Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चौंडेश्वरी बँकेत आर्थिक निर्बंधप्रश्नी ठेवीदारांची गर्दी

$
0
0
रिझर्व्ह बँकेने येथील चौंडेश्वरी सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध घातल्यामुळे सोमवारी दिवसभर ठेवीदार व खातेदारांनी बँकेत येऊन बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले.

५५ गावांत ‘एक गाव एक गणपती’

$
0
0
आजरा तालुक्यातील ५५ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस या सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी व्यक्त केला आहे.

‘अल्पसंख्याक दर्जासाठी लढा कायम ठेवणार

$
0
0
लिंगायत समाजातील ३८ पैकी १४ पोटजातींना आरक्षणास मान्यता मिळाली असून २४ पोटजातींची मागणी प्रलंबित आहे. २४ पैकी १२ पोटजातींची शिफारस करण्यात आली आहे.

‘कोल्हापूर उत्तर’साठी राष्ट्रवादीचा दबावगट

$
0
0
माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा बळकट केला जात आहे.

कांदा सौदे सहा तास बंद पाडले

$
0
0
कांद्याला वाजवी किंमतीपेक्षा कमी दर मिळाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजरा समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना अपशब्द वापरल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

गणेश मंडळ कार्यकर्त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

$
0
0
गणेश मंडपातील एलइडी टीव्ही दुरूस्त करत असताना शॉक लागून कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. निखिल शिवाजी पाटील (वय २४) असे त्याचे नाव आहे. साने गुरूजी परिसरातील अर्जुन गणेश मित्र मंडळाचा कार्यकर्ता होता.

कोयनेने गाठली ’मॅजिक फिगर’

$
0
0
येथील कोयनानगर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी सध्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याने ९७ टीएमसी ही मॅजिक फिगर ओलांडली आहे.

गुन्हा ठरतोय करिअरला ब्रेक

$
0
0
शारीरिक चाचणी व लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पोलिसाची नोकरी मिळाल्याच्या आनंदावर चारित्र्य पडताळीच्या दाखल्यामुळे विरजन पडू शकते. पोलिस भरतीत उत्तीर्ण झालेल्या तीन उमेदवारांवर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद असल्याने त्यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तिसऱ्या आघाडीतही बिघाडी?

$
0
0
जागावाटपावरून महायुती आणि काँग्रेस आघाडीत सुरू झालेल्या बिघाडीबरोबरच आता तिसऱ्या आघाडीत मनसेला घेण्यावरून बिघाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मनसेला आघाडीत सहभागी होण्याचे आवतण दिले आहे.

कोल्हापूर पालिका ‘ड’ वर्गातच

$
0
0
राजकीय स्वार्थापोटी नेतेमंडळींनी हद्दवाढीला खो घातल्यामुळे कोल्हापूर महापालिकेला मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने २०११ ची लोकसंख्या विचारात घेत राज्यातील २६ महापालिकांची सुधारित वर्गवारी जाहीर केली आहे.

रंकाळ्याला डायमंड नेकलेस

$
0
0
रंकाळा तलावाचे सौंदर्य खुलविण्यासाठी महापालिकेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईच्या मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर चौपाटीवर एलइडी दिवे बसविण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे.

कुमार महाराष्ट्र केसरी वैभव रासकरवर प्राणघातक हल्ला

$
0
0
खुल्या गटात कुस्ती खेळायची नाही, अशी दमदाटी करीत कुमार महाराष्ट्र केसरी वैभव कृष्णा रासकर (१७, रा. कडेगाव जि. सांगली) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर उघडकीस आली.

भुदरगडमध्ये सहकाराला घरघर

$
0
0
सन १९९० ते २००० या दशकात भुदरगड तालुक्याची जिल्ह्यात सहकार पंढरी अशी ओळख होती. तालुक्यातील गल्ली - गल्लीत पतसंस्था, सेवासंस्था, ग्राहकसंस्था, पाणीपुरवठा संस्था, खरेदी विक्री संस्थांचे जाळे होते.

इचलकरंजीत पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर

$
0
0
दोन दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे यंदा पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे.

ऑनलाइन अपॉइन्टमेंट मिळेना

$
0
0
वाहनांच्या शिकाऊ लायसन्सची यंत्रणा ऑनलाइन केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही आरटीओ कार्यालयात थंडा प्रतिसाद होता. ही यंत्रणा ऑनलाइन केल्याचे माहितीच नसल्याने नेहमीप्रमाणे कागदपत्रे घेऊन थेट कार्यालयात येणाऱ्यांची संख्या जास्त होती.

शिक्षकांनो, दर्जा सुधारा

$
0
0
‘केंद्र व राज्य सरकार विविध उपक्रमांतून ३३ हजार कोटी रुपये प्राथमिक शिक्षणावर खर्च करते. अलीकडे जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. शिक्षक अतिरीक्त ठरत आहेत. शिक्षकांसमोर आता शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे आव्हान आहे.

१२० कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीला ब्रेक

$
0
0
आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्याने महापालिकाचा गाडा हाकण्यासाठी प्रशासनाने खंभीर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण ने केल्याबद्दल घरफाळा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

मूर्तिदानासाठी २१ ठिकाणी काहिलींची सोय

$
0
0
शहरवासियांकडून मूर्ती दान उपक्रमाच्या वाढत्या प्रतिसादामुळे महापालिका यंत्रणा तसेच सामाजिक संस्थांनी विविध ठिकाणी काहिलींची तसेच निर्माल्य कुंडांची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्यावतीने सध्या २१ ठिकाणी काहिली ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

डॉल्बीविरोधात होणार कडक कारवाई

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळाविरोधात तक्रार देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तक्रारदाराच्या भूमिकेत असणार आहे.

सांगलीत दिमाखदार विसर्जन सोहळा

$
0
0
सांगली गणपती पंचायतच्या ऐतिहासिक गणपती विसजर्नाचा शाही आणि दिमाखदार सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराजवळ अलोट गर्दी लोटली होती.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images