Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साताऱ्यात २२ कोटींचे ड्रग जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

राज्यात अंमली पदार्थांच्या व्यापाराने दूरवर हातपाय पसरल्याचे स्पष्ट झाले असून सोमवारी सातारा जिल्ह्यात उघड झालेल्या रॅकेटमध्ये कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यात पोलिस खात्यातीलच कर्मचारी अडकल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावातून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने १२२ किलो मेफीड्रोन या अंमली पदार्थाचा साठा सोमवारी रात्री जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत २२ कोटी रुपये आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून आहे. त्यात एका पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

कण्हेरी गावात हा साठा लपविण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला असता एका घरात पाच मोठ्या पिशव्यांमध्ये मेफीड्रोनचा साठा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली.

मुंबई पोलिस दलात सेवेत असलेल्या कण्हेरी (ता. खंडाळा) येथील धर्मराज बाबुराव काळोखे (४५) या कर्मचाऱ्याकडून सुमारे एक कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जिल्हा पोलिस दलाने जप्त केला आहे. या प्रकरणी रात्री उश‌रिापर्यंत चौकशी व माहिती नोंदवण्याचे काम सुरू होते.

काळोखे हा गेली १५ वर्षे मुंबई पोलिस दलात सेवेत असून, त्याचे गावाकडे नेहमी येणे-जाणे होते. दोनच दिवसांपूर्वी तो कण्हेरी येथे आला होता. त्याने आपल्याकडील काळ्या रंगाच्या पाच बॅगा शेजारच्या घरात सोमवारी आणून ठेवल्या होत्या. याबाबतची माहिती खंडाळा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे यांनी मोठ्या फौजफाट्यासह छापा टाकून त्या बॅगा ताब्यात घेतल्या. काळोखेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याचे अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटशी संबंध असावेत, असा संशय आहे.

'आमचा संबंध नाही'

कोल्हापूर : कोंडुसकर ट्रॅव्हल्स ही कोल्हापूरस्थित प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून, तिचा ओंकार इंडस्ट्रीज या कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा कोंडुसकर ट्रॅव्हल्सने केला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या १० मार्चच्या 'कोंडुसकर पुन्हा ड्रग वादात' या शीर्षकाखालील वृत्तात ओंकार इंडस्ट्रीज ही कंपनी कोंडुसकर ट्रॅव्हल्सची उपकंपनी असल्याचा उल्लेख होता.

पोलिस स्टेशनच्या लॉकरमध्येच ड्रग

कॉन्स्टेबल काळोखे याच्या मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनच्या लॉकरमध्येही १२ किलो पांढरी पावडर सापडली आहे. मंगळवारी दुपारी मरिन ड्राइव्ह पोलिस आण‌ि अमली पदार्थ विरोधी पथकाने काळोखे याच्या पोलिस स्टेशनमधील लॉकरची झडती घेऊन ही पावडर हस्तगत करण्यात आली. त्याच्या तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबची मदत घेण्यात येत असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) के. एम. प्रसन्ना यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतदादा बँकेची चौकशी सुरू

$
0
0

सांगलीः वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी भाजप-शिवसेना युता सरकारने सुरू केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या बँकेचे सर्वेसर्वा माजी मंत्री मदन पाटील आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. सुमारे १०७ जणांवर या गैरव्यवहार प्रकरणी जबाबदारी निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येते. बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांचे काय होणार अशीही चर्चा येथे सुरू आहे. तसे पाहता, बँक अवसायनात निघाली त्यावेळी बँकेचे ३१५ कोटी रुपये कर्ज थकित होते. बँकेचे पाच हजारांवर सभासद असून एकूण ३५ शाखा होत्या. एकूण सुमारे नऊ हजार कर्जदारांना कर्ज वाटण्यात आले होते. या बँकेत महापालिका, तसेच जिल्हा सहकारी बँक, बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात ठेवी अडकून पडल्या आहेत. ९ जानेवारी २००९ मध्ये बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला. २५ फेब्रुवारीला बँक अवसायनात निघाली. सहकार कायदा कलम ८८ नुसार सुरू झालेल्या चौकशीला फेब्रुवारी २०११ मध्ये स्थगिती मिळाली. आता चार वर्षाने ती उठली अन् चौकशीस सुरूवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एप्रिलमध्ये होणार पुढील सुनावणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २००१ ते २०१२ या कालावधीत झालेल्या कामकाजात विविध दहा मुद्यांमध्ये आढळलेल्या ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ५९ संचालकांना म्हणणे मांडण्याची शेवटची मुदतवाढ देण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या बाबतची पुढील सुनावणी होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २००१ ते २०१२ या काळातील पंधरा संशयित व्यवहाराची चौकशी करण्याची शिफारस प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी केली होती. त्यानुसार सहकार विभागाच्या आदेशानुसार सहनिबंधक यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी मिरजेचे उपनिबंधक मनोहर माळी यांची नियुक्ती केली. माळी यांनी या पंधरा प्रकरणांची चौकशी करून अहवाल कोल्हापूरचे सहकार सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांना सादर केला.

माळी यांनी केलेल्या चौकशीत पंधरा पैकी दहा प्रकरणांत दोष असल्याचे आढळून आले होते. या दहा प्रकरणांमध्ये मिळून बँकेचे ४ कोटी १८ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा ठपका ठेवण्यात आला. नोकर भरती, रंगरंगोटी, संगणक खरेदी, अलार्म सिस्टिम खरेदी, बचत गट सहायत गट, निवृत्तांची नेमणूक, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी आदी प्रकरणांत ठपका ठेवण्यात आला आहे.

विशेष लेखापरिक्षक श्रीधर कोल्हापूर यांच्याकडे या अहवालाच्या आधारे सहकार कायदा कलम ८८ नुसार चौकशी सुरू आहे. सध्या ७२/२ नुसार संबधित ५९ आजी-माजी संचालकांचे म्हणणे घेण्यात येत आहे. मंगळवारी जिल्हा बँकेत कोल्हापूरे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. ५९ संचालकांपैकी २५ संचालकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले आहे. ९ जणांनी स्वतः हजर राहून आपली बाजू मांडली. या शिवाय मयत असणाऱ्या काही संचालकांचे नातलग व काही संचालक यांनी म्हणणे मागण्यासाठी मुदतवाढ मागितली. बँकेच्या तीन माजी कार्यकारी संचालकांनीही मुदतवाढ मागितली.

चौकशी अधिकारी कोल्हापूर यांनी सर्वांची बाजू ऐकून घेऊन संचालक व माजी कार्यकारी संचालक यांना म्हणणे मांडण्यासाठी शेवटची संधी देण्याचे जाहीर केले. मात्र, ही संधी शेवटची असेल. पुढील तारखेपर्यंत प्रत्येकाने आपले म्हणणे मांडावे. त्यानंनतर मात्र सहकार कायदा कलम ७२/३ नुसार आलेल्या म्हणण्याची पडताळणी सुरू केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमली पदार्थप्रकरणी पोलिसासह २ जणांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावातून ११२.२९ किलोचा मेफीड्रोन या अंमली पदार्थाच्या साठ्याप्रकरणी मुंबईतील पोलिस कॉन्स्टेबल धर्मराज बाबुराव काळोखे व आणखी एकास अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टाने १६ मार्चपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी दिली आहे.

कण्हेरी गावातील एका घरात पाच मोठ्या पिशव्यांमध्ये मेफीड्रोन या अमली पदार्थाचा साठा सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. मुंबई पोलिस दलात सेवेत असलेल्या कण्हेरी (ता. खंडाळा) येथील धर्मराज बाबुराव काळोखे (वय ४५) या कर्मचाऱ्याकडून सुमारे २२ कोटी ४० लाख ९१ हजार ९५० रुपये किमतीचे ११२.२९ किलो अंमली पदार्थांचा सातारा पोलिसानी जप्त केला होता. काळोखेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचे अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटशी संबंध असावेत, असा संशयही व्यक्त होत आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी धर्मराज काळोखे आणि अन्य एकास कोर्टाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनावरून संघर्ष अटळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभेने वादग्रस्त भूसंपादन विधेयक मंजूर केले आहे. भविष्यात हे विधेयक मंजूर झाले तर जिल्ह्यातील प्रस्तावित दोन औद्योगिक वसाहतींसाठीच्या भूमीसंपादनावरून संघर्ष होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात पेठवडगाव आणि विकासवाडी येथील औद्योगिक वसाहतींसाठीचे भूसंपादन प्रलंबित आहे. भू-संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेत योग्य मोबदला आणि पारदर्शतेचा अधिकार दुरुस्ती विधेयक-२०१५ ला लोकसभेने मंजुरी दिली आहे. गेल्या १५ वर्षांत विविध कारणासाठी ‌भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने 'द राइट टू फेअर कम्पेंन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड अॅक्विझिशन अँड रिसेटलमेंट अॅक्ट २०१३' ची अंमलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून सुरू केली. या कायद्याने सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा घेणे क्लिष्ट झाले. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या कायद्यात बदल प्रस्तावित केले आहेत. औद्योगिकीकरण आणि सार्वजनिक प्रकल्पांना वेग देण्यासाठी हे बदल प्रस्तावित केले आहेत.

कोल्हापूरपुरता विचार केला तर शिरोली औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण आणि विकासवाडी येथील प्रस्तावित वसाहत असे दोन औद्योगिक प्रकल्प रखडले आहेत. दोन्ही प्रकल्पांसाठी जमीन देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

शिरोली वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी वाठार येथील १०६.३४ हेक्टर तर वडगाव येथील ३३४.३३ हेक्टर जागा संपादित करणे प्रस्तावित आहे. २००७ ला या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. दिवगंत नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते. बागायत जमीन औद्योगिकीकरणासाठी संपादित केल्या जाऊ नयेत या मुद्द्यावरून तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी या संपादनला स्थगिती दिली होती.

विकासवाडी येथील प्रस्तावित वसाहतही रखडली आहे. या वसाहतीसाठी २६२ हेक्टर जागा संपादित करायची आहे. हलसवडे, विकासवाडी, कणेरीवाडी, नेर्ली आणि तामगाव येथील जागांचा समावेश प्रस्तावित आहे. विकासवाडी येथे जागा संपादित करण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, 'हा कायदा अस्तित्वात आला तर शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशीच असेल. प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष अटळ आहे. जमीन वाचवण्यासाठीची चळवळ उभी करू. प्रसंगी टोकाचा संघर्ष करण्याची शिवसेनेची तयारी आहे.' किसान सभेचे राज्याध्यक्ष नामदेव गावडे म्हणाले, 'भूसंपादनासाठीचा २०१३ चा कायदा अंमलात येण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा लढा दिला होता. नव्या कायद्यातील तरतुदींच्या विरोधात संघर्ष करू. या लढ्यात शेतकऱ्यांच्या पाठिशी किसानसभा आणि डावे पक्ष असतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंतराव चव्हाणांच्या मुलाखती पुस्तकरूपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्राचे भाग्यविधाते' अशी ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या गेली अनेक वर्षे पूर्णतः अप्रकाशित असणाऱ्या प्रदीर्घ मुलाखती आता संपादित ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या नजरेतून भारतीय समाजकारण व राजकारणाचा आलेखच या ग्रंथातून समोर येत असल्याने त्यांच्या सामाजिक व राजकीय विचारांचा खजिना वाचकांना नव्याने अनुभवायला मिळणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. प्रकाश पवार लिखित 'यशवंतराव चव्हाण रिफ्लेक्ट्स ऑन इंडिया : सोसायटी अॅन्ड पॉलिटिक्स (इन कॉन्व्हर्सेशन विथ जयंत लेले)' हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या उद्या गुरुवार (ता.१२) होणाऱ्या १०३व्या जयंतीनिमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये सायंकाळी पाच वाजता ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

कॅनडा येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीमधील डॉ. जयंत लेले यांनी त्यांच्या संशोधनाचा भाग म्हणून आणि त्यानंतर यशवंतराव यांच्याशी जुळलेल्या स्नेहातून १९६२ नंतरच्या कालखंडात त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

५७४ पानांचा हा ग्रंथ पुण्याच्या डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित करण्यात येतो आहे. 'परिचय', 'महाराष्ट्र: समाज व राजकारण' आणि 'भारत : समाज व राजकारण' अशा तीन विभागांमध्ये ग्रंथाची मांडणी केली आहे. परिचयात्मक विभागात डॉ. पवार यांच्यासह डॉ. जयंत लेले आणि गोविंद तळवळकर यांनी यशवंतरावांविषयी लिहिले आहे. दुसऱ्या, महाराष्ट्रविषयक विभागात स्वातंत्र्य चळवळ, शेतकरी व कामगार पक्ष (पीडब्ल्यूपी), संयुक्त महाराष्ट्र चळवळ, वस्तुनिष्ठ राजकारण, सातारा जिल्ह्यातील राजकारण आणि लोकशाहीची प्रगती या प्रकरणांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या, भारतविषयक विभागात गृहमंत्रिपदाचा कालखंड, काँग्रेस पक्षामधील सुधारणा, नेहरूंनंतरचा कालखंड, राष्ट्रीय राजकारण, आणीबाणीनंतरचे राजकारण - अ. शाह आयोग, ब. आघाड्यांचे राजकारण अशा प्रकरणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगरवाड्याला विजेची प्रतीक्षा

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, स्वातंत्र्यानंतर अनेक आव्हाने सरकारने लीलया पेलली. गरिबी दूर करण्यासाठी सरकार प्राध्यान्याने प्रयत्न करत आहे. शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवर समाधानकारक प्रगती केली आहे. नवीन सरकारने 'अच्छे दिन' येणार असल्याची ग्वाही जनतेला दिली आहे. भुदरगड तालुक्यातील गिरगाव धनगर वाड्यातील धनगर समाजाच्या जीवनात मात्र आजअखेर प्रकाश पडला नाही. या धनगर समाजाच्या घरांत ६७ वर्षात वीज पोहचलेली नाही की त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. अजून ही ३२ धनगर कुटुंबातील २१० लोक अंधारातच जीवन व्यथित करत आहेत. दिवसा जंगली मेवा, लाकडाची मोळी विकून दररोज ५० ची मजुरी आणि रात्री अंधार हा भोग मागील कित्येक वर्ष त्यांच्या नशिबी आला आहे.

भुदरगड तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगराच्या कडेला गिरगाव धनगर वाड्यात मागील चार वर्षापासून डंगे धनगरांची ३२ कुटुंबीय राहतात. त्यापूर्वी हा धनगर समा​ज तालुक्याच्या वस्तीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर दूर जंगलात पाऊस, ऊन, वारा, जंगली जनावरांशी सामना करत गवताच्या काडीत बांधलेल्या झोपडीत राहत होता. यावेळी विजेचा सोडाच रॉकेलचा दिवा सुध्दा यांच्या नशिबी नव्हता. यातून या धनगर समाजाची सुटका होऊन २०११ - २०१२ या वर्षी या ३२ कुटुंबियांच्या पैकी २६ कुटुंबियांना इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरे मंजूर करून डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गिरगाव येथे सरकारकडून पुनर्वसन करण्यात आले. मात्र या धनगर समाजाच्या घरात अजूनही महावितरणची वीज पोहचलेली नाही. सायंकाळी सहा वाजल्यानंतर हा गिरगाव धनगरवाडा अंधारात जातो. अजूनही हे धनगर लोक रॉकेलच्या दिव्यावर रात्री काढत आहेत. हे धनगर कुटुंबीय पुनर्वसन झाल्यापासून गिरगाव ग्रामपंचायतीकडे रीतसर घरफाळा, पाणीपट्टी भरत असल्याचे सांगतात. मात्र यांच्या आयुष्यात स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांत वीज पोहचलेली नाही की मुलभूत सुविधाही पोहचलेल्या नाहीत.

येथील धनगर समाजाला अजूनही उपजिविकेचे साधन उपलब्ध झालेले नाही. जंगलातील वाळलेली लाकडे, औषधी वनस्पती, जंगली मेवा गोळा करून तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये जाऊन विक्री करून आपले पोट भरावे लागते. यासाठी दररोज या धनगर लोकांना २० ते २५ किलोमीटर पायपीट केल्यानंतर दिवसाला ५० ते ६० रुपये यातून हातात पडतात. या धनगर लोकांमध्ये शिक्षणाविषयी अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही आणि सरकारही तसा प्रयत्न करत नाही. या धनगर लोकांना घरे बांधून दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असा सरकारचा समज झाला आहे असे दिसते. या धनगर समाजच्या घरात वीज पोहचविण्याबरोबरच त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावावेत. यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच त्यांना स्वातंत्र्याचा खरा लाभ मिळू शकेल.

हातात लेखणीऐवजी काठी

ज्या वयात सामान्य मुले हातात लेखणी धरतात त्या वयात डंगे धनगरांच्या मुलांच्या हातात गुरे राखण्यासाठी काठी दिली जाते. सध्या या धनगरांच्या कुटुंबातील सोळा मुले पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेतात. या मुलांना शाळेसाठी स्वतःची इमारत नाही गावातील एका भाड्याच्या घरात शाळा भरते.

'आमचे उभे आयुष्य जंगलातील काळोखात गेले. सरकारने पुनर्वसन केल्यानंतर जीवनात प्रकाश पडेल असे वाटले होते. मात्र मिळालेल्या घरात अजून विजेचा प्रकाश पडला नाही. सायंकाळी सहानंतर पूर्ण धनगर वाड्यावर काळोख असतो. त्यामुळे पुन्हा जंगलातील आयुष्याची आठवण येते. केवळ गवताच्या काडीची घरे जाऊन पक्की घरे मिळाली इतकाच काय तो बदल आमच्या आयुष्यात झाला. मात्र जीवनमानात कोणताच बदल झाला नाही. जीवन जगण्यासाठी पूर्वीचाच संघर्ष नशिबी आहे.

- सखाराम भिकाजी फोंडे, धनगरवाड्यावरील रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगपंचमी बेतली ज‌िवावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापुरातून आलेल्या एका पर्यटकाचा बुधवारी काळम्मावाडी (ता.राधानगरी) येथील दूधगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. प्रविण एकनाथ बोते (वय २२, रा. दिंडनेर्ली ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापुरातील महालक्ष्मी सेल्स सेर्व्हिस या खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत असलेला प्रवीण बुधवारी रंगपंचमी असल्याने सकाळी अकरा वाजता आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथे आला होता. धरणाच्या पायथ्याला असलेल्या काळम्मावाडी गावानजिक दूधगंगा नदीच्या काठावर रंगपंचमीचा आनंद लुटल्यावर दुपारी साडेबारा वाजता प्रविण आपले रंगाने माखलेले डोके धुण्यासाठी नदीकाठावर गेला असता तोल जावून तो नदीपात्रात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दोन तासाच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनाधिकाऱ्यांकडून कामाची खातरजमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळम्मावाडी धरणाच्या उजव्या बाजूला करण्यात येणाऱ्या पाइपलाइन योजनेच्या कामाची आणि महापालिकेच्या प्रस्तावाची खातरजमा केली. अप्पर प्रधान वनसंरक्षक सुरेश थोरात आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी अभयारण्य क्षेत्रातील प्रस्तावित जॅकवेल, पाण्याची टाकी, पंपिंग स्टेशन आणि सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनची माहिती घेतली. थोरात आता महापालिकेचा प्रस्ताव आणि प्रत्यक्ष पाहणीनंतरचा अहवाल नागपूर येथील प्रधान वन संरक्षक कार्यालयाकडे पाठविणार आहेत. त्यानंतर मंत्रालयामार्फत केंद्रीय वन व पर्यावरण खात्याकडे योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी जाणार आहे.

महापालिकेने डिसेंबर २०१४ मध्ये धरणाच्या उजव्या बाजूला बांधकामास सुरूवात केली. महापालिकेने त्यासाठी केवळ प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे वनविभागाने बांधकामास मनाई केली. यानंतर महापालिकेतर्फे फेरप्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार बुधवारी दुपारी वन संरक्षक थोरात, विभागीय वन अधिकारी झोरे, उपविभागीय वन अधिकारी नंदकुमार पाटील, वनसंरक्षक दशरथ पाटील यांनी जल अभियंता मनीष पवार यांच्यासोबत जागेची पाहणी केली.

राजकीय पाठबळाची गरज

वन संरक्षक थोरात नागपूर कार्यालयाकडे अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर तो मुंबई कार्यालयाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. राज्य सरकारकडून हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाते. वन विभागाची ही प्रक्रिया पाहता बांधकामाच्या मान्यतेसाठी आणखी काही महिने वाट पहावे लागणार आहे. वन विभागाकडून लवकर मान्यता मिळविण्यासाठी प्रशासनाला राजकीय पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक तपासात गुरफटले पोलिस

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

तब्बल तीन आठवडे उलटत असताना ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येच्या तपासाचे गांभ‌ीर्य वाढले असताना मोबाइल लोकेशन तपासावर पोलिसांनी लक्ष केंद्र‌ित केले आहे. हल्लेखोरांनी चोरीचा मोबाइल व बनावट सीमकार्ड वापरण्याची खबरदारी घेतली असल्याने हल्लेखोर शोधण्यासाठी पोलिसांना 'दर्या में खसखस' शोधण्याचा अनुभव येऊ लागला आहे.

पानसरे यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर मुंबई क्राइम ब्रॅच, पुणे क्राईम ब्रॅच व एटीएसने हल्लेखोरांनी वापरलेल्या मोबाइलचे लोकेशन कसे शोधायच्या याच्या ट‌िप्स कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलला दिल्या आहेत. मुंबई व पुण्यातील सायबर सेलच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्यामार्फत तपास सुरू आहे. पानसरे यांच्या बंगल्याच्या आवारातील एक किलोमीटर अंतरावर हल्ला होण्यापूर्वी दोन तास व हल्ल्यानंतर दोन तासात परिसरातील फोन, मोबाइलवरून झालेले कॉल, एसएम्एस, सोशल मीडिया, ट्विटरवरील कॉलचा काटेकोरपणे तपास करण्यात येत आहे.

दहशतवादी, घातपात कारवाया करणारी मंडळी, धमक्या देणारी मंडळी दरवेळी मोबाइल हॅन्डसेट बदलत असतात. त्यामुळे तीन वर्षापूर्वी राज्यात बोगस पत्त्यावर सीमकार्ड विकणाऱ्या दुकानदार व एजंटावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी चोरीला गेलेला मोबाइल व बनावट सीमकार्डचा वापर केल्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरात अनेक मोबाइल विक्री व दुरूस्तीच्या दुकानात चोरीचे मोबाइल विक्रीचा व्यवसाय सर्रास सुरू आहे. चोरीच्या मोबाईल विक्रीची व बनावट सीमकार्डची विक्री कुठे सुरू आहे याची पोलिसांना माहिती आहे पण महिन्यातून एकादी कारवाई करून पोलिस प्रशासन केवळ सोपस्कार पूर्ण करत आहे. महागडे मोबाइल चोरीचा तपास मात्र पोलिस प्रामाणिकपणे करतात. मोबाइल हरवला अथवा चोरीस गेल्यानंतर पोलिस तपास करताना गहाळ रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. मोबाइल चोरल्याचा तुमच्या कुणावर संशय असल्यास तक्रार करा अन्यथा नवीन मोबाइल खरेदी करा असा पोलिस ठाण्यात सल्ला दिला जातो. सहा महिन्यापूर्वी कोंबडी बाजारासमोरील एका मोबाइलच्या दुकानातून महागडे ५० मोबाइल चोरीला गेले. मोबाइलचा तपास करणे शक्य आहे पण त्यासाठी प्रामाणिकपणे व चिकाटीने पोलिसांकडून तपास होताना दिसत नाही.

सीमकार्डची सर्रास बेकायदेशीर विक्री

शहरात गल्लोगल्ली, बसस्थानक व बाजारपेठेत बनावट कागदपत्रे सादर करून सीमकार्डची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. प्रामा​णिकपणे सादर केलेल्या ग्राहकांच्या कागदपत्राचा वापर करून तीन ते चार कंपन्याचे सीमकार्ड विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. सीमकार्ड विक्री करणाऱ्या दुकानदारांनी स्वतंत्र रजिस्टर घालावे असा आदेश गृहखात्याने दिला असताना पोलिस प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नाही.

अकरा कोटींचे रक्तचंदन जप्त

निपाणीः निपाणीजवळ ११ कोटींचे रक्तचंदन जप्त करण्यात आले. नारळांच्या पोत्याखाली चंदनाचे ओंडके लपवून नेले जात होते. याप्रकरण चालक मुनी अय्यर (वय-६२) आणि क्लिनर प्रकाश (वय-३२) रा.चेन्नई यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चंदन तस्करांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. वनविभागाच्या यमगर्णी चौकीचे अधिकारी शंकर मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

आज दुपारच्य सुमारास हा ट्रक (एचआर.५५ क्यू ८५५९) नारळांची पोती भरुन पुणे-बेंगळुरू महामार्गावरुन जात होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आले हा ट्रक थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी दडवलेले साडेदहा टन रक्तचंदन सापडले. चिकोडी वनविभागाचे बी.ए.कंकणवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळ कनेक्शनही बोगस!

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

'महापालिकेची नवी योजना, चोवीस तास पाणी पुरवठा,' अशी बतावणी करत बोगस नळकनेक्शन देणारी टोळी कार्यरत झाली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी असल्याचे बिनदिक्कतपणे सांगत त्यांनी शहरातील विविध भागातील हॉ‌स्पिटल्स आणि काही बेकरी व्यावसायिकांना गंडा घातला आहे.

चार दिवसांपूर्वी शिवाजी पेठेतील एका हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून या टोळीने तीन हजार रुपयांत नळ कनेक्शन देतो असे सांगून पैसे लंपास केले आहेत. संबंधितांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. राजारामपुरी, शाहूपुरीतही असे प्रकार घडाले आहेत. मात्र प्रशासनाकडून कारवाईसंबंधी अद्याप काहीही हालचाली नाहीत. पाणी पुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांची अशा टोळ्यांना फूस असल्याचे वृत्त आहे.

शहरातील अनेक भागात बेकायदेशीररित्या नळ कनेक्शन जोडली आहेत. कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन राजरोसपणे अनधिकृत कनेक्शन देणारी यंत्रणाही कार्यरत आहे.

मीटर रीडरकडून होणारी लूट, बिलातील तफावत अशा घोळामुळे पाणी पुरवठा विभाग सातत्याने गाजत असतो. महापालिकेतील सर्वसाधारण सभा, जनता दरबारात अनेकदा पाणी पुरवठा विभागातील अनागोंदीचा पंचनामा होऊनही संबंधितांवर कारवाई झाली नाही. यावर कडी म्हणजे आता पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगत बोगस नळ कनेक्शन देणारी टोळी कार्यरत झाल्याने नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे.

महापालिकेकडे रीतसर तक्रार

बोगस नळ कनेक्शनबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहे. मकानदार व कुलकर्णी नावाचे दोन जण महापालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगत शिवाजी पेठेतील एका हॉस्पिटलमध्ये गेले. पाणी पुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे २४ तास पाणी पुरवठा होणार आहे. तीन हजार रुपये भरा तत्काळ नळ कनेक्शन देतो, असे नागरिकांना सांगितले जाते. रक्कम घेऊन गेल्यानंतर कनेक्शन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी मकानदार व कुलकर्णींनी दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधला. पण मोबाइल लागला नाही. महापालिकेकडे चौकशी केल्यावर मकानदार व कुलकर्णी नावाचे कर्मचारी नोकरीत नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात एका महिलेचाही समावेश आहे.

Latest Images