Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोषण आहारातील पोती सील

0
0
पोषण आहारातील गैरव्यवहारप्रकरणी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जयविजय विद्यामंदिरात तांदळाच्या पोत्यामध्ये तूट आढल्याने ही पोती सील करण्यात आली.

गावठी दारू दुकाने उदध्वस्त करणार

0
0
आजरा तालुक्याती कोळ‌िंद्रे येथे चार गावठी दारू दुकाने आहेत. यामुळे कोळींद्रेबरोबरच आजूबाजूचे वातावरण बिघडले आहे. पोलिसांकडून याकडे हेतूपुरस्सर डोळेझाक होत असते.

‘डीडी’ गटावरील वर्चस्वावरून शाहूपुरीत दहशत

0
0
‘डीडी’ गटावरील वर्चस्वावरून काटे गटाने शाहूपुरी पाचव्या गल्लीत दहशत माजवताना चार मोटारसायकली व कारचे नुकसान करून दहशत माजवली. बी.टी. कॉलेज चौक व शाहूपुरी पाचव्या गल्लीत अर्धा तास वाहने व घरांच्यावर दगड, विटा व बिअरच्या बाटल्या फेकल्याने नागरिक भयभीत झाले.

जनता बझारच्या जागा ताब्यात घेणार

0
0
हायकोर्टाने महापालिकेला कारवाईसाठी मोकळीक दिल्याने महिनाभरात जनता बझारच्या चार ठिकाणच्या जागा महापालिका ताब्यात घेणार आहे.

कामगार कार्यालयाला मनसेचे नोटांचे तोरण

0
0
शहर आणि जिल्ह्यातील गॅस एजन्सी मालक भ्रष्टाचाराला पाठिशी घालत आहेत, असा आरोप करीत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या फलकाला नोटांचे तोरण बांधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध व्यक्त केला.

अंगणवाडी सेविकांचे भीक मांगो आंदोलन

0
0
पेन्शन योजना जाहीर करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. तर टाऊन हॉल ते मध्यवर्ती बसस्थानक दरम्यानच्या रस्त्यावर हातात थाळया घेवून भीक मांगो आंदोलन केले.

अधिकारी घालताहेत नगरसेवकांना मध्यस्थी

0
0
‘रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराबरोबर ‘चर्चा’ करण्यासाठी नगरसेवकाला महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांना मध्यस्थी घालत आहेत,’ गंभीर आरोप नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.

फेरमूल्यांकन आवश्यकच

0
0
कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पाच्या पाहणीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालातील निष्कर्ष सोमवारी हायकोर्टापुढे सादर करण्यात आले. कामाचा दर्जा समाधानकारक नसण्याबरोबरच अपूर्ण कामांमुळे अपघातांचा धोका असल्याचे निष्कर्ष अहवालात आहेत.

शेंगतेल किलोमागे ४० रुपयांनी स्वस्त

0
0
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये गुजरात, राजस्थानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच कमी प्रतीच्या उत्पादनामुळे शेंगदाणा निर्यातीवर बंदी आली आहे.

गव्यांवर दुहेरी संकट

0
0
राधानगरी अभयारण्याची शान असणाऱ्या गव्यांवर आता संकटाची मालिका सुरू झाली आहे. शेतीच्या नुकसानीवरून गव्याच्या हत्या होत असताना आता लाळखुरकत या संसर्गजन्य रोगाचे सावट गव्यांवर पडू लागले आहे. अद्याप लाळखुरतची लागण गव्यांना झाल्याचा थेट पुरावा समोर आलेला नाही.

सिंह यांचा रणचंडिकेचा अवतार

0
0
‘अॅडिशनल एसपींनी तुमच्या हद्दीत येऊन रेड टाकत असताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तुम्हाला मस्ती चढली असली तर उतरायला लागेल. अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे तुम्हाला सस्पेंड करावे लागेल,’ असा सज्जड दम अतिरिक्त पोलिस अधिक्षक ज्योत‌िप्रिया सिंह यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या डीबी ब्रँचला दिला.

५९ वस्तू एलबीटीमधून वगळल्या

0
0
अन्नधान्य, गूळ, भाजीपाला, पुस्तके आदी जीवनावश्यक ५९ वस्तू एलबीटीमधून वगळण्यात आल्या असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

0
0
प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास येत्या दोन फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिले.

सोने पे सुहागा

0
0
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य प्रमाणपत्र आणि आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत स्टार ( स्टॅण्डर्ड ट्रेनिंग असेसमेंट अॅण्ड रिवॉर्ड ) योजना राबविण्यात येणार आहे. ज्वेलरी उद्योगामध्ये असलेल्या लोकांची उत्पादकता वाढविण्यासाठी अखिल भारतीय जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन आण कोल्हापूर ज्वेलर्स असोसिएशन यांच्या समन्वयातून शहरातील कारागीरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आघाडी सरकारकडून राज्याचा विकास

0
0
विकासात गुजरात राज्य अग्रेसर असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. ते खोटे आहे. काम कमी आणि प्रचार जास्त असा भाजपचा नारा सुरू आहे. मात्र, राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या चौदा वर्षात मोठा विकास केला आहे असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केले.

काळम्मावाडी धरणग्रस्तांचे आंदोलन सुरूच

0
0
प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्तांनी सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू ठेवले. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठींबा जाहिर करत जिल्हा प्रशासनाला बैठक आयोजित करण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन दिले.

चित्रकार माजगावकर यांचा गौरव

0
0
कोल्हापुरातील ज्येष्ठ चित्रकार गणपत शंकर माजगावकर यांना चित्रकलेतील समर्पण व योगदानाबद्दल मुंबई येथील आर्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेमार्फत सोसायटीच्या ९६ व्या कलाप्रदर्शनात मनोहर नायक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विनाअनुदान सेवा मान्यतेचा २८ हजार शिक्षकांना लाभ

0
0
खासगी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील विनाअनुदान काळातील सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत आणि समितीची प्रलंबित असलेली मागणी मान्य झाल्याचे समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी कळविले आहे.

ज्वेलरी रिटेल ट्रेनी अभ्यासक्रम सुरू

0
0
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ज्वेलरी व्यवसायासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्टार योजने अंतर्गत सोमवारी ज्वेलरी रिटेल ट्रेनी अभ्यासक्रमास सुरूवात झाली.

‘गुगल अब्लेझ’मध्ये केआयटीचे वर्चस्व

0
0
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉ‌लॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्यामध्ये घेण्यात आलेल्या गुगल अब्लेझ या कार्यक्रमातील विजेत्यांच्या नावांची घोषणा सोमवारी सायंकाळी करण्यात आली. चार प्रकारात झालेल्या स्पर्धेंत केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images