Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर-गोवा कनेक्टिव्हिटी वाढणार

$
0
0
गोवा राज्य व कोकणाशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा या राज्यमार्गाच्या चौपदरीकरणीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सीआरएफ फंडाकडे पाठविण्यात आला आहे. रिझर्व्ह फंडातून २५ कोटींची मागणी केली आहे.

पंचगंगेचे पाणी दुस-यांदा पात्राबाहेर

$
0
0
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. सायंकाळी सात वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २९.८ इंच राहिली.

यादवनगरातील वेश्याव्यवसाय बंद

$
0
0
यादवनगरातील वेश्याव्यवसाय बंद करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिल्याने बंडखोर सेना व भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारी स्थगित केले.

नाट्यगृह, कुस्ती मैदानाचे वर्षात नुतनीकरण

$
0
0
राज्य सरकारच्या दहा कोटींच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, खाऊ गल्ली परिसराच्या नुतनीकरण व सुशोभिकरण कामाचे प्रेझेंटेशन शुक्रवारी करण्यात आले.

खंडपीठासाठी बार कौन्सिल प्रयत्न करणार

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी बार कौन्सिलमार्फत प्रयत्न करण्याची ग्वाही इंडिया बार कौन्सिल सदस्य अॅड. सतिश देशमुख व महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. आशिष देशमुख यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने सत्कार केल्यानंतर ते बोलत होते.

वेश्या व्यवसाय रॅकेट उघडकीस

$
0
0
मुंबईतून मुली आणून त्यांचा कोल्हापुरात वेश्या व्यवसायासाठी वापर करणाऱ्या टोळीतील गोपाल तुकाराम आचार्या (वय ४० ) व मोहिनुद्दीन इक्बाल हुसेन (२२) यांना पोलिसांनी अटक केली. ही टोळी शिरोली एमआयडीसी परिसरात वेश्या व्यवसाय करत होती.

ई-मीटर नसलेल्या रिक्षांवर कारवाई

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविलेल्या तीन आसनी ऑटो रिक्षांवर कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांना जाब विचारला.

३ आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0
मोहोळ तालुक्यातील जामगाव-वटवटे रस्त्यावर दोन काळवीटाची शिकार करणाऱ्या कोल्हापूरच्या तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत १४ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

एक किलो मटणाला शंभरचा मसाला

$
0
0
‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशी म्हण आहे. ती आता प्रत्यक्षात येत आहे. आषाढात मांसाहारावर ताव मारणाऱ्यांच्या जीभेचे चोचले पुरवणाऱ्या चमचमीतपणाला मसाल्याचे दर वाढल्याने भाव आला आहे.

कोल्हापूरचा आवाज घुमणार

$
0
0
कोल्हापूरकरांनी शहरात महामोर्चा काढत टोलला विरोध करण्याचा निर्धार केल्याने लोकप्रतिनिधींनीही येत्या पावसाळी अधिवेशनात टोलच्या विरोधात जोरदार आवाज उठवून सरकारच्या टोल वसूल करण्याच्या नियोजनाला सुरुंग लावण्याचे ठरवले आहे.

मोटारीतून ऑइल वाहतुकीबद्दल कारवाई

$
0
0
गाडीला आतून पडदे आणि मालाच्या बॉक्समध्ये गाडीत गुटखा असावा या संशयावरुन येथे वाहतूक पोलिसांनी तपासलेल्या एका मोटारीत ऑईलचे बॉक्स आढळले.

नेत्यांना बंदी... वारसदार सज्ज !

$
0
0
नवीन सहकार कायद्यानुसार प्रशासक आलेल्या संस्थांच्या संचालकांना सहा वर्षांसाठी निवडणुकीस बंदी घालण्याचा वटहुकूम लागू करण्याचा प्रस्ताव आगामी विधानसभेत ठेवला जाणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना सहकारी संस्थाच्या निवडणुकीपासून लांब राहावे लागणारे आहे.

भाविक-पुजारी वाद कायम

$
0
0
राजारामपुरी सातव्या गल्लीतील शनीमंदिर कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नसल्याचा निर्धार भाविकांनी शनिवारी बैठकीत केला.

खंडपीठासाठी सहकार्य करू

$
0
0
‘न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण व्हावे हे बार कौन्सिलचे धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगाने कौन्सिलचे काम सुरु असते. कोल्हापूरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याच्या प्रस्तावासाठी आम्ही सकारात्मक पध्दतीने सहकार्य करु’ असे आश्वासन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिले.

निवृत्त केंद्रप्रमुखाचा खून

$
0
0
धारदार हत्यारांनी वार करुन मृतदेहाचा चेंदामेंदा केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा मृतदेह निवृत्त केंद्र मुख्याध्यापक ज्ञानदेव विठ्ठल राणे (६२, गारगोटी, ता. भूदरगड) यांचा असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

एलबीटीविरोधातील बंदला फक्त पाठिंबा

$
0
0
एलबीटीच्याविरोधात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) संघटनेने सोमवारी (दि. १५) व मंगळवारी सर्व महापालिकांमध्ये व्यवसाय व व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

२५ बंधारे पाण्याखाली

$
0
0
शुक्रवारीही शहरात दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३१. ३ इतकी राहिली. संततधार पावसामुळे कोयना धरणा ७० टक्के भरले आहे.

मार्केट यार्ड ते विक्रमनगर स्कायवॉक

$
0
0
कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर मार्केट यार्ड ते विक्रमनगर असा स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. त्याला मध्य रेल्वेने ग्रीन सिग्न दिल्याने याबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्षभरात स्कायवॉकचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी ५५ लाख रुपये खर्च येणार आहे.

प्रदीप पाटीलांचा पुण्यात अपघाती मृत्यू

$
0
0
पन्हाळ्याचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र प्रदीप (वय ५०) यांचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला. जीपने बसला मागून जोरात धडक दिल्यामुळे प्रदीप यांचा मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाले.

२१ गावांचा संपर्क तुटला

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाने निपाणी परिसरातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुधगंगा आणि वेदगंगा नदीवरील पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images