Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हत्येच्या तपासासाठी एसआयटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली. पथकाचे प्रमुख म्हणून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार काम पाहणार आहेत. दरम्यान, एसआयटीच्यावतीने पुण्यातील पथक शुक्रवारी कोल्हापुरात तपासासाठी येणार आहे. पानसरे हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करून तपासाची माहिती नियमित कोर्टाला द्यावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी होण्यापूर्वीच राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.

संजय कुमार यांनी बुधवारी कोल्हापुरात बैठक घेतली. तपासात प्रगती नसल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली. गेल्या दोन महिन्यांत पानसरे हत्येच्या तपासात कोल्हापूर पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी परजिल्ह्यातील पोलिसांनी पोलिस महासंचालकांकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एसआयटीचे प्रमुख संजय कुमार यांनी कोल्हापूर पोलिसांना तपासासाठी एसआयटीला माहिती देण्याचे आणि सहकार्याचे आदेश दिले आहेत. एसआयटीकडून पुन्हा कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पानसरे कुटुंबीयांचे जबाब तपासासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तपासाचा अहवाल रोज एसआयटीला देण्याचे बंधनकारक केले आहे.

दरम्यान, पानसरे हत्येचा तपास गेली दोन महिने कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार यांनी केला होता. हत्येच्या तपासासाठी २७ पथके कार्यरत आहेत. रितेशकुमार यांनी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक जिल्ह्यातील २० पोलिस अधीक्षकांची संयुक्त बैठक बोलावून तपासासाठी पुढाकार घेतला होता. तपासाला वेग आला असताना अचानक रितेशकुमार यांची बदली करण्यात आल्याने डाव्या चळवळीतील पक्षांनी राज्य सरकारचा निषेधही केला आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टात अॅड केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली असून, पानसरे हत्येचा तपास सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना पानसरे यांची कन्या स्मिता सातपुते व सून मेघा यांनीही एसआयटीची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लँडलाइन वापरा अनिर्बंध

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्यांच्याकडे भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) लँडलाइन सुविधा आहे, त्यांच्यासाठी 'बीएसएनएल'ने एक मेपासून मोठी भेट दिली आहे. रात्री नऊनंतर सकाळी सातवाजेपर्यंत लँडलाइनवरून देशभरातील कोणत्याही नेटवर्कच्या मोबाइलवर, लोकल तसेच एसटीडी नंबरवर केले जाणारे कॉल मोफत केले आहेत. एसटीडी सुविधा ज्यांच्याकडे नसेल त्यांना ही सुविधा सुरू करून घ्यावी लागणार आहे.

सध्या मोबाइलची मोठी चलती असल्याने देशभरातील 'बीएसएनएल' लँडलाइनची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. ब्रॉडबँड सेवा चांगली असल्याने कोल्हापूरमध्ये लँडलाइनची संख्या झपाट्याने कमी झालेली नाही. मात्र, देशभरातील सर्व ठिकाणची परिस्थिती पाहता 'बीएसएनएल'ने एक मेपासून ग्राहकांना मोठी सुविधा दिली आहे. ज्यांच्याकडे लँडलाइन फोन आहे, त्या ग्राहकांना रात्री नऊनंतर सकाळी सात वाजेपर्यंत देशातील कोणत्याही राज्यातील मोबाइलवर, कोणत्याही लँडलाइनवर मोफत फोन करता येऊ शकणार आहे. सध्या 'बीएसएनएल' एसटीडी सुविधा कनेक्शनसोबत देते. पण ज्यांच्याकडे ही सुविधा सुरू नाही, त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधल्यास तत्काळ सुरू करता येऊ शकते. या मोठ्या सुविधेसाठी बीएसएनएल केवळ मासिक शुल्कामध्ये नाममात्र वाढ करणार आहे. बिलातील ही वाढ २० ते २५ रुपयांपर्यंत असेल, असे 'बीएसएनएल'च्या सहाय्यक महाप्रबंधक ए. एस. भोसले यांनी स्पष्ट केले. याशिवाय एक मेपासून एफडब्ल्यूटी तरंग कनेक्शन सेवेसाठी मासिक भाडे ९० रुपयावरुन १२० रुपये करण्यात येत असल्याचे कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेशभूषाकाराची आत्महत्या

$
0
0



कोल्हापूर - मराठी चित्रपटातील वेशभूषाकार ​विजय मारुती सामाने (वय २८, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली.

सामाने यांचे देवल क्लबजवळ ड्रेपरीचे दुकान आहे. दुकानाशेजारी असलेल्या डान्स स्कूलमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास चेष्टामस्करीही केली. त्यानंतर ते दुकानात झोपी गेले. दुपारी अडीचच्या सुमारास विद्यार्थ्यांनी विजय यांच्या दुकानाचे शटर उघडले असता ते गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. विद्यार्थ्यांनी त्यांना सीपीआरमध्ये उपचारास हलविले, पण उपचारापूर्वीच विजय यांचा मृत्यू झाला. विजय यांनी १०० चित्रपटांत वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'धग'साठी वेशभूषाकार म्हणून स्पर्धेसाठी नामांकन झाले होते. 'ख्वाडा' चित्रपटासाठीही वेशभूषाकार म्हणून झी अवॉर्डसाठी त्यांचे नामांकन झाले आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, आठ महिन्याची मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

KDCCसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (केडीसीसी) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे एकच पॅनल उभे करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीचे नेते माजी मं‌त्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील यांनी काँग्रेसचे नेते आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत एकच पॅनल देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

'केडीसीसी'साठी २१ जागा आहेत. यातील १२ जागा प्रत्येक तालुक्यातील विविध व‌िकास सोसायट्यांसाठी आहेत. या जागा प्रत्येकाने स्वबळावर लढवाव्यात. उर्वरीत विविध गटांतील आठ जागांपैकी प्रत्येकी ४ जागा दोन्ही काँग्रेसला, तर १ जागा सतेज पाटील आणि कोरे यांच्या गटाला देण्यात यावी, असा प्राथमिक विचार आहे. महाडिक यांच्याशी टोकाचे मतभेद असलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतेज पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे.

यांसदर्भात पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'निवडणूक एकत्रित लढण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. जागावाटप कसे होईल, उमेदवार कोण असतील याचा निर्णय शुक्रवारी घेतला जाईल.' खासदार महाडिक यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, 'बँक सक्षमपणे चालवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यावर सर्वच नेत्यांचे एकमत झाले आहे. जिल्ह्याच्या विकासात केडीसीसीचे मोठे महत्त्व आहे.'

बैठकीआधी विश्रामगृहावर सायंकाळी मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 'केडीसीसी'च्या निवडणुकीत सेवा संस्था गटातील तालुकानिहाय १२ जागांसाठी प्रचंड चुरस आहे. मुश्रीफ यांनी या वेळी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रकाश आव्हाडे, रामराजे कुपेकर, प्रा. जयंत पाटील, युवराज पाटील, ए. वाय. पाटील, जयवंतराव शिंपी, भैय्या माने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरे, पाटील यांच्याकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सतेज पाटील आणि माजी मंत्री विनय कोरे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु माजी मंत्री प्रकाश आवाडे या निर्णयावर नाराज असल्याचे समजते.

जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सर्वांना बरोबर घेऊन एकच पॅनल देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, पण 'गोकुळ'च्या राजकारणात माजी मंत्री सतेज पाटील, विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, आदी नेते एका बाजूला, तर आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, मुश्रीफ एका बाजूला असे गट निर्माण झाले आहेत. जिल्हा बँकेमध्ये सतेज पाटील आणि कोरे यांनाही सोबत घेण्याची भूमिका मुश्रीफ यांनी घेतली आहे, तर 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांना सहकार्य केलेल्या काही नेत्यांची भूमिका 'गोकुळ'च्या नियोजनानुसारच जिल्हा बँकेतही लढत द्यावी अशी आहे. याबाबत सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'माझी आणि विनय कोरे यांची जिल्हा बँकेसंदर्भात एक तास चर्चा झाली, पण अद्याप काही निर्णय झालेला नाही.' दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचीही स्वतंत्र बैठक झाली.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून गुरुवारअखेर एकूण १६ जणांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्या उमेदवारांत पुंडलिक पाटील, राहुल पाटील, अनिल यादव, अजीत चराटी यांचा समावेश आहे. शुक्रवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान माजी संचालक बाबूराव हजारे, वसंत नंदनवाडे, मनीषा पाटील, भिवाजी पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. या चारही संचालकांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी विविध तांत्रिक कारणांवरून अवैध ठरवले होते. त्यांनी सह‌निबंधकांकडे अपील केले होते. त्याचा निकाल आज लागला असून त्यात चौघांचे अर्ज वैध ठरले. अजित नरके यांचाही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता, त्यांनीही सहनिबंधकांकडे अपील केला होता, पण त्यांचा अर्ज सहनिबंधकांनीही अवैध ठरवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फैसला ‘गोकुळ’च्या दहीहंडीचा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी अत्यंत चुरशीने ९९. ६९ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. 'गोकुळ'च्या दहीहंडीचा फैसला करण्यासाठी झालेल्या मतदानात प्रचंड चुरस आणि ईर्ष्या दिसली. कार्यकर्त्यांच्या वादावादीने होणारा तणाव नेत्यांच्या शेरेबाजीने शमला. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता 'गोकुळ'च्या निकालाकडे लक्ष लागले असून, आज (शुक्रवार) मतमोजणी होणार आहे.

'गोकुळ'ची निवडणूक आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षी शाहू पॅनेल आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. सहलीवर पाठविलेल्या आणि अज्ञातस्थळी ठेवलेल्या मतदारांना गुरुवारी सकाळी नऊपासूनच मतदान केंद्रावर आणल्यामुळे दहानंतर मतदानासाठी मोठी गर्दी झाली.

'गोकुळ'साठी एकूण ३२६३ मतदार होते. यापैकी १४ संस्थांनी दुबार ठराव दाखल केल्यामुळे त्या निवडणुकीसाठी अपात्र ठरल्या. यामुळे मतदारांची संख्या ३२४९ झाली. यापैकी दहा मतदारांनी हक्क बजावला नाही. त्यातील तीन मतदार मयत असून, उर्वरित ७ मतदारांमध्ये सदाशिवराव नवणे या अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.

मतदानासाठी गाड्या भरून आणलेल्या मतदारांच्या माध्यमातून नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मतदानाचा जोर दहानंतर वाढला. दुपारी १२ पर्यंत ५२ टक्के तर चार वाजेपर्यंत ९९ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान दरवाजात गाडी पार्क केल्याच्या कारणावरून खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील समर्थकांत वाद झाला.

महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील हे मतदारांच्या स्वागतासाठी एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणावाचे वातावरण होते. पण, दोन्ही नेते आणि अरुण नरके यांनी एकमेकांवर मार्मिक शेरेबाजी करत खेळीमेळीचे वातावरण ठेवले. आमदार महाडिक, पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, बाबासाहेब सुरूडकर आणि सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील, संजय घाटगे, संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, अरुण इंगवले आणि पॅनेलचे उमेदवार उभे होते.

१२पर्यंत निकाल स्पष्ट

'गोकुळ'साठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, मतमोजणीसाठी २० टेबल लावण्यात आली आहेत. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जतमध्ये मागासवर्गीय नागरिकांवर बहिष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शेगाव (ता.जत) गावातील स्वागत कमानीवर डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळा झेंडा लावला होता. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त निळा झेडा काढून भगवा झेंडा लावण्यात आला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

दलित समाजातील युवकांनी संबधित कृतीवर आक्षेप घेत जत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर या युवकांनी पोलिस उपाधीक्षक, तहसीलदार यांची भेट घेऊन निळा झेंडा काढणारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी संबधित चार युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईने गावातील काही मंडळीनी एकत्रित येवून गावबंद केले. दलित समाजातील युवकांवरही कारवाईचा आग्रह धरला. त्यामुळे तणाव वाढत गेला.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून दलितांना शेतातील कामावर येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. दलित वस्तीशिवाय गावात भाड्याने राहत असलेल्या दलित कुटुंबाना घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. पंपावर पेट्रोल बंद केले. दुकांनामधून माल दिला जात नाही. दलित वस्तीचा पाणीपुरवठाही बंद केल्याची तक्रार समाजाने आरपीआयकडे केली. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावात तेढ वाढू नये, तेथील अनुसुचित जातीच्या नागरिकांचे संरक्षण व्हावे. यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयच्या जिल्हा शाखेने केली आहे. या घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेटलेले झाड जीपवर कोसळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड-पाटण राज्यमार्गावरील केंडेवाडी (साटम आश्रम ता. पाटण) फाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने एका भल्यामोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्याला लावलेल्या आगीमुळे झाड प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्यापिवळ्या जीपवर कोसळल्याने चालकासह पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गेल्या दोन ते चार दिवसांपूर्वी अडुळ गावच्या हद्दीत केंडेवाडीच्या शिवारात अज्ञात व्यक्तीने वडाच्या झाडास आग लावली होती. बुडक्यापर्यंत पेटलेले झाड शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाटणहून कराडकडे निघालेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप (एम. एच. ११. एफ. १२५८) गाडीवर हे वडाचे झाड कोसळले. जीपमधील चालकासह सहा जण जखमी झाले आहेत. या मधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी कराडला हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक तीन तास बंद होती.

दरम्यान, घटना घडल्यानंतर सुमारे तासाभरानंतर बांधकाम व पोलिस खाते घटनास्थळी दाखल झाले. या मार्गावरून निघालेल्या जेसीबीच्या सहाय्याने व ग्रामस्थांच्या मदतीने वडाचे झाड बाजूला केल्यानंतर दोन तासानंतर रस्ता वाहतुकीस खुला झाला. दरम्यानच्या, काळात कोकणात चिपळूणच्या दिशेने जाणारी वाहतूक नवारस्ता-बेलवडे-त्रिपुडी-मुळगाव व पाटण अशी वळवण्यात आली होती. अवजड वाहने तशीच उभी असल्याने वाहतूक खोळंबली होती तर कराडहून पाटणला व पाटणहून कराडला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास सूर्यवंशींची सेनेतून हकालपट्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीचे जिल्हा प्रमुख विकास, मिरज तालुका प्रमुख रवींद्र नाईक यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या हकालपट्टीनंतर सांगली, मिरजेत माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुपारी घेऊन त्या दोघांनी संपर्क नेते नितीन बानुगडे-पाटील यांची बदनामी केल्याचा दावा माजी जिल्हा प्रमुख संदीप सुतार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. संपर्क नेते बानुगडे-पाटील हे कार्यक्रमांच्या निमित्ताने तीन दिवसांपूर्वी सांगलीच्या दौऱ्यावर असतानाच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढण्याचा प्रकार मिरजेत घडला होता. या प्रकाराला जिल्हा प्रमुख सूर्यवंशी हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट करून बानुगडे-पाटील आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सूर्यवंशींच्या हकालपट्टीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना सुतार म्हणाले, 'बदनामी प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे यांनी त्या दोघांची केवळ पदावरुनच नाहीतर पक्षातूनच हकालपट्टी केल्याचे आदेश 'सामना'मधून आलेत. आम्हाला पक्षाचे आदेश याच पद्धतीने दिले जातात. हकालपट्टीची कारवाई होताच बदनामीला सामोरे जावे लागलेले नेते बानुगडे-पाटील यांच्या प्रतिमेवर दुधाचा आणि तुपाचा अभिषेक करण्यात आला. सांगली आणि मिरजेत विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून या कारवाईचे स्वागत झाले आहे.

माझ्यावर अन्याय झाला आहे. या बाबत मी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहे.

- विकास सूर्यवंशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यांच्या निवडी

$
0
0

पंढरपूरः विठ्ठलाच्या परिवार देवतांच्या मंदिरात पुजारी भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हा निकाल जाहीर करताना मंदिर समितीकडून काही चुका झाल्याने या परीक्षा पद्धतीस गालबोट लागले आहे. पुजारी पदासाठीच्या लेखी परीक्षेचा प्रयोग करून मंदिर समितीने चांगला आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान, पुजारी पदासाठी परीक्षा दिलेल्या ४४ उमेदवारांच्या पैकी २२ जणांची निवड जाहीर केली असून, यात एका महिलेचा समावेश आहे. सेवक पदासाठी १४४ उमेदवारांच्या पैकी ३० जणांची निवड जाहीर केली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या पात्र उमेदवारांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात करण्यात आली असून, निवडलेले पुजारी महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील आहेत. या पुजाऱ्यांना पूजेच्या पद्धती आणि परंपरा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व उमेदवारांना शहरातील सर्व परिवार देवतांचीही जागेवर जावून माहिती करून दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात सात जण बिनविरोध

$
0
0

साताराः सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अखेर ९० जणांनी माघार घेतल्याने बँकेच्या संचालकपदी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे या सात जणांची बिनविरोध निवड झाली. आता १४ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी उमेदवारांना चिन्हवाटप केले जाणार आहे. पाच मे रोजी मतदान होणार असून, ७ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, महाबळेश्वर विकास सोसायटीमधून राजेंद्र राजपुरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. तर शुक्रवारी सहा जणांची बिनविरोध निवड झाली आहे. १४ जागांसाठी ५ मे रोजी निवडणूक होत असून, ३८ जण रिंगणात आहेत.

प्रमुख लढती

रामराजे नाईक-निंबाळकर - तुकाराम शिंदे

विलासराव पाटील-उंडाळकर - धनंजय पाटील

दादारार्जे खर्डेकर-आमदार बाळासाहेब पाटील

आमदार शशिकांत शिंदे - दीपक पवार

सदाशिवराव पोळ- आमदार जयकुमार गोरे

राजेश पाटील-वाठारकर - प्रभाकर साबळे

सुनील माने - लालासाहेब शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत जयंत पाटलांनी केली काँग्रेसची गोची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला शुक्रवारी कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमधील माजी मंत्री मदन पाटील गटाने एकत्र येवून 'शेतकरी सहकारी पॅनेल'ची घोषणा केली. यामुळे माजी मंत्री पतंगराव कदम आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना स्वतंत्र पॅनेल करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या निवडणुकीच्या रणनितीने वसंतदादा गटातील छुपी फुट आता उघड झाली आहे.

माजी मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसची चांगलीच गोची केली आहे. सर्वपक्षीय पॅनेल करायचे, असे सांगत काँग्रेसला शेवटपर्यंत गाफील ठेवले. ऐनवेळी मात्र काँग्रेसला वगळून आपले पॅनेल जाहीर केले. यामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. आता कॉँग्रेस एकाकी पडली असून, त्यांना एकटे लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, मदन पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, सेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, मानसिंग नाईक यांच्यात दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झडत राहिल्या.

'काँग्रेसची मागणी मान्य होण्यासारखी नव्हती'

शुक्रवारी सायंकाळी आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून पक्ष बाजूला ठेवून बँकेचे आणि शेतकऱ्यांच्या हित डोळ्यासमोर ठेवून 'शेतकरी सहकारी पॅनेल' केल्याची घोषणा केली. ते म्हणाले, 'सर्वांचे समाधान करता आले नाही. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची भेट होऊ शकली नाही. आमच्या वतीने विलासराव शिंदे आणि दिलीप पाटील यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. परंतु, त्यांची मागणी कृतीत येण्यासारखी नव्हती. त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून समविचारींना एकत्र करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.'

'आमची फसवणूक केली'

मोहनराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. कदम म्हणाले, 'आमच्याबरोबर गद्दारी केली गेली. लबाडीचे नवे राजकारण या निमित्ताने पुढे आले आहे. प्रामाणिकपणा नाही. एका बाजूला आमच्याशी चर्चा करून यादी नेली जाते. दिवसभर आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहतोय.

आम्ही स्वतःहून फोन केले असताना अजून आमची चर्चाच सुरू असल्याचे ते सांगत राहिले. अशा प्रकारची राजकीय निती आपण पहिल्यांदाच पाहतोय. विलासराव शिंदे आणि दिलीप पाटील यांनीच आपली फसवणूक केली आहे. विश्वासघात करून आमची दिशाभूल केली. त्यामुळे आमचे नुकसान झाले आहे. त्यांनी आगोदरच भूमिका स्पष्ट केली असती तर आम्ही पॅनेल केले असते.'

१९ जागांसाठी ५३ जण रिंगणात

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २१ पैकी १९ जागांसाठी निवडणूक होईल. १९ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 'अ' गटांत शिराळ्यातून माजी आमदार मानसिंग नाईक आणि वाळवातून दिलीप पाटील यांच्या विरोधात उमेदवारच उरला नसल्याने त्यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. 'अ' गटातील दहा जागांसाठी वीस, महिला राखीव जागेसाठी दोन, अनुसुचित जाती जमाती-सहा, इतर मागास वर्ग-दोन, भटक्या विमुक्त जाती-जमाती- दोन, 'क' एकसाठी-दोन, 'क' दोनसाठी-दोन, 'क' तीनसाठी-आठ, 'क' चारसाठी-अकरा, असे एकूण १९ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत बालकाचे अपहरण; सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील ट्रेडिंग व्यापाऱ्याच्या अडीच वर्षीय बालकाचे कामगाराने अपहरण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. आरव श्रीकांत बलदवा असे अपहृत मुलाचे नाव आहे. लग्न समारंभातून नजर चुकवून अमोल आदिनाथ पडसलगे (रा. आजरा बँकमागे, कबनूर) याने आरवला नेल्याचे उघडकीस आले होते.

आवाडेनगर कुलकर्णी गार्डननजीक राहणारे श्रीकांत बलदवा हे ट्रेडिंग व्यापारी आहेत. शुक्रवारी त्यांच्या भावाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने बलदवा यांनी मुलगा आरवला दिवाणजी अमोल पडसलगेकडे सोपविले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास अमोल हा समारंभातून आरवला घेऊन बाहेर पडला. शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे बलदवा यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना याबाबतची माहिती कळविली. विविध पथकांकडूनही आरवचा शोध घेण्यात येत होता. मात्र, सायंकाळपर्यंत ते सापडले नाहीत. दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आयको स्पिनिंग मिलनजीक एका पडक्या खोलीतून बांधलेल्या अवस्थेत रांगत आरव खोलीबाहेर आला. ही घटना नजीक फॅक्टरीच्या कामावर असलेल्या कामगार बाळासाहेब काळदाते याने पाहिले. त्याने तातडीने ही माहिती युनूस रोहिले व नागरिकांना दिली. रोहिले यांनी व्हॉटस्अॅपवर आरव व संशयित आरोपी पडसलगेच्या व्हायरल झालेल्या फोटोची खातरजमा केली. तेव्हा संबंधित मुलगा आरव बलदवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बलदवा कुटुंबीय व पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरव सुखरूप मिळाल्याने बलदवा कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र अपहरणकर्ता पडसलगे अद्याप फरार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे निर्णय राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र आणि राज्य सरकार कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांबाबतचे निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनेच घेत आहे. त्यामुळे शरद पवार यांना केंद्रीय कृषिमंत्री, तर जयंत पाटील यांना राज्यात सहकारमंत्री करावे,' अशी उद्विग्न टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजप केंद्रात मांडत असलेले भूसंपादन विधेयक हे शेतकरीविरोधी असल्याने त्याला कायम विरोध राहील, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेट्टी म्हणाले, 'राज्य आणि देशातील शेती, सहकार, साखरेची आयात-निर्यात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच निर्णय घेत आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांपेक्षा खूप कमी वेळा राष्ट्रवादीकडून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली जाते. एनडीएचा सदस्य असल्यामुळे कोणाचे भले पाहिले जात आहे याबाबत आपल्याला पूर्ण माहिती आहे.'

केंद्र सरकारकडून देण्यात येणारे कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान देण्यासाठी उशीर केला जात असल्याचे सांगत शेट्टी पुढे म्हणाले, 'निर्यात साखरेचे अनुदान डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र, मार्च अखेरपर्यंत ते देण्यात आलेले नाही. गाळप हंगाम संपत आला आहे. त्यामुळे त्याचा लाभ ठराविक क्षेत्रांनाच होणार असून सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सिद्ध होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील विद्यापीठे जोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठांनी अधिक समाजाभिमुख होऊन सामाजिक बांधिलकी जोपासायला हवी. विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे अधिकाधिक कल वाढला पाहिजे. विद्यापीठांनी सायन्स फेस्टिव्हल घेण्याची गरज आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे डिजिटल तंत्रज्ञानाने जोडणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान स्कूलची नूतन इमारत आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्‍‍घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर विद्यापीठात विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिविभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

राज्यपाल राव म्हणाले, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना मिळणारे वाढते प्राधान्य हा एकविसाव्या शतकातील स्वागतार्ह बदल आहे. विद्यापीठे ही समाजापासून अलिप्त असू नयेत. ती समाजासाठी आहेत. समाजासाठी कार्यरत असून सार्वजनिक निधीमधून चालविली जातात. विद्यार्थ्यांत विज्ञानविषयक जागृती व आवड निर्माण होण्यासाठी विद्यापीठांनी विज्ञान महोत्सव आयोजित करावा. या महोत्सवामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होईल. बी. एस्सी शुगर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम दक्षिण महाराष्ट्रात सुरु आहे. हा मूल्यवर्धित अभ्यासक्रम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक, भौगोलिक परिस्थिती पाहता या प्रकारचे अभ्यासक्रमांची गरज आहे.'

राव यांचा प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कुलपतींचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. आर.एम. कांबळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. आर.बी. पाटील आदी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानात सहभागी व्हा

राज्यपाल राव म्हणाले, 'गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठ व रेल्वे मंत्रालय यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला. त्या वेळी नजीकच्या रेल्वे स्थानकाची महिन्यातून एकदा स्वच्छता करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव परिसर, रेल्वे स्टेशन यांसह सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहीम राबवावी. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. स्वच्छ भारत अभियानाला योगदान द्यावे.'

सर्वंकष ज्ञान

राव म्हणाले, 'विद्यापीठाचा नॅनो सायन्स विभाग विविध विज्ञान विद्याशाखांमध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान देत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने राबविलेली चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) अभ्यासक्रम पद्धती सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारणा कारखान्याची वीज, पाणी तोडले

$
0
0

कोल्हापूरः राजाराम सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ वारणा सहकारी साखर कारखान्याचेही वीज व पाणी कनेक्शन शुक्रवारी तोडण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाबाबत जबाबदार धरत नदी खोऱ्यातील आतापर्यंत दोन साखर कारखान्यांसह नऊ प्रोसेर्स अशा ११ कारखान्यांवर उत्पादन बंदची कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी या नोटीसची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण तसेच इरिगेशन विभागाला कळवले होते. त्यानुसार महावितरणने गुरुवारी सायंकाळीच वारणा कारखान्याला वीज तोडण्याबाबतची कारवाई केली जाणार असल्याची २४ तासांची नोटीस दिली होती. त्याची मुदत शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत होती. नोटीसची मुदत संपल्यानंतर महावितरणने कारखान्याची वीज तोडण्याची कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ केल्यावरून बापाचा खून

$
0
0

गडहिंग्लजः शिवीगाळ केल्याच्या कारणावरून सखाराम रामचंद्र सुतार (वय ५५, रा. डुक्करवाडी, ता. चंदगड) यांना त्यांच्या अल्पवयीन मुलाने मारहाण केली. यात सखाराम यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. संशयित मुलाला नेसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सखाराम सुतार काही काम करीत नसत. संशयित आरोपी मुलगा नेसरी येथे एका बेकरीत काम करतो. सखाराम बेकरीत जाऊन मुलाला शिवीगाळ करीत असत. गुरुवारी रात्री त्यांनी बेकरीत जाऊन मुलाला शिवीगाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात मुलाने त्यांना लोखंडी रॉडने हातावर मारले. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. सोनाली सावेकर यांच्या फिर्यादीवरून नेसरी पोलिसांत नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक हांडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा डाव मांडण्याआधीच मोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केडीसीसीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला तोंड देण्यासाठी भाजपने शिवसेनेच्या मदतीने खेळलेला डाव मांडण्याआधीच मोडल्याची स्थिती शुक्रवारी झाली. भाजप, शिवसेनेचे पॅनेल तयार करण्यासाठी नेमलेल्या कमिटीचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक हेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये दाखल झाले. अध्यक्षांनीच पाठ फिरवल्याने त्यांच्या आधारावर भाजप-सेनेच्या पॅनेलमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांनीही आपल्या इच्छेला मुरड घालत या पॅनेलमधून रामराम केला. त्यामुळे शेवटी सहा जणांचे पॅनेल करण्याची वेळ भाजपवर आली.

केडीसीसीची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा, किंबहुना निवडणूक बिनविरोध करण्याबाबत नेत्यांच्या पातळीवर चर्चा होती. त्यानुसार दोन दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. त्यांचे एकत्र पॅनेल होत असताना नाराजीची शक्यता गृहित धरून भाजप व शिवसेनेने पॅनेल तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गुरुवारी रात्रीपासून आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक चर्चा करत होते. मंडलिकांना पॅनेल तयार करण्याच्या कमिटीचे अध्यक्षही बनवण्यात आले होते. कमिटीचे उपाध्यक्षपद आमदार चंद्रदिप नरके यांना देण्यात आले.

शुक्रवारी सकाळपासून गोकुळमधील निवडणुकीमधील निकालाचा रोख पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून सूत्रे हलवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी सर्किट हाऊसमध्ये भाजपच्या नेत्यांबरोबर आमदार हाळवणकर, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर उपस्थित होते. तेथून प्रा. मंडलिक, नरके यांच्याशी संपर्क साधून ते पॅनेल निश्चित करण्यासाठी बोलवत होते.

मात्र प्रा. मंडलिक यांची त्यावेळी काँग्रेस आघाडीसोबत चर्चा सुरू होती. काँग्रेस आघाडीच्या पॅनेलमध्ये जागा मिळाल्याने मंडलिक यांनी हाळवणकर यांना नकार कळविला. पॅनेल तयार करणारे मंडलिकच गोटातून बाहेर गेल्याने आबीटकर यांनीही इच्छुक नसल्याचे सांगत काढता पाय घेतला. एकीकडे दोन महत्वाचे शिलेदार बाहेर पडलेले असताना आमदार चंद्रदिप नरके यांच्याशी मिणचेकर सतत संपर्क साधत होते. शेवटी ते सर्किट हाऊसवर आले. मंडलिक यांच्याबाबतची माहिती समजल्यावर त्यांनीही आता अशा परिस्थितीत पॅनेल करणे शक्य नसल्याचे समजावणीच्या सुरात सांगितले. यासाठी प्रत्येक तालुक्यात ताकद असण्याबरोबर नेताही आवश्यक असल्याचे समजावून सांगून आपण तयार नसल्याचे स्पष्ट केले. या नेत्यांचा नकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेतकरी संघटनाही शांत झाली. शेवटी डॉ. सुजीत मिणचेकर (अनुसूचित जाती), परशराम तावरे (भटक्या विमुक्त), सुधीर मुंज (इतर मागासवर्गीय), दिलीप पाटील (प्रक्रिया गट), के. एस. चौगले (दूध संस्था), अनिल पाटील (बँक व पतसंस्था) अशा सहा जणांचे पॅनेलबाबतचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवणार कामगार विश्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा किती अस्वच्छ झालाय? पंचगंगेचे प्रदूषण किती वाढले आहे? वाहतूक कोंडीने शहर किती घुसमटले आहे? अशा केवळ चर्चा करण्याऐवजी समाजातील प्रत्येक घटकात बदल घडवण्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या फेथ फाउंडेशनमधील ६० तरुण आपली सुटी दरवर्षी खऱ्याअर्थाने 'यूथ'फूल करत आहेत. यंदा फेथ फाउंडेशनच्या तरुणाईने कामगारांचे आयुष्य कसे असते याचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते येत्या एक मे रोजी कामगारदिनाचे औचित्य साधून शहरातील कामगारांसोबत एक दिवस व्यतीत करणार आहेत. यामध्ये शहरातील स्वच्छता कर्मचारी, बांधकाम कामगारांसह कोणत्याही क्षेत्रातील कामगारांच्या दिनक्रमात डोकावताना त्यांच्या समस्याही जाणून घेणार आहेत.

फेथ म्हणजे विश्वास. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विश्वासातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारी ही तरुणाई गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आली आहे. चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली ही बहुतांश मुले. तरुण वयातील 'एन्जॉय' या संकल्पनेची यांची व्याख्या मात्र वेगळी आहे. दरवर्षीच्या सुटीत ही मित्रमंडळी एकत्र येतात तीच मुळी या सुटीत कोणता सामाजिक उपक्रम हाती घेऊन तडीस न्यायचा या विचारानेच.

गेल्यावर्षीही या ग्रुपने गरीब महिला कामगारांना कपडे वाटले. त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिले. इंधन वाचवा हा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढली. उर्दू शाळेतील मुलांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. त्यासाठीचा खर्च पॉकेटमनीतून केला जातो.

आता ग्रुपमधील सर्वांची तयारी सुरू आहे ती कामगारांसोबत एक दिवस या उपक्रमाची. त्यासाठी विविध कामगारांच्या प्रश्नांचा, त्यांना अपेक्षित असलेल्या सुविधांची ही मुले माहिती घेत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनी फेथ फाउंडेशनची सगळी तरुण मुले कामगारांसोबत जेवण, गप्पा मारणार आहेत. कामगारच का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना या ग्रुपमधील सदस्य राज कोरगावकर म्हणाले, 'कामगारांच्या कामाचा दर्जा जरी कमी असला तरी त्याचे काम समाजातील प्रत्येक घटकासाठी महत्त्वाचे आहे. त्याने घाणीत हात घातला नाही तर आपल्या शहरात स्वच्छता राहणार नाही. याची जाणीव तरुणाईला व्हावी यासाठी हा संदेश पोहोचावा म्हणून हा उपक्रम फेथ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विश्वास मनोहर पाटील (वय ३०, रा. टोप, ता. हातकणंगले) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एस. घाटपांडे यांनी दोन वर्षे सक्तमुजरी आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यातून पाटील यांची आई, भावाची निर्दोष मुक्तता झाली.

विश्वास याची पत्नी शिल्पा विश्वास पाटील (वय २२) यांनी १३ मे २०१३ रोजी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. शिल्पा यांचे वडील बाजीराव पाटील यांनी शिल्पाचा पती, सासू, दीर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. आई-वडिलांकडून रोख ५० हजार रुपये, दोन तोळ सोने आणण्यासाठी पाच वर्षे छळ होत होता. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश घाटपांडे यांच्यासमोर झाली. सरकारी वकील संजय कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images