Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रचाराला फेस्टिव्ह रंग

$
0
0
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर साजऱ्या होत असलेल्या नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या उंबरठ्यावर रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचाराला फेस्टिव्ह रंग चांगलाच चढला आहे.

‘चंदगड’ साठी बहुरंगी लढत

$
0
0
चंदगड मतदारसंघासाठी ४२ उमेदवारांनी ६५ अर्ज दाखल केले. पुर्नरचित मतदारसंघासाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस

$
0
0
आघाडी, युती संपुष्टात आल्याने प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांचा सुकाळच सुकाळ असल्याने कार्यकर्त्यांची पाचही बोटे तुपात आहेत. अनेक उमेदवारांच्या साठमारीत आता एक एक कार्यकर्ताही महत्वाचा वाटू लागल्याने त्याला जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ओबीसी सेवा संघ बहिष्काराच्या पवित्र्यात

$
0
0
जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात उच्च वर्गीयांकडून अन्याय होत असल्याच्या भावनेमुळे ओबीसी सेवा संघ विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या पवित्र्यात आहे. हा निर्णय घेण्यासाठी ओबीसी व भटके विमुक्त समाजाची व्यापक बैठक मंगळवारी (ता.३०) आयोजित केली आहे.

मंडलिक कारखान्याची नोंदणी ‘बहुराज्यीय’ करण्यास मंजुरी

$
0
0
सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल तालुक्यातील ८६ गावांचे आहे. सध्या कर्नाटक राज्यातील चिकोडी तालुक्यातून सुमारे एक लाख टन ऊस मिळतो. त्यामुळे या तालुक्यातील सुमारे ४५ गावांतून सभासद करुन घेण्यासाठी मागणीचा जोर वाढ आहे.

टोलच्या याचिकांची आजपासून सुनावणी

$
0
0
कोल्हापूरच्या टोलबाबत हायकोर्टात सोमवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. आयआरबी कंपनीकडून कोल्हापुरात बेकायदेशीर टोलवसुली सुरू असल्याचा आक्षेप आहे. टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी आयआरबीच्या विरोधात याचिका दाखल आहेत.

मोदींच्या उपस्थितीत शनिवारी प्रचार प्रारंभ

$
0
0
राज्यात सत्ता मिळविण्याच्या महत्वाकांक्षेने युती आणि आघाडी सोडून स्वतंत्रपणे लढणाऱ्या पक्षांनी प्रचारसभांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन दाखवायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेने भाजपच्या राज्यातील प्रचाराची सुरूवातही कोल्हापुरातूनच होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरोळवरून वाढला गुंता

$
0
0
माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा सत्वशील माने यांनी इचलकरंजीत बंडखोरी केल्यानंतर शिरोळमध्येही राष्ट्रवादी बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

बार्शीच्या प्रार्थनाला ब्राँझ

$
0
0
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुरुंदवाड येथील खेळाडूंनी टॅलेंट दाखवले होते. याचीच पुनरावृत्ती आशियायी क्रीडा स्पर्धेत बार्शीच्या प्रार्थना गुलाबराव ठोंबरे या युवा खेळाडूने केली आहे. प्रार्थनाने रविवारी भारताची अव्वल टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या साथीने दुहेरीत ब्राँझ पदक पटकावले.

दर्शनरांगेत सापाचा थरार

$
0
0
रविवारी पहाटे अंबाबाईच्या दर्शनरांगेत उभ्या राहिलेल्या महिलांना देवीचे दर्शनाधीच सापाचे दर्शन झाल्याने तारांबळ उडाली. साप पकडण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलातील कर्मचारी संग्राम मोरे याच्या बोटाला सापाने चावा घेतला.

अवतरले रूप पंचगंगेचे

$
0
0
शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पंचगंगा रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली.

आचारसंहितेचे वाजले तीन तेरा

$
0
0
निवडणूक आयोगाने कडक आचारसंहिता राबविण्याचे आदेश दिले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात आचारसंहितेचे तीन तेरा वाजले आहेत. खुलेआम शहर आणि उपनगरांत जेवणावळी सुरू झाल्या आहेत. दक्षिण, उत्तर, करवीरसह सर्वच विधानसभा मतदारसंघांत मतदारांना आमिषे दाखविली जात आहेत.

‘करवीर’, ‘उत्तर’साठी साटेलोटे

$
0
0
करवीर व कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती, शेकापने साटेलोटे केले आहे. या दोनच मतदारसंघात ही तडजोड असून इतरत्र मैत्रीपूर्ण लढत असेल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले.

नेत्यांविषयीचे ‘प्रेम’ महागात

$
0
0
निवडणूक काळात मोटारसायकल्स आणि अन्य वाहनांवर नेत्यांचे पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे लावणाऱ्यांवर आचारसंहितेचा बडगा बसणार आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने कारवाईसाठी कडक पाऊल उचलले आहे. विनापरवाना वाहने आणि घरांवर झेंडे आणि पोस्टर व बॅनर लावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

आर. आर. आबांची उमेदवारी धोक्यात

$
0
0
सत्ताविरोधी लाटेचा सामना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यानंतर सांगलीतही धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने त्यांचा अर्ज तूर्तास बाजूला ठेवण्यात आला आहे.

सांगलीतील आठ मतदारसंघात ३१ उमेदवारांचे ८७ अर्ज अवैध

$
0
0
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांमधील एकूण १९३ उमेदवारांची २७० नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून, ३१ उमेदवारांची ८७ नामनिर्देशनपत्रे छाननीत अवैध ठरविण्यात आली.

‘कृष्णा’च्या सभेत महाभारत

$
0
0
यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी गट आणि माजी अध्यक्ष मोहिते यांचा गट यांच्यात तुफानी हाणामारी झाली. त्यात इंद्रजित मोहिते व मदन मोहिते या माजी अध्यक्षांनाही मारहाण करण्यात आली.

गजारूढ रूपात अंबाबाईची पूजा

$
0
0
करवीर निवासिनी अंबाबाईची सोमवारी गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली. ललिता पंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर लवाजम्यासह त्र्यंबोली देवीच्या भेटीस गेली होती. सलग पाचव्या दिवशीही मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

सौर बंबांसाठीची सबसिडी रद्द

$
0
0
केंद्रीय नव आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सौर बंबांना (सोलर वॉटर हिटर सिस्टम) देण्यात येणारी स‌बसिडी १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सौरबंबांच्या किमतीत वाढ झाली आहे.

डिसेंबरमध्ये येणार मॉडेल बस

$
0
0
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून केएमटीला मिळणाऱ्या १०४ बसेसच्या खरेदीचा एक भाग म्हणून कंपनीला एक कोटी १० लाख रुपये मोबीलायझेशन फंड (अॅडव्हान्सची रक्कम) या आठवड्यात दिली जाणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images