Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘भरारी’ची कारवाई धीमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीस पाच दिवसांचा कालावधी उरल्याने प्रत्येक प्रभागात प्रचाराचा धमाका उडाला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार सर्व पर्यायांचा अवलंब करताना दिसत आहेत. भोजनावळीच्या पंगती उठत आहेत. काही प्रभागात भेटवस्तू वाटप सुरू आहे. विविध उत्सवांचे औचित्य साधून देवीदेवतांच्या दर्शनाच्या सहली सुसाट निघाल्या आहेत. मात्र आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकाची कारवाई मात्र धीम्या गतीने सुरू आहे. भरारी पथकाच्या मोटारी शहरात फिरताना दिसतात, पण कारवाई होताना नजरेस पडत नाही.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सात विभागीय निवडणूक कार्यालयासाठी प्रत्येकी एक भरारी पथक, दोन विशेष पथक आणि सहा नाक्यावरील नाकाबंदीसाठी दोन सत्रात कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. प्रत्येक भरारी पथकाकडे एक कॅमेरा आणि चार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विशेष पथकात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि एक पोलिस कर्मचारी आहे. भरारी पथक, विशेष पथक, नाक्यावरील तपासणी यासाठी मिळून २६ कॅमेरे आहेत. इतकी यंत्रणा असतानाही आतापर्यंत आचारसंहिताभंगाचे केवळ आठ गुन्हे दाखल आहेत.

शहरातील बहुतांश भागात प्रचंड चुरस आहे. निवडून येण्यासाठी उमेदवारांकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. भागाभागात भोजनावळी, सहली, भेटवस्तूंचे वाटप कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. काही उमेदवारांकडून पैशाचे वाटप सुरू आहे. मात्र या संदर्भात कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. उमेदवारांकडून वेगवेगळ्या युक्त्या आखल्या जात आहेत. मात्र आचारसंहिता पथक कारवाई करताना कमी पडत असल्याचे चित्र आहे.

कोजागिरीला लग्नाचा वाढदिवस

प्रभागातील लहान मुलाचा वाढदिवस, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस अशी कारणे सांगत उमेदवारांकडून भोजनावळी सुरू आहेत. सोमवारी बसंत बहार रोड येथे भोजनावळी सुरू असल्याची तक्रार पथकाकडे करण्यात आल्यानंतर अधिकारी त्याठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी लग्नाचा २५ चा वाढदिवस असल्याचे पार्टी आयोजित केली असे उत्तर मिळाले. अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेटची विचारणा करताच कोजागिरी पौर्णिमेची वेळ साधून लग्नाचा वाढदिवस साजरा करत असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांना ऐकून घ्यावे लागले.

प्रत्येक रॅली, सभेचे चित्रीकरण

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराची धामधूम वाढली आहे. निवडणूक विभागाने त्यावर लक्ष केंद्रित केले असून आचारसंहितेचा भंग होतो का हे तपासण्यासाठी आणखी दहा कॅमेरे तैनात केली आहेत. प्रत्येक सभा, कॉर्नर सभा, रॅलीचे शूटिंग होणार आहे.

आचारसंहिताभंग केल्याप्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवाना प्रचार कार्यालय सुरू केले म्हणून तीन गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी झेंडे, बॅनर लावल्यामुळे पाच गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारी आल्या की, पथकातील अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शहनिशा करतात.तसेच चित्रीकरण केले जाते.

- धनंजय खोत, आचारसंहिता नियंत्रण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी, ताराराणीच्या १२ संशयितांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कदमवाडी येथील राड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व ताराराणी आघाडीच्या १२ संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. पण गुन्ह्यातील मुख्य संशयित मोकाट असल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवींद्र शेखर बाडगे (वय ३२), सचिन बाबूराव शिंदे (३३), दस्तगीर गुलाब शेख (३३), विराज कमलाकर सुतार (४०), सैफ अय्याज फकीर (२३, सर्व रा. शाहू कॉलेज), विजय केरबा कांबळे यांना तर ताराराणी आघाडीच्या प्रविण राजू वाघमारे (३४), राहुल राजू वाघमारे (२८), सूरज विनायक कुरणे (२८), उदय भानुदास कांबळे (२८, सर्व रा. सदर बाजार), इम्रान रहमान हकीम (२७), मोहसिन रहमान हकीम (२५, दोघे रा. विचारे माळ) या सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेश लाटकर यांच्या समर्थकांनी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला होता तर नगरसेवक कदम यांच्या समर्थकांनी लाटकर यांच्या बंगल्यावर हल्ला केला होता. सोमवारी हल्ला झाल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. मंगळवारी मुख्यमंत्री दौरा असल्याने पोलिस बंदोबस्ताचे कारण दिले जात होते.

मुख्यमंत्री कोल्हापुरातून मुंबईला रवाना झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. मात्र या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार मोकाट फिरत असल्याने भयमुक्त वातावरणात निवडणूक होईल का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप म्हणजे खोटं बोल रेटून बोल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकीकडे कोल्हापूरची सत्ता द्या, तिजोरी भरुन देतो असे म्हणायचे व दुसरीकडे महाराष्ट्रात फिरताना तिजोरी खाली केल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुतोंडी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्राचा दुःस्वास असून सामान्यांच्या प्रश्नांबाबत आस्था, जिव्हाळा, प्रेम नाही. भाजप म्हणजे 'खोट बोल रेटून बोल', अशी गत असल्याची ‌टीका त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी भाजप व शिवसेनेचा पुरता समाचार घेतला. ते म्हणाले, 'शिवसेनेकडे असलेली मुंबई व मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात असलेल्या नागपूर ही शहरे बदलली नाहीत. पण राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड, नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलून टाकला. त्यासाठी मजबूत नेतृत्व लागते ते फक्त राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या महापालिकेत कमी नगरसेवक दिले. आता पूर्ण बहूमत द्या शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू. त्यातील कुणी नगरसेवक चुकला तर त्याला घरी घालवू. आम्ही जे बोलतो ते करतो. आताही जे सांगितले आहे ते पूर्ण करण्याचा शब्द ​देतो.'

'ताराराणी आघाडीने कोल्हापूर शहराच्या विकासात खोडा घातला. पुरोगामी विचारांना संपविण्याचे कामही युती सरकारने केले. त्यामुळे भाजप, शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेऊन कोल्हापूर महापालिकेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडचे ठेवा,' असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. तटकरे म्हणाले, 'युती सरकारच्या एक वर्षाच्या काळात महागाई वाढली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येच्या सातत्याने वाढ झाली. माजी गृहमंत्री जयंत पाटील, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, यांची यावेळी भाषणे झाली.

रामायणातील कैकयी

मुश्रीफ म्हणाले, 'निवडणूक तोंडावर ठेवून पालकमंत्री केडीसीसीबाबत बिनुबडाचे आरोप करीत आहेत. केडीसीसीप्रकरणी हायकोर्टाने ताशेरे मारुन स्थगिती दिली आहे. त्यामुळे रामायणातील कैकयीच्या पात्रासारखी अवस्था पालकमंत्र्याची झाली आहे. महापालिकेची सत्ता घेण्याचे काम कोणा एरागबाळ्याचे नाही. गेली बारा वर्षे ते आमदार होते. कुठे कुठे तोडपाणी केली आहे. टक्केवारीने किती कामे केली, या लीलांची माहितीच्या अधिकारात माहिती घेतली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांवर कंटेम्प्टची टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खंडपीठासाठी संप-आंदोलन करणार नाही, अशी हमी पूर्वी दिलेल्या कोल्हापूर वकील संघटनेने बुधवारी घूमजाव करत तशी हमी देण्याची आमची तयारी नसल्याचे मुंबई हायकोर्टात सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या हायकोर्टाने संघटनेची ही भूमिका कोर्टाचा अत्यंत गंभीर अवमान करणारी आहे, असे निरीक्षण नोंदवले. तसेच २७ नोव्हेंबरच्या पुढच्या सुनावणीला संघटनेच्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कोर्टात हजर रहावे, असे निर्देश दिले.

कोल्हापुरात फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याच्या मागणीवर हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी निर्णय घेतला नसल्याच्या निषेधार्थ ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान वकिलांनी काम बंद आंदोलन केले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वकिलांना संप, काम बंद आंदोलन करण्याची परवानगी नसताना कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, दापोली, गुहागर येथील वकील संघटनांनी आंदोलन केले होते. त्यामुळे हायकोर्टाने स्वतःहून दखल घेत 'सुओ मोटो' कोर्ट अवमान याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावरून न्या. अभय ओक व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने अशा सर्व पदाधिकाऱ्यांवर कंटेम्प्टची नोटीस काढल्यानंतर कोर्टात हा विषय प्रलंबित असेपर्यंत आंदोलन करणार नसल्याची हमी सर्व संघटनांनी दिली होती. त्यामुळे खंडपीठाने सर्वांना प्रतिज्ञापत्रासह लेखी हमी सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानुसार, बुधवारी हा विषय सुनावणीस आला असता, कोल्हापूर संघटनेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितले की, संघटनेने २१ ऑक्टोबरच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत लेखी हमी द्यायची नाही, असा ठराव करतानाच कोर्टाला आदेशात बदल करण्याची विनंती करणारा अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.

हमीपत्र देण्यास वकिलांचा विरोध

हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्यासंदर्भात खटल्याची सुनावणी असेपर्यंत आंदोलन करणार नाही, असे हमीपत्र देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कोल्हापूर बार असोसिएशनने घेतली आहे. तसे हमीपत्र देण्यास मुंबई हायकोर्टाला नकार दिला. न्यायमूर्ती अभय ओक व व्ही. एल. अचलिया यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. हमीपत्राबाबत कोल्हापूर बार असोसिएशनच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पदाधिकारी व वकिलांनी २७ नोव्हेंबरच्या सुनावणीस हजर राहण्याचा आदेशही देण्यात आला आहे. सुनावणीवेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रविंद्र जानकर, यांच्यासह वकील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या जोडण्यांना सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचाराला अवघे दोन दिवस राहिल्याने अनेक भागात उमेदवारांपर्यंत व मतदारांपर्यंतही आवश्यक ती 'रसद' पोहचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भागांमध्येही शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाच्या जोडण्यांना सुरुवात झाली आहे. प्रचाराबरोबरच या जोडण्यांमुळे निवडणुकीची रंगत वाढू लागला आहे.

उमेदवारांकडून आतापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचे मार्ग अवलंबले जात होते. विकासकामावर, आश्वासनावर, वेगवेगळ्या तालीम मंडळांना दिल्या जाणाऱ्या आश्वासनावर जास्तीत जास्त मतदार खेचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करत होते. त्यात विरोधकही जोरदार प्रयत्न करत होते. यामुळे जे भेटायला येतील, त्यांना 'आम्ही तुमच्यासोबत' असे मतदार सांगत होते. अनेक भागात उमेदवार भागातील नागरिकांना गटागटाने भेटून कोणती ना कोणती कारणे दाखवत जेवणावळी देत होते. तर भागात काही अडचण होऊ नये म्हणून थेट हॉटेलमध्येही अनेक जेवणावळींचे आयोजन केले जात होते. काही हॉलमध्येही जेवणावळी झाल्या. आतापर्यंत काही पक्षांकडून उमेदवारांना सहाय्य केले होते. त्यांच्या जोरावर प्रचाराची मोठी भिस्त सांभाळली होती. पण शेवटचा टप्पा महत्वाचा असून यामध्ये राजकीय पक्ष व उमेदवारही सतर्क झाले आहेत.

अनेक प्रभागांत अद्याप मोठ्या गटाच्या मतदारांनी भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. त्यांच्या प्रमुखांनी उमेदवारांसोबत बैठक चालवल्या असून ज्यांच्याकडून इच्छापूर्ती होईल, त्यांच्या मागे ताकद उभी केली जात आहे. यामुळे भागातील महत्त्वाच्या व जय पराजयाचे पारडे फिरवणाऱ्या जोडण्या सुरु झाल्या आहेत. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक ती 'रसद' ही पुरवली गेली आहे. उमेदवारांनी त्या रसदबरोबर आपलेही हात सैल सोडले आहेत. त्यातून छोट्या गटांचीही इच्छापूर्ती होत आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एखादा भाग फोडून आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा करण्यासही प्रयत्न सुरु झाले आहेत. दुसरीकडे प्रचाराला केवळ दोन दिवस राहिल्याने प्रचाराची वाहने दिवसभर भागाभागात फिरु लागली आहेत.

दुपारचा काही काळ विश्रांती घेतली जायची. पण आता ही वाहने दुपारीही कोणत्या ना कोणत्या भागात फिरताना दिसतात. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस उमेदवारांनी जशी परवानगी मिळेल तसे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. या दोन दिवसात भागांमध्ये मोठ्या रॅली निघणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांना वैचारिक अॅटॅक

$
0
0

नीलम गोऱ्हे यांची घणाघाती टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री एकीकडे वाद थांबविण्याचे आवाहन करतात आणि त्यानंतर लगेच शिवसेनेवर टीका करतात. पालकमंत्र्यांना महापालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने त्यांना अधून-मधून वैचारिक अॅटॅक येत असावा,' असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी लगावला. मागील वर्षी सत्तेत असलेले उमेदवार टोपी बदलून ताराराणी आघाडीत दाखल झाले आहेत. अशा गुंड आणि मटकेवाल्या उमेदवारांना वेळीच त्यांची ताकद दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेना उमेदवारांच्या प्रचार्थ पेटाळा येथे झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री पाटील आणि गोऱ्हे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. पालकमंत्र्याच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेताना गोऱ्हे म्हणाल्या, 'भाजप-ताराराणी आघाडीमध्ये गुंड, मटकावाले आणि खंडणीखोर असताना त्यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गल्लीबोळात फिरत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर पालकमंत्र्यांनी वाद शमवण्याचे आवाहन केले. आवाहनाला दोन-तीन तास होत नाहीत, तोपर्यंत ते शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यातून नैराश्य प्रकट होत असून त्यांना अधून-मधून वैचारिक अॅटॅक येत असावा.'

आमदार राजेश क्षीरसागर यांनीही पालकमंत्री पाटील आणि महानगरअध्यक्ष महेश जाधव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. क्षीरसागर म्हणाले, 'मटकेवाल्यांना मुख्यमंत्री ठोकून काढण्याची भाषा करत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षात मटकेवाले, जुगारी आहेत. ज्या नगरसेवकांनी टोलसाठी ठराव केले, त्यांनाच आघाडीत घेवून पालकमंत्री लबाड लांडग्याचे ढोंग करत आहेत. लाटेवर स्वार होऊन वाहत आलेल्या ओंडक्याला विधानसभेत चांगली मते मिळाल्याने मंत्री झाल्याचा भास होत असल्याचा टोला महेश जाधव यांना लगावला. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजीत मिणचेकर, सत्यजीत पाटील यांचीही भाषणे झाली.

सभेला राज्यमंत्री रवींद्र वायकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख संजयसिंह मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार उल्हास पाटील, ज्ञानराज चौगुले, वैभव नाईक उपस्थित्‍ होते. आभार जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मानले.

'महाराष्ट्र टाइम्स'चा संदर्भ

'महापालिकेची तिजोरी भरू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी, प्रत्यक्षात राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज असताना कोल्हापूर महापालिकेची तिजोरी कशी भरणार ?,' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. यावेळी बोलताना 'महाराष्ट्र टाइम्स' मधील वृत्ताचा संदर्भ देत एकीकडे तिजोरी भरू आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर या विसंगतीवर त्यांनी बोट ठेवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना सत्तेबाहेर गेली तरी बेहत्तर

$
0
0

सरकार टिकवण्यासाठी दोन पर्याय : सहकारमंत्र्यांचा इशारा

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर ः कोल्हापूर व कल्याण-डोबिंवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेना यांच्यातील दुरावा आणखी वाढत आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला भाजपने चोख प्रत्यूत्तर देण्याचे ठरवले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी बेहत्तर आमच्यापुढे सरकार टिकविण्यासाठी दोन सक्षम पर्याय उपलब्ध आहेत, असा इशारा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिला. सेना बाहेर पडली तरी काहीही अडणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यामुळे महापालिका निवडणुकानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप एकमेकांना मदतीची भूमिका घेतील अशी शक्यता होती, पण दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी केली. शिवसेनेने विशेषतः आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर प्रचारावेळी खासदार विनायक राऊत, आमदार निलम गोऱ्हे यांनीही भाजपवर त्यातही चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रहार केले. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली. मंगळवारच्या येथील जाहीर सभेत पाटील यांचे जाहीर कौतुक करतानाच त्यांना टार्गेट करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेचा उल्लेख त्यांनी केला नसला तरी त्यांचा रोख दोन्ही काँग्रेस बरोबरच सेनेकडेही होता.

मुख्यमंत्र्यांनी असा जा‌हीर पाठिंबा दिल्यानंतर सहकारमंत्री आणखी आक्रमक झाले आहेत. यातूनच सहकारमंत्र्यांनी सेनेवर बुधवारी प्रहार केला. गुंडगिरी, पाकिट संस्कृती, खंडणी यात माहीर असलेल्या शिवसेनेने आम्हाला शिकवू नये, असा इशारा देत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकार टिकवण्याची जबाबदारी फक्त भाजपचीच आहे असे नाही, सेनेला सत्तेत रहायचेच नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. सरकार टिकवण्यासाठी आमच्याकडे दोन पर्याय आहेत, असे ते म्हणाले. मात्र ते कोणते हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

काय असतील पर्याय?

सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेनेत दोन मतप्रवाह आहेत. सेना बाहेर पडल्यास भाजपसोबत राहणाऱ्या सेनेतील काही आमदारांचा हा पक्ष मदत घेऊ शकतो. काही आमदारांना राजीनामा द्यायला सांगून भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडून आणण्याबाबत विचार होऊ शकतो, पण सद्यस्थितीत हे अवघड असल्याने राष्ट्रवादीची मदत घेण्याबाबतही चाचपणी होऊ शकतो. हा दुसरा पर्याय मानला जातो. शिवसेनेचे उपद्रवमूल्य वाढत गेल्यास भाजप यातील कोणताही एक पर्याय निवडून सरकार टिकवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिजोरी कुणाची भरणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हातात द्या, तिजोरी भरू, असे म्हणता. या तिजोऱ्या कुणाच्या भरणार? तुमच्या की महापालिकेच्या?' असा थेट सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभेत बुधवारी ते बोलत होते. ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. शिवसेना लाचार म्हणून सत्तेत नाही तर जनतेच्या कल्याणासाठी आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

पेटाळा मैदानावर ही सभा झाली. ठाकरे यांनी एखनाथ खडसे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरमरीत समाचार घेतला. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाताता द्या, तिजोरी भरतो असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेत केले होते. त्या विधानाचा संदर्भ घेऊन तिजोऱ्या कुणाचा भरणार? असा थेट सवाल करीत भाजपने गुंड आणि अवैध धंदेवाले उमेदवार निवडणुकीत उभे केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने युती तोडल्याचा आरोप करणाऱ्या खडसेनींच आपणच युती तोडल्याची कबुली दिली. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला सत्य समजले. शिवसेना संपवा असे कोल्हापुरातील प्रचार सभेत वक्तव्य करणाऱ्या खडसेंच्या सातशे पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात शिवसेनेशी युती तोडणाऱ्या भाजपला काश्मिरात मात्र मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी युती कशी चालते? असा सवाल करून ते म्हणाले, 'हरियाणातील दलित जळीत हत्याकांडाबाबत बेजबाबदार वक्तव्य करणारे खासदार व्ही. के. सिंग भाजपचेच आहेत. भाजप शाहू महाराजांच्या कोल्हापुरात निवडणूक लढवण्यास लायक नाही.'

भाजपसह दोन्ही कॉँग्रेसवरही ठाकरेंनी आसूड ओढले. शरद पवारांची 'पापाची बारामती' असल्यामुळे बारामती पाहायला जाणे योग्य वाटत नाही. पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या नावाने लाटलेल्या गरिबांच्या जमिनी परत कराव्यात. केवळ विकासाच्या घोषणा करून जनतेची फसवणूक करण्याची दोन्ही कॉँग्रेसची नीती असल्यानेच शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला नाही. शहरात टोल आणणारे कॉँग्रेसवालेच आहेत. २५ वर्षांत यांना शहराची हद्दवाढ करता आली नाही. त्यामुळे या निवडणुकीतून त्यांना हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रकांत पाटलांचा मोठा वशिला

गृहमंत्रालयाचे वाभाडे काढणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा पक्षात मोठा वशिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरही ते टीका करतात. 'लॉटरी का फल, आज नही तो कल,' अशी त्यांची अवस्था असल्याचे सांगत वशिल्याने मंत्रीपद मिळाल्यानेच मुख्यमंत्रीही त्यांचे कौतुक करतात, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

६५०० कोटीचे पॅकेज कल्याण डोंबिवलीला जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूरविषयी प्रेम असते तर त्यांनी एक हजार कोटींचे पॅकेज आणले असते. मात्र मुख्यमंत्री हे एक नंबरचे थापाडे आणि बोलघेवडे आहेत.

- नारायण राणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

एकीकडे कोल्हापूरची सत्ता द्या, तिजोरी भरुन देतो म्हणतात व दुसरीकडे महाराष्ट्रात फिरताना तिजोरी खाली केल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुतोंडी आहेत. मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्राचा दुःस्वास असून सामान्यांच्या प्रश्नांबाबत आस्था, जिव्हाळा, प्रेम नाही. शिवसेनेकडे असलेली मुंबई व मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात असलेली नागपूर ही शहरे बदलली नाहीत.

- अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंडगिरी हीच शिवसेनेची संस्कृती

$
0
0

दोन्ही काँग्रेसने कोल्हापूर भकास केल्याचा पालकमंत्र्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गुंडगिरी, खंडणी बहाद्दरांचा भरणा, पाकिट संस्कृती ही शिवसेनेचे पूर्वापार संस्कृती आहे. त्यांची सुरुवातच यातून झाली आहे' असा आरोप भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 'शिवसेना किती सोज्वळ आहे, हे माहिती आहे. भाजप-शिवसेनेची युती तोडण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागरांना कोणी सुपारी दिली होती असा प्रश्न मनात येतो. त्यांनी भारतीय जनता पक्षाला शिकवू नये' असा टोलाही त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित 'चॅट रुम'मध्ये लगावला.

प्रश्न : कोल्हापूरच्या विकासाची तुमची काय भूमिका ?

तुंबलेले गटर आणि हाकेला धाऊन येणारा नगरसेवक अशी पारंपरिक, मर्यादित संकल्पना आता बदलली आहे. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करणारा नगरसेवक हवा. प्रलंबित कामासाठी नगरसेवकांच्या माणसांनीच कामे पूर्ण केली पाहिजेत. पाचपैकी चार माणसे नगसेवकांची असायला हवीत. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती कंगाल आहे. महापालिकेत भाजप युतीची सत्ता आल्यास प्रत्येक माणसांसह शहर श्रीमंत केले जाणार आहे. प्रत्यक्ष नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा कर लावणार नाही. प्रसंगी काही नियमात बदल करू. महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न करू. कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाईल. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. पूर्णपणे बीओटी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाईल. हा प्रकल्प झाल्यास महापालिकेची स्ट्रीट लाइटचे सुमारे दोन कोटी रुपयांचे बिल वाचणार आहे. वीज महावितरणला विकता येईल. महापालिकेच्या सर्व इमारती, ओपन पॅसेजच्या ठिकाणी सोलर दिवे लावता येतील. सांडपाण्याचा पुर्नवापर करणे शक्य आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार आहे. कोल्हापूरला पर्यटनाचा दर्जा देऊन आकर्षणाचे केंद्र केले जाईल. त्यासाठी दहा प्रकल्प राबवले जातील.

महापालिका निवडणुकीत भाजप-सेना युती का नाही ?

भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची महापालिकेतील युतीबाबत झालेली बैठक सकारात्मक झाली. मात्र ती युती मोडण्याचे काम शिवसेनेने केले. भाजपच्या नेत्यांवर आरोप सुरू केले. अमित शहा अफझलखान, भाजप पाण्याबरोबर वाहून जाणारा ओंडका असल्याच्या आरोपांची पत्रकबाजी, आरोप झाले. शिवसेनेने केलेल्या आरोपांमुळे भाजप दुरावत गेला. त्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांना कोणी सुपारी दिली होती का, असा प्रश्न निर्माण होतो. शिवसेना सोज्वळ आहे, असे नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत गोंधळ घातला. मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली. अशा कृत्याला त्यांनी राष्ट्रवाद म्हणण्यास सुरूवात केली. शिवसेनेची सुरुवात गुंडगिरी, पाकिट संस्कृती आणि खंडणीतून झाली. त्यांची ती पूर्वीपासून संस्कृती आहे. त्यामुळे राज्यात भाजपची शिवसेनेसोबत युती असताना महापालिका निवडणुकीत ताराराणी पक्षासोबत युती करावी लागली. आमच्याकडे दोन पर्याय आहेत. दोस्तीचे दोन प्रकार आहेत. शिवसेना नैसर्गिक मित्र असला तरी पर्यायी मैत्रीचा मार्गही खुला आहे. नैसर्गिक मैत्रीत दगा मिळाल्यास पर्यायी मैत्री खुली आहे. दरवेळीला आम्हीच सत्तेची काळजी करावी असे नाही.

सत्तेत शिवसेना मित्रपक्ष आहे. मग आरोप का सुरू आहेत ?

गेले पंचवीस वर्षे शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ असे चित्र आहे. मात्र मोठ्या भावाचे लहान भावावर प्रेम, आदर असल्याचे कुठेच दिसले नाही. भाजप कमकुवत आहे, असा गैरसमज निर्माण करून कायम दु्य्यम वागणूक मिळाली. ही वागणूक दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सहन होत नव्हती. त्यामुळेच राज्यात युती झाली नाही. नंतर तेच कोल्हापूरच्या बाबतीत झाले. काही कार्यकर्त्यांचा युती करायला विरोध होता. आजही शिवसेनेला या जगात शहाणी मी, आमच्याकडेच कर्तृत्वान कार्यकर्ते आहेत, असे वाटते. त्यांनी गेल्या काही निवडणुकीत कोल्हापूरात जागा वाटपात आम्हाला नगण्य समजले. आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. आम्हाला युतीत रहायचे नाही, अशी टिका, त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. तरीही आम्ही शांत होतो. उत्तर देत नाही म्हणजे आम्ही कमकुवत आहोत असे त्यांना वाटू लागले. त्यातून सेनेने सतत आरोप केले. त्यामुळेच टीकेला प्रत्युत्यर देण्याची वेळ आली.

सत्ता आल्यावर तुमची भूमिका काय असेल ?

आमची सत्ता आल्यास नवे प्रकल्प आणले जातील. चार चांगले प्रकल्प पारदर्शीपणे, वेळेत पूर्ण केले जातील. एक रुपयाही भ्रष्टाचार होणार नाही ही आमची हमी आहे. कोणत्याही प्रकल्पात पैसे खाल्ले नाहीत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून येईल. त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन आपोआप कमी होईल. विनाकारण आंदोलने होणार नाहीत. चांगली माणसं निवडून आली तर पैसे खाण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. सध्या महिला बचत गटांना काहीही दिशा नाही. त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊ. त्याचे व्हीजन तयार आहे. दोन महिन्यात खासगी विमानसेवा सुरू होईल. विमानतळ विस्तारीकरणही होईल.

कोल्हापूरच्या सद्यस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते?

महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विकासाचे व्हिजन नव्हते. राजकीय प्रबळ इच्छाशक्ती, पारदर्शकता कमी पडली. प्रत्येक प्रकल्पात पैसे खाण्याची नेत्यांची प्रवृत्ती राहिली. एसटीपी प्रकल्प, थेट पाइपलाइन, आयआरबीचा रस्ते प्रकल्प यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव राहिला. ढपल्यासाठी प्रकल्पांचा वापर केला.

कोल्हापूर अमृत योजना, स्मार्ट सिटीत का नाही ?

राष्ट्रवादी काँग्रेसची खोटे बोला, पण रेटून बोला अशी पद्धती आहे. २०१४ मध्ये काँग्रेस सरकारने कोल्हापूरचे नावच पाठविले नाही. मात्र, आमच्या सरकारने अमृत योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी निर्णय घेऊन प्रस्ताव पाठविला. मोदी सरकारच्या काळात मेरिटवर काम चालते. वशिला चालत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात वशिला चालत होता. थेट पाइपलाइनसाठी परवानगी न घेता वर्कऑर्डर दिल्या. थेट पाइपलाइन पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा काहींनी केली होती. ती पूर्ण करण्यासाठी​ परवाने न घेताच उद‍्घाटनाचा नारळ फोडला.

भाजपविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र का ?

आमच्या विरोधात या तीन पक्षांनी गट्टी​ केली आहे हे एखादा लहान मुलगाही सांगेल. भारतीय जनता पक्ष सक्षम, प्रबळ आहे. भाजप-ताराराणी आघाडी सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनने भाजपला लक्ष्य केले आहे. तिघे एकत्र आले तरी भाजपचा विजय निश्चित आहे. कसबा बावड्यात सेनेची हवा असताना त्यांनी प्रबळ उमेदवार दिले नाहीत यावरून ते लक्षात येते.

तुमचा नेमका शत्रू कोण?

आमचा मूळ शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आमची स्पर्धा त्यांच्याबरोबर राहील. तो दुसऱ्या क्रमांकावर राहील. काँग्रेस आणि शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर जातील. या निवडणुकीत पुन्हा संधी द्या असे काँग्रेस - राष्ट्रवादीकडून आवाहन केले जाते. त्यांनी चांगली कामे केली असतील तर मते मागण्याची वेळच आली नसती. जनतेने त्यांना पाठिंबा दिला असता. जनता आमच्या पाठिशी आहे. सत्ता आमचीच येईल. सत्तेवर आल्यानंतरही आम्ही मित्रपक्ष म्हणून सेनेला सोबत घेऊ.

टोलमुक्तीची चालढकल सुरू असल्याचा आरोप होत आहे ?

भारतीय जनता पक्ष पूर्णपणे टोलमुक्ती करणार आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तीन महिन्यांसाठी टोल बंद केलेला नाही. पुर्नमूल्यांकन समिती नेमली आहे. त्याबाबत निर्णय होईल. टोलमुक्तीसाठीचा हा शेवटचा टप्पा आहे. कोल्हापूरची हद्दवाढही करू. मात्र यात औद्योगिक वसाहतींचा समावेश नसेल.

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी तुम्हाला टार्गेट का केले आहे ?

राजकारणात चांगला माणूस आला की राजकारणी माणसांना त्रास होतो. तशीच अवस्था हसन मुश्रीफ यांची झाली आहे. त्यांच्या पाठिमागचा इतिहास पाहिला की इतकी संपत्ती कोठून आली असा प्रश्न पडतो. साधे स्टोह दुरुस्तीचेही दुकान चालवत नसलेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून हे विचार करण्याजोगे आहे. खासगी साखर कारखाना ते कसा उभारू शकले हे पहायला हवे. त्यांचे स्टोव्ह रिपेरिंगचे दुकान होते का? ते शेती करत होते का ? असा प्रश्न पडतो. त्यांनी केडीसीसीच्या कागलमधील शाखेत दोन कोटींचा ढपला पाडला आहे. त्यांचा स्वतः खासगी सहकारी साखर कारखाना आहे. सामान्य माणसांकडून शेअर्सची रक्कम घेऊन पैसे खाण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे लाखो रुपयांची माया जमविलेल्या मुश्रीफ यांच्या कारभाराची चौकशी करावी लागेल.

फटकारे...

> भाजप-शिवसेनेची युती मोडण्याचे काम शिवसेनेने केले. अमित शहा अफझलखान, भाजप पाण्याबरोबर वाहून जाणारा ओंडका असल्याच्या आरोपांची पत्रकबाजी, आरोप झाले. त्यामुळे भाजप दुरावला. यासाठी आमदार क्षीरसागर यांना कोणी सुपारी दिली होती का, असा प्रश्न निर्माण होतो.

> शिवसेना नैसर्गिक मित्र असला तरी पर्यायी मैत्रीचा मार्गही खुला आहे. नैसर्गिक मैत्रीत दगा मिळाल्यास पर्यायी मैत्री खुली आहे. दरवेळीला आम्हीच सत्तेची काळजी का करावी?

> क्षीरसागर यांचे मंत्रिपद माझ्यामुळे मंत्रीपद गेल्याचा आरोप शिवसेना करते. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. मी एवढा मोठा नाही. मंत्रीपदे दोन आणि २० दावेदार यामुळे अनेकांना संधी मिळाली नाही.

> काँग्रेस - राष्ट्रवादीने चांगली कामे केली असतील तर मते मागण्याची वेळच आली नसती. प्रत्येक गोष्टीत कमिशन खाल्ल्यानेे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.

> ताराराणी आघाडीपेक्षा कमी जागा आल्या तरी महापौर भाजपचाच असेल. ४५ जागा आमच्या आघाडीला मिळतील. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजप-ताराराणी घेईल.

(शब्दांकन : सचिन यादव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री थापाडे, बोलघेवडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कल्याण डोंबिवलीला ६५०० कोटीचे पॅकेज जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूरविषयी प्रेम असते तर त्यांनी एक हजार कोटींचे पॅकेज आणले असते. मात्र मुख्यमंत्री हे एक नंबरचे थापाडे आणि बोलघेवडे आहेत. राज्याचा आणि शहर विकासाचा दृष्टीकोन त्यांच्याकडे नाही. जाईल त्या ठिकाणी मोठ्या थापा मारायच्या आ​णि लोकांची दिशाभूल करायची हा भाजप शिवसेनेचा उद्योग आहे. भाजप आणि सेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपवाल्यांच्या रक्तात भ्रष्टाचार मुरला आहे. तर शिवसेना प्रगती आणि विचारापासून अलिप्त आहे,'अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथील माऊली चौकात आयोजित सभेत राणे यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांना लक्ष्य केले. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी प्रायव्हेट हायस्कूल येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व विरोधकांना बेईमान, लुटारू संबोधले होते. त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतच राणे यांनी भाषणाला सुरूवात केली. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत कर्तबगार मुख्यमंत्र्याची परंपरा लाभली. पण सध्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी बेईमान, लुटारू ही भाषा शोभणारी नाही. मुळात मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राशी प्रामाणिक नाहीत. १०५ जणांच्या हौतात्म्यातून संयुक्त महाराष्ट्र साकारला असताना फडणवीस हे विधानसभेतच वेगळ्या विदर्भाचा भाजपचा जाहीरनामा असल्याचे घोषित करतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाचे नव्हे तर राज्याच्या संपूर्ण विकासाचे धोरण राबवायचे असते याचे भान फडणवीस यांनी ठेवावे. जाती धर्मात तेढ निर्माण करून जातीयवाद माजवाल तर महाराष्ट्रात प्रक्षोभ निर्माण होईल, असा इशारा राणे यांनी दिला.

विकास प्रकल्पाचे दाखले देत राणे म्हणाले, 'महागाई, दुष्काळांनी जनता त्रस्त झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरात भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांना अच्छे दिन आले आहेत. टोलचे पाप हे काँग्रेसचे नसून शिवसेना भाजपचे आहे.' नितीन गडकरी यांनी १९९५ मध्ये युतीची सत्ता असताना टोलचा प्रस्ताव आणला होता याची आठवण त्यांनी करून दिली. माजी मंत्री पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष पी. एन.पाटील, निरीक्षक रमेश बागवे यांची उपस्थिती होती.

खासदारांनी पाठीत खंजीर खुपसला

माजी मंत्री सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत वैरत्व विसरून महाडिकांचा प्रचार केला. त्यांना निवडून आणले. पण त्यानंतर तीन महिन्यातच खासदार महाडिक यांनी पाठीत खंजीर खुपसला. उपकाराची जाणीव न ठेवणारे महाडिक जनतेचा काय विकास करणार ? असा प्रश्न करत जनता आपल्या पाठीशी आहे, यामुळे कुणाचीही भिती नसल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस प्रमुख की भाजपचे जिल्हाध्यक्ष

राणे यांनी जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्या कार्यशैलीवर टीका केली. कायदा मोडणाऱ्यांना चौकात आणून ठोकणार ही भाषा जिल्हा पोलिसप्रमुखांच्या तोंडी शोभते का ? गुन्हेगारावर कारवाई करा, गुन्हे दाखल करा. शर्मा हे जिल्हा पोलिस प्रमुख आहेत की भाजपचे जिल्हाध्यक्ष ? पोलिस प्रमुखांनी पहिल्यांदा कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडावे, त्या मारेकऱ्यांना चौकात आणून फोडावे, राष्ट्रपती पदकासाठी त्यांची आम्ही शिफारस करू, असा टोला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाची दिवाळी होणार द्विगुणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी आणि बोनस हे समीकरणच बनले आहे. त्यामुळे दिवाळी जवळ आली की सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना बोनसचे वेध लागतात. पगारासोबत बोनस म्हणून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेमुळे दिवाळीच्या खरेदीला वेग येतो. यंदाच्या वर्षीही कोल्हापूर परिसरातील काही कंपन्यांनी आकर्षक बोनस जाहीर केले आहेत. त्याचप्रमाणे, सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना दहा हजारांची उचल उपलब्ध करून दिल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळीच्या खरेदीला रंग चढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूरनजीक औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दरवर्षी नियमितपणे बोनस दिला जातो. दिवाळीपूर्वी १५ दिवस बोनसची घोषणा होते. बोनसच्या प्रमाणानुसार कर्मचाऱ्यांचे दिवाळी साजरी करण्याचे बेत ठरू लागतात. कंपन्यांप्रमाणेच सहकारी उद्योगांकडूनही कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. गोकुळ दूध संघाने मागील वर्षी कर्मचाऱ्यांना वेतनाच्या २७ टक्के दिवाळी बोनस दिला होता. यावर्षीही २७ टक्के बोनस जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांप्रमाणेच सभासद असलेल्या दूध उत्पादकानांही विविध दूध संस्थांकडून दिवाळीनिमित्त भेटवस्तू व पैसे दिले जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांप्रमाणेच सभासदांचीही दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

बोनसप्रमाणेच दिवाळीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांकडे पैसे असावेत, या उद्देशाने शासकीय मंडळांकडून 'उचल' या नावाखाली कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम दिली जाते. यावर्षी काही शासकीय मंडळांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत उचल मंजूर केली आहे. त्यामुळे दिवाळीची खरेदी करताना सरकारी कर्मचाऱ्यांना हात आखडता घ्यावा लागणार नाही.



खासगी कंपन्यांकडून आकर्षक बोनस जाहीर

यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दिवाळी आली आहे. खासगी कंपन्यांकडून आकर्षक बोनस जाहीर करण्यात येत आहे. खासगी उद्योगांत पगार महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत होतो. गतवर्षी २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी होती, त्यामुळे अनेकांना पगाराची विशिष्ट रक्कम दिवाळीसाठी राखून ठेवावी लागली होती. यंदा मात्र दिवाळीपूर्वीच्या आठवड्यातच पगार व बोनसची रक्कम हाती पडणार असल्यामुळे मनाप्रमाणे खरेदी करणे शक्य होणार आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेतील दिवाळीच्या काळातील उलाढालही गतवर्षीच्या तुलनेत वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हज’करूंनी उलगडली आठवणींची पोतडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीजवळ यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्या भीतीचे आणि असुरक्षिततेचे सावट अजूनही मनात आहे. तीव्र उन्हाच्या झळांचा त्रास, कित्येक मैल चालण्यामुळे शरीरावर येणारा ताण या सगळ्याला क्षणात हलके करणारी त्या ठिकाणची माणुसकी आणि हजारो अडथळे पार करत हज यात्रा पूर्ण केल्याचे समाधान मिळाले, अशा शब्दांत कोल्हापुरात सुखरूप परतलेल्या हजयात्रेकरूंनी आठवणींची पोतडी उघडली.

बकरी ईद साजरी करण्यासाठी मक्का येथे कोल्हापुरातून २७६ हज यात्रेकरू गेले होते. कोल्हापुरातून हज कमिटीतून १५१ आणि यात्रा कंपनीमधून १२५ यात्रेकरू गेले होते. ४० दिवसांच्या प्रवासानंतर त्यांचे मायभूमीत आगमन झाले. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर कुटुंबीयांना भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. ६२ वर्षीय बाबासाहेब शेख यांनी मक्का येथील हज यात्रेच्या अनुभवाचा प्रवास मांडताना मक्का येथील मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. रूईकर कॉलनी येथे राहणारे शेख प्रथमच हजयात्रेला गेले होते.

उष्ण वातावरणाचा त्रास वयोमानानुसार झाला तरी तेथील धार्मिक वातावरण सुखावणारे होते असेही शेख म्हणाले. मक्केचा परिसर खूप चांगला आहेच, पण तेथील माणसेही खूप आपुलकीने वागतात हा अनुभव घेतला. तीव्र उष्म्यामुळे शरीराला एनर्जीची गरज असते. त्यासाठी आमच्यासारख्या यात्रेकरूंना ते सरबत, फळे देण्यात स्थानिक नागरिकांनी खूप मदत केली.

आयुष्यात एकदातरी हज यात्रा करावी असे आमचा धर्म सांगतो. तेरा वर्षांपूर्वी हज यात्रा केली होती. मात्र, आणखी एकदा तरी यात्रा करावी एवढी अपेक्षा होती. यंदा पत्नीसोबत हज यात्रेला गेलो होतो. चेंगराचेंगरीसारख्या होणाऱ्या प्रकारामुळे मनात धास्ती होती. मात्र, ही यात्रा म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. यात्रा करून आल्यावर मिळणारे समाधान संकटावर मात करण्याची शक्ती देते. - अब्दुल बागवान, जवाहरनगर, हज यात्रेकरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता पथक, बंदोबस्ताचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी​ प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी दिवशी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ईव्हीएम मशिन मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. भरारी पथकाच्या कामकाजाविषयी चर्चा होऊन आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी त्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

मतदान व मतमोजणी या दोन्ही दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता करावयाच्या उपाय योजनेसंदर्भात आढावा घेण्यात आला. आयुक्त पी. शिवशंकर व अप्पर पोलिस अ​धिक्षक एस.चैतन्या यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी एस. चैतन्या यांनी पोलिस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची माहिती दिली.

प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनिषा खत्री बैठकीस उपस्थित होते. चर्चेत उपविभागीय पोलिस अधिकारी भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, अमृत देशमुख, दयानंद ढोमे, अनिल देशमुख यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांकडे नेतृत्वाची कुवत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप-शिवसेनेला कोल्हापूरविषयी आस्था नाही. वर्षभरात युती सरकारने कोल्हापूरसाठी काहीच केले नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील तर अपरिपक्व आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही. थेट पाइपलाइन योजना कोल्हापूरवासीयांच्या जिव्हाळ्याची असल्याने पालकमंत्र्यांनी त्याकडे आस्थेने पहायला हवे होते. मात्र त्यांचा वर्षभराचा कारभार कर्तव्यशून्य आहे. कोल्हापूरचा विकास त्यांच्या कुवतीबाहेरचा आहे. विकासयोजना राबविण्याची धमकही त्यांच्यात नाही. मुळात शहराशी निगडित प्रश्न, विषय समजत नाहीत. ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांनी त्यांना गोल केले आहे. त्यांची फसगत केली आहे,' असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'चॅटरुम'मध्ये केला.

प्रश्न : काँग्रेस कोणत्या मुद्यावर निवडणूक लढवित आहे ?

विकास हाच काँग्रेसचा अजेंडा आहे. काँग्रेसने गेल्या पाच वर्षात कोल्हापूर शहरात जी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली, त्याचीच पोचपावती यंदाच्या निवडणुकीत मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना कोल्हापूर शहराला विविध विकास प्रकल्पासाठी १२०० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध झाला. काँग्रेसकडे नगरविकास विभागासारखे महत्वाचे खाते असल्याने विकास प्रकल्पांना चालना मिळाली. तत्कालिन केंद्रीय मंत्री कमलनाथ, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पाइपलाइनसाठी निधी दिला. नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील रस्त्यासाठी निधी मंजूर केला. केशवराव भोसले नाटगृह, खासबाग मैदान सुशोभिकरण, न्यायसंकुल, क्रीडा संकुल अशा विविध प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला. त्याचे फलित म्हणजे, आज कोल्हापूरचा विकासाभिमुख चेहरा निर्माण झाला आहे. सत्तेवर आल्यानंतर पुढील पाच वर्षात लोकाभिमुख कारभाराला प्राधान्यक्रम असणार आहे.

महापालिकेत निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही?

शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. एकाचवेळी अनेक​ प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे निधीच्या विनियोग करताना काही त्रुटी राहिल्या. काही कामे प्रलंबित आहेत हे मान्य आहे. पण उपलब्ध निधीच्या माध्यमातून प्रकल्प पूर्णत्वास आणण्यावर आम्ही भर दिला. पाइपलाइन योजनेच्या मार्गासाठी परवानग्या मिळण्यास विलंब झाला. सततच्या पाठपुराव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यताही मिळाली. पाइपलाइन योजनाही ५२ किलो मीटर लांबीची आहे. प्रकल्पांचे नियोजन अलिकडच्या काळात विस्कळीत झाले. खरेतर आयुक्त हा महापालिका प्रशासनाचा प्रमुख असतो. आयुक्तांची भूमिका ही शहर विकासाला पूरक आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारी हवी. तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी शहर विकासाची भूमिका अंगिकारून कामकाज केला. आयआरबी कंपनीच्या विरोधात त्यांनी कणखर भूमिका घेतली. थेट पाइपलाइन योजना, केएमटीच्या नव्या बसेस याकरिता त्यांनी प्रशासकीय पातळीवर दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. मात्र सध्याच्या आयुक्तांच्या कामकाजाचे काही कळत नाही. शहर विकासाशी निगडीत प्रकल्प, योजनांचे अभ्यास करतात की नाही असा प्रश्न पडतो. महापालिकेचे नुकसान होईल अशी भूमिका कुणाची असू नये.

परवानगीआधीच पाइपलाइन योजनेची वर्कआर्डर काढली?

योजनेतील पाइपलाइन सरकारी मालकीच्या जागेतून टाकली जाणार आहे. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पाइपलाइन मार्ग हा शेतकऱ्यांच्या जमीनीतून, खासगी जागेतून असल्याचे धांदात खोटे सांगत आहेत. मुळात त्यांना पाइपलाइन योजनाच समजली नाही. पालकमंत्री अजून अपरिपक्व आहेत. त्यांना नियमावलीच माहिती नाही. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर गेल्या वर्षभरात २२०० कोटी रुपयांचे प्रोजेक्ट्स त्यांनी रद्द केले. पाइपलाइन योजनेचे उदघाटन करून कामास सुरूवात केली नसती तर योजनेचा निधीही भाजप सरकारने रद्द केला असता. परवानगी मिळण्याआधी घाईगडबडीने पाइपलाइन योजनेची वर्कऑर्डर काढल्या आरोप खोटा आहे. एखादा प्रोजेक्ट मंजूर नसेल तर त्याला परवानगी मिळत नाही हेही भाजपच्या नेत्यांना कसे कळत नाही. एखाद्या प्रोजेक्टसाठी फंडची तरतूद करताना त्या कामावर खर्चाशिवाय पुढील निधीची तरतूद केली जात नाही. युटि​लायझेशन सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय पुढील निधी मंजूर होत नाही, हे सरकारात असणाऱ्यांना माहिती असायला पाहिजे. सरकार हे समुद्रासारखे असते. जो पहिल्यांदा विकासकामे घेऊन जाईल, त्याला निधी मिळतो.

महापालिका निवडणुकीत तुमचा प्रमुख शत्रू कोण?

भारतीय जनता पार्टीला आम्ही रेसमध्ये गृहितच धरलेले नाही. त्यांच्याकडे ८१ प्रभागात उभे करण्यासाठी उमेदवार नाहीत. निवडणुकीत आमचे प्रमुख शत्रू हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ताराराणी आघाडीचा प्रताप नुकताच शिवाजी पार्कात पहावयास मिळाला. गेल्यावेळच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू आघाडीची स्थापना झाली होती. त्यांनी ४२ जागा लढविल्या. उठता बसता महाडिकांचा जपमाळ ओढणारे शाहू आघाडीचे उमेदवार होते. पण लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. भाजपला कोल्हापूरविषयी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी आत्मियता, अभिमान नाही. भाजपच्या जाहीरनाम्यावर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे नाहीत. भाजप भावनिक राजकारण करून लोकांची दिशाभूल करत आहे. त्यांच्या वर्षभराच्या कमकाजातून सरकारचा ढोंगीपणा जनतेच्या लक्षात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवित मते मिळवली. मात्र गेल्या वर्षभरात या सरकारने जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. महागाई गगनाला भिडली. तूरडाळीचा दर २२० रुपयापर्यंत पोहचला. अन्नधान्ये महागली. भाजप, सेनेच्या सरकारकडून लोकांचे स्वप्न भंगले आहे. भावनिक राजकारण करणारे कोल्हापूर शहराचा विकास काय साधणार ? शहरवासियांच्या भंगलेल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याची, त्यांची स्वप्ने साकारण्याची धमक फक्त काँग्रेस पक्षातच आहे. भाजपाने शंभर दिवसात कोल्हापूर टोलमुक्त करू अशी ग्वाही दिली होती. मात्र शहरवासियांची फसवणूक सुरू केली आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली आणि भाजपा सरकारने निधी देण्यात हात आखडता घेतला तर मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर बंद करू. आंदोलने करू.

महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही एकटे आहात ?

महापालिका निवडणुकीत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे असे सगळेजण एकत्रपणे काम करत आहोत. काँग्रेसला चांगले वातावरण असून पक्षाला निश्चित बहुमत मिळेल. माजी आमदार मालोजीराजे यांच्याशीही आम्ही संपर्क साधला होता. पण त्यांनी जिल्हाध्यक्ष पाटील व मला फोन करून निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या पाच वर्षात महापालिकेत मालोजीराजे गटाला जास्त पदे दिली. गट लहान असूनही झुकते माप दिले.

तुमच्यावर विश्वासघाताचा, जमिनी लाटल्याचा आरोप होतो?

विश्वासघात कुणी कुणाचा केला ? हे पहा. लोकसभा निवडणुकीला आम्ही राजकीय वैर विसरून धनंजय महाडिक यांना मदत केली. त्यांचा प्रचार केला. स्वतःच्या खर्चाने प्रचार यंत्रणा राबवली. विधानसभा निवडणुकीत त्यांना आमचा विश्वासघात केला. त्यांच्यामध्ये खरोखर हिंमत असेल, त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी. मग त्यांना त्यांची जागा कळेल. जमीनी लाटण्याचा आरोप गेल्या वीस वर्षापासून केला जात आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९८४ मध्ये विनाअनुदानित तत्वावर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना जमिनी, इमारती दिल्या. या आरोपात तथ्य नाही. आमदार महादेवराव महाडिक यांच्या पक्षविरोधी कारवायाबाबत पक्षाकडे तक्रार केल्या आहेत. त्याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील.

(शब्दांकन : आप्पासाहेब माळी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गल्लीबोळांत घुमल्या प्रचार मिरवणुका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचार समाप्तीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या जल्लोषी मिरवणुका गुरूवारी शहराच्या गल्लीबोळात घुमल्या. राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांकडून सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत मिरवणुका शहर व उपनगरात सुरु राहिल्या. उमेदवारांचा जयघोष, प्रचाराच्या रिक्षा, कोपरा सभा, मेळाव्यांनी शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवेसना, राष्ट्रीय समाज पक्ष, एसफोरए आघाडी, लोकशाही आघाडी, शेतकरी कामगार पक्ष आणि काही अपक्षांनी प्रभागात मिरवणुका काढल्या. मिरवणुकीत शक्तीप्रदर्शनावर भर राहिला. पक्षाचे झेंडे, उमेदवारांचे फलक, उमेदवारांकडून पक्षाची प्रतिमा असलेली चिन्हांचे वाटप करण्यात आले. रिक्षा, मोटारसायकल, जीपही मिरवणुकीत सहभागी झाल्या. शिवसेना कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हात चिन्ह असलेले टी शर्ट परिधान केले तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना घड्याळाची प्रतिकृती असलेल्या चिन्हांचे वाटप केले. भाजपच्या उमेदवारांनी प्रभागात कमळाचे वाटप केले.

पक्षांनी दिवसभर प्रचारफेरी, मिरवणुकांवर भर दिला. ताकदीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. उमेदवारांच्याकडून प्रभागातील प्रत्येक कॉलनीत काढलेल्या प्रचार फेरीचा आढावाही घेण्यात आल्या. हक्काचे मतदान मिळणार असल्याची खात्री असलेल्या कॉलनीत शक्तीप्रदर्शनावर अधिक भर राहिला. या ठिकाणी प्रत्येक घरात जाऊन मतदारांचे मत परिवर्तन करण्यावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा भर राहिला.

प्रचार यंत्रणेत प्रत्येक उमेदवाराने रॅलीतून शक्तीप्रदर्शन केले. कोपरा सभा, स्पिकर लावलेल्या रिक्षा, उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांचा प्रचार सुरु आहे. प्रचार फेरी, सायकल, मोटारसायकल फेरी, नेत्यांच्या कोपरासभा, मेळावे घ्ण्यात आले. हलगी, झांजपथकाच्या गजरात नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.



रविवारी बाजार बंद

दरम्यान, रविवारी महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे. सारे शहर त्यामध्ये गुंतलेले असेल. त्यामुळे दर रविवारी भरणारा लक्ष्मीपुरीतील बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, असे व्यापाऱ्यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राजेश क्षीरसागर चुकून झालेले आमदार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजेश क्षीरसागर चूकून झालेले आमदार आहेत. शिवसेनेकडून सुरु असलेल्या टीकेला भाजप भीक घालणार नाही,' असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'शहराच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून विरोधकांच्याकडून चिखलफेक सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना चिखलफेकीत आघाडीवर आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, उपनेत्या नीलम गोऱ्हे, नेते रामदास कदम आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी टीकेची झोड उडविली आहे. मात्र या टीकेचा भारतीय जनता पक्षावर काहीही फरक पडणार नाही. शिवसेनेकडून सुरु असलेली टीका भाजप एन्जॉय करतोय. कोल्हापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस कोटी रुपये दिले. निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांत तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.' खासदार संजय पाटील म्हणाले, 'शहराच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करण्याची गरज आहे.' यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, महेश जाधव यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकू काढला तर ‘गोविंदा’ होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पानिपत होणार असल्याच्या भितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमहवन, नवस केले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काही दिवसच शिल्लक आहेत. टेकू काढून घेताच त्यांचा गोविंदा झाल्याशिवाय राहाणार नाही,' असा टोला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावला. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी हुतात्मा तोरस्कर चौकात झालेल्या सभेत कदम यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह भाजपवर टीकेची अक्षरश: झोड उठविली.

कदम म्हणाले,' विदर्भ मराठवाड्यात दुष्काळामुळे माणसे किड्यामुंग्यांसारखी मरत असाताना देशाचे पंतप्रधान जगभर दौरे करत आहेत. बिहारसारख्या राज्यांना कोट्यवधींची मदत दिली जात असून दुसरीकडे महाराष्ट्राला दमडीही मिळत नसल्याचे वास्तव आहे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंना खुद्द आपल्या गावची ग्रामपंचायत राखता आलेली नाही. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला भ्रष्टाचार नवा नाही. अजित पवार, छगन भुजबळ यांची चौकशी नावापुरतीच सुरु आहे. दिल्लीतून फोन येताच ती थांबते.'



आयजीच्या जिवावर बायजी...

'कोकणात आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जिवावर जावई सुभेदार', अशी म्हण आहे. त्यानुसार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या कार्याचे श्रेय भाजपचे मंत्री घेत आहेत. शिवसेनेने केलेल्या टोलमुक्तीचे श्रेय घेवून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 'सुभेदार' झाले आहेत,' अशी टीका कदम यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नथुरामी प्रवृत्ती हद्दपार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नथुरामी प्रवृत्तीवर कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनाचा संशय आहे. त्या प्रवृत्तीला भाजपच्या मंत्रिमंडळाचा पाठींबा असल्याचा सणसणीत आरोप करत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पानसरेंवर झाडलेल्या गोळ्यांचा बदला मतपेटीतून घेत शाहू महाराजांच्या पुरोगामी शहरापासून भाजपला दूर ठेवा, असे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जवाहरनगरमधील​ सिरत मोहल्ल्यामध्ये गुरुवारी रात्री आव्हाड यांची सभा झाली. यावेळी भाजप, त्यांच्या विचारसरणीच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावर आव्हाड यांनी भाषणातून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'देशात द्वेषाचे वातावरण पराकोटीला पोहचले आहे. देशात काय खायचे, ताटात काय वाढायचे, मुलींनी कोणती कपडे वापरायची, किती वाजता बाहेर जायचे हे सारे भाजप, आरएसएस, बजरंग दल ठरवणार असेल तर देश संविधानावर चालणार नाही. गोमांस शिजवण्याचा वास येतो म्हणून लष्करी जवानाच्या वडिलांना जाळून मारले जात आहे. दलितांच्या मुलांना जाळले जाते. माणसे मारण्याची फॅक्टरी अशीच सुरु राहिली तर देश एकसंघ राहणार नाही.

शाहू महाराजांनी देशाला समतेचा विचार दिला. ही नगरी विचारवंतांची आहे. पानसरेंच्या खूनप्रकरणामध्ये फॅसिस्ट विचारसरणीचाच संशय आहे. अशा प्रवृत्तीला भाजपच्या मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचाच पाठींबा आहे. ज्यादिवशी पानसरे यांचे निधन झाले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील दिवसाचा एकही कार्यक्रम रद्द केला नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. तसेच फक्त फोनवरुन बोलले तर खून केला असे कसे म्हणू शकतो असे त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सांगत असतील तर त्याचा दबाव पोलिस यंत्रणेवर किती पडत असेल याचा विचार करा. हे फक्त फॅसिस्ट लोकच करु शकत असल्याने देश हिटलरशाहीच्या दिशेने चालला आहे याचा गांभीर्याने विचार करा.'

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील यांची भाषणे झाली. सभेला उमेदवार सुहास सोरटे, सरचिटणीस अनिल साळोखे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदी उपस्थित होते.



शाहूंचे विचार जिवंत ठेवा

आव्हाड म्हणाले, 'भाजपसारखे पक्ष भावनिक वातावरण तयार करुन सत्तेवर येतील, राज्य करतील. पण देशाचा यामध्ये बट्ट्याबोळ होणार आहे. अशा लोकांच्या हातात कोल्हापूरची सत्ता जाऊ नये यासाठी पानसरे यांच्यावर झाडलेल्या प्रत्येक गोळीचा बदला मतपेटीतून घ्या. पुरोगामी विचार संपवण्यास निघालेल्या या लोकांना जोरदार उत्तर देऊन शाहूंचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेना दरी रुंदावली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपकडे सरकार चालवण्यासाठी पर्याय आहेत असे म्हणता, मग ते वापरले का नाहीत? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो ऱ्हे यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना केला. त्याचवेळी पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने,' अशा पद्धतीचे आहे, असा टोलाही लगावला. पाटील यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी बेहत्तर, असे वक्तव्य बुधवारी केले होते. त्यांना गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले.

वाद मिटलेले असताना पाटील यांनी मुद्दाम युतीवर भाष्य करून वाद वाढवल्याचा आरोप करून त्या म्हणाल्या, 'राज्याचा विकास आणि सरकारच्या स्थैर्यासाठी शिवसेना सत्तेत आहे. पाटील यांच्या सांगण्यावरून कुणी युती तोडणार नाही. भाजपकडे दोन पर्याय आहेत असे म्हणणाऱ्या पाटील यांनी सुरुवातीलाच ते पर्याय का वापरले नाहीत?' हाणामारीतील ६० गुंडांना पोलिस प्रशासन हद्दपर करणार होते त्याचे काय झाले? असा प्रश्न करीत करवाई झाली नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रर करणार असल्याचा इशाराही दिला.



'मटा'च्या वृत्ताचा संदर्भ

'शिवसेना सत्तेबाहेर गेली तरी बेहेत्तर' अशी बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी या बातमीचा संदर्भ देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर पवार कुटुंबीयांच्या जमीन घोटाळ्यासाठीही गोऱ्हे यांनी महाराष्ट्र टाइम्सचा संदर्भ देत 'मटा'मधील बातमीचे कात्रणही पत्रकारांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाद्यांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी, विविध पक्षांच्या टोप्या-स्कार्फ-झेंड्यांसह उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शहरात दणकेबाज प्रचारफेऱ्या काढल्या. शुक्रवारी सायंकाळी प्रचाराचा समारोप असल्याने बहुतांश उमेदवारांनी गुरुवारीच प्रचारफेऱ्या काढल्याने शहर ढवळून निघाले. तसेच छुप्या हालचालींना प्रारंभ झाला असून प्रत्येक मतदारापर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहचवण्याची उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून उमेदवारांनी विविध माध्यमातून चालवलेल्या प्रचाराचा समारोप शुक्रवारी होत आहे. गुरुवारी सकाळी काही प्रमाणात, पण सायंकाळी बहुतांश भागांमध्ये उमेदवारांनी फेऱ्यांचे नियोजन केले होते. छोटे गल्लीबोळ न पकडता प्रभागातील प्रमुख मार्गावरुन या फेऱ्या काढल्या. त्यामध्ये भागातील महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. सहभागी प्रत्येकाच्या डोक्यावर पक्षाच्या टोप्या, स्कार्फ, टी शर्ट, रंगीत फुगे, झेंडे व चिन्हांचे फलक यामुळे या फेऱ्या लक्षवेधी ठरत होत्या. तसेच वाद्यांचा गजर आणि फेऱ्यांच्या मार्गावर फिरणारे प्रचाराचे वाहन यामुळे वातावरण चांगले तयार झाले.

सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार संपणार आहे. तोपर्यंत विविध माध्यमातून प्रचार करण्याचे नियोजन चालवले आहे. काही उमेदवारांनी सेलिब्रेटींना आणून शेवटची फेरी काढण्याचे नियोजन केले आहे. जो भाग धोकादायक वाटतो तिथे जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी छोट्या रॅली काढण्याचे काही उमेदवारांचे नियोजन आहे. शनिवारी दिवसभर प्रत्येक प्रभागातील अंतर्गत जोडण्या केल्या जाणार आहेत.



प्रचार सभांना दिग्गजांची उपस्थिती

प्रचारादरम्यान सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यात भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे पंकजा मुंढे, प्रा. राम शिंदे, कांता नलवडे, खासदार संजय पाटील, काँग्रेस उमेदवारांसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, राष्ट्रवादीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आणि शिवसेनेच्या प्रचाराठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, विनायक राऊत, रवींद्र वायकर, रामदास कदम यांचा समावेश होता. याशिवाय खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्याही सभा झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images