Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शहरात पादचारी पुलांची आवश्यकता

0
0
रस्ता सुरक्षा अभियानाच्यानिमित्ताने विविध यंत्रणांकडून वाहनधारकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. मात्र त्याच रस्त्यावर अधिकार असलेल्या पादचाऱ्यांबाबत महापालिका, पोलिस या दोन्ही यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

विठ्ठल मंदिराला धोका

0
0
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील छताची फळी मंगळवारी रात्री कोसळली. ती अंगावर पडल्याने ज्ञानेश मुंगसे या पुजाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

नीचांकी तापमानाची नोंद

0
0
दोन दिवसांपासून सुरु असलेली तापमानाची घसरण सुरुच असून बुधवारी कोल्हापुरात यंदाच्या हंगामातील १२.९ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. हुडहुडी भरायला लावणारी थंडी दिवसभरही जाणवत होती. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘गोकुळ’चा केंद्रबिंदू कागलच

0
0
‘गोकुळ’ निवडणुकीच्या निमित्ताने आमदार महादेवराव महाडिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे.

केएमटी करणार ‘इन्स्पेक्शन’

0
0
केंद्र सरकारच्या निधीतून घेण्यात येणाऱ्या बसेसची महापालिकेच्या परिवहन विभागाकडून स्वतंत्ररीत्या चाचणी होणार आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टमार्फत (सीआयआरटी, पुणे) तपासणी केली जाणार आहे. प्रती तीन बसमागे एक बस याप्रमाणे २५ बसेसची ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ होणार आहे.

एसटीचा रिव्हर्स गिअर

0
0
सार्वजनिक वाहतूक सेवेत गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या एसटीला अनेक संक्रमणावस्थेततून जावे लागत आहे. चालक-वाहकांची पुरेशी संख्या नसल्याने एकट्या कोल्हापूर विभागाला सहा महिन्यात ३ कोटी १६ लाखाला फटका बसला आहे.

व्याघ्र प्रकल्पात ५ पट्टेरी वाघ

0
0
सह्याद्री पर्वत रागांत वसलेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या कोअर व बफर झोन मिळून एकूण ११६५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तब्बल पाच पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याची माहिती प्रथमच वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

बेधडक सफर

0
0
बाइकची सफर ही एक अद्भूत अनुभूती आहे. त्यामुळे आपली आवडती गाडी घेऊन कुठेतरी लांबवर भटकून यावे असे कायम वाटत असते. पण, एकट्याला ते शक्य नसते. त्यासाठी एक ग्रुप हवा असतो.

यंग सीनिअर्सचा स्नेहगोडवा

0
0
अंगावर शहारा आणणारी थंडी, धुक्याने लपेटलेले रस्ते, नुकताच सूर्य उगवल्याने आसमंतात पसरलेली हलकीशी सोनेरी किरणांची तिरिप, पक्षांचा किलबिलाट अशा आल्हाददायक वातावरणात ज्येष्ठांची सकाळ स्नेहगोडव्याने अविस्मरणीय झाली.

वृत्तपत्र टाकणाऱ्या घन:श्यामची सुवर्णभरारी

0
0
‘भल्या पहाटे थंडी, वारा, पावसाला तोंड देत सायकलवरून रोज १८० घरांत वृत्तपत्र टाकल्यानंतर वेटलिप्टिंगचा सराव, त्यानंतर शाळा आणि पुन्हा सराव असा दिनक्रम अंगवळणी पडलेल्या सांगलीच्या घनःश्याम देसाईने दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे.

गाढविणीच्या दुधासाठी रांगा

0
0
बेळगावात सध्या गाढविणीच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. हे दूध ५० रुपयांना एक चमचा आणि ५००० रुपये लिटर भावाने विकले जात आहे. गाढविणीच्या दुधात मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असल्याच्या समजुतीतून ही मागणी निर्माण झाली आहे. रांगा लावून लोक हे दूध खरेदी करत अल्याचे चित्र शहरात आहे.

झेडपी सदस्यावर खंडणीचा गुन्हा

0
0
काशीळ (ता. सातारा) येथील एका डॉक्टरकडे वीस लाख रुपयांची खंडणीसाठी मागणे व अपहरण करणे या आरोपांवरून जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे याला व त्याच्या एका साथीदाराला गुरुवारी अटक करण्यात आली. दोघांनाही पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

रस्त्याचे काम बंद पाडले

0
0
नृसिंहवाडी ते गणेशवाडी रस्त्याचे पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथे संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडले. तसेच रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले याचबरोबर रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपणही केले.

चला... ग्रामीण संस्कृती पाहायला

0
0
चौथ्या भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्ताने कणेरी मठावर (ता.करवीर) रविवारपासून (ता.१८) ग्रामीण संस्कृतीचा मेळा भरणार आहे. श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाच्या वतीने भारतीय संस्कृती उत्सवानिमित्ताने आयोजित या व्यापक कार्यक्रमामध्ये आरोग्यदायी असणाऱ्या फूड मॉलची संकल्पना शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असेल तर कृषी पर्यटनाच्या कल्पक प्रदर्शनामुळेनव्या उद्योजकतेची बीजे रोवली जातील अशा स्वरुपाची रचना करण्यात आली आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना रोटरी समाजसेवा पुरस्कार

0
0
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व रोटरी समाजसेवा केंद्र यांच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा रोटरी समाजसेवा पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ कमला कॉलेज येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात शनिवारी (ता. १७) दुपारी चार वाजता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गणेश भट यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी सांगितले.

निधीसाठी प्रस्ताव तयार करा

0
0
रंकाळा तलावाचे प्रदूषण कमी करण्याकरिता आवश्यक उपाययोजना व संरक्षक भिंत बांधण्यासाठी राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून निधी प्राप्तीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी केल्या.

एजंटांपासून मुक्ती, हवी उपाययोजना

0
0
वर्षानुवर्षे एजंटांच्या विळख्यात अडकलेले आरटीओ कार्यालय आता परिवहन आयुक्तांच्या कडक आदेशामुळे मुक्त होण्याची चिन्हे आहेत. कार्यालयातील फाइल हाताळण्यापर्यंत मजल गेलेल्या एजंटांचा हस्तक्षेप सध्या कमी झाला असला तरी विविध कामांसाठी अजूनही एजंटगिरीचा वापर होत आहे.

नैराश्याने युवतीची आत्महत्या

0
0
वडिलांचा मृत्यूमुळे निराश झालेल्या रविवार पेठेतील माधुरी सदाशिव जाधव (वय २०, रा. टेंबे रोड) या युवतीने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. माधुरी हिने शिवाजी पुलावरून नदीत उडी मारली, मात्र लगतच सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या भरावावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मीच महापौरपदी राहणार

0
0
‘मला सहा महिन्यांसाठी महापौरपद मिळाले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत आहे. यामुळे येत्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. नेत्यांच्या आदेशानंतरच राजीनामा देईन. अद्याप तसा कुठल्याही प्रकारचा आदेश नाही, यामुळे फेब्रुवारीपर्यंत मीच महापौरपदी असेन,’ असे महापौर तृप्ती माळवी यांनी स्पष्ट केले.

‘चला, उद्या हेरिटेज समजावून घेऊ’

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने ‘सेलिब्रेट कोल्हापूर’ अंतर्गत शनिवारी (ता. १७ जानेवारी) हेरिटेज टूर आयोजित करण्यात आली आहे. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून चालत सुरू होणारी ही टूर भवानी मंडपात संपणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images