Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चित्रनगरीच्या १७ कोटींच्या कामांना मंजुरी

$
0
0
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने अध्यादेश काढून चित्रनगरीच्या १७ कोटी ४ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे.

दुर्मिळ अटॅकस अॅटलासची जोडी

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना रेशीम निर्माण करणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अशा ‘अटॅकस अॅटलास’ प्रजातीच्या पतंगांची जोडी तिलारीच्या जंगलात आणि पश्चिम घाटात प्रथमच सापडली. दुर्मिळ अशा या प्रजातीचा नर, मादी, कोष आणि अंडी एकाच ठिकाणी मिळून आले.

कारवाईचा ‘फॅन्सी’ फार्स

$
0
0
चेन स्नॅचिंग व वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फॅन्सी नंबरप्लेटवरील कारवाईची घोषणा केली. गेल्या महिन्यात केवळ एकच दिवस कारवाईचा दिखावा करण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत काहीच कारवाई होताना दिसत नाही.

‘केएमटी’साठी सात कोटी

$
0
0
केंद्र सरकारकडून महापालिका परिवहन विभागाला नवीन बसेस खरदेसाठी उपलब्ध ४४ कोटीतून नवीन डेपो उभारणी, व्हेईकल ट्रॅकिंग प्रणालीव अन्य पायाभूत सुविधासाठी सात कोटी रूपयांस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

मुश्रीफ यांच्या घरात ७६ मतदार

$
0
0
कागल विधानसभा मतदारसंघ निवडणुक यादीत निपाणी, संकेश्वर, मिरज आदी परिसरातील हजारो नावे घुसडण्यात आली आहेत. स्वत: जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एका घराच्या पत्त्यावर ७६ नावांची नोंद आहे. यामध्ये २० कुटुंबांचे आडनाव वेगळे आहे.

सहा लढती दुरंगी, चार तिरंगी

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी पाच मतदारसंघातील लढत कशी होणार? हे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अन्य शिरोळ, कोल्हापूर उत्तर व दक्षिण या तीन मतदारसंघात लढत कोणाकोणात होणार याची उत्सुकता कायम आहे. चंदगड आणि शिरोळ या दोन्ही मतदारसंघांबाबत अनिश्चिततेची स्थिती आहे.

'बाबा' अकार्यक्षमः नितीन गडकरी

$
0
0
‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) अकार्यक्षम आहेत, तर गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) वाचाळ नेते आहेत. मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार १५ वर्षे झालेली आणि कुचकामी ठरलेली आघाडी सरकारची गाडी आता भंगारात काढा,’ असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्वीप प्रकल्प ठरला देशात

$
0
0
लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत प्रभावी सहभाग नोंदवल्याबद्दल जिल्हा निवडणूक विभागाच्या सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवार्ड फॉर एक्सलन्स २०१४ स्पर्धेमध्ये ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ हा बहुमान प्राप्त झाला आहे.

करवीर पंचायत समिती सभापतीपदी कोण?

$
0
0
करवीर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असले तरी सभापतीपद कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

चंदगडमध्ये १५११ कुपोषित बालके

$
0
0
चंदगड तालुक्यातील अंगणवाडीमध्ये आरोग्य विभागाने बालकांची आरोग्य तपासणी केली आहे. तपासणीमध्ये तालुक्यातील १५११ बालके कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या सभेत ही आकडेवारी समोर आल्याने चंदगडमधील बालकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनसे दहा; जनसुराज्य चार जागा लढविणार

$
0
0
लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. कोल्हापुरात मनसे फारसा प्रभावी नसला तरी यंदा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही जागा लढविणार असल्याचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी सांगितले.

पोर्टेबल साखर कारखानाही शक्य

$
0
0
साखर कारखाना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसाचे गाळप करेल. त्यातून निर्माण होणारी साखर आणि अन्य उपउत्पादने शेतकऱ्यांनाच मिळतील आणि त्यांची विक्री शेतकरीही त्याच्या सोयीने करतील. ही अशक्य वाटणारी ही कल्पना प्रत्यक्षात आणता येईल, अशी संकल्पना कोल्हापुरातील एका इंजिनीअरने मांडली आहे.

कंत्राटदारांचे धाबे दणाणले

$
0
0
निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. अशा कंत्राटदारांचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करण्याबरोबरच दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.

दुर्गामूर्ती तयारीला वेग

$
0
0
शारदीय नवरात्रौत्सवासाठी दुर्गामूर्ती तयारीला कुंभारवाड्यात वेग आला असून सध्या मूर्तींचे पॉलिशकाम सुरू झाले आहे. गेल्यावर्षी शहरात लहानमोठ्या ३२६ सार्वजनिक मंडळांनी दुर्गा प्रतिष्ठापना केली होती.

एकाच जागेचे आरक्षण दोनवेळा वगळले

$
0
0
टेंबलाईवाडी परिसरातल सर्व्हे नंबर २३ व २४/२ येथील टिंबर मार्केटचे आरक्षण बदलून रहिवाशी विभागात समाविष्ठ करण्याचा विषय महापालिका सभेत दोन वेळेला मंजूर झाला. यापूर्वी २००७ मध्ये माजी नगरसेविका नूतन रविंद्र मुतगी यांनी ऑफीस प्रस्तावाला उपसूचना दिली होती.

गडकरींना भेटण्यासाठी विमानतळावर गर्दी

$
0
0
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी विमानतळावर अनेकांनी गर्दी केली. कोणाशीही चर्चा न करता विमानतळावरून बाहेर पडून त्यांनी सरळ महालक्ष्मी मंदिर आणि त्यानंतर सांगली गाठली.

मोटार अपघातात आजऱ्याजवळ ३ ठार

$
0
0
आजऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर हाळोलीजवळ लक्ष्मी ओढ्याच्या वळणावर गोव्याकडे निघालेल्या मोटारीवरील ताबा सुटल्यामुळे ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले. ही घटना सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.

अखेर शुभमने घेतला जगाचा निरोप

$
0
0
राजाराम तलावात पोहण्यासाठी गेलेला शुभम गटांगळ्या खाऊ लागला, कोणीतरी पोलिसांना फोन केला. पोलिसही आठ-दहा मिनिटांत आले. गटांगळ्या खाऊन बुडत असलेल्या शुभमला जिगरबाज पोलिसांनी क्षणाचा विलंबही न लावता तलावातून बाहेर काढले.

टोलचा प्रश्न अधांतरीच!

$
0
0
रस्ते विकास प्रकल्पातंर्गत शहरात तयार झालेले रस्ते आणि टोल वसुलीच्या विरोधात गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आचारसंहिता लागू होण्या अगोदर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

निवडणुकीसाठी प्रशासन गतिमान

$
0
0
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असल्याने आता प्रशासन गतीमान झाले आहे. मतदार नोंदणीपासून मतदान यंत्र तपासणी, निवडणूक स्टाफ प्रशिक्षण आदींची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images