Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

माळशिरसमध्ये तृतीयपंथीज्ञानदेव कांबळे सरपंच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील सरपंचपदाचे उमेदवार ज्ञानदेव कांबळे या तृतीयपंथी उमेदवाराला गावाने भरभरून मते देऊन विजयी केले. सोलापूरच्या इतिहासात तृतीयपंथी निवडून येण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे.
तरंगफळ माळशिरस तालुक्यातील १८०० लोकवस्तीचे एक दुष्काळी गाव आहे. निवडणूक जाहीर होताच अनेक दिग्गज सरपंचपदासाठी तयारीला लागले होते. गावोगाव भटकून जीवन जगणारे ज्ञानदेव कांबळे यांनीदेखील सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गावातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांना भाजपची उमेदवारी देऊन निवडणुकीस उभे केले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जयसिंग साळवे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. संपूर्ण प्रचारात त्यांच्या तृतीयपंथी असण्यावर टीका-टिप्पणी झाली, तरीही ज्ञानदेव उर्फ माऊली यांनी घरोघरी जात आपला प्रचार केला. संपूर्ण माळशिरस तालुक्याचे या गावाच्या लढतीकडे लक्ष होते. पहिल्या फेरीपासूनच कांबळे यांनी आघाडी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकविली. अखेरच्या फेरीत कांबळे यांना १७७ मताधिक्याने विजयी घोषित करताच कार्यकर्त्यांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली. गावातील नऊ सदस्यांच्या जागांपैकी भाजपने सहा, तर राष्ट्रवादीच्या पॅनलने तीन जागा जिंकल्या. लोकांनी आपल्याला निवडून दिले व विश्वास दाखवला आता गावाचा विकास करून आपण त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे कांबळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
उत्तर- दक्षिण सोलापूरमध्ये
भाजपचे कमळ फुलले
उत्तर सोलापुरातील डोणगाव, नरोटेवाडी, कारंबा, रानमसले, पाकणी, मार्डी या सहा ग्रामपंचायती भाजप आणि मित्रपक्ष, गावडी दारफळ, शिवणी, कौठाळी आणि भवळे या चार ग्रामपंचायती काँग्रेस, अकोलेकाटी राष्ट्रवादी आणि नंदूर सर्वपक्षीय निवडून आले. उत्तरमध्ये एकूण १२ ग्रामपंचायती होत्या. ज्यामध्ये भाजप आणि मित्रपक्षाने ६ जिंकल्या तर काँग्रेसने ४ जिंकल्या आहेत.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील १७ पैकी १३ भाजपने तर उर्वरित ४ काँग्रेस आणि मित्रपक्षाने जिंकल्या आहेत. निंबर्गी, शंकरनगर, बंकलगी, आहेरवाडी, वांगी, विंचूर, मंद्रुप, तेरामैल, औज मंद्रुप आदी भाजपने जिंकल्या आहेत. कंदलगाव, तोगराळी आदी चार ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादीला फटका
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली. राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून, स्थानिक आघाड्यांनी बाजी मारत आपले गड राखले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ग्लोबल मार्केटिंग करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक पदार्थांचे जागतिक पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावेत’, असे प्रतिपादन चितळे डेअरीचे कार्यकारी संचालक गिरीष चितळे यांनी केले. ‘वर्ल्ड फूड डे’च्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग व सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने 'अन्न प्रक्रीया उद्योगात व्यवसायाची संधी' या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित केलेल्या अध्यक्षस्थानी सीआयआयच्या दक्षिण महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी होते.

चितळे म्हणाले, ‘देशामध्ये बारा ते पंधरा टक्के वाटा हा अन्न प्रक्रिया उद्योगाचा आहे. या क्षेत्रामध्ये तरुणांना अनेक प्रकारच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संशोधक विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मालाच्या किंमती कमी करणे व गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहण्याची आवश्यकता आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये विविध प्रकारच्या स्वयंचलित उपकरणांची प्रचंड निकड आहे. कडधान्य, पालेभाज्या, फळे हे देशातील लोकसंख्येला पुरत नाहीत. बऱ्याच ठिकाणी ते पोहोचत नाहीत किंवा खरेदी करता येत नाहीत. त्यासाठी प्रक्रिया उद्योग पुढे येत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन, त्यावरील प्रक्रिया आणि मार्केटिंग यांचा योग्य ताळमेळ जमल्यास या क्षेत्रामधील तरुणांना प्रचंड उभारी मिळेल.’

चितळे म्हणाले, ‘भारतातील लोकांच्या खाण्याच्या गरजा बदलत नाहीत. पद्धती बदलत आहेत. मालाची गुणवत्ता टिकविणे, साठवणूक आणि वाहतूक करणे यामध्ये प्रचंड संधी निर्माण झालेली आहे. विद्यापीठ आणि उद्योग यांचे समन्वयाने विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होऊ शकते. भारतातील प्रत्येक छोटा व्यापारी आणि उद्योजक हा स्वत:च स्टार्ट अप आहे. हे छोटे व्यापारी दोन-तीन वर्षानंतर व्यवस्थापक ठेवून व्यापार पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के स्टार्टअप संपून जातात.’

पल्लवी कोरगावकर यांनी चर्चासत्रामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे. एस. बागी, डॉ. ए. के. साहू, प्रताप नाईक, उपकुलसचिव डॉ. जी. एस. कुलकर्णी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील सुमती राजगोंडा पाटील (वय ३२) यांच्यावर दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. किडनीवर अँड्रीनल ग्रंथीत चार सेंटीमीटरची गाठ शस्त्रक्रियेने काढण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटलमधील अशी पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा सीपीआर प्रशासनाने केला आहे. सीपीआरच्या सर्जरी विभागातील डॉ. विजय कस्सा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

रांगोळी येथील सुमती पाटील यांच्या पोटात दुखत होते. वारंवार चक्कर येत होती. कोल्हापूर व इचलकरंजीतील वैद्यकीय उपचारानंतर त्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या. डॉ. किस्सा आणि त्यांच्या टीमने पाटील यांची तपासणी केली. यावेळी किडनीवर अँड्रीनल ग्रंथीत चार सेंटीमीटरची गाठ असल्याचे निदान झाले. अँड्रीनल ग्रंथी ही शरीराच्या विविध कार्यावर आपल्या विकरांद्वारे (हार्मोन्स) नियंत्रण ठेवते. या ग्रंथीतील इपीनफिरीनमुळे शरीराचे रक्तदाब नियंत्रणात राहते. तर अॅल्डोस्टेरॉइन विकार शरीररातील क्षार व पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. इतर काही स्त्राव शरीराच्या वाढीसाठी व जननेंद्रीयांच्या विकासासाठी गरजेचे असतात. अँड्रीनलच्या गाठीमुळे शरीरात बिघाड होतो. रक्तदाब वाढतो. या ग्रंथीच्या पाच ते सात टक्के गाठी कॅन्सरच्या असू शकतात. तसेच १५ टक्के गाठी अनुवंशिक असतात. गाठ काढण्यासाठी दोन प्रकाराच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. पोटावर छातीच्या खाली छेद देऊन ओपन अड्रेनेलेक्टॉमी शस्त्रक्रिया करता येते. शस्त्रक्रियेत १५ ते २० सेटीमेंटर छेद देऊन स्नायू कट करावे लागतात. त्यामुळे रुग्णाला १० ते १२ दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या दुखण्याचे प्रमाण वाढत असल्याने तीन ते चार दिवस बेडरेस्ट घ्यावी लागते.

त्यामुळे सीपीआरमधील टीमने ओपन अँड्रेनेलेक्टॉमीऐवजी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. पाटील यांच्या पोटावर चार ठिकाणी बारीक अर्धा सेंटीमीटरचे छेद देऊन शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. गाठीजवळून पोटातील दोन मुख्य रक्तवाहिन्या होत्या. त्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव होण्याची भीती होती. वरील बाजूस यकृतलाही इजेचा धोका होता. मात्र डॉ. विजय कस्सा, डॉ. वासीम मुल्ला, डॉ. सत्येंद्र ठोंबरे, डॉ. प्रसाद, डॉ. रजनीस यांच्या टीमने शस्त्रक्रिया यशस्वी केली. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेत भूल देण्याची अवघड जबाबदारी डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. मारुती पवार यांनी पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी पाटील या हिंडू फिरू लागल्या. शस्त्रक्रियेसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र शस्त्रक्रियेचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेतून करण्यात आला. यासाठी विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

पत्रकार परिषदेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, सरकारी सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही काँग्रेसची दिवाळी,भाजपचा शिरकाव!

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

tweet@:gurubalmaliMT

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र दिवाळीचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. यशासाठी धडपडणाऱ्या या पक्षाला या निवडणुकीने नवसंजीवनी तर मिळाली आहेच, शिवाय ग्रामीण भागात याच पक्षाची अजूनही हवा असल्याचा पुरावाही मिळाला. यामुळे आगामी निवडणुकीत ‘हात’ बळकट होण्याचे संकेत मिळाले असले आहेत. या निवडणुकीत भाजपने शिरकाव करत ताकद आजमावली आहे. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या ‘दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मात देत आमदार सतेज पाटील प्रचंड यश मिळविले.

कोल्हापूर जिल्हा हा अनेक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने ग्रामपंचायत ते सोसायटीपर्यंत सर्वत्र त्यांचीच सत्ता होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर स्थानिक आघाड्यांच्या नावाखाली गावागावात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात सत्ता कायम राहिली. पण गेल्या पाच वर्षांत बालेकिल्ला असूनही मोठी पिछेहाट होत होती. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांत पिछेहाट झाल्यानंतर अनेक नेत्यांनी भाजपचा रस्ता धरला.

जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला सावरण्याचा थोडा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून झाला, पण सत्तेचा झेंडा फडकवण्यात अपयश आले. सतत अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाने नवसंजीवनी मिळाली आहे. या यशाने ‘परतीचा प्रवास ’ सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर नियोजन झाले तरच पक्षाला यश मिळण्याची शक्यता आहे. आमदार सतेज पाटील यांनी ‌दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक गटाचे पानिपत केले. त्यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या महडिक गटाचा पराभव केला. शिरोलीतील होमपीचवर झालेला पराभव महाडिक यांना विचार करायला लावणार आहे.

राज्यात सरकार आल्यानंतर तीन वर्षांत भाजपने ग्रामीण भागात हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यशही आले. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झालेल्या पक्षाने सहकारातही चंचूप्रवेश केला. बाजार समिती, जिल्हा बँक, दोन तीन साखर कारखान्यात शिरकाव केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. मोठ्या अपेक्षेने आणि ताकदीने निवडणुकीत उतरलेल्या भाजपला काही प्रमाणात अपेक्षाभंग झाला असला तरी त्यांचा शिरकाव मात्र उल्लेखनीय आहे. १०८ गावात भाजपचा सरपंच झाल्याचा दावा या पक्षाने केला आहे. जिथे काहीच नव्हते, तेथे ज्या ताकदीने शिरकाव केला आहे, त्याचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षानी कमी ठिकाणी यश मिळवले आहे. पक्षाच्या चिन्हापेक्षा स्थानिक आघाड्याद्वारे या निवडणुका अनेक ठिकाणी लढल्या गेल्या. सर्वच पक्षाची कडबोळी सत्तेवर आली असली तरी सर्वच पक्षांनी आमचीच सत्ता आल्याचा नगारा वाजवण्यास सुरुवात केली आहे. यातून जिल्ह्यात नक्की कुणाची हवा आहे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षानी सुरू केला आहे. ज्या ज्या नेत्यांची स्थानिक पातळीवर ताकद आहे, त्यांनाच तेथे यश मिळाले आहे. कागलला मुश्रीफ, महाडिक, पन्हाळ्यात कोरे, शिरोळला स्वाभिमानी, करवीरला पाटील गटानी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची ही चाचपणी होती. त्यामुळे नेत्यांनी त्यामध्ये चांगलेच लक्ष घातले होते. प्रत्येकाला ताकद कळाल्याने विधानसभेच्या तयारीला मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘करवीर’ मध्ये कॉंग्रेसच नंबर वन

$
0
0

कुडित्रे



करवीर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व स्थानिक आघाड्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती, त्यामध्ये सरपंचपदासाठी शिवसेनेला पाच ,भाजपला चार , अपक्ष तीन तर राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळवता आली. विविध पक्षांच्या स्थानिक आघाड्यांनी १६ ठिकाणी घवघवीत यश मिळवले. तर तब्बल २२ ठिकाणी विजय प्राप्त करून कॉंग्रेस तालुक्यात नंबर वन ठरली.

या निवडणुकीत वडणगे येथे माजी जि.प. सदस्य बी. एच.पाटील , कसबा बीड येथे गोकुळचे संचालक सत्यजित पाटील , करवीर पं. स. सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी यांनी आपली सत्ता राखली. सांगरुळ येथे शिवसेना भाजप आघाडीने सत्ताधारी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या कॉंग्रेसच्या पॅनेलचा पराभव करून सरपंचपदासह १६ जागांवर विजय प्राप्त करून सत्तांतर घडवून आणले.



तालुक्यातील विजयी सरपंच व कंसात गावाचे नाव : चिखली - उमा संभाजी पाटील (शिवसेना ), कांचनवाडी - सुवर्णा प्रभाकर परीट काँग्रेस ),पासार्डे -वंदना अशोक चौगले (काँग्रेस-शिवसेना आघाडी ), शेळकेवाडी- रंगराव शेळके ( काँग्रेस ), कावणे -सुनील टिपुगडे ( भाजप ),सादळे -मादळे- मिनाक्षी रमेश जाधव ( भाजप ), सावर्डे दुमाला- सुवर्णा कुंडलिक कारंडे ( शिवसेना -संयुक्त आघाडी ), भाटणवाडी- अमर कांबळे ( काँग्रेस - शेकाप आघाडी ),हणबरवाडी -सुप्रिया बाजीराव वाडकर ( काँग्रेस ), परिते- आक्काताई सुदाम कारंडे ( राष्ट्रवादी ), सडोली दुमाला- छाया मनोज कांबळे ( काँग्रेस ), आरळे- ईश्वरा शामराव कांबळे ( स्थानिक आघाडी ), सडोली दुमाला- छाया मनोज कांबळे( कॉग्रेस ), सोनाळी- मोहन पाटील ( काँग्रेस ), कंदलगाव -अर्चना साहील पाटील ( काँग्रेस ), कांडगाव-रुपाली बाळासो मेडसिंगे ( काँग्रेस ), सावरवाडी -मंगल बाळासाहेब जाधव ( शिवसेना - काँग्रेस आघाडी ), नंदवाळ -अस्मिता युवराज कांबळे ( शिवसेना ),म्हाळुंगे- पार्वती ईश्वरा चौगले ( काँग्रेस ), मांडरे -अर्चना संजय पाटील ( काँग्रेस ),नागाव- दिपाली नाईक ( काँग्रेस ) चुये-कविता शशिकांत सोहकर ( काँग्रेस ), हिरवडे दुमाला- दत्तात्रय कांबळे ( शिवसेना- शेकाप युती आघाडी ) बोलोली-सदाशिव बाटे, ( शिवसेना ),आंबेवाडी- सिकंदर मुजावर ( स्थानिक आघाडी ) जैताळ -लता अभिजित कांबळे ,( स्थानिक आघाडी ), द. वडगाव- अनिल मुळीक ( शिवसेना ), वाकरे- वसंत तोडकर ( सर्वपक्षीय महाआघाडी), कणेरी -उज्वला चंदकांत शिंदे ( स्थानिक आघाडी ), नेली -प्रकाश पाटील ( काँग्रेस ), हिरवडे खालसा -पुजा रविंद्र पाटील ( काँग्रेस ), दिंडनेली -मंगल उत्तम कुंभार ( भाजप ), सरनोबतवाडी -उत्तम माने, ( अपक्ष), हासुर दुमाला- अजित पाटील (काँग्रेस ),मोरेवाडी -सुनंदा चंद्रकांत कुंभार (काँग्रेस ), भुये- रमेश कांबळे (आघाडी ), उजळाईवाडी- सविता दिलीप माने.(काँग्रेस ), निगवे खालसा- पांडुरंग महाडेश्वर, ( भाजप ), कणेरीवाडी- शोभा सुरेश खोत ( काँग्रेस ), दोनवडे- सारिका सात्तापा जाधव ( शिवसेना ), गांधीनगर- रितू हरेश लालवाणी ( भारतीय एकता मंच ), पाडळी बु. -अनिता भिकाजी पाटील (आघाडी ), शिंगणापूर- प्रकाश रोटे ( स्थानिक आघाडी ), सांगरूळ- सदाशिव खाडे ( शिवसेना -भाजप), पाचगाव -संग्राम गोपाळ पाटील( काँग्रेस), वसगडे- नेमगोंडा पाटील.( महाडिक गट ) ,उचगाव- मालूताई गणेश काळे ( कॉंग्रेस ). चिंचवडे तर्फ कळे- युवराज कांबळे( अपक्ष ) गो. शिरगाव- महादेव पाटील.( काँग्रेस ), वडणगे -सचिन चौगले(कॉग्रेस ).

...............................

चौकट

परितेत चिठ्ठीवर विजय

परिते ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आक्काताई सुदाम कारंडे यांनी बाजी मारली. वार्ड क्रमांक एक मध्ये प्रतिक्षा कावणेकर व आश्विनी पाटील यांना २४४ इतकी समान मते मिळाली. त्यात चिठ्ठीवर काँग्रेसच्या अश्विनी पाटील विजयी झाल्या. त्यामुळे सरपंच राष्ट्रवादीचा तर सहा जागा जिंकून सत्ता काँग्रेसने मिळवली .

..................

चौकट

सांगरूळमध्ये सख्ख्या बहिणी विजयी

सरनोबतवाडी येथील उत्तम कृष्णात माने , चिंचवडेत तर्फे कळे येथील युवराय कांबळे, व सादळे- मादळे येथील मिनाक्षी जाधव हे तीन उमेदवार सरपंच म्हणून अपक्ष निवडून आले. सांगरूळमध्ये प्रभाग पाचमधून सविता मगदूम व प्रभाग तीन मधून अर्चना खाडे या दोन सख्ख्या बहिणी विजयी झाल्या. या निवडणुकीत काही ठिकाणी समान मते मिळाल्यामुळे सत्तेची चक्रे फिरली. लता महादेव शेळके (शेळकेवाडी ), अश्विनी पाटील ( परिते ) यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आल्या. तर सरपंच एकाचा व बलाबल एकाचे अशी परिस्थिती परिते, साववाडी, शिंगणापूर, म्हाळुंगे, दोनवडे आदी ठिकाणी निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचगाव, पाचगावात सतेज ‘एक्सप्रेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दक्षिण विधानसभा मतदार संघातील प्रचंड संवेदनशील असणाऱ्या पाचगावमध्ये काँग्रेसच्या आमदार सतेज पाटील गटाने सरपंचपदाबरोबरच १७ पैकी १५ जागा जिंकत सत्तांतर घडवले. उचगावमध्येही पाटील गटाने सरपंचासह तेरा जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. दोन्ही ठिकाणी आमदार अमल महाडिक यांच्या भाजप आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाचगावमध्ये आमदार पाटील यांची भैरवनाथ उपनगर विकास आघाडी तर उचगावमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन उचगाव ग्राम​पंचायत विकास आघाडी रिंगणात होती.

गेल्या पंचवार्षिकमध्ये पाटील व महाडिक गट सतत आमनेसामने ठाकल्याने पाचगाव ग्रामपंचायतीचे राजकारण जिल्ह्यात चर्चेचे बनले होते. या पार्श्वभूमीवर पाचगावमध्ये सरपंचपदासाठी आमदार सतेज पाटील गटाकडून भैरवनाथ उपनगर विकास आघाडीचे संग्राम पाटील तर आमदार अमल महाडिक यांच्या गटाकडून भाजपच्या महादेव उपनगर विकास आघाडीतून मनीषा पाटील उमेदवार होत्या. संग्राम पाटील यांना ६१६७ मते पडली तर मनिषा पाटील यांना केवळ २६३४ मतांवर समाधान मानावे लागले. प्रचंड मतांनी सरपंचपद मिळविण्याबरोबच १५ जागा जिंकत निर्विवाद सत्ता ​मिळवली. गेल्या पंचवार्षिकमध्ये जातीच्या दाखल्यामुळे सरपंचपदाचा ताकतुंबा सुरू होता. पहिल्या अडीच वर्षात पाटील गट व महाडिक गटाचे सरपंच झाले होते. तर त्यानंतरच्या अडीच वर्षात महाडिक गटाची सत्ता कायम राहिली. या निवडणुकीतील पाटील गटाने महाडिक गटाकडून सत्ता खेचून निर्विवाद वर्चस्व मिळवले. काँग्रेस आघाडीच्या सरपंच व सदस्यांचा विजय पाहता मतदारांनी ठरवून एकतर्फी सत्ता दिली आहे.

उचगावमध्ये काँग्रस व शिवसेना प्रणित उचगाव ग्रामपंचायत विकास आघाडी रिंगणात होती. तर भाजपची उचगाव विकास आघाडी विरोधात होती. उचगावमध्ये काँग्रेस आघाडीच्या मालू गणेश काळे या सरपंचपदाच्या निवडणुकीत २०० मतांनी विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात भाजप आघाडीच्या उषा केंगले उमेदवार होत्या. काँग्रेस आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवाराबरोबरच १३ सदस्य निवडून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसमध्ये कर्नाटकातील बसेवर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास शहरातील ताराराणी चौकात कर्नाटकच्या एका बसवर दगडफेक करण्यात आली, तर दोन बसच्या चाकांमधील हवा सोडली. संप काळात वाहतूक सुरू ठेवल्याने बसचालकांना दमदाटी करून आंदोलक पळाले. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेत आयोग लागू करावा, त्याचबरोबर विविध भत्ते आणि सवलती मिळाव्यात यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. महाराष्ट्रातील एसटी सेवा ठप्प असली तरी कर्नाटकातील सेवा सुरू होती, त्यामुळे काही आंदोलकांनी कर्नाटकच्या बसला लक्ष्य केले. मंगळवारी पहाटे ताराराणी चौकात कर्नाटकच्या एका बसवर दगडफेक झाली, तर दोन बसच्या चाकांमधील हवा सोडून वाहतूक बंद ठेवण्यासाठी चालकांना दमदाटी करण्यात आली. पुण्याहून कारवारकडे जाणारी कारवार डेपोची बस (के. ए. २३ एफ. १४५४) घेऊन चालक महेश बसवराज करदगे (वय ३६, रा. किणीसुलतान, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास शहरातील ताराराणी चौकात आले. यावेळी दोन मोटार सायकलवरून (एम.एच. ०९ ९९०६ आणि एम.एच. ०९ १२६९) आलेल्या चौघांनी एसटी थांबवली. ‘संप सुरू असताना तुम्ही बस का सुरू ठेवली आहे?’ अशी विचारणा करीत बसच्या काचांवर दगड मारले. यात बसच्या समोरील काचा फुटून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. याचवेळी पाठीमागून आलेल्या निपाणी डेपोची के.ए. २३ एफ. ९३५ आणि गोकाक डेपोची के. ए. २३ एफ. ९७४ या दोन्ही बसच्या चाकांमधील हवा सोडली. यानंतर बसच्या चालकांना दमदाटी करून हल्लेखोरांनी पळ काढला.

या घटनेनंतर महाराष्ट्रात धावणाऱ्या कर्नाटकच्या बस तातडीने बंद करण्यात आल्या. सीमाभागातही पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली असून, कर्नाटकच्या बस लक्ष्य होऊ नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. दरम्यान, महेश कारदगे या बस चालकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखेरांविरोधात फिर्याद दाखल केली. निपाणी बस स्थानकातील चार्जमन मनोहर बी बाळनाईक यांनी तोडफोड झालेल्या बसची पाहणी करून शाहूपुरी पोलिसांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गेश लिंग्रस सीपीआरमध्ये दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक अधिकाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेनेचा शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस न्यायालयीन कोठडीत आहे. मूत्रविकाराचा त्रास वाढल्याने लिंग्रस याला मंगळवारी (ता. १७) दुपारी उचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात लिंग्रस याच्यावर उपचार सुरू आहेत.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या कोल्हापूर शाखेचे अधिकारी राजेंद्र आनंदराव मोहिते (वय ४५, रा. कोरिवळे, ता. कराड, जि. सातारा) यांनी २३ सप्टेंबरला आत्महत्या केली होती. बँकेतील महिला कर्मचारी दीपाली लगारे यांना कार्यालयीन कामकाजातील त्रुटींमुळे समज दिल्याने लगारे कुटुंबीयांसह दुर्गेश लिंग्रस याने मोहिते यांना बँकेत जाऊन मारहाण केली होती. सर्व कर्मचारी आणि नागरिकांसमोर मारहाण झाल्याने मोहिते यांना मानसिक धक्का बसला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत लगारे कुटुंबीय आणि दुर्गेश लिंग्रस याचा उल्लेख केला होता. यानंतर उंब्रज (जि. सातारा) पोलिसांनी २३ सप्टेंबरला गुन्हे दाखल करून लिंग्रस याच्यासह दीपाली स्वरुप लगारे (वय ३०), स्वरुप मोहन लगारे (३५), राजश्री मोहन लगारे (६०) आणि मोहन गुंडू लगारे (६०, सर्व रा. राजारामपुरी) यांना अटक केली होती.

अटकेतील दुर्गेश लिंग्रस याची कळंबा जेलमध्ये रवानगी केली असून, गेल्या दोन दिवसांपासून त्याचा मूत्रविकाराचा त्रास वाढला आहे. त्याच्या विनंतीनुसार मंगळवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दूधगंगा इमारतीमधील पुरुष वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या बंदोबस्तासाठी चार पोलिस तैनात केले आहेत. ‘लिंग्रस याच्या वैद्यकीय तपासण्या केल्या असून, मूत्रविकाराचा त्रास वाढला आहे. यानुसार उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती सीपीआरचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

कैदी वॉर्ड बंदच

गेल्या सहा महिन्यांपासून कैदी वॉर्डच्या डागडुजीचे काम सुरू आहे, त्यामुळे कैद्यांना उपचारासाठी जनरल वॉर्डमध्येच दाखल केले जाते. १ ऑक्टोबरला दूधगंगा इमारतीतून दरोड्यातील आरोपी मुक्या पवार याने पलायन केले होते. हा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. जनरल वॉर्डमधील कैद्यांच्या उपचारासाठी आता पोलिसांना अधिकचा बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिरोळ’मध्ये भाजप आघाडीचे सहा सरपंच

$
0
0

जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सोयीच्या आघाड्या करीत १४ पैकी सहा ठिकाणी सरपंचपदी यश मिळविले. खिद्रापूरमध्ये सरपंचपदी अपक्षाने बाजी मारली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक ठिकाणी, तर उर्वरित ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना प्रणित आघाड्यांना सरपंचपदी संमिश्र यश मिळाले.

सरपंचपदाच्या निवडणुकीत कनवाड व शिवनाकवाडीत भाजपचे उमेदवार विजयी झाले. हेरवाडमधे भाजप-काँग्रेस आघाडी, तर कवठेसार, उमळवाड येथे भाजप-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. संभाजीपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी-काँग्रेस आघाडी तसेच शिवसेना यांच्याविरोधात एकाकी लढत देवून सरपंचपदाची सूत्रे काबीज केली. उमळवाड, कवठेसार, नवेदानवाड, राजापूरवाडी येथेही सोयीची आघाडी करून राष्ट्रवादीने विजय मिळविला.

शिरोळ येथे पंचायत समितीच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. एकूण पाच फेऱ्यांत मतमोजणी करण्यात आली.

शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी टाकवडे, शिवनाकवाडी व औरवाड येथे सत्तांतर झाले. अकिवाट येथे स्वाभिमानी व शिवसेना आघाडीने ९ जागा मिळवून सत्ता कायम ठेवली तर शिवनाकवाडीत ‘कमळ’ फुलले आहे. येथे सरपंचपदी भाजपचे श्रीकांत खोत विजयी झाले. भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीला आठ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला एक व शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. संभाजीपूर येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा कोळी यांनी सरपंचपदाची बाजी मारली. येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे चार तर स्वाभिमानी-काँग्रेस आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले.

उमळवाड येथे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विरोधी स्वाभिमानी, काँग्रेसशी झुंज दिली. येथे रामचंद्र कांबळे यांनी सरपंचपदी विजय मिळविला. राजापूरमध्ये स्वाभिमानी- भाजप आघाडीच्या सविता पाटील विजयी झाल्या. हरोलीत सुकाणू समितीच्या गीता कांबळे सरपंचपदी विजयी झाल्या. कवठेसार येथे भाजप-राष्ट्रवादी आघाडीच्या दीपाली भोकरे यांनी सरपंचदाची निवडणूक जिंकली. नवे दानवाडच्या सरपंचपदी शाहू आघाडीच्या वंदना कांबळे यांनी बाजी मारली. राजापूरवाडीत सरपंचपदी छत्रपती ग्रुप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे विजय एकसंबे विजयी झाले. हेरवाड येथे भाजप, काँग्रेस आघाडीचे सुरगोंडा पाटील यांनी सरपंचपद पटकावले. खिद्रापूरमध्ये हैदर मोकाशी या अपक्ष उमेदवाराने सरपंचपदी आपला झेंडा फडकाविला. औरवाडमध्ये काँग्रेस-स्वाभिमानी-शिवसेना आघाडीच्या अश्रफ पटेल यांची सरपंचपदी निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांचे होमपीचवर पानिपत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुलाची शिरोली मध्ये शशिकांत खवरे यांनी विजय खेचून आणत होमपीचवरच माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पानिपत केले. खवरे ६२१ मतांनी विजयी झाले. या ठिकाणी खवरे यांच्या आघाडीने ९ ठिकाणी तर महाडिक यांच्या आघाडीने ८ ठिकाणी विजय मिळवला आहे. महाडिक गटाला हा मोठा धक्का असून पराभव त्यांना चिंतन करायला लावणारा आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकलाकडे लागले होते.

महाडिक गटाला कडवा विरोध करून विविध गटांतील इच्छुक एकत्र येऊन महाडिक यांचे पारंपरिक विरोधक, काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येत श्री शाहू स्वाभिमानी आघाडी स्थापन केली होती. या निवडणुकीत प्रथमच खवरे बंधू एकत्र आल्याने त्यांच्या मताचे विभाजन झाले नाही. त्याचा फायदा घेत खवरे यांनी प्रचारात प्रथमपासूनच आघाडी घेऊन प्रभागातील नऊ जागांवर विजय मिळवला.आमदार सतेज पाटील यांचे लक्ष या निवडणुकीवर होते.

महाडिक यांच्या गटाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पण काही विद्यमान सदस्यांना थांबवत त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाराजांची संख्या वाढली ती नाराजी तसेच शशिकांत खवरे यांच्याबद्दल एक सुप्त अशी सहानभूती शिरोलीकरांच्या मनात प्रथम पासून दिसत होती. आमदार सतेज पाटील यांनीही खवरे यांच्या बाजूने खिंड लढविली.

मागील सभागृहात १४ सदस्य महाडिक गटाचे व विरोधी गटाचे तीन सदस्य होते त्यापैकी महाडिक गटाच्या पाच जागा कमी झाल्या आहेत.

विरोधात भक्कम आघाडी

महाडिक गटाच्या विरुद्ध महेश चव्हाण, शशिकांत खवरे, अनिल खवरे, विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील, बाजीराव जाधव, राजकुमार पाटील यांनी एकत्र येऊन महाडिक यांच्या विरोधात पारंपरिक गट तसेच काँग्रेस व शिवसेना याचे प्रमुखाना एकत्र आणत सुयोग्य नियोजन करून प्रथम पासूनच प्रचारात आघाडी घेतल्याने विजय मिळवता आला. हे सर्वजण विजयाचे शिल्पकार ठरले.

आमदार महाडिकांचे अपयश

संपूर्ण प्रचाराची जबाबदारी स्वतः कडे घेत आमदार अमल महाडिक यांनी येथे लक्ष घातले होते तसेच दोन दिवसांपासून गावात तळ ठोकला होता,पण त्यांच्या गटातील नाराज असणाऱ्यांना ते विरोधी आघाडीत जाण्यापासून रोखू शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर प्रवाशीच एसटी कर्मचाऱ्यांना ठोकतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

‘काही कारण नसताना एसटी बंद ठेवल्या तर जनतेचा कर्मचाऱ्यांविरुद्धच रोष निर्माण होईल. पगार काय आमची अडवणूक करायला घेता का? असा सवाल करत जनताच कर्मचाऱ्यांना ठोकून काढतील,’ असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत बोलताना महसूलमंत्री पाटील म्हणाले, ‘दिवाळीत नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच टप्प्यात बैठक घेतली. वादग्रस्त टेंडरबाबत काही माहिती नाही, पण त्याबाबत चर्चा होऊ शकते. चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करता येऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर काही कारण नसताना एसटी बंद ठेवून छोट्या छोट्या गावातील नागरिकांचे हाल केले तर आमची अडवणूक करायला पगार घेता का? असे विचारत नागरिकच तुम्हाला ठोकतील.’

कोल्हापुरात करण्यात येणाऱ्या आंदोलनांबाबत ते म्हणाले, ‘एखादा विषय मार्गी लागू नये याचा प्रयत्न केला जातो. कोणत्या विषयाची नीट माहिती नसताना आंदोलने केली जातात. त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत. मराठा आरक्षणाबाबत काय कायदे आहे, काय करावे लागणार आहे याची माहिती घ्यायला हवी. विमानतळाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया करावी लागणार होती. परवाना आता मिळून जाईल. पण नंतर स्लॉटचा प्रश्न उभा होता. आता बुधवार व शुक्रवारी स्लॉट मिळाला आहे. या सर्व परिस्थितीची माहिती घेण्याऐवजी दोषारोप करण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.’

ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालाबाबत विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला तरी सामान्य नागरिकांना हेच सरकार सुख व सुरक्षा देऊ शकेल, असा विश्वास असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी केले. बुधवारी कर्जमाफीबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या यादीमध्ये दहा लाखापेक्षाही जास्त लाभार्थी असतील. १५ नोव्हेंबरपर्यंत पात्र शेतकऱ्यांचे कर्जखाते निरंक तर ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरले, त्यांच्या खात्यावर २५ हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा महोत्सवातील सन्मान पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बळीराजा महोत्सव समितीच्यावतीने ‘महाप्रतापी बळीराजा स्मरण’ कार्यक्रमांतर्गत ‘बळीराजा सन्मान’ पुरस्कार जाहीर केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तीमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई, समाजिक कार्यकर्ते व माजी महापौर भिकशेठ पाटील व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इंद्रायणी पाटील यांच्या समावेश असून पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान माजी आमदार संपतबापू पवार-पाटील भूषवणार आहेत. महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. टी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रा. डॉ. पाटील म्हणाले, ‘दरवर्षी बलिप्रतिपदेला बळीराजा महोत्सवाचे आयोजन केले जाते. महाप्रतापी बळीराजाने आपल्या राज्यात शेती, जलनीती आणि सुसंस्कृती नागरिकांची निर्मिती केली. अशा महाप्रतापी बळीराज्याचे स्मरण ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांचे पालन करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळीराजा सन्मानाने सन्मानीत केले जाते. यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये डॉ. देसाई, माजी महापौर पाटील व अनिसच्या कार्यकर्त्या इंद्रायणी पाटील यांचा समावेश आहे.’

प्रा. पाटील म्हणाले, ‘डॉ. देसाई यांनी धर्म आणि विज्ञान विषयावर पी. एचडी पदवी मिळवली आहे. धर्म आणि तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व जिल्हा दैनिकांमध्ये स्तंभ लेखन केले आहे. त्यांनी सुमारे २० ग्रथांचे लेखन केले आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी महापौर भिकशेठ पाटील यांनी विद्यार्थी दशेपासून सत्यशोधक चळवळीला जोडले आहेत. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांच्या विचारांचे प्रभाव आहे. तर इंद्रायणी पाटील यांनी अंनिसच्या माध्यमातून आपले कार्य केले. गोध्रा हत्याकांड, त्सुनामीनंतर मुलांचे मानसिक पुर्नवसन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पथनाट्याच्या माध्यमातून लोकजागृतीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांची सर्वांची पुरस्कारांची निवड केली आहे.’ असे प्रा. डॉ. पाटील यांनी सांगितले.

सचिव दिंगबर लोहार, रवींद्र जाधव, विकास जाधव, संभाजीराव जगदाळे, व्यंकाप्पा भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालपरी थांबली, प्रवाशांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संपामुळे मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा स्टॅण्डसह बारा आगारातील बसस्थानकात शुकशुकाट होता. कोल्हापूर आगारातून एकही एसटी आगाराबाहेर पडली नाही. हुबळी-कर्नाटक आगाराची बेल्लारी पुणे मार्गावर धावणारी बस मध्यरात्री दुपारी दोन वाजता अज्ञातांनी फोडली. संभाजीनगर आगारात एसटी सेवा सुरू करण्यासाठी गेलेल्याचा कर्मचाऱ्यांनी बांगडी आणि गुलाबफुले देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला. संपाचा फायदा घेऊन महाराष्ट्रात कर्नाटकच्या प्रवेश करणाऱ्या बसेसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. सीबीएसजवळ दुपारी चार वाजता खासगी ट्रॅव्हल्स चालक आणि आंदोलनकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. एसटी सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. संप आणि ताणतणावामुळे बसस्थानकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते, सेवा-सवलती मिळाव्यात. तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप सुरू आहे. राज्यातील एसटी कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. सर्वाधिक सभासद असलेली मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून संप पुकारला आहे. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले. या संपाची झळ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना मंगळवारी दिवसभर बसली. महाराष्ट्र एसटी कामगार संघ आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे सुमारे साडेपाच हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बारा आगारातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. पहाटेपासून सीबीएसच्या गजबजलेला परिसरात शुकशुकाट होता. सोमवारी रात्री मुक्कामासाठी असलेल्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीतून वाहतूक करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध केला. या बसेस दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका परिसरात थाबंला. या ठिकाणी काहींनी या बसेसची हवा सोडल्या.

मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा आणि संभाजीनगर बसस्थानकात दिवसभर शुकशुकाट राहिला. काही प्रवाशांना संपाची माहिती नसल्याने बसस्थानकात एसटीच्या प्रतीक्षेत होते. सुमारे शंभराहून अधिक प्रवासी मध्यवर्ती बसस्थानकात थांबून राहिले. पुणे-मुंबई येथून कोकणाकडे जाणारे काही प्रवासी मध्यरात्रीपासून एसटीत थांबून राहिले. एसटी प्रशासनाकडून सेवा दिली जाईल, या आशेने थाबंलेल्या प्रवाशांचा मात्र भ्रमनिरास झाला. या प्रवाशांना एसटी रद्द झाल्याची कल्पना दिल्यानंतर बसस्थानक परिसरातील थांबलेल्या वाहनांची चौकशी करत होते. नातेवाईकांना मोबाइलवरून संपर्क साधून माहिती देत होते. ऐन दिवाळीत घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. खासगी वाहनांनी कोकणात जाण्यासाठी तीन ते पाच हजार रुपयांचा दर सांगितला. त्यामुळे अनेकांनी ट्रॅव्हल्स चालक आणि कोल्हापुरातील नातेवाईकांकडे चौकशी केली. संभाजीनगर स्थानक, रंकाळा बसस्थानकातूनही प्रवासी वाहतूक थांबली. सकाळी आठ वाजल्यापासून रंकाळा बसस्थानकात शुकशुकाट राहिला. अकरा वाजण्याच्या सुमारात दोन एसटी सुरू करण्यात आल्या. मात्र एसटी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळाल्याने या ठिकाणच्या सेवा बंद करण्यात आली.

९०० हून अधिक एसटी थांबल्या

कोल्हापूर आगाराच्या १२ आगारातून दिवसभरात ९०० हून अधिक एसटीच्या फेऱ्या थांबल्या. एका दिवसांत २ लाख ७० हजार किलोमीटरचा प्रवास थांबला. कोल्हापूर बसस्थानकातून दररोज सरासरी २० हजार प्रवासी एसटीतून प्रवास करतात. संपामुळे बसस्थानकात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारात शंभर प्रवासी होते. एसटीला दररोज बारा आगारातून ८० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवसभरात मध्यवर्ती बसस्थानकात एसटीचे २२ कर्मचारी कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांनीही अप्रत्यक्षपणे संपात सहभाग घेतला.

संभाजीनगर बसस्थानकात तणाव

संभाजीनगर बसस्थानकात कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारात एसटी कामगार सेनेच्या काही कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराला विरोध केला. हा संप सर्वच कर्मचाऱ्यांसाठी भवितव्यासाठी आहे. त्यामुळे शंभर टक्के संप यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. एसटी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुलाबफुले आणि बांगड्या देऊन सत्कार करण्यात आला. झालेल्या या प्रकारामुळे संभाजीनगर बसस्थानकात काही वेळ तणाव निर्माण झाला.

भानप दीर्घ रजेवर

कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना एसटीचे काही अधिकारी जागेवर नव्हते. विभाग नियंत्रक नवनीत भानप दीर्घ रजेवर आहेत. विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांचे पद गेली दीड वर्षे रिक्त आहे. विभाग नियंत्रकाचा प्रभारी कार्यभार एस. एस. कुलकर्णी यांच्याकडे सोपविला आहे. संपामुळे एसटी स्थानकातील स्थानक प्रमुखांसह काही कर्मचारी जागेवर नव्हते. कार्यशाळेतील काही कर्मचारी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात फिरत होते.

कृती समितीचे पदाधिकारी गायब

संपाला एसटी कामगारांची १४ संघटनांची संयुक्त कृती समितीने विरोध केला. या समितीचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात राहणार असल्याचे आश्वासन दिले होते. आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, मनसे परिवहन संघटना, कास्ट्राईब संघटना, बहुजन परिवहन संघटनेसह अन्य संघटना सहभागी होणार नसल्याचा निर्णय या संघटनेने घेतला होता. प्रत्यक्षात शहरातील तीनही बसस्थानकात या कृती समितीचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. केवळ रंकाळा बसस्थानकात दुपारपर्यंत दोन एसटी सुरु राहिल्या. मात्र दोन नंतर या पुन्हा बंद पाडण्यात आल्या.

बसस्थानकात सभा.. सरकारचा निषेध

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला सर्व श्रमिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात पदाधिकाऱ्यांनी सभा घेतली. या वेळी अतुल दिघे म्हणाले, प्राध्यापकांना लाखांत पगार आणि एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार दिला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस आणि पगारवाढ दिलेली नाही. कर्मचाऱ्यांनी हक्कांच्या मागण्यांसाठी केलेला संप योग्यच आहे. या वेळी उदय नारकर, सुभाष जाधव, दिलीप पोवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, एसटी कामगार सेनेचे माजी पदाधिकारी अनिल शिंदे, एसटी वर्कर्स (काँग्रेस) राज्य उपाध्यक्ष बंडोपत वाडकर, रवी जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान या संदर्भात सर्व श्रमिक संघातर्फे बुधवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता लक्ष्मीपुरीतील श्रमिकच्या कार्यालयात सभा बोलाविली आहे. विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाने केले आहे.

रेल्वे हाउसफुल

बससेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वेस्थानकात झाली. अचानक झालेल्या गर्दीमुळे रेल्वेचे जनरलचे डबे फुल्ल झाले. काही प्रवाशांनी आरक्षण केले होते. गर्दी वाढल्याने शेवटच्या क्षणी तयार केलेले अंतिम चार्टमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली. रात्रीची सह्याद्री, कोयनाही रेल्वे हाउसफुल झाल्या. तात्काळ तिकीट नोंदणीसाठी प्रवाशांची गर्दी झाली. मागेल त्या प्रवाशांना तिकीट दिल्याचे रेल्वे स्टेशन व्यवस्थापक विजयकुमार यांनी सांगितले.

खासगीची लूटमार सुरूच

कोल्हापूर ते पुणे, मुंबई, बेळगाव, बेंगळुरु, सोलापूर, नाशिक मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी पद्धतीने दर आकारले. आरटीओ कार्यालयाने दिवसभरात प्रवासी सेवेसाठी प्राधान्य देऊन परवडेल असे तिकीट दर आकारण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र दिवाळीच्या काळात वाढलेले दर आणि संपाचा फायदा घेत कोल्हापूर ते पुणेसाठी एसी स्लीपर कोचसाठी एक हजार आणि मुंबईसाठी दोन हजार रुपये काहींनी आकारला. बसस्थानकात अडकलेल्या बहुतांशी प्रवाशांनी दाभोलकर कॉर्नर, कावळा नाका परिसरातील ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयाकडे संपर्क साधला. वाहतूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने मागेल तो दर प्रवाशांनी दिली. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूटमारच केली. ट्रॅव्हल्स कंपन्याची ७० हून अधिक एजंट स्थानकाच्या परिसरात तैनात केले. प्रवासाचे ठिकाणी पाहून संबधितांना ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात पाठविण्यात आले. एका प्रवाशापाठीमागे एजंटाना ५० रुपये कमिशन देण्यात आले. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांनी दिवाळीच साजरी केली. बहुतांशी मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या. इचलकरंजीसाठी एसटीचा ३३ रुपये दर होता. खासगी वाहनधारकांना हा दर १०० रुपये घेतला. निपाणीसाठी ५२ रुपयांवरुन २०० रुपये आकारले.


पोलिसांचे संचलन

मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात सकाळी काही खासगी बसचालक रस्त्यावरून प्रवासी घेतले. हा प्रकार आंदोलनकर्त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाला. त्यांनी तातडीने या प्रकाराला विरोध केल्याने तणाव निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका बजाविल्याने खासगी बसचालकांनी स्थानक परिसरातून बससेवा थांबविली. मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी चारच्या सुमारास पुणे येथून आलेली एक खासगी बस थेट बसस्थानकात आल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले. स्थानकात बस का आणली, असा जाब विचारत आंदोलनकर्ते आणि बसचालकांत वाद निर्माण झाला. काही वेळ तणावपूर्ण वातावरण झाले. अखेर ही बस स्थानकाबाहेर गेल्यानंतर कर्मचारी शांत झाले. पोलिसांनी या प्रकरणी कर्मचाऱ्यांची समजून काढली. या प्रकारानंतर पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात संचलन केले.


प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेस, स्कूल बस, व्हॅन, केएमटीला जादा टप्प्यावर वाहतूक करण्याची सुविधा दिली आहे. शहरात ऑटो रिक्षांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना परवानगी दिली आहे. केएमटीला मंजूर झालेल्या प्रवासी टप्प्यापेक्षा दहा ते वीस किलोमीटर आणि ट्रकमधूनही प्रवास करण्याची सवलत दिली आहे. कोल्हापूर-पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स चालकांना परवडेल अशा दरात वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. डी. टी. पवार, आरटीओ



दुपारी तीन नंतर संप मागे घेतल्याची अफवा काहींनी पसरविली. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याला सरकार वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन आहे. नाइलाजाने हा संप करावा लागत आहे.

उत्तम पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात तृतीयपंथी सरपंच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे ज्ञानदेव कांबळे या तृतीयपंथी उमेदवाराला गावाने भरभरून मते देऊन सरपंचपदी विजयी केले. सोला तृतीयपंथी निवडून येण्याची ही पहिलीच घटना आहे.

तरंगफळ हे माळशिरस तालुक्यातील १८०० लोकवस्तीचे दुष्काळी गाव आहे. निवडणूक जाहीर होताच अनेक दिग्गज सरपंचपदासाठी तयारीला लागले होते. गावोगाव भटकून जीवन जगणारे ज्ञानदेव कांबळे यांनीही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. गावातील ज्येष्ठांनी त्यांना भाजपची उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जयसिंग साळवे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. कांबळे यांना १७७ मताधिक्याने विजयी झाले. गावातील नऊ सदस्यांपैकी भाजपने सहा, राष्ट्रवादीच्या पॅनलने तीन जागा जिंकल्या. लोकांनी विश्वास दाखवला, आता गावाचा विकास करून विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजळले माणुसकीचे दीप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंधारावर मात करत प्रकाश उजळणारा सण म्हणजे दीपावली. फराळाचा आस्वाद, रांगोळीचा सडा, पणत्यांची रांग, नवलाईचा साज आणि आनंदाची उधळण करत येणाऱ्या दिवाळीचा सण प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. बोचऱ्या थंडीसोबत येणारा हा सण तेजाचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. पण ज्यांच्या घरी गरीबीचा, जेमतेम परिस्थितीचा अंधार आहे, निराधारपणाचा अंधार आहे, त्यांच्या घरीही आनंदाचे दीप उजळावेत यासाठी कोल्हापुरातील अनेक संवेदनशील व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेतला. माणुसकीचे दीप उजळत अनेकांच्या घरी दिवाळी साजरी करणाऱ्या अनोख्या मंडळींमुळे कित्येकांच्या आयुष्यात उमेदीचा प्रकाश पडला आहे.

शिवाजी चौक तरूण मंडळातर्फे बालकल्याण संकुलातील २२५ मुलांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते याचे वितरण झाले. त्यांनी शिवाजी चौक तरूण मंडळाच्या विधायक दिवाळी उपक्रमाचे कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी ‘संकुलातील मुलांना दिवाळीसाठी नवीन कपडे दिल्याने आम्हालाही एक वेगळा आंनद मिळतो’, असे सांगितले. मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे यांनी, ‘प्रत्येकवर्षी दिवाळीत संकुलातील मुलांना नवीन कपडे दिले जातील’, असे सांगितले. बाल संकुलच्या पद्मजा तिवले यांनी, ‘समाजातील दानशूर व्यक्तीमुळे संकुलनास काहीही कमी पडत नाही’, असे सांगितले. उद्योगपती शंकर दुल्हाणी, बसवराज खोबरे, मनोहर चूघ, सुंदर पोपटानी, अतुल शहा, जयसिंगराव कदम, यशवंत वळंजू, दिलीप खोत, प्रफुल्ल भेंडे आदी

उपस्थित होते.

भारती विद्यापीठ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेकडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बालसुधार, अनाथ मुलांच्या वसतीगृहास डालड्याचा डबा, मुला, मुलींना मेहंदी कोन, नेलपॉलीश अशा भेट वस्तू देण्यात आले. नगरसेवक महेश सावंत, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया, तेजस ठाकूर, किरण पाटील, आदिल्य चौगुले, डॉ. एस. ए. पिशवीकर, डॉ. डी. ए. भागवत, एफ. ए. ताबोली पी. के. डवरी उपस्थित होते.

विहान प्रकल्प, एन. के. पी. प्लस सामाजिक संस्था, कलापी स्टोअर्स व इतर दानशूर व्यक्ती, संस्थेतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांना कपडे, स्वेटर, फराळ, अभ्यंगस्नानाचे साहित्य देण्यात आले. शाहू स्मारक भवनात वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रा. दिपक भोसले, प्रा. सुमन बुवा, आशिष तुर्कीया, शीतल ओसवाल, डॉ. अमरनाथ सेलमोकर, सागर बकरे, कृष्णात हिरूगडे, दीपा शिपूकर आदी उपस्थित होते. अन्कुली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. युवराज भणगे यांनी आभार मानले.

सीपीआरमधील पोस्टमार्टम विभागात अनेक वर्षे पोस्टमार्टमचे काम करणारे रणजित गोहीरे आणि सागर सारंगधर यांना दिवाळीनिमित्त कपडे,फराळ आणि भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम शाहीर विशारद आझाद नायकवडी लोककला सांस्कृतीक मंचतर्फे आयोजित केला होता. सागर सारंगधर आणि रणजीत गोहिरे यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपजिल्हाधिकारी अशोक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर, जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. एल. एस. पाटील, डॉ. वासिम मुल्ला, आरोग्यमित्र बंटी सावंत, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, डॉ. सागर पाटील, ‘अनिस’चे उमेश सूर्यवंशी, शाहीर पापालाल नायकवाडी, शाहीर आझाद नायकवाडी आदी उपस्थित होते.

‘शिवम’तर्फे दिवाळीची अनोखी भेट

शिवम प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील ऊस तोडणी करणारी कुटुंबे, वीटभट्टी, बांधकाम कामगार, गावातील गरीब कुंटुंबास फराळ किट वाटप केले जात आहे. दिवाळी साऱ्यांसाठी उपक्रमातर्गंत हे किट दिले जात आहे. गावातील संबंधीत कुटुंबांच्या घरासमोर रात्री किट ठेवले जाते. ‌थेट झोपडपट्टीत जाऊन पोहच केले जाते. अशाप्रकारे फराळ किट वाटप करताना कुठेही गाजावाजा केला जात नाही. शिवम प्रतिष्ठानचे जिल्हयातील सुमारे २०० कार्यकर्ते चार वर्षापासून वंचितांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी, यासाठी धडपडतात. यंदाही दिवाळीच्या आधी आवाहन करून दानशूर लोकांकडून फराळ, अभ्यंगस्नानासाठीचा साबण, सुगंधी तेल, नविन कपडे संकलित केले. त्याचे किट तयार केले. दोन ‌दिवसांपासून किट जिल्ह्यातील राधानगरी, वारणानगर, मुरगूड, शिरोळ परिसरातील ऊस तोडणी, वीट भट्टी, बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन पोहच करीत आहेत. पुढील दोन दिवस वाटप सुरू राहणार आहे. शिवमचे कार्यकर्ते सोमनाथ यरनाळकर, डॉ. संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते या कामात सक्रिय आहेत.

शिवसेना शहर कार्यालयातर्फे मातोश्री वृद्धाश्रमात फराळ वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमातील आजीआजोबांसोबत शिवसेनेच्या शहर कार्यकर्त्यांनी मनमोकळा संवाद साधला. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे समाजातील वंचित घटकांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी विशेष उपक्रमाचे आायेजन करण्यात आले. एचआयव्ही बाधित मुलामुलींना अर्बन बँकेचे अध्यक्ष जयसिंगराव माने यांच्या हस्ते नवीन कपडे व फराळ वाटप करण्यात आले. यावेळी राजू मेवेकरी यांनी उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्यावतीने ऊसतोडणी कामगार व वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांसह अनाथ व निराधारांना दिवाळीचा फराळ वाटप बुधवार दि. १८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. राजारामपुरी येथील १२ वी गल्ली येथे सकाळी साडेदहा वाजता हा उपक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवीरमध्ये काँग्रेसचा झेंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कसबा बावडा

करवीर तालुक्यात तसेच दक्षिण मतदार संघात दे धक्का निकाल लागले असून करवीर तालुक्यातील मोरेवाडी, नेर्ली, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, कणेरीवाडी गावांतील सरपंचपदासह ग्रामपंचायतीची सत्ता आमदार सतेज पाटील यांच्या गटाने काबीज केली आहे. ५० ग्रामपंचायतींमध्ये २२ ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर काही ठिकाणी शिवसेना व शेकापला सोबत घेत आघाडी केली होती. या ठिकाणीही विजय मिळवला.

वडणगे येथे सरपंचपदी बी. एच. पाटील गटाचे सचिन चौगुले हे विजयी झाले. मात्र सदाशिव पाटील मास्तर गटाने नऊ जागा मिळवत सत्ता मिळवली आहे. बी एच पाटील गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले. सरपंचपदासाठीचे मास्तर गटाचे प्रमुख बाजीराव पाटील यांना पराभव पत्करावा लागला. पूर्वश्रमीचे मास्तर गटाचेच सचिन चौगले उपसरपंच होते त्यांनी गट बदलून बी. एच. पाटील गटात प्रवेश करून सरपंचपदाची उमेदवारी मिळवली होती. भुये येथे माजी सरपंच अभिजित पाटील यांच्या आघाडीने विजय मिळवत प्रदीप पाटील-भुयेकर यांच्या गटाचा पराभव केला. या ठिकाणी प्रदीप पाटील यांच्या आई पंचायत समितीच्या सदस्य आहेत. त्यामुळे स्वतःच्या गावातील पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

टोप येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद हे शिवसेना आघाडीकडे तर १७ जागांपैकी १५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊन शिवसेनेने एकतर्फी सत्ता मिळवली आहे. या शिवाय जनसेवा पॅनेलला दोन जागा मिळाल्या. शिवशाहू पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. आतापर्यंतच्या टोपच्या इतिहासातील सर्वात तरुण उमेदवार राजू कोळी हे विजयी झाले आहेत.गांधीनगरमध्ये स्थानिक एकता मंचच्या रितू हरिष लालवाणी यांनी सरपंच पदावर विजय मिळवला. उजळाईवाडी येथे सतेज पाटील गटाच्या सरपंचपदी सविता दिलीप माने या विजयी झाल्या. स्थानिक व उपनगर आघाडीत मोठी चुरस झाली. वसगडे येथे सरपंचपदी स्थानिक आघाडीचे नेमगोंडा पाटील विजयी झाले.

आमदार सतेज पाटील यांचा दे धक्का

गेल्या तीन वर्षात झालेल्या सात निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटात थेट लढती झाल्या. त्यामध्ये मतदारांनी दोघांच्याही पारड्यात आलटून पालटून यश टाकल्याचे लक्षात येते. याची सुरूवात विधानसभा निवडणुकीत झाली. दक्षिण मधून आमदार पाटील पराभूत झाले, पण त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळाली. त्यानंतर गोकुळच्या निवडणुकीत महाडिक यांनी पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. महापालिका निवडणुकीत पडद्यामागे राहून भाजपला मदत करणाऱ्या महाडिक यांची घौडदौड आमदार पाटील यांनी रोखली. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक यांचा वारू रोखण्यात पाटील यांना अपयश आले. त्यानंतर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणू पाहणाऱ्या पाटील यांना महाडिक यांनी ऐनवेळी रोखले. तेथे भा​जपचा कमळ फुलला. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीची सरशी झाली. या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील ग्रामपंचायत निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सलग तीन ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर अखेर महाडिकांना त्यांच्याच गावातच शिवाय आमदार अमल महाडिक यांच्या मतदार संघात एकतर्फी विजय मिळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांचाच झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाचगाव आणि शिरोली या दोन्ही ग्रामपंचायतीत महाडिक गटाला धक्का देत आमदार सतेज पाटील यांनी एकतर्फी सत्ता मिळवली. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार पाटील गटाने दणदणीत यश मिळवत आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांच्यासमोर आव्हान उभे केले. आमदार सतेज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील दोन्ही गावांतील निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले होते. महाडिक गटाकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. काही विद्यमान सदस्यांना थांबवून त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यातून नाराजांची संख्या वाढली. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या नाराजीकडे दूर्लक्ष केल्याचा फटका त्यांना बसला.

शिरोलीत खवरे गटाची सरशी

पुलाची शिरोलीच्या निवडणुकीत शशिकांत खवरे यांच्या आघाडीने महाडिक गटाच्या आघाडीचा पराभव करत सत्ता मिळवली. खवरे यांच्या आघाडीने सरपंचपदासह नऊ जागा जिंकल्या. महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या गावातच त्यांचा पराभव झाल्याने महाडिक गटाला हा मोठा धक्का आहे. महाडिक यांच्याविरोधात इतर सर्व गट एकत्र झाल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत प्रथमच खवरे बंधू एकत्र आल्याने त्यांच्या मताचे विभाजन झाले नाही. त्याचा फायदा घेत खवरे यांनी प्रचारात प्रथमपासूनच आघाडी घेऊन प्रभागातील नऊ जागांवर विजय मिळवला.

पाचगावात सत्तांतर

दक्षिण विधानसभा मतदार संघातील प्रचंड संवेदनशील असणाऱ्या पाचगावमध्ये महाडिक गटाची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकत सरपंचपदासह १७ पैकी तब्बल १५ जागा सतेज पाटील गटाने जिंकल्या आहेत. संग्राम पाटील यांची सरपंचपदी निवड झाली असून महाडिक गटाच्या मनीषा पाटील यांचा येथे मोठा पराभव झाला.

उचगावमध्ये सत्ता राखली

उचगावमध्ये काँग्रस व शिवसेनाप्रणित उचगाव ग्रामपंचायत विकास आघाडी रिंगणात होती. तर भाजपने उचगाव विकास आघाडी विरोधात होती. काँग्रेस आघाडीच्या मालू गणेश काळे या सरपंचपदाच्या निवडणुकीत २०० मतांनी विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात भाजप आघाडीच्या उषा केंगले उमेदवार होत्या. काँग्रेस आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवाराबरोबरच १३ सदस्य निवडून आले. पाटील गटाने येथे सत्ता कायम राखली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचा सातबारा आज होणार कोरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज कृषी कर्जमाफी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी (ता. १८) दिवाळीच्या मुहूर्ताने कर्जदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी सहकार विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अनेक जाचक अटींचे दिव्य शेतकऱ्यांना पार करावे लागले. त्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले नव्हते. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. पण आजअखेर राज्यातील अनेक जिल्ह्यातील लेखापरीक्षणानंतर याद्या अपलोड झालेल्या नसल्याने कर्जमाफीच्या रकमेबाबत सांशकता व्यक्त केली जात होती.

यातून मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत पात्र प्रातिनिधीक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. मंत्रालयात दुपारी १२ ते एक या वेळेत होणाऱ्या कर्जमाफी प्रमाणपत्र वितरणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र वाटप केल्यानंतर राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या याद्यांची तपासणी करुन कर्जमाफीची रक्कम कर्जदारांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यानंतर अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा तपासणी होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गडहिंग्लज’ वर राष्ट्रवादीची पकड

$
0
0

गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यात अत्यंत चुरशीने लढलेल्या ३४ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. शहरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड झाल्याने निवडून आलेल्या विजयी सरपंचांची दिवाळी गोड झाली. यानिमित्ताने गटातटात विखुरलेल्या तालुक्यात सर्वच पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी ‘समझोता एक्स्प्रेस’चा आधार घ्यावा लागला. तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले तरीही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र घड्याळाने आपली टिकटिक कायम राखली. यासोबतच शिवसेनेची घोडदौड वाढली असून चार ठिकाणी त्यांनी बाजी मारली.

तालुक्यात सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह डॉ.प्रकाश शहापूरकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, अॅड.हेमंत कोलेकर, विद्याधर गुरबे, अॅड.श्रीपतराव शिंदे, संग्राम कुपेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यावेळी आमदार मुश्रीफ यांच्या वाट्याला फारसे काही आले नसले तरी आमदार कुपेकर मात्र फायद्यात राहिल्या. नेसरीमध्ये कॉंग्रेसच्या विद्याधर गुरबे यांना सोबत घेऊन भाजपचे अॅड.कोलेकर यांच्याशी केलेली मैत्री त्यांना उपयुक्त ठरली. महागाव ग्रामपंचायतीवर कधीकाळी एकहाती सत्ता असणाऱ्या अप्पी पाटील गटाला यावेळी पुन्हा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत पाटील गटाच्या ३५ वर्षाच्या सत्तेला सुरंग लावत पताडे गटाने बाजी मारली होती. यावेळीही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात पताडे गट यशस्वी ठरला आहे. सरपंचपदासह आठ जागा घेत त्यांनी वर्चस्व सिद्ध केले तर अप्पी पाटील गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले.

आमदार मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बड्याचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा-जनता दल युतीने सतरापैकी आठ जागा बिनविरोध करीत आधीच निम्मी लढाई जिंकली होती. मात्र सरपंचपदासाठी येथे सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. सतीश कोळेकर यांच्या सरपंचपदासाठी जद-भाजप एकत्र आले होते. नेसरीमध्ये पारंपारिक विरोधक असलेल्या कोलेकर गटाशी सुत जुळवून आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पुतणे संग्राम कुपेकर यांना शह दिला. तालुक्यात स्थानिक आघाडीने दहा, राष्ट्रवादी बारा, भाजपा सहा, कॉंग्रेस दोन तर शिवसेनेने चार ठिकाणी सत्ता काबीज केली.

...............

चौकट

विजयी सरपंच

ज्योत्स्ना पताडे (महागाव), दिनकर वळतकर (तावरेवाडी), सुजाता कंकणवाडी (हिटणी), उर्मिला पाटील (हरळीखुर्द), भारत झळके (येणेचवंडी), मारुती पाटील (सरोळी), शेवंता कांबळे (काळामावाडी), मीना सुतार (वैरागवाडी), उत्तम नाईक (डोणेवाडी), जितेंद्र रेडेकर (हिडदुग्गी), लता पाटील (हडलगे), भरमू जाधव (बिद्रेवाडी), चंद्रकांत कांबळे (कडाल), सविता कांबळे (कवळीकट्टी), तुकाराम पाटील (जखेवाडी), सचिन कांबळे (कुंबळहाळ), चाळोबा गावडे (यमेहट्टी), सुरज जाधव (बटकणगले), रेखा जाधव (कौलगे), कृष्णा नाईक (कुमरी), रोहिणी पाटील (बेकनाळ), बसवराज हिरेमठ (भडगाव), संजय बटकडली (कडगाव), प्रवीण माळी (करंबळी), बी.जी.स्वामी (मुगळी), सुरेखा चौगुले (खमलेट्टी), अप्पाजी शिखरे (शिप्पूर तर्फ नेसरी), आशिष साखरे (नेसरी), शांता कदम (हसूर सासगिरी), प्रकाश गुरव (सांबरे), अव्वाक्का नाईक (कडलगे), सतीश कोळेकर (बड्याचीवाडी), संजय कांबळे (हसूरवाडी) व मालूताई भारती (तारेवाडी).

....................

चौकट

नेसरीत फेरमतमोजणी

अधिकृत निवडणूक निकाल घोषित होण्यापूर्वीच पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींनी अतिउत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिल्याने नेसरी येथील पराभूत उमेदवाराने मिरवणूक सुरु केली. मात्र पाठोपाठ अधिकृत निकाल जाहीर होताच गोंधळलेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी धाव घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड वादावादी झाली. शेवटी फेरमतमोजणी घेतली असता अधिकृत निकाल कायम राहिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीचा वरचष्मा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींचा निकालात मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला. भाजपने पहिल्यांदाच सर्व ग्रामपंचायतींमध्ये चंचूप्रवेश केला तर शिवसेनेने आपले गड शाबूत ठेवले. मतदारांनी स्थानिक आाघाड्यांनाही कौल दिला. पक्षीय चिन्हांवर निवडणुका न झाल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्यालाच सर्वाधिक यश मिळाल्याचा दावा केला. मात्र केंद्र, राज्यात सत्ता असूनही भाजपला अपेक्षित मुसंडी मारण्यात यश ‌मिळाले नसल्याचे पुढे आले.

करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील यांची पकड कायम असल्याचे येथे स्पष्ट झाले. काँग्रेस २२, शिवसेना ५, भाजप चार, अपक्ष तीन, राष्ट्रवादीस एक, आघाड्यांना १६ जागा सरपंचपद मिळाल्या. चंदगड तालुक्यात राजकीय गटा-तटांचा प्रभाव असल्याने स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवल्या. त्यांना चांगले यश मिळाले. ‘कागल’मध्ये आमदार हसन मुश्रीफ, मंडलिक गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर झेंडा फड‌कविला. भाजपला येथे चांगले यश मिळाले नाही.

शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांनी शिवसेनेची प्रभाव कायम ठेवण्यात यश मिळवले. माजी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने ९ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवले. गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची पकड मिळवली. काँग्रेस, भाजपला अपेक्षीत यश मिळवता आले नाही. तालुक्यात पहिल्यांदाच शिवसेने चांगले खाते उघडले. आजरा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने १७ ठिकाणी यश मिळवले. राष्ट्रवादी व काँग्रेसची पिछेहाट झाली. उत्तूर येथे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी बाजी मारली. त्यांच्या पत्नी वैशाली सरपंचपदी निवडून आल्या. तालुक्यात पहिल्यांदाच भाजपने मुसंडी मारली.

पन्हाळ्यात जनसुराज्य पक्षाने बाजी मारली. पक्षाचे नेते माजी आमदार विनय कोरे यांचे प्रभाव कायम असल्याचे पुढे आले. कोरे यांच्या गटाचे १७ सरपंच निवडून आले. आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील गटाने १५ ठिकाणी विजय मिळविला. राधानगरीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुसुंडी मारली. भाजप, शिवसेनेला अपवाद वगळता फारसे यश मिळाले नाही. राशिवडे बुद्रकमध्ये ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, कृष्णात पाटील आघाडीच्या १२ जागा निवडून आल्या. हातकणंगले तालुक्यातील आवाडे गट, शिवसेना, जनसुराज्य पक्ष, भाजपासह स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मतदार संघातील तारदाळ, कोरोची येथील आवाडे गटाकडे सत्ता गेल्याने भाजपाला धक्का बसला. ‘भुदरगड’मध्ये २४ ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव गटाने ६, माजी आमदार के.पी.पाटील ५ तर भाजपने एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यश मिळविले. ‘शिरोळ’मध्ये भाजपने सोयीच्या आघाड्या करीत १४ पैकी सहा ठिकाणी सरपंचपदी मिळविले. खिद्रापूरमध्ये सरपंचपदी अपक्षाने बाजी मारली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका ठिकाणी, तर उर्वरित ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना प्रणित आघाड्यांना सरपंचपदी यश मिळाले. तर गगनबावडा तालुक्यात पक्षापेक्षा स्थ‌ानिक आघाड्यांनी बाजी मारली.

जल्लोष, मिरवणुका

निकाल लागल्यानंतर विजयी उमदेवार व समर्थकांनी संबंधीत गावात गुलालांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. विजयी मिरवणूक काढली. विजयी मिरवणुकीवेळी काही गावात दोन गटात वादावादीचे प्रसंग उदभवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images