Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आमचे सरकार लायक नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसदर नियंत्रण समितीने निश्चित केलेला दर कमी करण्याचा अधिकार साखर कारखानदारांना कोणी दिला. कारखानदारांना असा अधिकार आहे का. दर कमी करणाऱ्या कारखान्यांना नोटीस द्या, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने 'आमचे सरकार लायक नाही' असा घरचा आहेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. एफआरपी कमी केल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आलेल्या मशाल मोर्चावेळी ते बोलत होते. प्रातिनिधीक स्वरुपात मशाल दिली आहे, ऊसदराचा प्रश्न सुटला नाही तर शेतकरी संतप्त होऊन कार्यालय भस्मसात करेल, असा इशाराही पवार यांनी दिला. उपसंचालक दिग्विजय राठोड यांनी आपल्या मागण्या तातडीने साखर आयुक्त कार्यालयास पाठवण्याचे आवश्यास दिले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

साखर कारखानदारांनी ५०० रुपये एफआरपी कमी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा काढला. पद्मा टॉकिज येथील सेना कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अडवण्यात आला. यावेळी उपसंचालक राठोड, अधीक्षक आर. बी. बारडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे,'२०१७-१८ गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कारखानदार, शेतकरी संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. पण साखर दराचे कारण पुढे करत कारखानदारांनी एफआरपी देण्यास असमर्थता दर्शवत तब्बल ५०० रुपये दर कमी केला. ज्यावेळी साखरेला दर जादा असतो, त्यावेळी कारखानदार जादा दर देत नाहीत, पण कमी झाल्यानंतर मात्र उत्पादकांना कमी एफआरपी देतात. सरकार मराठवाडा, विदर्भातील कापूस उत्पादक किंवा अन्य पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देते, पण उसाचे आगार असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील उसउत्पादकांना नुकसान भरपाई का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.'

यावेळी पवार म्हणाले, 'कारखानदारांनी एफआरपी कमी करुन एकप्रकारे उत्पादकांच्या ५८५ कोटी रुपयांवर दरोडा टाकला आहे. दर कमी करुनही राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ याबाबत 'नो कॉमेट' असे कसे काय म्हणतात. सरकारच्या परवानगीशिवाय दर कमी करणाऱ्या कारखानदारांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन नोटीस द्या,' अशी मागणी केली.'

मोर्चात जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव पाटील, शहरप्रमुख शिवाजी जाधव, संग्रामसिंह कुपेकर, सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, संभाजी भोकरे, मधुकर पाटील, साताप्पा भवान, दुर्गेश लिंग्रस, बाबासाहेब पाटील, विराज पाटील, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, अवधुत साळोखे, शुभांगी पोवार, जयश्री खोत, दिपाली शिंदे, तानाजी आंग्रे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

२४ तास पोलिस बंदोबस्त

गळीत हंगामादरम्यान कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर नेहमीच आंदोलने होत असतात. अनेकवेळा आंदोलक अचानकपणे आंदोलन करतात, अशावेळी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे सहसंचालक कार्यालय येथे २४ तास बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार कार्यालयाला २४ तास दोन पोलिस ठेवण्याच्या सूचना जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांनी लक्ष्मीपुरी स्टेशनला दिल्या आहेत. तसेच आंदोलनादरम्यान दहा पोलिस तैनात राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात रस्ता रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

बीड बायपास रोड (एमआयटी कॉलेज चौक) ते सातारा गाव या रस्त्याच्या कामाचा नोव्हेंबर २०१७मध्ये गाजावाजा करीत प्रारंभ करण्यात आला, मात्र हे काम आठवडाभरच करण्यात आले. कामात 'एमआयटी' महाविद्यालयाच्या पाइप लाइनमुळे काम थांबले होते. अखेर महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर 'एमआयटी'ने नवीन पाइप लाइन टाकली. त्यानंतर तरी या कामाला मुहूर्त लागेल असे वाटले होते, परंतु कंत्राटदाराकडून या कामाला विलंब केला जात असल्याचे समोर आले आहे.

नोव्हेंबर २०१७मध्ये साताऱ्यातील खंडोबाची यात्रा होती. त्यामुळे एमआयटी कॉलेजपासून ते खंडोबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. विशेष म्हणजे या रस्त्याच्या विकासासाठी दोन वर्षांपूर्वी ९८ लाखांचा निधीही मंजूर झाला होता. खंडोबा यात्रेपूर्वीच रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला, परंतु मध्येच एमआयटी महाविद्यालयाच्या पाइप लाइनमुळे काम थांबले. यासंदर्भात वॉर्ड अभियंता पी. जी.पवार यांनी एमआयटी प्रशासनास पत्र देऊन पाइप लाइनचे काम त्वरित करा, असे सांगितले होते. पाइप लाइनचे काम करण्यास एक महिना लागला. त्यानंतर तरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल, असे वाटले होते, मात्र कंत्राटदार हे काम संथगतीने करीत आहेत. मागील आठवडाभरापासून हे काम पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे आणखी किती दिवस साताऱ्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागेल, असा प्रश्न गावातील नागरिक रमेश बहुले, रामचंद्र कर्डिवाल, सोमीनाथ शिराणे यांनी उपस्थित केला आहे.

वाहतुकीवर परिणाम

या रस्त्याच्या दोन्ही बाजुचा रस्ता खोदून त्यात भराव टाकण्यात येत आहे. हे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सातारा गा व परिसरातून एमआयटी कॉलेजकडे जाणारे विद्यार्थी, त्याचबरोबर या रस्त्याने सातारा गाव, भारत बटालियनकडे जाणारे नागरिक आणि श्रीयश कॉलेजकडे जाणारे विद्यार्थी यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक संथ झाली आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर धूळही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल वसुलीची मनमानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोलधाड दिवसेंदिवस अधिक जाचक बनत आहे. किणीसह तासवडे टोल नाक्यावरील एकत्रित पावती घेतल्यानंतर यापूर्वी सवलत दिली जात होती. आता मात्र दहा रुपये अधिक घेतले जातात. याशिवाय वारंवार मागणी करूनही किणी टोल नाक्यावर रिटर्न पावती दिली जातच नाही. अलिकडे तर पावत्यांमध्येही घोळ होत असल्याने वाहनधारक संतापले आहेत.

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत येणारा एकमेव किणी टोलनाका आहे. मुंबईच्या सहकार ग्लोबल लिमिटेड कंपनीकडून या टोल नाक्याचे व्यवस्थापन केले जाते. मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीमुळे सुरुवातीपासूनच हा टोल नाका चर्चेत आहे. कर्नाटकातील टोलच्या तुलनेत किणी येथील टोलची रक्कम अधिक असल्याने ती कमी करावी यासाठी अनेकदा वाहनधारकांनी आंदोलने, निदर्शने केली. सरकार दरबारी निवेदनेही पाठवली, मात्र बदल काहीच झाला नाही. सहकार ग्लोबल कंपनीकडे किणी आणि सातारा जिल्ह्यातील तासवडे या दोन टोल नाक्यांचे व्यवस्थापन आहे. कोल्हापूरकडून पुढे पुणे, मुंबईला जाणाऱ्या वाहनधारकांना यापूर्वी किणी आणि तासवडे येथील दोन टोल नाक्यांची एकत्रित पावती घेताना पाच रुपयांची सवलत मिळत होती. आता मात्र ही सवलत बंद करून अधिकचे पाच रुपये वसूल केले जातात.

छोट्या वाहनांसाठी ७० रुपये टोल आकारला जातो. किणी आणि तासवडे या दोन्ही नाक्यांवरील टोलची रक्कम १४० रुपये इतकी होते. किणी टोल नाक्यावर पुढील तासवडेचा टोल घेतल्यास यापूर्वी १३५ रुपयांची पावती मिळत होती. पाच रुपयांची सवलत मिळत असल्याने बहुतांश वाहनधारक एकत्रित पावती घेत होते, आता मात्र एकत्रित टोलची रक्कम १४५ रुपये घेतली जाते. याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण टोल नाक्यावर दिले जात नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीचे कारण देऊन वाहनधारकांना टाळले जाते. या तुलनेत कर्नाटकातील कोगनोळी टोल नाक्यावर दोन टोल नाक्यांची एकत्रित पावती घेतल्यास ३० टक्के सवलत मिळते. याशिवाय टोलची रक्कमही कमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरील मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी वाहनधारकांकडून सुरू आहे.

रिटर्नची सोय नाहीच

किणी टोल नाक्यावर सुरुवातीपासूनच रिटर्नची पावती दिली जात नाही. याबाबत वाहनधारकांनी अनेकदा राज्य सरकार आणि महामार्ग प्राधिकरणकडे तक्रारी केल्या, मात्र या टोल नाक्यावर रिटर्न पावतीची व्यवस्था उपलब्ध केली नाही. करारातच रिटर्नची सोय केली नसल्याचे टोल नाका प्रशासनाकडून सांगितले जाते. नागरिकांच्या मागणीनंतरही याकडे दुर्लक्ष होत असल्याने सहकार ग्लोबल कंपनीची मनमानी स्पष्ट होते.

पावत्यांचा घोळ कायम

टोलची पावती दिल्यानंतर त्यावर वाहनांचा नंबर, वेळ, टोलची रक्कम याचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र पावत्यांमध्ये गोलमाल केला जातो. अनेक पावत्यांवर वाहनांचे नंबर नाहीत. काहीवेळा रक्कमही दिली जात नाही. या प्रकारामुळे टोलचे पैसे नेमके जातात कोणाच्या खिशात? असा प्रश्न उपस्थित केला जातो. टोलमधून वसूल होणारी रक्कम डिजिटल फलकावर समजली पाहिजे, मात्र वाहनधारकांना समजेल अशा पद्धतीने माहिती दिली जात नाही.

वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे आमचे काम आहे. किणी आणि तासवडे या दोन्ही टोलच्या रकमेत आम्ही याआधी सवलत दिली होती, आता मात्र अधिकचे पाच रुपये घेण्याच्या सूचना आल्या आहेत. वाहनधारकांच्या सोयीसाठी आम्ही फलकही लावले आहेत. याबाबत असलेल्या तक्रारी आम्ही नेहमीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतो.

परेश पटेल,व्यवस्थापक, किणी टोल नाका

किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवर वाहनधारकांची लूट केली जाते. ७० ते ५०० रुपये एका वाहनाकडून घेतले जातात. याशिवाय दोन टोल नाक्यांच्या पावतीत सवलत नाही, रिटर्नची सोय नाही. याबाबत तक्रार करूनही सुधारणा होत नाहीत.

सागर सुतार, वाहनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिरेकनर तीन वर्षांनी जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम व्यावसायात आलेली मंदी, जीएसटी आणि सरकारच्या परवाडणारी घरे योजनेच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर तीन वर्षांनी जाहीर करावा आणि यंदा २०१८-१९ मध्ये रेडिरेकनरची दरवाढ करू नये अशी मागणी 'कोल्हापूर क्रेडाई'ने राज्य सरकारकडे केली आहे. 'रेडिरेकनर'चा दर दरवर्षीऐवजी दर तीन वर्षांनी प्रसिद्ध करावा, अशी मागणी कोल्हापूर 'क्रेडाई'ने केली आहे. सध्या दरवर्षी रेडिरेकनरचा दर जाहीर केला जातो. त्यामुळे होणारी दरवाढीचा परिणाम व्यवसायावर होत आहे. २०१८-२०१९ मध्ये रेडिरेकनरचे दर वाढवू नयेत, अशी मागणीही केल्याची माहिती 'क्रेडाई'चे अध्यक्ष महेश यादव यांनी दिली.

याबाबत क्रेडाईने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकार रेडिरेकनरचे दर वाढवण्याच्या विचारात आहेत. गेल्या दशकात राज्यात रेडिरेकनरचे दर १० ते २५ टक्के वाढले आहेत. गेल्या सात वर्षांत अनेक ठिकाणी रेडिरेकनरमध्ये ३०० टक्के वाढ झाली. ग्रामीण आणि प्रभावी क्षेत्रात एक टक्के स्टॅम्प ड्युटी झाल्यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र गेली पाच वर्षे बांधकाम व्यवसाय मंदीतून जात आहे. गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेतही राज्य सरकारने रेडिरेकनरचे दर वाढवले होते. सरकारने परवडणारी घरे ही योजना जाहीर केली आहे. एकीकडे सरकार जास्तीत जास्त घरे बांधून देण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामीण भागात गावठाणालगत जमिनीचे दर ६०० ते १००० हजार टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. जमिनीच्या दरवाढीमुळे जनतेला घरे बांधून देण्याचे सरकारचे धोरण निष्फळ ठरत आहे.

२०१७ मध्ये स्टॅम्पड्युटीच्या वाढीव्यतिरिक्त घरे घेणाऱ्या ग्राहकांवर जीएसटीचा बोजा पडत आहेत. ५.५ टक्के सर्व्हिस टॅक्स भरणाऱ्या ग्राहकाला १२ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावरील अन्यायाची माहिती लोकप्रतिनिधी, राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना भेटून दिली जाईल. यांतील अडचणी दूर करण्याची विनंती करणार असल्याचे 'क्रेडाई'ने स्पष्ट केले आहे. २००९ मध्ये तत्कालिन सरकारने मंदीचे वातवरण लक्षात घेऊन रेडिरेकनरचे दर न वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. असाच निर्णय यावर्षी घेण्याची परिस्थिती उद्भवली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकांच्या अपेक्षा

- रेडिरेकनरचे दर सरासरी दरांवर आधारित नसावे

रेडिरेकनरमध्ये निवासी दराची स्वतंत्र वर्गवारी करू नये

- मायक्रोप्लॅनिंग करून स्वतंत्र्य मूल्यांकन करावे

- मूल्यदर ठरवण्याची पद्धत शास्त्रशुद्ध करावी

- जिथे कमी दराने व्यवहार झाले असतील, तेथे रेडिरेकनरचे दर कमी करावेत

- मूल्य तक्त्यांमध्ये बांधकामाचा खर्च प्रत्यक्ष खर्चाशी निगडीत असावा

- जीएसटी लागू झाल्याने एक टक्के एलबीटी बंद करावी

- मूल्यदर तक्त्यातील चूक दुरुस्तीची कार्यपद्धत पारदर्शक,गतिमान, वस्तुनिष्ठ असावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांभाळण्यासाठी घेतलेल्या मुलाचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निलंबित डीवायएसपी मधुकर शिंदे यांनी सांभळण्यासाठी घेतलेल्या चौदा वर्षीय मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. चाइल्ड लाइनचे समुपदेशक शिवाजी माळी यांनी पीडित मुलाकडून माहिती घेतल्याने शिंदे कुटुंबीयांनी माळी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याविरोधात मधुकर शिंदे याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला आहे. दरम्यान, पीडित मुलाला बालकल्याण संकुलात दाखल केले असून, त्याचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.

निलंबित डीवायएसपी मधुकर शिंदे पत्नी आणि दोन मुलींसह ते ताराबाई पार्कात वास्तव्यास आहे. २०१२ पासून त्यांनी कनाननगर येथील एका महिलेकडून तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी घेतले होते. हा मुलगा घरातील किरकोळ कामे करीत होता. या मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा निनावी फोन चाइल्ड लाइन या संस्थेकडे आला होता. यानुसार चाइल्ड लाइनचे समुपदेशक शिवाजी माळी यांनी चौकशी केली. मुलाच्या अंगावर भाजल्याचे व्रण आहेत. गुप्तांगाला इजा झाली असून डोक्यावरील केसही विरळ झाले आहेत. सतत होणाऱ्या छळामुळे त्याला मानसिक धक्का बसला आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना या मुलाला शिंदे कुटुंबीयांनी स्वत:जवळ ठेवल्याचे चौकशीत समोर आले. याबाबत चाइल्ड लाइनचे समुपदेशक माळी यांनी मधुकर शिंदेकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन चौकशी करू नका, असे धमकावले. समुपदेशक माळी यांनी सोमवारी पीडित मुलाची सुटका करून छळाचा अहवाल बालकल्याण संकुलात सादर केला. याची माहिती मिळताच मधुकर शिंदे आणि त्यांच्या पत्नीने बालकल्याण संकुलात धाव घेऊन, मुलगा स्वत:च्या मर्जीने राहत असल्याची सारवासारव केली. मुलाच्या आईची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने मुलगा आमच्याकडे राहतो, असे त्यांनी सांगितले. पीडित मुलाने आणि त्याच्या आईनेही छळ झाल्याची माहिती दिल्याने चाइल्ड लाइनने आक्रमक भूमिका घेतली. आपण अडचणीत येणार हे लक्षात येताच शिंदे दाम्पत्याने समुपदेशक माळी यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत माळी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मधुकर शिंदे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. 'शिंदे यांना चौकशीसाठी बोलवले आहे. दोन दिवसांत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल,' अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.

मुलाचा बेकायदेशीर सांभाळ

निलंबित डीवायएसपी मधुकर शिंदे सहा वर्षांपासून मुलाचा सांभाळ करीत आहे. अनाथ किंवा असहाय मुलांना २४ तासांपेक्षा जास्त वेळ स्वत:जवळ ठेवता येत नाही. शिंदे स्वत: पोलिस खात्यात असून कायद्याची माहिती असूनही मुलाला स्वत:च्या घरात ठेवले हा गंभीर प्रकार आहे. त्याच्यासह मुलगी आणि पत्नीने पीडित मुलाचा छळ केल्याचे समुपदेशक माळी यांनी सांगितले. याबाबत चाइल्ड लाइनच्या वतीने तक्रार दाखल केली जाणार आहे.

वैद्यकीय अहवालानुसार होणार गुन्हा दाखल

पीडित मुलाच्या अंगावर चटके दिल्याचे आणि मारहाणीत जखमी झाल्याचे व्रण आहेत. त्याच्या गुप्तांगालाही इजा झाली आहे. लैंगिक शोषणाचीही शक्यता वर्तवली जात आहे. चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनी सुटका केल्यानंतर त्याला बालकल्याण संकुलात दाखल केले आहे. वैद्यकीय अहवाल आणि मसोपचार तज्ज्ञाचा अहवाल आल्यानंतर मधुकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती समुपदेशक शिवाजी माळी यांनी दिली.

हेल्पलाइनवर आलेल्या निनावी फोनमुळे मुलाच्या छळाचा प्रकार उघडकीस आला. चौकशीमध्ये याचे गांभीर्य लक्षात येताच आम्ही पीडित मुलाची सुटका करून त्याला बालकल्याण संकुलात दाखल केले आहे. यादरम्यान मधुकर शिंदे यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारअर्ज दिला आहे. पोलिसांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करावी,अन्यथा कोर्टात तक्रार देऊ.

शिवाजी माळी, समुपदेशक, चाइल्ड लाइन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कैद्यांना दिले मोफत सॅनिटरी पॅड

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता राखणे हा आरोग्याचा पहिला मंत्र आहे. हाच मंत्र कोल्हापुरातील 'टेंडरटच' फाउंडेशन आणि 'गार्गी क्लब' या संस्थांनी कळंबा कारागृहातील महिला कैद्यांपर्यंत पोहोचवला. केवळ आरोग्याबाबत मार्गदर्शनच नव्हे, तर पुढील सहा महिन्यांसाठी लागणारे सॅनिटरी पॅड्स या महिला कैद्यांना मोफत देण्यात आले. कारागृहातील ८० महिला कैद्यांना दरमहा लागणारे प्रत्येकी दहा पॅड देण्यात आले. भविष्यात कारागृहातील महिलांना या संस्थांच्यावतीने पाच हजार पॅड मोफत पुरवण्यात येणार आहेत.

कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांपैकी मासिक पाळी येणाऱ्या ८० महिलांचा समावेश आहे. यापैकी काही कैदी या झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत, तर काही कैदी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. या महिला कैद्यांना कारागृहातर्फे मासिक पाळीच्या काळात पॅड दिले जातात. मात्र, अनेक महिलांना पॅडच्या वापराबाबत माहिती नाही. काही महिलांनी कारागृहात येण्यापूर्वी पाळीच्या काळात पॅडचा वापरच केलेला नाही. पारंपरिक पद्धतीने कापडाचाच वापर काहीजणी करत होत्या. परिणामी, पाळीच्या काळात योग्य स्वच्छता न राखल्याने आरोग्यविषयक समस्याही त्यांना जाणवत होत्या.

'टेंडरटच फाउंडेशन' ही संस्था कोल्हापुरात डे केअर सेंटर चालवते. अनेक सामाजिक उपक्रमातही संस्थेचा सहभाग असतो. महिलांच्या आरोग्याबाबत काही उपक्रम घेता येईल का यादृष्टीने टेंडरटच फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन राजशेखर आणि गार्गी क्लबच्या सदस्या डॉ. नीता नरके यांनी चर्चा केली. यावेळी महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २६ जानेवारी रोजी या दोन्ही संस्थांच्या पुढाकाराने महिला कैद्यांना ८०० मोफत सॅनिटरी पॅड देण्यात आले. यावेळी महिला कैद्यांशी पाळीच्या काळातील समस्या, स्वच्छतेची काळजी, रजोनिवृत्ती काळातील शारीरीक व मानसिक समस्या याविषयी जानकी हॉस्पिटलच्या डॉ. गीता पिल्लई यांनी संवाद साधला. यामध्ये शरीराला असलेली पाण्याची गरज, पाळीच्या काळातील विश्रांती, गुन्हेगारी प्रवृत्तीवर मात करणारी मन:शांती, चांगल्या गोष्टींचा विचार करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला कैद्यांनी विचारलेल्या प्रश्नांचेही यावेळी निराकरण करण्यात आले.

गार्गी क्लबच्या अध्यक्ष विशाखा आपटे, गौरी शिरगावकर, डॉ. नीता नरके, रेखा सारडा, सुलक्ष्मी पाटील यांच्यासह 'टेंडरटच' फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन राजशेखर, स्मिता सावंत, मधुकर नाझरे, मुकुंद कपडेकर, श्रीकांत पोतनीस आदी उपस्थित होते.

मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरीक समस्या असतातच, पण एक मानसिक अस्वस्थताही असते. त्यातही कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या महिलांना पाळीच्या काळात कारागृहातील नियमही पाळावेच लागतात. शारीरीक कष्टाची कामे, नेहमीचा आहार यामध्ये सवलत मिळतेच असे नाही. या काळात आवश्यक भावनिक आधारही अनेकींना कारागृहात मिळेलच असे नाही. त्यामुळे किमान त्यांना सॅनिटरी पॅडची सुविधा मिळावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.

- विशाखा आपटे, अध्यक्ष गार्गी क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींसोबत मैत्रीच्या वादातून महेश कारंडेची हत्या

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

शाळेत मुलींसोबत मैत्री करण्यावरून झालेल्या वादात दहावीतील महेश कारंडे याची वर्गातील त्याच्या दोन जिवलग मित्रांनी निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर फरार झालेल्या त्याच्या दोन्ही मित्रांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.

पिरळे गावाच्या एका बाजूला समता विद्यालय ही विनानुदानित तत्वावर चालणारी शाळा आहे . शाळेत सध्या दहावीची सराव परीक्षा सुरू असल्याने सर्व मुले परीक्षेसाठी दुपारी साडेअकरा वाजता शाळेत येत होती. याच पद्धतीने महेश कारंडे हा देखील आपल्या वस्तीवरील घराकडून पायी चालत शाळेत आला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्याच्या दोन मित्रांनी शेजारील संगणक कक्षात बोलावून घेतले. तेथेच झालेल्या झटापटीनंतर दोन मित्रांनी डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. हे सर्व सुरू असताना शेजारील वर्गातील कोणालाच आवाज आले नाहीत, असं शाळेतील शिक्षकांचं म्हणणं आहे.

महेशचे वडील दोन्ही पायानी अपंग असल्याने ते उपजीविकेसाठी टमटम चालवतात. तर त्याचा मोठा भाऊ शेती करतो. गेल्या दोन तीन दिवसांपासून महेश आजारी होता. मात्र त्याचे मित्र सातत्याने त्याला फोन करून बोलावत होते, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. आपला मुलगा हुशार आणि सगळ्यात लोकप्रिय असल्यानेच त्या द्वेषातून मित्रांनी त्याची हत्या केल्याचं त्याची आई म्हणाली. आपल्या मुलाचं मित्रांसोबत भांडण आहे हे समजलं असतं तर आपणच जाऊन त्या मित्रांना समजावलं असतं. निदान यामुळे त्याची हत्या तरी झाली नसती, अशी भावना त्याचे वडील व्यक्त करत आहेत. मात्र वयात आलेल्या मुलाची अशा पद्धतीने झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण कुटूंब कोलमडून गेलं आहे. महेशच्या वडिलांना ज्यावेळी शाळेतून फोन आला तेंव्हा ते शाळेकडे आले. मात्र तिथे आपल्याच मुलाची हत्या झाल्याचे पाहून त्यांचाही धीर खचला. काल रात्री शवविच्छेदनानंतर महेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेने शाळेतील शिक्षक आणि मुलं हादरून गेली आहे. शाळेला आज सुट्टी देण्यात अली होती. मात्र दहावीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलं शाळेतल्या मुलींशी मैत्री करण्याबाबत ज्या पद्धतीने आक्रमक होऊन आपल्याच मित्राची हत्या करण्यापर्यंत गेल्याने पालकांनाही धक्का बसला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी रात्रभर दोन मुलांना शोधलं आणि सकाळी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी प्राथमिक चौकशीत मुलींच्या कारणावरून झालेल्या वादात हत्या केल्याचं या अल्पवयीन मुलांनी सांगितलं. शाळेत परीक्षा सुरू असताना पॅड आणि कंपास ऐवजी विद्यार्थी दप्तरात कोयते घेऊन कसे येतात याचेही उत्तर शिक्षकांकडे नसले तरी आता पोलीस या सर्व प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. महेशची हत्या केल्यानंतर हे दोघी मित्र त्या खोलीला काडी घालून दुचाकीवरून पळून गेले. शेजारच्या गावात दुचाकी लावून त्यांनी एसटीने पाहुण्यांचे गाव गाठले. मात्र पोलिसांनी रात्रभर त्यांचा शोध घेत आज सकाळी त्यांना ताब्यात घेतलं. महेशच्या हत्येत अजून कोणकोण सामील होते आणि हत्येमागचं खरं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक आजारी असल्याने गेल्या चार दिवसांपासून दवाखान्यात उपचार घेत आहेत. या घटनेबद्दल शाळेतील कोणीच काही बोलण्यास तयार नाहीत. टीव्ही, मोबाईलमुळे लहान मुलं बिघडत चालल्याच्या तक्रारी शहरी पालक करत असताना पिरळे सारख्या अतिशय लहानशा खेडे गावातील ही घटना पालकांना खडबडून जागं करणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी अर्भक विक्रीचे धागेदोरे नागपूर, मुंबईत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अल्पवयीन आणि विधवा मातांची बेकायदेशीर प्रसुती करुन जन्मलेल्या अर्भकांची विक्री करण्याच्या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अरुण पाटीलचा दवाखाना सील करण्यात आला आहे. अर्भक विक्रीचे धागेदोरे मुंबई आणि नागपूरपर्यंत असून विक्री केलेल्या बाळांच्या चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याची दोन पथके तिकडे रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉ. अरुण पाटील याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख आणि त्यांच्या पथकाने डॉ. पाटीलच्या दवाखान्यासह शहरातील दोन डायग्नोस्टिक सेंटरची तपासणी केली. तेथून या प्रकरणाशी संबंधित महत्वाची कागदपत्रे जप्त केली.

येथील जवाहरनगर परिसरातील डॉ. अरुण पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन व विधवा मातांची प्रसुती करुन या अर्भकांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने केलेल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणाचीही यानिमित्ताने पुन्हा चर्चा सुरू झाली होती.

नवी दिल्लीतील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने निनावी पत्राद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे डॉ. पाटील याच्या दवाखान्यावर छापे टाकल्यानंतर यंत्रणा हादरुन गेली. पथकाने जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्यासह छापे टाकले होते. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पाटीलने २ लाखाला मुलगी घेतल्याची माहितीही संबंधित मातेने दिली आहे. अधिक चौकशीदरम्यान डॉ. पाटीलने मुंबई व नागपूर येथे लहान मुले विकल्याची कबुली दिली आहे.

बुधवारी कोल्हापूरचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, डॉ. प्रमिला जरग, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे डॉ. श्रीकांत सुर्यवंशी, कायदेशीर सल्लागार गौरी पाटील यांच्या पथकाने डॉ. पाटीलच्या दवाखान्यात तपासणी करून कागदपत्रे ताब्यात घेतली व दवाखाना सील केला. त्याचबरोबर डॉ. पाटील यांच्या संदर्भाने शहरातील दोन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रुग्ण पाठविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पथकाने जगवाणी व शिखरे डायग्नोस्टिक सेंटरमधील काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, यातील पिडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र हा प्रकार जत (जि. सांगली) येथे घडला असल्याने तो गुन्हा जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पथक चक्रावले

डॉ. पाटीलच्या दवाखान्यात जन्मलेल्या बाळांच्या नोंदी कुठेच नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथक चक्रावून गेले आहे. पाटीलचे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र, सोनोग्राफी मशिन व काही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. तर दवाखान्यातील गायनॉलॉजिस्ट डॉ. कोडोलीकर यांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही, याची चौकशी पोलिस करत आहेत. पथकाकडून डॉ. कोडोलीकर यांच्या नावे असलेल्या सोनोग्राफी मशिनवरील डाटा घेण्याचे काम सुरु केले आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांच्या राजकारणाशी सहमत: सुशीलकुमार शिंदे

$
0
0

सोलापूर :

'शरद पवार जेव्हा नाही...नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर आज ते पंतप्रधान झाले असते. ते आपले गुरू आहेत आणि ते अतिशय चलाख व शार्प आहेत,' असं सांगतानाच प्लेटो हा राजकीय विचारवंत सुजलाम सुफलाम राजकारणाचा सिद्धांत मांडतो. तर मयाकेविली हा धूर्त राजकारणाचा पुरस्कार करतो. तर शरद पवार कात्रजचा घाट दाखवतात. या राजनितीशी मी सहमत आहे,' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते. सध्या केंद्रात विरोधकांना एकत्र करण्याचा काम शरद पवार करत आहेत. पवारांकडे विरोधकांचं नेतृत्व जाऊ नये म्हणून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधकांशी संवाद साधून पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. यापार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 'शरद पवार चलाख राजकारणी आहेत. त्यांना राजकारणातल्या वाऱ्याची दिशा अगोदरच समजते. असंख्य नेते त्यांनी घडवले. काँग्रेस सोडली नसती तर नक्कीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच दावेदार नव्हता,' असं त्यांनी सांगितलं.

मला मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचा कट होता

'२००४ साली माझ्या नेतृत्वात निवडणुका जिंकूनही मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. मला राज्यपाल करण्यात आलं. तो एक नियोजित राजकीय कट होता,' असा गौप्यस्फोट त्यांनी केला. 'पण आपल्याविरोधात कट रचल्या गेल्याचं हायकमांडच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी रातोरात मला केंद्रीय ऊर्जामंत्री केलं,' असंही त्यांनी सांगितलं.

भाजप म्हणजे 'स्लीप ऑफ इंडिया'

'दोन वेळा देशात भाजपचं सरकार आलं. पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यांचं सरकार कोसळलं. त्यावेळी इंडिया शायनिंग झालं होतं. आता स्टँडअप, सीटडाउन आणि स्लीप ऑफ इंडिया अशी भाजपची परिस्थिती झाली आहे,' अशी टीका करतानाच 'लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्यास काँग्रेसलाच फायदा होईल,' असा दावा त्यांनी केला.

राहुल यांना देश स्विकारेल

'मध्यंतरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला. गांधी घराण्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न विरोधकांनी नेहमीच केला आहे. ज्यांच्याबद्दल अपप्रचार झाला त्यांचीच नंतर वाहवा झाली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याप्रमाणेच देश राहुल गांधींना सुद्धा स्वीकारेल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

...तर प्रणिती मुख्यमंत्री होईल

'आमदार प्रणिती शिंदे यांच्या नशीबात असेल तर त्या मुख्यमंत्रीही होतील. त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल असेल,' असं भाकीत त्यांनी केलं. 'आक्रमक नेत्या अशी प्रणितीची प्रतिमा आहे, तर मी सौम्य प्रवृत्तीचा राजकारणी आहे,' असं सांगतानाच 'प्रणिती बोलताना फटकन बोलते. त्यामुळे कधी कधी अडचणी होतात,' असंही त्यांनी सांगितलं.

मोदी राजकारणी म्हणून चांगले नाही

शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'नरेंद्र मोदींशी वैयक्तिक ओळख आहे, त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण ते चहा विकत होते, हे अचानक २०१४ साली समोर आलं. व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत, पण राजकारणी म्हणून नाही. त्यांची धोरणं चुकीची आहेत,' अशी टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा तलावासाठी ५० लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून चार कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यासाठी त्यातील ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली. याशिवाय कणेरी मठावरील विकास कामांसाठी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी पहिल्या टप्यात १५ लाखाचा निधी मिळाला आहे.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रंकाळा तलाव व कणेरी मठ येथील विकास कामांसाठी आमदार महाडिक यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये रंकाळा तलावाच्या सभोवतालची संरक्षक भिंत दुरुस्त करणे, उतरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती करणे, रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन आणि संध्यामठ, धुण्याची चावी यांचे संवर्धन करण्याचे प्रस्तावित केले होते. यासाठी ४ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची नुकतीच बैठक झाली व या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच पहिल्या टप्प्यात त्यातील ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

याबरोबरच कणेरी मठावरील भक्त निवास, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हींग ब्लॉक, वाहनतळ करणे यासाठीही ८२ लाख ९३ हजाराच्या खर्चाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यालाही मंजुरी मिळाली असून त्यापैकी १५ लाख रुपयांच्या निधीचा पहिला टप्पा उपलब्ध झाला आहे.

रंकाळ्यासाठी कसा होणार निधी खर्च

रंकाळा संरक्षक भिंतीचे संवर्धन १ कोटी १० लाख

उतरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती २ कोटी

रंकाळा टॉवरचे संवर्धन १ कोटी

संध्यामठ संवर्धन ७० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबागांना फटका शक्य

$
0
0

हरीश यमगर, सांगली

बुधवारची सकाळ ढगाळ वातावरण घेऊन उगवल्याने सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार हबकले आहेत. धुरकट आणि अधून मधून पावसाचे बारिक थेंब येवू लागले. आकाश झाकाळून गेले. याचा सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या द्राक्षबागांवर आणि काढणीनंतर अद्यापही शेतात पडून असलेल्या शाळू पिकांना बसण्याची शक्यता आहे.

सांगली आणि परिसरात एक लाख एकराहून अधिक क्षेत्रावर द्राक्षबागा विस्तारल्या आहेत. जवळजवळ सर्वच बागांमध्ये यंदा द्राक्षांचा बहर उत्तम आहे. आत्तापर्यंत २५ ते ३० टक्के बागांमधील द्राक्षांचे हार्वेस्टिंग झाले आहे. तर उर्वरित ७५ टक्के बागांचे हार्वेस्टींग होणे बाकी आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रातील द्राक्ष हंगामाला बुधवारपासून निर्माण झालेल्या वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. अशा वातावरणाची पूर्वकल्पना असल्याने बागायतदार सतर्क असला तरी पाऊस कसा आणि किती होणार आहे, याची शाश्वती नसल्याने चिंता वाढली आहे. बेदाण्याला पोषक वातावरण अद्यापही तयार झाले नसल्याने बेदाण्यासाठीच्या बागांच्या हार्वेस्टिंगला गती आलेली नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील एप्रिल आणि सोलापूर जिल्ह्यातला द्राक्ष हंगाम मे महिन्यापर्यंत सुरु राहील, असा अंदाज तज्ज्ञाचा आहे. तोपर्यंत द्राक्षबागांची काळजी घ्यावी लागणार आहे.

बुधवारच्या वातावरणाबरोबर पडणार्या पावसाच्या थेंबांचा द्राक्षांवर फारसा परिणाम होणार नाही. भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल अशी शक्यता आहे. अशावेळी बागेवर कोणत्या औषधांची फवारणी करावी, कशाप्रकारे बागेची काळजी घ्यावी, याबाबत बागायतदार जागरुक आहेत. परंतु पावसाचा जोर वाढला तर द्राक्षमणी फुटून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. घाईघाईने हार्वेस्टिंग करुन द्राक्ष बेदाणा शेडवर टाकला आणि वातावरण असेच राहिले तर याचा परिणाम बेदाण्याच्या दर्जावर होणार आहे. सध्याच्या वातावरणाने बागायतदारांना कोंडीत टाकले आहे. ठोक व्यापार्यांनी काही बागा घेतल्या आहेत. तर काही बागांचे हार्वेस्टींग करुन स्वतःच बाजारपेठेत नेण्याचे काम खुद्द बागायतदारच करतात. सध्या चार किलोच्या द्राक्षपेटीला ११० ते १८० रुपयांचा दर आहे. यापेक्षाही चांगला २१० रुपयांच्याही पुढे भाव मिळणारेही बागायतदार आहेत. या वातावरणाचा परिणाम होऊ नये अशी अपेक्षा आहे.

बहुतांश बागायतदारांना ढगाळ वातावरणाची आठ दिवसांपूर्वीच कल्पना आली होती. बारीक पाऊस पडेल अशी शक्यता आहे. अशावेळी कोणती काळजी घ्यावी, औषधे कोणते फवारावे याबाबत उत्पादक शेतकरी जागरुक आहे. भूरी रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरली आहे. परंतु मोठा पाऊस झाला तर मात्र द्राक्षमण्यांना चिरा जाण्याची भीती आहे. तसे झाले तर द्राक्षबागायतदारांना मोठा फटका बसेल.

- सुभाष आर्वे, अध्यक्ष द्राक्षबागाईतदार संघ, सांगली

शाळू उत्पादकांची तारांबळ

बदलत्या वातावरणाने काढणीला आलेल्या, काही ठिकाणी काढणी करून शेतात पसरलेल्या शाळू उत्पादक शेतकर्यांची तारांबळ उडवून दिली आहे. या वातावरणात पावसाची भर पडली तर काढणीला आलेले उभे आणि काढून पेंड्या बांधण्याविना पडून असलेले शाळू पीक भिजणार आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेले पीक कसे वाचवायचे, या चिंतेने शेतकरी अस्वस्थ आहे.

पावसाची शक्यता

बुधवारच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे मध्यावर असलेल्या ऊस गळीत हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन अधिक असल्याने अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा अधिक ऊस शेतातच उभा आहे. पाऊस पडला तर वाहतुकीवर, वाहने शेतात ये-जा करण्यावर मर्यादा येणार आहेत. तोडणी मजूरांनाही पावसाचा अडथळा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित मुलाच्या अहवालाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेकायदेशीररीत्या मुलाचा सांभाळ करून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी डीवायएसपी मधुकर शिंदे यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले आहे. बालकल्याण संकुलाकडून येणाऱ्या अहवालावर ही कारवाई अवलंबून आहे, त्यामुळे मुलाच्या छळाचा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. दरम्यान, पीडित मुलाच्या वयाची वैद्यकीय चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा सुरू असल्याचे बालकल्याण संकुलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांभाळ करण्यासाठी घेतलेल्या १३ वर्षीय मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. ताराबाई पार्क परिसरात राहणारा निलंबित डीवायएसपी मधुकर शिंदे याच्यासह त्याची पत्नी आणि मुलीने छळ केल्याचे चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांनी सांगितले आहे. असा अहवालदेखील समुपदेशक शिवाजी माळी यांनी बालकल्याण संकुलाकडे सादर केला आहे. चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनी पीडित मुलाची सुटका करून त्याला बालकल्याण संकुलात दाखल केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना संकुलातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय तपासणीतून पीडित मुलाचे वय आणि त्याच्यावर झालेल्या छळाची माहिती मिळणार आहे. मात्र, अद्याप तपासणी झाली नसल्याने बालकल्याण संकुलातील अधिकाऱ्यांनाही वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणारा डीवायएसपी मधुकर शिंदे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'तक्रार अर्जाची चौकशी करून संबंधित संशयितावर गुन्हा दाखल केला जाईल. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन निलंबित डीवायएसपी शिंदे दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होईल. बालकल्याण संकुलाकडून तक्रार दाखल होताच पुढील कारवाईला सुरुवात होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचा अभ्यास तर जनतेची परीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना रोज काही ना काही तरी कारणे सांगून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा उद्योग सुरू आहे. शेतकऱ्यांना हवी तशी नव्हे तर सरकारला हवी तशी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न होत आहे. वेळेवर मदत झाली तरच त्या मदतीचा उपयोग आहे. सरकारच्या अनेक योजना रखडल्या आहेत. शेतकरी, कामगार ,व्यापारी, नोकरदार आदी सर्व घटक नाराज आहेत. राज्यातील कोणत्याही प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले तर अभ्यास सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्र्यांचा अभ्यास तर जनतेची परीक्षा सुरु असल्याची टीका आमदार अमित देशमुख यांनी केली.

करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन.पाटील होते. तत्पूर्वी महे येथील भैरवनाथ विकास सेवा संस्था, बीडशेड येथील श्रीपतरावदादा सहकारी बॅंक व कसबा बीड येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतींचे उद्घाटन आमदार देशमुख व पी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार देशमुख म्हणाले, 'पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे एक प्रमुख केंद्र असताना भाजपच्या काळात कोणताही मोठा उद्योग येथे उभारलेला पहायला मिळत नाही. विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्री पदाच्या काळात लातूरला २३ तर कोल्हापूरला २४ दौरे झाले होते. ते सगळे कार्यक्रम पी. एन. व कोल्हापूरवरच्या प्रेमापोटी झाले होते. सहकारातील एक आदर्श अशी श्रीपतरावदादा बॅंकेची वाटचाल आहे. पी. एन. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिले आहे. राज्यात गोकुळचा नावलौकिक आहे. राज्यातील एक अग्रेसर दूध संघ संघ म्हणून त्याची ओळख आहे. हा कार्यक्रम म्हणजे २०१९ च्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ माना, तयारीला लागा आणि विकासासाठी धडपडणारे पी.एन.पाटील यांच्यासारखे खमके सहकारी विधानसभेत पाठवा.'

माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील म्हणाले , 'आता काय महाग व्हायचे राहिले आहे सांगा? लोकांना आता सांगायची गरज राहिली नाही कारण जनताच आता या सरकारच्या कामकाजाविरुद्ध बोलू लागली आहे. राहुल गांधी हे पहिल्यापासूनच अभ्यासू व सक्षम नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाची झलक आता दिसायला लागली आहे. '

माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले , 'सोनिया गांधी १७ वर्षे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या तर पी. एन. पाटील १९ वर्षे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर येते. पी. एन. यांनी कामासाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उद्या या, नंतर सांगतो, बघूया अशी उत्तरे त्यांनी कधीही दिली नाहीत.'

पी.एन.पाटील म्हणाले, 'मतदारसंघातील अनेक विकासकामे करताना विलासराव देशमुख यांचे मोठे सहकार्य लाभले होते. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सहकार वाढवला. कॉंग्रेसच्या काळात सर्वांना कर्जमाफी झाली. पण भाजपच्या काळात कर्जमाफीत फसवाफसवी सुरू आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचे काम चालू आहे.'

मेळाव्यास सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील , सांगली शहर कॉंग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील , माजी मंत्री भरमूआण्णा पाटील , राजेश नरसिंग पाटील , भोगावती कारखान्याचे व्हा. चेअरमन उदयसिंह पाटील , श्रीपतरावदादा बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन व जि. प. सदस्य राहुल पाटील, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, जि.प. सदस्य सुभाष सातपुते, शामराव सूर्यवंशी, करवीरचे उपसभापती विजय भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गोकुळचे संचालक सत्यजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य राजेखान शानेदिवाण यांनी केले.

राष्ट्रवादीनेच काय तो निर्णय घ्यावा....

'आतापर्यंत जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहकार्य केले. आम्ही आजतागायत कुणाशी गद्दारी केली नाही. मात्र विधानसभेच्यावेळी करवीरमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करते ही गद्दारी आहे. आमचे कार्यकर्तेही आता आक्रमक बनले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा ते आता राष्ट्रवादीने ठरवावे', असे पी.एन. पाटील यांनी सांगताच कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत जोरदार समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरु

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील जुन्या शिवाजी पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला बुधवारी सुरुवात झाली. सर्वंकष माहिती संकलित करुन पुलाचे प्रोफाइल तयार करण्यात येणार आहे. गुरुवारी रडारच्या सहाय्याने पुलाची वाहन भारक्षमता तपासण्यात येईल. पुलाच्या दगडाची स्थिती, मटेरिलयची क्षमता आणि आयुर्मानही तपासण्यात येणार आहे. आठवडाभरात केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाकडे अहवाल सादर होणार आहे.

शिवाजी पुलावर २६ जानेवारीला रात्री मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात तेराजण मृत्यूमुखी पडले होते. अपघाताच्या दिवसापासून पुलावरुन अवजड वाहतूक बंद केली आहे. राज्य सरकारच्याने ध्रुव कन्सल्टंन्सी सर्व्हिसेसमार्फत स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरु केले आहे. ध्रुव कन्सल्टंन्सीमार्फत स्ट्रक्टवेल डिझाइनर्सच्या अकराजणांच्या टीमने सकाळी १०.३० वाजता ऑडिटच्या कामाला सुरुवात केली. पुलाचे मोजमाप घेताना कॅमेऱ्याचा आधारही घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी बूममधून पुलाच्या खालच्या भागापर्यंतची मोजमापे घेतली. स्ट्रक्टवेलचे अभियंता जितेंद्र भुजबळ यांच्यासह ११जणांची टीम कार्यरत आहे.

राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, उपअभियंता संपत आबदार, व्ही. जी. गुळवणी, सहायक अभियंता प्रशांत मुंगाटे, ध्रुव कन्सल्टंन्सीचे अभियंता जी. पी. सुर्यवंशी यांनी भेट देऊन पुलाची पाहणी केली. शाहूवाडी विभागीय पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनीही दुपारी भेट दिली.

रडारव्दारे तपासणी

शिवाजी पूल हा ब्रिटीशकालीन आहे. पुलाचे आयुष्य संपल्याचा रिपोर्ट आहे. शिवाय पुलाच्या सुरक्षेसाठी दहा टनापेक्षा अधिक भाराच्या वाहनांना पुलावरुन वाहतुकीस मनाई करण्याचा अहवाल आहे. यामुळे सध्या पुलावरुन अवजड वाहतूक बंद आहे. ऑडिटमध्ये गुरुवारी पुलाची वाहन भार क्षमता तपासण्यात येणार आहे. शिवाय एंडोस्कोपी संकल्पनेनुसार पुलासाठी वापरलेल्या मटेरियलची तपासणी, बांधकामात वापरलेल्या दगडाची स्थिती, त्याचे आयुर्मान या बाबी तपासण्यात येणार आहेत.

पुलावरुन वाहतूक बंद

सकाळी १०.३० वाजता ऑडिटला सुरुवात झाल्यानंतर पुलावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त होता. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. दरम्यान सकाळी ऑडिटचे काम सुरु झाल्यानंतर वडणगे येथील संजय ठमके यांनी पुलाचे मोजमाप घेण्याच्या कामी पथकाला मदत केली. ठमके हे खासगी बांधकाम व्यावसायिकाकडे सुपरवायझर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक विक्रीचे धागेदोरे नागपूर, मुंबईपर्यंत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अल्पवयीन आणि विधवा मातांची बेकायदेशीर प्रसुती करुन जन्मलेल्या अर्भकांची विक्री करण्याच्या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अरुण पाटीलचा दवाखाना सील करण्यात आला आहे. अर्भके विक्रीचे धागेदोरे मुंबई आणि नागपूरपर्यंत असून, विक्री केलेल्या बाळांच्या चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याची दोन पथके तिकडे रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉ. अरुण पाटील याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख आणि त्यांच्या पथकाने डॉ. पाटीलच्या दवाखान्यासह शहरातील दोन डायग्नोस्टिक सेंटरची तपासणी केली. तेथून या प्रकरणाशी संबंधित महत्वाची कागदपत्रे जप्त केली.

येथील जवाहरनगर परिसरातील डॉ. अरुण पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन व विधवा मातांची प्रसुती करुन या अर्भकांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने केलेल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणाचीही यानिमित्ताने पुन्हा चर्चा सुरू झाली होती.

नवी दिल्लीतील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने निनावी पत्राद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे डॉ. पाटील याच्या दवाखान्यावर छापे टाकल्यानंतर यंत्रणा हादरुन गेली. पथकाने जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्यासह छापे टाकले होते. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पाटीलने २ लाखाला मुलगी घेतल्याची माहितीही संबंधित मातेने दिली आहे. अधिक चौकशीदरम्यान डॉ. पाटीलने मुंबई व नागपूर येथे लहान मुले विकल्याची कबुली दिली आहे.

बुधवारी कोल्हापूरचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, डॉ. प्रमिला जरग, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे डॉ. श्रीकांत सुर्यवंशी, कायदेशीर सल्लागार गौरी पाटील यांच्या पथकाने डॉ. पाटीलच्या दवाखान्यात तपासणी करून कागदपत्रे ताब्यात घेतली व दवाखाना सील केला. त्याचबरोबर डॉ. पाटील यांच्या संदर्भाने शहरातील दोन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रुग्ण पाठविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पथकाने जगवाणी व शिखरे डायग्नोस्टिक सेंटरमधील काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, यातील पिडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र हा प्रकार जत (जि. सांगली) येथे घडला असल्याने तो गुन्हा जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

\Bपथक चक्रावले\B

डॉ. पाटीलच्या दवाखान्यात जन्मलेल्या बाळांच्या नोंदी कुठेच नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथक चक्रावून गेले आहे. पाटीलचे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र, सोनोग्राफी मशिन व काही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. तर दवाखान्यातील गायनॉलॉजिस्ट डॉ. कोडोलीकर यांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही, याची चौकशी पोलिस करत आहेत. पथकाकडून डॉ. कोडोलीकर यांच्या नावे असलेल्या सोनोग्राफी मशिनवरील डाटा घेण्याचे काम सुरु केले आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएचबी प्राध्यापकांची आर्थिक कोंडी

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर : पीएच.डी.पदवी, नेटसेट परीक्षेचे प्रमाणपत्र आणि जवळपास दहा ते बारा वर्षांहून अधिकचा अध्यापनाचा अनुभव असूनही तासिका तत्वावर काम करणारे हजारेक प्राध्यापक अडीच ते सात हजार रुपये मानधनावर राबत आहेत. या प्राध्यापकांना दर महिन्याला जेमतेम चार आकडी पगारही मिळत नाही. पाठपुरावा आणि सतत मागणीनंतर संस्था प्रशासन सात ते आठ महिन्यांनी पगाराचा धनादेश हातात टेकवते, तेव्हा त्यातीलही काही पैसे कापून घेतलेले असतात. अशिक्षित गवंडीकाम करणाऱ्यांच्या मजुरीपेक्षाही कमी वेतनावर तासिका तत्वाने काम करणाऱ्या प्राध्यापकांची सध्यातरी आर्थिक सर्कस सुरू आहे.

कनिष्ठ कॉलेजांमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना तासाला ७२ ते ८० रूपये वेतन ठरले आहे तर वरिष्ठ कॉलेजांमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना तासाला २४० रूपये वेतन ठरले आहे. या प्राध्यापकांना वेळापत्रकानुसार दर महिन्याला २८ तासिकांचा वर्कलोड मिळतो. यापैकी बहुतांश प्राध्यापकांकडे पीएचडी तसेच नेटसेट पदवी प्रमाणपत्र आहे. दहा ते पंधरा वर्षांचा अनुभवही गाठीशी आहे. कोल्हापुरातील प्रमुख कॉलेजांमध्ये किमान वीस ते कमाल ८० प्राध्यापक तासिका तत्वावर कार्यरत आहेत. मात्र त्यांना ठरलेले वेतनही दरमहा मिळत नसल्याचे दाहक वास्तव आहे.

कॉलेजमध्ये कायम स्वरूपी प्राध्यापक नियुक्तीची जाहीरात निघेल, तेव्हा तासिका तत्वावरील कामाचा अनुभव लक्षात घेऊन आपल्याला अध्यापनाच्या मुख्यप्रवाहात संधी मिळेल या विचाराने आजमितीला कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजार प्राध्यापक तासिकातत्वावर काम करत आहेत. यापैकी काहीजण शहरात तर काहीजण दीड दोन तासांचा प्रवास करून ग्रामीण भागातील कॉलेजमध्येही जात आहेत. तुटपुंज्या आणि तेदेखील सहा महिन्यातून एकदा मिळणाऱ्या वेतनावर घरखर्च भागत नसल्याने सकाळी कॉलेज आणि दुपारी कोणत्यातरी दुकानात काम करणे किंवा शेतात मजुरीला जाणे हा मार्ग धरण्याशिवाय पर्याय नसल्याचेही दिसून आले आहे.

कनिष्ठ कॉलेजमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना २८ तासिकांचे ८० रूपयांप्रमाणे दरमहा २२४० रूपये तर वरिष्ठ कॉलेजमध्ये तासिकातत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दरमहा २४० प्रमाणे ६७२० रूपये वेतन निश्चित केले आहे. कला व वाणिज्य शाखेसाठी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेतील तासिका या प्राध्यापकांना मिळतात. दहानंतरचे तास घेण्याची जबाबदारी कायमस्वरूपी प्राध्यापकांकडे असते. यातील मेख अशी आहे की सकाळच्या सत्रातील दोन तासातच विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण क्षमतेने असते तेव्हा तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या वेळेवर हजर राहण्यापासून अभ्यासक्रम पूर्ण करणे या गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. सकाळी दहा नंतर कॉलेजमध्ये वर्गातील मुलांची उपस्थिती कमी होते. कॉलेजमधील अंतर्गत उपक्रमांसाठी सकाळी दहानंतरचे तास अनेकदा होत नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी काम करणारे प्राध्यापक वर्कलोड असूनही निवांत राहतात अशी तक्रार तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी केली तर त्याकडे संस्था दुर्लक्ष करते. नोकरी टिकवायची असल्याने आणि संधी मिळाली तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी विचार केला जाईल या विचारातून सीएचबीधारक प्राध्यापक मजुरीपेक्षाही कमी मानधनावर अध्यापनाचा वसा सांभाळत आहेत.

विद्यार्थी घडवणारा शिक्षक आज त्याच्या न्यायासाठी भांडत आहे. यामध्ये आता तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापकही संघटीत झाले आहेत. प्रचंड मेहनतीने मिळवलेली पीएच.डी. पदवी, तसेच नेट व सेट या सारख्या पात्रता परीक्षा देऊनही कित्येक प्राध्यापक तासाला ७२ रूपयांवर काम करत आहेत. प्रामाणिकपणे अध्यापन करूनही जेव्हा भरतीची वेळ येते तेव्हा संस्थाचालक आपल्या मर्जीतील व्यक्तींचीच भरती करत असल्याचेही प्रकार सुरू आहेत. त्यासाठी या प्राध्यापकांना संघटीत करणे आवश्यक होते.

- डॉ. सुभाष जाधव, संघटक सीएचबी प्राध्यापक आंदोलन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणचा भार एका अधिकाऱ्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीऐवजी प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय झाला. प्राधिकरणची अधिसूचना प्रसिद्ध होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर प्राधिकरण सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लातूरचे नगररचनाकार शिवराज पाटील यांची नेमणूक झाली. पाटील यांनी गुरुवारी दुपारनंतर सूत्रे हाती घेतली. पण कार्यालयीन कर्मचारी वर्ग, प्राधिकरणच्या कामासाठी सहकार्य करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी पाटील यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही कार्यालयात नव्हते. मोठा गाजावाजा करत वेळोवेळी घोषणांचा पाऊस पाडत प्राधिकरणची स्थापना झाली पण,सुरुवातच अशी झाल्याने कामकाजाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्राधिकरणचे कार्यालय सुरू केले आहे. पाटील यांनी प्राधिकरण सचिव म्हणून सूत्रे हाती घेईपर्यंत कार्यालयातील साफसफाई, टेबल खुर्च्यांची मांडणी सुरू होती. प्राधिकरणचे कार्यालय नेमके कुठे असणार याविषयी फारसा गाजावाजा झाला नसल्याने बांधकाम व आर्किटेक्ट क्षेत्रातील अनेकजण शोध घेत ऑफिस गाठत होते.

दरम्यान प्राधिकरण सचिव पाटील यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्राधिकरणमधील समाविष्ठ गावांची माहिती घेतली. प्राधिकरणात समाविष्ठ ४२ गावे, शहरालगतचा परिसर, भौगोलिक रचना या संदर्भात अन्य विभागातील अधिकाऱ्यांसामवेत चर्चा केलीनगर रचनेच्या योजना, समाविष्ठ गावे, प्राधिकरणची हद्द यासंदर्भात सरकारच्या नगररचना विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. प्राधिकरण क्षेत्राचा नकाशा व अन्य कागदपत्रांची पाहणी केली. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, मूल्य निर्धारण नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. एन. चव्हाण यांच्यासह अन्य विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्य सरकारकडून सचिवपदी पाटील यांची नियुक्ती केली पण कार्यालयीन वर्ग अजून उपलब्ध केला नाही. प्रादेशिक योजना नगररचना विभाग व मूल्य निर्धारण नगर रचना विभागाकडून सध्या तांत्रिक सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्राधिकरणच्या आस्थापना विभागासंदर्भात विचारणा केली असता सचिव पाटील म्हणाले, प्राधिकरणच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. येत्या १५ दिवसांत ऑफिसमधील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर डेक्कनला ब्लॅकलिस्टमध्ये टाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या उडान योजनेतील पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी दिरंगाई करीत असल्याने एअर डेक्कन विमान कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे केली. दरम्यान, कोल्हापूर ते व्हाया पुणे, मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

उडान योजनेतंर्गत कोल्हापूर ते मुंबई मार्गावर नव्या वर्षात विमानसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र एअर डेक्कन कंपनीने मंत्री जयंत सिन्हा यांची भेट घेऊन सेवा देण्यास असमर्थता दर्शविली. या पार्श्वभूमीवर महाडिक व संभाजीराजे यांनी दिल्लीत सिन्हा यांची गुरुवारी भेट घेत ही कंपनी विमानसेवा सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. उडान योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आहे. मात्र अद्याप विमानसेवा सुरू नाही. ही विमानसेवा सुरू करावी. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर विमानसेवा देता येत नसल्यास कोल्हापूर ते पुणे, मुंबई मार्गे अहमदाबाद या मार्गावर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

उडान योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील विमानसेवा हैदराबाद, तिरुपती, बेंगळुरू ते कोल्हापूर मार्गांना मान्यता दिली आहे. आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा प्रस्तावित आहे. मात्र ही सेवा अद्याप सुरू झाली नसल्याने हवाई मार्ग बदलण्यास आणि एअर डेक्कनऐवजी अन्य विमान कंपनीला सेवा करण्याची परवानगी द्यावी. त्याचा फायदा कोल्हापूरकरांना होणार असल्याचे संभाजीराजे आणि महाडिक यांनी निदर्शनास आणून दिले. दिरंगाई करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला येत्या आठवडाभरात कारणे दाखवा नोटीस काढावी. कोल्हापूर ते मुंबई विमानसेवाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ही त्यांनी केली. त्याबाबत लवकरच विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सिन्हा यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील लूट मुंबईतील टोळीकडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरी कॉर्नर येथे बुधवारी सकाळी झालेल्या लुटीच्या घटनेतील लुटारू मुंबईचे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. लुटारुंच्या टोळीला स्थानिक टिप्सरने मदत केल्याची माहितीही समोर आली असून, लुटीपूर्वी दोन तास त्यांनी रस्त्यांची रेकी केली. गुन्ह्यातील कारचा नंबर आणि कारमालकाचे नावही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुणे, पनवेल आणि मुंबईत छापे टाकून पोलिसांनी तीन ते चार संशयितांकडे चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

गुजरी परिसरातील संभवनाथ जैन मंदिराजवळ बुधवारी सकाळी कांतिलाल मेहता या मुंबईच्या सराफावर पाच लुटारुंनी हल्ला करुन लुटारुंनी ३४ लाखांचे दागिने लंपास केले. घटनेपूर्वी दोन तास लुटारू शहरात आले. यानंतर त्यांनी स्थानिक टिप्सरच्या मदतीने रस्त्यांची रेकी केली. सराफ मेहता यांना लुटण्याचे ठिकाणही त्यांनी निश्चित केले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. संशयित कारचा नंबर पोलिसांना मिळाला आहे. यावरून कारमालकाचा शोध लागला आहे. मात्र पोलिसांनी त्याच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली आहे. लुटीपूर्वी दोन दिवस संशयित कार कुठे फिरली, याची माहिती घेण्यासाठी राज्यातील सर्व टोलनाक्यांशी संपर्क केला आहे.

बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास संशयित कार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याचवेळी स्थानिक टिप्सरला कारमध्ये घेऊन कार दोन तास शहरात फिरली. शहरातून बाहेर पडणारे मार्ग, गुजरी, रंकाळा रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी परिसराची रेकी केली. सहाच्या सुमारास पुन्हा ती कार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचली. सराफ कांतिलाल मेहता खासगी बसमधून सीबीएससमोर उतरताच टिप्सरने लुटारुंना मेहता यांची माहिती दिली. मेहता रिक्षात बसून स्टेशन रोडकडे निघताच लुटारुंनी कारमधून पाठलाग सुरू केला. स्टेशन रोडवर रिक्षाला ओव्हरटेक केले. मेहता मरुधर भवनमध्ये पोहोचण्यापूर्वी पाच मिनिटे लुटारू मरुधर भवनच्या समोरच्या गल्लीत थांबले होते. लुटीनंतर ते तातडीने शहरातून बाहेर पडले. त्यांच्या शोधासाठी पथके मुंबईत पोहोचली आहेत. लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

पुणे, पनवेल मुंबईत छापे

संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी गुरुवारी पुणे, पनवेल आणि मुंबईत तीन ठिकाणी छापे टाकले. कारवाईत तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. लुटारुंच्या टोळीतील काही संशयित मुंबईतील गुन्हेगारी टोळीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. कारच्या नंबरवरून लवकरच कारमालकही ताब्यात येईल. यानंतर लुटीचा उलगडा होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली. मेहता मुंबईतून बाहेर पडल्यानंतर संशयित कारही कोल्हापूरच्या दिशेने आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरीतील शाहू जलतरण तलाव, व्यापारी संकुल, टेनिस कोर्टची देखभाल या तीन महत्वाच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करुनही प्रशासनाने तीन वर्षे दुर्लक्ष केले आहे. आता सात दिवसात काम सुरु केले नाही तर नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी दिला. जलतरण तलावाबाबत खुद्द आयुक्तांनी पाहणी करुन अंदाजपत्रक तयार करुनही निधी अभावी काम थांबलेले आहे. आता काम सुरु झाले नाही तर या हंगामातही तलाव बंद ठेवावा लागेल, अशी परिस्थितीही जाधव यांनी मांडली.

प्रलंबित कामांबाबत जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला. त्यावेळी ते म्हणाले, राजारामपुरी एक्स्टेंशन येथील शाहू जलतरण तलाव महापालिकेने भिमा हेल्थ झोनला २० वर्षे भाडेकराराने दिला आहे. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. गळती दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. जवळपास सहा महिन्यापूर्वी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली होती. त्यानंतर ४६ लाख रुपयांचे गळती दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. पण हे काम अद्याप निधीअभावी प्रलंबित आहे. त्यामुळे जलतरण तलाव बंद ठेवावा लागला आहे. नागरिकांची गैरसोय होत असून आता काम सुरु झाले नाही तर या उन्हाळ्यामध्येही तलाव बंद ठेवावा लागेल, असेच दिसते. याबरोबरच प्रभागात महापालिकेचे व्यापारी संकुल बांधण्यासाठी सोलापूर येथील भारत कन्स्ट्रक्शनला काम दिले आहे. त्याची वर्कऑर्डर तीन वर्षापूर्वी दिली आहे. तसेच दहा लाख रुपये खर्चही झाले आहेत. पण आतापर्यंत पुढील काम केलेले नाही व महापालिकेला द्यायचा ५० लाख रुपयांचा प्रिमिअमही दिलेला नाही. काम तातडीने सुरु करण्याची आवश्यकता आहे. शहर अभियंता कार्यालयाकडून तसेच नगररचना कार्यालयाकडून काहीच पाठपुरावा केला गेलेला नाही.

जाधव म्हणाले, या बरोबर जलतरण तलावाच्या परिसरात टेनिस कोर्ट सुरू आहे. तिथे संरक्षक भिंत व गेट नसल्याने अवैध धंदे सुरू आहेत. त्याबाबतही पाठपुरावा केला. पण दखल घेतली जात नाही. प्रशासनाकडून या कामांकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने काम सुरु न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images