Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कासमध्ये बेकायदा माती उत्खनन

$
0
0
जिल्ह्यातील कास परिसरात बेकायदा लाल मातीचे उत्खनन होत आहे. प्रशासन मात्र या प्रकरणी सोयिस्कररित्या डोळेझाक करीत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाल माती माफिया मोकाट सुटले आहेत.

असल्या घरात माणसं राहतात काय?

$
0
0
नागरीकांच्या संरक्षणाची जबाबदारी हाकणाऱ्या पोलिसांच्या सरकारी निवासस्थानांची दयनीय अवस्था पाहून शुक्रवारी खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘या ठिकाणी माणसं राहतात काय? असा त्यांनी सवाल करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून घेतले.

मूकबधीर मुलीवर बलात्कार

$
0
0
लग्नाचे अमिष दाखवून दिवाळीपासून एका मूकबधीर मुलीवर बलात्कार केल्याबद्दल तिघा तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संदीप विलास पोवार, कुलदीप वामन पोवार व सुयोग सदाशिव चौगुले (तिघेही रा. पोवार मळा, धान्य गोडावूनच्या पाठीमागे, रमणमळा) अशी आरोपींची नावे आहेत.

गुऱ्हाळघरे आजपासून बंद

$
0
0
राज्यातील बाजार समित्यांचे गुळावरील हटवलेले नियमन व वारंवार ढासळणाऱ्या दराविरोधात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून (ता.१५) जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा गूळ उत्पादक असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

पीटीएम-खंडोबा समर्थकांत तुफान दगडफेक

$
0
0
शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर पाटाकडील तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळाच्या समर्थकांत तुफान दगडफेक झाली. यामध्ये दोघे फुटबॉलशौकीन जखमी झाले आहे.

प्रणिती-आडम मास्तर संघर्ष पेटला

$
0
0
शहर-मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे आणि माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यातील संघर्ष चांगलाच विकोपाल गेला आहे.

निर्मलग्रामचे कोट्यवधी कचऱ्यात

$
0
0
निर्मल ग्रामयोजनेत १०० टक्के बक्षीस पात्र ठरण्याच्या दृष्टीने मार्गाक्रमण करत असणाऱ्या भुदरगड तालुक्यात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेचे चित्र समोर येत आहे.

मॉडेल बसची चाचणी शुक्रवारी

$
0
0
केंद्र सरकारच्या ४४ कोटीच्या निधीतून कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाने अशोक लेलँड कंपनीकडून खरेदी करण्यात येत असलेल्या बसेसची मॉडेल बस (प्रोटोटाइप बस) शुक्रवारी (ता. १९ डिसेंबर) कोल्हापुरात दाखल होत आहे.

लँडलाइन बनतेय ‘ब्रॉडबँड’

$
0
0
पत्रांशिवाय कोणतेच संपर्क माध्यम नसलेल्या जगात वायरमधून एकमेकांचे बोलणे ऐकण्याचे अप्रुप असलेली लँडलाईन इंटरनेटच्या अतिवेगवान जगात ब्रॉडबँडमध्ये बदलू लागली आहे.

आता काँग्रेस ‘वेटिंग’वर

$
0
0
महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षात परस्परांवर कुरघोडीची संधी दवडली गेली नसल्याची स्थिती आहे. आगामी महापौर निवडीवरून आतापासून डावपेच आखले जात आहेत.

मैदाने फुलली

$
0
0
सकाळचे आल्हाददायक वातावरणात कोवळी किरणे अंगावर झेलत रंगीबेरंगी ट्रॅकसूटमधील मुलांनी शाळेची मैदाने फुलून गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मनातला एव्हरेस्ट प्रत्यक्षात

$
0
0
‘प्रत्येकाच्या मनात एक एव्हरेस्ट दडलेला असतो आणि प्रत्येकाचे एव्हरेस्ट वेगळे असते...’ जगप्रसिद्ध गिर्यायोहक क्रिस बॉनिरंगटन याचे हे विधान प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या मनातील एव्हरेस्ट वेगळा असला आणि प्रत्यक्ष एव्हरेस्टवर जाता आले नाही तरी त्याचे दर्शनतरी घेऊन येण्याची अनेकांची इच्छा असते.

थम्ब इम्प्रेशन शिवाय धान्य मिळणार नाही

$
0
0
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था गैरव्यवहारांनी कुरतडली असल्याने लाभार्थ्यांना हक्काचे स्वस्त धान्य मिळणे दुरापास्त होत आहे. हे थांबविण्यासाठी आता सरकार पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे स्वस्त धान्य दुकाने ऑनलाइन केली जाणार आहेत.

आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
एलबीटीचे निमित्त करुन व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाया विनाअट मागे घेऊन एलबीटीला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी सोमवारपासून व्यापाऱ्यांनी सांगलीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

नवोदय आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0
पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीत शिकणारा विद्यार्थी सचिन लालासाहेब जावीर (वय १५, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) या विद्यार्थ्यास गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यालयाचे प्राचार्य अशोक साली आणि हाउस मास्टर बी. आर. खेडकर व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

‘विल’ पॉवर

$
0
0
बेबी मावशी व बाबू काका बरेच दिवसांनी आमच्या घरी आले होते. बेबी मावशी प्रापंचिक जबाबदारीतून आता बरीच मोकळी झाली होती. दोन सुना घरची जबाबदारी चोख पार पाडत होत्या. नातवंडांचे शिक्षण संपून ती नुकतीच कॉलेजला जाऊ लागलेली होती.

आधीच उल्हास, त्यात फाल्गुनमास

$
0
0
शहरातील कचऱ्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायदेशीर लढाई करत असलेल्या महापालिकेला आणखी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टोप खणीत कचरा टाकण्यासंदर्भात एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे मान्यता मागितली आहे.

स्वाभिमानी परिवार : स्वावलंबी गाव

$
0
0
कणेरीतील सिद्धगिरी मठावर १९ ते २५ जानेवारीदरम्यान भारतीय संस्कृती उत्सव साजरा होत आहे. उत्सवात दहा लाख लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. सांस्कृतिक देवाण घेवाण आणि अनेक लोकांनी एकत्र येऊन खेड्यांचे सबलीकरण, पर्यावरण समतोल यासाठी केलेला हा प्रयत्न असेल.

स्वाभिमानी संघटनेचा ‘खड्डे महोत्सव’

$
0
0
दुंडगे (ता. चंदगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खड्डे महोत्सवाचा प्रारंभ संघटनेचे सचिव बाळाराम फडके यांच्या हस्ते खड्डे पूजा करुन करण्यात आला. प्रा. दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या खड्डे महोत्सवाला सुरुवात झाली.

अल्पसंख्याक समाजाचा शनिवारी मोर्चा

$
0
0
धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरोधात कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील लोक २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images