Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टाकीत बुडून बालिकेचा मृत्यू

$
0
0
घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडून बूडून दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास येथील गणेशनगरमध्ये ही घटना घडली. श्रीनिधी संतोष भोळे (वय २) असे बालिकेचे नाव आहे.

शाहू मराठा बोर्डिंग बंद

$
0
0
शाहू महाराजांनी ज्या हेतूने वसतिगृह सुरू केले ते वसतिगृह बंद करत शाहू विचार फक्त बोलण्यापुरतेच आहेत हे शाहू मराठा बोर्डिंगच्या संचालकांनी दाखवून दिले आहे.

‘लवासा’साठी इंचभर जमीनही देणार नाही

$
0
0
राज्यात लवासासारख्या प्रकल्पांना इंचभरही शेतकऱ्याची जमीन आता घेऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना दिला.

मंडलिक-घाटगे गटाचा व्हन्नाळी येथे मेळावा

$
0
0
‘विधानसभेच्या निमित्ताने आता खरे महाभारत सुरु झाले आहे.निश्चितच पांडवांप्रमाणे आपल्याकडे सैन्य कमी आहे. परंतु स्वत:च निवडणुकीस उभे आहोत असे समजून काम करा. कौरवांचा पराभव निश्चित आहे,’ असा विश्वास ‘बिद्री’ चे संचालक राजेखान जमादार यांनी व्यक्त केला.

पीटीएम-युनायटेडमध्ये अंतिम लढत

$
0
0
वेगवान ‍व अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने (पीटीएम) संध्यामठ तरुण मंडळाचा ४-२ असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात त्यांची लढत गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल क्लब संघाबरोबर बुधवारी (ता. २५) शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता होणार आहे. १७ वर्षाखालील चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धा सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूटच्यावतीने सुरु आहेत.

शुद्ध पेयजल प्रकल्प पालिकेच्याच मालकीचे

$
0
0
‘शहरातील शुध्द पेयजल प्रकल्प हे नगरपालिकेच्याच मालकीचे असून ते अन्यत्र स्थलांतर अथवा बंद करण्यात येणार नाहीत. जर पालिकेची हे प्रकल्प चालविण्याची तयारी असेल तर आमची कसलीही हरकत असणार नाही,’ अशी माहिती नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणीचे चेअरमन राहुल आवाडे यांनी दिली. यावेळी नगरपालिकेतील सत्तारुढ काँग्रेस, शहर विकास आघाडी तसेच उपस्थित असणारे नागरिक एकाचवेळी उठून मोठमोठ्याने बोलू लागल्याने गोंधळ उडाला आणि जनता दरबार गुंडाळण्यात आला.

मोदी सरकारकडून सत्तेचे केंद्रीकरण

$
0
0
‘देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींप्रमाणेच सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, भांडवलदार आणि सर्वसामान्य लोकांनी ज्या अपेक्षेने त्यांना निवडून दिले त्या पूर्ण करण्याचा विश्वास त्यांना दिला पाहिजे.

शाहूवाडीत लावण खोळंबली

$
0
0
शाहूवाडी तालुक्यात शंभर टक्के भात पेरण्या झाल्या आहेत. उगवणही चांगली झाली आहे. परंतु पावसाने दांडी दिल्याने रोप लावण खोळंबली आहे. पश्चिमेकडील भागात रताळीची लावणही अंतिम टप्प्यात आली आहे. माळरानावर भुईमूगाची टोकणही पूर्ण झाली आहे. सध्या या पिकांना पावसाची पूर्ण गरज आहे. सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मिळेल त्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे बी उपलब्ध करून घेण्याच्या धांदलीत शेतकरी वर्ग आहे.

चंदगडमध्ये पेरण्या वाया जाण्याची भीती

$
0
0
गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून मशागतीची कामे खोळंबली आहेत. मे महिन्यात झालेल्या वळीव पावसामुळे धुळवाफ पेरण्या आटोपल्या असल्या तरी गरजेच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राधानगरी तालुक्यात शेतकरी हवालदिल

$
0
0
पावसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा अंत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पाण्याविना त्याच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ बारा टक्के धूळवाफ पेरण्या सध्या पूर्ण झाल्या असून पेरलेल्या पिकांच्या उगवणीसह उर्वरित पेरण्या कशा करावयाच्या असा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे.

कागल तालुक्यात केवळ १५ टक्केच पेरण्या

$
0
0
कागल तालुक्यात खरीपाची केवळ १५ टक्के पेरणी आजअखेर पूर्ण झाली असून गतसाली याच काळात हीच पेरणी ९० टक्के झाली होती. लांबलेल्या मान्सूनच्या पावसाचाच हा परिणाम असून आतापर्यंत तालुक्यात केवळ ४३.४७ मि.मी.इतकी पावसाची नोंद झाली आहे. गतसालच्या तुलनेत ०.४२ टक्केच हा पाऊस आहे. पाण्याची सोय असणाऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी पेरण्या झाल्या असून माळरानाच्या ठिकाणी पावसाच्या आशेवर केलेल्या पेरण्यांसाठी आठवडाभर पाऊस लांबणे धोकादायक असून अशा ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट उभा रहाणार आहे.

आजरा तालुक्यात पेरण्या करपू लागल्या

$
0
0
संपूर्ण जून महिनाच कोरडा चालला असल्याने आजरा तालुक्यात मान्सूनपूर्व स्थितीत पेरणी करण्यात आलेल्या पिकांची वाढ खुंटण्याचा, तसेच काही ठिकाणच्या पेरण्या करपून चालल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन-तीन दिवसात पावसाला सुरवात न झाल्यास दुबार पेरण्यांबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहण्याची भिती व्यक्त होत आहे. तालुक्यातील ६६ टक्के म्हणजे ८१८३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अद्यापही ४४ टक्के क्षेत्र उरले आहे.

पावसाची दडी, पाणीसाठ्यांनी तळ गाठला

$
0
0
मान्सूनच्या आगमनाने सुखावलेल्या बळीराजाला दोनच दिवसात दडी मारून पावसाने अडचणीत आणले. गडहिंग्लज हा कोकण आणि घाटमाथ्याच्या वेशीवरील तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पश्चिम भागात धूळवाफ पेरणी तर पूर्व भागात नियमित पेरणी केली जाते.

शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे

$
0
0
मे महिन्याच्या मध्यावर वळीव पावसाने साथ दिल्यानंतर भुदरगड तालुक्यात धुळवाफ पेरणी पूर्ण झाली. त्यानंतर मशागतीला जोर चढला आहे. मात्र मृग नक्षत्रात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आणखीन चार दिवस पावसाने उसंत घेतल्यास धूळवाफ पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भुदरगड तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर धूळवाफ पेरणी पूर्ण झाली आहे.

विवाहिता आत्महत्या; सहाजणांना अटक

$
0
0
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पतीसह सहा जणांना अटक केली. पती उत्तम मोहन कदम, नणंद ज्योती मोहन कदम, जाऊ कविता गजानन कदम, नणंद संगीता बळवंत अतिग्रे, सुजाता लक्ष्मण वठारे, सौ. कल्पना दिलीप कदम अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

व्हॅटवरील परताव्याचा ‘विक्रीकर’ने खुलासा करावा

$
0
0
सरकारच्या नियमानुसार सर्व कॉन्ट्रॅक्टर व्हॅट भरतात. या व्हॅटवर अनेकवेळा परतावा मिळतो. व्हॅट भरताना उशीर झाल्यास दंड व व्याज आकारणी करून कर भरुन घेतला जातो. असे असताना आम्ही जादा भरलेली रक्कम परतावा म्हणून गेले पाच वर्षे प्रयत्नशील आहोत. मात्र ही रक्कम परत दिली गेलेली नाही. या परतावा रक्कमेवर सरकार व्याज देणार आहे का याबाबतही काही स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत विक्रीकर विभागाने खुलासा करण्याची आवश्यकता असल्याची मागणी कोल्हापूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने पत्रकाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादीचे ‘अच्छे दिन आये है’ आंदोलन

$
0
0
रेल्वे दरवाढीविरोधात रेल्वे प्रवाशांना गुलाबाची फुले देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘अच्छे दिन आये है’ अशा घोषणा देत भाजप सरकारची खिल्ली उडवून आंदोलन केले. राजर्षी शाहू महाराज रेल्वे स्थानकावर मंगळवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. महापौर सुनीता राऊत, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

खंडपीठ कृती समितीची शुक्रवारी बैठक

$
0
0
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात सहा जिल्ह्यांतील प्रतिनिधींची शुक्रवारी (२७) दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाटगे व खंडपीठ कृती समितीचे सचिव अॅड. राजेंद्र मंडलिक यांनी पत्रकातून ही माहिती दिली.

केएमटी बचावसाठी कर्मचाऱ्यांचे अभियान

$
0
0
खासगी वाहतुकीचे वाढते आव्हान, बसस्टॉप परिसरातून होणारी अवैध वाहतूक, डिझेलच्या वाढत्या दराचा आणि बसेस देखभालीच्या खर्चामुळे रोजच्या उत्पन्नापेक्षा तूटच अधिक वाढत चालल्यामुळे भरकटलेल्या केएमटीला योग्य मार्गावर आणण्याचे स्टेअरिंग वाहक, चालकांनीच हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात पन्नासहून अधिक चालक-वाहकांनी एकत्र येत प्रवाशी उठावो अभियान सुरू केले आहे. अभियानला बळ मिळावे म्हणून ड्यूटी सुरू होण्याअगोदर आणि संपल्यानंतर दोन तास ते बस थांब्यावर थांबून प्रवाशांना केएमटीमधून प्रवास करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीनंतर काम बंद आंदोलन मागे

$
0
0
जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी सदस्य व सदस्य सचिवांची पदे निर्माण न करता या पदांचा कार्यभार समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्याच्या घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगिती दिली. त्यामुळे कालपासून सुरू झालेले सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेचे आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images