Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ताराराणी आघाडी-राष्ट्रवादीत काटाजोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात भाजप व ताराराणी आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. ताराराणी आघाडीची सुत्रे महा‌डिक पिता पुत्र, पुतणे हलवत असल्याने राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे.

२०१० च्या महानगरपालिकेच्या निवडणूक पक्षीय पातळीवर झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करून महाडिक गटाला बाजूला ठेवले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सत्ता असल्याने दोन्ही पक्षांची‌ सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ नगरसेवक निवडून आले होते. २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केंद्र व राज्यातील निवडणुकीचे सूत्रे बदलल्याने त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या निवडणुकीतही पडले आहेत. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाने महानगरपालिका निवडणुकीत थेट महाडिक प्रणित ताराराणी आघाडीशी युती करून सत्ता स्थापनसेसाठी पावले उचलली आहेत.

भाजपाकडे प्रबळ उमेदवार नसल्याने अनेक ताराराणी आघाडीकडून इच्छुक असलेले उमेदवारांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपा व ताराराणीने सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ नगरसेवकांच्या प्रभागात भाजप व ताराराणी आघाडीने तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे गतवर्षीचा २५ नगरसेवकांचा आकडा कायम ठेवणे हे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक भूपाल शेटे व महेश गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आहे तर रोहिणी काटे यांची पती माजी नगरसेवक प्रकाश काटे यांनी ताराराणी आघाडीची उमेदवारी स्वीकारली आहे. प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेत बदल झाले असले तरी राष्ट्रवादीने विद्यमान नगरसेवकांना संधी दिली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराविरोधात भाजप ताराराणी आघाडीनेही तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत.

ताराराणी आघाडीचे सूत्रे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक, भाजपाचे आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक अप्रत्यक्षरित्या कार्यरत आहेत. ताराराणी व भाजपाकडून खासदार महाडिक यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे हक्काच्या प्रभागात राष्ट्रवादीला भाजप व ताराराणी आघाडीशी निकराचा लढा द्यावा लागणार आहे.

थेट लढत असलेले प्रभाग असे

कदमवाडी शाहू कॉलेज सदर बाजार, रूईकर कॉलनी, ट्रेझरी ऑफीस, बिंदू चौक, शिवाजी उद्यमनगर, प्रतिभानगर, कैलासगडस्वारी, पंचगंगा तालीम, दुधाळी पॅव्हेलियन, पद्माराजे उद्यान, संभाजीनगर बस स्थानक, शिवाजी विद्यापीठ, रामानंदनगर जरगनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवरात्रात मिळतात अनेकविध रोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राचीन भारतीय कृषी परंपरेचे प्रतिक असणाऱ्या नवरात्रीच्या धार्मिक सणाला काळानुरुप उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. उत्सवाची व्याप्ती वाढल्याने त्याला जोडून रोजगाराची ‌विविधताही वाढली आहे. यामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांबरोबर नवनवीन संकल्पांमुळे नवनवीन व्यावसायिकही निर्माण झाले आहेत. यामुळे नवरात्रीत काही वर्षांपूर्वी लाखात होणारी उलाढाल आज कोटींच्या घरात पोहचली आहे.

नवरात्रीचा उत्सव पूर्वी घरगुती पध्दतीचा व्हायचा. घरातील देव्हारा आणि गावातील देवदेवतांची मंदीरे असा मर्यादित स्वरुपाचा हा सण होता. मात्र अलिकडे या सणाला सार्वजनिक सणाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पारंपरिक पध्दतीच्या सणात धार्मिक साहित्याची विक्री करणारे, फुलाफळांची विक्री करणारे अशा मोजक्याच लोकांना व्यवसाय असायचा. मात्र याला सार्वजनिक सणाचे स्वरुप प्राप्त झाल्यानंतर त्याला जोडून अनेक व्यवसाय निर्माण झाले आहेत.

पारंपरिक उत्सवातही लोकांच्या आवडीनिवडीनुसार बदल झाले आहेत. पूर्वी नवरात्रोत्सवातील उपवास करणारे लोक दूध, फळे, रताळी अशा गोष्टी खात असत. कालौघात या पारंपरिक पदार्थांबरोबरच शाबू, खजूर, बटाटा चिवडा, शाबू चिप्स व तत्सम पदार्थांची विविधता बाजारात पहायला मिळते.

नवरात्रोत्सवकाळात घरातील देव्हाऱ्यात विविध प्रकारची पूजा बांधली जाते. यासाठी लागणाऱ्या आवश्यक कलाकुसरीच्या डिझाईन्सला मागणी असल्याने कलाकुसर करणाऱ्या कलाकारांना मागणी आहे. मंदिरांसह सार्वजनिक मंडळातही देवीची दररोज ‌वेगळी पूजा बांधली जात असल्याने त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांना मोठी मागणी असल्याने संबंधित व्यावसायिकांचा व्यवसाय वाढत आहे.

देवीची मूर्ती करणारे मूर्तीकार, नवरात्रोत्सवासाठी मांडव घालणारे डेकोरेशन व्यावसायिक, मिरवणुकांसाठीचे डीजे सिस्टीम, सजावट करणारे, मिरवणुकीतील विविध प्रकारची वाद्ये व इतर व्यावसायिकांना नवरात्रात मागणी असते. विविध समाज संघटनांतर्फे नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने समारंभासाठी सभागृह, विद्युत रोषणाई, दैनंदिन पुजेसाठी पुरोहित, प्रसादासाठी आचारी, झाडलोट व स्वच्छता करणारे लोक अशा विविध घटकांना रोजगार मिळतो.

नवरात्रोत्सव आणि दांडीया हे समीकरणच आहे. यामुळे दांडीया संदर्भातही मोठी उलाढाल पहायला मिळते. लाकूड, प्लॅस्टीकसह धातूच्या दांडीया, दांडीयाचे स्त्री पुरुषांचे पोषाख, दागदागिने, फॅशनेबल वस्तू , ठेका धारायला लावणाऱ्या म्युझिक सीडी यांना मोठी मागणी असते. यामुळे या व्यवसायातही मोठी उलाढाल होते.

नवरात्रीच्या काळात देवदर्शनाला जाण्यासाठी वाहनांची आवश्यकता असल्याने ट्रॅव्हल्स कंपन्या, रिक्षा व्यावसायिक, खासगी वाहतूक व्यावसायिकांचेही व्यवसाय चक्र फिरत राहते. नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने, शेतजमीन, घर, फ्लॅट, वाहन, गृहोपयोगी वस्तू खरेदीची परंपरा असल्याने या सर्व क्षेत्रात होणारी आर्थिक उलाढाल प्रचंड असते. यामुळे नवरात्रोत्सवातील व्यावसायिक संधी साधण्यासाठी संबंधित सर्वच घटक सज्ज असतात.

नवरात्रीच्या बदलत्या स्वरुपामुळे आणि धार्मिक सणाला प्राप्त झालेल्या सार्वजनिक उत्सवामुळे विविध प्रकारच्या व्यावसायकांना व्यवसायाच्या निरनिराळ्या संधी प्राप्त झाल्या आहेत. सोशल मिडीयामुळे प्रांताप्रांताची विविधता उत्सवात एकवटली आहे. याची छाप विविध व्यवसायांवर दिसत आहे.

- किशोर काटवे, कातकाम कलाकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या सुनावणीने खळबळ

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूरः सहकार विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या. तक्रारींची सुनावणी होऊन अहवाल राज्याच्या दक्षता कक्षाकडे सादर केला होता. अहवाल सादर करताना एकमेकांना अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी तक्रारीवर पुन्हा सुनावणी घेण्यासाठी संबंधित विभागीय सहनिबंधकांकडे पाठवले आहेत. अशा ३७ तक्रारीवर शुक्रवारी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी सुनावणी घेतली. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, कनिष्ठ अधिकारी, लेखापरिक्षक व तक्रारदारांचा समावेश होता.

सहकार खात्यातील विविध पदांवर कार्यरत असताना घेतलेले चुकीचे निर्णय, पक्षकारांना मारावे लागलेले हेलपाटे, लेखा परिक्षणाकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, अपहार केलेल्या संस्थाचालकांवर फौजदारी दाखल करण्यात केलेली दिरंगाई अशा तक्रारी होत्या. तक्रारींची दखल घेऊन अहवाल आयुक्तांकडे पाठवले होते. आयुक्त दळवी यांनी विभागवार बैठका घेऊन अशा अहवालांची खातरजमा केली. २०१२ पासून सादर झालेल्या अहवाल संगनमताने तयार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, फेरसुनावणीसाठी सर्व तक्रारी विभागीय सहनिबंधकांकडे पाठवण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी सुरू झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीला अधिकाऱ्यांसह तक्रारदार उपस्थित राहिल्याने सहनिबंधकांच्या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे. केवळ तक्रारीवर सुनावणीचे आदेश न काढता, सहकार व लेखापरिक्षण कार्यालयात तक्रारी किती दाखल झाल्या, किती प्रलंबीत आहेत याचा तपशील दर आठवड्याला देण्याचे आदेश काढला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे अनेक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. शुक्रवारी अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांची सुनावणी २८ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

सुनावणीस गैरहजर

तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरक यांच्यावर पतसंस्थांना दिलेल्या पॅकेजचे असमान वाटप केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची परवानगी सहकारचे प्रधान सचिव यांच्याकडे मागणी केली होती. हातकणंगलेचे सहायक निबंधक सुनील सिंगतकर यांच्यावर सिद्धबटुकेश्वर संस्थेला नव्याने चुकीची नोंदणी केली आहे. सहकारातील या दोन्ही अधिकाऱ्यांबरोबरच गडहिंग्लजचे सहायक निबंधक ए. ए. भंडारे सुनावणीस गैरहजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ पोहोचली २२० रुपयांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग तिसऱ्या आठवड्यामध्ये डाळींचे दर चढेच राहिले असून किरकोळ बाजारपेठेमध्ये तूरडाळीने २१० ते २२० रुपये प्रतिकिलोचा दर गाठला आहे. नवरात्रामुळे विविध प्रकारचा खजूरही मोठ्या प्रमाणावर बाजारात आला असून त्याचा दर ८० ते १५० रुपयांदरम्यान आहे. सणांमुळे फळांचीही बाजारामध्ये चांगली आवक झाली आहे.

खजुरामध्ये विविध प्रकार असून ८० रुपये प्रतिकिलोपासून खजूर उपलब्ध आहे. काळा खजूर व सीडलेस खजुराची किंमत मात्र जास्त असून या दोन्ही खजुरांचे दर किरकोळ बाजारपेठेत १४० ते १५० रुपये प्रतिकिलो इतके आहेत. नवारात्रीमध्ये प्रसाद म्हणून सुक्यामेव्यालाही चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे फळांचीही मागणी वाढली आहे. मोसंबी, चिकू, डाळींब या फळांची चांगली आवक झाल्याने त्यांचे दर काही प्रमाणात उतरले आहेत. टरबुजाचीही चांगली आवक असून त्यांना प्रतिनग २५ रुपये इतका दर मिळत आहे. नवरात्रामुळे रताळी, बटाटे यांचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून बटाटा प्रतिकिलो १० रुपये, तर रताळी प्रतिकिलो २० रुपये दराने उपलब्ध आहेत.

मागील आठवड्यामध्येच तूरडाळीचा दर १८० ते १९० रुपयांपर्यंत पोहोचला होता. वाढता दर मिळत असल्याने तूरडाळीची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी झाल्यामुळे तूरडाळीचे दर २२० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तूरडाळीचे दर वाढल्याचा परिणाम मूगडाळीवरही झाला असून मूगडाळीला प्रतिकिलो १४० रुपयांचा दर मिळत आहे. उडीदडाळ (रु.१८०), हरभरा डाळ (रु. ८०), मसूरडाळ (रु. ८०) यांचे दर मात्र या आठवड्यात स्थिर आहेत. कडधान्यांमध्ये मूग, मटकी, चवळी, हरभरा इत्यादींचे दर प्रतिकिलो ९० ते १०० रुपयांदरम्यान आहेत. शेंगदाणा १०० ते १२० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध आहेत. तेलांचे दरही या आठवड्यात स्थिर असून शेंगदाणा तेल प्रतिलिटर १२० रुपये, सूर्यफूल ९० रुपये आणि सरकी तेल ७२ रुपये दराने उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोमिओंना उठाबशांची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी पोलिसांनी नागाळा पार्क व कदमवाडी परिसरातील महाविद्यालयाच्या आवारातील टोळक्यांवर शनिवारी धडक कारवाई केली. पोलिसांनी रोडरोमिओंना कडक समज देऊन त्यांना उठाबशा काढायला लावल्या.

गेले काही दिवस नागाळा परिसरात रोडरोमिओ व टोळक्यांच्या त्रासांनी स्थानिक नागरिकांना त्रस्त केले आहे. जिल्हा परिषद, नागोबा मंदिर, न्यू पॅलेस परिसर, कदमवाडी ​परिसरात रोड रोमिओंची टोळकी विद्यार्थ्यांसमवेत बसलेली असतात.

लेक्चरला दांडी मारून विद्यार्थी व टोळक्यांचा दंगा नागाळा व ताराबाई पार्क परिसरात सुरू असतो. काही टोळकी तर थेट रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने आडवी लावून धुडगूस घालत असतात.

या संबधी परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे तक्रार केल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई सुरू केली. पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी व पोलिसांनी शनिवारी सकाळपासून गस्त घालण्यास सुरूवात केली. पोलिसांच्या आगमनामुळे विद्यार्थ्यांच्यात पळापळ सुरू झाली. पोलिसांनी टोळक्यांना ताब्यात घेऊन त्यांना कडक समज दिली. तसेच त्यांना उठाबशा काढायला लावल्या. काही टोळक्यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना कडक समज दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदू टोळीचा पर्दाफाश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पैशाचा पाऊस पाडून मालामाल करण्याचे आमिष दाखवत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूगिरी टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला. टोळीचा म्होरक्या भीमराव रामचंद्र शिंदे (वय ६६, रा. वाठार) याच्यावर भानामती करत असल्याचा गुन्हा दाखल केला; पण गुन्हा दाखल झाल्याने शिंदेच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. याप्रकरणी महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केल्याचे समजते.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः इचलकरंजी शहरासह परिसरात भीमराव शिंदे, सुरेश रामय्या स्वामी (३५, रा. कबनूर) व हणमंत जगन्नाथ राऊत (३४, रा. भोने माळ) यांनी काही दिवसांपासून पैशाच्या आमिषाने महिलांचे लैंगिक शोषण करत चांगलाच उच्छाद मांडल्याची लेखी तक्रार महिला दक्षता समिती सदस्यांनी पोलिसांकडे केली होती. यातील शिंदे हा भानामतीद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करीत होता. त्याने काही महिलांना हेरून तसा प्रयोगही केला होता. प्रयोगावेळी तो अंधाऱ्या खोलीत धूर करून महिलांना बेशुद्ध करून लैंगिक शोषण करीत. हा प्रकार महिला दक्षता समिती सदस्या अरुणा बंडू पवार यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळविला होता. त्याआधारे पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी व सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी सापळा लावला होता.

शिंदे हा डेक्कनजवळील आंबेडकरनगर परिसरातील एका घरात आल्यानंतर त्याच्याशी समितीच्या सदस्यांनी चर्चा करीत पैशाच्या पावसाची आपणास अत्यंत गरज असल्याचे सांगितले. त्यावर शिंदेने जो संवाद केला त्याआधारे त्याला पोलिसांनी पकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. आपण पोलिसांच्या सापळ्यात अडकल्याची जाणीव होताच त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्याला पालिकेच्या आयजीएम रुग्णालय उपचारार्थ दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. संशयिताचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाल्याने तहसीलदार दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले.

या प्रकाराचा तपास करण्यासाठी कोल्हापूर येथील गुप्तचर विभागाचे डी. डी. कांबळे, आर. डी. कुंभार यांचे पथक शहरात दाखल झाले आहे. शिंदेसह स्वामी व राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी दिली. तिघाही संशयितांवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी या टोळीच्या प्रकाराला दोन महिला बळी पडल्याचे बारी यांनी सांगितले. त्यापैकी एक महिला चार महिन्यांपासून महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या संपर्कात होती. त्या आधारेच महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला.

दरम्यान, या टोळीचा प्रमुख मृत शिंदे हा पोलिस रेकॉर्डवरील संशयित असल्याचे समजते. त्याच्यावर वडगाव, कोकण आणि विदर्भ याठिकाणी गुन्हे नोंद असल्याची माहिती पुढे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशावादी ‘स्वाभिमानी’ आक्रमक?

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

कोल्हापूरः 'सत्तांतर घडवलेल्या शेतकऱ्यांनाच फसवाल तर गाठ आमच्याशी आहे,' या शब्दांत सरकारला धमकावत अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. वर्षभर आशावादी राहिलेल्या स्वाभिमानीचा महायुती​ने भ्रमनिरास केल्याने खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी सत्तेच्या उबेत ठेवलेली शस्त्रे आता पुन्हा बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यत विरोधक असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांविरोधात ते लढत होते, आता मित्रपक्षाच्या नेत्यांबरोबरच त्यांना लढावे लागणार आहे. यामुळे ही आक्रमकता केवळ तोंडी इशारा देण्यापर्यंतच राहणार की कृतीत येणार याचा फैसला मात्र नोव्हेंबरमध्येच होणार आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्यासाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले, त्याचा जेवढा राजकीय फायदा त्यांना झाला, त्यापेक्षा जास्त फायदा राज्यातील उसकरी शेतकऱ्यांना झाला. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर मोठाच फायदा झाला. त्यामुळे शेतकरी मनाने कोणत्याही पक्षाबरोबर असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र शेट्टी यांच्यासोबत राहतात. त्यामुळे ते दुसऱ्यांदा सहज खासदार झाले. त्यांची धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अधिक असते. त्यानंतर त्यांचे लक्ष्य काँग्रेसचे नेते असतात. पंधरा वर्षे त्यांचे हे राजकारण याच पारंपारिक पध्दतीने सुरू आहे. आता मात्र दोन्ही काँग्रेस सत्तेवर नाहीत आणि जे सत्तेत आहेत, ते स्वाभिमानीचे राजकीय मित्र आहेत.

ऑक्टोबर महिना आला की, शेट्टी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर तुटून पडायचे. आक्रमक होत उसाला चांगला दर पदरात पाडून घ्यायचे. त्यांच्या या आक्रमकतेमुळे गेल्या काही वर्षात २७०० पेक्षा अधिक एफआरपी मिळाली. गतवर्षी मात्र हा दर २२०० ते २३०० पर्यंत खाली आला. तरीही शेट्टी शांत राहिले. पंधरा वर्षे दोन्ही काँग्रेस आणि साखर कारखानदारांविरूध्द आक्रमक होणारे शेट्टी गेल्या वर्षी मात्र अचानक मवाळ झाले. त्यांना गृहित धरून भाजपचे नेते कारभार करू लागले. यामुळे वर्षभर शेट्टी व खोत अस्वस्थ आहेत. सत्तेत असूनही नसल्यासारखी त्यांची अवस्था आहे. यामुळे शेवटी त्यांना सरकार विरोधात आंदोलन करण्याची भाषा करावी लागली.

मंत्रीमंडळात समावेश करतो म्हणून लेखी देवूनही शब्द पाळत नसल्याने भाजपवर स्वाभिमानीचे नेते नाराज आहेत. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आपले उपद्रवमूल्य दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आता त्यांच्या हातात तेच राहिले आहे. भाजपचे नेते फसवत आहेत याची पुरेपूर जाणीव शेट्टी यांना झाली आहे. पण आज ना उद्या सत्तेत घेतील या आशेवर त्यांची आक्रमकता बोथट झाली. आता मात्र पुन्हा आक्रमक होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पुढे केले आहे. यामुळे स्वाभिमान डिवचला असताना या पक्षाचे नेते काय करणार याचीच उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.

सहनही होत नाही अन्...

दोन्ही काँग्रेसविरोधात लढण्यासाठी स्वाभिमानीने महायुतीच्या हातात हात घातला. पण वर्षभरात महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेसपेक्षा वाईट अनुभव येत असल्याचे संघटनेचे नेते सांगत आहेत. काँग्रेसचे नेते किमान बैठकीला बोलवायचे, सल्ला विचारायचे. पण भाजपने वर्षभरात एकाही बैठकीला बोलवले नाही, ते गृहित धरून निर्णय घेत असल्याने सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही अशी अवस्था स्वाभीमानी संघटनेच्या नेत्यांची झाली आहे. एफआरपीची तोडमोड करत कारखानदारांना साथ देण्याची भूमिका सरकारने घेतल्याने स्वाभिमानी आणखी डिवचली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्मिळ फुलपाखराची राज्यात पहिली नोंद

$
0
0

Kumar.Kamble@timesgroup.com

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल येथे पार्थेनस सिल्व्हिया या फुलपाखराच्या प्रजातीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच या प्रजातीची नोंद झाली आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील डॉ. योगेश कोळी यांना ही फुलपाखराची प्रजात आढळली. कोळी हे मूळचे कोल्हापूर येथील आहेत.

या दुर्मिळ जातीच्या नोंदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेच्या संपन्नतेचा पुरावाच ठळक झाला आहे. याआधी २००४ आणि २००८मध्ये या फुलपाखराची नोंद गोव्यात झाली होती. डॉ. आर. एम. शर्मा आणि डॉ. एम. आर. बोरकर यांनी त्यांच्या शोधनिबंधात त्याचा उल्लेख केला आहे.

वालावल येथील मुख्य तलावाजवळच्या जंगलात फुलपाखराच्या 'क्लिपर' प्रकारातील (Parthenos Sylvia) 'पार्थेनॉस सिल्व्हिया' प्रजातीची नोंद केली आहे. या प्रजातीच्या सिंधुदुर्गातील आस्तित्वामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेचा आवाका किती मोठा आहे ते अधोरेखित झाले आहे. हे फुलपाखरू साधारण: सप्टेबर ते फेब्रुवारी या काळात भारताच्या अन्य भागातही आढळते. वालावल येथील दाट जंगलातील रानटी पटकुळी (Ixora) वनस्पतीच्या फुलांवर हे फुलपाखरु आढळले. ते जास्त पाऊस, घनदाट जंगल आणि मुख्यत्वे प्रदूषणविरहीत भागात आढळते. त्याचे पंख हे निळसर असून त्यावर लांब पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. वाघाच्या अंगावरील पट्ट्यांप्रमाणे या फुलपाखराच्या मुख्य शरीरावर काळ्या-पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याच्या दोन्ही पंखांचा एकत्रित विस्तार साधारणत: ९ ते १० सेमी एवढा असतो.

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील डॉ. मंगेश जांबळे, डॉ. योगेश कोळी आणि प्रा. संजय कांबळे यांनी कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात आढळणाऱ्या आणि अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या चार प्रजातींची नोंद केली आहे.

फुलपाखराविषयी...

या फुलपाखराच्या भारतात चार वेगवेगळ्या उपजाती उत्तरांचल, अरुणाचल, दक्षिण भारत आणि अंदमान-निकोबार या भागात आढळतात. शिवाय बांगला देश, श्रीलंका, मल्या या देशातही हे फुलपाखरू सापडते. जास्त पर्जन्यमान आणि घनदाट जंगलातच ही प्रजात आढळते. अडेनिया होंडाला या वनस्पतीची पाने ‌त्याचे मुख्य अन्न आहे.

ही प्रजाती दुर्मिळ आहे. वन्यजीव सुरक्षा कायद्याच्या अनुसूची २ मध्ये तिचा समावेश आहे. या फुलपाखरांच्या जाती वाचवायच्या असतील तर ‌त्यांचे खाद्यान्न वनस्पती वाचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

- डॉ. आर. एम. शर्मा, निवृत्त उपसंचालक, भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचाराचा धडाका सुरू

$
0
0

चिन्ह वाटपानंतर आजची सुटी कॅश करण्याचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधिकृत उमेदवाराची जाहीर झालेली यादी आणि चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी जोशात प्रचाराला सुरूवात झाली. मतदारांत चिन्ह ठसवण्यासाठी चिन्ह असलेल्या पत्रकांचे वाटप उमेदवारांनी ताबडतोब सुरू केले. प्रचारासाठी मिनी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. रविवारी सुट्टीच्यादिवशी मतदार कॅश करण्यासाठी उमेदवारांनी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ताराराणी आघाडी अधिकृत पक्ष असल्याने त्यांच्या बहुतांशी उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले. ताराराणी आघाडी, शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाने कपबशी चिन्हाची मागणी केली त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकून चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामुळे काही ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना कपबशीशिवाय अन्य चिन्हाचा पर्याय स्वीकारला लागला. भाजप व ताराराणी आघाडी असल्याने जेथे भाजपचे उमेदवार आहेत त्या प्रभागातील अपक्ष उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाल्याने ताराराणी आघाडीची काही प्रमाणात गोची झाली आहे.

शनिवारी सकाळी ८१ प्रभागातील सर्व ५०६ उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर सात निवडणूक विभागीय कार्यालयात चिन्ह वाटप प्रक्रिया झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांना पक्षांच्या अधिकृत चिन्हांचे वाटप झाले. ताराराणी आघाडीने कपबशी या चिन्हाची मागणी केल्यानंतर त्यांच्या उमेदवारांना ते चिन्ह देण्यात आले. काही प्रभागात शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाने कपबशी चिन्हावर दावा केल्याने याबाबतचा निर्णय चिठ्ठी काढून घेतला. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार आहे त्या प्रभागातील अपक्षांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. त्याचा फटका भाजपला बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपक्ष उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीनुसार चिन्ह वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार ठरला दर्शनवार

$
0
0

अंबाबाईच्या दर्शनाला सहा दिवसांत १४ लाख भाविक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवकाळात श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटक भाविकांच्या गर्दीने रविवारी कळस गाठला. तर गेल्या सहा दिवसात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या १४ लाख ७० हजार ४७८ झाल्याची नोंद ​मेटल डिटेक्टर यंत्रणेमध्ये झाली आहे. शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार भाविकांची संख्या २ लाख ८८ हजार ८७६ इतकी होती.नवरात्र संपण्यासाठी अजून चार दिवस असल्यामुळे ही संख्या यावर्षी १५ लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पर्यटकांच्या वाहनांसाठी सात ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीला शिस्त आली आहे. नवरात्रकाळात दरवर्षी रविवारच्या दिवशी भाविकांची संख्या गर्दीचा उच्चांक गाठते. यंदाचा रविवारही याला अपवाद ठरला नाही.

रविवारी सकाळपासूनच मंदिरातील दर्शनरांगेत भाविकांची गर्दी वाढू लागली. सकाळी साडेअकरा वाजताच मंदिरात अलोट गर्दी झाली होती. कोहळा फोडण्याच्या विधीसाठी देवीची पालखी त्र्यंबोली मंदिराकडे सकाळी दहा वाजता रवाना झाल्यानंतर मंदिरात भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला. सकाळी साडेआठ वाजता देवीला शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे, सहसचिव एस.एस. साळवी, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी आदी उपस्थित होते.

दुपारी चारनंतर मंदिरात गर्दी अधिकच वाढली. मंदिराच्या मुख्य दर्शनरांगेतील फेरे वाढवण्यात आले तसेच अन्य तीन प्रवेशद्वारातूनही भाविक मंदिरात प्रवेश करत होते. सध्या कल्याण डोंबिवली महापालिका आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे. याचेही पडसाद नवरात्रोत्सवातील भाविकांच्या लक्षणीय संख्येवर उमटले आहेत. शनिवारी कल्याण डोंबिवलीहून महिलाभाविकांच्या २३ ट्रॅव्हल्स बसेस कोल्हापुरात आल्या होत्या, तर आज ही संख्या ३२ बसेसवर गेली. दुपारच्यावेळी अचानक इतक्या संख्येने भाविक आल्यामुळे दर्शनरांगेची लांबी बघताबघता शंभर मीटर वाढली.

उमेदवारांनी केला प्रचार

रविवारी अंबाबाई मंदिर ते त्र्यंबोली मंदिर या मार्गावर ललिता पंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मार्गावर महापालिका निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचार केला. यावेळी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना केळी, लाडू, शीतपेय अशा पदार्थांचे वाटप केले. तर काही उमेदवारांनी अंबाबाईच्या पालखीलाही हात लावत विजयाचे साकडे घातले.

युवा स्वयंसेवक मदतीला

करवीर मंच या संस्थेमार्फत सुमारे दीडशे युवा स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील पर्यटकांच्या वाहतुकीला शिस्त व दिशा देण्यासाठी सहभाग दिला. साकोली कॉर्नर, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, बिंदू चौक येथे हे स्वयंसेवक पर्यटकांसह स्थानिक भाविकांच्या वाहनांना पार्किंगच्या स्थळांविषयी मार्गदर्शन करत होते. यामुळे गर्दी असूनही ​वाहतुकीची कोंडी फारशी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनचे डोके आंदोलनातून ठेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सनातनी नवे मैदान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देत सनातनचे वर येणारे डोके जनआंदोलनातून दाबून टाकण्यासाठी एकजूट दाखवा. जनआंदोलन हेच लोकशाहीचे मोठे हत्यार असून, सनातनी प्रवृत्ती हाणून पाडण्यासाठी २४ नोव्हेंबरला गांधी मैदानात पुरोगामी चळवळीची ताकद दाखवून देऊ,' असे आवाहन सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

लक्ष्मीपुरी येथील श्रमिक हॉलमध्ये सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाच्यावतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. भारत पाटणकर, भीमराव बनसोडे, मेघा पानसरे उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहीद स्थळापासून कॉ. गोविंद पानसरे यांच्या शहीद स्थळापर्यंत काढण्यात येणारी संघर्ष यात्रा २४ नोव्हेंबरला कॉ. पानसरे यांच्या जन्मदिनी पोहोचणार आहे. त्याच्या तयारीसाठी रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी संघर्ष यात्रेसाठी निधी गोळा करण्याचे आवाहन करताच कार्यकर्त्यांमधून १२ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली.

डॉ. आंबेडकर म्हणाले, 'भाजप सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत आहे. याचा परिणाम हा वैचारिक लढाई लढताना येत आहे. त्यासाठी भाजप सरकारच्या व्यवस्थेविरोधातील लोकलढा उभाण्याची गरज आहे. यासाठी २४ नोव्हेंबरच्या जनआंदोलन सभेला ५० हजार कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.'

श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. पाटणकर म्हणाले, 'दहशतवादाविरोधातील ही लढाई खेड्यापाड्यांतील लोकांपर्यंत पुरोगामी चळवळ पोहोचावी. सनातन २००५ पासूनच आक्षेपार्ह लिखाण करत असूनही सरकार त्यांच्याविरोधात कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे समीर गायकवाडसारख्याचे धाडस होत आहे. इथून पुढे मारण्यासाठी उठणाऱ्या हातांमध्ये बेड्या घालू आणि हिंसेविरुद्ध अहिंसेचा लढा देऊ.'

कॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, '२४ नोव्हेंबरच्या परिषदेला धर्मनिरपेक्षता मानणारे, समतावादी सर्वांनी एकत्र येऊन सनातनचे विचार हाणून पाडण्यासाठीचे हे पुढचे पाऊल आहे.'

यावेळी किशोर ढमाले, शेकापचे प्रा. टी. एस. पाटील, धनाजी गुरव, आदींची आदींची भाषणे झाली. कॉ. अतुल दिघे यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर सकट यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेवढे महाडिक तेवढे पक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जेवढे महाडिक तेवढे पक्ष, अशा प्रवृत्तींना आपण कितीवेळा विकले जाणार, भविष्यात महाडिक कुटुंबीयांना पक्षही कमी पडतील,' अशी घणाघाती टीका करत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. जिल्ह्यातील टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती मिळाली असून, निवडणुकीनंतर पुन्हा टोलवसुली सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय शेतकरी कामगार पक्षप्रणीत लोकशाही विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील होते.

आमदार पाटील म्हणाले, 'महाडिक कुटुंबीय सर्व पक्षांत विखुरले आहेत. अशा प्रवृत्तीमुळे विकासाला खीळ बसत आहे. या प्रवृत्तीला रोखायचे असेल तर महापालिका निवडणूक संधी समजावी लागेल. सध्या टोलवसुली बंद असली, तरी टोलचे भूत जिल्हावासीयांच्या मानगुटीवर अद्याप कायम आहे.

टोलवसुलीसाठी निवडणुकीनंतर आयआरबी कंपनी न्यायालयात दावा दाखल करून सध्याच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याची परवानगी मागणार आहे. असे होणार नसेल तर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोलवसुली होणार नसल्याचे लेखी आश्वासन द्यावे. शाहूंच्या पुरोगामी नगरीमध्ये प्रतिगामी शक्तींची ताकद वाढत आहे. याचा प्रत्यय कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतून आला आहे.'

यावेळी बसवंताप्पा उबाळे, शेकापचे केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, बाबूराव कदम, निवास लाड, डॉ. ज. रा. दाभोळे, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते. अनिल म्हमाने यांनी सूत्रसंचाल केले. दिगंबर लोहार यांनी आभार मानले.

कपबशीसाठी जयंत पाटलांना फोन

ताराराणी आघाडीने कपबशी चिन्ह मिळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगापासून इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडेही फोन केला होता. शेकपचे आमदार जयंत पाटील यांच्याकडे चिन्ह वाटपादरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडे कपबशी चिन्हाची मागणी करू नका, अशी मागणी स्वतः खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती, असा गौप्यस्फोट शेकापच्या कार्यकर्त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅसिड टाकून दुकान पेटविण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महाद्वार रोड येथील रती कलेक्शन दुकानावर रात्री अज्ञाताने अॅसीड टाकून पन्नास हजारांचे नुकसान केले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दुकानातील मॅटिंग आणि काही कपडे जळाले. अॅसिड टाकून दुकान पेटवण्याचा असाच प्रकार यापूर्वी ४ सप्टेंबरला घडला होता. याबाबतची तक्रार दुकानमालक सुजय राजपुरोहित यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. सध्या नवरात्रीमुळे हा परिसर गजबजलेला असतो. तरीही या घटनेमुळे महाद्वार रोड परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मटका अड्ड्यावर छापा; एकास अटक

कोल्हापूरः करवीर पोलिसांनी कळंबा येथील साळोखे गल्ली परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली आहे. राजेंद्र बाळकृष्ण ढोबळे साळोखे गल्ली येथील त्याच्या राहत्या घराजवळ थांबून लोकांकडून जुगारासाठी पैसे घेऊन अड्डा चावलत होता. याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून ढोबळेला अटक केली आहे. जुगार व्यवसायाचा मुख्य मालक विजय लहू पाटील हा असल्याचे निदर्शनास आल्याने, पोलिसांनी विजय पाटीलवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर प्रवेशावरून पिंपळगावमध्ये मारहाण

$
0
0

म. टा. वृतसेवा, कागल

पिंपळगाव बु. (ता. कागल) येथे काही तरुण गावातील प्रमुखांकडे आम्हाला मंद‌िर प्रवेश द्या, अशी मागणी करायला गेल्यावर चिडून चौघांनी या दलितांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे गावात तणाव वाढला असून मुरगूड पोलिसात चौघाजंणाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. गावात रात्री उशिरापर्यंत पोलिस व गावकऱ्यांची शांतता बैठक सुरु होती.

याबाबत मुरगूड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या नवरात्रीनिमित्त केदारलिंग देवासाठी गावातील लोक नवरात्र उपवास करीत आहेत. त्यामध्ये काही हा नवरात्रचा उपवास करीत आहेत. यावेळी गावातील केदारलिंग देवालयात जाऊन पानाचा विडा देवाला ठेवण्याची पद्धत आहे. हा पानाचा विडा ठेवण्यासाठी आम्हाला देवळात जाऊ द्यावे, अशी मागणी करण्यासाठी गावातील काही दलित तरुण प्रमुख मंडळीकडे गेली त्यावेळी गावकरी व दलित तरूणांच्या बाचाबाची झाली. या बाचाबाची नंतर हातघाईवर आली. यामध्ये प्रदीप कांबळे,आनंदा कांबळे, विकास कांबळे,विजय कांबळे, अरूण कांबळे या पाच जणांना विठ्ठल काटकर, दिनकर पोवार,पांडुरंग मधूकर ताशिलदार, पांडूरंग पाटील या चारजणांनी लाथाबुक्यांनी मारहणा केल्याची तक्रार दिली आहे.

दरम्यान ही मारामारी झाल्याने गावात तणावाचे वातावरण असून मुरगूड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकात मस्के यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवून शांततेचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी’तील बडे मासे गळाला लागणार?

$
0
0

जिल्हाधिकारी यांना 'वसुंधरा'चा अहवाल सादर

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (वसुंधरा) जिल्ह्याच्या कृषी खात्याकडून केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने खातेनिहाय चौकशी पूर्ण केली आहे. चौकशी अहवाल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सादर केला आहे. अहवालात प्रशासकीय, आर्थिक व तांत्रिक मुद्द्यांची चौकशी केली आहे. कृषी खात्याची प्रथमच खातेबाह्य चौकशी झाल्याने अनेक कृषी अधिकारी व कर्मचारी अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे चौकशी झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सैनी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कृषी खात्याकडे तक्रारीही झाल्या होत्या. मात्र, याबाबत दखल घेतली नाही. विभानसभेत आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चौकशी समिती नेमली होती.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमधील पाच विविध विभागांच्या तज्ज्ञांनी चौकशी केली आहे. खातेबाह्य चौकशीमुळे अहवालाला महत्त्व प्राप्त झाले असून, लवकर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करणार आहेत. यामुळे आयुक्त कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

खातेबाह्य चौकशीमुळे गैरकारभार उघड

कृषी खात्यातील गैरकारभाराबाबत यापूर्वी अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याची चौकशी खात्यातीलच अधिकाऱ्यांनी केल्याने अनेकांना अभय मिळाले होते. मात्र, 'वसुंधरा'बाबत विधानसभेत आवाज उठवल्यानंतर प्रथमच खातेबाह्य चौकशी झाली आहे. यामुळे चौकशीमध्ये अनेक कृषी खात्यातील 'बडे मासे' गळाला लागण्याची शक्यता खात्यातीलच वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ताराराणी’ला ‘मटका’ चिन्हच योग्य

$
0
0

शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिका निवडणुकीसाठी ताराराणी आघाडीने निवडलेले उमेदवार पाहता या आघाडीला 'कपबशी' ऐवजी 'मटका' हेच चिन्ह योग्य आहे,' असा हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला. महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हाच शिवसेनेचा मुख्य शत्रू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचा टोलप्रश्नही भिजत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोऱ्हे म्हणाल्या, 'भाजपने दिलेले टोलमुक्तीचे आश्वासन पाळलेले नाही. हद्दवाढ, प्रदूषणमुक्ती, स्मार्ट सिटी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या पालकमंत्र्याची गरज होती. कोल्हापूरच्या जनतेवर टोल लादणाऱ्या काही शक्ती आहेत. कोल्हापूरच्या जनतेने अनेक राजकीय वादळे पचविली आहे. त्यामुळे शंभर टक्के खरी आश्वासने देणाऱ्या शिवसेनेलाच मतदारांनी साथ देण्याची गरज आहे. केवळ निवडणुकीपुरता टोल रद्द केला जाणार नाही. महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यास कायमस्वरूपी टोलमुक्ती केली जाईल. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांचा महापौरच भ्रष्टाचार आणि लाचखोरीत सापडला. मात्र, त्यामागे एकट्या महापौरच असतील, असे नाही. त्यासाठी खऱ्या सूत्रधारांचा शोध घेणे गरजेचा आहे.'

गोऱ्हे पुढे म्हणाल्या, 'कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती दयनीय आहे. त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थमंत्री जबाबदार आहेत. या आघाडीने अनेक प्रकारचे कर लादले. शहर स्मार्ट सिटी होत असताना माणसे किती स्मार्ट झाली, याचे आत्मचिंतन गरजेचे आहे. येत्या निवडणुकीत शंभर टक्के शिवसेनेचा महापौर असेल. ४१ प्लस असा शिवसेनाचा नारा आहे. शिवसेनेचा हद्दवाढीला पूर्णपणे पाठिंबा आहे. जनता समाधानी तर शिवसेना समाधानी असेल. अनेक नागरी प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. राजकीय स्वार्थासाठी जैन आणि वारकरी समाजात काही शक्ती तेढ निर्माण करीत आहेत.' यावेळी संपर्कप्रमुख राहुल खेडेकर, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, आदी उपस्थित होते.

सेनेचा जाहीरनामा २५ ऑक्टोबरला

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे येत्या २५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला जाईल. कोल्हापूरच्या विकासाचे ठोस व्हिजनही मांडले जाईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

सरकार शिवसेनेमुळेच स्थिर

राज्यातील युतीचे सरकार शिवसेनेमुळेच स्थिर आहे. भाजपचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ आमदार आहेत. कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकल्यास कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे. केवळ खोटी आश्वासने देण्याची शिवसेनेची पद्धत नाही. कोल्हापूरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला जाईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार निवडणूक प्रचार‘वॉर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गल्लीबोळातून फिरणारा कार्यकर्त्यांचा जथ्था, चौकाचौकातील डिजिटल फलक आणि होर्डिंग्जमुळे प्रचाराची वाढललेली खुमारी, उमेदवारांच्या समर्थकांसह प्रचारफेऱ्या, विविध पक्षांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी योजलेले प्रचाराचे नवे फंडे, पथनाट्याच्या सादरीकरणापासून भागाभागात घुमणारा प्रचार रथ अशी धामधूम रविवारी दिवसभर शहरभर होती. एक नोव्हेंबरला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे.

महापालिकेवर सत्ता प्राप्त करण्यासाठी चारही प्रमुख पक्ष प्रयत्नशील आहेत. मतदानाला बारा दिवस उरल्याने उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. रविवार सकाळपासूनच शहरात प्रचाराचा धुराळा उडाला. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, फुलेवाडी, राजारामपुरी, कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, विक्रमनगर अशा सर्वच प्रभागात प्रचाराने वेग घेतला. 'मॉर्निंग वॉक'ला येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी ६.३० वाजताच प्रचाराला सुरुवात केली. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे 'चाय पे चर्चा'चा कार्यक्रम रंगला. परिसरातील विविध प्रभागांतील भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना सोबत घेत पालकमंत्र्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला.

पक्षाच्या चिन्हाच्या टोप्या, गळ्यात मफलर, मोटारसायकलवर झेंडे आणि पक्षाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांच्या निघालेल्या मोटारसायकल रॅलीने निवडणुकीचे वातावरण आणखी गडद केले. कार्यकर्त्यांची मोटारसायकल रॅली आणि उमेदवारांच्या पदयात्रांनी गल्लीबोळ दुमदुमले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात राजेंद्रनगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी येथे पदयात्रा काढली. सायंकाळी कळंबा फिल्टर हाउस, रायगड कॉलनी येथे कॉर्नर सभा घेतली. भारतीय जनता पक्षाचे आमदार अमल महाडिक यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठ, संभाजीनगर भागातून पदयात्रा काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीचा महापूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारचा सुटीचा दिवस, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या महिला भाविकांच्या सहली आणि नवरात्रोत्सवाच्या औचित्याने स्थानिक भाविकांचीही रीघ यामुळे रविवारी दिवसभर अंबाबाई मंदिरात गर्दीचा महापूर लोटला. एका दिवसात २ लाख ८८ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले, तर गेल्या सहा दिवसात भाविकांची संख्या १४ लाख ७० हजार ४७८ इतकी झाली आहे.

रविवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली. अकरा वाजता पुरूषांची रांग शिवाजी पुतळा तर महिलांची रांग एमएलजी हायस्कूलपर्यंत गेली होती. घटस्थापनेदिवशी १ लाख ६६ हजार भाविकांच्या गर्दीने नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस फुलून गेला. तर दुसऱ्या दिवशी ही संख्या २ लाख १२ हजारांवर गेली. नवरात्रातील शुक्रवारची पर्वणी साधत दोन लाख ९० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शनिवारी भाविकांची संख्या २ लाख ६१ हजाराच्या घरात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-ताराराणी स्वार्थांध युती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिका निवडणुकीतील भाजप आणि ताराराणी यांची युती स्वार्थाने अंध झालेल्यांची आहे. आपल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी थांबविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमदार महादेवराव महाडिक यांनी सहकार्य केले.,' अशी घणाघाती टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. तर डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्यांमुळे पुरोगामी कार्यकर्ते धास्तावले आहेत. सनातनवाले जाहीर बोलत आहेत. हा मोदींच्या राज्याचाच परिणाम असल्याचा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशन सोहळा रविवारी दसरा चौक मैदानावर झाला. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, 'ताराराणी आघाडीचे नेते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. यामुळेच काका काँग्रेसचे आमदार, मुलगा भाजपचा आमदार आणि पुतण्या राष्ट्रवादीचा आमदार आहे. गेली अनेक वर्षे आमदार असणाऱ्या महाडिक यांनी आपला निधी कोठे व कसा खर्च केला? याचा लेखाजोखा त्यांना आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत द्यावा लागणार आहे.

महापालिकेच्या राजकारणात अपक्षांचा घोडेबाजार बंद करणाऱ्या राष्ट्रवादी-जनसुराज्य युतीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे चिन्ह सरकारने गोठवले. मात्र, केवळ सत्तेसाठी भाजपशी युतीचे राजकारण करणाऱ्या ताराराणी आघाडीने कमळ चिन्हावर निवडणूक लढविणे का टाळले? आ. महाडिक, माजी आमदार मालोजीराजे यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांना एकटे पाडल्याने त्यांची अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे. मात्र, आजही त्यांचा श्रीकृष्ण आपणच आहे.'

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, 'सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण झाले तरी भाजपकडून कोल्हापूरच्या टोलमुक्तीची घोषणा पोकळच ठरली आहे. कोल्हापूरचा स्मार्ट सिटीत समावेश न करण्यामागे पश्चिम महाराष्ट्राला निधी न देण्याचा डाव आहे.'

जाहीरनाम्यात...

पर्यटन विकास, खाजगी बसेससाठी स्वतंत्र स्टॅंड, वायफाय सीटी, कॉ. पानसरे स्मारक, रिंगरोड व फ्लाय ओव्हर्स, प्रलंबीत रस्ते, सेफ सीटी, रंकाळा सुशोभिकरण, सोलर व इको एनर्जी आणि ग्रीन सीटी, मल्टी लेव्हल पार्कींग, स्मशानभूमि विस्तार, इंडस्ट्रीयल फोरम, झोपडपट्टी पुर्नवसन,मनपाचे ऑनलाईन काम, आर्ट गॅलरी, कोल्हापूर महोत्सव, आयटी पार्क, प्रेरणास्थळ विकास, मनपा नवीन प्रशासन इमारत, सांडपाणी शुध्दीकरण, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विकास, क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन, स्कायवॉक अशा योजना राबविणार.

अच्छे दिन नकोत...

मुश्रीफ म्हणाले, 'अच्छे दिन' या संकल्पनेप्रमाणेच 'स्वत: खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही' असे अश्वासन दिले होते. मात्र महागाईमुळे 'ते स्वत:ही खात नाहीत आणि कोणाला खाऊही देत नाहीत' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अच्छे दिन नकोत, आमचे पूर्वीचे दिवस परत द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून माजी मंत्री जयंत पाटील यांनी, मोदींच्या राज्यात कोंबडीपेक्षा डाळ महाग झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर भारतीय झाले कोल्हापूरकर

$
0
0

uddhav.godase@timesgroup.com

आल्हाददायक वातावरण, कामाची उपलब्धता आणि उत्सवप्रियता यामुळे कोल्हापुरात आलेले लोक कधी कोल्हापूरचे होऊन जातात हे त्यांनाही कळत नाही. ही 'कोल्हापुरी' बनण्याची प्रक्रिया इतक्या नकळत घडत असते की, काही ठराविक काळानंतर बाहेरून आलेल्या लोकांना आपण मूळचे कोल्हापूरचेच आहोत असे वाटायला लागते. कोल्हापुरात येऊन स्थिरावलेल्या उत्तर भारतीयांच्या बाबतीतही अगदी असेच घडले आहे. कामाधंद्याच्या निमित्ताने कोल्हापुरात येऊन राहिलेले दहा हजारांहून अधिक उत्तर भारतीय कोल्हापूरच्या संस्कृतीत रुजले आहेत.

उत्तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या प्रमुख दोन राज्यातून मोठ्या प्रमाणात आलेले लोक कोल्हापुरात स्थिरावले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये रोजगाराची साधने मर्यादित असल्याने पोट भरण्याच्या उद्देशाने आलेले लोक इथेच स्थायिक झाले. यामध्ये कष्टाचे काम करणारा औद्योगिक वसाहतींमधील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सुतार, पेंटिंग आणि वाहतूक व्यवसायातही उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. कष्टाचे काम करण्यासाठी सक्षम अशी बिहारी माणसांची ओळख आहे. त्यामुळे गोकुळ शिरगाव, शिरोली आणि उद्यमनगर औद्योगिक वसाहतीत बिहारींची संख्या अधिक आहे. सुतार आणि पेंटिंग व्यवसायात जवळपस ८० टक्के लोक उत्तर भारतीय आहेत.

शहरातील राजारामपुरी, आईचा पुतळा, सम्राटनगर, रुईकर कॉलनीसह काही झोपडपट्ट्यांमध्ये उत्तर भारतीय स्थिरावले आहेत. दिवसभर आपल्या व्यवसायामध्ये मग्न असलेले हे लोक कोल्हापूरच्या संस्कृतीत पुरते रुळले आहेत. जितक्या उत्साहात आणि श्रद्धेने हे लोक छटपूजा साजरी करतात, तितक्याच उत्साहाने कोल्हापूरकरांसोबत सर्व सण-समारंभांमध्येही सहभागी होताना दिसतात. १९८३ मध्ये त्रिलोकचंद राय यांनी त्यांच्या मित्रांसह कोल्हापुरात उत्तर भारतीय संघ स्थापन केला. या संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला जातो. गणेशोत्सव आणि जोतिबाच्या यात्रा काळात प्रसाद वाटपाची सुरुवात संघानेच केल्याची माहिती त्रिलोकचंद राय यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images