Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अजितराव घोरपडेंना भाजपमध्ये थारा नाहीखासदार संजय पाटील यांची माहिती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

भाजपमध्ये सोयीच्या राजकारणाला थारा नाही. माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपशी प्रामाणिक नाहीत. त्यांनी नेहमीच राष्ट्रवादीच्या भल्याचेच राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवार, ३१ डिसेंबर रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याची माहिती खासदार पाटील यांनी बुधवारी दिली.

पाटील म्हणाले, ‘कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील शेतकरी मेळाव्यास भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. घोरपडेंचा या मेळाव्याशी संबंध नाही. नगरपालिका आणि त्या आगोदरच्या निवडणुकांमध्ये घोरपडे यांनी कोणासाठी काम केले आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची त्यांची भूमिका आता लपून राहिलेली नाही. आतापर्यंत त्यांनी सोयीचेच राजकारण केले आहे. भाजपशी ते प्रामाणिक राहिलेले नाहीत. ते भाजपमध्ये आहेत की, अन्य कोणत्या पक्षात आहेत. याचीही दखल घेण्याचाही विचार आमच्या डोक्यात नाही. त्यांनी काय करायचे, कुठे रहायचे हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे आम्ही कोणत्याही कार्यक्रमास त्यांना निमंत्रित करणार नाही.’

जयंत पाटलांबाबत नो-कमेंट

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरबद्दल छेडले असता खासदार म्हणाले, मला त्याबाबत माहिती नाही. जयंत पाटील यांना त्यांनी ऑफर दिली की, राजकीय टिप्पणी केली, हे तपासून पहावे लागेल. जयंत पाटलांसारख्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने कोणते परिणाम होतील, या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेश करण्याचे नियोजन नाही.

टेंभूच्या पाचव्या टप्प्याचे भूमिपूजन

टेंभू उपसा योजनेच्या पाचव्या भूड येथील टप्प्याचेही भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कामासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी केला आहे. उगीच दुसऱ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मी करणार नाही. काही योजनांबाबत त्यांनीही पाठपुरावा केला आहे. ही वस्तूस्थिती आहे, असेही खासदार पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदीचा निर्णय विचारपूर्वकअर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांचे मत

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, मिरज

‘नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. हा निर्णय गोरगरीब जनतेच्या व देशाच्या हितासाठीच आहे, हे भविष्यात नक्कीच दिसून येईल,’ असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रवक्ते व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी मिरज येथे बोलताना केले.

मिरज शहर भारतीय जनता पक्षाने आयोजित नोटबंदी व भारतीय अर्थव्यवस्था, या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे, नगरसेविका वैशाली कोरे आदी उपस्थित होते.

‘मोदींनी आठ नोव्हेंबर रोजी काळ्या पैशाविरोधात अत्यंत धाडसी आणि कठोर निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण देशात त्याबाबत वेगवेगळी विचारधारा व्यक्त होत आहे. बहुतांशी भारतीय जनतेने मोदींच्या या निर्णयाला सहमती देऊन पन्नास दिवस त्रास सहन करण्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. तरीही काही मूठभर विरोधक व पन्नास वर्षे भ्रष्टाचार करून गब्बर झालेले राजकारणी आणि त्यांच्या साथीने काळेधंदे करणारे लोक मोदींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे जनतेवर बिंबविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहेत. अनेक अफवा पसरवून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र, जनता या निर्णयाच्या बाजूने उभी असल्याचे आजही दिसून येत आहे. नियोजनातील काही त्रुटींमुळे बँकेमध्ये सर्वसामान्य जनतेला रक्कम काढताना बंधने सहन करावी लागत आहेत. बँकेतील व्यवहारांबाबत दररोज बदलत असलेले निर्णय जनतेच्या मनात चलबिचल करीत आहेत,’ असेही कारंजीकर म्हणाले.

बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णयही धाडसी

१९६९साली जगात दोन मोठ्या घटना घडल्या. त्यापैकी एक घटना अमेरिकेत तर दुसरी भारतात घडली. अमेरिकेत त्यावेळी निक्सन प्रशासन होते. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने अंमली पदार्थ खरेदी-विक्री, शस्त्रे, मानवी देह व्यापार गुलामांची विक्री अशा अवैध व्यवसायात मोठ्या रकमेच्या नोटांमुळे वाढ झाली असल्याचा अहवाल दिल्याने निक्सन यांनी १०० डॉलर्सची नोट रद्द केली. ती आजतागायत बंद आहे. त्याचवेळी भारतात सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना बँक आपल्या दारात उभे करून घेत नसल्याचे आढळून आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर तब्बल ४७ वर्षांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचाधाडसी निर्णय घेतला. भारतात ७० टक्के लोकांचे बँकेत खातेच नसल्याने रोखीच्या पैशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. एका चौकटीच्या बाहेर हे लोक कधीच आले नाहीत. जवळजवळ ७० वर्षे हे असेच चालू होते. रोख पैशांचा मागोवा घेता येत नाही. भारतीयांकडून ७१ प्रकारांनी कर वसुली केली जाते, असेही कारंजीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येकाला मिळणार उपचारआरोग्य मंत्री दीपक सावंत यांची माहिती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

‘या पूर्वीचे राज्यकर्ते आरोग्य आपल्या दारी, असे फक्त म्हणत होते. आम्ही फक्त ते सिद्ध करून दाखवले आहे. खरोखरच आरोग्य आपल्या दारी आणले आहे. राज्यातील नामांकीत डॉक्टर आपल्या दारी आले आहेत. यापुढे राज्यातील एकही पेशंट उपचारा अभावी मरणार नाही याची काळजी सरकार घेईल,’ असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. शिबिरासाठी अकरा हजार जणांनी नोंदणी केली होती. सुमारे साडेपाच हजार पेशंटवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आरोग्य विभाग आणि येथील प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, संजय पाटील, डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते. प्रकाश हॉस्पिटलचा परिसर उपचारासाठी आलेल्या पेशंटनी फुलून गेला होता.

डॉ. दीपक सावंत म्हणाले, ‘ अगोदरचे राज्यकर्ते तुटपुंजी मदत करून आरोग्य आपल्या दारी, असा बडेजाव मारायचे. मात्र, आम्ही हा पॅटर्न बदलला. शिबिरात निदान झालेल्या पेशंटना कितीही खर्च आला तरी त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. राज्यातील सहा कोटी जनता सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते. सरकारी रुग्णालयामार्फत १४६ औषधे मोफत दिली जाता. आता जेनेरीक औषधे द्यायला सुरुवात केली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व जनता या योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. यापुढे किडनी प्रत्यारोपना सारख्या खर्चिक ऑपरेशनलाही निधी उपलब्ध करून दिला जाईल.’


सरकार तुमच्या पाठिशी

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, ‘उपचाराला पैसे नाहीत म्हणून यापुढे एकही पेशंट दगावता कामा नये. एकही रुपया खर्च न करता इलाज करण्याची जबाबदारी सरकारने उचलली आहे. सर्व सामान्य आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. तुम्ही काळजी करू, नका सरकार तुमच्या पाठिशी आहे. आम्ही हे काम सामाजिक बांधिलकी म्हणून करीत आहोत. सध्या वेगवेगळे आजार येत आहेत. पूर्वी पन्नाशीनंतर महिलांना स्तनाचा कर्करोग व्हायचा आता तो तिशीतील महिलांनाही होत आहे. यासाठी राज्यातील सर्व महिलांची तपासणी करून उपचाराची व्यवस्था सरकारने केली आहे. राज्यातील सर्व मुकबधीर मुल आता सरकारने दत्तक घेतली आहेत. एका मुलाच्या उपचारासाठी अंदाजे नऊ लाख रुपये खर्च येतो.

या वेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक यांची भाषणे झाली. प्रकाष हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. राम हंकारे यांनी आभार मानले.


हॉस्पिटलसाठी निधी मिळणार

इस्लामपूरच्या उपजिल्हा हॉस्पिटलसाठी शंभर बेडचे हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सेंटर मंजूर करावे, अशी मागणी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी टप्प्या टप्प्याने निधी देऊव हे काम पूर्ण करू, अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगावात अल्पवयीनमुलीवर बलात्कार

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

उदगाव (ता.शिरोळ) येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी दोघांजणावर गुन्हा दाखल केला आहे. अमोल प्रकाश मादनाईक (वय २५) व अभिजीत साखळे (दोघेही रा.उदगाव) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित मुलगी उदगाव येथे कुटुंबियांसमवेत भाड्याने राहते. शेजारीच राहणाऱ्या अमोल मादनाईक याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व त्यानंतरही तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले. तसेच हा प्रकार कोणास सांगितल्यास तुला व तुझ्या आईला मारून टाकीन अशी धमकी दिली.

यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमोलने पीडितेस कामानिमित्त घरी बोलवून घेऊन शारीरिक संबंध ठेवले. यावेळी मित्र अभिजीत साखळे हा आला असता अमोलने त्याच्यासोबतही शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडले. अभिजीतनेही यावेळी पीडित मुलीस जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतरही वारंवार अमोलने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशीरा अमोल मादनाईक याला पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहसंचालकांविरोधात याचिका दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भोगावती साखर कारखान्याच्या चौकशीबाबत हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे’ असे भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, व्हाइस चेअरमन अशोकराव पवार, केरबा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ गटावर परिणाम करण्याच्यादृष्टीने तसेच निवडणूक पुढे ढकलण्याच्यादृष्टीने राजकीय दबाव टाकून हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही सत्तारुढ गटाने केला. फक्त तीन नव्हे तर त्यापूर्वीच्या वर्षांतील कारभाराच्या चौकशीची मागणीही करण्यात आली.

कारखान्याच्या २०१० ते २०१३ या वर्षातील लेखापरीक्षणाच्या त्रुटीवरुन हायकोर्टात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीचे प्रकरण सुरू झाले आहे. याबाबत बोलताना माजी अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘सहकारमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. या कालावधीतील दोष दुरुस्तीचा अहवाल पुर्ण केला आहे. साखर सहसंचालकांनीही त्याला क्लीन चीट दिली आहे. सहकार मंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाप्रमाणे साखर सहसंचालकांनी यापूर्वी विशेष लेखापरीक्षक बी. के. तेलंग यांची नियुक्ती केली होती. पण त्यावर हायकोर्टात जाऊन स्थगिती मिळवली. त्याच्या सुनावणीची तारीख ५ जानेवारी रोजी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना साखर सहसंचालक रावळ यांनी चौकशीचे स्मरणपत्र दिले आहे. याबाबत रावळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केल्यानंतर त्यांनी असा कोणता चौकशीचा आदेश काढला नसल्याचे सांगितले. स्थगिती असताना चौकशीचे स्मरणपत्र देण्याने कोर्ट आदेशाचा अवमान झाला असून त्याबाबत अवमान याचिका दाखल करणार आहे.’

केरबा पाटील म्हणाले, ‘पुढील आठवड्यात मतदार यादी अंतिम होऊन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत सत्तारुढ गटावर परिणाम करण्याच्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. निवडणूक पुढे ढकलण्याचाही प्रयत्न दिसून येतो. राजकीय दबाव टाकून स्मरणपत्राचे प्रकार केले जात आहेत. २०१० पासूनच्याच कारभाराची चौकशी नव्हे तर त्यापूर्वीच्या कारभाराचीही चौकशी करण्यात यावी.’

यावेळी सत्तारुढ गटाचे माजी पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीलाच फटका

$
0
0

Gurubal.Mali
@timesgroup.com

Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : समरजित घाटगे यांच्यासह पक्षात झालेला अनेकांचा प्रवेश, संभाजीराजेंचा खासदार म्हणून झालेला सन्मान, नगरपालिका निवडणुकांत मिळालेले यश आणि सहकारी संस्थांत केलेला चंचूप्रवेश या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात जिल्ह्यात भाजपने भरारी मारली. याउलट दोन्ही काँग्रेस गटबाजीतच अडकल्याने राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष पिछाडीवर राहिले. स्वाभिमानी पक्षाला मंत्रीपदाची लॉटरी लागली तरी सहा आमदार असूनही शिवसेनेला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली. जनसुराज्य पक्षाने राज्यात भाजपबरोबर महाआघाडी आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. २०१६ वर्षात भरारी मारणाऱ्या भाजपला नव्या वर्षात जिल्हा परिषद निवडणुकीत रोखण्याचे आव्हान आता दोन्ही काँग्रेसमोर आहे.

नगरपालिकांत भाजप

यावर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भा​जपने ताकद नसतानाही चांगले यश मिळवले. दोन्ही काँग्रेसमधील गटबाजीचा पुरेपूर फायदा घेत भाजपने अनेक पालिकांवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफांना टार्गेट केले होते. कागलमध्ये सत्ता कायम राखण्यात मुश्रीफ यशस्वी झाले, पण इतर काही ठिकाणी

राष्ट्रवादीला अपयश आले. काँग्रेसची अवस्था देखील तशीच झाली. शिवसेना व स्वाभिमानी पक्षाला फारसा फायदा झाला नसला तरी जनसुराज्यकडे मात्र दोन पालिका अबाधित राहिल्या. पालिकांत भाजपची ताकद वाढल्याचा पुरावा या निवडणुकीने दिला.

राष्ट्रवादीला ओहोटी

महापालिकेत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीला महापौरपद मिळाले. पण पक्षाच्या अंतर्गत वादामुळे पक्षाला अनेकांनी रामराम केला. खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ असे दोन गट निर्माण झाल्याने काही ठिकाणी पक्षाला फटका बसत आहे. जिल्हा बँक, बाजार समिती पक्षाच्या ताब्यात असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद कमी झाली आहे. पक्षातील वाद मिटवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.

शिवसेना मंत्रिपदाविनाच

सहा आमदार असूनही जिल्हयाला मंत्रीपद न मिळाल्याने सेनेत वर्षभर नाराजी कायम राहिली. भाजप जिल्हयात ताकद वाढवत असताना सेना मात्र स्थिर आहे. राज्यात सत्ता असतानाही त्याचा फायदा जिल्ह्यात घेता येत नसल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी पक्षाला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने राज्यात मंत्रीपद मिळाले. यामुळे पक्षाला ताकद मिळाली असली तरी आंदोलनाची धार मात्र कमी झाली आहे. जनसुराज्य पक्षाने राज्यात भाजप बरोबर आघाडी करत आहे ती ताकद टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री विनय कोरे यांनी महत्वाचा निर्णय घेत भाजपला ताकद देतानाच आपले अस्तित्व टिकवले आहे.

कोल्हापूरला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने प्रथमच ही संधी मिळाली. मुख्यमंत्र्यानंतर मंत्रीमंडळात दोन नंबरचे पद मिळवत दादांच्या रूपाने कोल्हापूरला मिळाल्याने जिल्ह्याचे वजन राज्यात वाढले आहे. महसूल सारखे महत्वाचे खाते मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हद्दवाढीला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचा प्रस्ताव पुढे करत विकासाला चांगली संधी दिली आहे.

लोकसभेतील पराभवानंतर मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या संभाजीराजेंना राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदार करत भाजपने त्यांना सन्मान दिला. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवतानाच पक्षाला चांगला चेहरा मिळाला. याशिवाय शाहू कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांच्यासह पी. जी. शिंदे, प्रकाश चव्हाण,अशोक स्वामी अशा अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढण्यास मदत झाली.

कोल्हापूरला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने प्रथमच ही संधी मिळाली. मुख्यमंत्र्यानंतर मंत्रीमंडळात दोन नंबरचे पद मिळवत दादांच्या रूपाने कोल्हापूरला मिळाल्याने जिल्ह्याचे वजन राज्यात वाढले आहे. महसूल सारखे महत्वाचे खाते मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हद्दवाढीला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचा प्रस्ताव पुढे करत विकासाला चांगली संधी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध बिलाची रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेला तसेच अन्य सहकारी बँकांना आवश्यक प्रमाणात रोकड मिळाली नसल्याने २२७ कोटी रुपये दूध उत्पादकांच्या हातात पडलेले नाहीत. यामुळे ‘गोकुळ’ने अखेर जिल्हा बँकेच्या त्या-त्या परिसरातील शाखांमधून किमान दहा हजार रुपये तरी उत्पादकांना मिळावेत यासाठी नियोजन केले आहे. त्यातून उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीनंतर करन्सी चेस्टकडून जिल्ह्यातील सहकारी बँकांना अतिशय तोकडी रक्कम देण्यात आली. त्यातून त्यांचे दररोज व्यवहारही नीट सुरू नाहीत. यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार जवळपास ठप्प झाले. ऊस बिले व दूध बिले ही ​जिल्हा बँक अथवा सहकारी बँकांच्या माध्यमातून दिली जातात. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील दुधाची बिले ‘गोकुळ’कडून जिल्हा बँक तसेच इतर बँकांमध्ये जमा करण्यात आली आहेत. सर्वच ठिकाणी पैशांची चणचण असल्याने उपलब्ध पैसे येणाऱ्या खातेधारकांना देण्याचे नियोजन केले जात होते. त्यातून दोन हजार रुपयांपासून दहा हजार रुपयापर्यंत पैसे दिले जात होते. प्रत्येक उत्पादकाची दूध बिलाची रक्कम मोठी असते. जिल्हा बँकेमध्ये आतापर्यंत दूध बिलाचे १२० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तर १०७ कोटी रुपये इतर बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत. ४० कोटी रुपये पशूखाद्यासाठी कपात करुन घेतले आहेत.

गोकुळने मध्यंतरी यूथ बँकेच्या माध्यमातून उत्पादकांना रोख रक्कम देण्याचे नियोजन केले होते. पण जिल्हा बँकेच्या माध्यमातून यापूर्वी बहुतांश बिले दिली जात असल्याने याच बँकेचा वापर बिले देण्यासाठी करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार परिसरातील शाखेच्या माध्यमातून तेथील दूध संस्थांशी संलग्न उत्पादकांना दहा हजार रुपये देण्याचे नियोजन केले आहे. यातून काही प्रमाणात तरी उत्पादकांच्या हातात पैसे मिळतील अशी आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महोत्सवांतून घडते प्रेक्षकांची अभिरुची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चांगला प्रेक्षक, सुजाण माणूस घडविण्याची ‌प्रक्रिया महोत्सवांतून होत असते. प्रेक्षक आणि सिनेमाकर्त्यांचा महत्वाचा धागा असून लोकांमध्ये सिनेमाबाबत अभिरुची वाढविण्यासाठी महोत्सव आवश्यक असतात असे मत मुक्तसंवादात व्यक्त करण्यात आले.

‘किफ्फ’ महोत्सवांतर्गत ‘महोत्सव का आणि कशासाठी’ या विषयावर हा मुक्तसंवाद झाला. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या सिनेअभिनेते स्वप्नील राजशेखर, प्रा. राजेंद्र मेंगाडे, अंशुमन जोशी आणि प्रिया दंडगे यांनी मुक्तसंवाद साधला.

सिनेअभिनेते स्वप्नील राजशेखर म्हणाले, ‘मनातील अस्वस्थता व्यक्त होण्यासाठी, ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लघुपट महत्वाचा आहे. किफ्फसारख्या महोत्सवांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. सिनेमा किंवा लघुपटांबाबत तसेच जागतिक स्तरावरील सिनेमांबाबत लोकांच्या मनात अभिरुची निर्माण करण्यासाठी असे महोत्सव महत्वपूर्ण ठरतात. ग्रामीण परिसरातही असे महोत्सव पोहोचविण्यासाठी लोकांनीच तसेच कलारसिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे या महोत्सवाला व्यावसायिक स्वरुप येत आहे. यावर अंकुश ठेवण्याचीही गरज निर्माण झाली आहे.’

प्रा. मेंगाडे म्हणाले, ‘गोव्यातील इफ्फी महोत्सवाप्रमाणे एखाद्या सिनेमानंतर त्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. कोणता सिनेमा पहावा याची माहितीही तरुण पिढीला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कॉलेजांच्या स्तरावरच असे महोत्सव होणे गरजेचे आहेत. लघुपटाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.’

अंशुमन जोशी म्हणाले, ‘कोल्हापूरचा कलारसिक कोणताही हेतू न ठेवता केवळ आवडीसाठी सिनेमा पाहतो. सिनेमा पाहण्यासाठी तेवढी इच्छाशक्ती लागते. महोत्सवामुळे लघुपट करणाऱ्यांना व्यासपीठ मिळते. जगाच्या तुलनेत भारतीय सिनेमा कुठे आहे हेही कळते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक, आघाड्यांमध्ये अस्वस्थता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयामुळे महापालिकेतील २० नगरसेवकांची घाबरगुंडी उडाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-ताराराणी या चारही आघाड्यांमध्ये अस्वस्थता आहे. बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नगरसेवकांची बैठक झाली. आता याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात आहेत.

राज्य निवडणूक आयोग्याच्या निर्देषानंतर याप्रकरणी काय भूमिका घ्यायची, कायदेशीर लढा कसा द्यायचा यासंदर्भात दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नगरसेवकांची महापालिकेत बैठक झाली. माजी महापौर आर. के. पोवार, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेते प्रा. जयंत पाटील, नगरसेवक सुभाष बुचडे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, आदिल फरास यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी नगरसेवक सचिन पाटील, सागर यवलूजे, दिग्विजय मगदूम, सलीम मुल्ला उपस्थित होते. भाजपचे नगरसेवक विजय खाडे हे चर्चेत सहभागी होते.

नगरसेवकांनी मुदतीत कागदपत्रे सादर केली होती. मात्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून वेळेत प्रमाणपत्र मिळाले नाही. नगरसेवकांचा दोष नसताना त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी चर्चा बैठकीत झाली. याप्रश्नी पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे ठरले. हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात दाद मागू असे प्रा. पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे गटनेते विजय सुर्यवंशी यांनी ही याप्रश्नी भाजप, ताराराणी आघाडी नगरसेवकांसोबत राहिल. सत्ताधारी व विरोधी आघाडीची याबाबत संयुक्त बैठक होणार आहे. याची माहिती पालकमंत्री पाटील यांना दिल्याचे सांगितले.

समितीकडून झाला उशीर

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक दोन नोव्हेंबर २०१५ रोजी झाली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागावरून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्यांच्या कालावधीत (१ मे २०१६) जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र वीस नगरसेवकांना मुदतीत प्रमाणपत्र सादर करता आले नाही. त्यांच्या प्रमाणापत्राबाबत विभागीय पडताळणी समितीसमोर सुनावण्या सुरु होत्या. या नगरसेवकांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रमाणपत्र सादर केले.

निवडणूक आयोगाचे निर्देश

दरम्यान हायकोर्टातील न्यायमूर्ती अभय ओक, एम. एस. सनक, व ए. एस. गडकरी यांच्या पीठाने नऊ डिसेंबररोजी एका याचिकेच्या सुनावणीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यास पद आपोआप रद्द होते असा निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानेही या संदर्भात महापालिका व राज्य सरकारला कळविले आहे.


मुदतीत प्रमाणपत्र
सादर न केलेले सदस्य

भाजप-ताराराणी आघाडी : संतोष गायकवाड, विजय खाडे, मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, निलेश देसाई, किरण शिराळे, कमलाकर भोपळे, सविता घोरपडे.

काँग्रेस : माजी महापौर अश्विनी रामाणे, वृषाली कदम, नगरसेवक सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, दिपा मगदूम, रिना कांबळे.

राष्ट्रवादी काँग्रेस : महापौर हसीना फरास, नगरसेविका शमा मुल्ला, अफजल पिरजादे, सचिन पाटील.

शिवसेना : नियाज खान.

राज्यात ४५० नगरसेवक

कारवाईच्या कात्रीत

मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने राज्यातील विविध महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांतील ४५० नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्यातील अन्य महापालिका व जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाने पत्र पाठवून माहिती मागविली आहे. सहा महिन्यांपेक्षा जादा कालावधी उलटूनही प्रमाणपत्र सादर केले नसल्याने या सदस्यांच्या पदावर गडांतर आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांच्या नगरसेवकांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांनी रोखली वासरांची वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर नागरिकांनी वासरू आणि रेडकांची चोरटी वाहतूक करणारी ओम्नी व्हॅन पकडली. व्हॅनमधील २२ जनावरांची सुटका करून संतप्त नागरिकांनी कारची मोडतोड केली. याप्रकरणी शब्बीर मैनुद्दीन बेपारी या कारचालकाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दुसरा संशयित मात्र पळून गेला. व्हॅनमध्ये कोंबलेली वासरे आणि रेडकांना पेठवडगाव येथील कत्तलखान्यात पाठवले जात होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. यातील दोन वासरांचा गुदमरून मृत्यू झाला.

बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पांढऱ्या रंगाची कार पोस्टऑफिस चौकातून पुढे कसबा बावड्याच्या दिशेने निघाली होती. वॉटरपार्कजवळ व्हॅन पोहोचल्यानंतर पाय आणि तोंड बांधलेले एक वासरू व्हॅनमधून रस्त्यावर पडले. व्हॅनच्या मागे असलेल्या एका दुचाकीस्वाराने ही बाब चालकाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने भरधाव वेगाने व्हॅन पुढे नेल्याने संशय बळावला.

दरम्यान परिवहन विभागाचे कर्मचारी विजय पाटील हे दुचाकीवरून कसबा बावड्याकडे जात होते. त्यांनी पाठलाग करून व्हॅन थांबवली. व्हॅन चालकाची चौकशी करतानाच शेजारी बसलेला त्याचा साथीदार पळाला. दरम्यान, जमा झालेल्या नागरिकांनी व्हॅनची पाहणी केली असता, व्हॅनमधून रेडकू आणि वासरांची चोरटी वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी व्हॅनमधील २२ जनावरांची सुटका केली. जनावरांनी ओरडू नये यासाठी त्यांचे तोंड आणि पाय दोरीने घट्ट बांधले होते. प्रमाणापेक्षा जास्त जनावरे अक्षरशः कोंबून भरल्याने यातील दोन वासरांचा मृत्यू झाला होता. संतप्त नगरिकांनी व्हॅनची तोडफोड करून राग व्यक्त केला.

याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले घटनास्थळी दाखल झाले. व्हॅनचालक शब्बीर बेपारी याला ताब्यात घेतले. व्हॅनसह जनावरे शाहूपुरी पलिस ठाण्याच्या परिसरात आणली. रात्री उशिरापर्यंत जनावरांची आरोग्य तपासणी सुरू होती. ही जनावरे कोल्हापुरातून पेठवडगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती संशयित बेपारी याने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकराकडून केडीसीसीची कोणत्याही क्षणी चौकशी?

$
0
0

कोल्हापूर : नोटाबंदीच्या कालावधीत जमा केलेल्या रकमांबाबतच्या तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाचे पथक कोणत्याही क्षणी जिल्हा बँकेत धडकण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागाने सोमवारी सांगली जिल्हा बँकेवर छापा टाकून तपासणी केली होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेची तपासणी होणार असल्याचे समजते. या कारवाईत बँकेतील खातेदार, भरण्यात आलेली रक्कम, कर्जवाटप, ठेवींची माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

१० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत जमा झालेली व ८ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत जमा असलेली अशी तब्बल ३०४ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेत आहे. पन्नास हजार रुपयांपासून पुढील रक्कम ज्या खात्यांवर भरण्यात आली अशी ८२५ खाती नाबार्डने यापूर्वी तपासली आहेत. ​जिल्हा बँकेमध्ये ५० हजार रुपयांच्या आत पैसे भरलेल्या खात्यांची संख्या जास्त आहे. त्यापुढील रक्कम भरल्या गेलेल्या खात्यांवर लक्ष असेल.

नाबार्डबरोबर प्राप्तिकर व ईडी विभागाकडून याबाबत तपासणी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. नियमित भरण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरण्यात आलेल्या खात्यांवर प्राप्तिकर विभागाचे जास्त लक्ष असेल. या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेचे स्त्रोत तपासले जाणार आहेत. संबंधित खातेधारकच तो त्या खात्यावरील व्यवहार करत आहे की कामचलवू खाते आहे याची तपासणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस विरोधी बाकावर

$
0
0

, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेतील सत्तेच्या राजकारणाला सुरुवात होण्यापूर्वीच अनपेक्षित अशी कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रीय काँग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीच्या अशोकराव जांभळे गटाला सत्तेत सहभाग देताना पहिल्यावर्षी बांधकाम आणि पाणी पुरवठा ही दोन मलईदार खाती देण्यात आली असून उपनगराध्यक्षपदाची संधी ताराराणी आघाडीला मिळाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सत्तेपासून दूर ठेवत पुरेसे संख्याबळ नसतानाही नगरपरिषदेची चावी आपल्या हाती राखण्यात आमदार सुरेश हाळवणकर यांना यश आले आहे.

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपद भाजपला मिळाले असले तरी सत्तेची सूत्रे मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-राजर्षि शाहू विकास आघाडीच्या हाती गेली होती. सध्या नगरपरिषदेत काँग्रेस १८, भाजप १६ (१ अपक्ष, १ शिवसेना), ताराराणी आघाडी ११, राजर्षि शाहू विकास आघाडी १० (१ अपक्ष) आणि राष्ट्रवादी ७ अशी सदस्य संख्या आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासकामांचा निधी आणण्यासाठी नगरपरिषदेची सत्ताही भाजपकडे असणे गरजेचे होते. आमदार सुरेश हाळवणकर यांनी सत्तेसाठी कोणत्याही पक्षात फूट फाडण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असे सांगतानाच विकासकामांसाठी जे सोबत येतील त्यांचा उचित सन्मान केला जाईल असे सांगितले होते. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांत भाजपची सत्ता येईल असे खळबळजनक वक्तव्य करुन फोडाफोडीच्या राजकारणावर भर दिला होता. त्यानुसार इचलकरंजीतही भाजपसोबत राजर्षि शाहू विकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न झाला. तसा प्रस्तावही आघाडीचे प्रमुख मदन कारंडे यांना देण्यात आला होता. मात्र कारंडे गटाने स्पष्टपणे नकार दर्शविल्याने अखेरीस राष्ट्रवादीच्या जांभळे गटाला आपलेसे करण्यात भाजपला यश मिळाले.

माजी आमदार अशोकराव जांभळे हे भाजपसोबत चर्चा करीत असल्याने काँग्रेस व शाहू आघाडीची घालमेल वाढली होती. माजी मंत्री प्रकाश आवाडे, मदन कारंडे यांनी जांभळे यांच्याशी संपर्क साधत भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या वृत्ताची खातरजमा करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण जांभळे यांनी आपण एकत्रित असून कधीही फारकत घेणार नसल्याचे सांगितल्याने काँग्रेस व शाहू आघाडी निश्चिंत झाली होती. मात्र मंगळवार व बुधवार या दोन दिवसात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक साधली आहे. नगरपरिषदेच्या राजकारणात जांभळे गटाला सन्मान देत भाजपने दोन महत्वाच्या समित्या त्यांना बहाल केल्या आहेत. या घडामोडी दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ताराराणी आघाडीला स्विकृत सदस्यापासून वंचित रहावे लागले. माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके यांना दिली जाणारी संधी जांभळे गटाच्या रविंद्र माने यांना मिळाली आहे. ताराराणी आघाडीला उपनगराध्यक्ष व एका समिती दिली जाणार आहे. तर आघाडीपासून जांभळे गटाने फारकत घेतल्याने काँग्रेसमया हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे.

दरम्यान, राजर्षि शाहू विकास आघाडीच्या सदस्यांनी मदन कारंडे यांची भेट घेऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपशी मिळतेजुळते घेण्याचा सूर आळवण्यास सुरुवात केली होती. मात्र कारंडे यांनी काँग्रेसमया सोबत राहण्याचा निर्णय घेऊन चर्चेला पूर्णविराम दिला.

...

चौकट

वादच कारणीभूत

सत्तेची सूत्रे हाती येऊनही काँग्रेस आघाडीत फुट पडण्यास जांभळे-कारंडे गटातील पक्षांतर्गत वाद कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार तथा रविंद्र माने यांच्या आई इंदुमती माने यांचा पराभव करुन कारंडे गटाने माने यांना नगरपरिषदेपासून दूर ठेवण्याची खेळी यशस्वी झाली. पण जांभळे गटाने भाजपशी हातमिळवणी करुन ताराराणी आघाडीकडून स्विकृत सदस्य म्हणून रविंद्र माने यांना पुन्हा सभागृहात आणत कारंडे गटावर कुरघोडी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपेक्षा मोठ्या, पूर्ततेचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा फिल्टर हाऊस प्रभाग हा सर्वाधिक कमी लोकसंख्येचा प्रभाग. यामध्ये संमिश्र लोकवस्ती आहे. एकीकडे बंगले, अपार्टमेंटधारक, मध्यमवर्गीय लोकवस्ती तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी आहे. त्यामुळे प्रत्येक भागात समस्या वेगळ्या आहेत. प्रभागात ठिकठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. त्या विकसित झाल्या तर नागरिकांच्या शाळा, बागा या मागण्यांना मूर्त स्वरूप लाभेल. या प्रभागात काम करण्याची संधी मोठी आहे. योग्य नियोजन, निधीची सांगड घालून काम केल्यास प्रभागात सुविधा सहजरित्या उपलब्ध होऊ शकतील. नागरिकांच्या विकासकामांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यमान नगरसेविका व महिला बाल कल्याण समिती सभापती वृषाली कदम यांच्यासमोर त्या पूर्ततेचे आव्हान आहे.

दुसरीकडे या प्रभागात मैल खड्डा परिसरात महापालिकेच्या मालकीची सुमारे १८ एकर जागा आहे. या जागेवर प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आराखडा तयार आहे. प्रशासनाने, इमारत बांधणीसाठी निधी मिळावा म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे. नव्या इमारतीसाठी पाठपुरावा सुरु असताना या जागेकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निर्माण चौक परिसरातील मैल खड्डा जागेवर अतिक्रमण वाढत आहे. चायनिज सेंटरच्या नावाखाली जागा व्यापली गेली आहे. वाहने पार्क केली जात आहेत. त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. ​अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई होताना दिसत नाही. प्रभागात एकही बाग नाही. महापालिकेच्या मालकीची शाळा नाही. बालाजी पार्क, म्हाडा कॉलनी, ताराराणी कॉलनी, मैल खड्डा परिसरातील मुलांना शाळेसाठी नेहरुनगर व जरगनगर विद्यामंदिर येथे जावे लागते.

गेल्या वर्षी काँग्रेसच्या वृषाली कदम, भाजपच्या शीतल रामुगडे, राष्ट्रवादीच्या अलका कांबळे आणि शिवसेनेच्या वैशाली कांबळे अशी चौरंगी निवडणूक रंगली. यामध्ये काँग्रेसच्या कदम या विजयी झाल्या होत्या. प्रभागात बालाजी पार्क, नंदनवन कॉलनी, शिंदे अंगण, सासने कॉलनी, सासनेनगर, निर्माण चौक, झोपडपट्टी परिसर, शाहू वसाहत, शाहू कॉलनी, महालक्ष्मी पार्क परिसराचा समावेश आहे.

विद्युत वाहिन्यामुळे धोका

शाहू कॉलनी मंडळ, बालाजी पार्क चौक येथील मुख्य रस्ता उखडला आहे. म्हाडा कॉलनीत गटर्सची दुरवस्था झाली आहे. सांडपाण्याचा निचरा होत नाही. ताराराणी कॉलनी येथे काही ठिकाणी रस्ता व्यवस्थित आहे, काही ठिकाणी रस्ता खराब आहे. महालक्ष्मी पार्क, शाहू कॉलनीकडील ओढ्याकडील बाजूला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात या बाजूकडील घरांना पाण्याचा धोका वाढतो. सापांची भीती असते. सासने कॉलनीत रस्ता उखडला आहे. आमदार, महापालिकेच्या निधीतून भागात काही ठिकाणी रस्त्यांची कामे झाली. प्रभागात सर्वात जास्त म्हाडाची घरे आहेत. तेथेही ड्रेनेजची दयनीय अवस्था आहे. घरे दाटीवाटीची आहेत. घरावरून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांना बांधकाम करता येत नाही. विद्युत वाहिन्या जमीनीखालून टाकण्याची नागरिकांची मागणी आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कालावधीत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. नंतर काहीच झाले नाही. मैलखड्डा येथील झोपडपट्टी परिसरात अनधिकृत झोपड्या अधिक आहेत. ​

सभागृहाभोवती भिंत, बालोद्यानही हवे

सासने कॉलनीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निधीतून व्यायामशाळेसाठी इमारत बांधण्यात आली. सध्या ही इमारत बंदच असते. येथे व्यायामाचे साहित्य नाही. लगत मोकळी जागा आहे. तेथे बालोद्यान साकारू शकते. सध्या लहान मुलांना खेळण्यासाठी तीन खेळणी उपलब्ध आहेत. मात्र मैदानाचे सपाटीकरण, संरक्षक भिंत आवश्यक आहे. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या फंडातून बालाजी पार्क परिसरात हॉल उभारण्यात आला. तेथेही संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा व समारंभासाठी आवश्यक सोयी दिल्यास ते उपयुक्त ठरेल.

शहराची झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रभागात मैलखड्डा येथील जागेवर महापालिकेची प्रशासकीय इमारत होणे गरजेचे आहे. प्रभागातील ओपन स्पेस महापालिकेच्या नावावर झाल्या पाहिजेत. प्रभागात मुलांसाठी उद्यान नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही. पूर नियंत्रण निधीतून शाहू कॉलनीत संरक्षक भिंत बांधणे गरजचे आहे. सासने कॉलनीत सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. नगरसेविका वृषाली कदम यांचे वर्षभरातील कामा समाधानकारक नाही. प्रभागात विकासकामांना मोठी संधी आहे. पण कामे होताना दिसत नाहीत.
- शीतल रामुगडे (प्रतिस्पर्धी उमेदवार, भाजप)


प्रभागात महापालिकेच्या मालकीची शाळा नाही. शाळा सुरु केल्यास मुलांची सोय होईल. शाहू कॉलनी, महालक्ष्मी पार्क परिसरातील ओपन स्पेसवर ज्येष्ठ नागरिकांसाठी​ विरंगुळा केंद्र, बाग साकारू शकते. महापालिका पातळीवर त्यासाठी नियोजन गरजेचे आहे. म्हाडा कॉलनीत पिण्याची पाइपलाइन दोन इंचाची आहे. तीस वर्षापूर्वीची ही पाइपलाइन खराब झाली आहे. पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती आहे. दूषित पाणी त्यात मिसळते. जुनी पाइपलाइन बदलणे अत्यावश्यक आहे.
- दिनकर कांबळे (म्हाडा कॉलनी)

ताराराणी कॉलनी परिसरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी प्लॉट दिले आहेत. १५० हून अधिक जण येथे राहतात. मात्र आजही प्लॉटचे खरेदीपत्र झाले नाही. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नावांनी खरेदीपत्र झाल्यास प्रलंबित प्रश्न सुटू शकतो.
- उर्मिला सुतार (ताराराणी कॉलनी)

कळंबा फिल्टर हाऊस प्रभागात वर्षभरात ४३ लाख रुपयांची कामे मंजूर आहेत. यापैकी काही विकास कामांना सुरुवात झाली आहे. बालाजी पार्काता बाग करण्यात येणार आहे. बालाजी पार्क, गुरु महाराजनगरी, सासने कॉलनी येथे ओपन जीम प्रस्तावित आहे. सासने कॉलनीत अडीच लाख रुपये खर्चून ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण झाले आहे. म्हाडा कॉलनीत अंगणवाडीसाठी हॉल प्रस्तावित आहे. पाडळकर वसाहतीत डांबरीकरण सुरू आहे. राजश्री शाहू हौसिंग सोसायटी येथे गटर, निर्माण चौक ते ताराराणी कॉलनी रस्ता डांबरीकरण, स्वरूप तरुण मंडळ येथे हॉल उभारणी, शाहू कॉलनी येथे नवीन गटर्स अशी ३५ लाख रुपयांच्या कामांना जानेवारी महिन्यात सुरुवात होत आहे.
- वृषाली कदम (सभापती, महिला व बाल कल्याण समिती सभापती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुपट महोत्सवातून ‘अंनिस’तर्फे प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एरवी चित्रपट महोत्सव म्हटले कि शहर असे समीकरण असते. त्यामुळे साखरपासारख्या छोट्याशा गावात लघुपट केवळ दाखविले जात नाहीत, तर संवादही घडतोय. लघुपट चळवळ विस्तारतेय. एका वेगळ्या वर्गातील प्रेक्षकांशी संवाद साधायला मिळतोय’ असे प्रतिपादन अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी केले. साखरपा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते.

‘एकला चलो रे’, ‘सावट’ या स्वतः दिग्दर्शित केलेल्या लघुपटांवर स्वप्नील राजशेखर यांनी प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या सोबत उमर मुल्लाणी (ध्वनी), राहुल कुलकर्णी, कृष्णा भूतकर (सहाय्यक दिग्दर्शक) असा तंत्रचमूही उपस्थित होता. साखरपा (जि. रत्नागिरी) येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित फिल्म फेस्टिवलला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

यावेळी ‘बलात्कार आणि बालविवाह या समाजातील हिणकस प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी केवळ कठोर कायदे आदी अशा वरवरच्या बाबी प्रभावी ठरणार नाहीत. यामागच्या पुरुषसत्ताक समाजाच्या मानसिकतेवरच मुलाघात करायला हवा’ असे प्रतिपादन महोत्सवाचे फिल्म क्युरेटर आणि समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी केले.

महोत्सवात एकूण दहा लघुपट दाखवण्यात आले. ‘एकला चलो रे’ माहितीपटात हटके अंदाजात प्रवाशांना सेवा देणाऱ्या संवेदनशील कंडक्टरचे चित्रण केले आहे. आपले काम प्रामाणिकपणे करून मिळणारे समाधान सर्वोत्तम समाधान असते असा संदेश देणारी हि फिल्म लोकांना आपलीशी वाटली. ‘सावट’मधून पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रीवर असणारे असुरक्षिततेचे सावट अधोरेखित केले आहे. मिथुनचंद्र चौधरी दिग्दर्शित ‘कंपल्सरी हेल्मेट’मधून प्रस्थापित व्यवस्थेत ‘स्त्री’म्हणून होणारी घुसमट, संघर्ष विनोदी ढंगात मांडला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘पिस्तुल्या’ ही फिल्म तळागाळातील समाजाची शिक्षणासाठी होणारी होरपळ प्रतिबिंबित करते.

सीमा रानभरे, बापू शेट्ये, युयुत्सु आर्ते, आबाजी सावंत, गमरे सर, दिया चव्हाण, ऋषिकेश खाडे यांनी संवाद साधला. सामाजिक जाणीवा विस्ताराव्यात हा हेतू या उपक्रमाचा होता आणि मिळालेला प्रतिसाद पाहून समाधान मिळाले असे मत अंनिसचे साखरपा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. अश्विनी वैद्य, दत्तप्रसाद सांगेलकर यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप चव्हाण, गणेश शिंदे, विपुल देशमुख, सूरज मधाळे, रोशन पवार, ओंकार साळुंखे, प्रीतम गोरुले, चेतन नाईक (नारळ मित्र), रोहित देसाई, देवजी कांबळे, योगेश कांबळे, दत्तप्रसाद सांगेलकर, प्राजक्ता मधाळे, रोशनी पवार, अमिषा पवार, रुपाली पवार, प्रतिक्षा पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर प्राधिकरणाचा अहवाल आठ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरसह १८ गावांसाठी प्राधिकरण स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या सूचनांच्या अभ्यास करून आठ दिवसांत राज्य सरकारला अहवाल पाठवला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्राधिकरणाची घोषणा करण्यासाठी राज्य सरकार उत्सुक आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे.

आगॅस्ट २०१६ मध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत १८ गावांचा समावेश करण्याची तयारी राज्य सरकारने केली होती. मात्र सर्व १८ गावांनी हद्दवाढीला विरोध केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ गावांसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. प्राधिकरणासंदर्भात १८ गावे व कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. याबाबत सर्व १८ गावांनी सूचना पाठविल्या आहेत.

सेच काही संस्था, आर्किटेक्ट्स, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांसह कोल्हापूर महानगरपालिकेनेही सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने सूचना देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. पण महानगरपालिकेने एक महिन्याची मुदतवाढ घेतली. नगरसेवकांनी स्वतंत्रपणे आपल्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या सूचनांचा अभ्यास करून जिल्हाधिकारी डॉ. सैनी अहवाल तयार करणार आहेत. ‘आठ दिवसांत सर्व सूचनांचा अभ्यास करून राज्य सरकारला अहवाल पाठवला जाईल’, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकाराला राजकीय हादरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकाराच्या पायावर उभ्या असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्याला भाजप, शिवसेना सरकारने ​या वर्षभरात विविध निर्णयांतून व कामकाजातून हादरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या संचालकांची अपात्रता, कागदोपत्री असलेल्या हजारो संस्थांची नोंदणी रद्द, शेतमाल नियमनमुक्त, स्वीकृत संचालकांची नेमणूक हे कळीचे मुद्दे ठरले. नोटाबंदीच्या निर्णयातून सहकाराची ‘न भूतो’ अशी कोंडी झाली आहे. ग्रामीण जनतेचे कोट्यवधी रुपये बँकांमध्ये अडकल्याने शेतीपासून ते सहकारी संस्था, पतसंस्था, नागरी बँक, जिल्हा बँकेपर्यंतचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सहकाराच्या कोंडीतून ग्रामीण जीवन मात्र रखडले आहे.

भाजप, शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीची सहकारातून निर्माण झालेली ताकद कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यातून बरखास्त झालेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना दहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम जिल्हा बँकेत झाला. या कायद्यानुसार अकरा संचालक अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने व त्याची कारवाई झाल्यास जिल्हा बँकेतील सत्ता अल्पमतात येऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना राजीनामा द्यायला लावले. या अध्यादेशाविरोधात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर वर्षभर सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाली असून आता हायकोर्ट केव्हाही त्याबाबतचा निकाल देऊ शकते. यामुळे जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा बँकेतील संचालकांमध्ये वर्षभर अस्वस्थता होती.

ज्यांनी केवळ निधी मिळवण्यासाठी कागदोपत्री संस्था स्थापन केल्या होत्या, अशा संस्थांमुळे सहकार विभागाची घडी विस्कटली होती. पाच हजारांवर असलेल्या सहकारी संस्थांकडे लक्ष देता येत नव्हते. त्यातून अनेक संस्थांमध्ये गैरकारभार होण्याची संधी होती. त्यामुळे अशा कागदोपत्री संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत तब्बल १५०२ संस्थांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या. अजून २२७५ संस्थांवर लवकरच कारवाई होणार आहे. तसेच २४७ प्राथमिक दूध संस्था, ४८३ पशुपालन, ६ वराह पालन संस्था अशा ७३६ संस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमले. त्यांचीही नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. सरकारच्यावतीने स्वीकृत संचालक नेमण्याची सोय करण्यात आली. यातून निवडणुकीतून पद मिळवणे शक्य नव्हते, अशा ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याची व्यवस्था करण्यात आली.

सरकारच्या पातळीवर सहकारातील काही निर्णय घेतले जात असताना ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळ देणाऱ्या ‘गोकुळ’सारख्या दूध संघासमोर परराज्यातील दूध संघांचे आव्हान उभे ठाकले आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संघांमध्ये गोकुळ सध्या राज्यात अग्रक्रमावर आहे. अशा परिस्थितीत परराज्यांतील दूध संघ जिल्ह्यात दूध संकलन सुरू करण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादकांना जादा दर मिळेल ही आशा असली तरी त्यांचे कामकाज सुरू झाल्यानंतर बरे-वाईट परिणाम दिसू लागतील.

डिपार्टमेंटल स्टोअर्ससारखी सुविधा कोल्हापूरवासीयांना देणाऱ्या जनता बझारमधील कारभारात सातत्याने निर्माण झालेल्या त्रुटींमुळे अखेर या सहकारी संस्थेवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय या वर्षात घेण्यात आला. संचालक मंडळाला लेखापरीक्षणातून कारभार सुधारण्याच्या वारंवार सूचना देऊनही फरक न पडल्याने सहकार विभागाने प्रशासक नेमला. प्रशासकांनी सुरू केलेल्या चौकशीतून अनेक चुकीच्या बाबी समोर आल्या आहेत. जनता बझारच्या संचालक मंडळावरील फौजदारी दाखल करण्याबाबतही प्रक्रिया सुरू आहे. या वर्षभरात प्रचंड संवेदनशील असलेल्या बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्यांवर प्रशासक नेमण्यात आले. बलभीम बँकेतील कारभाराची चौकशी सुरू असून, शहरातील मोठ्या असलेल्या महालक्ष्मी व पंचगंगा बँकेची निवडणूक प्रचंड ईर्ष्येने लढली गेली.

शेतमाल नियमनमुक्त

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी बाजार समित्यांच्या आवारातच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावेत असे नियमन होते. भाजप-शिवसेना सरकारने शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्याला कुठेही शेतमाल विक्री करता येणार आहे. यामुळे बाजार समित्यांचे महत्त्व कमी होऊन त्यांचे उत्पन्नही घटणार आहे. सध्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य आघाडीची सत्ता आहे. पणन विभागाने कोल्हापुरात आठवडी बाजाराला सुरुवात केली आहे. शहरात विविध भागांत ११ बाजार सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या दोन शेतकरी संस्थांद्वारे एक आठवडी बाजार चालविला जात आहे. शेतकऱ्यांना विनाकपात पैसे मिळतील व ग्राहकांना ताजा भाजीपाला कमी दरात मिळेल असा या बाजाराचा उद्देश आहे.

नोटाबंदीने सहकाराची कोंडी

नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वांत मोठा फटका सहकार तत्त्वावर चालणाऱ्या ग्रामीण जीवनाला बसला आहे. जिल्हा बँक तसेच सहकारी बँकांना रक्कमच दिली नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. दूध उत्पादकांची २२७ कोटी रुपयांची बिले बँकेत अडकली आहेत. ऊस बिलेही जमा होत असून, बँकांकडे पैसेच नसल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पैसे मिळत नाहीत. दूध संकलनावर भविष्यात परिणाम होण्याची भीती आहे. अनेकांनी दूध संस्थेत दूध कमी देऊन थेट विक्री करून पैसे मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण जीवन ठप्प झाले आहे; पण बँकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन लाखो सभासदांना नुकसान सोसावे लागणार आहे. पतसंस्थांचा कारभार तर ठप्पच असून, बँकांची कर्ज वसुली ठप्प झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्ह्यात २० लाख बँक खाती ‘निराधार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नववर्षात कोल्हापूर जिल्हा कॅशलेस करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत तब्बल २० लाख खाती आधार क्रमांकाशी लिंक नसल्याचे स्पष्ट झाले. नियोजनपूर्वक डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करून या बँक खात्यांचे आधार लिंकिंग करावेत असे आदेश जिल्हाधिकारी सैनी यांनी यावेळी दिले. डिजिटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्याबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी बँकांनी आर्थिक साक्षरता कॅम्प मोठ्या प्रमाणात घ्यावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

बैठकीत जिल्ह्यात विविध बँकांमध्ये ग्राहकांची एकूण ५४ लाख खाती असून त्यापैकी २० लाख बँक खाती अद्यापही आधार क्रमांकाशी लिंक झालेली नाहीत अशी माहिती देण्यात आली. ही खाती बँकांनी आधार कार्डाशी जोडावीत. प्रत्येक बँकेने एक गाव कॅशलेस करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे असे या बैठकीत ठरले. जिल्ह्यातील सर्व सरकारी विभागांनी डिजिटल पेमेंट पद्धतीनेच व्यवहार करावेत, अशी सूचनाही सर्व सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.

‘खातेदाराला रुपे कार्ड, क्रेडिट-डेबिट कार्ड आदींचे वितरण करताना ती कार्डस् अॅक्टीव्हेट करुनच देण्याची दक्षता घ्यावी, कॅशलेस गावासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत, यासाठी प्रशासकीय यंत्रणा बँकांना मदत करेल असे आश्वासनही जिल्हा प्रशासनाने दिले. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक पी. एस. पराटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदु नाईक, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप आदींसह ३७ बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी १ हजार ९८५ कोटी रुपयांचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले. सप्टेंबरअखेर १ हजार २३२ कोटी १६ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. रब्बी हंगाम सुरू झाला असून जिल्ह्याचे पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल, असे बँकांच्या प्रतिनिधींनी बैठकीत स्पष्ट केले. जिल्ह्यात प्राथमिक सेवा क्षेत्रासाठी ६ हजार १३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सप्टेंबरअखेर ३ हजार ७३२ कोटी ६७ लाखांची उद्दिष्टपूर्ती झाली. जिल्ह्यात सप्टेंबरअखेर २० हजार ५५१ कोटींच्या ठेवी असून जून २०१६ अखेर ५९८ कोटींची यात वाढ झाली आहे. तर १७ हजार ५० कोटींचा कर्जपुरवठा केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळगडावरील बेकायदेशीर घर जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पावनगड (ता. पन्हाळा) येथे शिवकालीन तटबंदी पाडून, नगरपरिषद आणि पुरातत्व खात्याची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेला मन्नत व्हिला हे घर प्रशासनाने गुरुवारी पाडले. पन्हाळा नगरपरिषदेच्या रि. स. नंबर ३३० या क्रमांकाच्या पावनगडावरील जागेवर सिकंदर मुजावर यांनी तटबंदी पाडून घर बांधले होते. शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाने पुढाकार घेऊन स्थानिक प्रशासनाला या बांधकामावर कारवाई करण्यास भाग पाडले.

किल्ले पन्हाळाच्या पूर्वेस असलेल्या पावनगडावर काही दिवसांपूर्वी सिकंदर मुजावर यांनी यशवंत बुरूजाकडे जाणाऱ्या मार्गावर बेकायदेशीररित्या घर बांधले होते. घर बांधताना पुरातत्व विभागाच्या नियमांची पायमल्ली केली गेली होती. गडावर बांधकाम करताना तटबंदीपासून १०० मीटरहून अधिक लांब बांधकाम करण्याचा नियम आहे. मात्र, हा नियम मोडून किल्याच्या तटबंदीची मोडतोड करून त्यावरच बांधकाम करण्यात आले. घरातील सांडपाणी तटबंदीच्या खालच्या बाजूस सोडण्यात आले. रात्री उशिरा याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुजावर यांनी तटबंदी पाडून घर बांधल्याचे शिवप्रेमींच्या लक्षात आले. त्यानंतर गुरुवारी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्यावतीने अवैध बांधकाम त्वरीत हटवण्याचे निवेदन पुरातत्व विभाग, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांकडे देवून घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी केली. पन्हाळगडावरील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमीवतीने वारंवार होत होती.

पावनगड परिसरातील या अवैध बांधकाम पाडण्याच्या कारवाईसाठी पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम गोसावी, तहसिलदार राम चौबे, शहर अभियंता बेले, पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे, गडसंवर्धन समितीचे प्रमोद पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, मनजित माने, चेतन सावंत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमेश कदम यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी अटकेत असलेले तत्कालीन अध्यक्ष आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना सोलापुरात दाखल झालेल्या एका प्रकरणात सोलापूर न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून सुमारे ११ लाख ७५ हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार रमेश कदम यांचा कार्यकर्ता असलेला सुनील बचुटे याने काढून घेऊन त्या पैशातून वाहन खरेदी केले होते. या गुन्ह्यामध्ये महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार कदम यांनाही आरोपी करण्यात आले होते. आमदार कदम सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयीन कोठडीत आहेत. सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार कदम यांना मुंबईतून आणण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पथकासह गुरुवारी मुंबई गाठली आणि त्यांना सोलापुरात आणले.

शुक्रवारी सकाळी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आमदार कदम यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कदम यांना जेलरोडच्या लॉकपमध्ये ठेवण्यात आले आणि दुपारी सव्वा दोन वाजता न्यायालयासमोर उभे करण्यात आल्यानंतर त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे आमदार कदम यांचा मुक्काम जेलरोड पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणार आहे. दरम्यान, आमदार कदम यांना सोलापुरात आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार रमेश कदमांनादोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीसोलापूर कोर्टाचा आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूरमधील एका आर्थिक गुन्ह्याच्या आरोपाखाली अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम याना सोलापूर कोर्टाने दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. सोलापूर पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन कारवाई केली.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून सुमारे ११ लाख ७५ हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार रमेश कदम यांचा कार्यकर्ता असलेला सुनील बचुटे याने काढून घेऊन, त्या पैशातून वाहन खरेदी केले. या गुन्ह्यामध्ये महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार कदम यांनाही आरोपी करण्यात आले होते. आमदार कदम सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, न्यायालयीन कोठडीत आहेत. सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार कदम यांना मुंबईतून आणण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पथकासह गुरुवारी मुंबई गाठली आणि त्याना सोलापुरात आणले. शुक्रवारी सकाळी सोलापुरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आमदार कदम यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कदमाना जेलरोडच्या तुरुंगात ठेवण्यात आले. दुपारी सव्वा दोन वाजता कोर्टासमोर उभे करण्यात आल्यानंतर त्यांना दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images