Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘रंग निसर्गाचे’ प्रदर्शन खुले

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

युवा चित्रकार विजय टिपुगडे यांच्या निसर्गचित्रांचे 'रंग-निसर्गाचे' चित्र प्रदर्शन बुधवारपासून (ता. ११) राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात खुले झाले. प्रदर्शनात ८० हून अधिक चित्रकृती मांडण्यात आल्या आहेत. शनिवारपर्यंत हे प्रदर्शन सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. 'कलानगरी व्हॉटस्‌अॅप ग्रुप'ने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी सिनेअभिनेता सुशांत जाधव, शशिकांत कदम, नितीन भोसले, आर्किटेक्ट शीतल जगदाळे उपस्थित होते.

प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये निसर्गातील विविध रूपे रंगरेषांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहेत. यामध्ये झाडे, नदी, घाट, तलाव, प्राणी, पक्षी, निसर्गातील हवामान व ऋतुमानानुसार बदलणारी रूपे, पावसाच्या छटा, हिरवळ अशा विविधांगी निसर्गदर्शनाचा समावेश आहे. जलरंगातील या चित्रांना प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजवरची परंपरा पाहता येथील निसर्गाला कॅनव्हासवर रेखाटताना स्टुडिओपेक्षा स्थळचित्रणालाच महत्त्व दिले गेले. जलरंगातील निसर्गचित्र ही कोल्हापूरची ओळख बनली. कोल्हापूरची ही ओळख जपण्यामध्ये चित्रकार विजय टिपुगडे यांचाही समावेश आहे. सध्या ते पूर्णवेळ चित्रकला, छायाचित्रण आणि रंगावली या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. निसर्गचित्रणात त्यांचा हातखंडा आहे. यथार्थदर्शी रेखाटन, छाया-भेदासह वास्तवदर्शनाची अनुभूती देणारे पारदर्शी रंगलेपन ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळ्या भावांची आगळी पायवाट

0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

वाढदिवसाच्या आधीच आठवडाभर भागातील एखादा कॉर्नर हेरून त्यावर फलक उभारायचा, त्यावर वाढदिवस असलेल्या तरूणाचा फोटो आणि खाली ओळीने शुभेच्छुकांच्या फोटोंची रांग. संध्याकाळी सातच्या दरम्यान चौकात स्टेजवर केक कापण्याचे निमित्त करून डॉल्बीवर धिंगाणा घालायचा. सध्याच्या तरुणाईच्या व्याख्येत बसणाऱ्या या वाढदिवस साजरे करण्याच्या पद्धतीला बावीस वर्षाच्या जुळ्या भावांनी छेद दिला आहे. अजय आणि विजय प्रभाकर पाटील यांनी आपला २१ वा वाढदिवस 'अ​वनि' या संस्थेतील मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन साजरा केला.

मूळचे चंद्रे (ता. राधानगरी) येथील शेतकरी कुटुंबातील अजय आणि विजय हे जुळे भाऊ शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापुरात राहतात. न्यू कॉलेजमध्ये अजय बी. ए. (राज्यशास्त्र)च्या तृतीय वर्षाला आहे तर विजय (इतिहास) बी. ए.च्या दुसऱ्या वर्षाला आहे. शालेय शिक्षणापासूनच अजय आणि विजय प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे विद्यार्थी आहेत. ९ मार्चला या दोघांनी वाढदिवस पहिल्यांदाच साजरा केला. पण तो एखाद्या संस्थेतील अनाथ मुलांसोबत करायचा हे त्यांनी ठरवले आणि ​वडील प्रभाकर पाटली यांना आपली कल्पना सांगितली. माजी सरपंच असलेल्या पाटील आणि दूध संस्थेत चेअरमन असलेल्या आईने मुलांच्या कल्पनेचे कौतुक केले आणि त्यासाठी लागणारे पैसे दिले. त्यातून अ​वनि या संस्थेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची खरेदी केली. एक केक घेतला आणि अजय, विजय यांनी त्यांच्या 'यूथ फॉर हेल्थ' आणि 'सार्थक क्रिएशन' ग्रुपमधील, सागर बगाडे, गणेश आडनाईक या मित्रांसमवेत आणि अविनाश माळवी, राज पाटील या भावांसोबत 'अवनि'मध्ये वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा केला. न्यू कॉलेजचे प्राचार्य नागेश नलवडे यांनी दोघांचे अभिनंदन करत कॉलेजच्या गेटवर त्यांच्या अभिनंदनाचा फलकही लावला.

तीन मुलांनी केला संकल्प

अजय आणि विजय हे वाढदिवस साजरा करत नाहीत. या दोघांनी टाकलेले पाऊल लक्षात घेऊन त्यांच्या तिघा मित्रांनी आपला वाढदिवस अशाच सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. सुमारे २६ हजार हेक्टरवरील पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यात निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुमारे ३०० एकरावर ही निर्यातक्षम द्राक्षे घेण्यात आली होती. द्राक्षमणी तडकणे, घडातून मणी गळणे, देठ कुजणे, बुरशीचा प्रादुर्भाव आदी प्रकार या अवकाळी पावसामुळे झाले आहेत. अशी सर्व पार्श्वभूमी असतानाच दुर्दैवाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कांही भागांना झोडपल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अवकाळी पावसामुळे युरोपीय देशांना द्राक्षांची निर्यात बंद झाल्याचे अॅग्रोऑन ओव्हरसिज कंपनीचे संचालक महोश पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सध्या रशियाला द्राक्षांची निर्यात सुरू आहे. युरोपीय देशांत रेसिड्यू वगैरेबाबत काटेकोरपणे चौकशी केली जाते.' अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारीसह गहू, द्राक्ष, डाळिंब, बेदाणे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला वस्तुनिष्ठ पंचनामे करून ताबडतोबीने अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अवकाळग्रस्त शेतीचे सुंत्तपणे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत कोणाची तक्रार असल्यास त्याची दखल घेतली जाईल. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्वरित शासनाकडे अहवाल पाठविला जाईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीतिसंगम न्हायला सुरांच्या धारांत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराडमधील १२ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी गुरुवारी माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त 'एक सूर, एक ताल' कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहिली. या उपक्रमामुळे प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण समाधी परिसर गुरुवारी सकाळी सुरांनी न्हाऊन निघाला.

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'कराड नगरी लोक गर्जले यशंवत आमुचे भाग्यविधाते, कीर्तीवंत जाहले' (यशवंत गौरव गीत), 'आओ बच्चो तुम्हे दिखाए झांकी हिंदुस्तान की', 'इतनी शक्ती हमे देना दाता' (प्रार्थना), आदी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर आदींसह यशवंतप्रेमी नागरिक समाधी स्थळी उपस्थित होते.

येथील सरस्वती विद्यामंदिर, उर्दू हायस्कूल, यशवंत हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, लाहोटी कन्या प्रशाला, विठामाता विद्यालय, दि. का. पालकर माध्यमिक शाळा, टिळक हायस्कूल, शिवाजी विद्यालय, शाहीन हायस्कूल, एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल आदी १२ शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. यशवंत गीताला संगीत शिक्षक डी. एच. कुलकर्णी, अमृत गिजरे आदींची साथ मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावकरांसाठी १० लाखांचा निधी

0
0

नेपथ्य, ध्वनियंत्रणा कायमस्वरूपी खरेदी करणार

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

बेळगावच्या नाट्यवेड्यामंडळींना पूर्वीप्रमाणे शहरात मराठी नाटके पाहायला मिळवीत, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने बेळगावच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेला दहा लाख रुपयांचा निधी नेपथ्यसाहित्य आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दिला आहे. परिषदेच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या नाट्य संमेलनात जमवलेल्या निधीचा काटकसरीने आणि योग्य वापर केल्याचे सांगून लोकूर म्हणाल्या, 'सगळ्यांची बिले चुकती केली आहेत. परिषद कोणाचेही पैसे द्यायचे लागत नाही.'

नाटक कंपन्यांच्या वाहनांना कर्नाटकात अव्वाच्या सव्वा प्रवेश कर लादला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील नाटक कंपन्यांना बेळगावात येऊन नाटकाचे प्रयोग करणे शक्य होत नाही. दहा लाख रुपयांच्या निधीतून नाटकाचे नेपथ्य ,माइक आणि इतर साहित्य खरेदी करून कायमस्वरूपी बेळगावमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन येण्यासाठी छोटे वाहनही पुरेसे ठरेल आणि प्रवेश कर भरायचा प्रश्नच उद्भवणार नाही. त्यामुळे कमी खर्चात नाटके दाखवणे नाटक कंपन्यांना शक्य होणार आहे.

प्रारंभी नाट्य परिषदेच्या शाखेने महाराष्ट्र सरकारकडे पाच लाख रुपयांचा निधी मागितला होता. त्यावेळी अजित पवार यांनी दहा लाख रुपयांचा नवा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. त्यामुळे सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला होता. महाराष्ट्रात नवे सरकार आल्यावर सांस्कृतिक खात्याने त्वरित दहा लाखाचा निधी दिला आहे. पत्रकार परिषदेला गीता कित्तूर आणि कीर्ती टेंबे उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगले तहसीलवर शिवसेनेचा मोर्चा

0
0

भूसंपादन विधेयक मंजूर करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

भूसंपादन विधेयक मंजूर करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. देशात कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी आत्महत्या करीत असताना केंद्र सरकारने शेतकरी विरोधी भूसंपादन विधेयक मंजूर करून देशातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचे जिल्हासंपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यावेळी म्हणाले.

आमदार सुजित मिणचेकर यांच्या कार्यालयापासून अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरूवात झाली. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिक तहसील कार्यालयासमोर आले. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी बोलताना अरूण दुधवडकर म्हणाले, 'केंद्र सरकारने अन्य पक्ष व शेतकऱ्यांच्या भावना विचारात न घेता भूसंपादन विधेयक मंजूर केले. या विधेयकामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. उद्योजक कवडीमोल दराने जमिनी खरेदी करून स्वत: गब्बर होणार आहेत.'

जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, 'शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी अनेक नैसर्गिक संकंटांचा सामना करीत असताना आता भूसंपादन विधेयक मंजूर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सरकार त्यांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालत आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.' यावेळी तहसीलदार दीपक शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात उपतालुकाप्रमुख बाबासो शिंगे, अनिल सुतार, आण्णासो बिल्लोरे, बी.टी.जाधव, यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर पॅटर्न’च तारेल

0
0

शिष्यवृत्ती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पॅटर्न राबविण्याची मागणी

शांताराम पाटील, गारगोटी

चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत आहेत. या परीक्षांचे पेपर कोल्हापूर जिल्ह्याच्या पेपर वाटप धोरणानुसार परीक्षेच्या दिवशीच परीक्षा केंद्रावर राज्यातील सर्वच जिल्ह्यात देण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामधून होत आहे. या प्रकारामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दहावी, बारावीबरोबरच चौथी व सातवी ही दोन महत्वाची शैक्षणिक वर्षे मानली जातात. कारण चौथी आणि सातवीमध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेतून पालकांना व शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या बुध्दिमत्तेचा आणि शिक्षणाचा कल समजून घेता येतो. शिवाय मुलांची शिक्षणाची दिशा दहाव्या, बाराव्या वर्षीच निश्चित करता येते. यासाठीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. मात्र आता विद्यार्थ्यांपेक्षा शिष्यवृत्तीची स्पर्धा शिक्षक, शाळा, तालुका, जिल्हा या पातळीवर पोहचली आहे आणि आपल्या शाळेतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील मुले शिष्यवृतीत यावीत यासाठी अनेक गैरमार्ग अवलंबले जात असल्याचे पालक, शिक्षक यांच्यातून सांगितले जात आहे. यातूनच मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात चौथी व सातवीचे शिष्यवृत्तीचे परीक्षेच्या अगोदर दोन दिवस दिले जाणारे पेपर व परीक्षा साहित्य पेपर परीक्षेदिवशीच केंद्रावर पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तार अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याच दिवशी प्रश्नपत्रिका पोहचविण्याची अंमलबजावणी करण्यात आली. याच धर्तीवर राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात पेपर वितरण व्हावे, अशी मागणी पालक,

शिक्षकांतून होत आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असताना सुध्दा काही गैरप्रकारांमुळे जिल्ह्यातील मुले राज्याच्या गुणवता यादीत कमी पडतात. राज्याची गुणवत्ता यादी ही २७० पर्यंत लागते. यात जिल्ह्यातील मुले कमी दिसतात. मात्र इतर जिल्ह्यांची गुणवत्ता यादी ग्रामीण २४० ते २४५ व शहरी २३० ते २३५ लागत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र जिल्हा गुणवत्ता यादी ग्रामीण २६० ते २६४ व शहरी २५० ते २५५ लागत असल्याचे एका शिष्यवृत्तीधारक शिक्षकाने सांगितले. हे अगोदर दोन दिवस दिल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांच्या मुळेच शक्य होत असल्याचे या शिक्षकाचे म्हणणे आहे. इतर जिल्ह्यात दोन दिवस अगोदर दिल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका व परीक्षेचे इतर साहित्य त्याच दिवशी शाळा केंद्रावर कोल्हापूर जिल्हा धर्तीवर पोहचवल्यास राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल असे पालक, शिक्षकांचे म्हणणे आहे.

'कोल्हापूर पॅटर्न'च योग्य मार्ग

परीक्षेच्या दिवशीच पेपर केंद्रावर पोहोचविण्याचा 'कोल्हापूर पॅटर्न' हा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याचा उत्तम मार्ग असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असूनही राज्यातील अन्य मुलांच्या तुलनेत जिल्ह्यातील मुले मागे पडत आहेत. त्यामुळे राज्यभरात 'कोल्हापूर पॅटर्न' राबविण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत नॅपकीन योजना जूनपासून

0
0

जिल्ह्यातील सहावी ते बारावीपर्यंतच्या एक लाख ११ हजार मुलींसाठी योजना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील सहावी ते बारावीपर्यंतच्या शालेय मुलींना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्याच्या योजनेला जूनपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर १ लाख ११ हजार मुलींसाठी तीन महिन्यांसाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

योजनेच्या पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत जानेवारीमध्ये झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत नावीन्यपूर्ण योजनेतून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ही योजना सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पाहणी करण्यास सांगितले होते.

जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीतून ८०९१ मुलींपैकी ५९ टक्के मुली नॅपकीन वापरत नसल्याचे आढळून आले. त्यानुसार सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींची संख्या विचारात घेतल्यानंतर एक लाख ११ हजार मुलींना नॅपकीन देणे गरजेचे आहे, असे नियोजन मंडळाला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. या मुलींसाठी तीन लाख ३३ हजार नॅपकीन आवश्यक असल्याने बाजारभावाप्रमाणे त्यासाठी ६६ लाख ८८ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने त्यामध्ये दर कमी करणे शक्य असल्याने सध्या ५० लाखांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे.

जानेवारीमध्ये हा प्रस्ताव मांडताना फेब्रुवारी ते एप्रिल कालावधीत नॅपकीन देण्यात यावेत अशी योजना होती. पण प्रशासकीय मंजुरी, तरतूद, टेंडर अशी प्रक्रिया राबविण्यास दोन महिन्यांचा किमान कालावधी लागणार आहे. त्यानुसार मेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जूनपासून या योजनेला सुरुवात केली जाईल. जून ते ऑगस्टमध्ये ही योजना राबविल्यानंतर पुढील कालावधीसाठी योजना सुरू करण्याबाबतचा निर्णय तत्कालीन नियोजन मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवली जावी, असे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत मांडले होते. त्यांच्या पुढाकाराने जर या योजनेला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली तर ​ही योजना कायमस्वरुपी सुरू राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रशियन टूर ऑपरेटर्सची कोल्हापूरला पसंती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आतापर्यंत गोवा आणि देशातील मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित असलेल्या रशियन पर्यटकांसाठी कोल्हापूर हे नवे आवडीचे पर्यटन केंद्र म्हणून निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियन पर्यटकांना कोल्हापूर भावेल का, याचा अंदाज घेण्यासाठी रशियातील टूर ऑपरेटर्स व्येरा चिगिरी यांनी गुरुवारी कोल्हापूरला भेट दिली. त्यांच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसांत रशियन पर्यटकांचा एक ग्रुप कोल्हापूरच्या भेटीवर येणार आहे, तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कोल्हापूरची मोठी सहल आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिगिरी गेली १५ वर्षे 'टूर ऑर्गनायझर' म्हणून काम करतात. भारतात कर्नाटक आणि गोवा येथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहलींचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात पर्यटन संधींची माहिती घेण्यासाठी त्या काही दिवसांपूर्वी गोव्यातील पर्यटन विकास मंत्रालयात गेल्या होत्या. तेथून त्यांना कोल्हापूरचा संदर्भ मिळाला. गोव्यातील मंत्रालयात त्यांना कोल्हापुरात कारवाँ हॉलिडेजचे वासीम सरकवास यांचे नाव सुचवण्यात आले.

चिगिरी बुधवारी सकाळी कोल्हापुरात आल्यानंतर सरकवास यांच्यासमवेत त्यांनी महालक्ष्मी मंदिर, ताराराणी पुतळा, टाउन हॉल म्युझियम आणि न्यू पॅलेस, मंगळवार पेठ, पंचगंगा नदीघाट परिसर येथे भेट दिली. शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एन. के. बुवा यांनी कोल्हापुरातील विविध स्थळांची माहिती दिली.

सरकवास म्हणाले, 'परदेशी टूर ऑपरेटर कोल्हापुरात येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. १०० ते ३०० च्या ग्रुपने रशियन पर्यटक भारतात गोवा आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात येतात. यातील काही पर्यटक कोल्हापुरात वळले, तर त्याचा शहराला मोठा लाभ होईल. रशियामध्ये पॅकेज टूर्सने बाहेर देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी सवलती दिल्या जातात. त्यामुळे बऱ्याचवेळा दोनशे ते तीनशे जण चार्टर्ड विमानाने फिरायला येतात. कोल्हापुरात राशियन पर्यटकांसाठी दोन रात्री आणि तीन दिवसांच्या पॅकेजचे नियोजन केले आहे.'

कोल्हापूर ऐतिहासिक शहर असल्याचे येथील संस्कृतीतूनही जाणवते. येथील इतिहास समजून घेण्यासारखा आहे. शहरात 'लाइफ आणि एनर्जी' असल्याचे जाणवते. तसेच येथील हवामानही आल्हाददायक आहे.'

-व्येरा चिगिरी, रशियायन टूर ऑपरेटर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या आदेशाला पोलिसांची बगल

0
0

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी इतरांवर रुबाब; पोलिस ठाणी रिकामीच

सतीश घाटगे, कोल्हापूर

शाळा, कॉलेज, बँका, हॉस्पिटल व मॉलमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असताना पोलिस मुख्यालयासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यात मात्र सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत पोलिसांकडून कोणतीही पावले उचलली जात नाही. एकीकडे सीसीटीव्ही यंत्रणा उभारा म्हणून आवाहन करायचे व पोलिस मुख्यालयासह एकाही पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही उभारायचे नाही ही भूमिका संशयास्पद आहे.

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही यंत्रणा असते तर हल्लेखोर शोधण्यास मदत झाली असती असा दावा पोलिस प्रशासनाकडून होत आहे. सेफ सिटीची चर्चा गतवर्षी सुरू झाली होती. २०१४ मध्ये शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही उभारण्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर केल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. २०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर सीसीटीव्हीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला. आधीच्या सरकारने गृहखात्याची परवानगीच घेतली नव्हती अशी तांत्रिक कारणे पुढे केली गेली. महानगरपालिकेचे दोन कोटी व जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी निधी खचून शहरातील ६७ ठिकाणी २५० सीसीटीव्ही उभारण्याची घोषणा जिल्हा नियोजनमंडळाच्या बैठकीत केली.

दरम्यान पानसरे यांच्या हत्येनंतर जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने शहरातील शाळा, कॉलेज, बँका, मॉल, व्यापारी पेठा या ठिकाणी सीसीटीव्ही उभारण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला टार्गेट दिले आहेत. पोलिस कर्मचारी अशा संस्थांना भेट देऊन सीसीटीव्ही उभारणीसाठी आग्रह करत आहेत. पण दुसरीकडे पोलिस मुख्यालय, शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा, करवीर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा अस्तित्वात नाही. पोलिस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. पण त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. चार वर्षापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तत्कालिन पोलिस निरीक्षक संजय कुरूंदकर यांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली होती. पण पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाच्यावेळी ही यंत्रणा काढण्यात आली.

मुख्यालयाची परवानगीच नाही

सीसीटीव्ही बसवण्यास पोलिस मुख्यालयाने परवानगी दिलेली नसल्याने सीसीटीव्ही परत बसवण्यात आले नाहीत, असे अजब उत्तर पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. पोलिस ठाण्यात व ठाण्याबाहेर सीसीटीव्ही बसवले तर पोलिस ठाण्यात होणाऱ्या कायदेशीर व बेकायदेशीर बाबी रेकॉर्ड होणार असल्याने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास टाळाटाळ केली जात आहे. इचलकरंजी शहरात दोन पोलिस वाहनांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. शहरातील पोलिस निरीक्षकांच्या वाहनांवरही सीसीटीव्ही बसवण्यात येणार होते पण त्यालाही मुहूर्त मिळालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंच्या आयुष्यात संघर्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिथे अन्याय तिथे गोविंद पानसरे' हे समीकरण बनवल्याने ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या आयुष्यात संघर्ष हा अविभाज्य भाग बनला होता. त्यांच्या या विचारांची अनुभूती 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या डिव्हीडीमधून येत राहील, असे मत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन डी. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

पानसरे यांच्या निधनानंतर 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाची राज्यभरातून प्रचंड मागणी वाढली होती. काही दिवसात हजारो ​पुस्तके विकली गेली होती. छत्रपती शिवरायांबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठी महत्त्वाचे असलेले या पुस्तकातील विचार असंख्य लोकांपर्यंत पोहचावेत, यासाठी श्रमिक प्रतिष्ठानने पानसरे यांच्या गाजलेल्या भाषणाची डिव्हीडी प्रसिद्ध केली आहे. त्याचे प्रकाशन गुरुवारी पाटील यांच्या हस्ते बोर्डिंगमध्ये झाले.

यावेळी मिलिंद यादव यांनी डिव्हीडी प्रकाशित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ' पानसरे यांनी शिवाजी महाराजांबाबतचा अपप्रचार या पुस्तकातून दूर करण्याचा प्रयत्न केला. खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्यावर या पुस्तकाची मागणी वाढली. त्यांनी मांडलेला खरा इतिहास सर्वत्र पोहचवण्याबरोबरच तोच इतिहास बोललाही पाहिजे यासाठी ही डिव्हीडी महत्त्वाची आहे. '

डी. बी. पाटील यांनी पानसरे यांच्या आठवणी सांगितल्या. प्राचार्य नागेश नलवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विलास रणसुभे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उदय नारकर, दिलीप पवार, प्रभाकर आरडे, सुभाष वाणी, उमेश पानसरे, प्राचार्य समीर दिघे, प्रा. कुलकर्णी, दिलीप घाडगे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागील पानावरून पुढे

0
0

म. टा. प्र​​तिनिधी, कोल्हापूर

शहराचा नव्याने सॅटेलाइट नकाशा, त्या आधारे ​मिळकतींचा शोध घेऊन महापालिकेचे घरफाळा उत्पन्न वाढविणे, पाणी पुरवठा योजनेचे ऑड‌िट करून पाणी गळतीपासून इतर गैरप्रकारांना चाप लावणे, एनर्जी ऑड‌िट करून वीज बचतीसाठी सुचविलेल्या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गतीमान व पारदर्शी कारभारासाठी ई ऑफ‌िस सीस्टीम, रेकॉर्ड डिजीटायझेशन अशा विविध प्रकल्पांचा यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात समावेश आहे. या सर्व योजना मागील वर्षीच्याच असल्याने मागील पानावरून पुढे असाचा प्रकार अर्थसंकल्पाबाबत घडला आहे.

प्रस्तावित अर्थसंकल्पात घनकचरा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून ते तीन महिन्यात खुले करण्याचे प्रस्तावित आहे, अशा अनेक तरतूदी महापालिकेच्या प्र‌स्तावित अर्थसंकल्पामध्ये समविष्ट आहेत. महापालिकेच्या स्वनिधीमधून मोठे भांडवली प्रकल्प हाती घेणे अडचणीचे आहे. केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करून विशेष प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करावा लागणार आहे.

शहरातील रस्त्यांचा सर्व्हे, रेकॉर्ड डिज‌िटायझेशन

शहरातील सर्व रस्ते अद्ययावत करण्यासाठी रोड सर्व्हे होणार आहे. शहरातील वाहतुकीचा विचार करून रस्त्याची रुंदी, नवीन डीपी रस्ते तयार करणे, वाहतूक नियोजन, रस्ते बांधणी दुरुस्तीसाठी सर्व्हे उपयुक्त ठरणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून कोल्हापूर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधणे,जमीनीखालील पाइपलाइन बदलण्याची योजना प्रस्तावित आहे. आयटी पार्कसाठी पाच एकर जागा उपलब्ध केली जाणार आहे. तर रंकाळा टॉवर ते तांबट कमान रस्ता सिमेंट कॉंक्रेटचा करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नातील निम्म्यापेक्षा अधिक रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगार, पेन्शनसहित स्थापना विभागावर खर्ची पडते. चालू वर्षात अस्थापना खर्च १७३ कोटी ९३ लाख इतकी अपेक्षित धरली आहे. इतर खर्चाची रक्कमही ६२ कोटी २३ लाखापर्यंत वाढली आहे.

मागील वर्षीच्याच योजनांचा समावेश

महापालिकेची कमकुवत आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नाची मर्यादा यामुळे या वर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये नवीन योजनांचा समावेश न करता जुन्याच योजनांची री ओढल्याने मागील पानावरून पुढे असाच काहींसा प्रकार झाला आहे. त्यामुळे या वर्षी शहरात नवीन योजना, प्रकल्प दिसणार नाहीत. थेट पाइपलाइन योजना, कळंबा तलाव परिसर विकास, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन या विकास कामावरच भर दिला आहे. उपलब्ध निधी आणि मंजूर योजना कार्यान्वित करण्याकडेच कल असेल.

‌शिक्षण मंडळाचे ३० कोटींचे अंदाजपत्रक

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने ३० कोटी ५४ लाख रुपयांचे मागणी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. मागणी इतका निधी उपलब्ध झाला तर महापालिका शाळातील सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश पुरवण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर ई-लर्निंग सॉफ्टवेअर, एलसीडी प्रोजेक्टर, शाळांना अद्ययावत फर्निचर, सायन्स साहित्य, शैक्षणिक साहित्य, सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणे, नवीन माध्यमिक शाळा, बालवाडी सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. झोपडपट्टीतील शाळांना विशेष अनुदान दिले जाणार आहे. शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते यांनी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले.

कर्जाच्या परतफेडीसाठी वार्षिक १२ कोटींची तरतूद

नगरोत्थान अंतर्गत रस्ते, स्टॉर्म वॉटर प्रकल्प व थेट पाइपलाइन योजनेकरिता कर्ज उभारणी करून महापालिकेच्या हिश्श्याची तरतूद करावी लागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये ९१ कोटीचे कर्ज वित्तीय संस्थाकडून घेऊन महापालिकेच्या वाट्याची रक्कम उपलब्ध केली जाणार आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी वार्षिक १२ कोटीची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेमध्ये महापालिकेचा दहा टक्के हिस्सा असून अन्य कामासाठी १०४ कोटी रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे.

रंकाळ्यासाठी खास तरतूद नाही

रंकाळा तलाव हा शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा आहे. तलावाची तटबंदी कोसळत आहे. तलावाच्या संवर्धनासाठी भरीव रक्कम अर्थसंकल्पात करण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र कोसळलेल्या तटबंदीच्या उभारणीसाठी एक कोटी व इतर खर्चासाठी २० लाखाची तरतूद करून रंकाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येते. दरम्यान राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतंर्गत रंकाळा तलाव संवर्धन टप्पा २ प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. याकरिता डीपीआर तयार करून महासभेत मंजुरी घेऊन दोन महिन्यात केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे नियोजन आहे.

यंदा होणार कळंबा तलाव विकास

राज्य सरकारने कळंबा तलाव विकासासाठी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ७ कोटी ७५ लाखाच्या कामाची निविदा प्रसिध्द झाली आहे. अर्थसंकल्पीय वर्षामध्ये या कामाची पूर्तता केली जाणार आहे. उर्वरित २ कोटी २५ लाखाच्या निधीमध्ये जल संवर्धनाची कामे, धरण भरावाचा स्लोप मजबुतीकरण, मुख्य रस्त्याकडून कंपाउंड हॉल, गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे.

मोठ्या गृह प्रकल्पासाठी आठ कोटीची वाहन यंत्रणा

शहरात सध्या ११ मजलीचे दहा प्रकल्प सुरू आहेत. भविष्यात अशा प्रकल्पांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शहरात आपत्कालीन स्थिती उदभवल्यास आपत्ती व्यवस्थापन करणे, लोकांची सोडवणूक, शोध व बचाव कार्यासाठी अग्निशमन सेवेचे बळकटीकरण केले जाणार आहे. याकरिता टर्न टेबल लॅडर ही आठ कोटी रुपये किंमतीची अत्याधुनिक वाहन यंत्रणा खरेदी करण्याची तरतूद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ नगरसेवकांना अटक-सुटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांच्या मोटारीवर हल्ला केल्याप्रकरणी ३३ नगरसेवकांसह ३६ जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरूवारी अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चव्हाण यांनी त्यांची प्रत्येकी पाच हजाराच्या जामिनावर मुक्तता केली.

ठराव मंजुरीसाठी लाच घेताना अटक झालेल्या महापौर माळवी यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांविरोधात बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे. तीन मार्च रोजी महापौरांच्यावतीने महापालिकेत आयोजित जनता दरबाराच्या कार्यक्रमावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी माळवींच्या राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. जनता दरबार संपवून महापौर माळवी घरी परतत असताना आंदोलनातील नगरसेवकांनी मोटारीला घेराव घातला. हातातील पक्षाच्या झेंड्यांच्या काठ्या मोटारीवर मारून मोटारीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल माळवी यांनी त्याच दिवशी नगरसेवकांपासून जिवितास धोका असल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी नगरसेवक प्रयत्नशील होते. पोलिसांनी उपमहापौर मोहन गोंजारे व राष्ट्रवादीचे गट नेते राजेश लाटकर यांना नोटिसही पाठवला होती. त्यांनी नोटिसीला उत्तर देताना हल्ला केला नसल्याचा दावा केला होता.

दरम्यान गुरुवारी ३३ नगरसेवक व तीन नगरसेविकांचे पती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल करणे, शिविगाळ करून धमकी देणे या कलामांखाली अटक केली. अटकेनंतर त्यांना कसबा बावड्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले. नगरसेवकांतर्फे अॅड. शिवाजीराव राणे यांनी युक्तीवाद केला. वाईट प्रवृत्तींविरोधात नगरसेवक आंदोलन करत होते. आंदोलन करणे हा गुन्हा नाही. आंदोलन करणारे नगरसेवक आहेत. ते पोलिसांना तपासात सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली. न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आदींसह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते.

यांना झाली अटक - उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी सभापती आदिल फरास, परिवहन सभापती अजित पवार, शिक्षण सभापती संजय मोहिते, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेता राजेश लाटकर, माजी महापौर कांचन कवाळे, वंदना बुचडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

IRB रस्ते दुरुस्ती करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीने कोल्हापुरात साकारलेल्या रस्ते प्रकल्प आणि टोल आकारणीवरून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी 'आयआरबी'च्या प्रतिनिधींना चांगलेच सुनावले. 'वाहनधारकांकडून टोल आकारणी करताहात, तर रस्त्यांची देखभाल आ​​णि दुरुस्ती का केली जात नाही?' अशा शब्दांत रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार यांनी कंपनीला खडसावले. कंपनीने देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याचे मान्य करत अहवाल दर महिन्याला रस्ते विकास महामंडळ व महापालिकेकडे सादर करण्याची ग्वाही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तब्बल दोन वर्षानंतर सुकाणू समितीच्या झालेल्या बैठकीत आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा आढावा घेण्यात आला. करारानुसार रस्त्याची देखभाल होत नसल्याचा आक्षेप महापालिकेने घेतला. रस्तयांचा दर्जा आणि टोल वसुलीच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. टोल वसुलीला स्थगिती मिळावी यासाठी टोलविरोधी कृती समितीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. महापालिकेने, कंपनीकडून ९० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने रस्त्यांचे फेर मूल्याकंन करण्यासाठी नवीन समिती स्थापन केली आहे.

बैठकीला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आयआरबीचे प्रतिनिधी एम. ए. अब्राहम, रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीवरून आयआरबी कंपनीच्या प्रतिनिधींकडे थेट विचारणा करत कंपनीकडून हलगर्जीपणा होत असल्याबद्दल खडसावण्यात आले. फुटपाथ देखभाल, खड्ड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी केली जात नसल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले. दुरुस्ती दर महिन्याला अहवाल महामंडळ व महापालिकेकडे दिले जाईल अशी ग्वाही अब्राहम यांनी दिली.

मूल्याकंन सुरू करा

राज्य सरकारने रस्ते मूल्याकंनासाठी नव्याने समिती नेमली आहे. मूल्याकंनासाठी येणारा खर्च महापालिकेने करावयाचा आहे. स​मितीने मूल्याकंनाची प्रक्रिया सुरू करावी, महापालिका खर्च देण्यास तयार असल्याचे पत्र यावेळी दिल्याचे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचे सुख'कर' बजेट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन योजनांचा अभाव असलेला, मात्र शहरातील सध्याच्या ​विविध प्रकल्पांच्या पूर्ततेला प्राधान्यक्रम देणारे १०९८ कोटी रुपयांचे बजेट महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीला गुरुवारी सादर केले. यंदा कोणत्याही नव्या करवाढीचा बोजा शहरवासीयांवर लादलेला नाही ही जमेची बाजू असली तरी आर्थिक उत्पन्नवाढीसह शहर विकासाचे व्हिजन यंदाच्या बजेटमध्ये दिसलेले नाही.

महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून १ हजार ९७ कोटी ९८ लाख ७४ हजार २१४ रुपयांचे हे बजेट आहे. २०१५-१६ च्या बजेटमध्ये अव्वल शिल्लकीसह महसूली व भांडवली जमा ३८९ कोटी ४५ लाख ५४ हजार ७१५ रुपये अपेक्षित आहे. तर ३८९ कोटी ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून ४४ लाख ६७ हजार ७१५ रुपये शिल्लक बजेटमध्ये अपेक्षित आहे.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी गुरुवारी स्थायी समितीपुढे बजेट सादर केले. याबाबत अतिरिक्त आयुक्त देसाई म्हणाले, 'विशेष प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचे स्वतंत्र जमा-खर्चाचे बजेट तयार केले आहे. यात ७०८ कोटी ५३ लाख १९ हजार ४९९ रुपये जमा अपेक्षित आहे. या प्रकल्पांवर एकूण ६४४ कोटी १५ लाख ४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षण मंडळासाठी २८ कोटींची तरतूद केली आहे. रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीसाठी एक को​टी आणि इतर कामांसाठी २० लाख अशी एकूण एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद आहे. पत्रकार परिषदेला उपायुक्त विजयकुमार खोराटे, अश्विनी वाघमळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, जल अभियंता मनीष पवार, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

पाइपलाइन योजनेचे साठ टक्क्यांचे टार्गेट

शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प आणि नव्याने मंजूर झालेले प्रकल्प यांसाठी महापालिकेला स्वनिधीमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्याचा प्राधान्याने विचार करून बजेट तयार केले आहे. काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतंर्गत अर्थसंकल्पीय वर्षामध्ये ६० टक्के काम पूर्ण करण्यात येणार आहे. रंकाळा तलाव संवर्धन टप्पा २ प्रकल्पतंर्गत डीपीआर तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.'

यंदाच्या बजेटची वैशिष्ट्ये

शहरवासीयांवर कोणतीही करवाढ नाही

ई ऑफिस यंत्रणा कार्यान्वित करणार

पाणी पुरवठा योजनेचे ऑडिट

वीज बचतीला प्राधान्य, एनर्जी ऑडिट

अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन व सक्षमीकरण

शहराचा सॅटेलाइट नकाशा घेण्याचा प्रस्ताव

उत्पन्नवाढीसाठी मिळकतींचा शोध (जीआयएसद्वारे)

शहरातील रस्ते अद्ययावत करण्यासाठी सर्व्हे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजा-यांची लेखी, तोंडी परीक्षा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पांडुरंग अष्टक कोणी लिहिले? विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा कोणत्या तिथीला होतो? अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांनी गुरुवारी दिली. पंढरपुरात विठ्ठलाच्या पुजारीपदासाठी लेखी परीक्षा घेण्याचा अभिनव आणि पहिलाच प्रयोग गुरुवारी (१२ मार्च) पार पडला.

विठ्ठल मंदिराच्या अखत्यारित असलेल्या शहरातील २८ मंदिरांतील पुजाऱ्यांच्या नेमणुकीसाठी ही परीक्षा घेण्यात आली.

एखाद्या नियमित परीक्षेप्रमाणे ही परीक्षा झाली. मंदिर समितीच्या तुकाराम भवनातील मोठ्या हॉलमध्ये बेंच मांडण्यात आले होते. २२ पदांसाठी आलेल्या उमेदवारांना ७५ गुणांची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न स्वरूपात घेतली गेली. उत्तरे लिहिण्यासाठी प्रश्नपत्रिकेवरच जागा देण्यात आली होती. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी ५० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. परीक्षा केंद्राबाहेर मंदिर समिती आणि पोलिसांचा बंदोबस्त होता.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादमाने, व्यवस्थापक विलास महाजन आणि मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील परीक्षेचे नियंत्रण करीत होते. वारकरी संप्रदाय, विठ्ठल मंदिर, संतांचे वाङ्मय, देव पूजेतील

नित्योपचार आदी विषयांवरील ५० प्रश्न या लेखी प्रश्नपत्रिकेत होते. या परीक्षेसाठी ब्राह्मण, मराठा, धनगर, जंगम, सोनार, महार अशा अठरापगड जातींमधील ३७ उमेदवार उपस्थित होते. त्यात चार महिलांचाही समावेश होता. हे सगळे उमेदवार पंढरपूर परिसरातील होते.

लेखी परीक्षेनंतर २५ गुणांची तोंडी परीक्षाही घेतली जाणार असून, दोन्ही ठिकाणी सरस गुण मिळवणाऱ्या २२ उमेदवारांची भरती पुजारी म्हणून केली जाणार आहे. तोंडी परीक्षेत नित्यपूजेविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत.

पहिलाच प्रयोग?

पुजारीपदासाठी अशा पद्धतीने लेखी परीक्षा घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असावा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे बडवे आणि उत्पात यांची मक्तेदारी संपुष्टात येऊन यापुढे पगारी पुजारी असणार आहेत.

Latest Images