Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘टेट’ परीक्षा २७ डिसेंबरला

$
0
0

कोल्हापूरः महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) घेण्याची जबाबदारी सरकारने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली असून, ही परीक्षा २७ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन मंडळे, माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व माहिती mahatet.in व mscepune.in या संकतेस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबरअखेर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धूमधडाका सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलगीचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारी प्रचाराची होणारी सुरूवात, घरोघरी वाटली जाणारी उमेदवारांची निवेदने, कॉर्नर सभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांना विजयासाठी घातले जाणारे साकडे, विजयाच्या घोषणा आणि टोप्या, मफलर परिधान करत गल्लीबोळातून निघणारी रॅली असे प्रचाराचे धुमशान शहराने रविवारी अनुभवले. रविवारची सुटी कॅश करत उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढला. सगळ्याच पक्षाचे नेते निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

रविवार या सुटीच्या दिवसाचा उमेदवारांनी प्रचारासाठी पुरेपूर फायदा उठविला. सकाळपासूनच प्रचाराच्या वाहनातून मतदारांना साद घालण्यास सुरुवात झाली. रविवार असल्याने बहुतांश मतदार घरी असतात, यामुळे अनेक उमेदवारांनी प्रत्यक्ष संवादावर भर दिला. घरोघरी भेट देत प्रभागाच्या विकासासाठी पाठबळ देण्याची विनंती करण्यात आली. शनिवारी चिन्ह वाटप झाल्याने उमेदवार पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरले. प्रचाराने संपूर्ण शहरभर खऱ्या अर्थाने रविवारी निवडणुकीचा माहोल तयार झाला. प्रमुख पक्षांचे नेते थेट प्रचारात उतरल्याने प्रचाराची धार वाढली आहे. 'चाय पे चर्चा' ते प्रचार सभा यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यंतराला राजकीय वातावरण तापले आहे.

भ्रष्टाचाराची चौकशी थांबविण्यासाठी पालकमंत्री पाटील यांना आमदार महाडिक यांचे सहकार्य.

- आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

ताराराणी आघाडीला 'कपबशी' ऐवजी 'मटका' हेच चिन्ह योग्य. आमचा शत्रू काँग्रेस आणि राष्ट्रवादी हाच.

- नीलम गोऱ्हे, उपनेत्या, शिवसेना

भविष्यात महाडिक कुटुंबीयांना पक्षही कमी पडतील. अशा प्रवृत्तींना महापालिका निवडणुकीत रोखा.

- आमदार जयंत पाटील, शेकाप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगावच्या बाजारात पाच कोटींची उलाढाल

$
0
0

बैलजोडी सव्वाचार लाख, तर गाय ९० हजारांना विक्री

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

वडगाव (ता. हातकणंगले) येथे सोमवारी भरलेल्या श्री महालक्ष्मी जनावर बाजारात सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये सव्वाचार लाखाला बैलजोडी, तर ९० हजाराला गाय, सांगोल्याचे बोकड ७५ हजार अशा प्रकारे उच्चांकी दर मिळत जनावरांची विक्री झाली. वडगाव येथे दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात जनावरांचा बाजार भरण्याची परंपरा आहे. याहीवर्षी ही परंपरा कायम राखत महालक्ष्मी मंदिर ते वडगाव न्यायालयापर्यंत जनावरांचा बाजार भरला.

बाजारात बैल दोन हजार, म्हशी ७००, गाई ५००, शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. आजच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत सुमारे ८० लाखांची उलाढाल झाली. म्हशींच्या विविध प्रकारच्या २० जाती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. यामध्ये अनिल जाधव (मिणचे) यांची म्हैस एक लाख २० हजार रुपयांना दिलीप सांगले यांनी खरेदी केली. बैलांच्या बाजारात नायकू भोसले यांची बैलजोडी सव्वा लाखाला विक्री झाली, तर तळसंदेच्या बाबासाहेब चरणे यांची गाय ९० हजार रुपयांना घुणकीच्या आबा काशीद यांनी खरेदी केली. बाजारात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आदी राज्यांतून व्यापारी व शेतकरी आले होते. बाजाराचे आयोजन वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केली. सभापती विलासराव खानविलकर, संचालक नितीन चव्हाण, अजित पाटील यांनी भेट दिल्या. बाजार अधिक भरल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबांनीच दिला दातृत्वाचा वसा

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या रसिक मनावर कथा, कादंबऱ्यांच्या माध्यमातून मोहिनी घालणारे सिद्धहस्त लेखक बाबा कदम यांचा मंगळवारी (ता. २०) सहावा स्मृतिदिन. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या वीरसेन आनंदराव कदमांना अवघा महाराष्ट्र 'बाबा कदम' या नावानेच ओळखतो. बाबांनी त्यांच्या आयुष्यात सरकारी वकील म्हणून जितकी ख्याती मिळवली त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ख्याती साहित्यिक म्हणून मिळवली. त्यामुळेच त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत राज्याभरातील बड्या साहित्यिकांचा राबता त्यांच्या कोल्हापुरातील घरात राहिला. साहित्य, पटकथा, चित्र अशा विविध क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणाऱ्या या लेखकाच्या आठवणी जाग्या केल्या त्यांच्या पत्नी कुमुदिनी कदम यांनी.

वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी बाबा कदमांबरोबर विवाहाच्या बंधनात अडकलेल्या कुमुदिनी कदम तशा बाबांच्या नात्यातीलच. त्यामुळे लग्नाआधीपासूनच बाबांशी त्यांचा परिचय होता. लग्नाआधी सुटीला कोल्हापुरातील रविवार पेठेतल्या घरात आले की, दररोज रात्री घरातील सर्व मुलांना बाबा गोष्टी सांगायचे. खुलवून गोष्टी सांगण्याच्या हातोटीमुळे इतर मुलांना बाबांचे नवल वाटायचे. पुढे बाबांच्या आईच्या आजारपणामुळे घाईगडबडीतच बाबा आणि कुमुदिनी यांचा विवाह झाला. लग्नानंतर शिक्षणापासून दूर गेलेल्या कुमुदिनी म्हणजे माईंना बाबांनीच प्रोत्साहन देऊन पुन्हा शिकण्याची इच्छा निर्माण केली. बाबांच्या सरकारी वकिलीच्या नोकरीत ठिकाणे बदलत राहिली तरीही त्यांच्या प्रोत्साहनामुळे शिक्षणाची आस मात्र कमी झाली नाही. जेव्हा सोने ८० रुपये तोळा विकले जात होते, तेव्हा ३० रुपयांची फी देऊन बाबांनी शिकवणी लावली होती. बाबांमुळेच वि. स. खांडेकर, ग. ल. ठोकळ, नाथमाधव, ह. ना. आपटे यांचे साहित्य माईंना वाचायला मिळाले. बाबांनी साहित्याची आवड लावल्यामुळेच त्या काळात मराठीतून एम. ए. पूर्ण करू शकल्याचे माई सांगतात.

बाबा कदमांच्या कादंबऱ्या लोकप्रिय होत असताना राज्यभरातील अनेक मान्यवर साहित्यिक कोल्हापुरातल्या त्यांच्या घरी हजेरी लावत होते. यामध्ये ग. दि. माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, पु . ल. देशपांडे नियमित यायचे. पु. ल. देशपांडे, पाडगावकर आणि कदम कुटुंबियांचे आजही घरोब्याचे संबध आहेत. कुणी साहित्यिक घरी आले की, तासनतास वाङमयीन गप्पांच्या मैफिली रंगायच्या अशा आठवणी सांगताना माई नकळत त्या काळात हरवतात. अनेक गाजलेल्या पुस्तकांची कथानके कोल्हापुरातील माईसाहेब बावडेकरांच्या बंगल्याशेजारी असलेल्या बाबा कदमांच्या घरातच जन्माला यायची, असे माई अभिमानाने सांगतात. स्वतः बाबांनी ७५ कादंबऱ्या लिहिल्या. मोठे साहित्यिक आणि प्रतिष्ठित सरकारी वकील अशी त्यांची ख्याती होती, मात्र कधीही त्यांनी पैशाचा हव्यास धरला नाही. खटला जिंकल्यावर साधी मेथीची पेंडी जरी एखाद्या शेतकऱ्याने देऊ केली तरीही तितक्याच नम्रतेने ती परत केल्याच्या आठवणी सांगताना माईंचे डोळ्यांच्या कडा ओलावतात. बाबांनीच वाचनाची आवड निर्माण केल्याने आवर्जून सांगत आज वयाच्या ७६ व्या वर्षीही आपण काय वाचत आहोत हे उत्साहाने सांगतात. त्यांनी लिहिलेले काही लेखही नियतकालिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून प्रकाशित झाले आहेत. सध्या त्या एक कादंबरी लिहित आहेत, तर आत्मवृत्तही पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. काही अनुभव लिहिण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या सांगतात.

'नाम'ला ४५ हजार

कुमुदिनी कदम यांनी आपल्या आयुष्यातील गतकाळाला उजाळा देत अनुभव शब्दबद्ध करण्याचे काम सुरू ठेवले आहे. आत्मवृत्ताला 'जीवनगाणे' असे नाव दिले असून लवकरच ते प्रसिद्ध होणार आहे. यातून बाबा कदम यांचेही व्यक्तिमत्त्व उलगडणार आहे.

'जीवनगाणे' लवकरच

राज्यात यंदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदतीसाठी 'नाम' संस्था स्थापन केली आहे. कुमुदिनी कदम यांनी 'नाम' ४५ हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच ही रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना समजला तरच दुष्काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन मळणी जवळपास अंतिम टप्प्यात आहे, पण गतवर्षाच्या तुलनेत उत्पादन अर्धेही हाती लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अपुऱ्या पावसाने उत्पादनावर झालेला परिणाम पाहण्यासाठी कुणीही सरकारी अधिकारी फिरकत नाहीत, त्यामुळे केवळ कार्यालयात बसून केलेल्या पाहणी अहवालात खरा दुष्काळ दिसणार कसा ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. तर राज्याचे सत्ताकेंद्र विदर्भात गेल्याने जाणीवपूर्वक कोल्हापूरवर अन्याय होत असल्याची भावना विरोधी लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यातील १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याने त्या गावांमधील शेतकऱ्यांना करसवलती मिळणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या मुलांना शैक्षणिक फीमध्ये थोडासा दिलासा मिळणार असल्याने त्यांना दुष्काळ सुसह्य होण्याची शक्यता आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी केवळ पावसावर शेती अवलंबून आहे अशा ठिकाणी शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्ण पाऊसकाळात केवळ ३७.८ टक्के पाऊस पडल्याने पिकांची योग्य वाढ झाली नाही, परिणामी उत्पादनात मोठी घट होत आहे. कृषी विभागाने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या पाहणीनुसार भात आणि नागली पिकाचे २५ ते ३० टक्के नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, मात्र त्यानंतर पिकांना उपयोगी ठरणारा पाऊस बिलकूल झाला नसल्याने नुकसानीत मोठी वाढ झाली आहे.

कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात सोयाबीन हे नगदी पिक फारच महत्त्वाचे समजले जाते. अपुऱ्या पावसाने सोयाबीनचे उत्पादन ५० टक्क्यांहून अधिक वाया गेले आहे. याचा मोठा परिणाम स्थानिक बाजारपेठेत जाणवणार आहे. सोयाबीनला फटका बसल्याने दिवाळीसाठी शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित पैसे पडणार नाहीत. भात आणि नाचणीच्या पिकाबाबतही अशीच स्थिती आहे. वर्षभरासाठी खायला पुरेल इतकेही भात हाती लागणार नाहीत अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

जिल्ह्यात भात, ऊस, भूईमूग आदी महत्त्वाची नगदी पीके आहेत. मात्र अपु‍ऱ्या पावसामुळे यांना मोठा फटका बसला आहे. ऊसाचे वजनही घटण्याचा धोका आहे. सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन नुकसानीची पाहणी करावी. ज्या ठिकाणी खरोखरच पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि सवलतीही द्याव्यात, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

'सरकारी नियमानुसार जिल्ह्यातील पिकस्थितीची पाहणी केली आहे. सप्टेंबर महिन्यातील पाहणीत २५ ते ३० टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता पिक कापणीच्या दरम्यान आणखी एकदा पाहणी करून अहवाल सरकारकडे पाठवणार आहे.

- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक

'कर्मचारी आणि अधिकारी कधीच बांधापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान नसल्याचा अहवाल देणे म्हणजे आमची चेष्टा करण्याचाच प्रकार आहे. असेच दुर्लक्ष केले जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या करतील.

- यशवंत निर्मळे, शेतकरी, आजरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडळाची निवडणूक लांबणीवर

$
0
0

Appasaheb.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : मराठी चित्रपट व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सध्याच्या कार्यकारिणीची मुदत डिसेंबर २०१५ मध्ये संपते. नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. निवडणूक विषयक कार्यक्रम ठरविण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेला आहेत. गेली दोन वर्षे महामंडळाची सर्वसाधारण सभा झालेली नाही. यंदा महामंडळाची सभा कधी होणार आणि निवडणूकविषयक कार्यक्रम कधी ठरणार याकडे सिनेव्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचा कारभार वादग्रस्त ठरला. २७ ऑगस्ट २०१३ रोजी नव्या अध्यक्ष निवडीसाठी कार्यकारिणीची बैठक झाली. विजय कोंडके आणि विजय पाटकर हे दोघे अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने मतदान घेण्यात आले. दोघांना प्रत्येकी सात मते पडल्याने दोघांना अध्यक्षपदाचा कार्यकाल एकेक वर्षाकरिता देण्याचे ठरले. सिनीअर या नात्याने कोंडके यांची अध्यक्षपदी निवड झाली. सुर्वे यांच्या कालावधीतील खर्च व कामकाजाचे फेरऑडीट आणि इतर कारणावरून कोंडके आणि कार्यकारिणीत मतभेद झाले. ४ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत कोंडके यांना राजीनामा सादर करावा लागला. त्यानंतर पाटकर यांच्याकडे अध्यक्षपद आले. दरम्यानच्या कालावधीत कोंडके यांनी कार्यकारिणीच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली.

सत्तारूढ गट : जागृती पॅनेल बारा संचालक (अध्यक्षः विजय पाटकर, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, संजीव नाईक, सतीश बीडकर,अनिल निकम, विजय कोंडके, प्रसाद सुर्वे, अलका आठल्ये, इम्तियाज बारगीर, सदानंद सुर्यवंशी, बाळकृष्ण बारामती)

समर्थ पॅनेल : दोन संचालक (सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे)

मतदानाचा अधिकार : अ वर्ग सभासदांना ​(संख्या सहा हजाराच्या आसपास)

दोन वर्षे सभा नाही

महामंडळाच्या घटनेनुसार वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा होणे गरजेचे आहे. महामंडळाची सर्वसाधारणसभा यापूर्वी २ ऑगस्ट २०१३ रोजी झाली. महामंडळाच्या विरोधात काहीजणांच्या तक्रारी, कोर्टात याचिका यामुळे गेल्या दोन वर्षात सर्वसाधारण सभा झाली नाही. फेरऑडीटचा अहवाल अद्याप सभेपुढे सादर व्हायचा आहे. महामंडळाची निवडणूक आतापर्यंत चित्रपट व्यावसायिकांपुरती मर्यादित राहिली आहे.

'महामंडळाच्या कार्यकारिणीची पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठक आहे. बैठकीत सर्वसाधारण सभा कधी बोलवायची यासंबंधी निर्णय होईल. निवडणुकीचा कार्यक्रम, त्या संबंधी ठराव करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला आहेत. सर्वसाधारण सभा निवडणूक कार्यक्रम व निवडणुकीसाठी कमिटी स्थापण्याचा निर्णय घेईल.

- सुभाष भुरके, प्रवक्ता, मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक छळप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीतील आणखीन दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. शांताराम सोमा गोताड (वय ४४, रा. आसरानगर) व श्रीकांत प्रकाश केसेकर (३२, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रविवारी अटक केलेल्या शांताराम व श्रीकांत हे दोघेजण गरजू महिलांना हेरून पैशाचा पाऊस पाडतो अशी बतावणी करून त्यांना पैशाचे आमिष दाखवत. टोळीचा म्होरक्या भोंदूबाबा भीमराव शिंदे याच्याशी ते भेट घालून देत. आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांवर कारवाई करण्यात आली आहे. पैकी या टोळीचा म्होरक्या भीमराव शिंदेचा मृत्यू झाला असून सुरेश स्वामी, हणमंत राऊत, गोताड आणि केसेकर पोलिस कोठडीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने पारगाव पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत योजनेच्या चौकशीचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक एस. एस. शिंदे यांना दिले आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व ग्रामीण पाणीपुरवठा बबनराव लोणीकर यांनाही पाठविली आहे.

योजना २००९ मध्ये हाती घेण्यात आली. ती एका वर्षात कार्यन्वित होणे बंधनकारक होते. मात्र, अद्याप ही योजना पूर्णक्षमतेने कार्यन्वित झालेली नाही. तसेच झालेल्या कामामध्ये अनेक साहित्य नित्कृष्ट दर्जाचे वापरले गेले आहे. सुमारे एक कोटी ७६ लाख रुपयांच्या योजनेमध्ये तब्बल १५ लाख रुपये खर्च करुन जलशुद्धीकरण केंद्र उभा केली आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्र उभा करूनही ग्रामस्थांना नदीतून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. योजनेमध्ये वापरलेल्या पाइप, इलेक्ट्रिक मोटर, पाइप खुदाई, टाकीच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ग्रामसभेला १७०२ ग्रामस्थांची उपस्थिती

ग्रामसभेतील ग्रामस्थांची उपस्थिती नेहमीच चर्चेची विषय बनला आहे. राज्य सराकारच्या अद्यादेशानुसार स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाला प्रत्येक गावात ग्रामसभांचे आयोजन केले जाते. यानुसार जुने पारगाव येथे १५ ऑगस्टला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला एक हजार ७०२ ग्रामस्थांची उपस्थिती दाखवली आहे. माहिती अधिकारी याची माहिती घेतली असताना यामध्ये अनेक ग्रामस्थांच्या बोगस सह्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय फोडले

$
0
0

कोल्हापूरः उजळाईवाडी येथील बांधकाम व्यावसायिक राजू माने यांचे कार्यालय व मोटारीची तोडफोड करण्यात आली. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक वादातून माने यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली. माने यांच्या भावाने तोडफोड केल्याची चर्चा आहे. माने यांचा भाऊ महामार्ग पोलिसांच्या सेवेत आहे. उजळाईवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत गुन्हा नोंद झाला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्याच्या ऑडिटची मागणी

$
0
0

कोल्हापूरः रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणासाठी गेल्या पंधरा वर्षांत (सन २००० पासून) खर्च केलेल्या निधीचे ऑडिट करण्यात यावे. रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभिकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तरीही तलाव स्वच्छ व सुंदर झाला नाही. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रंकाळा प्रेमींनी केली आहे. रंकाळ्याच्या प्रदूषणास सांडपाणीच कारणीभूत आहे. महापालिकेने आजपर्यंत तकलादू उपाययोजना करून कोट्यवधी खर्च दाखविला आहे. आता राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलावाच्या सुशोभिकरण आणि संवर्धनासाठी १२५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. यापूर्वी मिळालेल्या आठ कोटी ६५ लाखांचा निधी योग्यपणे खर्च केला नाही. त्यामुळे रंकाळा तलावाला आजपर्यंत मिळालेल्या निधीचा आणि झालेल्या कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी शरद तांबट, कॉम्रेड चंद्रकांत यादव, दिलीप कदम यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीडीप्रकरणी वारसांना हाकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मस्कत येथे अपघातात मरण पावलेल्या नीतिश पाटीलचे वडील आणि नातेवाईक डीडीविषयी विचारणा करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले असता, डॉ. सैनी यांनी अपमानजनक भाषा वापरून कार्यालयाबाहेर हाकलल्याची तक्रार वारसांनी प्रसारमाध्यमांकडे केली. डॉ. सैनी यांच्या या वर्तनामुळे डीडी गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी वारसांनी केली आहे.

मृत नीतिश पाटील याचे वडील तुकाराम पाटील यांच्यासह इतर नातेवाईक सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना भेटण्यासाठी गेले होते. कार्यालयात गेल्यानंतर नीतिशच्या नातेवाईकांनी डीडीबाबत विचारणा केली. आठवड्याभरात जिल्हा प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली? मस्कतमधून डीडी परत आणण्यासाठी काय काम केले? असे विचारल्यानंतर संतप्त झालेल्या डॉ. सैनी यांनी, 'तुम्ही जज्ज आहात काय, मी तुम्हाला का सांगू? आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. तुम्ही बाहेर चला,' असा आदेश सोडला. सूचनेनंतरही लोक कार्यालयातच थांबल्याचे पाहून भडकलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'तुमको अंदर करुंगा' असा दम भरल्याचा आरोप मृत नीतिशच्या नातेवाईकांनी केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी नातेवाईकांना कार्यालयाबाहेर हाकलले. त्यानंतर काही वेळाने जिल्हाधिकाऱंनी पुन्हा नातेवाईकांना पोलिसांकरवी आत बोलावले मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा संताप पाहून नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेतला.

दरम्यान, मस्कत दुतावासाकडून डीडीबाबत मेल आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी दिली आहे. एका लिपिकावर निलंबनाची कारवाई केली असून, इतर जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या एका टोकापासून न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो, पण त्यांनी आमचे म्हणणे ऐकूण घेण्याच्या आधीच बाहेर हाकलले. आता न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न आम्हाला पडला आहे. जबादार सर्वांवरच कारवाई व्हावी.

- तुकाराम पाटील, नीतिशचे वडील

माझ्या कार्यालयात येऊन मला उद्धटपणे प्रश्न विचारणाऱ्यांना मी कार्यालयाबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. नेमके वारसदार कोण आहेत याबाबत मला कल्पना नव्हती. आम्ही दररोज या प्रकरणाचा आढावा घेत असून तातडीने डीडी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपारीचे दोन संशयित पळाले

$
0
0

कोल्हापूरः हद्दपारीची शिक्षा झालेल्या दोन गुन्हेगारांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील संशयित गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे. तरीही हद्दपार करण्यात आलेल्या संशयितांचा वावर कोल्हापुरात असतो. अशा संशयितांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे.

शहरातील एका झोपडपट्टीतील हद्दपार करण्यात आलेले दोन संशयित झोपडपट्टी परिसरात आलेल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याला मिळाली. या आधिकाऱ्याने दोन पोलिसांना घेऊन झोपडपट्टी परिसराकडे मोर्चा वळवला. झोपडपट्टी परिसरात दोघे संशयित दिसले. अधिकारी व दोन पोलिसांनी या दोघांचा पाठलाग केला. त्यातील एक संशयित पोलिस अधिकाऱ्याला सापडला. पण त्याने थेट पोलिस अधिकाऱ्याला ढकलून दिले व धूम ठोकली. अधिकारी खाली पडल्याने त्यांना सावरण्यासाठी दोघे कर्मचारी धावले. या गडबडीत संशयित दोघे पळून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगतकरांचे अखेर निलंबन

$
0
0

सहकार आयुक्त दळवी यांनी दिले निलंबनाचे आदेश

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या हातकणंगले येथील उपनिबंधक सुनील सिंगतकर यांना निलंबन करण्यास अखरे सरकारला मुहूर्त मिळाला. लाच स्वीकारल्यापासून तब्बल दीड महिन्यानंतर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सिंगतकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले. निलंबनाचा आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी कार्यालयीन शिपायांकरवी बजावला आहे. सिंगतकर यांच्याशिवाय त्यांचा सहकारी संजय थैल याची सांगली जिल्ह्यात बदली केली आहे. सहकार आयुक्तांनी विभागीय सुनावणीचे दिलेले आदेश आणि सिंगतकर यांच्या निलंबनामुळे सहकाराची शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शिवशाहू मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची जमीन विक्री करण्यास मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले तालुक्याचे उपनिबंधक सुनील सिंगतकर, कर्मचारी संजय थैल व चालक राजेंद्र चव्हाण यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. सिंगतकर यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. मात्र कारवाईच्या प्रस्तावाची फाईल पुढे सरकत नव्हती. सिंगतकर यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव गेले अनेक दिवस जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पडून होता.

सिंगतकर यांच्यावर कारवाई होत नसल्याने संस्थेचे संचालक वैभव कांबळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तसेच हातकणंगले निबंधक कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांची बदली झाल्याने कारवाईला दिरंगाई होत होती. अखेर सहकार आयुक्तांच्याकडे अहवाल दाखल झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे. या काळात त्यांना सांगली कार्यालयात हजेरी द्यावी लागणार आहे. समकक्ष अधिकाऱ्यांसमोर हजेरी द्यावी लागणार असल्याने त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

कारवाई रोखण्याचा प्रयत्न

उपनिबंधक सुनील सिंगतकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांनी निलंबनाची कारवाई रोखण्यासाठी सर्व पर्यायांचा अवलंब केला होता. यामुळे त्यांच्यावरील अहवाल जवळपास दीड महिने धूळखात पडला होता. अखरे सहकार आयुक्त दळवी यांनी निलंबनाचे आदेश बजावले. हा आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शिपायाकरवी पुणे येथील निवासस्थानी जाऊन दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटकेवाल्यांची परंपरा आमची नव्हे

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिटोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराराणी आघाडीत एक तरी उमेदवार मटकेवाला दाखवावाच. मटकेवाल्यांची परंपरा आमची नसल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांचे नाव न घेता लगाविला. स्मार्ट सिटीत कोल्हापूरचा समावेश न होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना कपबशी ऐवजी मटका चिन्हच योग्य असल्याचे वक्तव्य रविवारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी कडाडून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'कधी कधी विरोधक अशी वक्तव्य करतात की त्यांच्या बुद्धिची कीव येते. ताराराणी आघाडीने जाहीर केलेले उमेदवार पूर्णपणे पारदर्शी आहेत. एकाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. कोणतेही उमेदवार अवैध व्यवसायाशी संबधित नाहीत. केवळ ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधक रचत आहेत. कोल्हापूरचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही, याचा मूळ दोष हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा सरकारचा आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या विकासासाठी आघाडी सरकारने प्रयत्न केले असते तर ही वेळ आली नसती. मात्र भाजपचे सरकार स्मार्ट सिटीसाठी ताकदीने प्रयत्न करणार आहे.'

टोल हा केवळ निवडणुकीपुरता बंद केला असल्याचा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला होता. त्याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कोल्हापूरचा टोल तीन महिने कायमस्वरुपी बंद केला आहे. त्यासाठी काही कायदेशीर बाबी सुरु आहेत. प्रकल्पाच्या मूल्यांकनाचा मार्ग काढण्याचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसांत टोल कायमस्वरुपी बंद होईल, अशी खात्री कोल्हापूरकरांनी बाळगायला काहीच हरकत नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प. निवडणुका पुढील वर्षी

$
0
0

राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यातील ८० टक्के जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका डिसेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ या कालावधीत होणार आहेत,' अशी माहिती राज्याचे राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सहारिया यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव के. पी. बक्षी, राज्याचे पोलिस महासंचालक प्रविण दिक्षीत, जिल्हाधिकारी अमित सैनी, कोल्हापूर परिक्षेत्राचे​ विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा बैठकीला उपस्थित होते.

सध्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून सहारिया म्हणाले, 'डिसेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी नाव नोंदणी, मतदार यादीत दुरूस्ती करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. आठ ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम आहे. हीच मतदार यादी त्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

गृह विभागाचे अप्पर सचिव के. पी. बक्षी म्हणाले, 'निवडणूक आयोगांच्या नियमाचे उल्लंघन होवू नये. निवडणुकीच्या कालावधीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करून मुक्त आणि निर्भयपणे निवडणुका पार पाडाव्यात यासाठी सरकारस्तरावर निवडणूक आयोगाशी पूर्ण समन्वय ठेवण्यात आला आहे.' प्रारंभी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वागत केले. महापालिका निवडणुकीबाबत केलेली पूर्वतयारी, आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था, मतदान व मतमोजणी, मतदार जागृतीबाबत केलेल्या नियोजनाची व उपाययोजनांची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. निवडणूक खर्च परीक्षण व व्यवस्थापन यंत्रणा, आचारसंहिता पथकाची कारवाई, करावयाच्या उपाय योजना यासंबधी यावेळी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

मुश्रीफांच्या खुलाशानंतर कारवाईचा निर्णय

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांच्यातील वाद आणि मुश्रीफांना नोटीस याविषयी सहारिया म्हणाले, 'यासंदर्भात मुश्रीफांना नोटीस पाठविली आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडे खुलासा करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत आहे. मुश्रीफांचा खुलासा येऊ दे, त्यानंतर काय कारवाई करता येईल याचा निर्णय घेतला जाईल.

मॉडेल मतदान केंद्रे बनावीत

महापालिका निवडणुकीतील ऑनलाइन अर्ज भरण्याच्या घोळाप्रश्नी विचारले असता सहारिया म्हणाले, 'निवडणूक प्रक्रियेत नवीन पद्धत स्वीकारली जात आहे. नाविन्याचा अंगीकार करताना काही चुका होवू शकतात. उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहू नये याकरिताच शेवटी छापील अर्जाचा अवलंब करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणकीत संगणकीकरणाचा अधिकाधिक अवलंब करण्याच्या सूचना केल्या आहेत. महापालिका निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रे मॉडेल मतदान केंद्रे बनावीत यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन महिन्यांत विमानाचे ‘टेकऑफ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरची विमानसेवा येत्या दोन महिन्यात सुरु केली जाईल. तीन विमान कंपन्यानी विमानसेवा सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्रस्ताव काही दिवसांतच ठेवला जाणार आहे. त्याच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच विमानाचे टेक ऑफ होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येणार आहे.

राज्य सरकार कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन विमानसेवा कंपन्यांनी कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. १९ सीटरची विमानसेवा सुरू केली जाईल, असा प्रस्ताव विमान कंपन्यांच्यावतीने मांडण्यात आला आहे. विमान कंपन्याचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणारी जमीनही संपादित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या विमानतळावर प्रायव्हेट लायसन्सची विमाने उतरू शकतात. त्यासाठी धावपट्टी योग्य असल्याची खात्री केली जात आहे. कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी देशभर वाढविण्यासाठी आणि पर्यायाने कोल्हापूरचा विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. नामांकित विमान कंपन्याची विमानसेवा सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावात विमान प्रवासाचे भाडे, येणारा खर्च, पुणे, मुंबई, बेळगांव येथे विमानसेवा, मार्गावरील फेऱ्या, विमानतळावर लागणाऱ्या सुविधांसह हॉपिंग सेवा देता येणे शक्य आहे, असा प्रस्ताव या कंपन्यांनी दिला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यास येत्या दोन महिन्यात कोल्हापूरकरांना विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे.

आशा पल्लवित

गेली तीन वर्षे विमानसेवा बंद आहे. सध्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम विमानपत्तन प्राधिकरणाकडून सुरू आहे. यापूर्वी पाच सीटर विमानसेवेची चर्चा झाली होती. मात्र धावपट्टीचे काम सुरू असल्याने ही विमानसेवा सुरू करणे शक्य झाले नाही. भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगतकरांच्या निलंबनाचे आदेश

$
0
0

कोल्हापूर : लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेले हातकणंगले येथील उपनिबंधक सुनील सिंगतकर यांना निलंबन करण्यास अखेर सरकारला मुहूर्त मिळाला. लाच स्वीकारल्याच्या प्रकारापासून दीड महिन्यानंतर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सिंगतकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले. निलंबनाचा आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बजावला आहे. सिंगतकर यांच्याशिवाय त्यांचा सहकारी संजय थैल याची सांगली जिल्ह्यात बदली केली आहे. दरम्यान, सहकार आयुक्तांनी विभागीय सुनावणीचे आदेशही दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी

$
0
0

मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शी व्हाव्यात यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. संवेदनशील प्रभागात जादा पोलिस बंदोबस्त असेल. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. मतदारांना प्रलोबन, दहशत अशा गैरकृत्याचा अवलंब करण्याचा कुणी प्रयत्न केला तर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार बैठकीत दिली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सहारिया सोमवारी दौऱ्यावर आले होते. सर्किट हाऊस येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सहारिया यांनी निवडणूक प्रक्रिया आणि महापालिका, पोलिस प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महापालिका निवडणुकीचे कामकाज एकूण बारा टप्पे असून आतापर्यंत नऊ टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. एक नोव्हेंबरला मतदान आणि दोन तारखेला मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आहे. शहरातील १६७ इमारतीतील ३७८ मतदान केंद्रावर मतदानाची सोय केली आहे. संवेदनशील प्रभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बंदोबस्तासाठी आणखी यंत्रणा आवश्यक असेल तर ते देण्यास गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी संमंती दर्शविली आहे. विशेष म्हणजे, मतदार आणि उमेदवारांत निवडणूक प्रक्रियेविषयी विश्वास निर्माण होईल, या अनुषंगाने कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.'

पोलिस महासंचालकांचे पानसरेप्रकरणी मौन

पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबद्दल बोलण्यास नकार दिला. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, निवडणूक निपक्षपातीपणाने पार पडावी यासाठी दक्षता घ्यावी. निवडणुका सुरळीत होण्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलिस प्रशासनात समन्वयाच्या सूचना केल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

घोळाबाबत हात वर

मतदार यादीतील घोळामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले असता सहारिया म्हणाले, 'भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादी तयार केली जाते. भारत निवडणूक आयोगाची यादी आहे तशी वापरली जाते. राज्य निवडणूक आयोग मतदानासाठी यादी तयार करत नाही. यादीत जो घोळ झाला, ते केंद्रीय निवडणूक आयोगला कळवू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईची बुधवारी नगर प्रदक्षिणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्‍सवांतर्गत मुख्य दिवस असलेल्या अष्टमीनिमित्त देवीची पालखीतून नगरप्रद‌क्षिणा काढण्यात येणार आहे.

प्रथेप्रमाणे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती विराजमान होऊन नगरवासीयांच्या भेटीला निघेल. रात्री बारा वाजल्यानंतर अष्टमीच्या जागर महापूजेला प्रारंभ होणार आहे. अष्टमीदिवशी अंबाबाई पालखीतून नगरप्रदक्षिणेला निघते. या दिवशी शक्तीने महिषासुराचा वध केला. यानिमित्त उद्या करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा आणि जागर पूजेची तयारी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरांची टोळी गजाआड

$
0
0

पंचावन्न लाखांची आठ वाहने जप्त

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

चोरलेली महागडी चारचाकी वाहने अपघातातील स्क्रॅप वाहनांच्या कागदपत्राच्या आधारे विकणाऱ्या कोल्हापूरच्या सहाजणांच्या टोळीला मंगळवारी सांगली पोलिसांनी गजाआड केले. टोळीकडून पंचावन्न लाखांची आठ वाहने जप्त केली आहेत. त्यात दोन तवेरा, बलोरो, सँट्रो, युनो, अ‍ॅसेंट आणि आयव्हा ट्रक असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख सुनिल फुलारी यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलिस निरिक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने युसुफ युनूस मकानदार (वय २९, जवाहरनगर), हाबीब रहिमतुल्ला गडकरी (वय २६,लक्ष्मीकॉलनी, टेंबलाईवाडी ), महमदअली उर्फ इरफान हाबीब काझी ( वय २५, शाहूमिल कॉलनी, बी वॉर्ड) या तिघांना आगोदर अटक केली. त्यानंतर त्यांचे साथीदार अल्ताफ बाबासो मुलाणी (वय ३०, सरनाईक वसाहत), रियाज रफिक शेख (वय ३०, बी वॉर्ड) आणि इसाक खुदबुद्दीन मुजावर (वय ४०, सुभाषनगर ) यांना अटक केली. पहिले तिघेजण सांगलीतील शंभरफुटी रस्त्यावर अ‍ॅसेंट कारमधून संशयितरित्या फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगलीतील डीमार्ट जवळून नऊ महिन्यांपूर्वी बलोरो गाडी चोरल्याची कबुली दिली. त्या गाडीचा मूळ मालकाशी संपर्क साधला असता त्याच्याकडील कागदपत्रांवर गाडीचा क्रमांक वेगळाच होता. ती गाडी चोरताना चोरट्यांनी वुनो गाडीचा वापर केला होता. चौकशीत टोळीपैकी काहीजण अपघातातील स्क्रॅप गाड्या इन्श्युरन्स कंपनीकडून विकत घेत होते. जी गाडी स्क्रॅपमध्ये घेतली आहे. तशीच दुसरी गाडी चोरायची. चोरलेल्या गाडीचा चेस आणि इंजिन नंबर कापून टाकून त्या ठिकाणी स्क्रॅपमधील गाडीचा चेस नंबर लावायचा आणि ती कागदपत्रांसह विकायची. अशा प्रकारे टोळीने चोरलेली आठ वाहने पोलिसांनी जप्त केली. ही वाहने त्यांनी रायगड, भायखळा( मुंबई),विश्रामबाग ( सांगली) मधून चोरली आहेत. वाहन चोरीची ही नवीनच पध्दत समोर आली असून या टोळीने गुजरात, राजस्थानसह अन्य राज्यातही असे चोरीच्या वाहनांचे व्यवहार केले असून ही आंतरराज्य टोळी पकडण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images