Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रस्त्यांचे भाग्य उजळणार

$
0
0
खराब रस्त्यांनी त्रस्त बनलेल्या नागरिकांना आणखी दोन अडीच महिने चांगल्या रस्त्याची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अतंर्गत उपलब्ध निधीतून महापालिका शहरातंर्गत रस्त्यांची दुरूस्ती, डांबरीकरण करणार आहे.

उद‍्ध्वस्त घराला मिळते संरक्षण

$
0
0
गॅस स‌िलिंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली किंवा जीवितहानीसारखी एखादी घटना घडली तर संबंधित कुटुंब झालेल्या नुकसानीमुळे उद्ध्वस्त होते. आपल्या आसपास अशा दुर्घटना अनेकवेळा घडल्याही आहेत.

बॉम्बसदृश वस्तूचा हातगाडीवर स्फोट

$
0
0
शाहू टोल नाक्यानजीकच्या चिकन ६५च्या हातगाडीवर शनिवारी रात्री सातच्या सुमारास गावठी बॉम्बसदृश वस्तूचा स्फोट झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली. या घटनेत दोघेजण भाजून जखमी झाले.

आघाडीच्या कामांची उद‍्घाटने

$
0
0
‘महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केलेल्या विविध विकासकामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी उद‍्घाटने करत सुटले आहेत. आम्ही केलेल्या कामांच्या उद‍्घाटनासाठी मोंदींना पाच वर्षे पुरणार नाही. हाच मुद्दा घेऊन आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तरुणाच्या मृत्यूने उद्रेक

$
0
0
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सनी प्रकाश पोवार (वय २६, सिद्धार्थनगर, पेठवडगाव) या तरुणाचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाल्याच्या प्रकारानंतर संतप्त भावना उमटल्या. जमावाने पेठवडगाव पोलिस स्टेशनची मोडतोड करून पोलिसांवर दिसेल तेथे दगडफेक केली.

महाबळेश्वरमध्ये जमीन खचली

$
0
0
यंदा महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील विल्सन पॉइंटच्या पायथ्याला असलेल्या हॉटेल गौतममधील जमीन मोठ्या प्रमाणावर खचली आहे. या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. हॉटेलच्या शेजारील भागातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत.

सांगलीत आभाळ फाटले

$
0
0
सांगली परिसरात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काळोख दाटून आभाळ फाटल्यासारखा धो-धो पाऊस कोसळला. रस्त्यांचे नाले झाले. काही क्षण संपूर्ण शहरच निर्मणुष्य होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले.

काश्मिरींना घेऊन देश जोडा

$
0
0
‘स्वातंत्र्याला ६५ वर्षे झाली पण काश्मिरी लोकांना काय हवं आहे हे अजूनही भारतीय लोकांना समजलेले नाही. ते स्वतःला काश्मिरी समजतात, पण भारतीय समजत नाहीत. त्या लोकांना जोडले तर देश जोडला जाणार आहे,’ असे मत पुण्यातील सरहद संस्थेचे संजय नहार यांनी व्यक्त केली.

साडेपाचशे बालके कुपोषित

$
0
0
भुदरगड तालुक्यात अंगणवाडी शाळांमध्ये शिकणारी साडेपाचशे बालके कुपोषित असल्याची माहिती पंचायत समितीच्या मासिक सभेत उघड झाली. या कुपोषित बालकांच्यासाठी आहार केंद्रे स्थापन करून त्याना साधारण श्रेणीत आणण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.

गणेशोत्सवासाठी जादा बसेस

$
0
0
गणेशोत्सवासाठी कोल्हापूर विभागातून पुणे, मुंबई, रत्नागिरी, बेळगाव, सांगली, इस्लामपूर, सावंतवाडी, मालवण, कणकवली मार्गावर जादा बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

शिक्षक संघात वादाची घंटा

$
0
0
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांचा राज्याध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर केल्याने संघाचा राजकारणाचा धडा सुरू झाला आहे.

शिक्षक धावले पोलिसांवर

$
0
0
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभेत प्रत्येकाने एकच प्रश्न विचारण्याचे आवाहन अध्यक्षांनी केल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. यावेळी सभासद शिक्षकांना रोखताना साध्या वेशातील पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

टोलमुक्तीपर्यंत संघर्ष कायम

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोल संदर्भात कोल्हापूरची जनता उत्साहित, आनंदी होईल असा कोणताही मेसेज दिला नाही. कोल्हापूर टोलमुक्त होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा ​टोलविरोधी कृती समितीने जनतेला शब्द दिला आहे, तो खाली पडू देणार नाही.

जवानांचा विमा उतरविणार

$
0
0
विविध सामाजिक उपक्रमांतून सार्वजनिक तरुण मंडळांमध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवातही वेगळ्या व आदर्शवत उपक्रमाची परंपरा कायम ठेवली आहे.

इच्छुकांची डिजिटल सलामी

$
0
0
पक्ष कुठला हे अद्याप माहीत ना​ही, राजकीय पक्षाकडून उमेदवारीची निश्चिती नाही, तरीसुध्दा विधानसभा निवडणुकीसाठी ‘मै हूं ना’ म्हणत इच्छुकांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. चौकाचौकात पोस्टर आणि डिजीटल फलकाच्या माध्यमातून आमदारकीसाठी मतदारांना साद घालत आहेत.

टोलविरोधाच्या आडून राजकारण?

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी मंगळवारी टोलविरोधी कृती समितीने पुकारलेला कोल्हापूर बंद राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा आहे.

पेठवडगाव भीतीच्या छायेत

$
0
0
पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यातील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार (वय २६, रा. सिध्दार्थनगर, पेठवडगाव) याच्या मृत्यूनंतर रविवारी दिवसभर पेठवडगाव शहर भीतीच्या छायेखाली राहिले.

‘एटीएस’कडून तपास सुरू

$
0
0
राजर्षी शाहू टोल नाका परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाडीवर शनिवारी रात्री सातच्या सुमारास गावठी बॉम्बसदृश वस्तूच्या स्फोटाची गंभीर दखल घेत एटीएस पथक रविवारी पहाटे कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने दिवसभर कसून तपास केला.

मुस्लिम समाजाच्या हरकती फेटाळल्या

$
0
0
निवडणूक ओळखपत्रावर मुस्लिम महिलांचे बुरखा परिधान करुन काढलेले छायाचित्र वापरल्याबद्दल घेण्यात आलेल्या हरकती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या आहेत. अशा महिलांची नावे वगळण्याच्या हरकती घेतल्या होत्या.

सहायक निरीक्षकासह तिघांवर खुनाचा गुन्हा

$
0
0
पेठ वडगाव पोलिसांच्या ताब्यातील तरुणाच्या मृत्युप्रकरणी सहायक निरीक्षक संजीव पाटील, सहायक फौजदार डी. डी. शिंदे व पोलिस नाईक धनाजी पाटील या तिघांवर सीआयडीने खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, सोमवारी पेठ वडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. जगदीश उर्फ सनी प्रकाश पोवार (वय २६, सिध्दार्थनगर) असे मृताचे नाव आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images