Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चलो; जुना बुधवार पेठ...!

$
0
0
जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने सन १९७६ मध्ये कागदाच्या लगद्यापासून २१ फुटी भव्य गणेशमूर्ती साकारली. पर्यावरणाची चळवळ ज्यावेळी अस्तित्वात यायची होती, त्यावेळी कागदाच्या लगद्यापासून मूर्ती साकरता येतात याचा आदर्श जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने घालून दिला होता.

फळबाजार तेजीत

$
0
0
सार्वजनिक मंडळांच्या आरतीनंतर देण्यात येणारा प्रसाद, ऋषीपंचमी व सुहासिनींसाठी वाण म्हणून फळे देण्याची प्रथा यामुळे श्रावण महिन्यापेक्षाही गणेशोत्सवामध्ये फळांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.

दुसऱ्या दिवशीही मिरवणुका सुरूच

$
0
0
ढोल-ताशांच्या गजरात आणि एलइडी इफेक्टच्या झगमगाटात शनिवारीही सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींचे आगमन सुरुच होते. राजारामपुरीसह शाहूपुरी व मंगळवार पेठेतील काही मूर्ती मिरवणुकांनी मंडपात आणण्यात आल्या.

विमानसेवेसाठी ‘एनओसी’

$
0
0
कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र मिळाले आहे. या एनओसीमुळे विमानसेवा सुरू होणार हे निश्चित झाले आहे.

ती तान्हुली सांगलीत सापडली

$
0
0
मुंबईतून नऊ महिन्यांच्या मुलीला पळवून आणणाऱ्या महिलेला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी सांगलीत मुलीसह अटक केली. मुंबई येथील व्ही. पी. रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुलीला पळवणारी भाग्यश्री संतोष पाटील (३५, रा. विजापूर) ही महिला सांगलीतील गोकुळनगर परिसरातील वेश्यावस्तीच्या आश्रयाला होती.

‘राधानगरी’चे दरवाजे तिसऱ्यांदा खुले

$
0
0
मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी रात्री राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले झाल्यानंतर पूर्ण संचयन क्षमतेने भरलेल्या काळम्मावाडी धरणाचे पाच दरवाजे रविवारी सायंकाळी २५ सेंटीमीटरने खुले करण्यात आले.

अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची मुदत २१ सप्टेंबरला संपत असल्यामुळे त्यापूर्वी अध्यक्षपदाची निवड होणे अपेक्षित आहे. उमेश आपटे यांची निवड करताना राजकीय फायदा पाहून निवड करण्यात आली आणि आतासुद्धा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवूनच कोणत्या भागातून विधानसभेला मदत होईल यावरच अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरणार आहे.

विसर्जन मार्गावर १८ सीसीटीव्ही

$
0
0
जिल्हा पोलिस प्रशासनाच्या विनंतीनुसार महापालिकेने विसर्जन मिरवणूक मार्गावर नजर ठेवण्यासाठी १८ सीसीटीव्ही उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिस मित्र समिती स्थापन केली जाणार आहे.

माणसे वाचणारेच पुस्तके लिहू शकतात

$
0
0
‘शब्दाची जाण, अलंकारिक भाषा आणि खुमखुमी असणारी व्यक्ती पुस्तक लिहू शकत नाहीत. माणसे व समाज ज्यांना वाचता येतात ते पुस्तक लिहू शकतात’, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी केले. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या ‘देशाबाहेर’ पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.

भाषणाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर

$
0
0
शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे. पंतप्रधानांचे हे थेट भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्थेची जबाबदारी मुख्याध्यापकाची असणार आहे.

फुलांच्या दरात प्रचंड वाढ

$
0
0
घरगुती गणपतीसाठी करण्यात येणारी आरास, सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीला अर्पण करण्यात येणारे छोटो मोठे हार यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून धुवाधार पडणाऱ्या पावसामुळे फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

दागिन्यांचा अनोखा थाट

$
0
0
शुक्रवारी बाप्पाचे घरोघरी मंगलमय वातावरणात आगमन झाले. सध्या बाप्पाच्या मूर्तीला सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजविण्याची हौस भक्तांमध्ये वाढली आहे. त्यामुळे यंदाही बाप्पाच्या मूर्तीला सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा थाट वाढला आहे.

गौरी आगमनाची जय्यत तयारी

$
0
0
मंगळवारी घराघरात येणाऱ्या गंगागौरीच्या स्वागताच्या तयारीला वेग आला आहे. पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसरात रविवारी गौरीचे मुखवटे व स्टँड खरेदी करण्यासाठी गर्दी झाली.

शिक्षक बँक सभेत गुद्दागुद्दी

$
0
0
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी शिक्षक सभासदांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. संचालकांनीही एकमेकांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले.

राजकारणाच्या चरकात हद्दवाढ

$
0
0
शहर विकासासाठी हद्दवाढीची नितांत गरज असतानाही केवळ निवडणुकीच्या स्वार्थापोटी स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीला स्थगिती देत आपलेही पाय मातीचेच असल्याचे दाखवून दिले आहे.

पंधरा ठिकाणी विसर्जन कुंड

$
0
0
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. या वर्षी विसर्जन कुंडांची संख्या वाढविण्याबरोबरच आकारही वाढविण्याचा विचार सुरू आहे. शहरात एकूण पंधरा ठिकाणी विसर्जन कुंड असतील.

काळम्मावाडीतून विसर्ग सुरू

$
0
0
धरणक्षेत्रात दोन दिवसांपासून धुवाँधार सुरू आहे. त्यामुळे दूधगंगा धरण या पावसाळ्यात प्रथमच पूर्णक्षमतेने भरले असून रविवारी सायंकाळी मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. राधानगरी धरण पूर्णक्षमतेने भरल्याने दिवसभर स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

चांदोली धरण भरले

$
0
0
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण रविवारी रात्री शंभर टक्के भरले आहे. सोमवारी धरणाच्या चार दरवाज्यातून ९३०० क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून १५९७ असे एकूण १०८९७ क्युसेक पाणी वारणा नदीत सोडण्यात आले.

वीजनिर्मिती प्रकल्प जागेवरच

$
0
0
शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प साकारण्याचे ठरले. पुण्यातील कंपनीने महापालिकेकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. मात्र प्रकल्पासाठी आवश्यक चार एकर जागा कंपनीला उपलब्ध करून देता आले नाही.

तोंडी तक्रारीमुळे तपासाला मर्यादा

$
0
0
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियाचा अफवा पसरवण्याचे प्रभावी माध्यम म्हणूनच जास्त वापर होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images