Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आज‍ऱ्यातील उसाची उचल करा

$
0
0
यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी आजरा तालुका साखर कारखान्याकडून तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या ऊस उचलीला अद्याप सुरवात केलेली नाही. तालुक्यातील उत्तूर विभागाव्यतिरिक्त अन्य परिसरातील उसाची उचल न करण्याच्या कारखान्याच्या धोरणाचा हा परिणाम आहे.

गूळ व्यापाऱ्यांची लालूच

$
0
0
गुळा हमीभाव मिळावा, बाजार समितीचे नियमन कायम असावे व उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे बारा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जपुरवठ्यासाठी एनजीओंची मदत

$
0
0
लहान घटकांना बँकांशी जोडण्यासाठी नाबार्ड यापुढे स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे. या निर्णयामुळे लघुउद्योग करणारे तरूण व शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अशोक कांबडे यांनी व्यक्त केला.

शहरात होणार निर्भया संलचन

$
0
0
ताराराणी संरक्षक दल, मुख्याध्यापक संघ व ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांच्या वतीने निर्भया अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सुमारे ३००० हजार मुलींची निषेध फेरी काढण्यात येणार असल्याची माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटीक यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांनी दिली.

वीरमाता-पित्यांना सलाम

$
0
0
महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात सोमवारी सकाळी शहीदांच्या माता, पित्यांसह पत्नीचा सन्मान करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या, महापालिकेच्या अग्निशमन विभागातील शहीद जवानांच्या वीरमाता, पिता आणि पत्नींना गौरविण्यात आले.

१० हजारांमागे ७०० किडनी पेशंट!

$
0
0
बदलत्या जीवशैलीमुळे होणारा मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटची संख्या वाढली आहे. दर दहा हजारी लोकसंख्येमागे ७०० हून अधिक पेशंट किडनीच्या विकाराने त्रस्त आणि दोन्ही किडन्या निकामी असलेले पेशंट साधारण हजाराच्या घरात आहेत.

श्याम मनोहर, पुष्पा भावे यांना पुरस्कार

$
0
0
अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांची घोषणा आज येथे करण्यात आली. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर (पुणे) यांना साहित्य जीवनगौरव तर पुष्पा भावे (मुंबई) यांना सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

इन्स्पिरेशन

$
0
0
शहरात होणारी वीज चोरी असो वा विजेचा तुटवडा, धरणाच्या पाण्यातून होणारी वीजनिर्मिती, सांडपाण्याचे नियोजन अशा कोल्हापूरसह देशभर भेडसावणाऱ्या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी कल्पक उपाययोजना सुचविल्या.

पासपोर्ट नोंदणी महा ई-सेवा केंद्रातून

$
0
0
पासपोर्टसाठीची ऑनलाइन नोंदणीची सोय आता महा इ- सेवा केंद्र किंवा संग्राम कक्षात करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भरमसाठ पैसे आकारणा ऱ्यांना एजंटगिरीला आळा बसणार आहे. केवळ शंभर रुपयांत ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

जनता गाडी धावणार सुसाट

$
0
0
रंकाळा-कागल आणि रंकाळा-हुपरी जनाता गाडीने एसटीला दररोज दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. पण केएमटी आणि वडाप व्यावसायिकांना प्रवासी मिळत नसल्याच्या सबबीखाली सूत्रबद्ध हालचाली सुरू केल्या. याला प्रादेशिक परिवहन कार्यालयही बळी पडले पण जनरेट्यामुळे शहरांतर्गत टप्पा वाहतुकीला ‘ब्रेक’ लागणार नाही.

एलिफंट गो बॅक मोहिमेचा फज्जा

$
0
0
आजरा तालुक्यातील विशेषत: पश्चिम व दक्षिण विभागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकट ठरलेल्या एका टस्करला हुसकावण्यासाठी राबविलेल्या गो बॅक एलिफंट मोहिमेचा मंगळवारी अक्षरश: फज्जा उडाला. वनविभागाने ही मोहिम राबविण्याचे ठरविले खरे पण त्यादृष्टीने वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हत्तीप्रवण क्षेत्राकडे कूच करूनही हाती काही मिळाले नाही.

यंग सीनिअर्सचा सोशल टच

$
0
0
वयाच्या ५८ आणि ६० वर्षांपर्यंत विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयात नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनाची सुरुवात होते. या जीवनातही यंग सीनिअर्संना अनेक जबाबदारी पार पाडत आहेत. यंग सीनिअर्संनी नाती-गोती जपण्यासह दिनचर्येचे परफेक्ट नियोजन केले आहे.

द्राक्षाचे ५०० कोटींचे नुकसान

$
0
0
अवकाळी वादळी पाऊस, खराब हवामानामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष सुभाष आर्वे यांनी केला आहे.

‘रंकाळा जनता’ला मिळणार दिलासा

$
0
0
‘रंकाळा’ एसटी प्रवासी आणि विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाने दिलासा दिला आहे. शहरांतर्गत टप्पा वाहतुकीस मज्जाव केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर एसटी महामंडळ जागे झाले. ‘रंकाळा-कागल व रंकाळा-हुपरी जनता गाडीला शहरांतर्गत टप्पा वाहतुकीला परवानी मिळण्यासाठी महामंडळांने प्रादेशिक परिवहन आयुक्तांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

सुमन कल्याणपूर यांचा गौरव

$
0
0
भावमधुर गायनाने रसिक मनांवर ठसा उमटविणाऱ्या पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा रविवारी (ता. २१) सत्कार, प्रकट मुलाखत आणि त्यांनी गायिलेल्या मराठी-हिंदी गीतांच्या ‘सुमन सुगंध’ मैफलीचे आयोजन केले आहे.

अंध घडवताहेत ‘डोळस’ पर्यटन

$
0
0
पर्यटनातून सर्वसमावेशक विकासाची संकल्पना जगभर राबवली जात आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या या व्यवसायावर अवलंबून आहे. यंदाचे वर्ष पर्यटनातून ‘सामाजिक-आर्थिक विकास,’ ही संकल्पना घेऊन राबविण्यात येत आहे.

झिगझॅग स्टाइलला आवरा!

$
0
0
रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. रुंदी कमी असल्याने वाहनांच्या दोन रांगा लागलेल्या आहेत. या परिस्थितीत एका वाहनामागून वाहन चालवणे स्वतःबरोबर सर्वांच्याच सोयीचे असते. परंतु, कर्णकर्कश्श हॉर्न वाजवत, झिगझॅग पद्धतीने बेदरकारपणे बाइक चालवणारे अनेकजण शहरात पाहायला मिळतात.

‘अनाथ’पणाचा दाखलाच मिळेना

$
0
0
महिला व बाल विकास विभागामार्फत बाल न्याय अधिनियमांतर्गत मान्यताप्राप्त संस्थांमध्ये दाखल अनाथ मुलांना ‘अनाथ’ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने १६ जून २०१२ रोजी अध्यादेश काढला. मात्र, या निर्णयाची गेल्या दोन वर्षात अंमलबजावणीच झाली नाही.

खंडणीखोराविरोधात उत्स्फूर्त बंद

$
0
0
वेगवेगळ्या कारणावरून खंडणी उकळणाऱ्या तरुणावर कारवाई व्हावी या मागणीसाठी बुधवारी गांधीनगरातील व्यापारी पेठेत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये गांधीनगरातील २५ हजार दुकाने बंद राहिली.

तपकिरी शेपटीचा स्वर्गीय नर्तक

$
0
0
जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांच्या सीमेवरील जंगलातील दुर्मिळ जैवविविधतेचा आढळ पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images