Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चार हजार ऊसदरासाठी नरेंद्र मोदींच्या दारात बसू

$
0
0
‘मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन आने वाले है’ या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या उसालाही अच्छे दिन यावेत, अशी माझीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे. चार हजार रुपयांच्या वर उसाला दर जाहीर होत नाही तोपर्यंत वारणा कारखाना सुरू न करण्याचा निर्णय मी तुमच्या सहमतीने आजच जाहीर करतो.

निवडणुकीमुळे लाभतोय रोजगारनिर्मितीला हातभार

$
0
0
निवडणुकीत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, मतदारांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडवावा लागतो. उमेदवारांना आणि पक्षांना खिसा रिकामा करावा लागतो. प्रचारासाठी लागणारी यंत्रणा मात्र अर्थव्यवस्थेला मोठा आधारही देते आणि रोजगारनिर्मितीलाही हातभार लावते.

आमदार हाळवणकर यांची उमेदवारी वैध

$
0
0
सर्वांचेच लक्ष वेधून राहिलेल्या विधानसभा उमेदवार छाननी प्रक्रियेत सोमवारी इचलकरंजी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार सुरेश हाळवणकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. अनुकूल निकाल प्राप्त होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

आठ महिन्यांत ३२ रस्ते बाद

$
0
0
कोल्हापूर शहरांतर्गत रस्त्यांची चाळण झाल्यानंतर महापालिकेने केलेल्या सर्व्हेत ३२ रस्ते पूर्णपणे खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी २०१४ नंतर हे रस्ते तयार केले होते. या रस्त्यांवर जवळपास एक कोटी रूपये खर्च झाले आहेत.

धैर्यशील मानेंची बंडखोरी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन मतदारसंघात दणका बसला. शिरोळ मतदारसंघात धैर्यशील माने यांचा राष्ट्रवादीच्यावतीने भरलेला अर्ज अवैध ठरला तर कोल्हापूर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचे दुर्वास कदम यांचा अर्ज त्रुटींमुळे बाद ठरवण्यात आला.

शहराला चोवीस तास सुरक्षा कवच

$
0
0
विस्तारणाऱ्या शहराची सुरक्षितता, वाहतुकीला शिस्त आणि आपत्कालीन स्थितीत जलदगतीने मदतकार्य पोहोचावे या अनुषंगाने ‘सेफ सिटी’ची संकल्पना मूर्त रूपात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका, पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

आबांचा उमेदवारी अर्ज वैध

$
0
0
भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांचा आक्षेप फेटाळून लावत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी आर. आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला.

स्टार प्रचारक मतदारसंघातच

$
0
0
राज्यात अचानक झालेल्या महाघटस्फोटाने सर्वच पक्षांचे नेते हादरले आहेत. अचानक मिळालेल्या उमेदवारीने अनेकांची धावपळ उडाली आहे. वातावरण निर्मितीसाठी स्टार प्रचारकांची गरज असताना सर्वच पक्षातील बहुतांशी स्टार प्रचारक घरच्या मैदानातच बॅटिंग करण्यात अडकले आहेत.

मेहुणीवर खुनी हल्ला करणाऱ्यास जन्मठेप

$
0
0
मेहुणीवर खुनी हल्ला करणाऱ्या सुकुमार कल्लाप्पा कांबळे (वय ३५, रा. अब्दुललाट) याला दोषी ठरवून येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी मंगळवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ट्रॉलीला आता बसणार ‘ब्रेक’

$
0
0
कोल्हापुरातील एका इंजिनीअर आणि उद्योजकाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी (ट्रेलर) ब्रेकची निर्मिती केली आहे. हे ब्रेक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे असून त्यातून ट्रॅक्टर-ट्रॉलीवर एकाचवेळी नियंत्रित करता येते.

मराठा जातीचे दाखले त्वरित द्या

$
0
0
मराठा जातीचे दाखले मिळत नाहीत. किरकोळ कारणासाठी अर्ज फेटाळून प्रशासनाकडून अडवणूक सुरू आहे. हा प्रकार तातडीने थांबूवन दाखले द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र स्वराज्य संघाने पत्रकाद्वारे दिला आहे.

सभा गाजवणारी ‘दुसरी फळी’आहे कुठे?

$
0
0
‘आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत आमचे साहेब जनतेच्या ह्दयावर राज्य करतील. विकासाचे डोंगर फक्त आमचे साहेबच उभे करु शकतील. विरोधकांची अनामत जप्त केल्याशिवाय आमचा नेता स्वस्थ बसणार नाही,’ अशी नेत्यांच्या आणि समर्थकांच्या अंगावर मोरपीस फिरवल्यासारखी शब्दफेक आणि विरोधकांच्यावर तुफान टोलेबाजी करणारी ‘दुसरी फळी’ बहुतांश मतदारसंघात दिसेनाशी झाली आहे.

राज ठाकरेंची सभा दुसऱ्या आठवड्यात

$
0
0
आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन झाल्यानंतर कोल्हापुरातही पहिल्या तीनचार वर्षात मनसेचे कार्यकर्ते सक्रीय होते. मात्र आंदोलनाची दखल पदाधिकाऱ्यांनी न घेतल्यामुळे सध्या कोल्हापुरात मनसे निस्तेज असल्याचे चित्र आहे.

नेत्यांच्या सौभाग्यवतींची अखेर माघार

$
0
0
‘कोणतीही रिस्क नको’ यासाठी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मातब्बर उमेदवारांच्या पत्नींनी भरलेले पर्यायी अर्ज मंगळवारी माघारी घेण्यात आले.

‘आम्ही सातपुते’ अखेर भाजपच्या तंबूत

$
0
0
विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून लढण्यास इच्छूक असलेले ‘ते’ सातजण भाजपच्या तंबूत जाण्याच्या तयारीत आहेत. यातील प्रा. जयंत पाटील, बी.जी. मांगले, माणिक पाटील चुयेकर व प्रताप कोंडेकर हे भाजपच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत.

मुक्काम मतदारसंघातच...!

$
0
0
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या सर्वच पक्षांचे जिल्हाध्यक्ष, मंत्री सध्या विधानसभेच्या रिंगणात आहेत. अचानक दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे हे या सर्वांची मोठी तारांबळ उडाली आहे.

‘गोकुळ’च्या दुधाला सर्वपक्षीय रंग

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळीचे जाळे आहे. या सहकारी संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातो. अनेक संस्थांच्या माध्यमातून राजकीय नेते आपले राजकारण करत असल्याचे दिसते.

लाखांहून अधिक ई बुक्सचे ग्रंथालय

$
0
0
शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजचे एच. टी. अपराध ग्रंथालय हायटेक बनले आहे. ग्रंथालय संगणकीकृत असून पंचवीस हून अधिक महाविद्यालयांशी कनेक्टिव्हीटी आहे. एक लाखांहून अधिक इ-बुक्स आणि पाच हजार इ-जर्नल्स उपलब्ध आहेत.

टोल याचिकांची सुनावणी पूर्ण

$
0
0
रस्ते प्रकल्पातील अनियमितता आणि टोल वसुलीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. आयआरबीने ९५ टक्के कामे पूर्ण केली नसल्याने टोल वसुलीचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद महापालिकेतर्फे करण्यात आला तर आयआरबीने ९६ टक्क्यावर कामे झाल्यामुळे टोलवसुली नियमानुसार सुरू असल्याचे सांगितले.

तिरुपतीचा शालू येणार

$
0
0
विजयादशमीच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला नेसवण्यात येणारा मानाचा शालू तिरुपती देवस्थानच्यावतीने गुरुवारी (ता. २ ऑक्टोबर) कोल्हापुरात येणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images