Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया

$
0
0
सोलापूर जिल्ह्यावरील दुष्काळाची गडद छाया अद्यापही कायमच असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. पाण्याअभावी खोळंबलेल्या पेरण्या, जळालेल्या फळबागा पुनर्जिवीत करण्यासाठी बळीराजाचा सुरु असलेला आटापिटा, चारा छावण्यांची जैसे थे परिस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची तारांबळ सुरू आहे.

‘कृष्णा-भीमा’ योजना पूर्ण करणारच

$
0
0
सोलापूरसह सहा जिल्हे आणि ३१ तालुक्यांतील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी रखडलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी आणून कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

‘जयप्रभा’ विक्रीस परवानगी

$
0
0
जयप्रभा स्टुडिओच्या जागा विक्री व्यवहाराविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने दाखल केलेली याचिका अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी गुरुवारी फेटाळली. स्टुडिओचा परिसर खासगी मालमत्ता असल्याने महामंडळाला या प्रकरणी दावा दाखल करण्याचा अधिकार नसल्याचा लता मंगेशकर यांच्या वतीने केलेला युक्तिवाद कोर्टाने मान्य केला.

महाबळेश्वर-विटा हायवे चौपदरी

$
0
0
महाबळेश्वर-विटा या राज्य महामार्गावरील मोळाचा ओढा, सातारा शहर पोवई नाका ते गोडोली नाका परिसरास जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन चौपदरीकरण होणार आहे. मोळाचा ओढा ते गोडोली नाका या रस्त्यांसाठी १९ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, या कामाची निविदा एक महिन्याच्या आत निघणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

दवाखान्याच्या इमारतीत शिपायाचे अतिक्रमण

$
0
0
जत तालुक्यातील कुंभारी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीत तहसीलदार कार्यालयातील शिपायाने अतिक्रमण करून आपला संसार थाटला आहे. आता त्या सरकारी माणसाचे अतिक्रमण कोण काढायचे, असा प्रश्न पडला आहे.

‘एलबीटी’ न भरणाऱ्यांविरुद्ध सांगली पालिकेची मोहीम

$
0
0
जकातीऐवजी स्थानिक संस्था कराची (एलबीटी) सुरुवात करण्यात आली. मात्र, त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनू लागली आहे. त्यामुळे एलबीटी न भरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोयनेतील पाणीसाठा ७०.५० टीएमसी

$
0
0
येथील कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांतील काही विभागात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी रिपरिप सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात ७०.५० टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी २१३० फूट ५ इंच तर ६४९.३५१ मीटर इतकी झाली असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

पंचगंगेत चौघे वाहून गेले

$
0
0
कोल्हापूरमधील शिंगणापूर नाका येथे पंचगंगा नदीत चौघेजण वाहून गेल्याचे वृत्त असून त्यांचा शोध सुरू आहे.

प्रभाकर देशमुखांना अखेर यश

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत हीन भाषेत उडवलेल्या खिल्लीमुळे चर्चेत आलेले सोलापुरातील शेतकऱ्यांचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

'स्टँडिंग'च्या खांडोळीचे पाप

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने सहा महिन्यांचे दोन सभापती करून स्टँडिंगची (स्थायी समिती) खांडोळी करून कोल्हापूर महापालिकेत एक चुकीचा पायंडा पाडला आहे.

वाहतूक शाखा होणार अपडेट

$
0
0
शहरात रोज होणारी वाहतूक कोंडी, विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक पोलिस शाखा अधिक सक्षम व अपडेट होणार आहे. फक्त कारवाईवर भर न ठेवता व्यापक जनजागरण करण्यात येणार आहे.

धनगरवाड्यातील घरे वनकर्मचा-यांनी जाळली

$
0
0
शाहूवाडी तालुक्यातील सोनार्ली पैकी धनगरवाडा येथील अकरा धनगर कुटुंबियांवर वन कर्मचाऱ्यांकडून अमानूष अन्याय केल्याची तक्रार मल्हार सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. प्रापंचिक साहित्यासह झोपड्या पेटवून देण्याबरोबरच जवळपास ४०० लहान मोठी जनावरे जाळल्याचाही आरोप यावेळी करण्यात आले आहेत.

शेंडापार्कातील ग्रामीण रूग्णालयासाठी ५ कोटी

$
0
0
'शेंडापार्कातील ग्रामीण रुग्णालयासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करा' असा आदेश गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआर प्रशासनाला दिले.

दोन सदस्यांवर 'देवस्थान'चा भार

$
0
0
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची अध्यक्षनिवड गेली ३ वर्षे प्रलंबित असताना समितीच्या पाचपैकी तीन सदस्यांची मुदत २३ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे फक्त दोन सदस्यांवरच देवस्थानच्या व्यवस्थापनाचा भार पडणार आहे.

दागिने चोरांवर पश्चातापाची वेळ

$
0
0
दागिने घालून मिरवायची हौस अनेक महिलांना असते. त्यामुळेच मोठेपणा मिरवणाऱ्या महिलांच्या बाबतीत धूम स्टाईलने चोरीच्या घटना घडतात. यामुळे अनेकवेळा पश्चातापाची वेळ येते.

‘छात्रसभा’ सोडविणार समस्या

$
0
0
कॉलेज आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांविषयी विविध प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्नांची मांडणी करायची आहे. मात्र प्रत्येकाचा आवाज विद्यापीठापर्यंत पोहोचतोच असे नाही. विद्यार्थ्यांची ही अडचण आता दूर होणार आहे.

सुंदर आणि मुलायम

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या प्राण‌िशास्त्र विभागाच्यावतीने पश्चिम घाटात आदिवासी आणि शेतकऱ्यांत टसार रेशीमचा प्रसार करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात आला. या टसारची निर्मिती करणाऱ्या अँथेरिया मायलिटा हे पतंग विभागाच्या प्रयोगशाळेत कोषातून बाहेर आले आहेत.

कोयना धरणात ७३ टिएमसी पाणीसाठा

$
0
0
गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत रागांच्या भागात पावसाने शुक्रवारी चांगलाच जोर धरला आहे. पश्चिमेकडील कराडसह पाटण, जावळी, महाबळेश्वर व वाई तालुक्यांमध्ये दिवसभसर पावसाची रिपरीप सुरू होती.

आरक्षणासाठी एकजूट करा

$
0
0
केवळ एकजुटीअभावी समाजाचा आवाज आणि ताकद लोकप्रतिनिधींपर्यंत आणि पर्यायाने सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर एकजुटीला पर्याय नाही, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते सुभाष सोनवणे यांनी केले.

पेन्शनरांचे १४ ऑगस्टला उपोषण

$
0
0
इ.पी.एस. ९५ या योजनेतील सरकारी धोरणानुसार ४ रूपयांपासून १८०० रूपयांपर्यंत पेन्शन घेणारे देशातील पेन्शनर्स आपापल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सर्व श्रमिक संघातर्फे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images