Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संघर्ष नको, समन्वयाने घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरातील बुडीत ऊस उचलणे, घसरणारा साखर उतारा, कर्नाटक सरकारची झोनबंदी आणि हंगामाचा कमी कालावधी, या पार्श्वभूमीवर कारखाने सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी संघर्षाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घ्यावी, असे आवाहन कारखानदारांनी केले. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर कारखानदार प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

शनिवारी सायंकाळी कारखाने सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेत अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यतेखाली कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी कारखानदारांच्या अडचणी मांडल्या. ते म्हणाले, 'नवीन सरकार स्थापन न झाल्याने मंत्रिगटाची स्थापना झालेली नाही. हंगाम सुरू करण्यासाठी गाळप परवाने दिलेले नाहीत. स्वाभिमानी संघटनेची जयसिंगपुरात २३ नोव्हेंबरला ऊस परिषद होत असून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिषद झाल्यानंतर आणि ऊसदर जाहीर केल्यानंतर कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. महापुराने उसाचे नुकसान झाले असून, पूरबाधित ऊस तोडून लावण करण्यासाठी रान मोकळे करून द्यावे लागणार आहे. कर्नाटकने झोनबंदी केली असून, महाराष्ट्र सरकारने झोनबंदी न केल्याने बेडकिहाळ, हालसिद्धनाथ, संकेश्वर, गोकाक या कारखान्यांकडे सीमाभागातील ऊस जात आहे. त्यामुळे कारखाने लवकर सुरू करण्याची गरज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांनी यापूर्वी दरातील स्पर्धेमुळे एफआरपीपेक्षा जादा रक्कम दिली आहे. कारखाने मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, यंदा रिकव्हरी कमी होणार असल्याने कारखाने आणि ऊस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्यामुळे कारखानदारांच्या अडचणी सांगून त्यात मार्ग काढण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा केली जाईल.'

कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून खासदार मंडलिक, आमदार आवाडे, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार के. पी. पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मनोहर जोशी, पी. जी. मेढे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

आमदार आवाडे म्हणाले, 'नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले असून, उसाचे शेंडे मोडले आहेत. डोळे फुटले असून तो ऊस कसा काढायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तोडणी मजुरांना समजावून सांगावे लागणार आहे. बुडीत क्षेत्रातील साखर उतारा चार ते पाच टक्क्यांनी, तर अतिवृष्टीमुळे अन्य ठिकाणच्या उताऱ्यात दोन टक्क्याने घट येणार आहे. शेतकरी आणि कारखानदारांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतकरी संघटनांनी सामजस्यांची भूमिका घ्यावी.'

बैठकीला शाहूचे अमरसिंह घोरपडे, भोगावतीचे उपाध्यक्ष उदय पाटील, हेमरसचे जनरल मॅनेजर सुधीर पाटील, महाडिक शुगरचे जयधवल पाटील, अथणी शुगर्स तांबाळेचे योगेश पाटील, दत्त दालमियाचे एन. सी. पालीवाल, संग्राम पाटील, पंचगंगा कारखान्याचे सी. एस. पाटील, अथर्व शुगर्सचे मानसिंग खोराटे, आदी उपस्थित होते.

०००००००

पुढील वर्षी एफआरपी कमी होणार

महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदा साखर उतारा घटणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी कमी एफआरपी भरणार आहे. एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असून, पुढील वर्षी साखर उतारा घटला तरी ऊस उत्पादकांना फटका बसू नये याची काळजी कारखानदार घेतील, अशी प्रतिक्रिया कारखानदारांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

००००

फोटो कॅप्शन :

साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात जिल्हा बँकेत आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यतेखाली शनिवारी कारखानदारांची बैठक झाली. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, माजी के. पी. पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाइन बाजारमधील वृक्षसंपदा जपण्यासाठी धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना बुधवार पेठेत पोलिस लाइनमध्ये पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी काम सुरू आहे. येथे बांधकामांना अडथळा ठरणारी दोन मोठी झाडे तोडण्याचा घाट घातला जात आहे. शहरातील ही वृक्षसंपदा जतन करुन बांधकाम करावे' अशा मागणी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पोलिसांना निवारा देण्यासाठी जुना बुध‌वार पेठेत पोलिस वसाहत होती. बैठ्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने या ठिकाणी चांगला निवारा देण्यासाठी अपार्टमेंट उभारण्यात येणार आहे. मात्र, अपार्टमेंटच्या विकास आराखड्यानुसार सुमारे ७० वर्षांपूर्वीची दोन झाडे तोडण्यात येणार आहेत. नवीन बांधकामांमुळे या झाडांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जुन्या वृक्षसंपदेवर दरवर्षी चार महिने स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो असा दावा पर्यावरणप्रेमींचा आहे. त्यामुळेच ही वृक्षसंपदा जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यादव यांनी आयुक्तांशी पत्रव्यवहार करून झाडे न तोडण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार, आमदारांचा निधी आठवडाभरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर व जिल्हा नागरी कृती समितीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शनिवारी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांनी ऐच्छिक फंडातील प्रत्येकी २५ लाख रुपायांचा निधी देण्याचे मंजुरीपत्र आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले. मंगळवारी (ता. १९) महापालिका त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणार आहे. त्यानंतर आठ दिवसांत हा निधी महापालिकेच्या खात्यावर वर्ग होईल. त्यातून रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लागणार आहेत.

शहरातील खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडील निधी अपुरा पडत असल्याने कामावर मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी रस्तेप्रश्नी स्थापन झालेल्या कृती समितीने केली होती. त्याबाबत शुक्रवारी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. मंडलिक व आमदार पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख असे एकूण ७५ लाख रुपये रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेला देण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार शनिवारी ऐच्छिक निधीचे मंजुरी पत्र खासदार, आमदारांच्यावतीने कृती समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना केली. शिवाय, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही तातडीने प्रस्ताव सादर करा अशी सूचना महापालिकेला केली.

लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रानुसार मंगळवारी महापालिकेकडून निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. 'लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रानुसार व महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार आठ दिवसांत निधी खात्यावर वर्ग होईल. तत्पूर्वी सोमवारपासून निविदा प्रक्रिया राबविली जाईल' असे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले.

आयुक्तांना पत्र देताना कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, फत्तेसिंग सावंत, माजी नगरसेवक विनायक फाळके, अमर पाटील, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, राजू भोसले आदी उपस्थित होते.

कामांचे सोशल ऑडिट

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत सरकारकडे १७६ कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर रस्ते दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींकडून ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेच्या दीड कोटींच्या स्वनिधीतून पॅचवर्क सुरू आहे. नवीन रस्त्यांची चार कोटी ७६ लाखांची कामे मंजूर झाली आहेत. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यासाठी कामाचे सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनीअर्सने पुढाकार घेतला आहे. अन्य सामाजिक संस्था व व्यक्तींनीही संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदार, शेतकरी संघटनात आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर हंगामासाठी कारखाने सुरू करण्यासंदर्भात कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज, रविवारी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीत कारखाने सुरू करण्यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे.

कारखानदारांची शनिवारी सायंकाळी जिल्हा बँकेत आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत हंगाम सुरू करण्याबाबत चर्चा झाली. महापूर आणि अतिवृष्टीने ऊस उत्पादन घटणार असून लवकर कारखाने सुरू होण्याची गरज कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. शेतकरी संघटनांनी संघर्षाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकरी संघटनांसमवेत खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, 'दत्त'चे अध्यक्ष गणपतराव पाटील चर्चा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी विरोधासाठी उद्या विमाप्रतिनिधींचा मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमा ग्राहकांच्या पॉलिसींवर लादलेला जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता.१७ ) विमा प्रतिनिधींचा विभागीय मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये रक्तदान करुन तीव्र निदर्शनेही केली जाणार आहेत, असे लाइफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर डिव्हीजनल कौन्सिलचे अध्यक्ष शरद हुक्केरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन केले आहे.

हुक्केरी व जनरल सेक्रेटरी शिरीष कुलकर्णी म्हणाले, 'सकाळी नऊ वाजता मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये होणाऱ्या मेळाव्यास कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील दोन हजाराहून अधिक विमा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नयनकुमार कमल, विभागीय अध्यक्ष सुधीर पाध्ये, रफीक डोसाणी हे मार्गदर्शन करतील. मुंबई येथील मुकेश जोशी यांचे प्रशिक्षण शिबिरही घेण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान करुन अनोख्या पद्धतीने निदर्शने केली जाणार आहेत. या मेळाव्यामध्ये विमा ग्राहकांच्या पॉलिशीवर व लेट फीवर लादलेला जीएसटी कर रद्द करुन पॉलिसीवरील बोनस वाढवावा ही आग्रही मागणी ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रतिनिधींना प्रॉव्हिडंट फंड मिळावा, कुटुंबासह प्रतिनिधींना २० लाख रुपयांचा ग्रुप मेडिक्लेम हयातीपर्यंत मिळावा, त्यापैकी ५० टक्के प्रिमीअम एलआयसीने भरावा अशा ४० हून अधिक मागण्या करण्यात येणार आहेत.' यावेळी अजय कापसे, अतुल पाटील, राजाराम घाटगे, सतीश पंदारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाच्या तोट्यास विरोधक जबाबदार

'गोकुळ'च्या निवडणुकीचे पडघम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी कच्ची मतदारांची यादी तयार करण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. कच्च्या यादीसाठी दूध डेअरीतून मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव गोळा करण्यासाठी संचालक मंडळाकडून फिल्डिंग लावली जात आहे. एप्रिल २०२० मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. यावपूर्वी २३ एप्रिल २०१५ मध्ये गोकुळची निवडणूक झाली. मुदत संपत आल्याने प्रशासाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी सहकार खात्यातील निवडणूक प्राधिकरणाला कळवले आहे. पुणे विभागीय सहकार संस्था उपनिबंधकांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कच्ची यादी करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रत्येक दूध संस्थेकडून मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव द्यावा लागतो. ठरावांची छाननी होऊन जानेवारी २०२०च्या दुसऱ्या आठवड्यात पक्की यादी तयार होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. गेल्या निवडणूकीत सत्ताधारी पॅनेलला विरोधी आघाडीने मोठे आव्हान दिले होते. सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेराव महाडिक यांनी केले. त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. विरोधी पॅनेलचे नेतृत्व सतेज पाटील यांनी केले. विरोधी पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले. काही उमेदवार थोडक्या मताधिक्याने पराभूत झाले होते. पण गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकारणात पुलाखालून पाणी वाहून गेले असून समीकरणे बदलली आहेत. सत्ताधाऱ्यांकडून गोकुळ मल्टिस्टटच्या प्रस्तावाला आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी विरोध केला होता. पण, सत्ताधाऱ्यांनी मल्टिस्टेटचा हेका सोडला नसल्याने त्याचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत बसला. आता त्यांना उपरती आली असून मल्टिस्टेटचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात रद्द केला गेला. आगामी निवडणूकीवरही मल्टिस्टेटचे पडसाद उमटणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमुळे राजकीय समिकरणे बनली आहेत. आमदार सतेज पाटील यांनी निवडणूकीसाठी शड्डू ठोकल्याने सत्ताधारी सावध झाले आहेत. संचालकांनी ठराव गोळा करण्यासाठी फिल्डिंग लावली असून आपले समर्थक ठरावधारक असावेत यासाठी संचालकांनी यंत्रणा कार्यरत केली आहे. त्यासाठी चर्चा, बैठका सुरू असून आश्वासनेही दिली जात आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे संचालकाकडून रणनिती सुरू असली तरी विरोधकांनी जय्यत तयारी केली आहे. डिसेंबरमध्ये ठराव जमा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वाढीव सभासदांचा कौल महत्वाचा गोकुळच्या २०१५ च्या निवडणूकीत ३२६३ पात्र सभासद होते. या निवडणूकीत नवीन ३९६ सभासदांची भर पडली. नोंदणी झालेल्या सभासदांवर विरोधकांकडून आक्षेप घेण्याची शक्यता असल्याने नवीन किती सभासद पात्र ठरणार? याकडे दूध संस्थांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुजावर यांचे व्यंगचित्रांतून रस्ते समस्यांवर फटकारे

$
0
0

फोटो आहे म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांमुळे वाहनधारक त्रस्त बनले आहेत. वाहतुकीची कोंडी आणि खड्ड्यांतून वाट काढताना नागरिक मेटाकुटीला येत आहेत. नागरिकांच्या नेमक्या याच भावना आणि शहरातील खड्ड्यांची दुरवस्था व्यंगचित्रकार शिराज मुजावर यांनी व्यंगचित्रांतून मांडली आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी यंत्रणेवर फटकारे मारले आहेत. मुजावर यांच्या व्यंगचित्रांच्या प्रात्यक्षिकांचे शहरातील विविध भागात आयोजन केले आहे. नेशन फ्रेंड्सने पुढाकार घेतला आहे. गंगावेश येथे शुक्रवारी प्रात्यक्षिके झाली. नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी विजय तायशेट्ये, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, विवेक कुलकर्णी, कुलदीप नाळे, सुप्रिया मोहिते, ओंकार खराडे, निखिल मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत भवानी मंडप येथे प्रात्यक्षिके झाली. शहरातील खड्ड्यांसह विविध समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. रविवारी (ता.१७) सकाळी रंकाळा चौपाटी येथे व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके होणार आहेत. ०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराष्ट्रीय रेशीम परिषदेसाठीडॉ. ए.डी. जाधव जपानला रवाना

खड्ड्यांनी झाली दैना

$
0
0

गेल्या दोन-तीन वर्षांत महापालिकेच्या प्रशासनाकडून रस्त्यांची डागडुजी न झाल्याचा फटका शहरवासियांना बसत आहे. त्यात यंदाचा महापूर, अतिवृष्टी यांची भर पडली आहे. बहुतांश रस्त्यांची चाळण झाल्याने चांगला रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची हाडेच खिळखिळी करण्याचे काम रस्ते करीत आहेत. वाहने नादुरुस्त होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. 'मटा'च्या टीमने मुख्य रस्त्यांची पाहणी केल्यावर नऊ प्रमुख रस्त्यांवर १५०० हून अधिक खड्डे आढळून आले आहेत. रस्त्यांच्या सद्यस्थितीचा हा टीम मटाने केलेला रिपोर्ट.

कोल्हापूर टाइम्स टीम

महानगरपालिकेच्यावतीने गेल्या आठवड्यापासून रस्त्यांच्या पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली. पण, बहुसंख्य रस्ते पॅचवर्कच्या पलिकडे गेले आहेत. खराब स्थितीमुळे लहान-मोठे अपघात तर नित्याचेच बनले आहेत. महापालिकेकडे निधी अपुरा असल्याने दुरुस्तीचे कामही पूर्ण होणार नसल्यासारखी स्थिती आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असताना अतिवृष्टी आणि महापुरामुळे त्यामध्ये अधिक भर पडली. सद्यस्थितीत शहरातील २९९ किलोमीटरचे रस्ते खराब असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी नोंद आहे. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करायची म्हटले, तरी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे २१० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यापैकी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील १७६ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर असल्याचे सांगितले जाते. पण, हा निधी मिळणार कधी आणि रस्त्यांची दुरुस्ती होणार कधी? असा प्रश्न आहे. त्यामुळे शहरात दररोज आंदोलनांच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात ये-जा करणारे प्रमुख नऊ मार्गांचा 'महाराष्ट्र टाइम्स'च्या टीमने रविवारी सर्व्हे केला. या नऊ मार्गावर तब्बल १,५०० खड्ड्यांचे अस्तित्व दिसून आले. अनेक ठिकाणी रस्त्याचा वरचा थरच नष्ट झाल्याचे दिसले. प्रमुख मार्गावरील रस्त्यांची अशी अवस्था असताना गल्लीबोळातील रस्त्यांची तर त्याहून बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनाने या सर्व रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती न केल्यास शहरवासियांच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता आहे.

- दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची गरज

- रस्ते दुरुस्तीसाठी २१० कोटी रुपयांचा प्रस्ताव

- सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून १७६ कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

- शहरातील २९९ कि.मी. रस्ते खराब झाल्याची महापालिकेकडे नोंद

खरी कॉर्नर ते बाबूजमाल रोड

खरी कॉर्नर परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने येथे विद्यार्थी, पालकांसह अन्य वाहनधारकांची नेहमीच वर्दळ असते. खरी कॉर्नर ते गांधी मैदान विभागीय कार्यालयापर्यंत सात खड्डे असले, तरी या मार्गावर डांबराच्या लाटा तयार झाल्या आहेत. ड्रेनेजचे चेंबर रस्त्यापेक्षा उंच झाल्याने रस्त्यावरील प्रवास अत्यंत धोकादायक आहे. अशीच स्थिती गांधी मैदान ते निवृत्ती चौकापर्यंत दिसून येते. या रस्त्यावर मोठे खड्डे नसले, तरी बारीक खडी सर्वत्र पसरली आहे. निवृत्ती चौक ते वांगी बोळापर्यंतच्या केवळ ५०० मीटर अंतरात १७ खड्डे आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करण्यापेक्षा अन्य मार्गांचा आधार वाहनधारक घेतात. तेथून अवघ्या ५० मीटर अंतरावरील मोठा खड्डा तर अपघाताला निमंत्रणच देतो. नंतरचा सुमारे दीडशे मीटरचा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. सरस्वती चित्रमंदिर ते बाबूजमाल दर्गा रोडवर पुष्कराज मित्र मंडळापर्यंतचा रस्ताच गायब झाला आहे. येथे खड्ड्यांपेक्षा चांगला रस्ता दुर्बिणीने शोधावा लागेल अशी स्थिती आहे. शहराच्या अत्यंत रहदारीच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर ४४ ठिकाणी खड्डे पडले आहेत.

३० फूट अंतरात १७ खड्डे

मिरजकर तिकटीकडून दैवज्ञ बोर्डिंगकडे जाणारा रस्ता मे २०१८ मध्ये तयार केला गेला. या रस्त्यावर सर्वत्र बारीक खडी वर आली आहे. त्यामुळे मोटारसायकली घसरत आहेत. विठोबा मंदिराजवळ केवळ ३० फूट अंतरात तब्बल १७ खड्डे पडले आहेत. दुतर्फा लावलेली वाहने आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

पॉइंटर

- खरी कॉर्नरवरील ड्रेनेज चेंबर धोकादायक

- बाबूजमाल रोड ते पुष्कराज मित्र मंडळापर्यंतचा रस्तावरील डांबर गायब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यासह पालेभाज्यांचे दर चढेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

या आठवड्याच्या बाजारातही कांद्याचा दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपये कायम आहे. बाजारात पालेभाज्यांची दरवाढ कायम आहे. कोबी आणि फ्लॉवर गड्ड्याचीही चढ्या किमतीने विक्री सुरू आहे.

परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसल्याने आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर भडकलेले आहेत. लहान आकाराचा कांदा प्रतिकिलो ३० रुपये असून मध्यम आकाराच्या कांद्याचा दर ५० रुपये आहे. मोठा आणि चांगल्या दर्जाच्या कांद्याचा दर ६० रुपयांवर टिकून आहे. लसूणाचा दर १४० ते १६० रुपये तर आल्याचा दर १०० ते १२० रुपयांवर कायम आहे.

पालेभाज्यांची आवक जादा असली तरी मेथी पेंढीचा दर २० रुपये आहे. पोकळा, कांदा पात, करडा, पालक, शेपू पेंढीचा दर १० ते १५ रुपये आहे. कोथिंबीर पेंढीचा दर ३० ते ४० रुपये आहे. वांगी, दोडका, भेंडी, वरणा, श्रावण घेवडा, बेळगावी घेवड्यांचे दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये आहेत. फळभाज्याचे दर आवाक्यात असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचा दर प्रतिकिलो ३० रुपयांवर स्थिर होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ६०

टोमॅटो : ३०

भेंडी : ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ५० ते ६०

कारली : ४० ते ६०

वरणा : ६० ते ८०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : ३०

लसूण : १२० ते १४०

कांदा : ३० ते ६०

आले : १०० ते १२०

मुळा : १० ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १५ ते २०

कांदा पात : १० ते १५

कोथिंबीर : ३० ते ४०

पालक : १० ते १५

शेपू :१० ते १५

चाकवत : १० ते १५

करडा : १० ते १५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ४० ते ८०

सिताफळ : ४० ते ६०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुटकी गाय अन् २५ फुट उंच ऊस

$
0
0

फोटो अर्जुन टाकळकर म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर शेतीपूरक औजारांचे स्टॉल्स, शेतीक्षेत्रातील नवीन प्रयोगांची माहिती, दोन फुट उंचीची गाय ते २५ फूट उंचीचा ऊस यामुळे निर्माण चौक येथील सजीवन कृषी प्रदर्शन आकर्षण ठरत आहे. गेल्या दोन दिवसात हजारो नागरिकांनी प्रदर्शनस्थळी भेट दिली. बी बियाणे बचत गटांनी उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही गर्दी होत आहे. प्रदर्शनात शेतीसाठी लागणारे अवजारे, बी बियाणे, खते व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पद्धती, रोपवाटिका, पाणी व्यवस्थापनविषयक माहिती देणाऱ्या स्टॉल्सचा समावेश आहे. बँका आणि वित्तीय संस्थेच्या कक्षातून अर्थसहाय्य योजनांची माहिती दिली जाते. याशिवाय आयुर्वेदिक औषधे, गृहोपयोनी वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. प्रदर्शनात सुमारे १३५ स्टॉल्स आहेत. प्रदर्शनात कमी उंचीची अंबू गाय आणि २५ फुटी ऊस हे प्रमुख आकर्षण ठरले आहे. पुणे जिल्ह्यातील कणेरसर येथील सफल अरविंद जाधव यांच्या मालकीची ही गाय आहे.या गायीची उंची दोन फूट तीन इंच आहे. लांबी तीन फूट इतकी आहे. सव्वा पाच वर्षाची कमी उंचीची गाय शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरली आहे. प्रदर्शनात सुमारे पंचवीस फूट उंचीचे ऊस कुतुहलाचा विषय ठरले आहे. कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील शेतकरी विठ्ठल विश्वनाथ माळी यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीद्वारे पिकाचे उत्पादन घेतले आहे. ८६०३२ या जातीचा हा ऊस आहे. हे प्रदर्शन १८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान खासदार संजय मंडलिक, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, वृषाली कदम, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज इव्हेंटचे राज डावरे, श्रीकृपा इंडस्ट्रीजचे संभाजी कोपार्डे, शिंदे उद्योग समूहाचे अनिल शिंदे, धनलक्ष्मी इंडस्ट्रीजचे संजय बगे, युनिटी मोटर्सचे व्यवस्थापक जयकुमार किट्टे, दुर्वास कदम, व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी हा कृषी प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. एकाच छताखाली शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध झाली आहे. शेतीची औजारे, नवीन तंत्रज्ञानासंबंधीचे स्टॉल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहेत. - रविकिरण इंगवले, संयोजक, कृषी प्रदर्शन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलानजिकच्या चौकात आयलँड गरजेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलालगतच्या चौकात पूर्वीप्रमाणे आयलँड बसवावा. या भागात लवकरात लवकर विद्युत दिव्यांची सोय करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जीवदान सेवाभावी संस्थेने दिला आहे. या भागातील वाहतुकीला शिस्त लावावी असेही पत्रकांत म्हटले आहे.

पत्रकांत म्हटले आहे, 'पर्यायी पुलावरुन वाहतूक सुरू झाल्यानंतर चौकात आयलँड बसविण्याचे प्रशासनाने मान्य केले. आता वाहतूक सुरू होऊन अनेक महिने झाले. मात्र आयलँड बसविले नाही. चौकात आयलँड नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी कुचंबणा होत आहे. या ठिकाणी वाहनाचे अपघात घडत आहेत. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी पूर्वीप्रमाणे आयलँडची व्यवस्था करावी. स्पीडब्रेकर बसवावेत. वाहनधारकांनी वारंवार याकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाने वाहनधारक व नागरिकांच्या सहनशीलतेची अधिक वाट न पाहता समस्यांची सोडवणूक करावी.'

संघटनेचे अध्यक्ष अरुण खोडवे, उपाध्यक्ष भगवान खेवरे, वसंत लिंगनूरकर, सुनील निकम, सौरभ पाटील, संदीप खोडवे, अक्षय बागडी आदींनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसदरप्रश्नी चर्चा फिसकटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गळीत हंगामावेळी एफआरपीपेक्षा जादा दराची घोषणा करणाऱ्या साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर केलेल्या चर्चेत ऊस दर जाहीर करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. दर जाहीर न करता कारखाने सुरू केल्यास ते बंद पाडले जातील, असा इशाराही संघटनेने दिला. दरम्यान, साखर हंगामावर तोडगा काढण्यासाठी २५ नोव्हेंबरला पुन्हा बैठक घेण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मुहूर्ताची उसाची मोळी टाकून गळीत हंगामास सुरूवात केली आहे. गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी.वाय. पाटील साखर कारखाना आणि कागल तालुक्यातील संताजी घोरपडे कारखान्याने पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. डॉ. डी.वाय. पाटील कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानीने रोखली असून ऊस परिषदेत निर्णय झाल्याशिवाय कारखाने सुरू करु नयेत, अशी विनंती स्वाभिमानीने केल्यानंतर शनिवारी कारखानदारांची जिल्हा बँकेत बैठक झाली. बैठकीत ठरल्यानुसार रविवारी शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसोबत कारखानदारांनी दीड तास चर्चा केली. कारखानदारांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, 'राजाराम'चे मानद सल्लागार पी.जी. मेढे तर संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यासह पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले.

बैठकीची माहिती देताना आमदार आवाडे यांनी कारखानदारांची भूमिका मांडली. ते म्हणाले, 'स्वाभिमानीची २३ तारखेला ऊस परिषद असून तोपर्यंत कारखाने सुरू करु नयेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच संघटना एकरकमी एफआरपीवर ठाम असून आणखी जादा दर द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यावर कारखान्यांचे कार्यकारी संचालक चर्चा करुन निर्णय घेतील.'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र कारखानदार चर्चेत वेळ घालवून दर न जाहीर करता कारखाने सुरू करत आहेत, असा आरोप केला. प्रा. जालिंदर पाटील म्हणाले,' डी.वाय.पाटील आणि सेनापती घोरपडे कारखान्यांच्या गळीत हंगामात संजय पाटील आणि आमदार मुश्रीफ यांनी एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची घोषण केली आहे. त्यामुळे या बैठकीत कारखानदार दर जाहीर करतील अशी आशा होती. पण त्यांच्याकडून एफआरपीचे तुकडे पाडण्याची भाषा बोलली जात आहे. आम्ही समन्वयाची भाषा करत असताना कारखानदार आम्हाला गाफील ठेवून दर जाहीर करत नसल्याची शक्यता असल्याने आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे.'

........

संबंधित वृत्त २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस परिषदेनंतरच चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर उद्योग अडचणीत आहे. बुडीत ऊस काढण्याची गरज आहे असे सांगून उसाचा दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ते खपवून घेणार नाही, अशा इशारा संघटनेने रविवारी दिला. दर जाहीर न करता आणि एफआरपीचे तुकडे पाडून कारखाने सुरू करता येणार नाहीत असे संघटनेने स्पष्ट केले. संघटनेच्या ऊस परिषदेतनंतर, २५ नोव्हेंबरला कारखानदारांशी पुढील बैठक घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील तर कागल तालुक्यातील सेनापती संताजी घोरपडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २३ नोव्हेंबरला होणार असल्याने कारखाने सुरू करू नयेत अशी विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या प्रतिनिधीची जिल्हा बँकेत, अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कारखान्यांसमोर असलेल्या अडचणी मांडून हंगाम सुरू करण्याबाबत निर्णयासाठी, आज रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात कारखानदार प्रतिनिधी आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.

बैठकीत कारखानदारांकडून आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांनी बाजू मांडली. तर स्वाभिमानीकडून प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्याण्णावर यांनी भाग घेतला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आवाडे म्हणाले, 'ऊस परिषदेनंतर कारखाने सुरू करावेत असा स्वाभिमानीचा आग्रह आहे. संघटना एकरकमी एफआरपीवर ठाम असून आणखी जादा दर द्यावा अशी त्यांची मागणी आहे. तर बुडीत क्षेत्रातील ऊस काढण्यासाठी आणि कर्नाटकातील कारखाने इथला ऊस पळवत असल्याने कारखाने लवकर सुरू करण्याची भूमिका आम्ही मांडली. महापूर आणि अतिवृष्टीमुळे साखरेचा उतारा एक ते दीड टक्क्यांनी कमी होणार आहे. त्याचा फटका शेतकरी आणि कारखान्यांनाही होणार आहे. एक टक्का उतारा घटला तर साखर १० किलोने घटेल. त्याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. उसाचा दर आणि साखरेचा दर यामध्ये शॉर्टमार्जिन यापूर्वीच झाले. यंदा ते वाढणार आहे.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'स्वाभिमानीने एकरकमी एफआरपीपेक्षा जादा रक्कम द्यावी, अशी मागणी केली आहे. दरवाढीबाबत साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक चर्चा करुन निर्णय घेतील.'

राजाराम कारखान्याचे मानद सल्लागार पी. जी. मेढे यांनी यंदा साखर उतारा कमी होणार असल्याने कारखान्यांना तोटा होणार आहे. पुढील वर्षी ऊस उत्पादक आणि कारखान्यांना याच फटका बसणार असल्याचे सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका मांडताना प्रा. पाटील म्हणाले, 'उसाची एफआरपी थकल्यास व्याजासहित संबंधीत शेतकऱ्याला दराची पूर्तता करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अद्याप काही कारखान्यांनी गेल्यावर्षीची एफआरपी दिलेली नाही. एफआरपीचे तुकडे केल्याने शेतकऱ्यांचा हजार कोटी रुपयांचा तोटा झाला.'

सावकार मादनाईक यांनी, 'यंदा एकवेळ आमचे तुकडे झाले तरी बेहत्तर. पण एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही,' असा इशारा दिला.

राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, 'आमदार मुश्रीफ यांनी एफआरपीपेक्षा दिडशे रुपये जादा देतो म्हणून सांगितले होते. त्यामुळे काही तरी तोडगा निघेल असे वाटत होते. पण एफआरपी दोन, तीन टप्प्यात देऊन त्याचे तुकडे करण्याची भाषा केली जात आहे. दर जाहीर न करता कारखाने सुरू करून दाखवावे. स्वाभिमानीची काय ताकद आहे हे लक्षात येईल.'

कारखानदारांत दुफळी

बैठकीत कारखानदारांच्या शिष्टमंडळातही एकमत होत नव्हते. उसाची पळवापळवी होवू नये यासाठी कारखाने वेळेत सुरू करण्याची सूचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली. त्याला स्वाभिमानीने आक्षेप घेतला. त्यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी, 'आमचे कारखाने बंद आहेत. मग तुमचे सुरू का ठेवता?' असा सवाल पाटील यांना केल्याचे सांगण्यात आले. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीही, सतेज पाटील यांना 'आमचे कारखाने सुरू करू का?' अशी विचारणा केली. कारखानदारांतच दुफळी असल्याचे यातून स्पष्ट झाले.

कोणाचा फायदा करताय?

स्वाभिमानीचे सावकार मादनाईक म्हणाले, 'सध्या ऊस तोडणीस वातावरण पोषक नाही. उसाचे वजन वाढले नसून उतारा मिळत नाही. तोडणीला गडबड केली तर नदीकाठचा खराब झालेला ऊस तसाच शेतात राहाणार आहे. उर्वरीत उसाला अद्यापही उतारा कमी आहे. त्यामुळे सरासरी उताऱ्यात घट होऊन पुढील वर्षी एफआरपीवर याचा परिणाम होणार आहे. वजन कमी, उताराही कमी असताना लवकर ऊस तोडून कोणाचा फायदा करताय?'

फोटो ओळ‌ (अर्जुन टाकळकर)

कोल्हापुरात रविवारी शासकीय विश्रामगृहावर साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत चर्चा करताना आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर आदी.

०००

(मूळ कॉपी)

ऊस दरवाढीवर स्वाभिमानी आक्रमक, पान २

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर उद्योग अडचणीत आहे, बुडीत ऊस काढण्याची गरज आहे असे सांगून उसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. एफआरपीचे तुकडे पाडून दर जाहीर न करता कारखाने सुरू करता येणार नाहीत. असे स्वाभिमानीने स्पष्ट केले. कारखानदारांशी पुढील बैठक संघटनेच्या ऊस परिषदेतनंतर २५ नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी.वाय. पाटील तर कागल तालुक्यातील सेनापती संताजी घोरपडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २३ नोव्हेंबरला होणार असल्याने कारखाने सुरू करू नयेत अशी विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या प्रतिनिधीची जिल्हा बँकेत आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कारखानदारांसमोर असलेल्या अडचणी सांगून हंगाम सुरू करण्याबाबत आज रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात कारखानदार प्रतिनिधी आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. बैठकीत कारखानदाराकडून आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.जी. मेढे यांनी बाजू मांडली. तर स्वाभिमानीकडून प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, राजेंद्र गडण्णावर यांनी भाग घेतला.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आवाडे म्हणाले, स्वाभिमानीच्या ऊस परिषदेनंतर कारखाने सुरू करावेत असा त्यांचा आग्रह आहे. संघटना एकरकमी एफआरपीवर ठाम असून आणखी जादा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. तर बुडीत ऊस काढण्यासाठी आणि कर्नाटकात इथला ऊस पळवत असल्याने कारखाने लवकर सुरू करण्याची भूमिका आम्ही मांडली. महापूर आणि अतिवृष्टीमुळे साखरेचा उतारा एक ते दीड टक्क्यांनी कमी होणार आहे. त्याचा फटका शेतकरी आणि कारखान्यांनाही होणार आहे. एक टक्का उतारा घटला तर १० किलोने साखर घटणार आहे.त्याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. उसाचा दर आणि साखरेचा दर यामध्ये शॉर्ट मार्जिन यापूर्वीच तयार झाले असून यंदा ते वाढणार आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, स्वाभिमानीने एकरकमी एफआरपीपेक्षा जादा रक्कम द्यावी, अशी मागणी केली आहे. दरवाढीबाबत साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक चर्चा करुन निर्णय घेतील.

राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.जी.मेढे यांनी यंदा साखर उतारा कमी होणार असल्याने कारखान्यांना तोटा होणार असून पुढील वर्षी ऊस उत्पादक आणि कारखान्यांना फटका बसणार असल्याचे सांगितले.

स्वाभिमानीची भूमिका मांडताना प्रा.डॉ. जालंदर पाटील म्हणाले, उसाची एफआरपी थकल्यास व्याजासहित संबंधीत शेतकऱ्याला देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र गेल्या वर्षीची एफआरपी अद्याप काही कारखान्यांनी दिलेली नाही. एफआरपीचे तुकडे केल्याने शेतकऱ्यांचा तोटा हजार कोटीचा तोटा झाला आहे. सावकार मादनाईक यांनी यंदा एकवेळ आमचे तुकडे झाले तरी बेहत्तर पण एफआरपीचे तुकडे होवून देणार नाही, असा इशारा दिला.

राजेंद्र गड्डयानवार म्हणाले, आमदार मुश्रीफ यांनी एफआरपी पेक्षा दिडशे रुपये जादा देतो म्हणून सांगितले होते. त्यामुळे काही तरी तोडगा निघेल असे वाटत होते. पण एफआरपी दोन तीन टप्प्यात देवून तुकडे करण्याची भाषा केली जात आहे. दर जाहीर न करता कारखाने सुरू करुन दाखवावेच. स्वाभिमानीची काय ताकद आहे हे लक्षात येईल.

०००००

कोणाचा फायदा करताय?

स्वाभिमानीचे सावकार मादनाईक म्हणाले, सध्या ऊस तोडणीस वातावरण पोषक नाही. ऊसाचे वजन वाढले नसून उतारा मिळत नाही. तोडणीला गडबड केली तर नदीकाठचा खराब झालेला ऊस तसाच शेतात राहाणार आहे. उर्वरीत उसाला अद्यापही उतारा कमी आहे. त्यामुळे सरासरी उताऱ्यात घट होवून पुढील वर्षी एफआरपीवरती याचा परिणाम होणार आहे. वजन कमी, उताराही कमी असे असताना लवकर ऊस तोडून कोणाचा फायदा करताय?

०००००

बैठकीत कारखानदारांच्या शिष्टमंडळात एकमत होत नव्हते. उसाची पळवा पळवी होवू नये यासाठी कारखाने वेळेत सुरू करण्याची सुचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली. याला स्वाभिमानीने हरकत घेतली. यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी आमचे कारखाने बंद आहेत. मग तुमचे का सुरू ठेवता? असा सवाल केला. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी आमचे कारखाने सुरू करू का? अशी विचारणा आमदार पाटील यांना केली.

फोटो कॅप्शन, अर्जुन टाकळकर

शासकीय विश्रामगृहावर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत चर्चा करताना आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, राजेंद्र गडण्णावर आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात उद्यापासून तीन दिवस पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर योजनेतील ११०० मिमी व्यासाच्या प्रिस्ट्रेट पाइपलाइनची गळती व क्रॉस कनेक्शन करण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता. १९) या कामाला सुरुवात होणार असल्याने तीन दिवस निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए, बी, ई वॉर्ड आणि सलंग्न उपनगरे व ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, बालिंगा, कसबा बावडा व कळंबा जलशुद्धीकरण केंद्रामार्फत नियमित पुरवठा होणार आहे.

फुलेवाडी रिंगरोड ते कळंबा साई मंदिरापर्यंतच्या डांबरीकरणास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या बाजूने शिंगणापूर योजनेतील जलवाहिनी टाकण्यात आली आहे. जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. रिंगरोडच्या कामापूर्वी जलवाहिनी दुरुस्ती करण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार मंगळवारपासून दुरुस्तीला सुरुवात होणार आहे. साळोखेनगर व बुद्धिहाळकर नगर येथे जलवाहिनी दुरुस्तीसह क्रॉस कनेक्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळ‌वार, बुध‌वार आणि गुरुवारी असा तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शिंगणापूर योजनेद्वारे पाणी येणाऱ्या ए, बी वॉर्डातील साळोखेनगर, कणेरकर नगर, बापूराम नगर, आयटीआय, कळंबा जेल परिसर, आपटेनगर, जीवबानाना पार्क तर सुभाषनगर पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी याचबरोबर मंगळवार व शिवाजी पेठेच्या काही भागांचा समावेश आहे. तर 'ई' वॉर्डातील सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, राजारामपुरी, शाहू मिल, राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, कावळा नाका, रुईकर कॉलनी, कदमवाडी, लोणार वसाहत, शिवाजी पार्क व महाडिक वसाहतीचा समावेश आहे. दुरुस्तीच्या कालावधीत ज्या भागात पाणी येणार नाही, त्या भागात महापालिका व खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅसच्या स्फोटात मुलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

फुग्यामध्ये भरावयाच्या गॅस टाकीचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सना शहानूर पठाण (वय १३) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. ही घटना रविवारी स्वामी मळा परिसरात घडली. याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी मुकेश देसू राठोड (वय २३, रा. स्वामी मळा) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी-कोल्हापूर रोडवरील स्वामी मळा परिसरातील गुजराती भवनसमोर अजित वास्कर यांच्या मालकीच्या खोल्या आहेत. याठिकाणी पठाण कुटुंबीय तसेच मुकेश राठोड हे शेजारी राहण्यास आहेत. राठोड हा गॅसवरील फुगे विक्रीचा व्यवसाय करतो. फुग्यात हवा भरण्यासाठी तो गॅस टाकीचा वापर करत होता. कार्बनडाय ऑक्साइडसह काही रसायने वापरुन तो गॅस तयार करत होता. १५ किलो वजनाची ही टाकी त्याने ती खोलीबाहेर उघड्यावरच ठेवली होती.

रविवारी शहानूर पठाण यांची मुलगी सना ही शेजारील सहकाऱ्यांसमवेत घरासमोर खेळत होती. अचानकपणे राठोडने घराबाहेर ठेवलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की खेळत असलेली सना काही अंतरावर फेकली गेली. स्फोटामुळे टाकी फुटल्याने त्याचा पत्रा लागून सनाचे दोन्ही हात आणि पाय अक्षरक्ष: तुटून पडले. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या घटनेवेळी सनाची आई रेश्मा पठाण या घरासमोर धुणीभांडी करत होत्या. डोळ्यासमोरच घडलेल्या या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला. स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी सनाला तातडीने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूरला पाठविण्यात आले. तिथे तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार, निरीक्षक ईश्‍वर ओमासे आदींनी घटनास्थळी भेट देऊना पहाणी केली.

परिसरात हळहळ

या दुर्घटनेत सनाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिचे वडील शहानूर पठाण हे सेट्रिंग काम करतात. सना ही जवाहरनगर परिसरातील उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. अनधिकृतपणे गॅस भरत असल्यासह सना हिच्या मृत्यूत कारणीभूत प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मुकेश राठोड याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संबोधी’च्या व्याख्यानमालेचाप्रारंभ महात्मा फुले स्मृतिदिनी

$
0
0

'संबोधी'च्या व्याख्यानमालेचा

प्रारंभ महात्मा फुले स्मृतिदिनी

सातारा :

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले स्मृतिदिनी २८ नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, ६ डिसेंबर या कालावधीत होणारी यंदाची ३३वी थोरांच्यास्मृती-व्याख्यानमाला 'परिवर्तनाचे दीपस्तंभ' या विषय सूत्राने गुंफली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अप्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.

फुले-आंबेडकर विचाराचा जागर करणाऱ्या या व्यख्यानमालेने साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. व्याख्यानमालेचे हे ३३ वे वर्ष आहे. नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ही व्याख्याने होणार आहेत. पहिले पुष्प महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज, या विषयावर बहुजन चळवळीचे अभ्यासक कोल्हापूर येथील रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण शिंदे गुंफणार आहेत. शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक धोरण, या विषयावर तत्वज्ञान व मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. हिंदुराव पवार, शनिवारी ३० नोव्हेंबरला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समाजकारण, या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, सोमवारी २ डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील व शतकमहोत्सवी रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, या विषयावर निवृत्त रयत सेवक अंनिसचे कार्यकर्ते प्रा. आर. वाय. जाधव, मगंळवारी ३ डिसेंबरला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकर चळवळीतील योगदान, या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक नाशिकच्या डॉ. इंदिरा आठवले, बुधवारी ४ डिसेंबरला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व समाज क्रांतीचे योगदान, या विषयावर दलित चळवळीचे अभ्यासक कोल्हापूरच्या महावीर कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शरद गायकवाड, गुरुवारी ५ डिसेंबरला बुद्ध धम्माची वैश्विकता, या विषयावर रयतच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे मांडणी करणार आहेत. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सकाळी दहा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी एक डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाठक हॉलमध्ये प्रसिद्ध लेखिका शिल्पा कांबळे (मुंबई) यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या हस्ते यंदाचा २२व्या महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्काराचे वितरण होणार आहे.

...............

शशिकांत शिंदे

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

सातारा :

माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान केले. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात शुक्रवारी जयंत पाटील यांनी शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान केले. संपूर्ण राज्यात असलेला संपर्क, संघटन कौशल्य आणि कामगार क्षेत्रातील काम पाहून शरद पवार यांनी तुमच्यावर ही जबाबदारी सोपविली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाबरोबर संपूर्ण राज्यातील औद्योगिक व कामगार सेलची जबाबदारी आणि आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहर-जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ही शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्ष जी जबाबदारी देईल, ती सक्षमपणे पार पाडणार आहे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबर औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवून कामगार वर्गाला न्याय देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूरज साखरे गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खंडणीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आणि मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेला सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद) याला गांधीनगर पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले. कोर्टासमोर हजर केले असता त्यालाचार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बेकायदेशीर सावकारीसह भूखंड माफियांची टोळी 'एसएस गँग'चा म्होरक्या सूरज साखरेसह त्याच्या सहा साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कलमाखाली पुणे विशेष मोक्का कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सध्या याप्रकरणी सातजण कळंबा कारागृहात आहेत. साखरेने पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगावजवळील एका रेस्टॉरंटमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तपासासाठी तो आवश्यक असल्याने पोलिसांनी कोर्टाकडे त्याचा ताबा मिळावा म्हणून पत्रव्यवहार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने १५ नोव्हेंबर रोजी त्याचा कळंबा कारागृहातून ताबा घेतला. पोलिसांनी यापूर्वीच्या गुन्ह्यांत साखरेच्या घरावर छापे टाकून खंडणीतून मिळविलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या खरेदी दस्तांच्या फायली, बँक पासबूक जप्त केले आहे. त्याने वीस ते पंचवीस टक्के व्याजाने पैसे देऊन अनेकांना गंडा घातला आहे. अनेकांना धमकावून जागा बळकावल्या आहेत. त्याच्यावर आतापर्यंत १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्चस्ववादातून खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गर्दी, मारामारी, जाळपोळ असे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडल अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज-चंदगड मार्गावर शिप्पूर तर्फ नेसरी येथे एका वळणावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे कोवाड (चंदगड) येथील मंडळ अधिकारी दयानंद विरगोंडा पाटील (वय ४२, माणिकबाग गडहिंग्लज) यांचा मृत्यू झाला.

पाटील हे चंदगड तालुक्यातील कोवाड येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत होते. गडहिंग्लजहून कोवाडपर्यंत रोज मोटारसायकलवरून ते ये-जा करीत होते. शनिवारी आपले काम आटोपून मोटारसायकलवरून (एमएच ०९ सीबी ०७७४) ते गडहिंग्लजकडे परत येत असताना शिप्पूर तर्फ नेसरीजवळ बटकणंगलेच्या वळणावर अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. पाटील हे यापूर्वी गडहिंग्लज येथे तलाठी म्हणून काम करीत होते. वर्षभरापूर्वी त्यांची मंडलाधिकारी म्हणून चंदगड तहसील कार्यालयाकडे बदली झाली. पत्नी व दोन मुलांसह ते गडहिंग्लज येथे राहत होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावळ कुंबळहाळ या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images