Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘गोकुळ’ची बैठक शांततेत

$
0
0
मुंबईत फ्लॅट देण्याच्या आमिषाने गोकुळच्या कर्मचाऱ्यांना फसवलेल्या अधिकाऱ्याच्या प्रकरणाबाबत नेत्यांनी शांत राहण्याचा सल्ला दिल्याने गोकुळची संचालक मंडळाची मासिक बैठक शांततेत झाली.

चंदगडमध्ये महिला साहित्य संमेलन

$
0
0
तालुक्यातील महिलांच्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या दिशा सामाजिक संस्थेच्यावतीने २९ सप्टेंबर रोजी महिलांचे साहित्य संमेलन होणार आहे.

हितसंबंध नजोपासल्याने विरोध

$
0
0
संचालकांचे हितसंबध सांभाळता आले नाहीत म्हणून माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. एकमेकाला काढून टाकण्याची भाषा करणारे आज स्वार्थासाठी एकत्र आलेत.

देखाव्यांसाठी रात्रीचा दिवस

$
0
0
स्टेजपासून ते साउंड सिस्टीमपर्यंत आणि संवाद पाठांतरापासून ते तांत्रिक साहित्याच्या जुळवाजुळवीपर्यंत सर्व काही अचूक करून देखावे खुले करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्रीचा दिवस करण्याची लगबग सुरू होती.

..तर कुठे आग्राभेटीचा थरार

$
0
0
कैलास शिखराचा फील देणारी आणि नैसर्गिक धबधब्यांच्या सानिध्यात घेवून जाणारी नाथा गोळे तालमीची महादेव गुहा, शनिवार पेठेतील जयशिवरायचा काळाच्या ओघात हरवत चाललेल्या गलोरी खेळात दंग झालेले गणराय आणि मित्रप्रेमचा शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग हे देखावे आज शुक्रवारी रात्री खुले होणार आहेत.

संस्थानच्या गणपतीचे विसर्जन

$
0
0
भूतपूर्व सांगली संस्थानच्या गणपती विसजर्नाचा सोहळा शुक्रवारी पार पडला. हा शाही दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्लील क्लिप : दोघांना पोलिस कोठडी

$
0
0
गारगोटी-बोरवडे परिसरात सध्या चर्चेत असलेल्या अश्लील ऑडिओ क्लिपप्रकरणी बोरवडे येथील दोघांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. दाभोलकर हत्येचा तपास CBI कडे द्या

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची कसून चौकशी करण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याने त्यापुढे त्यांच्या हत्येचा तपास सी.बी.आयकडे सोपवावा, अशी आग्रही मागणी राधानगरी तालुका जनता दल (से) च्या वतीने करण्यात आली.

देशी बनावटीची २ पिस्तुल जप्त

$
0
0
येथील कुख्यात गुंड सलीम मोहंमद शेख उर्फ सल्या चेप्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांकडून शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन पिस्तुले जप्त केले आहेत.

कदम, पाटील यांचा खंडपीठाला पाठिंबा

$
0
0
हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी सांगलीत आंदोलन करणाऱ्या वकीलांना वन आणि पुनवर्सन व मदतकार्य मंत्री पतंगराव कदम, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी शुक्रवारी पाठिंबा दिला.

४ वैद्यकीय अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0
वाहन ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वाहनांची बोगस फिरती दाखवून लाखो रुपये लाटणाऱ्या सिद्ध्नेर्ली, कसबा सांगाव, कळे येथील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर यांनी दिले आहेत.

चौकशीला सामोरे जाण्याचे वळंजूंचे आव्हान

$
0
0
स्वच्छ कारभार असणाऱ्यानी हिम्मत असेल तर चौकशीला सामोरे जावे ,असे आव्हान नंदकुमार वळंजू यांनी एका पत्रकाव्दारे दिला आहे. माझी सुध्दा चौकशी व्हावी त्यामध्ये दोषी असेल तर कोणतीही कारवाई करावी आपण त्याला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दागिने चोरणा-या महिलेस अटक

$
0
0
महापालिकेजवळील गजबजलेल्या बाजारगेट परिसरातून लहान मुलीचे अपहरण करुन तिच्या कानातील दागिने चोरणाऱ्या महिलेला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिरज येथून अटक करण्यास लक्ष्मीपुरी पोलिसांना यश आले.

विकृत प्रवृत्तींवर धाक निर्माण करणारी योग्य शिक्षा

$
0
0
देश हादरुन टाकणाऱ्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने फाशी सुनावल्याने तरुणीला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा ‘शुअर शॉट’

$
0
0
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी स्वयंअध्ययनासोबतच सामुदायिक चर्चाही महत्वाची असते. उमेदवारांना प्रत्येक विषयाचे वाचन करणे शक्य होत नाही. चालू घडामोडींबाबत अपडेट राहणेसुध्दा अनेकांना शक्य होत नाही.

डॉ. भवाळकरांना प्रा. प्रियोळकर पुरस्कार जाहीर

$
0
0
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांना मुंबई विद्यापीठाकडून मराठीतील ज्येष्ठ नामवंत संशोधकांना दिला जाणारा प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

पालिकेला मिळेना गाळ्यांचा कब्जा

$
0
0
नगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे ७५० दुकानगाळे भाडे तत्वावर देण्यात आले आहेत. या दुकानगाळ्यांची मुदत संपून काही वर्षे लोटली तरी गाळेधारकांनी त्याचा कब्जा नगरपालिकेला दिला नाही.

कोल्हापूर-मुंबई सायकल प्रवास

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे,या मागणीसाठी कोल्हापूर येथील बार असोशिएनच सदस्य अॅड. प्रसाद जाधव व अॅड. ए. एल. मिरजे यांनी कोल्हापूर ते मुंबई सायकलवरून प्रवास करीत जनजागृती आंदोलन सुरू केले आहे.

निबंधकांचा अहवाल एकतर्फी

$
0
0
बाजार समितीच्या चौकशीसाठी नेमलेल्या शहर निबंधक रंजन लाखे यांचा अहवाल एकतर्फी असून समितीतील नुकसानीस नंदकुमार वळंजू कारणीभूत असल्याचा आरोप कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व संचालकांनी पत्रकार परिषदेत केला.

सीरियल किलर लहरिया मानसिकदृष्ट्या फिट

$
0
0
कोल्हापुरातील सीरियल किलर म्हणून पकडण्यात आलेल्या दिलीपसिंह कुवरसिंह लहरिया हा न्यायालयात हजर राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाने ठरवले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images