Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चांगला ग्राहक तयार करण्याचा प्रयत्न

$
0
0
पूर्वी क्विंटलवर साखर विकताना दर्जेदारपणाला फारसे महत्त्व नव्हते, परंतु आता साखर पूर्णपणे मुक्त केल्याने सर्वच कारखान्यांच्या संचालक मंडळावर शिल्लक साखरेची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

कामगार कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी

$
0
0
वस्त्रनगरीतील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कायमस्वरुपी अधिकाऱ्याचे पद असतानाही अधिकारी हजर नसतात. पुरेसा कामगार वर्गही इथे नसल्याने अनेक प्र्रश्न वर्षानुवर्षे प्र्रलंबित राहतात.

बोलेरो-एसटी अपघातात १९ प्रवासी जखमी

$
0
0
भरधाव वेगात असलेली बोलेरो जीप ट्रकवर आदळून त्यानंतर ट्रकमागून येणाऱ्या एसटीलाही धडक दिल्याने एसटी झाडावर आदळून १९ जण जखमी झाले. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील निळेपैकी भोसलेवाडीच्या वळणावर हा अपघात घडला. अपघातात बोलेरो जीप व एसटीचे नुकसान झाले.

मतमोजणी कक्षात कडक निर्बंध

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी त्यांचे पोलिंग एजंट व स्वतःचे ओळखपत्र याबाबत खातरजमा करुन घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सोमवारी केली.

९१ डॉक्टरांपैकी तीनच हजर

$
0
0
‘सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वेचेन तसेच वैयक्तिक स्वार्थापेक्षा रुग्णाच्या सेवेसाठी प्राधान्य देईन,’ अशी रुग्णसेवेची शपथ वर्षभरापूर्वी घेणारे डॉक्टर वर्षभरातच त्याला तडा देतात.

दबावतंत्र आले अंगलट

$
0
0
शाहूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणात चौकशीतून दोषी ठरलेल्या तालुक्यातील सहा प्राथमिक शिक्षकांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने शाहूवाडीत खळबळ उडाली आहे.

संग्राम कक्ष देणार बँकिंग सुविधाही

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने संग्राम कक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारचे दाखले, रेल्वे आणि बस आरक्षण, वीजबिले याबरोबरच बँकिंग सुविधाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

डेबिट कार्डचे हायटेक चोर

$
0
0
‘हॅलो, मी अमूक एका बँकेतून बोलतोय, तुमच्या खात्यावर तातडीने पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी तुमचा डेबिट कार्ड क्रमांक आणि पिन क्रमांक सांगा, पैसे दोन मिनिटात जमा होतील’, असे दूरध्वनी काही ग्राहकांना येत आहेत.

डेबिट कार्डचा पिन विचारून फसवणूक

$
0
0
बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून डेबिट कार्डचा अकाउंट नंबर व पिन नंबर विचारुन दोघा तरुणांना साडेदहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी घडला. याप्रकरणी संबंधित बँकेने आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून पोलिसांनी बँकेच्या आयटी विभागाचा रिपोर्ट मिळाल्यावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

सीपीआर बचावसाठी जनआंदोलन

$
0
0
सर्वसामान्यांसाठी आधारवड असणारे छत्रपती प्रमिलाराजे सिव्हिल हॉ‌स्पिटल (सीपीआर) लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मृत्यूशय्येवर आहे. सीपीआरला स्वतंत्र जिल्हा हॉस्पिटलचा दर्जा द्यावा व सरकारी मेडिकल कॉलेजपासून ते तत्काळ वेगळे करावे या मागणीसाठी जनआंदोलन उभा करण्याचा निर्धार विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठकीत केला.

बोधचिन्हासाठी ‘आचारसंहिता’ लागू

$
0
0
बोधचिन्हाचा गैरवापर होऊ नये म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाने नवी नियमावली लागू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून विद्यापीठातील लेटरहेड आणि व्हिजिटींग कार्डाचा विशिष्ट आकार निश्चित केला आहेत.

‘कॉमन मॅन’चा आरटीओला घेराव

$
0
0
ऑटो रिक्षाच्या परमीटच्या जाचक अटी रद्द कराव्यात यांसह अन्य मागण्यांसाठी कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघाच्यावतीने आरटीओ लक्ष्मण दराडे यांना सोमवारी घेराव घालण्यात आला.

‘अनुदानित’मध्येही शुल्कवाढ

$
0
0
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या खासगी विनाअनुदानित शाळांतील नफेखोरीचा फंडा शोधला आहे. अनुदानित असलेल्या काही शाळांनी शुल्क वाढीची छडी पालकांच्यावर उगारली आहे.

सुटीतील शिक्षण

$
0
0
शाळा, कॉलेजला मिळणारी किमान दीड महिन्याची उन्हाळी सुटी म्हणजे आपले ज्ञान, कौशल्य वाढविण्याची एक संधी. अशा सकारात्मक भूमिकेनेच विविध स्वयंसेवी संस्था अल्प मुदतीचे कला, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, शिबिरे आयोजित करतात.

‘सुपरपेसर’साठी तरुणाई आतूर

$
0
0
जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थानाकडे झेप घेणाऱ्या भारतीय संघात विरोधी संघाच्या दांड्या वेगवान चेंडूवर गूल करण्याचा विडा महाराष्ट्र टाइम्सने सुपर पेसर मोहिमेद्वारे उचलला आहे.

टोलवसुलीला हिरवा कंदील

$
0
0
टोल वसुलीला स्थगिती देणाऱ्या आदेशाचा ३१ जुलैपर्यंत पुनर्विचार करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिला. या काळात टोल वसुली करण्याची आयआरबीची विनंती मान्य करण्यात आली आहे.

डेंगीसदृश आजाराची लागण

$
0
0
लोटेवाडी (ता. भुदरगड) येथे गेल्या काही दिवसांपासून गावातील लोकांना डेंगीसदृश आजाराची लागण होऊ लागल्याचे आढळून येत आहे. गावातील ग्रामस्थांमध्ये ताप, डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

वळवाने इचलकरंजीला झोडपले

$
0
0
वळीव पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इचलकरंजीसह परिसराला चांगलेच झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने व घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.

स्त्रीत्वाची रूपे साकारताना स्त्रीशक्तीची जाणीव

$
0
0
‘द्रौपदी, जिजाऊ अशा भूमिका साकारण्याची संधी मिळाली. स्त्रीत्वाची विविध रूपे साकारताना स्त्री शक्तीची जाणीव झाली,’ असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.

कामातून जनतेसमोर जाणार

$
0
0
‘मतदारसंघामध्ये वारसाहक्कापेक्षा कितीतरी मोठे प्रश्न आहेत. पोटनिवडणुकीत दिलेल्या वचनपूर्तीच्या पाठपुराव्यात व्यस्त असल्याने अन्य बाबींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे सांगत संग्रामसिंह कुपेकर यांच्या मेळाव्यासंदर्भात डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी ‘ठंडा’ प्रतिसाद दिला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images