Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घंटागाड्या भंगारात

$
0
0
घंटागाड्यांच्या देखभालीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे या गाड्या भंगारात जाऊ लागल्या आहेत. वॉर्ड ऑफिस, मोकळी मैदाने आणि कोंडाळ्याच्या ठिकाणी मोडलेल्या या गाड्या गंजू लागल्या आहेत. त्यांच्या दुरूस्तीकडे वेळीच लक्ष न दिल्यास कचरा उठावाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिक्षण मंडळाची शाळांवर ‘नजर’

$
0
0
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळामार्फत शहरातील प्राथमिक शाळांच्या स्वच्छतेचा लेखाजोखा मांडणार आहे. खासगी आणि महापालिका शाळेतील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तपासल्या जाणार आहेत.

जप्तीची नामुष्की टळली

$
0
0
बाळासाहेब पांडव मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकारी राजाराम माने यांचे वाहन, फर्निचर व संगणक, आदी साहित्य जप्त करण्यासाठी बुधवारी कोर्टाचे पथक दाखल झाले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी कोर्टाकडे तीन महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने ही जप्तीची नामुष्की टळली.

शिवाजी विद्यापीठात वाद

$
0
0
शिवाजी विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचा विद्यार्थी कोनार्क मदनलाल शर्मा याची निवड झाली. त्याने प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता मुरगुंडी यांच्यावर मात करीत २३ मते मिळविली.

बुवा, महाराजांची ‘दुकाने बंद’

$
0
0
चमत्कार आणि साक्षात्काराचा बागुलबुवा निर्माण करून लोकांची फसवणूक करणाऱ्या बुवा आणि महाराजांची दुकाने आता पूर्णपणे बंद झाली आहेत. डिसेंबर २०१३ ला जादूटोणाविरोधी कायदा संमत झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने काही मंडळींनी पोबारा केला आहे, तर काहींनी आम्ही सगळे असले प्रकार बंद केले आहेत, असे सांगायला सुरुवात केली आहे.

कॅम्पस रंगला गुलालात

$
0
0
सीनिअर कॉलेजच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदाची निवड जल्लोषात करण्यात आली. विविध कॉलेजमधून नूतन सचिवांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. अनेक कॉलेजमध्ये चुरशीने मतदान तर काही कॉलेजमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.

मुलींच्या जन्माचे होतेय स्वागत

$
0
0
एकेकाळी पुरोगामी कोल्हापूरच्या लौकिकाला डाग लावणाऱ्या मुलींचा जननदरात आता चांगलीच वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुलांच्या तुलनेत मुलींचा जननदर ८९२ इतका होता. तो वाढून ९०२ एवढा झाला आहे.

कोल्हापुरात जकात की एलबीटी?

$
0
0
मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीचा निर्णय महापालिकेवर सोपविल्याचे जाहीर केले आहे. सरकारी आदेश आल्यानंतरच एलबीटी की पुन्हा जकात कर लागू करायची याचा निर्णय सर्वसाधारण सभेवर अवलंबून असणार आहे.

२४ तास वीजपुरवठाः मोदी

$
0
0
‘देशभर २४ तास वीज पुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे जाहीर केले. आपल्या दीर्घकालीन विकासाच्या योजनेत रस्ते, वीजवाहिन्यांचे जाळे आणि वीज व पाण्याचे ग्रीड यांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालखी मार्गांचे चौपदरीकरण

$
0
0
आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

ट्रान्स्पोर्ट व्यवसायासाठी परवाना बंधनकारक

$
0
0
ट्रान्स्पोर्ट व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारच्या गुडस कॅरेज अॅक्टनुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परवाना घेणे आवश्यक बनले आहे. यासाठी माल वाहतुकीची किमान दोन वाहने ज्या व्यक्तीच्या नावावर आहेत. त्यालाच परवाना मिळणार आहे.

मग काँग्रेसने बंडखोरी केली तर गैर काय?

$
0
0
‘आघाडी धर्म पाळण्याचा मक्ता काय फक्त काँगेसनेच घेतला आहे का ? राष्ट्रवादीने तो पाळायला नको का ? आघाडीविरोधात बंडखोरी करत के.पी. पाटील निवडून येऊ शकतात मग त्यांच्याविरोधात काँग्रेसने बंडखोरी केली तर गैर काय, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.

‘राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या हा कॉँग्रेसचा प्रश्न’

$
0
0
‘कॉँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आमची आघाडी आहे. मागील निवणडणुकीत आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला होता. जागांच्या वाटपाबाबत हायकमांड निर्णय घेते. त्यामुळे राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या हा आमचा प्रश्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

देहदानातून दाभोलकरांचे स्मरण

$
0
0
अंधश्रध्देच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टी मिळावी आणि तो समाज या कर्मकांडांच्या जखडातून बाहेर पडावा यासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस)च्या कोल्हापुरातील युवा कार्यकर्त्यांनी देहदानाचा संकल्प सोडला आहे.

शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0
आडोली (ता. राधानगरी) येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयास अधिकृत म्हणून घोषित करावे, तसेच शिक्षक-शिक्षकेतरांचा सन २००६ पासूनचा थकीत पगार सुरू करावा, या मागणीसाठी ध्वजवंदनावेळी अन्यायग्रस्त शिक्षकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

करवीरमधून राजेंद्र सूर्यवंशी

$
0
0
जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीतून करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी यांची उमेदवारी निश्चित केल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी दिली.

उद्धव गुरुवारी कोल्हापुरात

$
0
0
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे २१ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.

काटकर महाराज यांचे निधन

$
0
0
रुईकर कॉलनीजवळील प्रज्ञापुरीतील स्वामी समर्थ मंदिराचे मुख्य प्रवर्तक ज्ञानेश्वर हरी काटकर यांचे (वय ८६) शुक्रवारी(ता.१५) रात्री निधन झाले. त्यांनी स्वामी समर्थ यांच्या सेवेचे व्रत जवळपास ६० वर्षे चालवले. ‘काटकर साहेब’ या नावाने ते सर्वत्र परिचित होते.

मराठा भवनसाठी जागेचा शोध

$
0
0
मराठा समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या मराठा स्वराज भवनसाठी जागेचा शोध सुरू झाला आहे. कसबा बावडा आणि एसटी बोर्डाकडील जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, आवश्यक तशी जागा न मिळाल्यामुळे पुन्हा मराठा भवनसाठी जागेचा शोध सुरू आहे.

पुढची महापौर ओबीसी महिला

$
0
0
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदावरील सध्या पाच वर्षे असणारे महिलाराज पुढील वर्षांनंतर येणाऱ्या नव्या सभागृहातही कायम राहणार आहे. मंत्रालयात काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये ऑक्टोबर २०१५नंतर अडीच वर्षांपर्यंतचे महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images