Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील संस्थांना ‘सिद्धिविनायक’चे पाठबळ

$
0
0
सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई या संस्थेतर्फे समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक मदत, रुग्णांसाठी आरोग्य सेवा पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यातील शैक्षणिक संस्थांना देखील आर्थिक मदत केली जाणार आहे.

सुपारी देऊन हल्ला केल्याची शक्यता

$
0
0
आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात कळंबा कारागृहाचे तुरूंग अधिकारी उत्तरेश्वर निवृत्ती गायकवाड (वय ४३, रा. मूळ गाव उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, सध्या रा. कळंबा कारागृह, नवीन बिल्डिंग, क्वॉर्टर नं.१) यांच्यावर तिघांनी स्टंपने हल्ला करून जखमी केले.

दर्शनातून आईच्या भेटीची प्रचिती

$
0
0
जन्मदात्या आईला कधीच न पाहिलेल्या देशमुखे यांना महालक्ष्मीच्या दर्शनामध्ये आई जाणवत असल्याचे ते सांगतात. दीड वर्षाचे असताना साथीच्या रोगामुळे अंध झालेले चंद्रकांत देशमुखे गेल्या ५० वर्षांपासून दरवर्षी सांगली जिल्ह्यातील कडेगावाहून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात.

महेश जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी

$
0
0
मागील वीस वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आंदोलने करणारे महेश जाधव यांना शहर दक्षिणमधून भाजपने उमेदवारी दिली पाहिजे. फक्त उमेदवारीसाठी पक्षात येणाऱ्यांना मतदार स्वीकारणार नाहीत.

एमडीआर टीबीचे १९ रुग्ण

$
0
0
हवेतून पसरणारा साधारण क्षयरोग (टीबी) कोल्हापुरातही दुसऱ्या टप्प्यात पोहचला आहे. कोणत्याही औषधांना न जुमानणाऱ्या एमडीआर टीबीचे (मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स) शहरात १९ रुग्ण आढळून आले आहेत.

मतदार नोंदणीसाठी वेळ कमी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु आहे. नाव नोंदणी करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने मतदारांनी आपले नाव तत्काळ मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले.

नेत्यांच्या चुकांचा शहराला फटका

$
0
0
शहर विकासाच्या व्हिजनचा अभाव आणि मंत्रीमंडळातील राजकीय वजन कमी पडत असल्यामुळे कोल्हापूरवरील अन्यायाची मालिका सुरूच राहिली आहे. महापालिका वर्गवारीच्या प्रस्तावित निकषांच्या जवळपास पोहचणाऱ्या नाशिक आणि नांदेड शहरला विशेष दर्जा मिळाला.

राष्ट्रवादी प्रचारावेळी आंदोलन

$
0
0
कोल्हापूर टोलमुक्त करण्याचा आदेश काढला नाही तर मंगळवारी (१६ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रारंभासाठी येणाऱ्या शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी गाडी अडवण्यापासून तीव्र आंदोलन करावे, अशा सूचना टोल विरोधी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.

पायाभूत सुविधांसाठी कर्जावर कर्ज

$
0
0
उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्यामुळे कोल्हापूर महापालिकेला पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी कर्जानंतर कर्ज काढायची वेळ आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतंर्गत शहरात विविध प्रकल्प सुरू असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेला स्वतःचा निधी गुंतवावा लागत आहे.

विनय कोरेंना घेरण्याची रणनीती

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांनी अपेक्षेप्रमाणे घवघवीत यश मिळवून तब्बल एक लाख ७७ हजार मतांन विजयी झाले. या मतांमध्ये शाहुवाडी विधानसभा मतदाराचा वाटा मोठा होता.

शिरोळमध्ये काँग्रेस फुटीच्या उबंरठ्यावर

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबरच महायुतीने अद्याप आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. मात्र शिरोळ तालुक्यात काँग्रेससमोर बंडखोरीचे आव्हान आहे. राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केला आहे.

के.पीं.ना आबिटकरांचे आव्हान

$
0
0
भुदरगड,राधानगरी- आजरा विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी आमदार के. पी. पाटील यांची उमेदवारी निश्चित असली तरी यावेळी त्यांना कडवी झुंज द्यावी लागेल. तरूण नेते प्रकाश आबिटकर यांनी गेल्या काही वर्षांपासून जोर बैठका काढण्यास सुरु केल्याने त्यांचे तगडे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.

इचलकरंजीत काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी

$
0
0
महाराष्ट्राचे मॅचेंस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघात यावेळीही काँग्रेस आघाडी व महायुती यांच्यातच लढत रंगणार आहे. पाच वर्षापूर्वी निसटलेला मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून माजी आमदार प्रकाश आवाडे सज्ज झाले आहेत.

कागलमध्ये मुश्रीफ टार्गेट

$
0
0
राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांचा पाडाव करण्यासाठी संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकवटले आहेत

चंदगडमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

$
0
0
विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता शुक्रवारी जाहीर झाल्याने सर्वच इच्छुक मंडळींनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला प्रांरभ केला आहे. चंदगड मतदारसंघात सर्व पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने पक्षाच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे.

करवीरमध्ये तिरंगी लढत

$
0
0
विद्यमान आमदार चंद्रदीप नरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शेकाप व जनसुराज्यचे युतीचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांची करवीर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाल्यास चौरंगी सामना होईल अन्यथा तिरंगी लढत होईल.

हातकणंगलेत शिवसेनेपुढे आव्हान

$
0
0
हातकणंगले विधानसभा मतदार संघात सध्यातरी तिरंगी लढतीचे चिन्ह आहे. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे विद्यमान आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे आणि जनसुराज्यशक्ती पक्षाचे माजी आमदार राजू किसन आवळे यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे.

सेनेविरुद्ध तगड्या उमेदवाराचा शोध

$
0
0
शिवसेनेचा जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस आघाडी अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत. पण सेनेच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीपैकी कोण याबरोबरच त्यांचा उमेदवार कोण हेच अजून निश्चित झालेले नाहीत.

गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?

$
0
0
परवापर्यंत गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे शहर दक्षिणमधून विधानसभा निवडणूक एकहाती जिंकून हॅटट्रीक करतील असे चित्र होते. मात्र आता दक्षिणच्या राजकारणाने अनपेक्षीत वळण घ्यायला सुरवात केली आहे.

पांजरपोळ दवाखाना ढासळण्याच्या मार्गावर

$
0
0
भटक्या जनावरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या पांजरपोळ संस्थेचा बागल चौक परिसरातील विजयमाला महाराणी जनावरांचा मोफत दवाखाना बंद पडला आहेच. पण त्याचबरोबर त्याची जुनी देखणी इमारतही ढासळण्याच्या मार्गावर आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images