Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिसांचा पगार थांबविण्याचा इशारा

$
0
0
निवडणुकांमध्ये मतदानापासून पोलिस वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीबाबतची सर्व माहिती संकलित करून द्यावी असे पत्र जिल्हा निवडणूक शाखेने पोलिस प्रशासनाने पाठविले आहे.

फेथ फाउंडेशनचा आज वर्धापनदिन

$
0
0
सामाजिक कार्यासाठी स्थापन झालेल्या फेथ फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन बुधवारी (२२ जानेवारी) साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून राबविण्यात आलेल्या महालक्ष्मी जीवन योजनेचे उद्धाटन केले जाणार आहे.

बांधकाम कामगारांचा आज मोर्चा

$
0
0
बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने केलेल्या २५ घोषणांची अंमलबजावणी करावी, यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी (दि. २२) शाहूपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

पुण्याचे ‘पारंब्या’ राज्यात पहिले

$
0
0
राज्य बालनाट्य स्पर्धेत पुणे व कोल्हापूर केंद्रातून पुण्याच्या बाबा महाराज सहस्रबुद्धे विद्यामंदिरच्या ‘पारंब्या’ या नाटकाने पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली.

चित्र

$
0
0
प्रदर्शनीमध्ये प्रदर्शनासाठी भिंतीवर लटकवलेलं चित्र, चित्रांची मांडणी करणाऱ्या नोकरानं नजरचुकीनं म्हणा, बेपर्वाईनं म्हणा किंवा बाय डिफॉल्ट असलेल्या ह्या दोन्हीच्या नोकरशाही सवयीनं म्हणा, चित्राची खालची बाजू वर करून लटकवलं होतं किंवा वरची बाजू खाली करून, असंही म्हणता येईल.

राजपथावर घुमणार ‘कोल्हापूर ग्रुप’चा आवाज

$
0
0
नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी होणारे संचलन म्हणजे भारतीय लष्कराच्या वैभवाचे दर्शन. भारतीय सैनिकांचे दिमाखदार संचलन आणि ‌िववि‌ध राज्यांचे चित्ररथ यामुळे ‘रिपब्लिक डे परेड’ आकर्षणाचा केंद्रबिंदू. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेटसच्या दृष्टीने प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी निवड म्हणजे शाळा आणि कॉलेज जीवनातील सर्वोच्च सन्मान.

आर्टगॅलरीत फुलणार ‘रंगबहार’

$
0
0
गेल्या ३६ वर्षांपासून मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी टाउन हॉल बागेतील हिरवळीवर फुलणाऱ्या ‘रंगबहार’ या अनोख्या आविष्कारातून आकाराला येणाऱ्या तब्बल साडेतीनशे चित्रकृती लवकरच आर्ट गॅलरीच्या वॉलवर हक्काची जागा पटकावणार आहेत.

महोत्सवाची पर्वणी

$
0
0
गेला महिना-दीड महिना कोल्हापुरातील वातावरणात सांस्कृतिक इंद्रधनुष्य खुलला आहे. राज्यस्तरीय युवा महोत्सवात उधळलेल्या युवारंगांपासून सुरू झालेली महोत्सवांची नांदी नुकत्याच संपलेल्या ग्रंथ महोत्सवासोबत संपली. तर वाचनसंस्कृतीचे महत्त्व सांगणाऱ्या आणि पुस्तकांच्या राज्याची सफर घडवणाऱ्या ग्रंथ महोत्सवाने वैचारिक खाद्यही पुरवले.

सांगलीवाडीतील टोलवसुली बंद पाडली

$
0
0
प्रत्येक वेळी कायदा हातात घेतल्यावरच सरकारला जाग येणार काय? असा सवाल करीत सांगलीतल्या टोलविरोधी कृती समितीने बुधवारी सांगली बंद ठेवून नागरिकांनी सर्वपक्षीय मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

‘हेमरस’ची उद्या ऊस वाहतूक रोखणार

$
0
0
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस कारखान्याकडून चंदगड तालुक्यातील ऊस डावलून कागल, भुदरगड व कर्नाटकातील उसाची उचल केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हलकर्णी येथील माजी सैनिक बेपत्ता

$
0
0
पेन्शनच्या कामासाठी ग्वाल्हेरला जातो असे घरी सांगून गेलेले माजी सैनिक पांडुरंग वाकोजी प्रधान (वय ५०, रा. हलकर्णी, ता. चंदगड) बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सौ. रंजना पांडुरंग चव्हाण यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.

आणखी एक जमीन गैरव्यवहार उघड

$
0
0
आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पांतर्गत आंबाडे व किटवडे येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीची पर्यायी व गावठाणासाठीची जमीन पूर्वपरवानगीशिवाय विक्री अथवा इतर घटकांना देऊ नये, असे जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही तत्कालीन तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतचे व्यवहार परस्पर उरकून टाकले.

मुरुक्टे जंगलात सापडला गव्याचा मृतदेह

$
0
0
मुरुक्टे (ता. भुदरगड) येथील जंगलात गव्याचा मृतदेह आढळून आला. जंगलात दुर्गंधी पसरल्याने वनपाल व कर्मचाऱ्यानी मागोवा घेतला असता हा मृतदेह सापडला. दोन दिवसांपूर्वी कड्यावरून पडल्याने या गव्याचा मृत्यू झाला असावा, असा वनखात्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कार नदीत कोसळून वारूळजवळ दोघे ठार

$
0
0
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारुळजवळ कार नदीत कोसळून दोघेजण जागीच ठार झाले. अमित रमेश पंडीत (वय २९, रा. ओगलेवाडी व चालक प्रशांत आबासाहेब जाधव (वय ३८, रा. आगाशिव नगर, कराड) अशी मृतांची नावे आहेत.

लाकूड व्यापाऱ्यांचे उपोषण मागे

$
0
0
आजऱ्याच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची बदली करण्यासाठी छेडण्यात आलेले येथील लाकूड व्यापाऱ्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन अखेर आमदार के. पी. पाटील व संध्यादेवी कुपेकर यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.

पंचगंगेतून उपसा सुरू करा

$
0
0
काळम्मावाडी योजनेला कालावधी लागणार असल्याने पंचगंगा नदीतील पाण्याचा वापर उद्योगासाठी करावा यासह शहरातील विविध नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

रघुनाथदादांच्या एंट्रीने ‘आप’ला शेतकरी चेहरा

$
0
0
देशाच्या राजधानीची सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र लोकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी आवश्यक असलेला व्यापक पाया या पक्षाकडे नाही. सोशल मीडियाच्या आधारावर हा पक्ष ग्रामीण भागात हातपाय पसरू शकत नाही.

प्रशांत हर्षद कोर्टापुढे शरण

$
0
0
सांगली जिल्हा परिषदेतील सुमारे ५५ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील संशयित प्रशांत हर्षद सोमवारी येथील कोर्टापुढे शरण आला. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मंगळवारी विश्रामबाग पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला आहे.

प्राणिगणनेसाठी २५ कॅमेरे

$
0
0
चांदोली अभयारण्यात सध्या प्राणी गणनेचे काम सुरू आहे. अभयारण्यात २५ ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. २१ लाइनवर सुमारे ६० कर्मचारी गणनेचे काम करीत आहेत, अशी माहिती वनअधिकारी एस. एल. झुरे यांनी दिली.

रेशनकार्ड फेरसर्व्हेची मागणी

$
0
0
मोटणवाडी-रायंदेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीमधील बीपीएल रेशनकार्ड लाभार्थ्यांना उत्पन्नाचे चुकीचे निकष लावल्याने या गावचा फेरसर्व्हे करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच शिवाजी गावडे यांना तहसीलदार बी. आर. माळी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images