Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आर्थिक दहशतवाद संपवा

$
0
0
‘माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी बसवलेली सुसंस्कृतीची घडी विस्कटली असून तालुक्यावर वाईट वेळ मुश्रीफांमुळेच आली आहे. मंत्री मुश्रीफांकडे इतका पैसा आहे की, तो काय करायचा म्हणूनच ते महिनाभरापासून पैसे वाटत सुटले आहेत. तालुक्यातील मुश्रीफांचा हा आर्थिक दहशतवाद संपवा,’ असे आवाहन शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.

माकप इचलकरंजी, हातकणंगलेतून

$
0
0
इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला मिळाल्या असून इचलकरंजीतून कॉ. सदाशिव आण्णाप्पा मलाबादे तर हातकणंगलेतून कॉ. भरमा लगमाण्णा कांबळे हे निवडणूक लढविणार आहेत.

‘भारती’चा रोबो रोखणार अपघात

$
0
0
भारती विद्यापीठ कॉलेजमध्ये संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या गौरव कालेकर, अमेय काजरेकर, पंकज सौंदळे आणि जितेश अहुजा यांनी असा रोबो तयार केला आहे की, वाहन चालविताना खोल द ऱ्या आणि उंच टेकड्यांमधील नागमोडी वळणांचा रस्ता सहजपणे वाहकाला दिसेल आणि जीवघेण्या अपघातापासून वाचता येईल.

‘स्वाभिमानी’तून पहिली बंडखोरी

$
0
0
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या दुर्लक्षित पुतळ्याला पंचामृताने अभिषेक घालून पाटील अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे गेले.

एसटीला गणपती पावला

$
0
0
गणेशोत्सवाने एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला चांगलाच हात दिला आहे. मुंबई ते कोकण, कोल्हापूर ते कोकण व जिल्ह्यातंर्गत सोडण्यात आलेल्या ४०० एसटी बसेसमुळे सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

घटस्थापनेची तयारी...

$
0
0
देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने नवरात्रकाळात दररोज मंदिरातील कारंजा चौक येथे दिवसभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी मंदिरात खास चौरंगावर देवीचा घट बसवण्यात येणार असून नऊ दिवस रोज फुलांसह विड्याच्या पानांची माळ बांधली जाणार आहे.

अखेर शेट्टी पोहोचले मुंबईत

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी गेल्या आठवडाभरापासून मुंबईत होते. भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत चर्चा संपत नसल्यामुळे शेवटी कंटाळून ते मंगळवारी सकाळी कोल्हापूरला आले.

इचलकरंजीत दोन गटांत धुमश्चक्री

$
0
0
पूर्ववैमनस्यातून कोल्हापूर नाका परिसरात (इचलकरंजी) दोन गटात धुमश्चक्री झाली. धुमश्चक्रीमध्ये इरफान दस्तगीर मुल्ला (वय २१ रा. विक्रमनगर) जखमी झाला आहे.

मूल्यांकन अहवाल जनतेसमोर मांडा

$
0
0
टोल वसुलीच्या विरोधात कोल्हापूरची जनता गेल्या चारवर्षापासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने रस्ते मूल्यांकन समिती स्थापन केली. समितीने एक महिन्यापूर्वी अहवाल सादर केला आहे.

संध्यादेवी कुपेकरांची उद्वेगाने अखेर माघार

$
0
0
चंदगड विधानसभा मतदारसंघात आज दिवसभरात नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा केली.

सावधान... मी पोलिस आहे

$
0
0
अनोळखी व्यक्तीने प्रवासात बिस्कीटे देऊन सर्व लुटले... भाडेकरू निघाला घरफोड्या... भडकाऊ मजकुरामुळे दंगल घडली या समाजविघातक घटना सतत घडत असतात.

पथदिव्यांची तत्काळ दुरूस्ती करा

$
0
0
आयआरबी कंपनीने रस्ते विकास प्रकल्पातंर्गत साकारलेल्या रस्त्यावरील पथदिव्यांची तातडीने दुरूस्ती करावी, अशा सूचना महापालिकेने कंपनीला केल्या आहेत. बंद पथदिव्यांच्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार रस्ते विकास महामंडळाला आहेत.

‘सात्विक उपासनेचा सात्विक आहार’

$
0
0
लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आता नवरात्रौत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. घराघरात आता नवरात्रोत्सवाची चर्चा अन तयारीला वेग आला आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात उपवासाला फार महत्त्व असते.

भवानी मंडप ‘नो व्हेईकल झोन’

$
0
0
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत भवानी मंडप परिसर हा ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

पार्किंगसाठी १२ ठिकाणे निश्चित

$
0
0
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची खासगी आराम बस, मिनी बसेस तसेच अन्य अवजड वाहने मध्यवस्तीतील रस्त्यांवर येऊ न देण्याचे नियोजन केले आहे.

संशोधनातून गुणवत्तेचा मानदंड

$
0
0
‘कमवा आणि शिका’ योजनेपासून ते विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शिवाजी विद्यापीठाने अनेक सामाजिक, शैक्षणिक, संशोधनाला चालना देणारे उपक्रम राबविले आहेत. या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तेचा मानदंड देशभरात पोहोचला.

मते मिळविण्याचा प्रयत्न

$
0
0
कार ते कारपेट असा प्रवास करणाऱ्यांना वाड्यावस्तींवरील जनतेच्या अडचणी काय समजणार? निवडणुकीच्या तोंडावर थापा मारुन मते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला.

राजीव आवळे ठरले जायंट किलर

$
0
0
२००४ ची विधानसभा निवडणूक जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरली. जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना या निवडणुकीने घरचा रस्ता दाखवला आणि जिल्ह्याच्या राजकारणात नवीन नेतृत्वाचा उदय झाला.

भाजप, शिवसेनेत आयाराम-गयाराम

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी बेडूकउड्या हा परवलीचा शब्द बनला आहे. कोल्हापूरात तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नेहमीचे चित्र आहे.

आता बचत गटही लागले कामाला

$
0
0
निवडणुकीत हमखास यश मिळवायचे असेल तर महिलांचे मतपरिवर्तन करणे गरजेचे असते. एक महिला संपूर्ण घराचे मतदान फिरवू शकते ही जाणीव असल्यानेच की काय, ‘ताई, माई आक्का...’ अशी घोषणा देत महिलांना आवाहन केले जायचे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images