Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोकणच्या बस सीबीएसलाच

$
0
0
कोकणातून संभाजीनगर आगारापर्यंतच बसच्या फेऱ्या करण्याचा एस. टी. महामंडळाचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर बदलण्यात आला आहे. प्रवाशांची मागणी व जनतेच्या सोयीकरिता पूर्ववत कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत सुरू राहतील.

रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या हालचाली

$
0
0
कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच यामध्ये विशेष रस दाखवल्याने या मार्गाबाबत पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोंडी हवी की बससेवा ?

$
0
0
‘दिडशे वाहनांपासून होणारी वाहतुकीची कोंडी हवी की संभाजीनगर आगारातून जाणारी कोकण बस सेवा हवी याचा निर्णय कोल्हापूर शहरवासियांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले.

अपघात बळींची संख्या घटली

$
0
0
जिल्ह्यात रस्ते अपघातात गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूंची संख्या १०० ने घटली आहे. गतवर्षी २०१३ मध्ये रस्ते अपघातात ३१३ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये वर्षभरात २१३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

पार्किंगमधून ५५ लाखांचे उद्दिष्ट

$
0
0
कोल्हापूर शहरातील तेरा वाहनतळ भाडेतत्वावर देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. या वाहनतळाच्या माध्यमातून वर्षाला ५५ लाखाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पर्यटकांचा राबता आणि भाविकांची गर्दी विचारात घेत पे अँड पार्किंगच्या माध्यमातून महापालिकेने पार्किंगमधून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

तीन दिवस पारा खालीच राहणार

$
0
0
ओरिसा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट आहे. शिवाय राज्यातील सर्वच जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे.

सात हजार एकर जमीन गायब?

$
0
0
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जागांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. २०१० ते २०१३ या तीन वर्षांत देवस्थान समितीकडील नोंदीमध्ये जवळपास सात हजार एकर जमिनीचा फरक दिसून आला आहे.

सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला प्रारंभ

$
0
0
सनई चौघड्यांचा मंजूळ आवाज, हलग्यांचा कडकडाट, बॅन्जोवरील भक्तिगीत आणि ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर’च्या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला तैंलाभिषेकाने मंगळवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

सांगलीत होणार पाण्याचे ‘एटीएम’

$
0
0
महापालिका शहरातील नागरीकांना शुद्ध पाणी देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रायोगिक तत्वावर नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत सांगलीतील शास्त्री चौकात पाण्याचे ‘एटीएम मशिन’ बसवण्यात येणार आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांना ओळखपत्राची सक्ती

$
0
0
अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून प्रवाशांबाबत अन्य शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) प्रवासी रिक्षा तसेच टॅक्सीमध्ये परवानाधारकासह ​चालकाची माहिती लावण्याचा निर्णय घेतला आहे.

पी. शिवशंकर महापालिका आयुक्त

$
0
0
गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. शिवशंकर (आयएएस) यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज‍ऱ्यात बिबट्याचा वावर

$
0
0
गेले काही दिवस एक बिबट्या आजरा शहरालगत वावरत आहे. काही दिवस याबाबत चर्चा होत असताना मंगळवारी वनविभागाने केलेल्या पाहणीमध्ये या बिबट्याच्या पायाचे ठसे मिळाल्यामुळे याला दुजोरा मिळाला आहे.

आणखी चार मोबाइल स्वच्छतागृहे

$
0
0
स्वच्छतागृहांअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाच्या निधीतून आणखी चार मोबाइल स्वच्छतागृहे खरेदी करण्यात येणार असून, ती पुरुष आणि महिला दोघांनाही वापरता येणार आहेत.

महाडिकांनी शब्द पाळला नाही

$
0
0
लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून धनंजय महाडिकांना मदत केली. त्यांनीही विधानसभा निवडणुकीत मदत करू असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी शब्द पाळला नाही.

महाडिक हेच शत्रू

$
0
0
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काही काळ अलिप्त राहिलेले सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. मंदाकिनी आमटे यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार

$
0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंद‌ाकिनी आमटे यांना यंदाचा भद्रकाली ताराराणी पुरस्कार जाहीर झाला आहे. ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या स्मृतिनिमित्त विविध क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो.

श्रीधर फडके यांना ऐकण्याची शनिवारी पर्वणी

$
0
0
मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांची ‘फिटे अंधाराचे जाळे’ ही मैफल महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने आयोजित केली आहे.

कोल्हापुरात रविवारी मिरवणूक

$
0
0
चौथ्या भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्ताने कणेरी येथे श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाच्या वतीने भारतीय संस्कृती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्पात सुरु आहे. १८ ते २५ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या उत्सवासाठी देशभरातून दहा लाख लोक भेट देतील.

...अन्यथा लाखाचा दंड

$
0
0
कोट्यवधी रुपयांच्या निधीतून कोल्हापुरात सुरू असलेल्या रस्ते कामात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठेकेदारांकडे डांबरीकरणासाठी आवश्यक बॅचमिक्स प्लँटही नाहीत. परिणामी रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम संथगतीने होत आहे.

दूध संस्थांच्या निवडणुकांना वेग

$
0
0
गोकुळची निवडणूक जाहीर झाल्यापासून दूध संस्थांच्या निवडणुका घेण्यास जिल्हा पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत ५४१ संस्थांपैकी १७५ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्यातील फक्त दोनच संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images