Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मोलकरणींच्या मुलांना लॅपटॉप

$
0
0
दररोज उठून दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करून आपला उदनिर्वाह करणाऱ्या घरेलू मोलकरणींच्या मुलांचे भविष्य नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे अपडेट राहावे यासाठी सरकारने आता मोलकरणींच्या मुलांना टॅब आणि लॅपटॉप देण्याची नवी योजना मंजूर केली आहे.

...म्हणून होते रस्त्यांची दुर्दशा!

$
0
0
पाइपलाइन टाकण्याच्या कामामुळे शहरातील चांगले रस्तेही खराब होत असल्याचा आरोप करत नगरसेवक अशोक मोने आणि नागरिकांनी हे काम बंद पाडले. कमानी हौद ते कूपर कारखाना या रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.

हद्दपार आरोपीला इचलकरंजीत अटक

$
0
0
हद्दपार करण्यात आलेल्या दादासो बापूसो हजारे (वय २६ रा. भैरेवाडी ता. शिरोळ) याला गावभाग पोलिसांनी इचलकरंजी येथे फिरत असताना अटक केली.

मानधनवाढीसाठी प्रयत्न करू!

$
0
0
कलावंतांना सरकारकडून मिळणारे मानधन तुटपूंजे आहे. त्यामुळे त्यामध्ये भरघोस वाढ व्हावी यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार जयवंतराव आवळे यांनी दिले. इचलकरंजी येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते.

दोन अपघातांत दोघेजण ठार

$
0
0
कागल-निपाणी मार्गावरील यमगर्णी पुलावर झालेल्या अपघातात सुभाष बापूसो नरके (वय ४५, रा. हुपरी, ता. हातकणंगले) हा मोटारसायकलस्वार तर बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या अपघातात ज्ञानेश भानूदास गाडवे (वय २४, रा. सरुड, ता. शाहूवाडी) हा तरुण ठार झाला.

हद्दवाढीविरोधात कृती समिती

$
0
0
महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात कृती समिती नेमण्याचा निर्णय गुरुवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला. २६ जानेवारीला ग्रामसभेत हद्दवाढीविरोधाचा ठराव करुन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

वीज कंपनीच्या अभियंत्यांना सरंक्षण द्या

$
0
0
वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी सरकारने सरंक्षण द्यावे, अशी मागणी सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर माहुरे व सचिव सुनिल जगताप यांनी पत्रकार परिषेदत केली.

हुतात्मा शंकरराव तोरस्कर ट्रस्टची मागणी

$
0
0
हुतात्मा तोरस्कर यांचे नाव संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी हुतात्मा शंकरराव तोरस्कर ट्रस्टचे सचिव संजय तोरस्कर यांनी केली आहे.

महिला महोत्सव

$
0
0
पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील विजयसिंह यादव प्रतिष्ठान व कल्याणी सखी मंचच्या वतीने २४ ते २६ जानेवारी दरम्यान वडगाव महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवामध्ये विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत

आपटीत ऐतिहासिक विहीर

$
0
0
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आपटी येथील गाव तलावातील गाळ काढताना कोरीव बांधकामाची विहीर सापडली. तलावाच्या मध्यभागी असणारी ही विहिर ४० फूट लांब आणि ४ फूट रुद असून २० फूटांहून खोल आहे.

वणव्यामुळे वने धोक्यात

$
0
0
पाटण तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या रांगांमधील वनसंपदा वणव्यांमुळे धोक्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभाग आणि वन खात्याचे या वणव्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने मात्र वणव्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे.

रस्त्यांची दुर्दशा

$
0
0
रस्ते प्रकल्पाचा वाद सुरु असल्याने नवीन काम करण्याचे दूरच, पण जुन्या कामांची दुरुस्ती कोण करणार हा प्रश्न कायम असल्यामुळे या प्रकल्पातील अनेक रस्त्यांवरील खड्डे धूळ उडवत आहेत. अशा खड्ड्यांची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नाऐवजी दिवसेंदिवस युटिलिटीच्या तसेच अन्य सुविधांच्या नावाखाली नवनवीन खड्ड्यांची भरच घातली जात आहे.

उद्योजक नाराज

$
0
0
वीजदरवाढीची घोषणा फसवी असल्याने महाराष्ट्रातील उद्योजकांचा भ्रमनिरास झाल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी कर्नाटकचे लघुउद्योगमंत्री प्रकाश हुक्केरी यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.

विजय टिपुगडे यांच्या चित्रकलेचे ‘रंग-दंग’

$
0
0
येथील युवा चित्रकार विजय टिपुगडे यांच्या निसर्गचित्राचे विक्रमी प्रदर्शन ‘रंग-दंग’ हे एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनच्या मोठ्या कलादालनामध्ये होणाऱ्या या प्रदर्शनात २५० चित्राकृती मांडण्यात येणार आहे.

लक्ष्मीनारायण संगीत विद्यालयाची रौप्यमहोत्सवी वाटचाल

$
0
0
कोल्हापुरातील प्रथितयश तबलावादक महेश देसाई यांनी १९८९ साली श्री लक्ष्मीनारायण संगीत विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयाच्या माध्यमातून गेली २४ वर्षे अखंडितपणे गायन, संवादिनी, तबलावादन यांचे शिक्षण दिले जाते.

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ‘होलिक्रॉस’च्या विद्यार्थिनींची निवड

$
0
0
होलीक्रॉस स्कूलच्या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘पॉवर बेच’ प्रोजेक्टची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे. यामध्ये या विद्यार्थिनींना विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

शिरोली एमआयडीसीत रस्त्यांची दुरुस्ती

$
0
0
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजुंच्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले होते. याबाबत अनेकदा तक्रार करूनही रस्त्यांचे काम हाती घेतले गेले नव्हते.

नेताजींचे जीवनकार्य समजून घेण्याची संधी

$
0
0
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती मिळण्याची संधी येथील व्हाइट आर्मी या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील आझाद हिंद मंच यासंस्थेच्या सहकार्याने शाहू स्मारक भवन येथे हे प्रदशर्न सुरू आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी जनरेटरची गरज

$
0
0
जयंती नाल्यावरील सांडपाणी नवीन एसटीपी प्रकल्पाकडे उचलण्यासाठी जादा क्षमतेचे पंप बसवण्यात आले. पण वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर त्यांना जनरेटरकडून आवश्यक वीजपुरवठा होत नसल्याने जरी अर्धा तास वीजपुरवठा खंडीत झाला तर नाला ओसंडून वाहण्याची नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

प्रजासत्ताकाचा विचार होईल?

$
0
0
यंदाचा प्रजासत्ताक दिन उद्या (रविवार) आहे. हक्काच्या राष्ट्रीय सुटीचा दिवस रविवारीच आल्यामुळे तो वाया जाणार. हक्काची सुटी शनिवारी किंवा सोमवारी आली असती तर दोन दिवस जोडून सुटीचा मनसोक्त आनंद लुटला असता, पण एक राष्ट्रीय सुटी बुडाल्याने साऱ्यांनाच हळहळ वाटतेय. (शिक्षक, प्राध्यापक सरकारी नोकरदार यांना जरा जास्त हळहळ वाटणार) खरं आहे ना! पण काय करणार?
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images