढवळे, शेखर कुसाळे, राजसिंह शेळके, किरण नकाते, महेश वासुदेव, संजय निकम, संग्राम निकम आदी स्वागतसाठी प्रवेद्वारावर थांबून होते. चहापानाचा कार्यक्रम संपल्यानंतर भाजप आघाडीच्या नगरसेविका रुपाराणी निकम, उमा इंगळे, गीता गुरव, कविता माने, अर्चना पागर, भाग्यश्री शेटके, सविता घोरपडे आदींनी पवार यांची भेट घेतली. खासदार महाडिक यांनीच पवारांना नगरसेविका भेटायला आल्याचे सांगितले. त्यावेळी पवारांनी महिला सदस्यांना सभागृहातील कामकाजाविषयी विचारणा केली. त्यावेळी महाडिक यांनी महिला सदस्य प्रभावीपणे कामकाज करतात, सभागृहात नागरी प्रश्नासंदर्भात आवाज उठवतात असे सांगितले. नगरसेविका निकम यांनी खासदारांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर पत्नीला अटक

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, इचलकरंजी

कुमारीमाता, विधवा महिलांची अर्भक बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटील याची पत्नी उज्वला पाटील हिलाही रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. डॉ. पाटील याच्या पत्नीलाही याप्रकरणी अटक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.

होमिओपॅथिक डॉक्टर अरुण पाटील याच्या दवाखान्यावर दिल्लीतील महिला बाल कल्याण समितीच्या पथकाने धाड टाकल्यानंतर दवाखान्यात कुमारीमाता, विधवा महिलांचे अवैधरित्या प्रसूती केली जात असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी डॉ. पाटील यांना अटक केली असता याप्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. याप्रकरणी डॉ. पाटील याने मुंबईतील डॉक्टर अमोल सवाई आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावचे अभियंता अनिल चहांदे यांना अर्भक विकल्याचे कबूल केले होते. त्यानंतर या दोन्ही दाम्पत्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चहांदे दांपत्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर रविवारी याप्रकरणी डॉ. पाटील याची पत्नी उज्वला हिला अटक करण्यात आली. दरम्यान, दवाखान्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. एस.एस.कडोलीकर यांचा पोलिसांनी जबाब घेतला असून डॉ. पाटील याचा निरोप आल्यावर दवाखान्यात जात असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. एकूणच या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून उज्वला पाटील हिची या प्रकरणातील सहभागाबाबत कसून चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारामारीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोव्हेंबर २०१७ महिन्यात झालेल्या मारामारीप्रकरणातील चार संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. सागर प्रकाश कोरे (वय २७), दिलीप सुभाष सूर्यवंशी (२२), निलेश रामचंद्र कापूसकर (२६),राहुल रतन धनवडे (२४, सर्व रा. गणेशनगर, शिंगणापूर रोड, चंबुखडी,ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कसबा बावडा जुने शिये पूल मार्गावर ओंकार विष्णू कांबळे (२३, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) याला २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता पाच संशयितांनी मारहाण केली होती. ओंकार मोटारसायकलवरुन जात असताना संशयितांनी ओंकारच्या मोटार सायकलच्या कार आडवी घातली. यावेळी ओंकारने गाडी व्यवस्थित चालवा असा सल्ला दिल्यावर कारमधील पाचही संशयितांनी ओंकारला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. एका संशयितांने कारमधील टॉमीने मारहाण केली होती. तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या गुन्ह्यातील शहाबाज सलीम पटवेगावर (वय २४, रा. कागदी गल्ली, शुक्रवार पेठ) याला यापूर्वीच अटक केले होते. अन्य चौघे संशयित फरारी होते. शाहूपुरी पोलिसांनी चौघांनी अटक केली. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images