Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाहू पुतळ्याचे सौंदर्यीकरण रखडले

$
0
0
राजर्षी शाहू महाराजांच्या दसरा चौकातील पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण रखडले आहे. सुशोभिकरणासाठी १३ लाख ८९ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. वर्कऑर्डर काढली असली तरी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जुन्या वास्तूंची मोडतोड करत केवळ पुतळा परिसराचे नव्हे तर दसरा चौकाचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी शाहूप्रेमींकडून होत आहे.

आता महिनाभरात टेक ऑफ

$
0
0
कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याची सुप्रीम एअर ट्रॅव्हल सर्व्हिसेस कंपनीची तयारी आहे. रोज चार प्रवाशी मिळत असतील तरीही विमान सुरू ठेवण्याची कंपनीची तयारी आहे.

आंदळकरांना शाहू पुरस्कार जाहीर

$
0
0
राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा शाहू पुरस्कार हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजाराम माने व विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.

रस्ते, हद्दवाढीकडे लक्ष

$
0
0
शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा हद्दवाढीसंबंधीच्या प्रस्तावावर सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर हद्दवाढीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात जाणार आहे.

ओस पडली भाजी मंडई

$
0
0
रुक्मिणीनगर आणि रुईकर कॉलनी या भागात राहणाऱ्या लोकांसाठी असलेली महानगरापालिकेची सुसज्ज मंडई भाजी विक्रेत्यांअभावी मोकळी पडली आहे. बसण्यासाठी चांगली व्यवस्था, पाणी, करमणुकीसाठी टी. व्ही अशा सुविधा असून देखील लोकच येत नसल्यामुळे याठिकाणी भाजी विक्रेते बसत नाहीत.

प्रवेश घेताच मतदार

$
0
0
मतदान नोंदणी कधी करायची...कशी करायची? राहू दे... नंतर बघू. अशी वृत्ती विद्यार्थीदशेत बहुतेकांची दिसून येते. या वृत्तीमुळे अद्याप ३६ हजार नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. मतदार यादीपासून दूर असणाऱ्या अशांचा समावेश आगामी विधानसभेचे मतदार म्हणून होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कल्पक फंडा राबवण्यास सुरुवात केली आहे.

घरफाळा कॅम्पला अत्यल्प प्रतिसाद

$
0
0
कर आकारणीबाबत महापालिकेने गेल्या महिन्याभरापासून राबवण्यात आलेल्या मोहिमेत ८० नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरवर्षी हजारो नवीन मिळकती निर्माण होत असताना घरफाळा लागू करण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला.

पर्यटनाचा पर्यावरणावर ताण

$
0
0
गेल्या काही वर्षांत पर्यटनदृष्ट्या शहराचे महत्त्व वाढत चालल्यामुळे त्याचा शहराच्या पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे. स्थानिक लोकांच्या वाहनांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहेच, परंतु त्याहीपेक्षा बाहेरून येणाऱ्या वाहनांचा बोजा शहरावर अधिक पडतो.

त्रिवेणी पुरस्कार

$
0
0
उत्तूर (ता.गडहिंग्लज) येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेच्यावतीने १४ वा गुणगौरव समारंभ रविवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष टी.के.पाटील, प्रा.श्रीकांत नाईक यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

अक्षय जाखोट‌ियाला रिटर पुरस्कार

$
0
0
टेक्स्टाईल मशीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अग्रेसर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रिटर या कंपनीकडून येथील डीकेटीई संस्थेतील विद्यार्थी अक्षय अजय जाखोट‌िया याला प्रतिष्ठेचा ‘रिटर’ अवॉर्ड घोषित झाला झाला आहे.

पदासाठी घाई, कामात दिरंगाई

$
0
0
शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये अगदी ग्रामपंचायत सत्तेएवढे महत्व देवून प्रसंगी काही गावात तर मतदानातून निवड झालेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनेक गावाच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष कामात सहभाग घेण्याबाबत मात्र मागेच आहेत. त्यामुळे पदासाठी हातघाई व आता कामात दिरंगाई असे चित्र अनेक शाळांत आहे.

शाहूंच्या जन्मस्थळासाठी प्रसंगचित्रे

$
0
0
कसबा बावडा येथील राजर्षी शाहूंच्या लक्ष्मीविलास पॅलेस या जन्मस्थळावर उभारण्यात येणाऱ्या आर्ट गॅलरीमध्ये शाहूंच्या जीवनातील महत्वाची प्रसंगचित्रे व शिल्पे (म्यूरल्स) साकारुन मोफत देण्याचा प्रस्ताव कोल्हापूर आर्ट फाउंडेशनने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

कवनांतून उलगडले शाहूचरित्र

$
0
0
ढोलकीवर थिरकणारी बोटे, डफावर पडणारी थाप आणि तुणतुण्याच्या निनादाने शाहिरांनी राजर्षी शाहूंच्या सामाजिक कार्यातील रोमांचकारी इतिहास कवनांतून सादर केला. शिवाजी महाराजांचा संघर्षमय इतिहास आणि शाहूंचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व अनुभवताना श्रोते मंत्रमुग्ध झाले.

कोल्हापूर क्राइम डायरी

$
0
0
कोल्हापूरः महत्त्वाचे गुन्हे वृत्त

महिन्याभरात मूल्यांकन

$
0
0
कोल्हापूरची टोलविरोधी कृती समिती रस्त्यांची प्राथमिक पाहणी करून मूल्यांकनाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करणार आहे.

समाजकल्याण विभागाचे आंदोलन

$
0
0
जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी सदस्य व सदस्य सचिवांची अद्याप पदे निर्माण करण्यात आलेली नाहीत. कायद्यानुसार पदे निर्माण न करता या पदांचा कार्यभार विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याने तो रद्द करावा अशी मागणी करत सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवारपासून काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू केले.

सामाजिक आरोग्यासाठीही योग

$
0
0
‘कोल्हापुरचे योगा अॅम्बेसिडर’ किंवा ‘स्ट्रेस मॅनेजमेंट गुरू’ अशी ओळख असलेले डॉ. धनंजय गुंडे हे मंगळवारी (ता. २४) ७८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. डॉ. गुंडे यांनी आजवर योग साधनेविषयी देश-विदेशात ८२८ शिबिरे घेतली आहेत. ताण-तणाव विरहित जीवन जगण्याची कलेचा मंत्र देणाऱ्या डॉ. गुंडे यांच्याशी साधलेला संवाद.

एसटीचा पास महागला

$
0
0
मार्च आणि जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळाने तिकिट दरात वाढ केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून त्यांच्या मासिक पासमध्ये वाढ होणार आहे. ही भाडेवाढ दोन स्टेजच्या पुढे १२ टक्क्यांची होईल

हद्दवाढ सरकारच्या कोर्टात

$
0
0
आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून हद्दवाढीकडे न पाहता कोल्हापूर शहराची सर्वांगीण वाढ झाली पाहिजे, या भूमिकेतून महापालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. महापालिका प्रशासनाने २०११ च्या जनगणनेवर आधारित हद्दवाढीचा सुधा​रीत प्रस्ताव महासभेत मांडला.

साखर उद्योगास चालना मिळेल!

$
0
0
केंद्र सरकारने साखर आयातीस ४० टक्के शुल्क आकारण्याबरोबरच पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगास नवी चालना मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांमया ऊसाला जादा भाव मिळणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images