Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बस खरेदी आचारसंहितेत?

$
0
0
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे सध्या सुरू असलेली बस खरेदी प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे खरेदी प्रक्रिया विधानसभेच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियाची प्रचारात आघाडी

$
0
0
विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपली आहे. इच्छुकांनी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीसह प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आघाडी व युतीतील जागावाटपाच्या घोळामुळे बहुतांश इच्छुकांचे तिकीट सोडून द्या पण अद्याप पक्षही ‘फायनल’ झालेले नाहीत.

संकटेच देतात जगण्याचे बळ

$
0
0
‘यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. संकटेच जगण्याला बळ देत असतात. त्यामुळे आयुष्यात येणा-या कठीण प्रसंगांचा सामना करत जीवन जगल्यास निश्चित ध्येय गाठता येते,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

खारफुटीच्या प्रजातींचा डेटाबेस

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री विभागाने खारफुटी वनस्पतींच्या प्रजातींचा डेटाबेस बनवला आहे. या डेटाबेसमुळे खारफुटीच्या शंभर प्रजातींची माहिती एकत्र उपलब्ध झाली आहे.

शेडशाळमध्ये जॅकवेल कोसळले

$
0
0
शिरोळ तालु्क्यातील शेडशाळ, गणेशवाडी व कवठेगुलंद या तीन गावांना नळपाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे शेडशाळ येथील कृष्णा नदीवरील जॅकवेल सोमवारी मध्यरात्री कोसळले.

कोल्हापूर पाटबंधारे विभाग स्वतंत्र

$
0
0
कोल्हापूर पाटबंधारे विभाग हा सांगली पाटबंधारे विभागाकडे जोडण्यात आला होता. हा विभाग आता वेगळा करून कोल्हापूर पाटबंधारे विभाग स्वतंत्र करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटिश नागरिकावर सर्जरी यशस्वी

$
0
0
वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेसमध्ये (विन्स) जॉनी कॉलीवर या ब्रिटिश नागरिकावर सायकोसर्जरी (मानसिक आजारावर उपचारासाठी मेंदूवरील शस्त्रक्रिया) यशस्वी झाली आहे.

२३५ घरांची पावसाने पडझड

$
0
0
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला असून सुमारे ४२ लाख रुपयांचे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील २३५ घरांची पावसामुळे पडझड झाली असून ४ ठिकाणच्या सार्वजनिक मालत्तेचे नुकसान झाले आहे.

‘आवडेल तेथे’ प्रवास महाग

$
0
0
एसटीच्या झालेल्या भाडेवाढीनंतर विविध सेवांच्या नैमित्तिक करार व इतर सेवांचे दरही वाढवण्यात आले आहेत. नैमित्तिक कराराचे दर वेगवेगळया हंगामात वेगवेगळे ठरवण्यात आले आहेत.

दाखल्यांचे काम खोळंबले

$
0
0
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाजावर परिणाम झालेला असताना मंगळवारपासून तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने नागरिकांची पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केल्याने एकूणच महसूल विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.

मंदिराभोवती सांडपाण्याचा सडा

$
0
0
देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येथील महालक्ष्मी चरणी नतमस्तक होण्यास येत असतात. पण मंदिर परिसरातील महाद्वार रोड व जोतिबा रोड या लगतच्या रस्त्यांवर गटार ही यंत्रणाच नसल्याने अनवाणी येणाऱ्या या भाविकांना ड्रेनेज, सांडपाणी तसेच चिखल तुडवतच मंदिरात जावे लागत असल्याचे विदारक चित्र या रस्त्यांवर आहे.

भटजींचे बुकिंग फुल्ल

$
0
0
श्रावण सोमवार अथवा शुभ दिवशी सत्यनारायण पूजा करण्याऐवजी सुटीदिवशी यथासांग पूजा करण्याकडे कल वाढू लागला आहे. वाढत्या सत्यनारायण पूजेमुळे भटजींचे मार्केट चांगलेच वाढले आहे.

मोल अँटिकचे

$
0
0
सध्याच्या ऑटो स्टार्ट आणि मोठ्या सीसी गाड्यांच्या जमान्यात किक उलटी फिरवली की ब्रेक लागणारी ‘लक्ष्मी’, पॅडलमध्येच किक असणारी सुवेका, बिगर शॉक ऑब्झर्व्हरची लुना अशा मोपेडची आठवण झाली की जुने दिवस आपोआपच नजरेसमोर तरळू लागतात.

सीईओंची बदली रद्द करा

$
0
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अनेक योजना व उपक्रम राबवले आहेत. या योजना यशस्वी करण्यासाठी डॉ. सुर्यवंशी यांचीच आवश्यकता आहे.

चेस ऑलिम्पियाड

$
0
0
मागच्या आठवड्यापासून जगातला एक अतिशय मोठा, महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा क्रीडासोहळा, चेस ऑलिम्पियाड सुरू झाला. सारे बुद्धिबळ विश्व या स्पर्धेतील डाव पाहण्यात दंग आहे.

लोकसभा पराभवाची कसर भरुन काढणार

$
0
0
‘प्रा.संजय मंडलिकाच्या लोकसभेतील निसटत्या पराभवाचा बदला घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील शिवशक्ती आणि भिमशक्तीची ताकद महायुतीच्या विजयासाठी सर्वशक्तीनिशी जिवाचे रान करेल,’ असा निर्धार दलित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.

चित्री तुडुंब..!

$
0
0
आजरा, गडहिंग्लजसह कर्नाटक परिसरालाही वरदान ठरलेला आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प अखेर मंगळवारी सकाळी सहा वाजता शंभर टक्के भरला. यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यामधून दोन सेंटीमीटरचा तर विद्युतगृहासाठी १७८ क्युसेक्स विसर्ग सुरू झाला.

जंगमहट्टी मध्यम प्रकल्प भरला

$
0
0
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील मध्यम प्रकल्प दमदार पावसामुळे तुडूंब भरला आहे. हा प्रकल्प तालुक्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य प्रकल्प आहे. अनेक गावांतील पाणीपुरवठा या तलावातील पाण्यावर अवलंबून असल्याने हा भरल्यामुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न काहीसा मिटला आहे.

अभ्यासक्रमात भविष्याचा विचार करा

$
0
0
‘सध्याचे अभ्यासक्रम चांगले आहेत. मात्र मेंदूवर ओझे होणाऱ्या प्रश्नांपेक्षा विचारांना चालना देणाऱ्या प्रश्नांची आजच्या अभ्यासक्रमात गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या अभ्यासक्रमाची निर्मिती ही विद्यार्थी भवितव्यासाठी उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातूनच करणे आवश्यक आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी मत व्यक्त केले.

मतदारांना श्रावण पर्वणी!

$
0
0
श्रावण महिन्याची पर्वणी साधत विधानसभा निवडणुकीतीस इच्छुक उमेदवारांनी विकासकामाबरोबर महिला मतदारांमध्ये प्रचार करण्यासाठी हळदी कुंकू, आरोग्य शिबिर व वर्गणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images