Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘ऑन ड्युटी’ यंत्रणा लागली कामाला

$
0
0
निवडणुकीचा प्रचार यापूर्वी सबंधित पक्ष कार्यकर्ते आणि उमेदवाराचे स्वत:चे समर्थक निस्वार्थपणे करत असत. आता मात्र नेते जसे बदलले तशी कार्यकर्त्यांची प्रवृत्तीसुध्दा व्यावहारिक झाली.

पुन्हा सीरिअल किलर?

$
0
0
कोल्हापूरकरांचा थरकाप उडवणाऱ्या सीरिअल किलिंगच्या घटना पुन्हा घडू लागल्याचा प्रकार मंगळवारीही दिसला. बागल चौक परिसरात एका फिरस्त्या महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

पोपट जगला ! ‘पोपट’ झाला !

$
0
0
शिवसेना-भाजप युतीचा मेलेला पोपट पुन्हा जिवंत होत असताना महायुतीमधील अन्य घटकपक्षांच्या नेत्यांचा मात्र ‘पोपट’ झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. गेले पंधरा दिवस महायुतीचे शिल्पकार असल्याच्या थाटात वावरणारे घटकपक्षांचे नेते कथित नव्या फॉर्म्यूल्यामुळे मंगळवारी सायंकाळी रडकुंडीला आल्यासारखे दिसत होते.

सोलापूरमधून आडाम मास्तरांचा अर्ज

$
0
0
सुतगिरणी आणि विडी कामगारांसाठी जीवनभर संघर्ष करणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला.

राजकारणातील नवे नेते

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील आघाडी व युतीच्या लढतीमध्ये अनेक दिग्गजांची कसोटी लागणार असताना जिल्ह्यातील निम्म्या मतदार संघात नव्या दमाच्या इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. अनेकांना पराजयाला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती असतानाही विधानसभेसाठी पहिली सलामी द्यायचीच असा निर्धार केला आहे.

भाजपाचा उसन्यांभोवती पिंगा

$
0
0
प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची चढाओढ सुरू आहे. ही जागा भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी सध्या पक्षाबाहेरच्या उमेदवारांची फिल्डींग लागली आहे. मात्र, त्यामुळे गेली अनेक वर्षे पक्षाचे काम केलेले सच्चे कार्यकर्ते मागे पडत आहेत.

घटकपक्षांचे उपद्रवमूल्य महत्त्वाचे

$
0
0
महायुतीतून स्वाभिमानी, रासप व शिवसंग्राम हे घटकपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न ​शिवसेना व भाजपाचे नेते करत आहेत. मात्र याला यश न आल्यास त्याचा फटका आता शिवसेना व भाजपाला काही मतदार संघात बसणार आहे.

पी. एन. पाटील यांची कांडगाव, जैताळमध्ये सभा

$
0
0
काँग्रेसने सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना सुरु करुन त्यांच्या दारापर्यंत पोहचवल्या. विद्यमान आमदार मात्र राजकीय स्वार्थासाठी त्याचे भांडवल करुन जनतेची फसवणूक करत आहेत, अशी टीका पी. एन. पाटील यांनी केली. कांडगाव, देवाळे, जैताळ, नंदवाळ, हळदी, शेळकेवाडी या गावांच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.

चंदगडमध्ये संध्यादेवी

$
0
0
स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी विकासकामांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा एक प्रबळ गट तयार केला होता. त्यांच्यामागे संध्यादेवी कुपेकर यांनी तो वारसा चालविला आहे. या निवडणुकीत श्रीमती कुपेकर यांना तिकीट मिळणार नसेल, किंवा त्यांना माघार घ्यायला भाग पाडले जात असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची ठिणगी पडेल असा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देण्यात आला.

राधानगरीत तिरंगी लढत ?

$
0
0
राधानगरी विधानसभा मतदारसंघात आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या १२ व सर्वपक्षीय एक सभा झाली. तरीही अजून ठोस निर्णय झालेला नाही.

संजय घाटगेंची डिपॉझिट जप्त करू!

$
0
0
ज्या दलित समाजाने मला आमदार आणि नामदार केले,तो समाज माझी कवच कुंडले असल्यामुळे आता कुठली मोदी लाट, आता तर फक्त मुश्रीफ लाट आहे.या लाटेत संजय घाटगेंचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते कागल येथे दलित मेळाव्यात बोलत होते. येथील गैबी चौकात दलित बांधवांची मोठी उपस्थिती होती.

पाच निरीक्षकांची नेमणूक

$
0
0
दहा विधानसभा निवडणूक मतदारसंघांसाठी २७ सप्टेंबरपासून आय. ए. एस. दर्जाच्या पाच सर्वसाधारण निरीक्षकांची (जनरल ऑब्झर्व्हर) नेमणूक केली आहे.

निवडणुकीसाठी हेल्पलाइन

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत केंद्र व तक्रार निवारण समिती कक्षाची स्थापना करण्यात आली. कक्षाचा टोल फ्री क्रमांक १९५० असणार आहे.

ट्रॅफिक फ्राय डे

$
0
0
नवरात्र उत्सव व विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून होणाऱ्या शक्तिप्रदर्शनामुळे शुक्रवारी शहरात ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाने उमेदवारी अर्ज भरण्याऱ्या मिरवणुका आमने सामने येऊ नयेत यादृष्टीने मिरवणुकीचे मार्ग काढण्याचे नियोजन सुरू केले आहे.

टोलविरोधी आंदोलन सुरूच

$
0
0
टोलविरोधी कृती समितीचे आंदोलन हे कोल्हापूरच्या जनतेचे व्यासपीठ असून ते जनआंदोलन बनले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतही आंदोलनात खंडू पडणार नाही, पूर्वीच्याच नेटाने आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात करण्यात आला.

महिलेचा मृत्यू

$
0
0
बागल चौक परिसरात अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या आशा रघुनाथ माने (वय ६०) या महिलेचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी मृत्यू झाला. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना सिरियल किलिंगची आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नो पार्किंग झोन

$
0
0
भवानी मंडप परिसरातील पूर्वेकडील भिंत उतरवण्याचे काम पूर्ण झाल्याने राजाराम हायस्कूलच्या मैदानावर पार्किंग व्यवस्था होणार असल्याने भवानी मंडप परिसर नो पार्किंग झोन होणार आहे. दरम्यान, शिवाजी चौक ते वसंत मेडिकल्स या रस्त्यावर बॅरिकेटस् उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

दांडियाची धूम

$
0
0
मुक्तामंच आणि जैन जागृती केंद्राच्यावतीने आयोजित रास दांडिया गरबा आणि प्रदर्शनाचे उदघाटन गुरूवारी (ता.२५) संध्याकाळी चार वाजता भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आणि महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रदर्शन २५ सप्टेंबर सकाळी ९ वाजल्यापासूनच कोरगांवकर लॉन येथे सुरू होणार आहे.

पुन्हा चढेल डॉल्बीचा आवाज?

$
0
0
काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनीप्रदूषणाची मर्यादेपेक्षा जास्त असलेली पातळी कोल्हापुरात या गणेशोत्सवात आणखीनच वाढली आहे. गेल्या तीन वर्षात डॉल्बीमुक्त व पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे कमी असलेली ध्वनीची तीव्रता या वर्षी पुन्हा चढली आहे.

अर्जासाठी उद्याचा मुहूर्त

$
0
0
विधानसभा उमेदवारीसाठी बुधवारी विविध मतदारसंघातून चारजणांनी एकूण पाच अर्ज दाखल केले. मातब्बर उमेदवार शुक्रवारी (ता.२६) मिरवणुकीव्दारे शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरणार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images