Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

BJP: गायीचे पवित्र दूध प्या आणि मागण्या मान्य करा!; भाजपचं मुख्यमंत्र्यांना साकडं

$
0
0

कोल्हापूर: आम्ही पाठवलेले गायीचे पवित्र दूध प्या आणि न्याय बुद्धीने आमच्या मागण्या मान्य करा, अशी विनंती भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदनासमवेत दूध देण्यात आले. भाजप च्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा दिवसभर सुरू होती. ( BJP 's Request To Uddhav Thackeray )

वाचा: भाजपचे मतलबी आंदोलन; राजू शेट्टी यांची भाजपवर टीका

गायीच्या दूधाला प्रती लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी करिता प्रती किलो ५० रुपये अनुदान आणि सरकारकडून ३० रुपये प्रती लिटरने दुधाची खरेदी करावी, अशा विविध मागण्या भाजपने केल्या आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेने देखील याच मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी स्वाभिमानीच्या वतीने राज्यभर दूध संकलन बंद करण्यात येणार आहे. रयत च्या वतीने १ ऑगस्टला दूधाने आंघोळ घालण्यात येणार आहे. या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजपच्या वतीने एक ऑगस्ट रोजी दूध एल्गार आंदोलन होणार आहे. याबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दूग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी निवेदन दिले. पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी निवेदनासमेवत दूध दिले. हे दूध प्या आणि आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती त्यांनी सरकारला केली.

वाचा: आंदोलन सुरू; राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर दुधाचे पाट

भाजपच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायी, म्हशींचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर दुधाची सहकारी संघाकडून खरेदी केली जाते. ९० लाख लिटर दूध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. सरकारी योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते. लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दूधाची मागणी घटली. सध्या खासगी संस्था व सहकारी संघाकडून दूध १५ ते १६ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दूधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. यामुळे दूधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांचं आंदोलन; दूध व्यवसायावर ओढवणार 'हे' संकट

दरम्यान, स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळ दूध संघाने मंगळवारी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला राज्य सरकारच्या दूग्धविकास विभागाने आक्षेप घेतला. यामुळे संघाने निर्णय बदलला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Hasan Mushrif ग्रामपंचायतींवर प्रशासक: भाजपने केले ते आम्ही केले नाही; मुश्रीफांचं प्रत्युत्तर

$
0
0

कोल्हापूर: महाराष्ट्रातील चौदा हजारावर ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे. १९९२ साली झालेल्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार त्यांना मुदतवाढही देऊ शकत नाही. त्यामुळे करोना संसर्गाच्या महामारीत गावगाडा सुरळीत चालविण्यासाठी प्रशासक नियुक्तीचा कायदा केला, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच हा कायदा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ( Hasan Mushrif on Gram Panchayat Administrator )

वाचा: राम मंदिरावर शरद पवार काय म्हणतात त्याची हिंदूंना पर्वा नाही: चंद्रकांत पाटील

कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासक नियुक्ती बद्दलचे वास्तव आणि आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, 'कायद्यानुसार मुदत संपलेल्या विद्यमान सरपंचांना मुदतवाढ देता येत नाही. प्रशासक नेमण्याची झाली तर तेवढे विस्ताराधिकारी नाहीत. मुळातच विस्तार अधिकाऱ्यांची संख्या कमी आणि या करोना महामारीच्या काळात काम ठप्प झालं तर याची फार मोठी किंमत आम्हाला चुकवावी लागेल. यामुळे पालकमंत्र्यांच्या सोयीने प्रशासक नेमण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना च्या महामारीत गावगाढा उत्तम चालावा एवढीच प्रामाणिक भावना आहे. यामध्ये राजकीय हेतु कोणताच नाही.'

वाचा: गायीचे पवित्र दूध प्या आणि मागण्या मान्य करा!; भाजपचं मुख्यमंत्र्यांना साकडं

भाजपच नेते आमच्यावर महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना मागील दाराने आणत आहेत, अशी टीका करत आहेत असा संदर्भ देत मुश्रीफ म्हणाले, या कायद्याविरुद्ध ते उच्च न्यायालयात गेले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतच करू. परंतु; आम्ही भाजपने जसं केलं तसं केलं नाही. त्यांनी जिल्हा नियोजन मंडळात भाजपाचे नऊ -नऊ दहा -दहा निमंत्रित सदस्य आणून बसवले. सहकारी संस्थांवर तज्ञ म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणून ठेवले असा टोलाही त्यांनी मारला आहे.

प्रशासकपदी पक्षकार्यकर्ते नकोच: फडणवीस

मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सरकारचा आदेश पूर्णत: राजकीय हेतुने प्रेरित असून करोना संकटाच्या काळात अशापद्धतीने आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रकार योग्य नाही. निवडणूक आयोगाने प्रशासक नेमण्याचे निर्देश दिले असले तरी त्यात कुठेही राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करा असे नमूद नाही, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे.

वाचा: धोका वाढला; आता 'या' जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन

अण्णा हजारेंचीही टीका

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीबाबत राज्य सरकारचे परिपत्रक बेकायदा असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. प्रशासकाची नियुक्ती करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, ही तरतूद घटनाबाह्य असल्याचे हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळविले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचातीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची संबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने नेमणूक करायची आहे. म्हणजेच पालकमंत्री कोणत्या तरी पक्षाचे असतील आणि त्यांचा सल्ला घेऊन प्रशासक नेमायचा आहे. म्हणजेच पालकमंत्री आपल्या पक्षाच्या व्यक्तीचे नाव सुचविणार आणि राज्यात पक्षाची, पक्षाने, पक्ष सहभागातून चालविलेली शाही येऊन लोकशाही पायदळी तुडविली जाणार हे सुद्धा स्पष्ट होते,’ असा आरोप हजारे यांनी केला आहे.

वाचा: पडळकरांनी राष्ट्रवादीशी पुन्हा घेतला पंगा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PSI Appointments: अखेर 'त्यांच्या' अंगावर खाकी वर्दी; ३८७ उमेदवारांना MPSCची शिफारसपत्रं

$
0
0

कोल्हापूर: सर्व परीक्षा पास झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) होणार म्हणून त्यांनी फटाके उडवले, गुलाल उधळला, पेढे वाटले, सत्कार स्वीकारले, पण चार महिन्यानंतरही खाकी वर्दीची प्रतिक्षा राहिलेल्या राज्यातील ३८७ युवकांना अखेर खाकी वर्दी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनवरील वृत्ताची दखल घेत लोकसेवा आयोगाने त्यांना शिफारस पत्रे दिली. या पत्रानुसार लवकरच राज्य सरकार त्यांना सेवेत रूजू करून घेत प्रशिक्षणाला पाठवणार आहे. ( MPSC recommendation for PSI Appointments )

वाचा: गुलाल उधळला, फटाके फुटले पण अंगावर अजून खाकी वर्दी नाही!

अडीच वर्षांपूर्वी पीएसआय होण्यासाठी राज्यातील चार लाख युवकांनी परीक्षा दिली. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या युवकांनी अंतिम परीक्षा दिली. त्यामध्ये यश मिळालेल्यांची शारिरीक चाचणी घेतल्यानंतर ३८७ युवकांची पीएसआय म्हणून निवड यादी जाहीर झाली. मार्च महिन्यात ही यादी झळकल्यानंतर या सर्वांनी आनंद व्यक्त करताना गुलाल उधळला. अनेक वर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले म्हणून पेढे वाटले. काही ठिकाणी तर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. अनेकांची लग्ने ठरली. पण याच दरम्यान, करोना संसर्ग वाढला. याचा फटका त्यांना बसला. उत्तीर्ण होऊन चार महिने झाली तरी सरकारने आयोगाकडे प्रस्तावच दिला नाही. त्यामुळे लोकसेवा आयोगाकडून शिफारस पत्रे मिळाली नाहीत.

वाचा: १४० नंबरने उडवली खळबळ; मुंबई पोलीस 'त्या' वाहिनीला दाखवणार हिसका

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सरकारकडून पुढील प्रक्रिया होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर या युवकांची अवस्था दयनीय झाली होती.पीएसआय झाल्याने ते इतर खासगी नोकरी करू शकत नाही, दुसरीकडे हक्काची नोकरी मिळेना अशी त्यांची अवस्था झाली. यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली होती. सरकार आणि आयोगाच्या या दुर्लक्षाबाबत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनवर ९ जुलै २०२० रोजी बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीनंतर तातडीने दोन्ही पातळीवर हालचाली सुरू झाल्या. सरकारने प्रस्ताव दिला. त्यानुसार २१ जुलै रोजी आयोगाने सर्व उमेदवारांना शिफारसपत्रे पाठवली. अवर सचिव देवेंद्र तावडे यांनी पाठवलेली ही शिफारसपत्रे या उमेदवारांना मिळाली. यामुळे येत्या काही दिवसांतच या उमेदवारांना सरकार प्रशिक्षणासाठी नाशिक अथवा सांगली जिल्ह्यातील तुरची येथे पाठवेल. आयोगाने मटा ऑनलाइनच्या वृत्ताची तातडीने दखल घेतल्याने ३८७ युवकांच्या अंगावर खाकी वर्दी येणार आहे.

वाचा: मुंबई पोलिस दलात फेरबदल; पोलिस उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या

अशी झाली प्रक्रिया

राज्यातील पोलीस दलात पीएसआय भरतीसाठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर १३ मे २०१८ रोजी चार लाखावर युवकांनी पूर्वपरीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांची २६ ऑगस्ट व २ सप्टेंबरला मुख्य परीक्षा झाली. त्याचा निकाल वर्षाने लागला. ६ नोव्हेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२० या दरम्यान शारिरीक चाचणी घेऊन अंतिम निकाल १७ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. अंतिम निकालानुसार पीएसआय म्हणून ३८७ जण पात्र ठरले. तेव्हापासून हे युवक नोकरीत रूजू होण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांना २१ जुलै रोजी आयोगाने शिफारसपत्र दिल्याने त्यांच्या अंगावर आता खाकी वर्दी येणार आहे.

वाचा: धोका वाढला; आता 'या' जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन

अंतिम परीक्षा उत्तीर्ण होवून चार महिने झाले तरी आम्हाला खाकी वर्दीची प्रतीक्षा होती. पण महाराष्ट्र टाइम्सने आमची ही व्यथा मांडल्यानंतर सरकार आणि आयोगाने त्याची तातडीने दखल घेत आमचा प्रश्न सोडवला आहे. यामुळे आमच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे - सुरज आमते, उत्तीर्ण विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Milk Protest: दूध दरासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आक्रमक; हजारो लिटर दूध रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । सांगली

शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. सांगली जिल्ह्यात पुणे-बेंगलोर महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले.

राज्यात गाईच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. हा दर खूपच कमी असल्याने सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. देशांतर्गत दूध दर नियंत्रित राहण्यासाठी दूध पावडरीची आयात बंद करावी, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानीचे आंदोलन होण्यापूर्वीच सोमवारी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यभर आंदोलन करून दूध दराचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मॅच फिक्सिंग प्रमाणे असल्याचा आरोपही केला. यानंतर आक्रमक बनलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटे पासूनच आंदोलनाला सुरुवात केली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर येलूर फाटा येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचा टँकर अडवून त्यातील २५ हजार लिटर दूध रस्त्यावर ओतले. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील आंदोलनात सहभाग घेऊन गोकुळ दूध संघाचे दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले.

स्वाभिमानीने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासूनच दूध दर आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी गावांमध्ये मंदिरात दुग्धाभिषेक केला, तर काही ठिकाणी मोफत दूध वाटप देखील सुरू आहे. या आंदोलनात गोकुळ दूध संघाची वाहने लक्ष्य केल्याचे दिसत आहे. गोकुळ दूध संघाने सुरुवातीला स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी सकाळचे दूध संकलन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुग्ध विभागाची नोटीस येतात संघाला हा निर्णय बदलावा लागला. गोकुळ दूध संघाने यू-टर्न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संघाची वाहने लक्ष्य केली जात आहेत.

वाचा: आंदोलन सुरू; दगडाला दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Sangli Crime: घरात ठेवलेले पैसे घेऊन बायको पळाली!; पतीची पोलिसांकडे धाव

$
0
0

सांगली: कौटुंबिक वादातून चिडलेल्या पत्नीने घरातील तीस हजार रुपये घेऊन पोबारा केला. पतीने समजूत घालून पत्नीला माघारी बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी घरी येत नसल्याने आणि पैसेही मिळत नसल्याने अखेर पतीने पत्नीच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. सांगली ग्रामीण पोलिसांनी तिच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दीक्षा भीमराव कांबळे (रा. समडोळी, ता. मिरज, सध्या रा. इचलकरंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. ( Husband Complaint Against wife In Sangli )

वाचा: लाइव्ह व्हिडिओ करून 'त्यानं' घेतला गळफास; आत्महत्येचं कारण सांगितलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहणाऱ्या भीमराव कांबळे यांच्याशी इचलकरंजी येथील साक्षी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरूनही दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान साक्षी यांनी घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून भीमराव यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३० हजार रुपये घेऊन माहेरी पोबारा केला. घरातील पैसे घेऊन पत्नी माहेरी गेल्याचे लक्षात येताच भीमराव यांनी तिची समजूत घालून पुन्हा माघारी बोलवण्याचा प्रयत्न केला.

वाचा: धक्कादायक! पुण्यात नराधम बापानंच केला ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून पत्नीने पैसे दिले नाहीत आणि ती परतही आली नाही. अखेर भीमराव यांनी याबाबत मंगळवारी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. भीमराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून पत्नी साक्षी भीमराव कांबळे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा: मटणाचा रस्सा सांडल्याने वडील ओरडले; १० वर्षीय मुलाची आत्महत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रवाशांना 'असे' लुटत होते, पोलिसांनी केली अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. रवी महावीर खोत (वय २९), संदीप शिवाजी कुंटे (वय २१), ऋतिक दिनकर महापुरे (वय २९), जयेश रवींद्र पवार (वय २५) अशी अटकेतील लुटारुंची नावे आहेत. पोलिसांनी या टोळीकडून ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीतील रवी खोत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात दोन खुनाचे गुन्हे, एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. रात्रीच्या वेळी रात्री चाकूचा धाक दाखवून ते प्रवाशांना लुटत होते.

१९ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरमध्ये राहणारे बाबासो विठ्ठल गवळी हे त्यांच्या ट्रकमधून सातारा येथून कोल्हापूरकडे माल घेऊन निघाले होते. कासेगावच्या पुढे नेर्ल येथे दत्त भुवन जवळ आले असता, ट्रकमध्ये अचानक बिघाड झाला. रात्री उशीर झाल्याने ट्रक दत्त भुवनच्या बाजूला लावून ते ट्रकमध्येच झोपले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार व्यक्तींनी क्लिनर साइडची काच फोडून ट्रकमध्ये प्रवेश केला. गवळी आणि त्यांच्या क्लिनरला बेदम मारहाण करून खुरप्याचा धाक दाखवत त्यांची खिशातील १३ हजार रुपये रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणी गवळी यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या लुटमारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी एक पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात केले होते. गुन्ह्याच्या तपासत असताना पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी व पोलिस कॉन्स्टेबल संकेत कानडे यांना लुटारूंबद्दल माहिती मिळाली. संशयित आरोपी पेठनाका येथील उड्डाणपुलाच्या खाली थांबल्याची माहिती मिळताच पथकाने त्याठिकाणी छापा मारून चौघांना ताब्यात घेतले. त्यातील रेकॉर्डवरील आरोपी रवी खोत यांच्याकडे नेर्ले येथील ट्रक ड्रायव्हरच्या लूटमारी प्रकरणी चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा आपल्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लूटमारीतील रोख रक्कम सात हजार रुपये व मोटारीसायकल असा ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Battis Shirala Nag Panchami 'येथे' यंदाही जिवंत नागांची पूजा नाही; प्रशासनाचा अॅक्शन प्लान तयार!

$
0
0

सांगली: वन्यजीव कायद्यानुसार जिवंत साप पकडून त्यांची पूजा करणे गुन्हा असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदाही बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांची पूजा होणार नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिराळ्यातील अंबामाता मंदिर बंदच राहणार आहे. जिवंत नागांची पूजा करू नये, तसेच स्पर्धा भरवू नये यासाठी विशेष नजर ठेवण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ( Battis Shirala Nag Panchami )

वाचा: आदित्य ठाकरेंच्या पत्राने जादू केली; ४०० वर्षांचा निसर्गाचा ठेवा वाचला

नागपंचमी निमित्ताने जिवंत नागांना पकडून त्यांचे पूजन आणि स्पर्धा भरवण्याची प्रथा बत्तीस शिराळा येथे होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रथेवर बंद घातल्याने नागपंचमीला काही ठिकाणी छुप्या पद्धतीने जिवंत नागांची पूजा करण्याचा प्रयत्न केला जातो. असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी बुधवारी वन विभागाचे उप वनसंरक्षक पी. बी. धनके, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, शिराळा नगराध्यक्षा अर्चना शेटे, आदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वाचा: श्रावणातही देवळांची कवाडे बंदच!

नागपंचमीला जिवंत नागांची पूजा होऊ नये, तसेच स्पर्धा होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चित्रीकरण केले जाणार आहे. शहरातील सीसीटीव्ही कमेऱ्यांवरूनही नजर ठेवली जाणार आहे. आवश्यकतेनुसार शिराळ्यासह परिसरात संचारबंदी लागू केली जाईल. कोणाकडे जिवंत साप आढळल्यास दोषींना तीन वर्षांपर्यंत कैद आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा होईल, असे कदम यांनी बैठकीत सांगितले. बैठकीसाठी शिराळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सहायक वन संरक्षक जी. आर. चव्हाण यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

वाचा: सोन्याला चकाकी ; जळगावात सोन्याची उच्चांकी दौड

आठ वर्षांपासून मिरवणुकांवर बंदी

नागपंचमीपूर्वी आठ-दहा दिवस परिसरातून नाग पकडले जात होते. यानंतर नागपंचमीला त्यांचे पूजन करून मिरवणूक काढली जात असे. यावेळी नागांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जायच्या. या स्पर्धा पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक बत्तीस शिराळ्यात दाखल होत असत. मिरवणूक संपल्यानंतर सर्व नाग पुन्हा जंगलात सोडले जात होते. मात्र, नागांचे होणारे हाल थांबवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते अजित पाटील यांनी सन २००२ मध्ये पहिल्यांदा याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २०१२ मध्ये मुंबई हायकोर्टाने जिवंत नागांचे पूजन, मिरवणूक आणि खेळांवर बंदी घातली. या निर्णयानंतर शिराळ्यात मातीच्या नागाच्या प्रतिकृतीचे पूजन केले जाते.

वाचा: नागपूजा विधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या पत्राने जादू केली; ४०० वर्षांचा निसर्गाचा ठेवा वाचला!

$
0
0

सांगली: रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणातील भोसे (ता. मिरज) येथील ४०० वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्यात अखेर यश आले. महामार्ग प्राधिकरणने वटवृक्ष काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. याशिवाय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून वटवृक्ष वाचवण्याची विनंती केली होती. अखेर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वटवृक्षाची पाहणी करून सर्व्हिस रोडबाबत पर्याय काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेकडो पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहिला.

वाचा: तुम्ही काहीतरी लपवताय; संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले!

रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान असलेल्या भोसे गावच्या हद्दीत महामार्गालगत गट नंबर ४३६ मध्ये सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा विशालकाय वटवृक्ष उभा आहे. जवळच यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिरही आहे. परिसरातील शेकडो पक्ष्यांचे हे हक्काचे नैसर्गिक आश्रयस्थान आहे. अनेक वाटसरू रोज याच्या सावलीत काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होतात. मिरजमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्या याच वटवृक्षाच्या छायेत थांबतात. शेकडो वर्षांपासून हा वटवृक्ष परिसराची वेगळी ओळख बनला आहे. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणात सर्व्हिस रोडमध्ये अडथळा ठरत असल्याने हा तोडण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणने घेतला होता.

वाचा: लोक लॉकडाऊनला कंटाळलेत, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

भोसे ग्रामपंचायत, यल्लम्मा मंदिर देवस्थान ट्रस्ट, सह्याद्री देवराई निसर्गप्रेमी परिवारासह परिसरातील नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला होता. ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवून त्याच्या बाजूने महामार्ग तयार करावा, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वटवृक्ष वाचवण्याबाबत पत्र पाठवले होते. खासदार संजय पाटील यांनीही वटवृक्षाबद्दल असलेली जनभावना मंत्री गडकरींना कळवली. गडकरींनी तातडीने याची दखल घेऊन वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाठवले. यानुसार प्राधिकरणचे संचालक संजय कदम यांनी बुधवारी परिसरातील नागरिकांसह वटवृक्ष आणि महामार्गाच्या कामाची पाहणी केली. ‘मुख्य महामार्गात वटवृक्षाचा अडथळा नाही. सर्व्हिस रोडमध्ये वटवृक्ष येत असल्याने या जागेत सर्व्हिस रोडचे काम स्थगित करून पर्यायी जागेचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वटवृक्ष वाचवण्याबाबतचा अहवाल लवकरच केंद्रीय परिवहन मंत्र्यांना पाठवला जाईल,’ अशी माहिती संचालक कदम यांनी दिली.

वृक्षप्रेमींनी केले निर्णयाचे स्वागत

वटवृक्ष वाचवण्याच्या निर्णयाचे वृक्षप्रेमींनी स्वागत केले. सह्याद्री देवराई निसर्गप्रेमी परिवार, भोसे ग्रामपंचायत आणि यल्लम्मा मंदिर देवस्थान ट्रस्टनेही वटवृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न केले. संबंधित सरकारी कार्यालये, मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यासह सोशल मीडियातही वटवृक्ष वाचवण्याची मोहीम सुरू होती. अखेर या लढाईला यश आल्याने वृक्ष प्रेमींनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

वाचा: नीतेश राणेंनी फडणवीसांना दिली 'ही' उपमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता 'या' महिला नेत्याला करोनाची लागण; पालिकेतील अनेकांशी आला होता संपर्क

$
0
0

म टा वृत्तसेवा, कराड: सुमारे साडे तीन महिने करोना योध्याच्या भूमिकेत कराड शहरवासीयांना करोनापासून वाचविण्यासाठी अविरत कार्यमग्न असलेल्या कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनाच अखेर करोनाने गाठले असून बुधवारी सायंकाळी त्यांना करोना अहवाल बाधित आल्याने त्यांना येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचा उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कराड शहरवासीयांना करोनापासून चार हात लांब ठेवण्यासाठी करोना योध्याच्या भूमिकेत अविरत कार्यरत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांना घशात दुखत असून तापही येत होता.त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. तसेच त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना बुधवारी घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रयोगशाळेने सायंकाळी दिलेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा रुग्णालयातील करोना वॉर्डमध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, नगराध्यक्षा शिंदे यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच त्याचे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच त्यांचा रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी , कर्मचारी आणि नगरसेवकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. यासाठी याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.

बेड न मिळाल्यानं आंदोलन करणाऱ्या 'त्या' रुग्णांचा मृत्यू; महापौरांचे चौकशीचे आदेश

नगराध्यक्षा शिंदे या शुक्रवारीपर्यंत पालिकेत येत होत्या शनिवारपासून त्या कार्यालयात येण्याचे बंद झाल्याने त्यांनी आजारी असल्याचा निरोप त्यांनी दिला होता. त्या घरी उपचार घेत होत्या. बुधवारी सायंकाळी त्यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिका प्रशासनात घबराट पसरली आहे. त्यांचा रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांना क्वारंटाइन करावे लागणार असल्याने यासाठी शिंदे कोरोना बाधित कश्या झाल्या. त्याची माहिती घेत आहोत. ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अधिक स्पष्टता होईल. त्यांच्या सहवासातील लोकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. त्यांच्या घरी, कार्यालयातील त्यांच्या नेहमीच्या सहवासातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली आहे.

चिंता वाढली! दिवसभरात १० हजारांवर करोनाबाधित सापडले

गेल्या सुमारे साडे तीन महिन्यापासुन त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत अविरत कार्यरत होत्या. त्यामुळे दगदग व धावपळ झाल्याने ताप आला असावा म्हणून त्यांनी घरीच उपचार सुरू केले होते. मात्र त्यांनी त्यांची करोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.

'सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम'

माझी प्रकृती स्थिर असून मी लवकरच ठीक होऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन. अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकून शिंदे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच कराडकर जनतेनेप्रथम स्वतःची काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे लवकरच बरी होऊन पुन्हा आपल्या सेवेत येईल आपण स्वतःची काळजी घेउन इतरांचीही काळजी घ्यावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. कुटुंबाची काळजी घ्यावी असे भावनिक आवाहनही नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी केले आहे. मात्र नगराध्यक्ष शिंदे यांना करोनाची लागण झाली असल्याचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. याबाबत शहरवासीयांच्यातून त्यांच्या प्रकृतीला लवकरच आराम मिळो व त्या पूर्ण बऱ्या होऊन शहरात कार्यरत होवोत, यासाठी येथे नागरिक प्रार्थना करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Coronavirus In Pandharpur विठुरायालाही करोनाचा विळखा, मंदिर परिसरही 'कंटेन्मेंट झोन'

$
0
0

पंढरपूर: करोनाचा विळखा आता थेट विठुरायाला बसला असून मंदिर परिसर देखील आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पंढरपूर शहरातील १७ प्रभागांत सध्या कंटेन्मेंट झोन असून तालुक्यातील तब्बल २७ गावांत करोना संसर्ग पसरला आहे. करोनारुग्णांत तब्बल २१ लहान मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक बाबही समोर आली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. ( Coronavirus In Pandharpur )

वाचा: मी आरती देशमुख बोलतेय; पोलिसांच्या घरी एक कॉल धीर देणारा!

करोनारुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाला वारकरी संप्रदायाच्या मठांचा मोठा आधार मिळाला असून शहरातील ३०० पेक्षा जास्त मठ ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मठांमध्ये नगरपालिकेच्या वतीने गाद्या पाठवण्यात येत असून अशा मठांतून तब्बल तीन हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था प्रशासनाने करून ठेवली आहे. सध्या शहरातील संत गजानन महाराज मठ, तनपुरे महाराज मठ याशिवाय अनेक मठांत अनेक कुटुंबांना क्वारंटाइन ठेवण्यात आले असून जशी गरज भासेल तसे इतर मठांत नागरिकांना पाठवण्यात येणार आहे.

वाचा: पुण्यात करोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; २४ तासांत ३२१८ बाधित

करोना संकटामुळे आषाढी यात्रा न भरविण्याचा निर्णय योग्यच होता हे पंढरपुरातील सद्याच्या स्थितीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या शहर व तालुक्यात जवळपास २५० करोना बाधित रुग्ण असून रोज सरासरी दीडशेच्या आसपास नागरिकांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे प्रशासनाने नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याची विनंती केली आहे. सध्या संचारबंदी नसली तरी जे नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत त्यांनी समाजाची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे

दरम्यान, पंढरपुरात करोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी तातडीने संचारबंदी जाहीर करण्याची मागणी मनसेचे दिलीप धोत्रे यांनी केली आहे. करोना रुग्णावरील उपचारासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स याच्या चढ्या भावात होणाऱ्या विक्रीवरही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी धोत्रे यांनी केली आहे.

वाचा: ठाकरे सरकार दोन महिन्यांत कोसळेल; आता 'या' मोठ्या नेत्याचा दावा

स्टेट बँक शाखा बंद

शहरातील स्टेट बँकेतील कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याने बँक बंद करण्यात आली असून सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत असून गेल्या काही दिवसांत बँकेत आलेले ग्राहकही धास्तावले आहेत.

३१ जुलैपर्यंत सोन्या-चांदीची दुकाने बंद ठेवणार

पंढरपुरात करोना संसर्गाचा वाढत धोका पाहून शहरातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी २४ ते ३१ जुलैपर्यंत आपली सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष महावीर गांधी यांनी सांगितले. सध्या शहरातील विठ्ठल मंदिर परिसर, गांधी रोड, नाथ चौक परिसरात करोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागले आहेत अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरमध्ये अजूनही संचारबंदी लागू केलेली नाही. आता प्रशासनाला मदत म्हणून सराफ असोसिएशन दुकाने बंद ठेवण्यासाठी पुढे आले आहे.

वाचा: पसार करोनाबाधित कैद्यांना पकडलं, आता 'त्या' पोलिसांची उडाली झोप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याने जपली वनसंपदा; माळरानावर फुलले नंदनवन

$
0
0

उद्धव गोडसे, सांगली

जगभर एकीकडे झाडांची कत्तल होत आहे. सिमेंटची जंगले वाढत आहेत. पर्यावरणाचा -हास सुरूच आहे. जैववविधतेला धोका निर्माण झाला असताना सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याने मात्र वेगळा आदर्श घालून दिला आहे. देशातील पहिल्या मानवनिर्मित अभयारण्याने वनसंपदा संवर्धनाचा संदेश दिला आहे. वनसंवर्धन दिनाच्या (ता. २३) निमित्ताने सागरेश्वर अभयारण्याची ही खास सफर...

राज्यातील ताडोबा, दाजीपूर, चांदोली, कोयना, नागझिरा, मेळघाट, तानसा, नायगाव, आदी अनेक अभयारण्ये तुम्हाला माहीत असतील. ही सर्वच अभयारण्ये नैसर्गिक आहेत. प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींच्या हजारो प्रजातींचे आश्रयस्थान असलेली अभयारण्ये म्हणजे जैवविविधतेची आगारे आहेत. मात्र, राज्यात मानवनिर्मित अभयारण्य तयार करण्याचाही यशस्वी प्रयत्न झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे राज्यातील पहिले आणि एकमेव मानवनिर्मित अभयारण्य. पलूस, कडेगाव आणि वाळवा तालुक्यांच्या सीमांवर १०.८७ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेले हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि वृक्षमित्र धो. म. मोहिते यांच्या पुढाकारातून १९८५ मध्ये हे अभयारण्य आकाराला आले.
77121951


सह्याद्रीच्या एका चुकार रांगेच्या कुशीत वसलेलं सागरेश्वर अभयारण्य आकाराने लहान असले तरी, जैवविविधतेने समृद्ध आहे. या ठिकाणी हरीण, सांबर, चितळ, काळविट, ससा, कोल्हे, लांडगे, तरस, रानडुक्कर आहेत. पक्ष्यांसाठी हे अभयारण्य विशेष पसंतीचे आहे. या परिसरात १४२ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. यात मोर, पोपट, राखी धनेश, मैना, सुगरण, रातवा, खंड्या, कोतवाल, कोकीळ, भारद्वाज, बगळा, सुतारपक्षी, चंडोल, बुलबुल, पावशा, घुबड अशा अनेक पक्ष्यांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण मानले जाते. पावसाळ्यात या अभयारण्याचे सौंदर्य आणखी खुलते. उंच डोंगर, हरवीगर्द झाडी, दाट धुके आणि अगदी जमिनीवर उतरणारे ढग यामुळे परिसर स्वर्गाहूनी सुंदर बनतो. अभयारण्याच्या कुंपणाला लागून शेती सुरू होते. काही ठिकाणी लोकांची वस्तीही आहे. पण वन्यजीव आणि लोकांमध्ये संघर्ष नाही हे विशेष. अभयारण्याच्या सभोवती गावांचा वेढा असला तरी आत मात्र वन्यजिवांचा मुक्तसंचार आहे.
77121928


अलीकडे वनसंवर्धनासाठी जगभर चर्चा होते. वनसंपदेचे जतन करा असे सांगितले जाते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. प्रत्यक्षात मात्र जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे. वन्यजिवांचा अधिवास उद्ध्वस्त होत आहे. हत्ती, गवे, बिबटे, वाघांचा मानवी वस्तीत शिरकाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सागरेश्वर अभयारण्याने हजारो प्राणी, पक्षी आणि कीटकांना हक्काचे घर दिले. हे घर दिवसेंदिवस अधिकच समृद्ध होत आहे. एकेकाळी माळरान असलेला हा परिसर आता जैवविविधतेचे माहेरघर बनत आहे.


नैसर्गिक वनांचे जतन करण्यात उदासीनता असताना सागरेश्वर अभयारण्याने वन संवर्धनाचा आदर्श घालून दिला. आज हे अभयारण्य हजारो प्राणी आणि पक्ष्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे. पर्यटकांसाठीही हे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

-राजू सावंत
लेखापाल वन्यजीव विभाग, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

udayanraje bhosale : तसं काही घडलंच नाही; अन्यथा सभागृहातच राजीनामा दिला असता; उदयनराजे कडाडले

$
0
0

सातारा: राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही, असं सांगतानाच महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच खासदारकीचा राजीनामा दिला असता, असं भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडलं नाही, त्याचा बाऊ करू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.

उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्याला आक्षेप घेत उदयनराजेंना समज दिली. त्यावरून राजकारण रंगलेल्याने उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकारण करणाऱ्यांना फटकारले. मी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्याने आक्षेप घेतला. त्यावर अध्यक्षांनी हे कुणाचं घर नाही. हे चेम्बर असून त्याचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं रेकॉर्डवर येणार नाही. यापुढे या गोष्टींचं भान ठेवा, असं नायडू यांनी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते राज्य घटनेला धरून होतं. राज्यघटनेनुसार त्यांना कामकाज करावं लागतं म्हणून त्यांनी त्यानुसार सांगितलं. त्यात काही चुकीचं नाही. त्यात अवमान होण्यासारखंही काही नाही. उलट त्यांनी मला नव्हे तर माझ्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्याला नायडूंनी रोखलं, असा दावा करतानाच मात्र, नॉन इश्यूचा इश्यू बनवून काही लोक राजकारण करत आहेत. विनाकारण वादाला जन्म देत आहेत, असं सांगतानाच महाराजाचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का? माझा स्वभाव पाहून तुम्हाला असं वाटतं का? मी तिथेच राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो, असंही उदयनराजेंनी सांगितलं. नायडूंनी काही चुकीची भूमिका घेतली असती तर त्यांनी माफी मागावी म्हणून मीच मागणी केली असती. पण ते चुकलेत असं मला वाटत नाही, असंही ते म्हणाले.

शरद पवारांना विचारा

सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही होते. तुम्ही त्यांना विचारू शकता असं काही घडलं का? तेही सांगतील. मी पवारांसोबत काम केलं आहे. त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केलयं. कालही वेगळं काही घडलं असतं तर त्यांनी मला त्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितली असती. पण काही घडलंच नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

त्यांचा राजीनामा मागा

महाराजांच्या अवमानाचा निषेध म्हणून उदयनराजेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी माझ्याच राजीनाम्याच्या तुम्ही मागे का लागलाय? असा मिश्किल सवाल केला. काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणेला आक्षेप घेतला. त्याचाच राजीनामा घ्या. माझा राजीनामा का घेता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आहे. त्याच काँग्रेसच्या सदस्याने घोषणेला आक्षेप घेतला, ते कसं चालतं? असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

udayanraje bhosale : ... तर शिवसेनेचं नामांतर 'ठाकरे सेना' करा; उदयनराजेंची टीका

$
0
0

सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करणाऱ्यांनी आधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं, असं सांगतानाच तुम्हाला जर बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेचं नाव बदलून 'ठाकरे सेना' करावं, असा टोला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला लगावला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजाचा दिल्ली दरबारी अपमान होत असताना भाजप गप्प का? असा सवाल केला होता. त्यावरून उदयनराजे यांना छेडले असता त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना महान म्हणत जोरदार हल्ला चढवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या आधी खूप राजकारण झालं अजूनही सुरू आहे. काही लोकांनी तर महाराजांच्या तिथीवरूनही राजकारण केलं. एवढंच काय काही लोकांनी तर आम्ही छत्रपतींच्या कुटुंबातीलच नसल्याची टीकाही केली. आज या लोकांना शिवाजी महाराजांचा कळवळा आला आहे, अशी खोचक टीका करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदरच आहे. पण शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांपेक्षा बाळासाहेबांचा फोटो मोठा आहे. त्यामुळे बाळासाहेब मोठे होते की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांनी सांगावं. मग यावर कुणीच आजपर्यंत का आक्षेप घेतला नाही? यावर का कुणी विचारणा केली नाही. मी लॉजिकली बोलतोय, असं सांगतानाच जर बाळासाहेब मोठे असतील तर शिवसेनेच्या नावातील शिव हा शब्द काढून ठाकरे सेना करावं, असा घणाघातील हल्लाही त्यांनी चढवला.

तसं काही घडलंच नाही; अन्यथा सभागृहातच राजीनामा दिला असता; उदयनराजे कडाडले

संजय राऊत महान आहेत. त्यांनी महाराजांवर बोलावं. वा रे वा... काही लोकांना प्रसिद्धीचा सोस असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही याचे ज्यांनी दाखले मागितले त्यांनी असं बोलणं हास्यास्पद आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतरांनीही आमच्यावर टीका केली तेव्हाही आम्ही शांत बसलो होतो. मात्र, जेव्हा त्यांनी आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातीलच नाही असं म्हटलं त्यावेळी त्यांनी मला खूप डिवचलं. त्यामुळे मला पत्रकार परिषद घेणं भाग पडलं, असंही ते म्हणाले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडलं नाही, त्याचा बाऊ करू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.

sharad pawar : 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्र पाठवणार; भाजयुमोचा 'या' नेत्याविरुद्ध 'लेटरबॉम्ब'

छत्रपती शिवरायांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान; भाजपचं तोंड बंद का?: शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Tuzhat Jeev Rangala कोल्हापूर लॉक, चित्रीकरण ऑन; 'या' मालिकेत जीव रंगला!

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात अचानक करोना संसर्ग वाढला. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सारे कोल्हापूर लॉक झाले आहे. पण यामुळे नुकतेच चित्रीकरण सुरू झालेल्या मालिकांच्या निर्मात्यावर मोठे संकट आले. मालिकांचे नवे भाग दाखवायचे असतील तर चित्रीकरण करणे अत्यावश्यक होते. अशावेळी कोल्हापूर चित्रनगरी त्यांच्या मदतीला धावली. सोशल डिस्टन्सिंगचे सारे नियम पाळत चित्रनगरीत ‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रीकरण झाले आणि निर्मात्यासह सर्वांनीच सुस्कारा सोडला. ( Tuzhat Jeev Rangala Serial Shooting )

वाचा: व्हॅक्सिन येईपर्यंत करोनावर विजय अशक्य; CM ठाकरेंनी केलं मोठं विधान

मार्च महिन्यात करोना संसर्ग वाढू लागला. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व व्यवहार बंद झाले. त्यामध्ये सिनेमा, मालिका यासह वेबसीरिज, शॉर्टफिल्म ,माहितीपट, जाहिराती या सर्वांचेच चित्रीकरण बंद झाले. यामुळे तीन महिने एकही नवा चित्रपट थीएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. बहुतेक सर्वच वाहिन्यांवर जुन्या मालिका दाखवण्यात येऊ लागल्या. त्याच त्या मालिका पाहून प्रेक्षकही कंटाळले. त्यामुळे मालिकांचे नवे भाग दाखवण्यासाठी चित्रीकरणास परवानगी देण्याचे प्रयत्न सुरू झाले. जून महिन्यात त्याला परवानगी मिळताच अनेक मालिकांच्या चित्रीकरणाचा पुन्हा श्रीगणेशा झाला. यामध्ये कोल्हापूर आघाडीवर राहिले. तुझ्यात जीव रंगला, जीव झाला येडापीसा, राजा राणीची ग जोडी या तीन मालिकांचा यामध्ये समावेश होता. रोज १३ ते १५ तास चित्रीकरण करत अधिकाधिक भाग तयार करण्यावर भर दिल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना नवे भाग पाहण्याची संधी मिळू लागली.

वाचा: साफ खोटं! महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह नाही

चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या कलाकार, तंत्रज्ञांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. सर्व नियम पाळत चित्रीकरण सुरू झाले. पण याच दरम्यान कोल्हापुरात करोना संसर्ग वाढला. कोल्हापूर सुरक्षित आहे म्हणून येथे चित्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या महिन्यात करोना बाधितांचा आकडा तीन हजारावर पोहचल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले. करोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे सर्व व्यवहार पुन्हा ठप्प झाले. चित्रीकरण करण्यासही बंदी आल्याने निर्मात्यांसह सारेच चिंताग्रस्त झाले. अशावेळी कोल्हापूर चित्रनगरी त्यांच्या मदतीला धावली.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व नियम पाळत चित्रनगरीत परवानगी देण्यात आली. त्यानुसार तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले. त्यासाठी चित्रनगरीत राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आली. येथे काम करणाऱ्या ३० लोकांचा इतर कुणाशीही संपर्क येऊ नये याची काळजी घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले सर्व नियम पाळत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे लॉकडाऊन असतानाही तीन दिवस अधिकाधिक चित्रीकरण आवरण्यात आले.

वाचा: आदित्य ठाकरेंच्या पत्राने जादू केली; ४०० वर्षांचा निसर्गाचा ठेवा वाचला!

कोल्हापुरात आता चित्रीकरणासाठी अतिशय चांगली संधी आहे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने चित्रीकरणात अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व नियम पाळून चित्रीकरणाला परवानगी दिली. कोल्हापूरकर अडचणीच्या काळात मदतीला धावून येतात हे आम्ही दाखवून दिले- संजय पाटील, व्यवस्थापक, चित्रनगरी

लॉकडाऊनचे नियम शिथील होताच कोल्हापुरात आणखी दोन नव्या मराठी मालिकांसह दोन हिंदी वेबसीरिजचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्याची सर्व तयारी झाली आहे. चित्रनगरीसह अन्य काही ठिकाणी हे चित्रीकरण करण्यात येणार आहे- आनंद काळे, महालक्ष्मी सिने सर्व्हीस

वाचा: करोनाबाधितांची संख्या वाढतीच; आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Coronavirus In Kolhapur हे वागणं बरं नव्हं! मुंबई, पुणेकरांनी बिघडवलं 'या' जिल्ह्याचं आरोग्य

$
0
0

कोल्हापूर: मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर अशा रेडझोन भागातून चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या तब्बल अडीच लाख लोकांमुळे कोल्हापूरचे आरोग्य धोक्यात आले आहे. या आगमनाला दोन महिन्यात मर्यादा घातल्या गेल्या पण नंतर ‘त्याला काय होतंय’ हा चुकीचा आत्मविश्वास वाढत गेल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा तीन हजारावर पोहचला. जिल्हा प्रवेशाला बंदी घातल्यानंतरही अत्यावश्यक कारण दाखवत येणारा लोंढा थांबत नसल्याने कडक लॉकडाऊन करूनही रोज बाधितांचा आकडा दोनशेचा टप्पा पार करत आहे. रुग्णालयांची क्षमता संपल्यानेआ आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ( Coronavirus In Kolhapur )

वाचा: कोल्हापूर लॉक, चित्रीकरण ऑन; 'या' मालिकांत जीव रंगला!

कोल्हापुरातील काही लाखावर नागरिक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे यासह राज्यातील विविध जिल्ह्यात व परराज्यात राहतात. त्यामध्ये केवळ मुंबईतच अडीच ते तीन लाख लोक आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर व करोना संसर्ग वाढत गेल्यानंतर यातील बहुसंख्य नागरिकांनी कोल्हापूरचा रस्ता धरला. त्याला काही प्रमाणात स्थानिकांनी विरोध केला. पण ते मूळचे कोल्हापूरकरच असल्याने त्यांना रोखणे अशक्य होते. यातून केवळ एप्रिल महिन्यात साधारणत: लाखापेक्षा अधिक लोक कोल्हापुरात आले. यामध्ये शाहूवाडी, आजरा, भुदरगड या तालुक्यातील नागरिक जास्त होते. हे सारे रेडझोन मधून आल्याने त्यांची तपासणी केली. यात पाचशेवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, कुठेही नोंद न करता गुपचूप कोल्हापूर गाठलेल्या अनेकांनी करोना संसर्ग वाढवला. यामुळे हा आकडा आठशे ते हजारावर गेला.

वाचा: व्हॅक्सिन येईपर्यंत करोनावर विजय अशक्य; CM ठाकरेंचे मोठे विधान

कोल्हापुरात येणाऱ्या लोकांवर प्रशासनाने वॉच ठेवण्यास सुरुवात केली. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची माहीम राबवली. १३ मे ते २२ जुलै या दरम्यान जिल्ह्यात एक लाख ३३ हजारावर नागरिक आले. यामध्ये मुंबई आणि पुणे या भागातील तीस हजारावर नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात असल्याने करोना संसर्गावर काही प्रमाणात मर्यादा आल्या. पण या काळात विनाकारण ये जा करणाऱ्यांची संख्या वाढली. कोल्हापुरात बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे, याचा पुरावा देणारी आकडेवारी सर्वत्र पसरली. त्यामुळे कोल्हापूर सुरक्षित आहे, त्याला काय होतंय ही भावना वाढली. नेमकं याच भावनेमुळं नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनेकडं दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्याचा फटका बसला. केवळ आठ दिवसात रोज २०० ते ३०० रुग्ण वाढत गेल्याने करोना बाधितांचा आकडा आता तीन हजारावर पोहोचला आहे.

वाचा: करोनाबाधितांची संख्या वाढतीच; आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये दीड हजारावर लोक बरे होऊन घरी परतले असले तरी सध्या १८०० लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयाची क्षमता नाही. यामुळे सध्या प्रशासनाची तारांबळ उडत आहे. लॉकडाऊन अतिशय कडक केल्यानंतरही आकडा कमी होत नसल्याने अडचणींचा डोंगर उभा राहण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्याला काय होतंय या प्रवृत्तीमुळे त्याला रोखणे अशक्य होत आहे. नागरिकांच्या या चुकीच्या आत्मविश्वासामुळे गेल्या काही दिवसांत रोज आकडा वाढत आहे- प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

दोन महिन्यात कोल्हापुरात आलेले परजिल्ह्यातील नागरिक

मुंबई- १२०२०
मुंबई उपनगर- १६२२
ठाणे- १७५९०
पालघर- ५२८३
रायगड- ४३११
पुणे- १४८४६
सोलापूर- ६१७०
इतर भाग- १४४४

वाचा: चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचं; 'या' बैठकीत झाला ठराव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Sangli Lockdown करोनाने केली कोंडी; मास्क नसल्यास 'येथे' ५०० रुपये दंड

$
0
0

सांगली: सांगली जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आता विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास संबंधितांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आंदोलने होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. ( Sangli Lockdown )

सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क, रूमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक आहे. नागरिकांनी लॉकडाऊन बाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून करोना संसर्गाला अटकाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

वाचा: चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचं; 'या' बैठकीत झाला ठराव

दिवसभरात नवे ७० रुग्ण; ५ पोलिसांचा समावेश

सांगली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात करोना संसर्गाचे नवे ७० रुग्ण आढळले. यात सहा पोलिसांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १२८४ एवढी झाली असून, यातील ६८२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत ४२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या ७० रुग्णांपैकी ५७ रुग्ण सांगली आणि मिरजेतील आहेत. ग्रामीण भागातील १३ रुग्ण आहेत. सांगली जिल्हा पोलिस दलातील एका उपनिरीक्षकांसह सहा पोलीस कोरोना बाधित असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखेचे दोन कर्मचारी आणि आटपाडी पोलीस ठाण्यातील तीन कर्मचारी अशा सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. जिल्हा प्रशासनाच्या करोना नियंत्रण कक्षातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

वाचा: हे वागणं बरं नव्हं! मुंबई, पुणेकरांनी बिघडवलं 'या' जिल्ह्याचं आरोग्य

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यात पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाउन सुरू केला आहे. बुधवारी रात्री या लाकडाऊनची सुरुवात झाल्याने सांगली शहरासह जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी ' जनता कर्फ्यू 'ला चांगला प्रतिसाद मिळाला.

वाचा: करोनाबाधितांची संख्या वाढतीच; आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Kolhapur: यापेक्षा वाईट ते काय? उपचारासाठी बेड न मिळाल्याने रुग्णाचा तडफडून मृत्यू

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सीपीआर या सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने गुरुवारी रात्री डॉक्टरांनी रुग्णास दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचाराअभावी गांधीनगर येथील एकाचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा कहर सुरू आहे. करोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल ३२०० च्या पुढे गेला असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रशासनाने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पण उपलब्ध बेडची क्षमता आणि रुग्णांची वाढती संख्या यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.

वाचा: तुम्हाला कोकणी माणसाची कोंडी करायची आहे का?; भाजपचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

काल रात्री गांधीनगर येथील मोहनलाल चावला या रुग्णास त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी नेले होते. केस पेपर काढल्यानंतर ते डॉक्टरांना भेटले, पण बेडच उपलब्ध नसल्याचे कारण सांगून डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. बराच वेळ विनंती करूनही डॉक्टरांचा नकार कायम राहिल्याने शेवटी नातेवाईकांनी त्या रुग्णास घरी नेले. उपचार न झाल्याने पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

वाचा: दाढी मिशा कुणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर रोजगार वाढवा!

खासगी रुग्णालयात सध्या रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे, त्यामुळे बहुतेक जण सरकारी रुग्णालयाकडे धाव घेत असल्यानं तिथं बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळं उपचारावर मर्यादा येत आहेत. सध्या कोल्हापुरात ३२०० हून अधिक करोना बाधित रुग्ण असून आत्तापर्यंत ८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या १८०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सीपीआर, डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटल, घोडावत हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे आता सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वाचा: ३१ जुलैनंतर लॉकडाऊन उठणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कोल्हापूरमध्ये सध्या लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरीही रुग्णांचा आकडा रोज दोनशे पेक्षा अधिक वाढत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Supriya sule: राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या 'या' नेत्यानं घेतली सुप्रिया सुळेंची भेट; चर्चेला उधाण

$
0
0

कोल्हापूरः भाजप नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. सुळे आणि धनंयज महाडिक भेटीनं कोल्हापुर जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुकवर त्यांच्या भेटीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळं या भेटीमागचं कारण नक्की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर धनंजय महाडिक यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. साखर कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जातं आहे. धनंयज महाडिक भाजपच्या राज्यातील साखर कारखाना विभागाचे प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. धनंजय महाडिक यांनी अचानक सुप्रिया सुळींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग आला होता. मात्र, मडाडिक यांनीचं ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी असल्याचं स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

77146900


वाचाः तुम्ही बसलेल्या जागेचा सातबाराही शिवरायांचीच पुण्याई; नायडूंना 'या' नेत्याचा टोला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह धनंजय महाडिक यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील साखर कारखाने व उद्योगांसदर्भात चर्चा करण्यात आली होती.

वाचाः तुम्हाला कोकणी माणसाची कोंडी करायची आहे का?; भाजपचा संताप

महाडिक यांना २०१४ मध्ये राष्ट्रवादीने लोकसभेचे तिकिट दिले होते. या निवडणूकीत त्यांचा विजय झाला. मात्र, २०१९च्या निवडणूकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात त्यांना पराभव स्विकारावा लागला. नंतर लगेचच सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्दैवं! करोनाच्या भीतीनं तरुणाची आत्महत्या, नंतर अहवाल आला निगेटिव्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : करोनानं देशासह राज्यभरात (Coronavirus in maharashtra) धुमाकूळ घातला असून, हजारो नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. करोना संसर्गाचा धसका सगळ्यांनीच घेतला आहे. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. करोना झाल्याच्या भीतीने एका तरुणाने आज, दुपारी कोविड सेंटरमध्येच आत्महत्या केली. मात्र, संध्याकाळी या तरुणाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

करोना संसर्गाचा लोकांनी किती धसका घेतला आहे, हे गडहिंग्लज तालुक्यातील या घटनेने सिद्ध झाले. केवळ पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर आता आपल्याला देखील करोनाचा संसर्ग होणार या भीतीनेच तरुणाने आत्महत्या केली. पण दुपारी आत्महत्या केलेल्या या दुर्देवी तरुणाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तो निगेटिव्ह आला. केवळ भीतीनेच या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली.

कोविड सेंटरमध्ये मुलीवर बलात्कार, पीडिता आणि आरोपीही करोना पॉझिटिव्ह

Aurangabad : चोर समजून तरुणाला जमावानं जीव जाईपर्यंत मारलं


गडहिंग्लज (gadhinglaj) तालुक्यातील लिंगनूर कसबा नूर या गावातील ही घटना आहे. या गावातील सुधीर दत्तात्रय येसरे हा ३२ वर्षाचा तरूण शेती करतो. चार दिवसांपूर्वी गावात एक जण करोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना प्रशासनाने गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर कोविड सेंटर येथे नेले. तेथे सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल येईपर्यंत सर्वांना तेथेच ठेवण्यात येणार होते. त्यानुसार येसरे याला देखील तेथे ठेवण्यात आले. अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने तो अस्वस्थ होता. आपला अहवाल काय येणार याची त्याला काळजी लागली होती. अहवाल पॉझिटिव्ह येणार अशी त्याला भीती वाटत होती. यामुळे त्याच्या अस्वस्थेत भर पडू लागली. यामुळे घाबरलेल्या येसरेने कोव्हिड सेंटरमधील बाथरूममध्ये आत्महत्या केली.

लॉकडाउनमधील भयाण वास्तव; आर्थिक तंगीमुळं पित्यानं ४ महिन्याच्या मुलीला विकलं

लॉकडाउनमुळं बिझनेस ठप्प; गुजरातमध्ये २४ तासांत ३ व्यापाऱ्यांच्या आत्महत्या


दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी दुपारी सर्वांचा अहवाल आला. ज्यांचा ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी वाहन मागवण्यात आले. त्यानुसार या सेंटरवर वाहन आले. येसरे याचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला घरी पाठवण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. तो बराच वेळ सापडेना. शेवटी बाथरूममध्ये त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अहवालाची वाट न पाहताच त्याने आपली जीवनयात्रा संपवली होती. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ते पाहण्यासाठी तो मात्र राहिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या, डोळ्यांत चटणी टाकून तलवारीने केले १६ वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: भर चौकात तरुणाला अडवले. गाडी थांबवताच त्याच्या डोळ्यात हल्लोखारांनी चटणी फेकली. काय झालं कळायच्या आतच दोघांनी त्याच्यावर तलवार आणि चाकूने सपासप वार केले. तलवार आणि चाकूने १६ वार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याच्या किंकाळ्या ऐकून लोक चौकात धावले. त्यांना पाहून मारेकऱ्यांनी तेथून पोबारा केला. या हल्ल्यात आकाश विनायक सोनुले उर्फ मॅनर्स या २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वसाहतीतील वर्चस्व वादातून हा खून झाल्याचे समजते. कागल येथील महात्मा फुले वसाहतीमधील महालक्ष्मी चौकात आज, शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

कागल येथील महात्मा फुले वसाहतमध्ये गेल्या काही वर्षांपासून वर्चस्वासाठी दोन गटात वाद धुमसत आहे. यातूनच आकाश सोनुले याच्यावर दुपारी हा हल्ला झाला. दुपारी २ वाजता तो जेवायला घरी निघाला होता. महालक्ष्मी मंदिरासमोर दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. तो चौकात येताच त्यांनी त्याला अडवले. त्याची गाडी थांबताच एकाने त्याच्या डोळ्यात चटणी फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने आकाश घाबरला. डोळे चोळत असतानाच दोघांनी तलवार व चाकूने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. डोळ्यात चटणी टाकल्याने त्याला कोणताही प्रतिकार करता आला नाही. सपासप वार झाल्याने तो गाडीवरून खाली कोसळला. त्याच्या आर्त किंकाळीने शेजारी राहत असलेले अनेकजण मदतीला धावले.

पुणे: बिर्याणीवरून भांडण; डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून

दुर्दैवं! करोनाच्या भीतीनं कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या, नंतर अहवाल आला निगेटिव्ह


अनेक वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. लोक येताच त्या दोघांनी तेथून पोबारा केला. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी रूग्णालयास नेण्यात आले. पण अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक तिरूपती काकडे व प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या प्रकरणी सायंकाळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा बातम्या

रात्रीची वेळ, 'ती' न्यूज अँकर प्रचंड घाबरली; मागं वळून पाहिलं तर...

delhi rape: कोविड सेंटरमध्ये मुलीवर बलात्कार, पीडिता आणि आरोपीही करोना पॉझिटिव्ह

Aurangabad : चोर समजून तरुणाला जमावानं जीव जाईपर्यंत मारलं

लज्जास्पद! ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, हत्येनंतर मृतदेह धरणात फेकला


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>