Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘सेसाचे काम कौतुकास्पद’

$
0
0
‘सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांची संघटना (सेसा) गेली पंचवीस वर्षे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करते हे आश्वासक चित्र आहे. संघटनांनी अशा पद्धतीने रचनात्मक कार्य केल्यास विकास प्रक्रियेला गती येईल’ असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

काही भागात आज पाणीपुरवठा बंद

$
0
0
पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सोमवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सी, डी तसेच बी वॉर्डमधील काही भागाला आता मंगळवारीच पाणीपुरवठा होणार आहे.

‘एमपीएससी’चा पुन्हा गोंधळ

$
0
0
ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलाचा प्रताप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रविवारी घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या पूर्व परीक्षेच्या अचानक बदललेल्या बैठक व्यवस्थेवरून परीक्षार्थी उमेदवारांची तारांबळ उडाली.

भ्रष्टाचारी साखळी तोडा

$
0
0
राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराचा मासिक ताळेबंद हा एक कोटी रुपयांपर्यंत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून शिपाईपदापर्यंत याची वाटणी दरमहा होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.

धर्मांधांचा मनसुबा धुळीला मिळवू

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अनेक पटीने वाढवून खुनी-धर्मांधांचा मनसुबा धुळीला मिळवण्याचा निर्धार येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत करण्यात आला.

पर्यायी आर्थिक धोरणांसाठी कामगारांचा संघर्ष अपरिहार्य

$
0
0
‘केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या भांडवलदार धार्जिण्या आर्थिक धोरणामुळे कामगार वर्गाचे प्रश्न तीव्र होत असून पर्यायी आर्थिक धोरणासाठी कामगारांनी संघर्ष करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य महेंद्रसिंग यांनी केले.

मातीविरहीत किचन गार्डन

$
0
0
जागेची कमतरता, कुंडी-मातीची कटकट दूर करुन अनेकांना घरच्याघरी ताजा भाजीपाला घेण्याबरोबरच टेरेस गार्डन करणे आता शक्य होणार आहे. येथील संजीव गोखले यांनी हवा आणि पाणी तत्वावर चालणारे व्हर्टिकल एरोफोनिक फार्मिंग तयार केले आहे.

इचलकरंजीत मुलीचा डेंगीने मृत्यू

$
0
0
येथील लालनगर परिसरातील १२ वर्षीय शाळकरी मुलीचा रविवारी डेंगीने मृत्यू झाला. शिवानी दीपक हुनुले असे या मुलीचे नाव आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तरीही १६९२ विद्यार्थी शाळाबाह्य

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले, तरी राज्यात २५ हजार आणि कोल्हापूर विभागात अद्याप १६९२ मुले हे शाळाबाह्य असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मुलाला वाचविताना आई बुडाली

$
0
0
विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी आईने थेट पाण्यात उडी टाकली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी खुपीरे (ता. करवीर) येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

आणखी चार ठिकाणी विसर्जन कुंड

$
0
0
पाण्याचे महत्त्वाचे स्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महापालिका यंदा ठिकठिकाणी विसर्जन कुंड बांधण्याचे नियोजन करीत आहे.

निपाणीजवळ बस अपघातात ३ ठार

$
0
0
तीर्थयात्राकरून परतणा-या शिर्डीच्या यात्रेकरुंच्या बसला महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर निपाणी येथे अपघात होऊन तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे एकच्या दरम्यान घडला. यात्रेकरूंच्या या बसची धडक एका मालवाहू ट्रकला बसल्याने ही घटना घडली.

दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज

$
0
0
राजर्षी शाहू सुविधा केंद्र प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले असून हे सुविधा केंद्र अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

वेतन करारातील त्रुटी दूर करा

$
0
0
नवीन वेतन कराराची अंमलबजावणी करताना काही तरतुदीचा भंग झाल्याने विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. करारातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात अन्यथा पुन्हा व्यापक संघर्ष उभारला जाईल, अशा इशारा महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिला.

दहीहंडीला ग्लॅमरची झालर

$
0
0
लाखो रुपयांची बक्षिसे, दहीहंडी फोडण्यासाठी गो​विंदा पथकातील चढाओढ, मानवी मनोरे उभारण्याचे कौशल्य आणि श्वास रोखून धरायला लावणारे क्षण ही दहीहंडी उत्सवाची वैशिष्ट्ये. शहरातील ​विविध संस्था, संघटनांनी दहीहंडीचे आयोजन करत कोल्हापूर हे दहीहंडी उत्सवातील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई अटळ

$
0
0
‘गेली दोन वर्षे गणेशोत्सवात डॉल्बीमुक्तीची आदर्श परपंरा निर्माण झाली आहे. डॉल्बीच्या आवाजामुळे शारीरिक व मानसिक आजार वाढतात. हा सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळे डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल’ असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

सरकारी कीटकनाशके, खते रस्त्याकडेला

$
0
0
एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतीला आधार देत आहे, तर दुसरीकडे कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा नडत आहे.

अधिका-यास मारहाण; कर्मचा-यांची एकजूट

$
0
0
सोलापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता वसंत पवार यांना अतिक्रमण धारकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कामगार कृती समितीच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले.

निपाणीजवळ अपघात; ३ ठार

$
0
0
दक्षिण भारताची यात्रा संपवून शिर्डीकडे परतणा-या नगर जिल्ह्यातील भाविकांच्या लक्झरी बसचा अपघात होऊन तिघे ठार तर २३ जण जखमी झाले. पुणे बेंगळुरू हायवेवरील निपाणी चेकपोस्ट नाक्याजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता ही दुर्घटना घडली.

बिद्री कारखान्याने दुसरा हप्ता द्यावा

$
0
0
‘बिद्री साखर कारखान्याचा साखर उतारा राज्यात प्रथम क्रमांकाचा असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या के. पी. पाटील यांनी शाहू आणि हमीदवाडा साखर कारखान्यांपेक्षा जादा दराने दुसरा हप्ता जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी गारगोटी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images