Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कचऱ्यापासून वीजनिर्मिती रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पस्थळावर कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे ठरविले. पुणे येथील कंपनीला याचा ठेका दिला. या प्रकल्पाला मंजुरी देऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला. पण अद्याप वीज निर्मिती प्रकल्प कागदावरच आहे. महापालिकेला संबंधित कंपनीला प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देता आलेली नाही. दुसरीकडे शहरात रोज १७० टनाहून अधिक कचरा निर्माण होत आहे. हा कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न उभा आहे.

घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प हा ३० कोटींचा आहे. पुणे येथील रोकेम कंपनीने घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता. कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरातील चार एकर जागा कंपनीसाठी आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला निधी गुंतवावा लागणार नाही. प्रकल्पाचा संपूर्ण खर्च कंपनी करणार आहे. रोकेम कंपनी आ​णि महापालिकेत फेब्रुवारी २०१४ मध्ये यासंदर्भात करार झाला. कंपनीला प्रकल्प उभारणीसाठी चार एकर जागा आवश्यक आहे.पण महापालिकेने कंपनीला जागा उपलब्ध करून दिली नाही. कसबा बावडा रोडवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला दोन एकर जागा मोकळी करून देण्याच्या हालचाली झाली. जागा तयार करण्यात आली. पण कालांतराने त्या जागेवरही कचऱ्याचे डोंगर तयार झाले.

तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कालावधीत कचरा टाकण्यासाठी शहरातील विविध जागांचा शोध घेण्याच्या हालचाली झाली. बिदरी यांनी चारही विभागीय कार्यालयांना जागांचा शोध घेण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासकीय पातळीवरून त्या संदर्भात कसल्याच हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेच्या मलकीची पुईखडी परिसरात चार एकर जागा आहे. त्याठिकाणी कचरा टाकण्याचे निश्चित करण्यात आले. पण, स्थानिक राजकारण समोर ठेवून लोकप्रतिनिधींनी त्याला ​विरोध केला. सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला. मात्र, सभागृहाने पुईखडी येथील जागा कचरा टाकण्यासाठी देण्यास सहमती दिली नाही. हा विषय नामंजूर केला गेला.

घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी रोकेम कंपनीला सध्याच्या प्रकल्पाला लागून पाच एकरची जागा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीबाबतचा प्रस्तावही सादर केला आहेत. टोप येथील खणीची महिनाभरात मोजणी होईल. त्यानंतर डीपीआर तयार केला जाणार आहे.

- डॉ. विजय पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका

शहरात रोज १७० टनाहून अधिक कचरा तयार होतो. नोव्हेंबर २०१३ मध्ये रोकेमच्या पुण्यातील प्रकल्पाची पाहणी सर्वसाधारण सभेत (डिसेंबर २०१३) प्रस्तावाला मंजुरी वीज निर्मितीसाठी चार एकर जागेची गरज १८ महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित करण्याविषयी करार राष्ट्रीय हरित लवादने टोप येथील खणीचा निकाल महापालिकेच्या बाजूने दिला येथे इनर्ट मटेरियल टाकण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संयुक्त तपासाची मागणी करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ.एम.एम. कुलबर्गी यांच्या हत्येच्या तपास करण्यासाठी कलबुर्गी आणि पानसरे कुटुंबियांसह कर्नाटकातील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते १३ सप्टेंबरनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय असतील. या तिन्ही कुटुंबीयांच्यावतीने या हत्येचा तपास तातडीने करावा, अशी मागणी संयुक्तपणे करणार आहेत. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी ही माहिती दिली आहे.

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असून त्यांची हत्या करणारी प्रवृत्ती एकच आहे. कुलबर्गी यांच्या हत्तेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची मागणी कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. कुलबर्गी हत्येच्या तपासात दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचे धागेदारे मिळतील, अशी शाही पानसरे यांनी व्यक्त केली आहे.

मेघा पानसरे व त्यांचा मुलगा कबीर यांनी रविवारी धारवाड येथे जाऊन कलबुर्गी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी, मुलगा श्रीविजय, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी (चेन्नई), कन्नड कवयित्री डॉ. हेमा पट्टणशेट्टी, कर्नाटक स्त्री संघाच्या अध्यक्ष डॉ. वसुंधरा भूपती, प्रा. शशिकांत तोडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कलबुर्गी हत्येची माहिती घेताना पानसरे यांची झालेली हत्या, तपासाबाबत कलबुर्गी कुटुंकीय व सामाजिक कार्यकर्त्यांशी सुमारे अडीच तास चर्चा केली.

दाभोळलर व पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष पथकाची स्थापना करण्यासाठी उशीर केला आहे. अशीच स्थिती कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात होऊ नये यासाठी कलबुर्गी हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची लवकरात लवकर नियुक्ती करावी, याबाबत पाठपुरावा करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने १३ सप्टेंबरला मुख्यमंत्री भेट देतील, तेव्हा ही तिन्ही कुटुंबीय भेट घेणार आहेत. कलबुर्गी हत्येचा तपास लवकर व्हावा यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी एकच फोरम स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलावंतला १३ वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करुन त्याची अश्लिल चित्रफित वितरीत केल्याप्रकरणी इम्रान मौला कलावंत (वय ३४, रा. गावभाग, इचलकरंजी) या शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. राजेश अस्मर १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

‌या शिक्षेत ५० हजाराच्या दंडाचाही समावेश आहे. अशा प्रकरणात मोठी शिक्षा झालेली ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. सात वर्षापूर्वीच्या या खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

कलावंतने २ जुलै, २००८ मध्ये अल्पवयीन मुलीला प्रश्नपत्रिका व महत्त्वाच्या नोटस् देण्याचे आमीष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला होता. त्याच्या चित्रफितीही एका अल्पवयीन मित्राला दिल्या. तेथून या चित्रफिती सर्वत्र पसरल्या. यातील एक चित्रफित पीडित मुलीच्या चुलत भावाच्या मित्राकडे आली. तेथूनच या प्रकरणाचा उलगडा झाला.

ही माहिती समजताच संतप्त जमावाने कलावंतला मारहाण करीत त्याच्या तोंडाला काळे फासून गाढवावरुन धिंडही काढली होती. याप्रकरणी इम्रान याच्यासह त्याचा अल्पवयीन मित्र व लॉजमालक हरिष देवाडीगा या तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलिस उप अधीक्षक अश्विनी सानप व पोलिस निरीक्षक फुलचंद चव्हाण यांनी तपास केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीवर दुष्काळाचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीवर राज्यातील दुष्काळी स्थितीचे सावट आहे. राज्य सरकारने दुष्काळाची घोषणा केली तर निवडणूक कामासाठी आवश्यक अधिकारी आणि यंत्रणा उपलब्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागातील अ​धिकारी दुष्काळ निवारणाच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्याचे ठरले तर निवडणूक आयोग निवडणूक पुढे ढकलणार की नियोजित वेळापत्रकानुसार घेणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. दुसरीकडे अन्य महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करून निवडणूक घेता येऊ शकते असाही मतप्रवाह आहे.

सध्या निवडणूकविषयक कामकाज सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया पार पडली आहे. मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. नोव्हेंबरच्या मध्यंतराला सभागृहाची मुदत संपणार असल्याने निवडणूक आयोग निवडणुकीची अधिसूचना केव्हा काढणार याकडे लक्ष लागले आहे. अधिसूचना लागू केल्यानंतर ३० ते ४० दिवसात निवडणूक प्रक्रिया राबवावी लागेल.

महापालिका प्रशासनामार्फत निवडणुकीची तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या विविध कामांची जबाबदारी, उमेदवारांचा खर्च, प्रसिद्धी, रोजचा अहवाल अशा विविध कामासाठी अ​धिकारी आणि कर्मचारी मिळून ७२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रभाग रचनेची माहिती आणि अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

नियोजित वेळापत्रकानुसार काम सुरू आहे. दुष्काळाची घोषणा झाल्यास त्या संदर्भात ज्या त्या वेळची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

-जे. एस. सहारिया, मुख्य निवडणूक आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर न्यायाच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याच्या मागणीवर आज (मंगळवार) निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यासंबंधीचा निर्णय देणार आहेत. त्यांच्या या निर्णयाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार वकिलांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंच स्थापन करावे असा मंत्रीमंडळ ठराव यापूर्वीच पाठवला आहे. त्यानुसार सर्किट बेंचप्रश्नी न्यायमूर्ती शाह यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

न्यायमूर्ती शहा हे मंगळवारीच निवृत्त होणार आहेत. सर्किट बेंचप्रश्नी ऑगस्ट महिन्यात खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने गोव्यातील पणजी हायकोर्टात शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली होती. शाह यांनी संस्थानकालात कोल्हापुरातील सुप्रिम व हायकोर्टाच्या कामकाजाचे पुरावे आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांचे ठराव मागितले होते. खंडपीठ कृती समितीच्यावतीने त्याचीही मुंबई हायकोर्टाच्या रजिस्ट्रारांकडे तातडीने पूर्तता केली आहे.

शाह सोमवारी निवृत्त होणार असल्याने दिवसभर सर्व वकिलांचे लक्ष मुंबईकडे लागले होते. खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी व वकील मुंबईशी सोमवारी दिवसभर संपर्क ठेवून होते. दुपारी अडीचपर्यंत कोणत्याही क्षणी सर्किट बेंचचा निर्णय होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ममात्र दुपारनंतर यासंबंधीचा निर्णय मंगळवारी होणार अशी चर्चा जिल्हा न्यायालयाच्या आवारात होती.

लढ्याची अडीच वर्षे

गेल्या अडीच वर्षांत कृती समितीने खंडपीठप्रश्नी आंदोलन छेडले आहे. २९ ऑगस्ट २०१३ ते २८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत वकिलांनी सलग ५५ दिवस कोर्ट कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंडपीठाऐवजी सर्किट बेंचच्या मागणीचा प्रस्ताव पुढे केला होता. न्यायमूर्ती शाह यांनीही वकिलांनी कानावर बंदूक ठेवून वेठीस धरून निर्णयाची अपेक्षा धरू नये. आंदोलन बंद करून कामकाजात सहभागी व्हावे, अशी विनंती समितीला केली होती. अखेर खंडपीठाची मागणी मान्य होण्याच्या अपेक्षेने वकिलांनी संप मागे घेतला होता. पण, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्किट बेंचचा प्रस्ताव रेंगाळला होता. भाजप महायुतीच्या सरकारने सर्किट बेंच स्थापनेचा मंत्रीमंडळ ठाराव मुंबई हायकोर्टाला पाठवला. त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे, दाभोलकर कुटुंबीयही घेणार कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ.एम.एम. कुलबर्गी यांच्या हत्येच्या तपास करण्यासाठी कलबुर्गी आणि पानसरे कुटुंबियांसह कर्नाटकातील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते १३ सप्टेंबरनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय असतील. या तिन्ही कुटुंबीयांच्यावतीने या हत्येचा तपास तातडीने करावा, अशी मागणी संयुक्तपणे करणार आहेत. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी ही माहिती दिली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असून त्यांची हत्या करणारी प्रवृत्ती एकच आहे. कुलबर्गी यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची मागणी कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. कुलबर्गी हत्येच्या तपासात दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचे धागेदारे मिळतील, अशी शक्यताही मेघा पानसरे यांनी व्यक्त केली आहे.

मेघा पानसरे व त्यांचा मुलगा कबीर यांनी रविवारी धारवाड येथे जाऊन कलबुर्गी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी, मुलगा श्रीविजय, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी (चेन्नई), कन्नड कवयित्री डॉ. हेमा पट्टणशेट्टी, कर्नाटक स्त्री संघाच्या अध्यक्ष डॉ. वसुंधरा भूपती, प्रा. शशिकांत तोडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कलबुर्गी हत्येची माहिती घेताना पानसरे यांची झालेली हत्या, तपासाबाबत कलबुर्गी कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांशी सुमारे अडीच तास चर्चा केली.

दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष पथकाची स्थापना करण्यासाठी उशीर केला आहे. अशीच स्थिती कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात होऊ नये, यासाठी कलबुर्गी हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची लवकरात लवकर नियुक्ती करावी, याबाबत पाठपुरावा करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने १३ सप्टेंबरला मुख्यमंत्री भेट देतील, तेव्हा ही तिन्ही कुटुंबीय भेट घेणार आहेत. कलबुर्गी हत्येचा तपास लवकर व्हावा, यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी एकच फोरम स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण

$
0
0

सांगली : पाणी योजना सुरू करा, चारा डेपो सुरू करा, कर्जमाफी द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तासगाव येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे म्हणाले, तालुक्यातील विसापूर, पुणदी पाणी योजना सुरू केल्या जाव्यात. येरळा नदीत पाणी सोडा. आरफळ, ताकारी, टेंभू या पाणी योजना सुरू करा. चारा डेपो उघडा. शेरीनाल्याचे प्रक्रिया केलेले पाणी धुळगावला शेतीसाठी सोडा, पाण्याअभावी जळालेल्या पिकांच्या नुकसानभारपाई पोटी हेक्टरी २५ हजार रुपये द्या, पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकर सुरू करा, चारा पुरवताना शेळ्या-मेंढ्यांचाही विचार करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व पासचे शुल्क माफ करावेत, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही बंदी आदेश मोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांत २५ याने अवकाशात झेपावणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'आगामी दोन वर्षांत नवीन २५ याने अवकाशात झेप घेणार आहेत. २०१७साली चंद्रयान-२ व सन २०२०साली चंद्रयान-३ची चाचणी घेतली जाणार आहे,' अशी माहिती इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांची माहिती दिली. डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'अवकाश संशोधनासाठी लागणारे इंजिनिअरींगचे कौशल्य' या विषयावर नाईक बोलत होते.

'भास्कर-१ हे यान तयार करताना व पुढे चाचणी करताना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी आपले संबंध आल्यानेच त्यांचा आदर्श समोर ठेवून मला अवकाश संशोधनात स्फूर्ती मिळाली. मंगळ ग्रहावरील हवामानाचा, मिथेन वायुचा रंग व इतर खनिजांचा शोध लावण्याच्या ध्येय व उद्देशाने मंगळ ग्रहावर पाठविलेल्या पीएसएलव्ही या यानाच्या इंजिनचे सहा वेळा फायरींग करण्यात आले, त्यामुळे हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेपर्यंत पोहचले. त्यासाठी नेवीगेशन सेन्सर्स वापरले गेले. मंगळयान हे हेलीओसेंट्रिक टप्प्यामध्ये काम करते. भारताने सर्व यानाची निर्मिती ही कमीत-कमी खर्चामध्ये केली आहे. एसएलव्ही-३ आणि पीएसएलव्ही या यानांतील पीएसएलव्ही हे यान एसएलव्ही-३ पेक्षा जास्त कार्यशिल असते. पीएसएलव्हीने आतापर्यंत अशा यानांची अनेक देशांनी एकूण ४६ यशस्वी उड्डाणे केली आहेत,' असेही नाईक म्हणाले.

चंद्रयानाच्या चंद्रापर्यंतचा प्रवासाविषयी बोलताना डॉ. नाईक म्हणाले, पृथ्वीपासून चंद्राचे अंतर चार लाख कि. मी. आहे. यानाचे इंजिन फायर केल्यावर गती वाढते आणि तो चंद्राच्या कक्षेत पोहोचतो. चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधण्यासाठी भारताने यान सोडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इस्लामपूर झाले ‘वाय-फाय’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'मित्रांनो वाय-फायचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करा. तातडीच्या सेवा आणि समाज उपयोगी गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरा. ज्येष्ठांनीही वाय-फायचा वापर करावा,' असा आग्रह अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात केला. ताम्हणकर शहरातील फोर-जी वाय-फाय इंटरनेट सेवेच्या लोकार्पण सोहळयात बोलत होत्या. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार कचेरी चौकात युवकांच्या उत्साहाने या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती.

सई ताम्हणकर म्हणाली, 'आपण ज्या व्यक्तींवर प्रेम करतो तिचे सर्वकाही आपण ऐकतो. त्याप्रमाणे सेलिब्रेटींवर लोक प्रेम करतात म्हणून, या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले आहे. रोटी, कपडा और मकान ही म्हण बदलून आता रोटी, कपडा और वाय-फाय, असे म्हणायला हवे. जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी वाय-फायची गरज आहे. मी लहान असताना पाहिलेले इस्लामपूर आणि आता एज्युकेशन हब बनलेले इस्लामपूर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी झाले आहे.'

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, 'आपले इस्लामपूर शहर यापुढे सर्वांत वेगाने जगाच्या संपर्कात राहणार शहर ठरणार आहे. सई ताम्हणकर ही अभिनेत्री आपल्या इस्लामपूरच्या एका भगिनीची कन्या आहे. ती सेलिब्रेटीपेक्षा ती आपली भाची आहे. म्हणून तिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आपली तरुण पिढी जगाच्या बरोबर रहावी. जगाच्या पाठीवरील ज्ञानचे भांडार तरुणांसाठी खुले व्हावे म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी इस्लामपूर शहर वाय-फाय करा, असा सल्ला दिला होता. त्यामुळे वाय-फायची यंत्रणा सुरू केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलधाडीला स्थगिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगलीवाडीनजीकच्या नाक्यावर पुन्हा येऊ पाहणाऱ्या टोलधाडीला अखेर मंगळवारी हायकोर्टाने स्थगिती दिली. संबधित ठेकेदाराची रक्कम सरकार परत करेल, पण पुन्हा टोलवसुली होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मंगळवारी सांगलीत पत्रकारांना दिली. टोलवसुलीला स्थगिती म्हणजे काम फत्ते झाले, असे नाहीतर आजवरच्या वसुलीची सर्वंकष चौकशी करून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील, मदन पाटील युवामंचचे प्रशांत पाटील-मजलेकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा निता केळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे अजिंक्य पाटील, मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत, शहर सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेविका स्वरदा केळकर आदी सर्वांनी एकत्रित येवून हायकोर्टाच्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी इचलकरंजीत तिघांना अटक

$
0
0

इचलकरंजी : शहापूर येथील गवंडी कामगार दीपक मारुती मस्तुद (वय ३२) याच्या खून प्रकरणी शहापूर पोलिसांनी मंगळवारी तिघाजणांना अटक केली. माणिक उर्फ योगेश बळीराम कांबळे (वय १९), विनोद शिवाजी जाधव (वय १९) आणि अनिल वसंत वाघमारे (वय १९, सर्व रा. तारदाळ) अशी त्यांची नावे आहेत. मस्तुद याचा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली तिघांनीही दिली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या दीपक मस्तुद याचा ३१ ऑगस्ट रोजी याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. शहापूर पोलिसांच्या विविध पथकाद्वारे या हल्लेखोरांचा तपास सुरु होता. इचलकरंजीतील मरगुबाई मंदिर परिसरात या खूनातील संशयित माणिक कांबळे, विनोद जाधव व अनिल वाघमारे या तिघांना गावभाग पोलिसांच्या मदतीने सापळा रचून रात्री ताब्यात घेण्यात आले. माणिक याच्या आईशी दीपक याचे अनैतिक संबंध होते. याचा माणिक याला राग होता. त्यातच रविवारी रात्री दीपक व माणिक यांच्यात वादावादी झाली होती. याच रागातून माणिक याने दीपक याचा काटा काढण्याचे ठरविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालकासह दोघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

खंडणी मागितल्याप्रकरणी संजिवनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक भूपाल आण्णा विभुते (वय ६७) व सुकुमार कुमार पाटील (वय ५३) या दोघांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विभुते व पाटील यांनी दहा लाख रूपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद विभुते विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महावीर पाटील यांनी दिली होती. याबाबतच्या खटल्यात न्यायालयाने हा निकाल दिला.

आण्णासाहेब विभुते विद्यामंदिरमध्ये महावीर आप्पासाहेब पाटील हे सन २००० पासून मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. २४ जानेवारी, २०११ रोजी शाळेत नेहमीप्रमाणे हजेरीपत्रकावर सही करीत असताना भूपाल विभुते व सुकुमार पाटील यांनी सही करण्यास विरोध केला. तसेच दहा लाख रूपयांची मागणी केली. रक्कम दिली नाही तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. पैसे द्यायचे नसतील तर माझी इमारत खाली करा, मुलांना कोठेही नेवून शिकवा अशी मला व स्टाफला धमकी देवून दहा लाख रूपये खंडणीची बेकायदेशिररित्या मागणी केल्याची फिर्याद मुख्याध्यापक महावीर पाटील यांनी दिली होती. यानंतर हवालदार ए. एस. कांबळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे फिर्यादी महावीर पाटील यांच्यासह पाच साक्षीदार तपासण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानेत बार घुसल्याने मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हुपरी (ता. हातकणंगले) येथे मनसेच्या दहीहंडीचा कार्यक्रमावेळी लाइट व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या टॉवरवरून पडल्याने एका प्रेक्षकाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. लोखंडी बार छातीत आरपार झाल्याने सुनील तुकाराम गजरे (वय ३८, रा. गजरे गल्ली, हुपरी) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सी.पी.आर. पोलीस चौकीत झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हुपरीतील मनसेच्यावतीने दहीहंडीचा कार्यक्रम व अर्चना सावंत यांच्या लावणीचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक क्रीडांगणावर आयोजित केला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हुपरीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. संख्या जास्त असल्यामुळे क्रीडागंणावर मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक बसले होते. सभोवतालच्या इमारतीवर प्रेक्षक उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. क्रीडांगणावर लाइट व्यवस्थेसाठी टॉवर उभा केला होता.

त्या टॉवरवर चढून काही हौशी तरूण कार्यक्रम पाहत होते. त्यामध्ये सुनील गजरेचाही समावेश होता. अर्चना सावंत यांच्या लावणीचा कार्यक्रम संपल्यानंतर शिरोळच्या मंडळाने दहीहंडी फोडली. त्यानंतर सुनील टॉवरवरून खाली उतरत असताना पाय निसटल्याने टॉवर उभारण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी बारवर आदळला. तो लोखंडी बार सुनीलच्या छातीतून मानेपर्यंत आरपार घुसला. यानंतर त्याला तत्काळ रूग्णवाहिकेतून कोल्हापूरला हलविले.

अखेर मृत्यूने गाठलेच...

सुनील गजरे याचा मागील वर्षी मोटार सायकलचा अपघात होवून एक पाय फॅक्चर झाला होता. त्या पायामध्ये रॉड घातले होते. त्यानंतर यावेळी झालेल्या आषाढी दिंडीवेळी गोपालदास महाराजांच्या पालखीचा रथ पायावर पडून पायाची दोन बोटे निकामी झाली होती. त्यावेळी सुनील गजरे हा मित्रांना सांगून माझी वेळ चांगली होती म्हणून पायावर निभावले असे गंमतीने सांगत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दत्त शिरोळ’चा १३०० रु. दुसरा हप्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याने गत हंगामात १६ मार्च नंतर गाळपास आलेल्या उसास प्रतिटन १३०० रूपये दुसरा हप्ता दिला आहे. यापुर्वी कारखान्याने प्रतिटन १२०० रूपये पहिला हप्ता दिला होता. आता दुसरा हप्ता बँक खात्यावर जमा केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २५०० रूपये मिळाले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कारखान्यात १५ मार्चपर्यंत गाळप झालेल्या उसास प्रतिटन २५०० रूपये देण्यात आले. मात्र यानंतर शेतकऱ्यांना प्रतिटन १२०० रूपये पहिला हप्ता दिला होता. साखरेचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांची ऊस बिले रखडली होती. साखर कारखान्यासमोरील ही समस्या विचारात घेवून एफआरपीप्रमाणे ऊस दर देण्यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले. दत्त साखर कारखान्यास बँक ऑफ इंडियाकडून कर्ज उपलब्ध झाले. यामुळे एकूण ३१ कोटी ७२ लाख ७७ हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन २५०० रूपये मिळाले आहेत, असेही गणपतराव पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, कार्यकारी संचालक, एम. व्ही. पाटील, संचालक व खाते प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेसरीत हत्तीमुळे थरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीसह तळेवाडी, अर्जुनवाडी परिसरात टस्कर हत्तीचे मंगळवारी आगमन झाले. नेसरीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी हत्ती आल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. नेसरी परिसरातील शेतवडीत हत्ती शिरल्याने बघ्यांची‌ मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे हत्ती बिथरून सैरावैरा पळत होता. बघ्यांच्या अतिउत्साहामुळे हत्ती अधिकच बिथरला. गेले काही दिवस टस्कर चंदगडमध्ये ठाण मांडून होत. चंदगडच तालुक्यातील न्हावेली, उमगाव आदी जंगलाकडील गावांमध्ये त्यांना थैमान घातले आहे.

भात, ऊस व अन्य पिकांचे मोठे नुकसान केले आहे. हाच हत्ती गड‌िंग्लज तालुक्याकडे आला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता नागनवाडी येथे तो शेतकऱ्यांना दिसला होता. त्यानंतर त्याने उसगाव, वाळकोळी, ऊरजमार्गे पहाटे पाचच्या सुमारस त्याने कानडेवाडीतील बागी मळा येथे दर्शन दिले. त्यानंतर त्याने अर्जुनवाडी, तळेवाडी परिसराकडे कूच केले. या कालावधीत नागरिकांना याची कुणकुण लागली. क्षणार्धात ही बातमी परिसरातील गावांमध्ये पसरली. त्यामुळे बघ्यांची गर्दी उसळली. व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून ही बातमी क्षणार्धात सगळीकडे पसरली आणि आजरा, गडहिंग्लज, चंदगड आदी ठिकाणहून उत्साही तरूण हत्ती पाहण्यासाठी गेले. हत्तीला हुसकावून लावण्याच्या नादात प्रचंड आरडओरडा झाल्याने हत्ती बिथरला. त्यामुळे तो कधी शेतात तर कधी जमावाच्या दिशेने रस्त्याकडे येत होता. त्यामुळे वनविभाग व पोलिसांनी तत्काळ उपाययोजना सुरु केल्या.

वनविभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी अकरा ते चार या कालावधीत त्यांनी रेगे यांच्या उसाच्या शेतातून त्याला बाहेर पडण्यास प्रतिबंध केला. यामध्ये वनविभागातर्फे टस्कर नागरी वस्तीकडे वळणार नाही याची खबरदारी घेतली. नेसरी-आजरा मार्गावरील मारियन रेगे यांच्या शेतातून कृषी महाविद्यालय परिसरात फिरून पुन्हा रेगे यांच्या शेतात जवळपास दोन तास हत्ती ठाण मांडून होता.

दरम्यान पोलिस निरीक्षक राकेश हांडे, वनरक्षक बी. बी. पाटील, बाळकृष्ण देरेकर, लक्ष्मण पाटील, राजन देसाई आदींसह पोलीस व वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न करून तळेवाडी-अर्जुनवाडी मार्गावरील वाहने माघारी फिरवली तसेच टस्करवर लक्ष ठेवून आहेत. आजरा तालुक्यातील, मसोली, लाटगाव, इटे, रायगवाडा, खानापूर, पोळगाव, एरंडोळ गावातील बहुतांश पिकांचे अतोनात नुकसान झाले होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मदरशांविरोधात नाही

$
0
0

भाजपच्या जमाल सिद्धीकी यांची स्पष्टोक्ती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मुस्लिम समाज सुरक्षित आहे. आघाडी सरकारने केवळ आरक्षणाचे आणि संरक्षणाचे लॉलीपॉप दाखविण्याचे काम केले आहे. राज्य सरकार मदरसाच्या विरोधात नसून अधिकृत नोंदणीचे काम करीत आहे. या चांगल्या कामाचा काँग्रेसच्या दलालांनी गैरप्रचार सुरु केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिद्धीकी म्हणाले, 'काँग्रेसच्या सरकारकडून मुस्लिमांचे भले झालेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मुस्लिम सुरक्षित नव्हते. त्याउलट भाजप सरकारमध्ये मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत.

अब्दुल कलाम आझाद यांच्या विचाराने चालणारा मुस्लिम समाज आहे. पाकिस्तानमध्ये कधी बाँम्ब फुटेल, याची श्वाशती नाही. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात मुस्लिम सुरक्षित आहे. काँग्रेसने केवळ आरक्षणाचे गाजर दाखविले.

काँग्रेसच्या दलालाकडून मदरसाचा अपप्रचार केला जात आहे. राज्यातील मदरसांची अधिकृत नोंदणीचे काम सरकारकडून सुरु आहे. सरकार मदरसांच्या विरोधात नाही. मदरशांमध्ये शिकणारी मुले शालाबाह्य ठरविण्याचा सरसकट निर्णय अजून झालेला नाही. तरीही त्याविरोधात बु‌द्धिभेद केला जात आहे. या मदरसामध्ये केवळ अरबी, फारसीचे अध्यापन केले जाते. या मदरसामध्ये मराठी, गणित, सायन्ससारखे विषय शिकविले जाणार आहे. या मदरसामधून काही मौलाना बनतील. मात्र त्यासह डॉक्टर, इंजिनीअरिंग आणि वकीलही घडतील.'

ते पुढे म्हणाले,' असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष हा मृगजळ आहे. त्यापाठीमागे कोणीही धावू नये. काही बेरोजगार अमिषापोटी याकडे वळले आहेत. त्यांना आता वास्तव कळाले आहे. देशाची फाळणी करणाऱ्या जिना यांचे ओवेसी समर्थक आहेत. मौलाना आझाद मंडळाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत. मुस्लिम महिलांच्यासाठी नयी रोशन ही योजना राबविण्यात येणार आहे.' यावेळी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नजीरअहमद देसाई, जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अब्दुल करीम शेख, ताहेर असी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्ट‌िकमुक्तीचा निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गडहिंग्लजपाठोपाठ आता आजरा गाव व परिसराची प्लास्टिकमुक्ती करण्याचा निर्धार आजरा ग्रामपंचायतीने केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत ठराव करण्यात आला असून आजरा व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन याबाबतचा संकल्प सोडण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात कारवाई करणाऱ्यांवर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्यापारी वर्गातील तरूण मंडळी या उपक्रमाबाबत आग्रही आहेत. नागरिकांना प्लास्ट‌िक पिशवी मागण्याची व वापरण्याची लागलेली सवय इतक्या सहजासहजी बदलणार नाही, याची जाणीव असली तरी प्रयत्नांच्या आधारे हा उपक्रम यशस्वी करण्याचा व सुपूर्ण गाव व परिसराला प्लास्ट‌िकच्या पाशातून सोडविण्यात येणार आहे.

प्रत्येकाने एकेक नवा उपुक्रम राबवून स्वत:ची अशी एक वेगळी छाप उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वच्छता मोहीम, कतरा उठाव करण्यासाठी शहरात घंटागाडी, पिण्याच्या पाण्याची नवी योजना, रस्ते रूंदीकरण, गटार खोदाई, परिसरात उद्यान निर्मिती, रामतीर्थ पर्यटन स्थळ सौंदर्यीकरण आदींद्वारे प्रत्येक सरपंचाने गावाला वेगळे रूप देण्याचा व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. नयना भुसारी सध्या आजऱ्याच्या सरपंच आहेत. त्यांच्या पुढाकाराने या नव्या उपक्रमाची संकल्प सोडण्यात आला आहे. याबाबत सर्वांचे सहकार्य मिळेल, असा आशावादही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

बाजारामध्ये कोणत्याही दुकानात वस्तू खरेदी करताना गिऱ्हाइकांना प्लास्ट‌िक पिशवी मागण्याची व ती पुरविण्याची सवय लागलेली आहे. दुकानदारांनाही अशा प्रकारची पिशवी पुरविण्याशिवाय गत्यंतर नसते. विशेषत: ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्ट‌िक पिशव्या पुन्हा वापरता येत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याचा विचार करून या प्रकारच्या पिशव्या वापरण्याबाबत निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याबाबत व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत सद्यस्थितीत साठा असलेल्या पिशव्या संपविण्याबाबत एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

या मुदतीत सर्व दुकानदारांनी त्यांच्याकडील प्लास्ट‌िक पिशव्या संपवायच्या आहेत. महिनाभरानंतर अशा प्रकारे कोणी पिशव्या पुरविताना आढळल्यास पाच हजार रूपये दंड आकारण्याचे ठरले आहे. आजरा शहरात आठवडी बाजारही भरतो. बाहेरगावचे अनेक व्यापारी यानिमित्ताने येथे दुकाने थाटतात. या अनुषंगाने प्रबोधनात्मक कामावर भर देण्याचे ठरले असून काही संस्था व शाळांसह तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

प्लास्ट‌िक पिशव्या टाळण्यासाठी स्वस्तात कापडी पिशव्या पुरविण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याबाबत संथगतीने का असेना नियोजनबद्धरितीने उपक्रम राबविण्याचा निर्धार आहे.

- नयना भुसारी, सरपंच

हा उपक्रम स्तुत्य आहे. याआधीच याबाबतची कार्यवाही व्हायला हवी होती. व्यापारी असोसिएशन याबाबत सहकार्य करेल. याबाबत प्रबोधनाची जास्त गरज आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल.

- दिवाकर नलावडे, आजरा व्यापारी असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा नाही, आता संघर्षच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'यापुढे मराठा आरक्षणासाठी कुणाकडे भीक मागितली जाणार नाही. विरोध करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ. मराठा आरक्षणाविरोधात धमकी देणाऱ्यांनी यापुढे नाव आणि पत्ताही द्यावा. आरक्षण मिळाले नाही तर हिंसक मार्ग पत्कारावा लागेल,' असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे झालेल्या मराठा आरक्षण जागृती मेळाव्यात दिला. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून पुन्हा एल्गार पुकारण्यात आला. स्वाभिमान संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, क्षत्रिय मराठा, छावा संघटना यांच्यावतीने राजर्षी शाहू स्मारकमध्ये मेळावा झाला.

आमदार राणे म्हणाले, 'येणारा काळ संघर्षाचा आहे. विचारांचे उत्तर विचारांनी देण्यासाठी काहीच हरकत नाही. मात्र, मराठा आरक्षणासाठी मागणी, निवेदने, चर्चा करण्याची वेळ संपली आहे. आरक्षणाला विरोध करणारे स्फोटक पदार्थ पाठवतात. त्यामुळे आता मराठा समाजाच्या मावळ्यांनी गप्प बसून चालणार नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय झाला. मात्र, काही समाजकंटकांनी तो हाणून पाडला. त्यामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत मराठ्यांची ताकद इच्छुक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना दाखवा. स्वतंत्र मराठा गट म्हणून निर्माण करा. येत्या काही दिवसांत गांधी मैदानात मेळावा घेतला जाईल.'

आमदार राणे पुढे म्हणाले, 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना दिला जातो. त्यांना विरोध झाल्यास ठाकरे बंधूही टीकास्त्र सोडतात. अनेक प्रकारे तांडव रचले जाते. शिवरायांची बदनामी केलेल्या जेम्स लेनची वारेमाप प्रसिद्धी केली जाते. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्नावर सर्वच राजकीय नेते मूग गिळून गप्प आहेत. पुरंदरेंचा जाहीर सत्कार करून दाखवाच, त्यांना तांडवाची खरी परिभाषा दाखवून देऊ. खरे शिवाजी कोण, असे सांगणाऱ्या अॅड. गोविंदराव पानसरे यांची हत्या केली जाते.'

यावेळी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, श्रीमंत कोकाटे, संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष हिंदुराव हुजरे, क्षत्रिय मराठाचे दिलीप पाटील, छावा संघटनेचे राजू सावंत, आदी उपस्थित होते.

तावडे, मेटेंना बघू..

मराठा आरक्षणासाठी आरक्षण समितीचे समन्वयक विनोद तावडे आणि शिवस्मारक समितीचे विनायक मेटे यांच्याकडून आता काहीही अपेक्षा राहिलेली नाही. शिवस्मारकासाठी तारीख पे तारीख सुरू आहे. तावडेंकडेही निवेदने देऊन शिष्टमंडळ वैतागले आहे. आता आरक्षणाची मागणी, निवेदन दिले जाणार नाही. भाजपच्या कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यात शिवरायांचे पोस्टर नव्हते. त्यावरूनच भाजप-शिवसेना युती सरकारची खरा इतिहास पुढे येत असल्याची टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्दिष्टपूर्तीतच समाधान

$
0
0

पुरुष नसबंदीबाबत सरकारी पातळीवरही प्रचंड उदासीनता

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जात असताना सरकारी पातळीवर मात्र याबाबत अनास्था असल्याचे पुरुष व स्त्री नसबंदी आकडेवारीवरुन दिसून येत आहे. गेल्या साडेतीन वर्षामध्ये जिल्ह्यातील केवळ दोन हजार १७७ पुरुषांनी नसबंदी करुन घेतली आहे. स्त्री नसबंदीपेक्षा आठपटीने हे आकडे कमी असल्याने पुरुष नसबंदीची केवळ उद्दिष्टपूर्ती झाली असल्याचे सरकारी पातळीवर समाधान मानले जात आहे. सरकारच्या आरोग्य विभागाकडून स्त्री नसबंदीचे उद्दिष्ट हजारात दिले असताना पुरुष नसबंदीचे केवळ ४०० ते ५०० देऊन सरकारी पातळीवरच विषमता दाखवून दिली जात आहे.

कृषी क्षेत्राचा विकास आणि वैद्यक शास्त्रातील संशोधनामुळे माणसाचे आर्युमान वाढत आहे. यामुळे लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होती. आणिबाणीमध्ये पुरुष नसबंदीचा अतिरेक झाल्याने त्यावर टीकाही झाली. यामुळे आजतागायत पुरुष नसबंदीचे उद्दीष्ट देताना सरकारी पातळीवर 'हातचे राखूनच' उद्दीष्ट देत आहे.

याच स्थितीमुळे गेल्या पाच सहा वर्षापासून ६०० ते ७०० पेक्षा अधिक पुरुष नसबंदीचे उद्दिष्ट मिळालेले नाही. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ९० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टपूर्ती होत असली, तरी स्त्री नसबंदीपेक्षा ही आकेडवारी खूपच कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कमी गुंतागुतींचा आणि जोखमिची नसली, तरी यामध्ये पुरुषांमधील कमी जागृतता कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळे स्त्री शस्त्रक्रिया अधिक गुंतागुतींच्या सर्वाधिक जोखमीची असूनही सर्वात जास्त स्त्री नसबंदी होत आहेत. पुरुष नसबंदीची आकडेवारी वाढवायची असल्यास उद्दिष्टामध्ये जास्त वाढ करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कमी उद्दिष्ट देवून उद्दिष्टपूर्ती झाल्याचे समाधान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मानावे लागेल.

प्रयत्नांची गरज

चिरायु योजना, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू योजनासारख्या योजना राबवून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या आरोग्याला नवी दिशा दिली आहे. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये पुरुष नसबंदी संख्येमध्ये वाढ होत असली, तरी हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला यापेक्षा वेगळे प्रयत्न करावे लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महापालिकेवर टोलचा बोजा पडू देणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरला टोलमुक्त करण्याचा शब्द दिला आहे. सध्या टोल वसुलीला तीन महिन्याची स्थ​गिती असली तरी त्या अगोदरही कोल्हापूर टोलमुक्तीचा निर्णय होऊ शकेल. कोल्हापूर महापालिका आणि जनतेवर कसलाही बोजा पडू देणार नाही.,'अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा टोल विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.

कृती समितीचे पदाधिकारी बाब पार्टे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी मंत्री शिंदे यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. मुंबई येथील बैठकीतच टोल वसुलीला स्थगिती दिली आहे. त्या आदेशाची प्रत काढायची वेळ येऊ दिली नाही. प्रकल्पाच्या मूल्यांकनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्रकल्पाची किंमत निश्चित करून आयआरबी कंपनीला रक्कम भागवली जाणार आहे. आयआरबी कंपनीच्या प्रतिनिधींनाही भानगडी करू नका अशा सक्त सूचना केल्या आहेत. टोलप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे कंपनीने काही आगळीक करू नये. करारातील अनेक अटीचा भंग झाल्याचे अहवालाअंती सामोरे आले आहे. कंपनीने भानगडी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला असल्याचे शिंदे यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. रस्ते देखभाल आणि दुरूस्तीसाठी महापालिकेवर ताण पडू नये यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात अशोक पोवार, पंडीतराव सडोलीकर, हंबीरराव मुळीक, अजित सासने, मदन चोडणकर चर्चेत सहभागी झाले. यावेळी प्रसाद जाधव, दीपा पाटील, वैशाली महाडिक आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images