Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मारहाणीचा बदला घेण्यासाठी व्हाट्सअॅपवरून बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दीड वर्षापूर्वी कानशिलात लागवल्याचा राग मनात धरून संशयित प्रितीराज सुरेश पवार (वय २२, रा. १७५, राजोपाध्येनगर) याने भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची सोशल मीडियावर अश्लिल चित्रांद्वांरे बदनामी केली. तशी कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पवारला गुरुवारी अटक केली. त्तपूर्वी बुधवारी प्रविण उर्फ बबलू हिंदूराव साबळे (२३, रा. आदर्श वसाहत, संभाजीनगर) या महाविद्यालयीन तरूणाला अटक केली.

पीडित महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. संबधित महिलेने ज्या क्रमांकावरून सोशल मीडियावर अश्लिल छायाचित्रे व्हायरल झाली होती, तो क्रमांक पोलिसांना दिला होती. पोलिसांनी या सीमकार्डच्या आधारे आधी बबलू साबळेचा नंबर शोधून काढला. त्याला बुधवारी शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयाच्या आवारातून ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केल्यावर बबलूने २५ मार्च रोजी काही काळ मोबाइल प्रतिराज पवारला वापरायला दिल्याचे उघड झाले. पवारने पीडित महिला आणि महेश जाधव यांची अश्लील छायाचित्रे तयार करून सोशल मीडियावर अपलोड केली होती. पोलिसांनी प्रितिराज याला अटक केली. दीड वर्षापूर्वी तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी महेश जाधव यांनी प्रितीराजला कानशिलात लगावली होती. याचा राग त्याच्या मनात होता. गेल्या काही दिवसात महेश जाधव यांच्या बदनामीची माहिती मिळाल्यावर त्याने पीडित महिला व जाधव यांची चित्रे तयार केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ही चित्रे त्याने कुठे तयार केली, पीडित महिलेची छायाचित्रे कोठून उपलब्ध केले? बदनामीसाठी कोणी सुपारी दिली होती का? याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, कोर्टाने दोघांची जामिनावर मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टाइम्स प्रॉपर्टी शो’चे दालन उद्यापासून खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया' च्यावतीने आयोजीत करण्यात आलेले 'टाइम्स प्रॉपर्टी शो' हे प्रदर्शन शनिवारपासून (२ एप्रिल) खुले होत आहे. आठवड्यावर आलेल्या गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत घर घेणाऱ्यांसाठी ही संधी असून शहराच्या विविध भागातील फ्लॅट तसेच पुण्यातील नामवंत गृहप्रकल्पांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये २ ते ४ एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन होत आहे. आनंद ग्रुप हे 'टाइम्स प्रापर्टी शो'चे मुख्य प्रायोजक आहेत.

नवनवीन ​गृहप्रकल्प, त्यातील आधुनिक सुविधांनीयुक्त फ्लॅट हे 'टाइम्स प्रॉपर्टी शो' चे वैशिष्ट आहे. शहराच्या विविध भागातील अगदी सोळा लाखांपासून एक कोटी रुपयापर्यंतचे फ्लॅट तसेच पुण्यातील नामवंत गृहप्रकल्पांची माहितीही या प्रदर्शनात मिळणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्यावतीने २०१३ व २०१५ मध्ये 'टाइम्स प्रापर्टी शो'चे आयोजन केले होते. या प्रदर्शनांना मिळणारा प्रतिसाद पाहून यावर्षी गुढी पाडव्याच्या आधी 'टाइम्स प्रापर्टी २०१६' चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या 'टाइम्स प्रॉपर्टी शो' या प्रदर्शनात नामवंत बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. 'टाइम्स प्रापर्टी शो' हा बांधकाम व्यावसायिकांबरोबरच नवीन घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असते. असंख्य नागरिक या शोची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. यामध्ये नामवंत बांधकाम व्यावसायिक त्यांचे नवनवीन गृहप्रकल्प सादर करत असतात. प्रदर्शनात शहरातील वेगवेगळ्या भागातील गृहप्रकल्प प्रत्यक्षात पाहताही येणार आहेत. आपल्या आवडीनुसार विविध आकारांचे फ्लॅटस, रो हाउसेस, बंगले, पेंट हाउस आणि व्यावसायिक जागांची निवड करणे सोपे होते. त्यामध्ये रंकाळा, मुक्त सैनिक वसाहत, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रुईकर कॉलनी, कदमवाडी, कसबा बावडा, जरगनगर, मोहिते पार्क, कळंबा, आर. के. नगर, सीबीएस, राजोपाध्येनगर या परिसराचा समावेश आहे.

इथे साधा संपर्क...

विविध तयार होत असलेल्या प्रकल्पांबरोबरच काही रेडीपझेशन प्रॉपर्टीही उपलब्ध असल्याने गुढीपाडव्याला गृहप्रवेशाचे स्वप्न ही साकरणार आहे. टाइम्स प्रापर्टी शोच्या अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत औंधकर (९५२७९७२५००) आणि मंदार मिरजकर (९६८९८८६६३०) यांच्याशी संपर्क साधावा.

'डुकाटी'चे खास आकर्षण

बाइकर्समध्ये 'डुकाटी' बाइकची प्रचंड क्रेझ आहे. प्रचंड ताकदीच्या या बाइककडे अनेकांच्या नजरा आपोआपच वळतात. कोल्हापूरकरांची वाहनांची आवड सर्वश्रुत आहे. या आवडीप्रमाणेच 'टाइम्स प्रापर्टी २०१६' शो मध्ये 'डुकाटी' चा खास स्टॉल लावण्यात येणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूरवासियांसाठी 'डुकाटी' खास आकर्षण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र आराखडा लोकप्रतिनिधींच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा व तीर्थविकास प्राधिकरण मंजुरीचा प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अखत्यारित आला आहे. मात्र, अद्याप याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची अधिकृत समितीच स्थापन न झाल्याने या प्रस्तावावर कार्यवाही रेंगाळली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. तीर्थक्षेत्र आराखडा प्रस्तावाच्या सद्यःस्थितीबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित स्पष्टीकरण दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासातील पहिल्या टप्प्यातील आराखड्याला राज्य सरकारकडून मार्चअखेर मंजुरी मिळण्याची ग्वाही दिली आहे. एकूण २५५ कोटींची तरतूद असलेल्या या ​आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासावर ७२ कोटींचा खर्च होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ११६ कोटी आणि तिसऱ्या टप्प्यात ६७ कोटींची विकासकामे मंदिर परिसरात करण्यात येणार आहेत. एकीकडे तीर्थक्षेत्र म्हणून हा परिसर विकसित होत असताना परिसरातील व्यापारी, नागरिक, संस्था यांच्या भूसंपादनामुळे नाराजीचा सूर आहे. नेमका हा आराखडा कसा आहे, त्यामुळे धार्मिक पर्यटनवृद्धी आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधांचा परीघ किती वाढू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे किमान ४० मीटर परिसरातील भूसंपादन होणाऱ्या नागरिक, व्यापारी यांच्या पुनर्वसनाचे पर्याय यादृष्टीने विकास आराखड्याचा प्रस्ताव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा घनसाळचा सुगंध ‘जीआय’मुळे जगभर

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

वेगळी चव आणि सर्वत्र पसरणारा सुगंध यामुळे सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या 'आजरा घनसाळ' तांदळाला 'जीआय' मिळाला आहे. भारत सरकारच्या जिऑग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रीचे प्रमाणपत्र आजरा शेतकरी मंडळाला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील ३० गावांत शुद्ध घनसाळ उत्पादनाचा आणि त्या भातालाच घनसाळ दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय त्यावर केवळ आजरेकरांचाच हक्क राहणार आहे. जीआय मिळण्यासाठी गेले काही वर्षे प्रयत्नशील असलेल्या आजरेकर शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही मोलाची कमाई मानली जात आहे.

आजऱ्याच्या लाल मातीत रूजलेला आणि येथील अंगभूत वैशिष्ट्यांची खासियत असलेला घनसाळ तांदळाचा वाण काही वर्षांपूर्वी अस्तंगत होण्याच्या मार्गावर होता. पण याबाबत जिल्हा कृषी विभागाचे तत्कालीन अधीक्षक उमेश पाटील, मोहन आटोळे, आर. बी. गायकवाड आणि तालुका कृषी विभागाबरोबर शेतकऱ्यांनीही धडपड सुरू केली. यातूनच दाभिलचा घनसाळ प्रकल्प साकारला. काही क्विंटलमध्ये उत्पादित होणाऱ्या घनसाळचे उत्पादन आता टनात होते. सुवासिकतेसह चविष्टपणामुळे सर्वदूर पसरलेल्या घनसाळच्या रंग, रूप आणि चवीसह उत्पादन आणि वितरणावरही आजरेकरांचाच हक्क रहावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.

आजरा शेतकरी मंडळाचे संभाजी सावंत, संताजी सोले आदींनी पुढाकार घेत जीआयसाठी कंबर कसली. कायदेशीर प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी पूर्ण केली. वर्षभरापूर्वी या वाणाची माहिती ऑालाइनवर प्रकाशित करीत हरकती मागविण्यात आल्या. मात्र त्यावर कोणत्याही हरकती आल्या नसल्याने घनसाळचे भू-जैवशास्त्रीय तांत्रिक माहितीचे प्रेझेंटेशन दिल्लीत झाले. या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्याच्या जनुकीय कोशातही घनसाळ समाविष्ट करण्यात आला. याकामी उमेश पाटील, मोहन आटोळे, 'आत्मा'चे धनराज पाटील, नितीन सुकळीकर आणि आजरा तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांचे मोलाचे सहकार्य ठरल्याचे मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात पाणी कपात सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर ः
धरणातील कमी झालेला पाणीसाठा, नदीतील खालावलेली पाणी पातळी यामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शुक्रवारपासून (ता.१) पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनात बदल करून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. सम आणिविषम तारीखनिहाय शहरातील विविध भागांना पाणी पुरवठरा होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी रोज १२० एमएलडी पाणी उपसा केला जातो. पाणी कपातीच्या निर्णयामुळे ४० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. ना​गरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवान महापालिकतर्फे करण्यात आले आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच पाणी कपात करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपेक्षा फोल, रेडीरेकनरमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम व्यवसायातील मंदी, दुष्काळाची परिस्थिती यांच्यामुळे सरकार रेडीरेकनरच्या दरात वाढ करणार नाही अशी व्यक्त केली जात असलेली अपेक्षा गुरुवारी फोल ठरली. जिल्ह्याच्या खुल्या जागा, निवासी तसेच व्यावसायिक वापराच्या इमारती साऱ्यांच्याच रेडीरेकनरमध्ये सरसकट दहा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व एलबीटी या साऱ्यांमध्येच आपोआप वाढ होणार आहे.

दोन वर्षांपासून दरवर्षी जवळपास २० टक्क्यापर्यंत रेडीरेकनरचा दर वाढत होता. यातून सरकारला महसूल मिळत असला तरी घर घेणाऱ्या नागरिकांच्या खिशातून हा महसूल जात होता. तशातच बांधकाम व्यवसायातील मंदी कमी होत नसल्याने या क्षेत्रातील उलाढाल थंडावली होती. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात २२३ कोटीच्या महसुलाचे टार्गेट होते. ते पूर्ण झाले असले तरी व्यवहारात मात्र वाढ झाल्याचे दिसून येत नाही. यामुळे 'क्रिडाई' या संस्थेकडूनही सरकारकडे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ होऊ नये, अशी विनंती केली होती. याबाबत सरकारकडून काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेप्रमाणे नसली तरी सरासरी दहा टक्के वाढ लागू केली. एक एप्रिलपासूनच्या व्यवहारांना ही दरवाढ लागू होणार आहे.

अनेकदा जागांवर कमी व इमारतींवर जास्त प्रमाणात वाढ करण्यात येते. यंदा जिल्ह्यातील रेडीरेकनर मात्र निवासी, व्यावसायिक वापराच्या इमारती तसेच जागांच्याही रेडीरेकनरच्या दरात सरासरी दहा टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे व्यवहाराची रक्कम वाढणार असून त्याप्रमाणात पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का नोंदणी शुल्क व एक टक्का एलबीटी यांच्या रकमही वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांचा खर्च वाढणार आहे.

बांधकाम व्यवसायात नाराजी
===

केंद्र सरकारचे सर्वांना घरे देण्याचे धोरण पाहता यंदाची वाढ अपेक्षित नव्हती. 'क्रिडाई' च्यावतीने दरवाढ करु नये अशी मागणीही केली होती. मात्र दोन वर्षांची तुलना करता फार मोठी नसली तरी वाढ झाल्याने नाराजी आहे.

महेश यादव, क्रिडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इकॉनॉमिक्सच्या गठ्यात संस्कृतचे पेपर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बी. ए. च्या इकॉनॉमिक्स प्रश्नपत्रिकेच्या गठ्यात संस्कृतचे पेपर आल्याने कराड आणि विवेकानंद कॉलेज परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे दोन्ही केंद्रावरील सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी हवालदिल झाले. तीन वाजता होणारा पेपर साडेतीन वाजता घेण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सीनिअर कॉलेजांच्या परीक्षा सुरू आहेत. गुरूवारी दुपारी दोन तीन वाजता नियमित विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्सचा पेपर होता. कराड आणि विवेकानंद कॉलेज या केंद्रावर परीक्षकांनी प्रश्नपत्रिका फोडल्या. त्यावेळी इकॉनॉमिक्सऐवजी संस्कृतच्या प्रश्नपत्रिका असल्याचे निदर्शनास आले. झालेला प्रकार परीक्षकांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविला. परीक्षा विभागाकडून या केंद्रावर परीक्षा इकॉनॉमिक्सच्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. दुपारी तीनऐवजी साडेतीन वाजता या पेपरची सुरूवात झाली. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आली. गुरुवारी संस्कृत विषयाची परीक्षा होती.

याबाबत परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, 'गोपनीय प्रेसकडून संबधित परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. घडलेल्या प्रकाराबाबत संबधितांकडून अहवाल मागविला जाणार आहे. इकॉनॉमिक्सऐवजी संस्कृतच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर गेल्याचे समजते. या प्रकाराची चौकशी केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका तुमच्या मालकीची आहे का ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधी वाटपात स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी पक्षपातीपणा केला आहे. विरोधी भाजप, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या ३० प्रभागांत एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही. सभापतींनी स्वतःच्या प्रभागात ९२ लाख रुपयांची विकासकामे प्रस्तावित केली आहेत. ५१ प्रभागांसाठी निधीची तरतूद करून उर्वरित भागाकडे डोळेझाक केल्यामुळे सभापती एका प्रभागाचेच आहेत की शहराचे असा प्रश्न पडतो. फक्त काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रभागात निधीची तरतूद करायला ही महापालिका काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मालकीची आहे का?' असे खडे बोल विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी सुनावले. बजेटच्या सभेत त्यांनी सत्तारुढ कारभाराचा पंचनामा केला. महापौर अश्विनी रामाणे यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधत जाधव यांनी हा प्रकार कोल्हापूरला आणि सभागृहाला शोभणारा नाही असा टोला लगाविला.

सभापती मुरलीधर जाधव यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चर्चेवेळी विरोधी पक्षनेता जाधव यांनी सभापतींच्या कारभाराचे वाभाडे काढले. 'शहरातील ठराविक भागाला निधी आणि इतर भाग वंचित हा काय प्रकार आहे ? हे बजेट आम्हाला मान्य नाही. सगळ्यांना समान न्याय द्या. शहरातील लोक घरफाळा, पाणीपट्टी, ड्रेनेज कर भरतात. सभापती निधी वाटपात पक्षपातीपणा करणार असतील तर इतर लोकांनी कर कशाला भरायचा? नवे सभागृह अस्तित्वात येऊन चार महिने झाले तरी निधी मिळालेला नाही. निधी वाटपातही विरोधकांवर अन्याय झाला आहे. याप्रकरणी महापौरांनी लक्ष घालून सर्वाना समान निधी द्यावा' असे जाधव म्हणाले.

शिवसेनाही दुखावली

पदाधिकारी निवडीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली. मात्र बजेटमध्ये सेनेच्या नगरसेवकांनाही कात्रजचा घाट दाखवल्याने शिवसेनाही दुखावली. गटनेते नियाज खान यांनी जोरदार टिका करत, 'शिवसेनेला हे बजेट मान्य नाही. सेनेने पदाधिकारी निवडीत काँग्रेस आघाडीला साथ दिली याचे भान पदाधिकाऱ्यांनी ठेवणे अत्यावश्यक होते. सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी वागणुकीने शिवसेना दुखावली असून, आम्ही वेगळ्या पद्धतीने विरोध दाखवून देऊ. महापौरांनी सगळ्या नगरसेवकांना समान निधी द्यावा. अन्यथा आंदोलन करू' असे सुनावले. निधी वाटपातील पक्षपातीपणाबद्दल नियाज खान यांनी सत्ताधाऱ्यांचा धिक्कार केला. सेनेच्या नगरसेविका, स्थायी सदस्य प्रतिज्ञा निल्ले यांचा प्रभाग वगळता खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण यांच्या प्रभागासाठी बजेटमध्ये तरतूद केली नसल्याचा आरोप झाला.

जयंत पाटलांनी लढविला किल्ला

सभापती जाधव यांच्यावर टीकेचा भडीमार झाल्यानंतर आरोपाला त्यांचे राजकीय मार्गदर्शक प्रा. जयंत पाटील यांनी किल्ला लढविला. भाजप, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचे आरोप त्यांनी तपशीलवरपणे खोडून काढले. प्रा. पाटील म्हणाले, 'निधी वाटपात पक्षपातीपणा झाला नाही. संपूर्ण शहरातील रस्ते, गटर्स, ड्रेनेज लाइन, पिण्याच्या पाण्याची सुविधा यासाठी ४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सगळ्या नगरसेवकांना निधीचे मिळेल. बजेट शहराच्या विकासाला चालना देणारे आहे. प्रशासनावर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. वाय-फाय सिटी, अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर झाल्यांतर तत्काळ कामाला सुरूवात करा. इस्लामपूर, कागल शहर वायफाय होत असतील तर कोल्हापूर का होत नाही? प्रशासनाने वर्षभर काय केले? नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीत 'स्थायी'ने वाढ केली. त्याला प्रशासनाने मान्यता द्यावी. सेफ सिटीतील दुसऱ्या टप्प्यातील कामे पोलिस खात्याशी निगडीत आहेत. यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडून निधी आणावा.

जाधव-चव्हाणांत खडाजंगी

विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी जनता बझारच्या थकीत घरफाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी आक्षेप घेतला. 'शहरातील अन्य संस्थांची लाखो रुपयांची थकबाकी असताना फक्त जनता बझारचा विषय प्रत्येक सभेत कशासाठी काढता? जनता बझारमध्ये इतका इंटरेस्ट का?' अशी विचारणा चव्हाण यांनी केली. हा वाद वाढत गेला. महापौर अश्विनी रामाणे यांनी हस्तक्षेप करून 'ही बजेटची सभा आहे. अन्य विषयांवर चर्चा नको' असे सदस्यांना सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करकंब स्फोटप्रकरणीपोलिस निरीक्षक निलंबित

$
0
0

पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवलेल्या गंधक आणि शोभेच्या दारूला आग लागून झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी निलंबित केले आहे.
या प्रकरणाची पाहणी संजय वर्मा आणि पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी केल्यानंतर स्फोटक हाताळण्यात निष्काळजी झाल्याचे निदर्शनास आल्याने निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. ज्या पद्धतीने स्फोटके वेळीच निकामी किंवा नष्ट करणे गरजेचे असताना अनेक महिने पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या ठाण्याच्या आवारातील जवळपास ३० ते ४० बेवारस दुचाकी आगीत भस्मसात झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या पाणीप्रश्नाबाबतसोमवारी मुंबईत बैठक

$
0
0

सोलापूरच्या पाणीप्रश्नाबाबत
सोमवारी मुंबईत बैठक
सोलापूर-सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत सोमवारी (दि. ४) जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.
उजनी धरणातून सोलापूरसाठी कांही दिवसांपूर्वीच औज बंधाऱ्यात भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले होते. परंतु, उन्हाळ्यामध्ये शहरवासियांची पाण्यासाठी तारांबळ उडत आहे. काही दिवस पुरेल इतकेच पाणी औज बंधाऱ्यात असून, शहरवासियांवर जलसंकट येण्यापूर्वीच उजनीतून सोलापूरसाठी पाणी सोडण्याकरिता गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
बैठकीला महापौर प्रा. सुशीला आबुटे, आयुक्त विजयकुमार काळम, उजनीचे अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत ३८ टीएमसी पाणीसाठा

$
0
0


कराड
कोयना धरणात आजअखेर ३८. ६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच कोयनेचे पाणी पिण्यासाठी व

सिंचनासाठी सोडावे, अशी मागणी सातारा, सांगली जिल्ह्यांतून होत आहे. या मागणीला सरकारने हिरवा कंदील

दाखविला तर वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवलेले २९ टीएमसी पाणी कोयना नदीत सोडावे लागणार आहे. त्यामुळे

भविष्यात वीजनिर्मितीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
कोयना वीज प्रकल्पातून वर्षाकाठी सुमोर साडेतीन हजार दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी

प्रतिवर्षी सरासरीने ६७ ते ६८ टीएमसी इतके पाणी वापरले जाते. कोयनेच्या पाण्याचा वीजनिर्मितीबरोबरच सातारा

जिल्ह्यातील पाटण, कराड व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी काठांवरील गावांच्या पिण्यासाठी व लाभक्षेत्रातील

शेतीला सिंचनासाठी वापर होत असतो. उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे वीज निर्मितीबरोबरच पिण्याच्या व

सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढू लागल्याने सरकारीपातळीवर नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. या

बैठकीत वीजनिर्मितीसाठी लागणारे सरासरीचे ६७ ते ६८ टीएमसी इतके पाणी कमी करून ते ५२ ते ५३ टीएमसी

इतकेच वापरावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोयनेच्या पाणी वापराचे प्रशासकीय वर्ष एक जूनला सुरू

होवून ते ३१ मेला संपते. या प्रशासकीय वर्षात आतापर्यंत एकूण ६८ टीएमसीपैकी वीजनिर्मितीसाठी सुमारे ४०

टीएमसी पाणी वापर झालेला आहे. त्यामुळे महाजनकोने नेहमीच्या धोरणानुसार उर्वरित २८ ते २९ टीएमसी पाणी

वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवले होते. मात्र, आता या पाणीसाठ्यातील १३ ते १४ टीएमसी पाण्याला पिण्याची व

सिंचनासाठीची कात्री लागणार असल्याने केवळ १३.५ ते १४13.5 टीएमसी इतकेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरावे

लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेड शिवापूर टोलनाक्यावरपाच रुपयांची दरवाढ

$
0
0

खेड शिवापूर टोलनाक्यावर
पाच रुपयांची दरवाढ
सातारा
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात एक एप्रिलपासून दरवाढ करण्यात आली
आहे. कार, जीप आणि इतर हलक्या वाहनांच्या टोलमध्ये वाढ केलेली नाही. मात्र इतर वाहनांच्या टोलमध्ये
प्रत्येकी पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात
आली.
टोल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कार, जीप, व्हॅन आणि इतर हलक्या वाहनांसाठी पूर्वी ८० रुपये टोल
आकारण्यात येत होता. यामध्ये काहीही वाढ केलेली नाही. मात्र इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या टोलमध्ये प्रत्येकी
पाच रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार व्यापारासाठी वापरण्यात येणारी हलकी वाहने आणि हलक्या बससाठी
आता १३५ रुपये, ट्रक आणि बससाठी २८० रुपये, बांधकामासाठीची वाहने तसेच जमीन खोदण्यासाठी वापरल्या
जाणाऱ्या वाहनांसाठी ४३५ रुपये आणि प्रमाणापेक्षा जास्त आकाराच्या म्हणजेच अवजड वाहनांना ५३० रुपये टोल
आकारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरावे सादर करण्यासाठी महाराष्ट्राने मागितली मुदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी महाराष्ट्राने अधिक साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी मुदत मागून घेतली. कोर्टाने ती मान्य केली. आता पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे.

सुप्रीम कोर्टात न्या. जगदीशसिंग खेहर, न्या. मदन लोकूर, न्या. सी. नागप्पन या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर दोन्ही पक्षांकडून सादर करण्यात आलेल्या दोन-दोन अर्जांवर शुक्रवारी सुनावणी होती. सुनावणीसाठी केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल रजतकुमार, महाराष्ट्रातर्फे अॅड. राजू रामचंद्रन, शिवाजीराव जाधव, अपराजिता सिंग, माधवराव चव्हाण आणि कर्नाटकतर्फे व्ही. व्ही. राव, अॅडव्होकेट जनरल मधुसूदन नायक, उदय होल्ला, शरद जवळी उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्राकडून सीमाप्रश्नी अधिक साक्षी-पुरावे सादर करण्यासाठी कोर्टाकडे मुदत मागणारा आणि सीमाभागात 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी, अशी मागणी करणारे दोन अर्ज सादर करण्यात आले. त्यांना कर्नाटकच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मत नोंदविण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती कर्नाटकने केली.

कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील गावांत महाराष्ट्राने अधिक मराठी शाळा सुरू करू नयेत आणि सीमाप्रश्नावरील साक्षी-पुरावे नोंदविण्यासाठी नेमलेली निवृत्त न्या. मनमोहन सरीन यांची एक सदस्यीय समिती त्रिसदस्यीय करावी, अशी मागणी कर्नाटकने केली. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद झाल्यानंतर पुढील सुनावणी कोर्टाच्या सुटीनंतर जुलै महिन्यात होणार आहे.

समितीची आज पुण्यात बैठक
दरम्यान, 'सीमाप्रश्नाबाबत कर्नाटकने भूमिका बदलली आहे. या प्रश्नाची न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीची शनिवारी (२ एप्रिल) पुण्यात बैठक होत आहे,' अशी माहिती ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, 'येथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये समितीची बैठक होणार आहे. १९५६ पासून हा सीमाप्रश्न प्रलंबित आहे. याप्रकरणी ९० हजार कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. महाजन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्नाटकने काही गावे महाराष्ट्राकडे देण्याची तयारी दर्शविली आहे. याप्रकरणी न्यायालयीन सुनावणी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्टसाठी पाच दिवसाचा कॅम्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी पुढील दोन महिन्यात पाच दिवसांचा पासपोर्ट कॅम्प आयोजित केला जाईल,' अशी माहिती पासपोर्ट व्हिसा अॅन्ड ओव्हरसिज इंडियन अफेअर्सचे कौन्सिलर ज्ञानेश्वर मुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पासपोर्ट ऑफीस कोल्हापुरात सुरू करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस व्हेरिफिकेशनसाठी महाराष्ट्रात खूप कालावधी लागत असून तो कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पुणे पासपोर्ट ऑफीसचे रिजनल ऑफीसर अतुल गोटसुर्वे यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात शुक्रवारी पासपोर्ट कॅम्पच्या उदघाटनानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. मुळे म्हणाले, 'पूर्वी पासपोर्ट दिसावा अशी मानसिकता होती. पण आता पासपोर्ट असावा अशी मानसिकता आहे. पासपोर्ट असणे हे प्रगतीचे लक्षण आहे. देशात महाराष्ट्र अव्वल असला तरी पासपोर्टमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पासपोर्टधारकांची संख्या वाढावी यासाठीच 'पासपोर्ट आपल्या दारी' या योजनेनुसार जिल्ह्याच्या ठिकाणी कॅम्प घेतले जात आहेत. पासपोर्टसाठी देशभरात १०० कार्यालये आहेत. पासपोर्ट कार्यालयाची संख्या वाढवण्यासाठी विदेश मंत्रालय प्रयत्नशील असून ६८० कार्यालयाच्या आयटी कंपन्यांशी संपर्क सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणेतील तीन कोटीची चौकशी ‘इडी’कडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा शिक्षण संकुलातील चोरी प्रकरणातील सव्वातीन कोटी रकमेची चौकशी आता इडी (सक्त वसुली संचनालय) करणार आहे. ही चौकशी करण्याबाबतचे पत्र पोलिस प्रशासनाने पाठवले आहे.

चोरीच्या रकमेतून बुलेट खरेदी करणाऱ्या मिरजेचा पोलिस कर्मचारी इरफान नदाफ व वारणा शिक्षण संस्थेचे सचिव जी.डी. पाटील यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सोमवारी दोघांची चौकशी होणार आहे.

चोरीप्रकरणी सांगलीच्या मोहिद्दीन मुल्लाला अटक केली आहे. चोरी झालेल्या फ्लॅटमधील कपाटात सव्वातीन कोटीची रक्कम मिळाली होती. एकाचवेळी इतकी रक्कम मिळाल्यानंतर आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील फिर्यादी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी एमआयडीसी येथे औषध तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यासाठी जमिन खरेदी करण्यासाठी रक्कम जमा केली होती, असा कबुली जबाब दिला आहे. सव्वातीन कोटी रक्कम चोरी होऊनही फिर्यादिला कळत नसल्याने पोलिसांना ही रक्कम बेहिशोबी असल्याचा संशय निर्माण झाल्या. त्यांनी या रकमेबाबत चौकशी करण्यासाठी इडीला पत्र दिले आहे.

चोरी केलेल्या रकमेतून मुल्लाने दोन बुलेट खरेदी केल्या होत्या. एक बुलेट मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्यातील कर्मचारी इरफान नदाफचा भाऊ साजिदच्या नावावर खरेदी केली होती. तर दुसरी बुलेट मोहिद्दीनने सासू नानीबाई भोरे यांच्या नावे खरेदी केली होती. दर्शन अभय पाठक या बुलेटच्या डिलरला तीन लाख सहा हजार रूपये रोख दिले होते. या पार्श्वभूमीवर इरफानची चौकशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा तापणार एफआरपी

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर: गेल्या काही वर्षांतील आर्थिक संकटानंतर सरकारचा मदतीचा हात आणि साखरेच्या दराने उसळी घेतल्याने साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली आहे. २६०० रुपये प्रतिक्विंटल साखरेचे दर आता ३४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर समाधानकारक असल्याने कारखान्यांना उभारी मिळाली आहे. साखर दरातील तेजीचा फायदा वाढीव एफआरपीच्या रुपाने शेतकऱ्यांनाही मिळावा, असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरला आहे, त्यामुळे एफआरपीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे कारखानदार दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत असताना शेतकरी संघटना केवळ इशारे देत आहेत.

साखर कारखानदारीसमोरील आर्थिक संकटांमुळे सन २०१५-१६ च्या गळीत हंगामात दोन टप्प्यात एफआरपीची रक्कम देण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. हंगामाच्या सुरुवातीस साखरेचे बाजारातील दर २६०० रुपये क्विंटल असे होते, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही फारशी समाधानकारक स्थिती नव्हती. कारखान्यांचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील साखरेची मागणी घटल्यामुळे कारखानदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारनेही साखर कारखानदारांना आर्थिक मदतीचा हात दिल्याने वेळेत हंगामाची सुरुवात झाली. गेल्या तीन महिन्यात बाजारातील साखरेचे दर २६०० रुपयांवरून ३४०० रुपयांवर पोहोचले आहेत, त्यामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दरही वाढल्याने आणि केंद्र सरकारने निर्यातीसाठी अनुदान दिल्याने कारखान्यांना याचा दुहेरी फायदा झाला आहे. यंदा देशाच्या गरजेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन होत असले तरीही साखर निर्यातीच्या निर्णयामुळे दर नियंत्रित राहिले आहेत. सरकारकडून झालेली आर्थिक मदत आणि साखरेची दरवाढ या पोषक स्थितीचा फायदा कारखानदारांना होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरीही यापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

एकरकमी एफआरपीवरून दोन टप्प्यात एफआरपी घेण्याची तडजोड शेतकऱ्यांनी केली. कारखान्यांची स्थिती पाहून शेतकऱ्यांनी एक पाऊल मागे घेतले होते. आता कारखान्यांना फायदा होत असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांनाही मिळावा, असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरला आहे. बहुतांश कारखान्यांनी एफआरपीचा पहिला टप्पा दिलेला आहे, मात्र अजूनही २० टक्के रक्कम बाकी आहे. आता कारखान्यांनी वाढीव एफआरपी देऊन त्यांचा प्रामाणिकपणा दाखवावा, अन्यथा वाढीव एफआरपीसाठी कारखान्यांसह सरकारच्याही विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता. ३) शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यानंतर राज्यात पुन्हा एफआपरपीचा मुद्दा तापणार आहे.

विभागातील वीस कारखाने बंद

कोल्हापूर विभागातील ३८ कारखान्यांपैकी २० कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. अजूनही १८ साखर कारखाने सुरू आहेत. हंगाम संपण्यापूर्वी एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे हंगामाच्या सुरुवातीलाच

ठरले आहे, मात्र अजून एकाही कारखान्याने उर्वरित रक्कम दिलेली नाही. १५ दिवसांत ही रक्कम न मिळाल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर येण्याची चिन्हे आहेत.

हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखानदारांनी साखर दराचे कारण पुढे करून दोन हप्त्यात एफआरपी देण्याचे मान्य केले. काहींनी तर साखरेचा दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपये झाल्यास एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात अजून एकाही कारखान्याने याची अंमलबजावणी केलेली नाही. कारखानदारांनी दिलेला शब्द पाळावा अन्यथा संघर्ष अटळ आहे.

खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासारीच्या शाळेत विविधांगी उपक्रम

$
0
0

प्रकाश कारंडे,कागल

‍गावकऱ्यांचा सहभाग आणि प्रचंड विश्वास या दोनच गोष्टीवर गेल्या १० वर्षांपासून कासारी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत अमूलाग्र बदल घडवून आणले. शाळेने आयएसओ मानांकन मिळविले असले तरी ४२ निकष त्यांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. स्पर्धेच्या युगात मुलांना हवीहवीशी वाटणारी शाळा निर्माण झाली.

केवळ लोकांच्या मदतीतून एक लाखाहून अधिक रक्कम शाळेच्या नावे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कायमस्वरुपी ठेव रुपाने ठेवणारी ही तालुक्यातील पहिली शाळा आहे. त्याबद्दल या शाळेला सन्मानितही केले गेले आहे. सावित्रीबाई दत्तक पालक योजना या रक्कमेच्या व्याजातून चालविली जाते. याद्वारे ३५ गरीब, होतकरू मुली शिक्षणासाठी दत्तक घेतल्या आहेत. त्यांना दरवर्षी १२ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. स्वतंत्र आणि ५२५ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे बालवाचनालय, बोलका व्हरांडा, गावापासून जगापर्यंतचे अद्ययावत नकाशे याद्वारे शाळा सुंदर आणि खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिर केली आहे. गेल्या दहा वर्षांत शाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. शाळेला जगाबरोबर नेण्यासाठी प्रोजेक्टर देऊन इ-लर्निंगची सोय केली. सर्व साहित्यांनीयुक्त विज्ञान प्रयोगशाळा उभारली. ज्ञान हे सर्वांगी असावे यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, ज्ञानरचनावादी अध्ययन- अध्यापन, गड-किल्ले, साखर कारखाने, धरणे, समुद्रकिनारे यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांत जागृतीसह प्रात्यक्षिक ज्ञानाची भर टाकली जाते. आरोग्य मार्गदर्शने, व्याख्याने आणि महिला मेळावेही घेतले जातात. या शाळेत शिष्यवृत्ती ही केवळ परीक्षा राहिली नसून येथील परंपरा झाली आहे. त्यासाठी वर्षभर सकाळी सात ते सायंकाळी सात अशी बारा तासांची कार्यशाळाच होते.

याशिवाय शाळा आणि परिसरात वेगवेगळी झाडे लावली आहेत. परिणामी गावातून इंग्रजी माध्यमाकडील पालकांचा कल कमी होऊन या शाळेकडील ओढा वाढला. येथील बहुतके उपक्रम हे पुरस्कार मिळण्याच्या आधी अनेक वर्षापासून सुरू आहेत. यामुळेच गावचे लोक शाळेला भरभरुन देत आहेत. मात्र त्यातील कोणत्याही उपक्रमात हस्तक्षेप किंवा दबाव नाही. आमचे शिक्षक चांगले काम करतात असाच विश्वास स्थानिकच्या राजकीय व्यक्तींचा असल्याने शिक्षक अधिकच जबाबदारीने काम करत आहेत. आता आयएसओ मानांकनाने त्यांच्या सन्मानात भरच पडली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम बांधवांची विश्वशांतीसाठी प्रार्थना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

उदगाव (ता. शिरोळ) येथील इज्तेमाच्या शेवटच्या दिवशी विश्वशांतीबरोबरच देशाची अखंडता, शांतता, बंधुत्व अबाधित रहावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. पन्नास सामुदायिक विवाह झाले. गुरूवारी रात्री हाफीज मंजूरसाहेब (पुणे) यांचे प्रवचन तसेच दुवा झाली यानंतर सामुहिक प्रार्थनेने दोन दिवसाच्या इज्तेमाची सांगता झाली. कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील मुस्लिम समाजबांधव प्रार्थनेत सहभागी झाले होते.

उदगाव येथे कोल्हापूर सांगली रस्त्यालगत इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी दिलावर मुल्लाणी (कोल्हापूर), मौलाना उस्मान (पुणे), मौलाना साद (औरंगाबाद), मौलाना मुबीन यांनी उपस्थितांना संदेश दिला तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी युसूफभाई एसटी (औरंगाबाद), अफसरभाई (पुणे), मौलाना शोएब (मुंब्रा), मौलाना युनूस (बांद्रा, मुंबई) यांचे प्रवचन झाले.

मानवी जीवावर संस्कार महत्त्वाचे आहेत. आचरण चांगले असेल तर आपण परमेश्वराला प्रसन्न करू शकतो. मात्र दुर्दैवाने माणुसकी संपुष्टात येत आहे. माणसाचे पशुप्रमाणे वर्तन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात होणारी माणसाची हत्या चिंताजनक आहे. परमेश्वराने सर्व सजीवामध्ये मनुष्याला सर्वश्रेष्ठ बनविले. मात्र त्याचा विसर पडला आहे. परमेश्वर निर्माता असून त्याची भीती प्रत्येकाला हवी. त्याची भक्ती, स्मरण केले पाहिजे. शेताप्रमाणे माणसाच्या मनाची मशागत होणे गरजेच आहे. प्रत्येकाने वडिलधाऱ्यांचा आदर करावा. इतरांना मदत करावी. समाजात माणुसकीचे बीज अंकुरावे हा इज्तेमाचा उद्देश आहे. भारतात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहातात. जगात अन्यत्र हे चित्र पहायला मिळत नाही. या एकजुटीस घातक बाबीचे निर्मूलन गरजेचे आहे. असा संदेश मौलाना शोएब, मौलाना युनूस, युसूफभाई एसटी, अफसरभाई यांनी दिला.

इज्तेमामध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक राज्याच्या सीमाभागातून मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उदगाव येथे आले होते.

मोठ्या संख्येने इज्तेमासाठी मुस्लिम बांधवांची हजेरी गृहीत धरून उदगाव परिसरात कुंजवन, गावठाण तळे, स्टेशन रोड यासह ठिकठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

इज्तेमासाठी १२० एकर क्षेत्रात मुख्य मंडप उभारण्यात आला होता. यामध्ये मुस्लिमबांधवांसाठी तालुकानिहाय भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

गुरूवारी रात्री नऊ नंतर सामुदायिक प्रार्थना झाली. यावेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर सांगली महामार्गावरील वाहतूक जयसिंगपूर शहराबाहेरून बायपास रस्त्याने वळविण्यात आली होती.

सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी, उपअधीक्षक रमेश सरवदे, निरीक्षक वसंत बागल, सहायक निरीक्षक संतोष डोके, धनंजय जाधव उपस्थित होते. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच स्वयंसेवक दक्षता घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण तलावात बुडून कागलमध्ये मुलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अकराव वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू झाला. वसुधा सतीश कुंभार (रा. यशवंतनगर, दावणे गल्ली) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दरम्यान जलतरण तलावावर असलेल्या गलथान कारभारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलीची आई अश्विनी यांनी कागल पोलिसांत केली आहे. प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

याबाबत अधिक माहिती अशी, छत्रपती शाहू स्टेडियमनजीक नगरपरिषदेचे जलतरण तलाव आहे. या तलावावर सायंकाळी चार ते पाच ही वेळ महिलांना पोहण्यासाठी राखीव ठेवली आहे. या तलावात वसुधा गुरुवारपासून पोहण्यासाठी जात होती. ती येथील दूधगंगा विद्यालयात चौथीच्या वर्गात शिकत होती. आज दुपारी तीनच्या दरम्यान ती वडील आणि शेजारील एका मुलीसोबत पोहण्यासाठी गेली होती. ती लहान टँकमध्ये पोहण्यास गेली होती, ती पोहत मोठ्या टँकमध्ये गेली असता तिने कमरेला बांधलेला पट्टा निसटला. पाणी खोल असल्याने ती बुडू लागली. तिच्या मै‌त्रीणीने आरडाओरड केली तरीही ‌त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. आतील गोंधळ ऐकून बाहेरील लोकांनी प्रवेशद्वारावर लाथा मारून आत प्रवेश केला. त्यावेळी वसुधा हिची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला मृत घोषित केले. ही घटना समजताच घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तिची आई अश्विनी हिने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.याप्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ-सी डॅकमध्ये सामंजस्य करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ आणि प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) या दोन महत्त्वपूर्ण संस्थांत शुक्रवारी सामंजस्य करार झाला. दोन्ही संस्थांच्या भावी शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञानविषयक सहकार्य वृद्धीमध्ये मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मोना यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि सी-डॅक यांच्यात प्रा. मोना व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि सी-डॅकतर्फे सचिव कर्नल अनुपकुमार खरे यांनी स्वाक्षरी केल्या.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यापीठ स्तरावरील कॉम्प्युटिंगला काही प्रमाणात मर्यादा येतात. त्यामुळे या क्षेत्रातील 'सी-डॅक' या दिग्गज कंपनीसोबत सामंजस्य कराराची भूमिका घेतली. दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान व माहितीचे होणारे आदान-प्रदान विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. संगणक क्षेत्रातील संशोधन विकासालाही विद्यापीठात चालना मिळेल.'सी-डॅक'चे सह-संचालक महेश कुलकर्णी यांनी 'सी-डॅक'च्या वाटचालीचा आढावा घेतला. संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. कुलगुरू डॉ. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला.

प्रा. मोना म्हणाले, 'सी-डॅक' गेली २८ वर्षे कार्यरत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा देश अशी देशाची जगभर ओळख प्रस्थापित करण्यात 'सी-डॅक'ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यापीठानेही मुडलसारख्या आधुनिक शिक्षण पद्धत स्वीकारली आहे विज्ञान विभागासह हिंदी भाषा अधिविभागातही आयसीटीविषयक अतिशय काम सुरू आहे. विद्यापीठासोबत केलेला एमओयू निश्चितच उपयोगी ठरेल.

सामंजस्य कराराची उपयुक्तता

संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञानाबरोबरच पूरक ज्ञान उपलब्ध होणार आहे. बीग डाटा अॅनालिसीस, फ्री अॅण्ड ओपन सोर्स डाटा यनिंग एम्बेडेड सीस्ट‌िम, वायरलेस सेन्सर नेटवर्क, व्ही. एल. एस. आय. डिझाइन, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, मल्टिलिंग्युअल टेक्नॉलॉजी यांसारख्या अत्यावश्यक संशोधन क्षेत्रांसंदर्भातील देवाण-घेवाण होईल. औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास बळ मिळेल. नवतंत्रज्ञान, संशोधन याबाबतीत या दोन शिखर संस्थांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यशाळा होतील. त्याच लाभ संशोधक, विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी होईल. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांतील बदल, संशोधनाच्या बाबतीत समन्वय व विचारविनिमय करता येणे शक्य होणार आहे. सी-डॅकमधील तज्ज्ञांची अभ्यागत व सहयोगी व्याख्याते म्हणून नियुक्त करता येऊ शकेल. पुणे येथे सी-डॅक प्रकल्प तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांच्यात कौशल्ये विकसित केली जाणार असल्याने व्यवसाय-रोजगार संधी मिळविण्यासाठी फायदा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images