Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नारळावर कोळी किडीचा प्रादुर्भाव

$
0
0
जिल्ह्यात नारळावरील कोळी कीडीचा (इरोफाईड माईट्स्) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोकणात थैमान घालून डोकेदुखी ठरलेल्या या कीडीने जिल्ह्यात वाऱ्यामार्फत आपले बस्तान बसवले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवा

$
0
0
‘पालकवर्ग खासगी शाळांच्या प्रलोभनांना बळी पडत आहेत. खासगी शाळांशिवाय पर्याय नाही असा ग्रह करून पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळेत दाखल करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता इतकी वाढवा की, जेणेकरून खासगी शाळा तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

यशवंतगड ६ महिन्यांत ताब्यात घेऊ

$
0
0
'साडेपाच एकर क्षेत्रात व्यापलेला यशवंतगड एखाद्या व्यक्तीच्या नावे होतोच कसा? याबाबत जिल्हाधिकारी चौकशी करत आहे. अधिग्रहणाच्या कागदपत्रांची पूर्तता होताच सहा महिन्यांत हा गड सरकारच्या ताब्यात घेऊ,’ अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महावितरण घेणार खंडित विजेचा आढावा

$
0
0
भारनियमन नसतानाही वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. खंड‌ित झालेली वीज अनेक तास येत नाही. त्यामुळे ‘महावितरण’कडून छुपे भारनियमन सुरू असल्याचा नागरिकांचा समज होऊ लागला आहे.

टोल रद्द करा, अन्यथा राजीनामा द्या

$
0
0
‘कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची ताकद असेल तर टोल रद्द करुन दाखवावा. ते जमत नसेल तर मंत्र‌िपदाचा राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे’ असे आव्हान महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.

सॅण्ड रिक्लेमेशन अडचणीत

$
0
0
फाउंड्री उद्योजकांना भेडसावणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेला वेस्ट सॅण्डच्या प्रकल्पासाठी आवश्यक लोकवर्गणीला उद्योजकांनी केलेल्या विरोधामुळे आलेल्या अडचणी आजही कायम आहेत.

गोल्डन ज्युबिली निधीत अवघे एक कोटी

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विद्यापीठाच्या विविध प्रोजेक्ट्ससाठी निधी उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी समिती स्थापन झाल्या. मात्र, सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्य सरकारकडून मिळणारा निधी वगळता १० कोटी रुपयांचा निधी उभारणीऐवजी विद्यापीठाला अवघ्या एक कोटींच्या निधीवर समाधान मानावे लागले.

रंकाळा तलाव संवर्धनासाठी पाहणी

$
0
0
रंकाळा संवर्धन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील आठ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीतील कामे अजून पूर्ण झालेली नसताना दुसऱ्या टप्प्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया चालवली आहे.

पूरस्थ‌िती हाताळण्यासाठी सज्ज व्हा

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन-चार वेळा नद्यांना पूर येण्याचा आजवरचा अनुभव आहे. संभाव्य पुरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी तयारी सुरु करावी. महापुराचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे’ असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले.

‘सीपीआर’ला चार दिवसांनंतर पाणी

$
0
0
महापालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या वाहिनीचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) गेले चार दिवस बंद झालेला पाणी पुरवठा मंगळवारी सकाळपासून सुरू झाला.

‘त्या’ जागांबाबत महापालिकेचे कॅव्हेट

$
0
0
उचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागा महापालिकेच्या मालकीच्या असल्याचा न्यायालयाने निर्णय दिल्याने त्याविरोधात हायकोर्टमध्ये आव्हान देण्याची ग्रामपंचायतीने तयारी चालवली आहे. त्यामुळे महापालिकेनेही याबाबत हायकोर्टमध्ये कॅव्हेट दाखल केले आहे.

कॅम्पसमधील झाडांची नासधूस

$
0
0
काही अतिउत्साही तरुणांकडून शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधील झाडांना इजा पोहचवली जात आहे. झाडावर दगड मारणे, दगडी गोळा फेकणे अशा प्रकारांतून झाडांची नासधूस होत आहे.

बी. माजनाळकर यांचे निधन

$
0
0
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते, दिग्दर्शक बंडोपंत श्रीपतराव तथा बी. माजनाळकर (वय ८४) यांचे मंगळवारी (दि. ६ मे) पहाटे न्यू शाहूपुरीतील निवासस्थानी वार्धक्याने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते. रविवारपासून त्यांची तब्येत बिघडली. अखेर मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पोलिस चौक्यांना आली जाग !

$
0
0
कामाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी शाहूपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याने हद्दीतील पोलिस चौक्यांना ऊर्जितावस्था दिली आहे. चौकीचा कारभार उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला असून हद्दीतील घडणारे गुन्हे, तपास, गस्त व स्थानिक नागरिकांशी प्रशासनाचा संवाद वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सोलापूरचे आयुक्त पुन्हा परतणार

$
0
0
‘काम बंद ठेवून सोलापूरकर नागरिकांना वेठीस धरू नका. १५ मेपर्यंत सोलापुरात परतण्याचा प्रयत्न करेन. आंदोलन मागे घ्या,’ असे आवाहन महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केल्यानंतर सोमवारपासून सुरू झालेले कामबंद आंदोलन कामगार कृती समितीने मंगळवारी दुपारी स्थगित केले.

‘चित्रकर्मी’, ‘चित्रभूषण’ जूनमध्ये

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वादामुळे ‘चित्रकर्मी’ व ‘चित्रभूषण’ पुरस्कार रखडल्याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केल्यानंतर, महामंडळाने तातडीने हालचाल सुरू केली असून, येत्या जून महिन्यात हे पुरस्कार दिले जातील, अशी सुचिन्हे आहेत.

महिनाभरात तिसरा मोर्चा

$
0
0
संयमाने व जनतेच्या पाठबळावर टोल विरोधातील आंदोलनात विजयश्री खेचून यंदाचे सीमोल्लंघन करायचे आहे. महिनाभरात टोल विरोधातील तिसरा महामोर्चा काढण्याचा निर्धार मंगळवारी टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.

स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी नगरसेवकांचेही पाऊल

$
0
0
गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यातील मुलींचा टक्का दिवसेंदिवस घसरत गेला. या रेड झोनमध्ये कोल्हापूरही असल्यामुळे अनेक संस्था, संघटनांमार्फत स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती सुरू झाली.

हाणामारी प्रकरणी ३ अटकेत

$
0
0
मोटार सायकल धडकल्याच्या किरकोळ कारणावरून संतोषवाडी (ता. मिरज) येथे दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. भाऊसाहेब उर्फ साहेबराव जगताप यांनी बंदुकीतून गोळीबार केल्याने एकजण जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी साहेबराव जगताप यांच्यासह तिघांना अटक केली

बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा

$
0
0
तासवडे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे सहायक अभियंता म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत अशोक दुधाणे यांना २०१० मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images